IIT आणि USA

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
14 Jul 2015 - 4:09 pm
गाभा: 

आजकाल आयआयटी मधील अनेक विद्यार्थ्यांना campus इंटर्व्यू मध्ये किंवा त्यानंतर लगेच 100 ते 250 कोटी प्रतिवर्ष पगार देणार्‍या अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळतात . इतरांना देखील गेलाबाजार 10 ते 20 कोटी प्रतिवर्ष पगाराचे जॉब अमेरिकेत ऑफर होतात . किंबहुना आयआयटी करनारांचे उद्दीष्ट अमेरिकेत सेटल होणे हेच असते , मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला?

मला वाटते आयआयटी मध्ये प्रवेश देतानाच अमेरिकेत जॉब करायचा असेल तर नोकरी लागल्यानंतर 3 ते 5 वर्षात 5 ते 10 कोटी रुपये आयआयटी ला भारतीय चलनात भरण्याचे बंधपत्र करून घ्यावे व ते वसूल करून घ्यावेत ...\

आपले काय म्हणणे ? मंडळी ?

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

14 Jul 2015 - 4:18 pm | उगा काहितरीच

आकडे पाहून आकडी आली!

मंदार कात्रे's picture

14 Jul 2015 - 4:23 pm | मंदार कात्रे

माफ करा मंडळी 1 te दीड करोड असे वाचावे / गळती से मिसटेक हो गयी

बॅटमॅन's picture

14 Jul 2015 - 4:29 pm | बॅटमॅन

अगदी बरोबर, विचारांच्या गळतीमुळेच मिष्टेक झाली. =))

१०० ते २५० कोटी प्रतिवर्ष हे वाचून लगेच जेईईची पुस्तकं मागवायला धावणार होतो.

प्यारे१'s picture

14 Jul 2015 - 7:02 pm | प्यारे१

अगदी १ ते १.५ कोटी 'प्रति वर्ष' तेही फ्रेशरसाठी असलं तर पुन्हा अभ्यासाचा विचार करायला काय हरकत आहे? ;)

असल्या छोट्यामोठ्या अमौंटसाठी परत अभ्यास कोण करणार? ;)

प्यारे१'s picture

14 Jul 2015 - 9:21 pm | प्यारे१

बाळ लैच मोठ्या पावलाचं हाय ब्वा! ;)

अस्वस्थामा's picture

14 Jul 2015 - 9:37 pm | अस्वस्थामा

डालरा डालरा.. !! ;)

खेडूत's picture

14 Jul 2015 - 4:29 pm | खेडूत

ITI आणि UAE

आजकाल आयटीआय मधील अनेक विद्यार्थ्यांना campus इंटर्व्यू मध्ये किंवा त्यानंतर लगेच 20 ते 25 लाख प्रतिवर्ष पगार देणार्‍या आखातातील गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळतात . इतरांना देखील गेलाबाजार 8 ते 10 लाख प्रतिवर्ष पगाराचे जॉब आखातात ऑफर होतात . किंबहुना आयटीआय करनारांचे उद्दीष्ट आखातात जाणे हेच असते , मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला?

मला वाटते आयटीआय मध्ये प्रवेश देतानाच आखातात जॉब करायचा असेल तर नोकरी लागल्यानंतर 3 ते 5 वर्षात 5 ते 10 लाख रुपये आयटीआय ला भारतीय चलनात भरण्याचे बंधपत्र करून घ्यावे व ते वसूल करून घ्यावेत ...\

आपले काय म्हणणे ? मंडळी ?

ह. घ्या हो धागाकर्ते! :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Jul 2015 - 4:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य मुद्दा आहे रे मंदारा. जोडीला एफ.टी.टी.आयला ही घे.ह्यांच्यावरही खूप खर्च होतो असे नुकतेच वाचले.त्या मुन्नाभाईवाल्या राजकुमार हिरानीकडून(तो एफ टी टी आय वाला आहे) ३/४ कोटी वसूल करावेत असे ह्यांचे म्हणणे.

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2015 - 4:48 pm | टवाळ कार्टा

मै इज ब्याक :) आता जेपी पण येईल ;)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Jul 2015 - 4:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य मुद्दा आहे रे मंदारा. जोडीला एफ.टी.आय.आयला ही घे.ह्यांच्यावरही खूप खर्च होतो असे नुकतेच वाचले.त्या मुन्नाभाईवाल्या राजकुमार हिरानीकडून(तो एफ टी टी आय वाला आहे) ३/४ कोटी वसूल करावेत असे ह्यांचे म्हणणे.

लौ यु माईआज्जी आणि नानाजोबा!

नाव आडनाव's picture

14 Jul 2015 - 5:30 pm | नाव आडनाव

सगळ्या सदस्यांना एक प्रश्न आहे -

मिसळपावचे किती सदस्य आहेत?
जर तुमचं उत्तर - "मिसळपाव च्या डेटाबेस मधे आहेत तितके" असे असेल तर ते चूक आहे.

.
.
.

एक सदस्य तुम्ही कमी मोजताय ...

.
.
.

'हे' :)

माईंनी आयडी बदलून "माईसाहेब हे कुरसूंदीकर" केला तर नव्या सदस्यांना "हे" म्हणजे कोण अशी शंका येणार नाही.

द-बाहुबली's picture

14 Jul 2015 - 5:35 pm | द-बाहुबली

हे हे हे... xD xD xD

आनन्दा's picture

17 Jul 2015 - 11:27 pm | आनन्दा

रोफ्ल

कपिलमुनी's picture

14 Jul 2015 - 4:37 pm | कपिलमुनी

सध्या जे परदेशी आहेत त्यांचा काय म्हणणे आहे ते वाचू या .
कारण माध्यमिक शाळा या अनुदानित असतात आणि त्यावर सरकारने पैसे खर्च केले आहेत .
आय आय टी प्रमाणेच परदेशस्थांकडून खर्च वसूल करवा काय ?

