विलासराव देशमुख यांचा राजीनामा मंजूर

कशिद's picture
कशिद in काथ्याकूट
3 Dec 2008 - 10:56 pm
गाभा: 

विलासराव देशमुख यांचा राजीनामा मंजूर

विलासराव देशमुख यांचा राजीनामा मंजूर
नवी दिल्ली - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा राजीनामा कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी मंजूर केला.

जर उद्या कोणी विचारला कोण आहे मुख्यमंत्री तर जपून उत्तर दया [:)][8)]

(राजकरानत लक्ष असनारा घालणारा) अक्षय

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

3 Dec 2008 - 10:57 pm | मुक्तसुनीत

मोरया !
कुठल्याच वर्षी परत येऊ नका !

विकास's picture

3 Dec 2008 - 11:26 pm | विकास

ह्या "उमद्या" व्यक्तीमत्वाला जावे लागणार हे ऐकून भरून आले. आता केंद्रात आणि राज्यात दोन हसरी व्यक्तीमत्वे निघून गेली... आता परत अजून एक असेच नुसते हसरे व्यक्तिमत्व आले नाही म्हणजे मिळवले. कारण जनतेला आत्ता नेतृत्व आहे असे वाटणे महत्वाचे आहे.

देवदत्त's picture

3 Dec 2008 - 11:50 pm | देवदत्त

त्या आधी मी काय चूक केली असे त्यांनी मिडीयाला व पर्यायाने जनतेला विचारले होते.
नंतर काल ह्यांनी हायकमांडकडे सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण दिले होते. आणि माफी मागितली होती.

पण ह्यांना जनतेकडे माफी मागता आली नाही, किंवा त्याचे उत्तर नाही. फक्त हायकमांड हेच त्यांचे सर्वेसर्वा आहेत. X(

राजीनामा लगेच मंजूर झाला हे बरे, नाहीतर त्यांच्याकडून आणि मिडीया कडून आणखी काय काय ऐकायला मिळाले असते. #:S

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2008 - 11:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सकाळी दैनिकात त्यांच्या 'सेफ' च्या बातमीने जरा नर्व्हस झालो होतो.
नवा मुख्यमंत्री वर्षभरात काय करेल हा पुढे प्रश्न आहेच ? मुख्यमंत्री कणखर देणे वगैरे काँग्रेसची संस्कृती नाही.
त्यामुळे विलासराव बरे होते असे म्हणण्याची नामुष्की महाराष्ट्रीयांवर येऊ नये म्हणजे झालं !!!

दहशतवाद्यांची चौकशी, वीज भारनियमन, मराठा आरक्षण, सहावा वेतन आयोग, हे आणि विविध प्रश्न नव्या मुख्यमंत्र्याचे स्वागत करतील.

विकास's picture

4 Dec 2008 - 6:31 am | विकास

सकाळी दैनिकात त्यांच्या 'सेफ' च्या बातमीने जरा नर्व्हस झालो होतो.

नुसते "सेफ" असे वाचले नव्हते तर काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना काढता येणार नाही असे म.टा. मधे लिहीले होते. त्यामुळे अजूनच डोके फिरले... ह्यांनी नक्की काय "कॉन्फिडेन्शियल कॉन्ट्रॅक्ट" सोनीयाजींशी केले आहे असे वाटले... अर्थात काही तरी नक्कीच गोम होती कारण नाहीतर आबांप्रमाणे लगेच राजीनामा मंजूर झाला असता. पण मला वाटते खालच्या फोटोने आणि "जागो (मन)मोहन प्यारे" वगैरे घोषणांनी समजून चुकले की आता काही पर्याय नाही... बाकी आता विलासराव लवकरच कुठल्यातरी इतर भागात "प़क्षश्रेष्ठी" म्हणून वर्दी लावणार :-)

From Together Against Terrorism

पन्नास हजार मुंबईकर या मोर्चासाठी कुठल्याही राजकीय पक्षाने न बोलावता आपणहून गेले! जर काही आशा असेल तर ती या मुळेच...

विकि's picture

4 Dec 2008 - 12:08 am | विकि

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मंजूर होणारच होता.आता नविन मुख्यमंत्री कोण याचे वेध लागले आहेत.मला वाटत सुशील कुमार शिंदे किंवा नारायण राणे मुख्यमंत्रीपदी बसतील.

कपिल काळे's picture

4 Dec 2008 - 12:16 am | कपिल काळे

पुढच्या वर्षीच्या विधानसभेच्या तसेच येत्या फेब्रु- मार्च मध्ये येणारया लोकसभेच्या निवडणुकांसाठी भरपूर पैसे, पक्षाला जमवून देणारा कोण आहे?