पिलीयन रायडर's picture

14 Jul 2015 - 4:38 pm | पिलीयन रायडर

हं...

मुद्दा बरोबर आहे..

म्हणजे नक्की सरकारने का गुणवंत विद्यार्थ्यांवर पैसा खर्च करावा जर पुढे जाउन ते इथे काम करणारच नसतील?
ह्यात सरकारचा काय फायदा?

ह्यापेक्षा सरकारी शाळांसाठी हा पैसा वापरता येईल ना?

द-बाहुबली's picture

14 Jul 2015 - 4:41 pm | द-बाहुबली

करदात्यांचा जेवढा पैसा एक विद्यार्थी वापरतो त्याच्या कितीतरी पट पैसा तोच विद्यार्थी जर बाहेर स्थिरस्थावर झाला तर भारतात (प्रत्यक्षपक्ष) पाठवतो..

तिमा's picture

14 Jul 2015 - 4:50 pm | तिमा

करदात्याचा जेवढा पैसा एक विद्यार्थी वापरतो त्याच्या शंभर, हजार पटीने करदात्याचा पैसा एक राजकारणी वापरतो, त्याच्याकडून वसूल करण्याची हिंमत आहे का तुमची ?

संजय पाटिल's picture

14 Jul 2015 - 4:53 pm | संजय पाटिल

परदेशात नोकरी करणारे लोक आपला पैसा भारतातच परत आणत असतील तर त्यावर नाममात्र कर आकारला जातो कारण हे पैसे परकीय चलणच्य स्वरूपात आपल्याच गंगाजळी मधे जमा होत असतात. त्यामुळे सरकारने त्यांना ही सवलत दीली आहे.

'पिंक' पॅंथर्न's picture

14 Jul 2015 - 4:57 pm | 'पिंक' पॅंथर्न

आय आय टी चे सगळेच विद्यार्थी अमेरिकेत अथवा परदेशात गलेलठ्ठ पगारावर जातात काय?
हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या डिस्टींशन वाल्यांना अशी संधी मिळते.

फी मधुन पैसे वसुल करणे हे अन्यायकारक होईल.
पण सरकारचा पहीली ते अगदी पदवी पर्यंत एका विद्यार्थ्यावरचा खर्च लक्षात घेता माझ्या मते पदवी मिळवल्यानंतर पहिली काही, निदान कमितकमी दोन वर्षे तरी भारतातच काम करणे बंधनकारक करावे. म्हणजे त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा थोडा तरी उपयोग देशाला होईल.

जसे मेडीकलच्या विद्यार्थ्यांना काही काळ ग्रामीण भागात अॅपरंट्सशीप करणे बंधनकारक असते.

बॅटमॅन's picture

14 Jul 2015 - 5:05 pm | बॅटमॅन

अतिशय बिनडोक धागा आहे. इन्सेण्टिव्ह आणि अ‍ॅसेट क्रिएशन कशाशी खातात हे माहिती नसलेला.

अस्वस्थामा's picture

14 Jul 2015 - 5:33 pm | अस्वस्थामा

:)))

इन्सेण्टिव्ह आणि अ‍ॅसेट क्रिएशन कशाशी खातात

संबंध आहे हे मान्य, पण हे कशाशी खातात याचा धागा काढण्यासंदर्भात इथे तितकासा संबंध वाटत नै..
धागाकर्त्याच्या बाजूने डेविल्स अ‍ॅडवोकसी करायची झाली तर हेच म्हणणे असेही मांडता येईल की,
भारतीय अनुदानित संस्थांमधून पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या भारतीय नागरिकास शिक्षण पूर्ण झाल्यावर "भारतात किमान २ वर्षे योगदान अथवा २ वर्षात अनुदानित शिक्षणाची फी परत करावी" असा पर्याय असावा. .

(पदवी-पूर्व शिक्षण सरकारची जबाबदारी म्हणून इथे गृहित आहे. त्यास तूर्तास बाजूस ठेवू हवेतर)

बॅटमॅन's picture

14 Jul 2015 - 6:24 pm | बॅटमॅन

हा मुद्दा "नॉट ईव्हन राँग" अशा क्याटेगरीत असल्याने तूर्त तरी दुर्लक्ष करण्यात येत आहे.

अस्वस्थामा's picture

14 Jul 2015 - 7:08 pm | अस्वस्थामा

तूर्त तरी दुर्लक्ष करण्यात येत आहे

हे का हो ? म्हणजे कळले नाही. "नॉट ईव्हन राँग" म्हणून दुर्लक्ष म्हणजे मुद्दा गृहित धरण्यालायक नाही असा अर्थ आहे काय?

अत्रन्गि पाउस's picture

14 Jul 2015 - 10:50 pm | अत्रन्गि पाउस

!!

निम्मे सोफ्टवेयर वाले आयआयटी मध्ये होते का हो? त्यातले कुठून कुठून शिकून बाहेर जाता आहेत मग तुमचा आयआयटी वाल्यांवर का हो राग?माझ्या माहितीत २ मायक्रोबायलोजी आणि १ फार्मसीवाला पण बाहेर गेलाय. आता लोकांना इथे चांगले कॉलेज मिळत नाही म्हणून लोक १२वि नंतर बाहेर जायला लागले आहे. ह्यावर काय एक धागा काढा बघू

विवेकपटाईत's picture

14 Jul 2015 - 8:40 pm | विवेकपटाईत

१२ पास बाहेर गेलेले घरी पैसा पाठवितात. परीकीय चलनात यांचा वाट सर्वात मोठा आहे.
उच्च शिक्षित त्यांच्या घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे ते पैसा पाठवीत नाही.
बाहेर जाणार्या उच्च शिक्षित लोकांकडून १२% व्याजसकट पैसा वसूल करण्यात काही ही वागवे नाही.

मित्रहो's picture

14 Jul 2015 - 10:04 pm | मित्रहो

शासकीय अभियांत्रिकी किंवा फ्रिसिटवर पास झालेले पण अमेरीका किवा इतर देशात जातात तेंव्हा नियम त्यांनाही लागू करायला हवा. बरेच आयआयटीवाले नंतर भारतात परत येतात. काही आयआयटीच्या लोकांनी अमेरीकेत जाउन स्वतःचे उद्योग काढले मग त्याची शाखा भारतात काढली. कन्वल रेखी, विनोद खोसला या लोकांनी भारतात बरीच गुंतवुणुक केली. कदाचित सरसकटीकरण होइल पण आयआयटीचे जी मुले बाहेर जातात ती काही दिवसात बऱ्याचदा उच्च पदावर पोहचतात त्यामुळे ते मोठ्या निर्णायांवर प्रभाव पाडू शकतात. ही गोष्ट इतर कॉलेजातल्या विद्यार्थांबाबत घडत नाही.

अवांतर
आयआयटीवाले भारतात राहीले तर मिडीयाला रोज एक बातमी देउ शकतात हे दिल्लीत दिसले.

पाटीलअमित's picture

15 Jul 2015 - 2:01 am | पाटीलअमित

हा लेख तुम्ही विचारांशी जुळणारा आहे
नेमका योगायोग कि दोन्ही लेख एकाच वेळी समोर आले
http://scroll.in/article/715918/Dear-Smriti-Irani-stop-giving-my-money-t...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jul 2015 - 3:24 am | निनाद मुक्काम प...

लष्करात वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यावर त्यात सेवा करणे सक्तीचे असते अधिकार माहिती डॉ खरे सांगतील
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ग्रामीण भारत सेवा देणे सक्तीचे आहे
तर आय आय टी वाल्यांचे लाड का
नेहरूंनी ज्या उद्देशाने आय आय टी स्थापन केली त्या उद्देशाला हरताळ फासला जातो , लोकशाहीत विद्यार्थ्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे पण आय आय टी च्य प्रवेश परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात त्यात काही मोजके मर्यादित जाग असल्याने आय आय टी मध्ये प्रवेश घेतात
उरलेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये अनेक गुणी हुशार मुले असतात
त्यांना जागेअभावी प्रवेश मिळत नाही.
तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना भारतात राहून देशासाठी आहे त्या परिस्थितीत काही करण्याची इच्छा आहे अश्या उमेदवारांना प्राधान्य देण्यास काय हरकत आहे
म्हणजे यु पी एस सी सारखी तोंडी परीक्षा घेऊन उमेदवाराच्या हुशारी सोबत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुद्धा कस लागेल
अनेक गुणी मुलांना डावलून एक गुणी मुलगा आय आय टी मध्ये प्रवेश घेतो व परदेशी उडून जातो तेव्हा उरलेल्या गुणी मुलांच्या मधून एखादा देशात राहून देशासाठी काहीतरी करण्यासाठी प्रेरित मुलांना आय आय टी मध्ये प्राधान्य का मिळू नये
त्याने गुणवत्तेत तडजोड होणार नाही किंवा आय आय टी अ सरकारी अनुदाने बंद करा
हा ही एक उपाय आहे

अभिजित - १'s picture

15 Jul 2015 - 6:09 pm | अभिजित - १

फक्त IIT का ? मग असा नियम करूया ना कि कोणताही विद्यार्थी जो सरकारी संस्थेत शिकला तो बाहेर कधीच नोकरी करायला जाऊ शकणार नाही. होईल तुमचे समाधान ?
आणि IIT मध्ये तोंडी परीक्षा, व्यक्तिमत्व चाचणी घेण्याची कल्पना तर अफलातून . हे पोचतील का हो तिकडे मग ? रोजगार मजुराची मुले ?
ज्ञानी लोकांनी एकदम MBA style चकचकीत असलेच पाहिजे IIT मध्ये जायचे असेल तर असा नियमच करून टाकू. नाहीतर तुमच्या ज्ञाना ला इकडे काही किंमत मिळणार नाही हे ठाम पाने आपण सांगून टाकू.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jul 2015 - 1:03 am | निनाद मुक्काम प...

हे पोचतील का हो तिकडे मग ? रोजगार मजुराची मुले ?
धोनीच्या एका मुलाखतीची आठवण झाली त्यात तो म्हणाला
की छोट्या शहरातील लोकांना आपले लक्ष्य गाठण्यासाठी बालपणापासून संघर्ष करतात म्हणूनच ते शहरी मुलांच्या पेक्ष्या मानसिक दृष्ट्या सक्षम असतात..
श्रीरंग ची कल्पना आवडली

अभिजित - १'s picture

16 Jul 2015 - 5:18 pm | अभिजित - १

तुमचे ज्ञान अफलातून आहे. UPSC मधल्या interview बद्दल.