सुशील की नारायण?

http://kalekapil.blogspot.com/

विकि's picture

4 Dec 2008 - 12:27 am | विकि

नारायण राणे .त्यात काय विचारायचे. उधा १०० % राणेच मुख्यमंत्री(राणेंवर जुगार खेळतो)

भास्कर केन्डे's picture

4 Dec 2008 - 6:49 am | भास्कर केन्डे

ऑ, कॉम्रेडं जुगारी सुद्धा झाले बॉ!!!

हेच राहिले होते ;)

विषायांतराबद्दल क्षमस्व.

भास्कर केन्डे's picture

4 Dec 2008 - 7:19 am | भास्कर केन्डे

दहशतवादाविषयीच्या बैठकीत झोपा काढणारे हे मुख्यमंत्री...

यांच्यापासून सुटका झाली हे आपले नशिबच!

रेवती's picture

4 Dec 2008 - 7:23 am | रेवती

मंजूर आनंदानं केला असेल.
खरंतर कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण न मागताच
शांतपणे राजीनामा स्वीकारून टा टा म्हटले असते तर
स्वत:ची खरी किंमत कळली असती.
त्यांचे खजील झालेले फोटो झळकायला हवे होते.

रेवती

रेवती's picture

4 Dec 2008 - 7:27 am | रेवती

दोनदा प्रकाशीत झाल्याने प्र का टा आ.

रेवती

विकास's picture

4 Dec 2008 - 9:22 am | विकास

खालील स्वातंतत्र्योत्तर चले जाव चळवळीचा पहीला "मानाचा" बळी! आता हाच "मेसेज" तमाम भारतीयांकडून सर्व राजकारण्यांना मिळोत.

अमोल केळकर's picture

4 Dec 2008 - 9:47 am | अमोल केळकर

काँग्रेस श्रेष्ठी नारायण राणे यांना देतील संधी बहुतेक .
आता जो मुख्यमंत्री असेल त्याचा कार्यकाल थोडाच असेल. पण मुख्यमंत्री पद देऊन आपण शब्दाला जागलो हे सोनियांना सांगता येईल. मुख्यमंत्री पद मिळवून राणे साहेब शिवसेनेची कशी जिरवली हे सांगतील. राणे विरोधक थोडाच कालावधी असल्याने चालवून घेतील. आणी पुढील निवडणुकीत पक्षाची सत्ता आली नाही ( जी येणे शक्य नाही असे वाटते आहे ) तर त्याचे खापर राणेंवर आपोआप फोडता येईल.
मराठा समाजाचाच मुख्यमंत्री पाहिजे असल्याने शिंदे साहेब शर्यतीत बहुतेक मागे राहतील.
असो भावी मुख्यमंत्री आणी उप मुख्यमंत्री यांना शुभेच्छा

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मुंबईतील विलासरावांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठीच्या आजच्या आमदारांच्या बैठकीसाठी श्री. प्रणव मुखर्जी आणि ए.के.ऍन्टनी यांना पक्षाचे निरिक्षक म्हणून पाठवले जाणार आहे असे कालच बातम्यांमध्ये सांगितले.

वास्तविक प्रणव मुखर्जी हे परराष्ट्रमंत्री आणि ए.के.ऍन्टनी हे संरक्षणमंत्री आहेत.मुंबईवर झालेल्या भीषण हल्ल्याला एक आठवडा होत नाही तो परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्री या आताच्या संकटकाळात महत्वाचे निर्णय घ्यायची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांना राज्याच्या मुख्यमंत्री निवडीच्या बैठकीत निरिक्षक म्हणून का पाठवले जात आहे?ते काम पक्षाचे सरकारात नसलेले इतर नेते करू शकणार नाहीत का? एकिकडे म्हणायचे की समुद्रमार्गे अतिरेकी आले आणि भविष्यकाळात ते हवाईमार्गाने येऊ शकतील. तेव्हा हवाईसुरक्षा बळकट करण्यासाठी तातडीचे निर्णय घ्यायची गरज असताना संरक्षणमंत्र्यांना पक्षाच्या कामासाठी का जुंपले जात आहे?

अमेरिकेवर ११ सप्टेंबरचा हल्ला झाल्यावर काबूलमधून तालिबान्यांना हाकलून देऊन हामीद करजाई यांचा अध्यक्ष म्हणून शपथविधी होईपर्यंत परराष्ट्रमंत्री कॉलीन पॉवेल आणि संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड हे आपल्या कामातच व्यस्त होते. किंबहुना तसे ते नसते तर अमेरिकन जनतेने त्यांचा राजीनामा मागितला असता.

रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात शिवाजी महाराजांचे संभाजीराजांना उद्देशून एक वाक्य आहे," राजे, छत्रपतींना छत्रपतीपदाशिवाय प्रपंच नाही". त्याप्रमाणेच अशा महत्वाच्या मंत्र्यांना त्यांच्या मंत्रालयाच्या कारभारापेक्षा दुसरा प्रपंच नसावा अशी जनतेची अपेक्षा असली तर त्यात काय चुकले?

क्लिंटन

विकास's picture

5 Dec 2008 - 12:35 am | विकास

त्याप्रमाणेच अशा महत्वाच्या मंत्र्यांना त्यांच्या मंत्रालयाच्या कारभारापेक्षा दुसरा प्रपंच नसावा अशी जनतेची अपेक्षा असली तर त्यात काय चुकले?

वास्तवीक जनतेच्या मतावर निवडून आलेल्यांनी त्यांच्या पक्षातील श्रेष्ठी असले तरी त्यांना वाटेल त्यालाच नेतृत्व करायला देणे, त्यांच्या हातात राजीनामा देणे वगैरे अतिशय गैर वाटते (बेकायदेशीर आहे का ते माहीत नाही).

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Dec 2008 - 10:48 am | घाशीराम कोतवाल १.२

दहशतवाद विरोधी बैठकित मुख्यमंत्री झोपा काढतो आणि पाहणी दौर्‍यात डायरेक्टर आनि अभिनेता पुत्राला नेतो विलास राव आता तुम्ही सुभाष घई व्हाच कारण आता तुम्ही दौर्‍यात स्पॉट पाहिले स्टोरी तयार आहेच आणी आता आपल्याकडे काम नाही वेळ भरपुर
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

प्रदीप's picture

5 Dec 2008 - 1:17 pm | प्रदीप

पूर्वी बॅ. बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे सर्वात कँडिड मुख्यमंत्री समजले जात. आपल्या मुख्यमंत्रीपदावरील निवडीपासून त्यांनी पत्रकारांना व जनतेला स्वतःबद्दलच्या दिलखुलास टिप्पणीने हसवत ठेवले होते. पण आता हे बिरूद विलासरावांनी संभाळले आहे असे दिसते. मुख्यमंत्री म्हणून शेवटच्या पत्रकार परिषदेत त्यांची काही वक्तव्ये ह्या कठीण परिस्थीतीतही थोडी करमणूक करून जावीत.

(येथे मी आजच्या लोकसत्ता व लोकमतातील बातम्यांचा आधार घेतला आहे. अर्थात, 'माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला' असे विलासराव म्हणू शकतीलच).

काही ठळ्क मुद्दे:

१. हे पद सोडतांना आपल्यावर कुठल्याही भष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत, तसेच कुठल्याही कोर्टाने आपल्यावर कोणते ताशेरे ओढले नाहीत, ह्याचे फार मोठे समाधान आपल्याला आहे असे ते म्हणाले (लोकमत).

२. आपल्या कारकीर्दीत अतिवृष्टि, रेल्वे बॉंबस्फोट मालिका, मालेगाव बाँबस्फोट, शेतकर्‍यांच्या आत्महत्या अशा अनेक संकटांचा सामना सरकारने यशस्वीरित्या केला, असे त्यांनी सांगितले (लोकसत्ता / लोकमत).

३. राज्याला परकिय गुंतवणूकीत क्रमांक एकवर नेण्यात तसेच 'मेकओव्हर मुंबई' [माझा प्रश्नः ??] करण्यात आपल्याला यश आले (लोकमत).

४. आपण हा राजिनामा कुठल्याही अंतर्गत अथवा बाहेरील दबावामुळे देत नसून मुंबईवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून देत आहोत असे म्हणून 'आपण लकीएस्ट अँड हॅपीएस्ट पर्सन' आहोत असे उद्गार त्यांनी काढले (लोकसत्ता).

भडकमकर मास्तर's picture

5 Dec 2008 - 4:25 pm | भडकमकर मास्तर

राजीनामा दिला दिला असं रविवार पासून चाललंय .... यांना पाच दिवस झाले, पुढचा माणूस ठरवता येत नाही?
..असंही वाचलं की प्रचंड कामं खोळंबली आहेत, खूप मीटिंग शिल्लक आहेत, दहशतवादाच्या प्रश्नावर अनेक तातडीचे निर्णय बाकी आहेत आणि यांची गल्ली ते दिल्ली राजकारणं, आमदारांचे शक्तिप्रदर्शन असले प्रकार चालले आहेत....

... हे सारं पाहून उबग आलाय...... निवडणुकीनंतर महिनामहिना गोंधळ घालतातच, आत्ताही तेच ?

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/