भुमन्यु's picture

15 Jul 2015 - 11:02 am | भुमन्यु
अभिजित - १'s picture

15 Jul 2015 - 5:53 pm | अभिजित - १

अंदाजे १०,००० सीट्स IIT मध्ये असतात. त्यातले किती मुले नोकरी करता बाहेर जातात ? २० टक्के / २५ टक्के ? किती ? चला २० टक्के पकडू. म्हणजे २००० लोकांनी भारत मातेला आपली सेवा देण्या पेक्षा Sam Uncle आपला मानला. अरे काय वाईट आहे याच्यात ? असे समजा ना कि इथल्या मुलांना ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांच्या करता २००० जास्त नोकर्या निर्माण झाल्या.
मी असे म्हणत नाहीये कि IIT च्या मुलाच्या जागी स है जोंधळे, तासगावकर कोलेज चा मुलगा लागेल. IIT च्या त्या जागेवर VJTI COEP ची मुले. या VJTI वाल्यांच्या जागेवर , भारती , DY पाटील ची मुले. थोडक्यात नोकर्या झिरपत खालच्या स्तर पर्यंत पोचतील ना. आत्ताच किती मुले नोकरी नाही म्हणून रडतात. त्यांचे भले होईल.
मी असे म्हणतच नाही कि कंपनी ला नालायक ( शैक्षणिक दृष्ट्या ) मुले नोकरीवर ठेवावी लागतील. आपण बघतो कितीतरी हुशार मुले पण नशीब खराब म्हणून नोकरी नाही. त्यांचे भले होईल. he vacha

अभिजित - १'s picture

15 Jul 2015 - 6:12 pm | अभिजित - १

त्यातले किती मुले नोकरी करता बाहेर जातात ? >> त्यातले किती मुले नोकरी लगेच बाहेर जातात ?
असे वाचावे. ३/४ वर्षात तर भारती वाला पण जातोच. त्यात काय नवल नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jul 2015 - 4:57 am | निनाद मुक्काम प...
अभिजित - १'s picture

17 Jul 2015 - 1:03 pm | अभिजित - १

याच्यात IIT च्या विद्यर्थी चा काय दोष आहे ? अमेरिका - जिथे सगळे ( शब्दात पकडू नका ) मोट्ठे शोध लागले, लागत आहेत. तिथे उद्योग जगत आणि त्यांचे मालक मोठ्या प्रमाणावर शिक्षणात गुंतवणूक करतात. फायद्या करता नाही. आणि आयुष्याच्या शेवटी समाजाचे देणे लागतो या भावनेने प्रचंड दान हि करतात. जे पी मोर्गन , रॉकफेलर , कार्नेजी . शोधा , वाचा .
इथे बिर्ला , गोएंका , अंबानी , अदानी , मारवाडी पंजाबी उद्योगपती . कोणी असे काही केले आहे का ?
इथले उद्योगपती एक नवीन धंदा म्हणून काही कॉलेज काढतात. अमेरिकेत तसे नसते. खूप मोठा फरक आहे.

आणि नवीन शोध - INFOSYS ने काय लावले हो नवीन शोध ?
काय product , OS ? वेब server , गेला बाजार एखादा browser ? काय शोध लावले ? आपले IT मजूर US मध्ये ठराविक बिलिंग रेट वर लावले. त्यांच्या डोक्यावर MBA supervisor बसवला. ( जो स्वत काही करू शकत नाही. पण मजूर लोकांना दम भरण्याचे काम जोरात करतो ) थोडक्यात रो ह यो ( रोजगार हमी योजना ) ची एकदम चकचकित आवृत्ती !!
थोडक्यात मूर्ती म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान , आपण कोरडे पाषाण .

संदीप डांगे's picture

17 Jul 2015 - 2:13 pm | संदीप डांगे

सहमत...

अनुप ढेरे's picture

17 Jul 2015 - 2:51 pm | अनुप ढेरे

आणि नवीन शोध - INFOSYS ने काय लावले हो नवीन शोध ?

इंफोसिसने नवे शोध लावले नाहीत कारण त्यांचे ते बिझनेस मॉडेल नाहीच्चे. पण इंफोसिस आणि तत्सम भारतीय आय्टी कंपन्या या जगातल्या अवाढव्य कंपन्यांना त्यांचं काम स्वस्तात करून देतात आणि त्यांना अधिक एफिशिअंट बनवतात. दुसर्‍याला एफिशिअंट बनवून त्याची हजारो कोटींची कंपनी बनवणं ही नक्कीच अचिवमेंट आहे.

दुसरीकडे आयाआयटी \आयायेस्सी यांच्या कडून कटिंग नव्या तंत्रज्ञानाची अपेक्षा ठेवली जाते कारण त्यांची स्थापना त्यासाठी झालेली आहे. सरकार त्यावर अमाप पैसे खर्च करत असते.

आणि मूर्ती यांच विधान चूक आहे हे सिद्ध करा की. सांगा आयाय्टी/आयायेस्सी ने लावलेले शोध/तंत्रज्ञान जे आज घराघरात वापरलं जातय. लोकांना आनंदच वाटेल असं काही असेल तर.

बाकी आयाय्टीमधून शोध लागले नाहीत अस म्हणल्यावर इन्फीने कुठे लावलेत शोध अस विचारणं म्हणजे दोघे समान पातळीवरचे आहेत हे म्हणणं नव्हे काय?

अभिजित - १'s picture

17 Jul 2015 - 4:04 pm | अभिजित - १

अर्धे वाचून उत्तर देऊ नका हो ढेरे.
US आणि इंडिया, उद्योगपती लोकांची विचारसरणी वेगळी आहे. इकडे मारवाडी बनियागिरी आहे. तिथे उद्योग आणि विद्यापीठ हातात हात घालून काम करतात. इथे काय होतेय ?
खरे सांगायचे नसेल, कबूल करायचे नसेल तर फेका. Efficiency च्या गोष्टी काय सांगता ? उद्या आमच्या घरची भांडीवाली पण अगदी हाच दावा करू शकतेच ना. वेगळा स्तर पण तीच गोष्ट .
पिंडी ते ब्रह्मांडी. ऐकलीय का हि म्हण कधी ? इथे भारतात INFY कशाला , सगळ्यांचे तेच business मोडेल असते. मग धंदा काय पण असो. नवीन काही शोध लावायचा नाही. सगळे बाहेरून आणायचे . जास्त रिस्क न घेता , कायम उत्पन्न कसे चालू राहील हे business मोडेल. ठीक आहे . करा तसे. पण मग लोकांना अक्कल शिकवू नका.
अशा ठिकाणी IIT वाले काही नवीन करायला बाहेर जाऊ लागले कि त्यांना अडव काहीतरी तात्विक मुद्दा काढून. खेकडा / jealous मनोवृत्ती आहे.

अनुप ढेरे's picture

17 Jul 2015 - 4:11 pm | अनुप ढेरे

आणि मूर्ती यांच विधान चूक आहे हे सिद्ध करा की. सांगा आयाय्टी/आयायेस्सी ने लावलेले शोध/तंत्रज्ञान जे आज घराघरात वापरलं जातय. लोकांना आनंदच वाटेल असं काही असेल तर.

या प्रश्नाचं उत्तर द्याल असं वाटलं होतं.

शेपूट घालायची तर सरळ घाला. गाठी का मारता?

चैतन्य ईन्या's picture

17 Jul 2015 - 4:31 pm | चैतन्य ईन्या

सिद्ध काय करायचे आहे, खरच आहे ते. दुर्दैवाने आपल्याकडे सध्या बेसिक गोष्टी सुधाराव्यात किंवा सुरळीत कराव्यात अशी मानसिकताच नैह्ये. मग कसले शोध लागतायत. काय होतंय कि आहे त्या परिस्थिती कसे पुढे जाता येईल इतकेच बघायची सवय म्हणा किंवा अजून काहीही म्हणा अशी विचित्र गोष्टी होवून बसली आहे. सगळीकडे फक्त जुगाड आणि त्यालाच आपण मान्यता देतो. चलता है कारभार सगळा.

अत्रन्गि पाउस's picture

21 Jul 2015 - 6:04 am | अत्रन्गि पाउस

ह्यावरून कोंबडीप्रेमी ह्यांचा हा लेख आठवतो

अभिजित - १'s picture

17 Jul 2015 - 4:36 pm | अभिजित - १

IIT ला industry ची साथ नाही . जशी US मध्ये कार्नेजी , MIT , princeton ला मिळते तशी. साधे उत्तर आहे. समजायची अक्कल नसेल तर माफ करा, मी याच्या हून जास्त समजावून देऊ शकत नाही.
आणि म्हणून काही IIT वाले बाहेर जातात तर त्यांचे पैसे बघून लोक जळतात.

अनुप ढेरे's picture

17 Jul 2015 - 5:02 pm | अनुप ढेरे

हा मुद्दा बाहेर जाण्याबद्दल नाही. नारायण मूर्तींच्या विधानाबद्द्ल आहे. मूर्तींचं विधान बरोबर आहे हे तुम्हाला मान्य आहे तर.

आनंदी गोपाळ's picture

17 Jul 2015 - 5:24 pm | आनंदी गोपाळ

आययटीला सरकार प्रचण्ड पैसा देतं आहे. तिकडे कंपन्या देत आहेत.
मग अडचण कुठे आहे? कंपनीची साथ म्हणजे नक्की काय हवं आहे तुम्हाला?

संदीप डांगे's picture

17 Jul 2015 - 5:04 pm | संदीप डांगे

ते विधान बरोबरच आहे, चूक काहीच नाही त्यात. पण कोण म्हणतंय त्यालाही काही महत्त्व आहे की नाही? पैसा, तंत्रज्ञान, वेळ, क्षमता, परिस्थिती हाताशी असतांना मूर्थींनी काय केले हे महत्त्वाचे आहे की नाही?

आधी केले मग सांगितले असा थोरामोठ्यांचा शिरस्ता असतो असं लहानपणापासून ऐकत आलोय. त्याप्रमाणे मूर्तींनी काय उत्पादने काढली जी जगाला बदलवून टाकणारी ठरली हाही प्रश्न विचारणे आलंच की. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून मूर्तींनी जे विधान केलंय त्याचं अर्थाची विधानं ऐकत आलोय आपण. ते लहान असतांना मूर्तींनीही ऐकले असेल. मग स्वतः त्याप्रमाणे संधी असतांना जे करू शकले नाहीत त्यांना इतरांना डोस पाजायचा अधिकार काय?

उलट त्यांनी असे म्हटले असते की 'ठिकाय, नाही झालं ना ६० वर्षात, आपण सगळे मिळून आता करुया. आता काळ/परिस्थिती योग्य आहे. मी माझ्यातर्फे संशोधनासाठी अमूक इतके करोड देतो दरवर्षी. चांगली संशोधनं/आयडीयाज आणा आणि ग्रँट मिळवा. इन्फोसिस तुमच्यासोबत पार्टनर्शीप करून तुमचे उत्पादन जगात आणेल.' तर कुणीही विरोधी स्वर काढला नसता. किंवा गेले दहा-पंधरा वर्ष ते हेच करतायत पण ग्राउंडब्रेकिंग काही तयार झालं नाही म्हणून वरिल विधान केलं तर उद्विग्नता म्हणून समजून घेऊ शकतो. इन्फोसिस तर्फे स्टार्ट-अप फंड यावर्षी सुरु झाला.

परदेशात वाय काँबीनेटर ही सीडफंड कंपनी २००५ मधे सुरु झाली. आजवर त्यांनी ८४० कंपन्या जन्माला घातल्यात. त्यांची एकूण मार्केट वॅल्यू तीस बीलियन डॉलर आहे. हेच भारतात सुरू करायला इन्फोसिसकडे सर्वप्रकारची सुविधा असतांना २०१५ उजाडले तेही मॉडेल परिपूर्ण नाही.

एक व्यावसायिक म्हणून त्यांनी प्रचंड संपत्ती/नाव कमावले म्हणून महत्त्वाच्या विषयांवर फक्त पिंकटाकू पवित्रा घेणे त्यांच्यासारख्या कॅलिबरच्या माणसाला शोभत नाही.

dadadarekar's picture

15 Jul 2015 - 6:30 pm | dadadarekar

हे प्रचंड मोठे बांडगूळ आहे.

अन्या दातार's picture

16 Jul 2015 - 5:15 am | अन्या दातार

अगदी खरंय. एकजात बंद करुन टाकल्या पाहिजेत सगळ्या आयायटीज. तरंच नेहरुंच्या कल्पनेतला तंत्रकुशल भारत निर्माण होईल.
नलिनीरंजन सरकार मुर्दाबाद!!
बिधानचंद्र रॉय मुर्दाबाद!!

iitkgp

जाता जाता - देशातील पहिल्या आयायटीच्या मुख्य इमारतीवरचे बोधवाक्य

मंदार कात्रे's picture

15 Jul 2015 - 8:56 pm | मंदार कात्रे

दुसरा एक पर्याय म्हणजे फक्त परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या सोयीसाठी अलग व पूर्णपणे विना-अनुदानित पण सरकारी आयआयटी / आय आय एम स्थापन करावेत.
आपले काय म्हणणे ? मंडळी ?

श्रीरंग_जोशी's picture

15 Jul 2015 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी

याच ठिकाणी कशाला ज्यांची आर्थिक परिस्थिती जेवढी सक्षम असेल तेवढ्या ठिकाणी सरकारी अनुदानांच्या लाभार्थींमधून त्या मंडळीना काढावे. अर्थात असे काही केल्यास बहुतेक लोक स्वतःची आर्थिक क्षमता प्रत्यक्षापेक्षा जमेल तेवढी करून दाखवण्याचा जोरदार प्रयत्न करतील.

डिझेलवर चालणार्‍या लक्झरी कार्सचा खप भरपूर असणे ही भारतीय व्यवस्थेचा क्रूर विनोद आहे.

अतिशय बिनडोक धागा आहे. इन्सेण्टिव्ह आणि अ‍ॅसेट क्रिएशन कशाशी खातात हे माहिती नसलेला.

ब्याटोबा,

गेली कित्येक वर्षे, (फक्त मेरिटने शासकीय कॉलेजात शिकलेल्या, रिझर्वेशन व ओपन दोन्ही) वैद्यकीय विद्यार्थ्यांना बंधपत्र सादर करणे अनिवार्य का आहे? (किमान गेल्या ३० वर्षांपासुन. मी स्वतः शासनाचा बंधपत्रित उमेदवार होतो. शासकीय सेवा करून बाँड फेडला आहे)

आजही खेड्यात नोकरी केल्याशिवाय या मुलांना पीजी एन्ट्रन्सला बसूही दिले जात नाही. एमबीबीएस केल्यानंतर देश सोडला तर २० एक लाखांचा दंड भरावा लागेल असे अ‍ॅडमिशन घेतानाच बाँडपेपरवर लिहून द्यावे लागते.

बरे, या मुलांना फी माफ असते काय? तर ते ही नाही. सरकारी फी देखिल तगडी आहे. सुमारे ३००० रुपये प्रति महिना, मिनिमम. होस्टेल, मेस, पुस्तके, लॅब, लायब्ररी इ.इ. वेगळे. लाख रुपये किमान वार्षिक खर्च आहे.

शासकीय विद्यालयांतील प्राध्यापकही मुख्यत्वे करून रुग्ण तपासणी, त्यांच्यावरील शस्त्रक्रिया, उपचार इ. मध्येच जास्त व्यस्त असतात. रात्री बेरात्री येऊन सेवाही देतात. अर्थात, त्यांच्यावर खर्च केलेला पगार विद्यार्थ्यांना शिकवणे सोडून समाजोपयोगी कामांवर खर्च होतो.

पीजी स्टुडंट्स हे रजिस्टर्ड एमबीबीएस असून सरकारी अवाढव्य रुग्णालये मुख्यत्वे करून यांच्याच जिवावर चालतात. यांना स्टायपेंड मिळत असला तरी २४-३६-७२ तासा पर्यंतची सलग ड्यूटी करणे नॉर्मल समजले जाते.

इतके करूनही बाँड 'खारिज' होत नाही. मिलिटरी कॉन्स्क्रिप्शन सारखे (जे आपल्या देशात नाही) या विद्यार्थ्यांना राबवून घेतले जाते.

आता, या तुलनेत, इंजिनियरिंग वा आयायटीवाल्यांना अशी कोणती एक्स्ट्रा शिंगे असतात, ज्यामुळे यांना मेडिकल विद्यार्थ्यांसारखा बाँड लावू नये?

हे बाँड्स प्रायव्हेट कॉलेजेसमधल्या डोनेशनवाल्यांना लागू नाहीत. तिथल्याही मेरिटवाल्यांना आहेत. (माझ्या माहितीप्रमाणे.)

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Jul 2015 - 11:48 pm | अनिरुद्ध.वैद्य

आम्ही तर तयारच आहोत!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jul 2015 - 3:52 am | निनाद मुक्काम प...

आता, या तुलनेत, इंजिनियरिंग वा आयायटीवाल्यांना अशी कोणती एक्स्ट्रा शिंगे असतात, ज्यामुळे यांना मेडिकल विद्यार्थ्यांसारखा बाँड लावू नये?
असतात हो शिंगे
लिखाणातून दिसतात की

अन्या दातार's picture

17 Jul 2015 - 5:45 am | अन्या दातार

सेवेच्या टँजिबिलिटीचा मुद्दा सोडल्यास फार काही हाती लागत नाही. वैद्यकीय सेवेची ग्रामीण भागात असलेली पोकळी बाँडपद्धतीने भरुन काढण्याचा विचार शासनाने केला असावा. इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांवर इमिजिएट जोखमीची / जिवाची जबाबदारी विद्यार्थीदशेत तरी थेट नसल्याने मेडीकलच्या तुलनेत त्यांना काही शिंगे जास्त फुटल्याचे दिसूही शकेल.

मला एक मुद्दा अजिबात कळला नाही, तो असा की बाँड लादून नक्की साध्य काय होणार? भारतातील सर्व आयायटी मिळून जी काही विद्यार्थीसंख्या होईल त्यातील नक्की किती विद्यार्थ्यांना लगच्यालगेच बाहेर नोकरी मिळते? १% पण नसेल हो होत. मग बाकीचे जे ९९% विद्यार्थ्यांवर बाँड लादला काय किंवा लादला नाही काय?

आज कितीतरी स्टार्ट-अप्स हे आयायटी व आयायएमच्या विद्यार्थ्यांनी चालू केलेले दिसून येतील. त्यातून नोकरीच्या संधी विविध शाखांच्या पदवीधरांना मिळतात. विविध कंपन्यांमध्ये काम करणारे इंजिनीअर्स कंपनीचा पैसा वाचवण्यासाठी प्रोजेक्ट्स करतात. त्यामुळे कंपन्यांचा खर्च कमी होऊन फायदा वाढतो. या फायद्यावर कंपन्या मिनिमम आल्टरनेट टॅक्स भरतात. हे अ‍ॅसेट क्रियेशन भारत सरकारला व पर्यायाने आयायटीला काहीच उपयोगाचे नाही?

आयायटीत कँपस रिक्रूटमेंट करायची असेल तर कंपन्यांना आयायटीला पैसे द्यावे लागतात. त्यातूनही त्यांचा खर्च निघतोच काही प्रमाणात.

अनुप ढेरे's picture

17 Jul 2015 - 10:23 am | अनुप ढेरे

आज कितीतरी स्टार्ट-अप्स हे आयायटी व आयायएमच्या विद्यार्थ्यांनी चालू केलेले दिसून येतील.

आयाय्टी चा शिक्का असेल तर फंडिंग मिळ्वणे सोपे असेल तुलनेने असं वाटतं.

संदीप डांगे's picture

17 Jul 2015 - 10:58 am | संदीप डांगे

हे खरं आहे. तुमच्याकडे आयआयटीची डीग्री असेल तर तुम्ही कितीही बिन्डोक आयडीया बँकर्स आणि इन्वेस्टर्स समोर ठेवली तरी ती झटक्यात पास होते. पण आयआयटीयन नसाल तर जेनुइन व वर्केबल आयडीयाज ना कुत्रंही विचारत नाही. स्वानुभवाने सांगतो.

मित्रहो's picture

17 Jul 2015 - 6:49 pm | मित्रहो

आयाय्टी चा शिक्का असेल तर फंडिंग मिळ्वणे सोपे असेल तुलनेने असं वाटतं.

हे तितकेसे खरे नाही.कुणी यावे काहीतरी आयडीया सांगावी, आयआयटीचे सर्टीफिकेट दाखवावे फंडींग मिळवावे असे होत नाही. कुणाला जवळून ओळखत असल्याशिवाय कुणी पैसा गूंतवत नाही. आयआयटाचे Alimni Network तुलनेत मजबूत असते हे खरे. भारतात जे सीड फंड आहेत Indian Angel Network, Mumbai Angel Network Seed Fund या साऱ्यांवर आयआयटीचा प्रभाव आहे असे वाटत नाही.

वर कुणीतरी इन्फोसिस आणि नारायण मूर्तीने काय केले वगेर म्हटले आहे. त्याकाळात त्या परिस्थितीत मूर्तीने जे केले ते कौतुकास्पद आहे फार मोठे काम आहे. राजीव गांधींनी नुसते संगणकाचे नांव काढले तर किती नावे ठेवली गेली होती. सॅम पिट्रोडा कडे एक विलेन म्हणून बघण्यात येत होते. कुठे मिळाले तर त्याकाळातले अग्रलेख वाचावे. आयात निर्यात यावर बंधने हाती. भारताचे स्वतःचे संगणकीय धोरण असे काहीच नव्हते. तेंव्हा आयटी सर्व्हीस हे मोठे क्षेत्र निर्मीण केले. जे आजही तितकेच मोठे आहे. प्रॉडक्टसाठी आपल्याकडे अनुभव कमी आहे. आपल्याला अमेरीकेतून भारतात आलेली अनुभवी माणसे लागतील. मूर्ती, प्रेमजी, राघवन, टाटा यांनी व्हेंचर फंड स्थापन केला आणि गुंतवणुकीसुद्धा केल्या.

श्रीगुरुजी's picture

17 Jul 2015 - 8:28 pm | श्रीगुरुजी

>>> वर कुणीतरी इन्फोसिस आणि नारायण मूर्तीने काय केले वगेर म्हटले आहे. त्याकाळात त्या परिस्थितीत मूर्तीने जे केले ते कौतुकास्पद आहे फार मोठे काम आहे.

सहमत.

इन्फोसिस सुरवातीपासूनच सर्व्हिसेस या क्षेत्रात काम करीत होती. तरीसुधा इन्फोसिसने 'फिनॅकल' ही कोअर बॅन्किन्ग प्रणालीची एक आन्तरराष्ट्रीय दर्जाची सिस्टिम तयार केली आहे. अनेक देशातील अनेक बॅकान्मध्ये फिनॅकल वापरले जाते. हा प्रॉड्क्ट जगातील एकूण उपलब्ध बॅन्किन्ग प्रॉडक्ट्समध्ये कायम पहिल्या ५ क्रमान्कात राहिला आहे. फ्लेक्सक्यूब, टेमेनॉस इ. तोडीस तोड हा प्रॉडक्ट आहे.

इन्फोसिसने सुरवातीच्या काळात वेअरहाऊस मॅनेजमेन्ट सिस्टिमसाठी 'ड्ब्ल्यूएमएस यन्त्रा' या नावाने एक चान्गला प्रॉडक्ट बनविला होता. सुरवातीच्या काही इन्स्टॉलेशननन्तर त्यान्नी तो प्रॉडक्ट एका अमेरिकन कम्पनीला विकल्याने त्यान्च्याकडे त्याचे हक्क नाहीत.

इन्फोसिसचे अजून काही प्रॉडक्ट्स आहेत, परन्तु मला त्याबद्दल फारशी माहिती नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे इन्फोसिसने प्रतिकूल वातावरणात सुरूवात करून आज जवळपास ८ अब्ज डॉलर्स वार्षिक महसूल असलेली एक मोठी कम्पनी बनविली, जागतिक दर्जाच्या सन्गणकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी आपल्या किमान लाखभर कर्मचार्‍यान्ना कायदेशीर मार्गाने कोट्याधीश बनविले (यातले बहुसन्ख्य कर्मचारी मध्यमवर्गातील होते).

इन्फोसिस करत असलेल्या कामाला रोजगार हमी योजना अशी उपमा देणे अजिबात पटत नाही. त्यान्नी ज्या काळात कम्पनी सुरू करून आज जेथे पोहोचविली आहे ते अत्यन्त कौतुकास्पद आहे.

अभिजित - १'s picture

17 Jul 2015 - 9:43 pm | अभिजित - १

माझे पोस्टस परत एकदा वाचा. मुद्दा निट समजावून घ्या . मग बोला .
Infosys revenue - $ ८ बिलिअन .
finacle revenue - अंदाजे ३०० मिलिअन .
infosys चा मुख्य धंदा काय आहे ? bodyshopping चा ना ? मग राग यायचे कारण काय मि तसे सांगितले तर ?

श्रीगुरुजी's picture

18 Jul 2015 - 2:06 pm | श्रीगुरुजी

मी कशाला रागावतोय? राग यायला काही तरी कारण असावे लागते.

फिनॅकलचा रेव्हेन्यू आणि कम्पनीचा रेव्हेन्यू यान्ची तुलना करण्याची गरजच नाही, कारण मुळात इन्फोसिस ही कम्पनी प्रॉड्क्ट तयार करण्यासाठी स्थापन केलेलीच नव्हती. भारतात काम करून परदेशातील ग्राहकान्ना कमी खर्चात, दर्जेदार सन्गणकीय व सन्गणकाधारीत सेवा देणे हेच मूळ उद्दीष्ट होते व ते अजूनही कायम आहे. फिनॅकल व इतर काही प्रॉड्क्ट्स, हाय एन्ड कन्सल्टिन्ग, बीपीओ इ. कालौघात सुरू झाले, परन्तु मूळ उद्देश परदेशातील ग्राहकान्ना दर्जेदार सन्गणकीय व सन्गणकाधारीत सेवा देणे हाच होता. स्थानिक ग्राहकान्ना सेवा देणे हा मूळ उद्देश नव्हता आणि नाही. फिनॅकलच्या निमित्ताने युनियन बॅन्क, आयसीआयसीआय बॅन्क, कॉसमॉस बॅन्क इ. स्थानिक ग्राहकान्ना सेवा दिली हा तेवढ्यापुरता अपवाद. इतर सर्व ग्राहक परदेशातीलच आहेत.

इन्फोसिसचा मूळ धन्दा बॉडीशॉपिन्ग नाही व नव्हता. बॉडीशॉपिन्गमध्ये ग्राहकान्ना फक्त हवी ती माणसे कन्त्राट पद्धतीने पुरविली जातात. बॉडीशॉपर स्वतः सन्गगणकाशी सम्बन्धित कोणतेही काम करीत नाहीत, ते फक्त माणसे पुरवितात. इन्फोसिसला पूर्वी काही ग्राहकान्नी डॉटनेटचा अनुभव असलेले ४० कर्मचारी ६ महिन्यान्साठी द्या किन्वा कोअर जावाचा अनुभव असलेले ५० कर्माचारी १ वर्षाकरीता आमच्या प्रोजेक्टसाठी द्या अश्या मागण्या आल्या होत्या. परन्तु इन्फोसिसने या सन्धी स्वीकारल्या नाहीत. ऑफशोअर डेव्हलपमेन्ट हाच इन्फोसिसचा मुख्य व्यवसाय होता व आहे.

अभिजित - १'s picture

18 Jul 2015 - 4:59 pm | अभिजित - १

तुम्ही कितीही समर्थन केलेत तरी Infosys bodyshopper आहेच. गुगल सर्च करा - infosys body shopping company
त्यात काही चुकीचे आहे असे मी अजिबात म्हणत नाही. किती तरी भारतीय लोकांना खूप फायदा झाला आहे INFY मुळे. पण त्यामुळे सत्य बदलत नाही.

श्रीगुरुजी's picture

19 Jul 2015 - 6:20 pm | श्रीगुरुजी

बॉडी शॉपिन्गची विकीपीडीआची व्याख्या अशी आहे.

Body shopping is the practice of consultancy firms recruiting information technology workers in order to contract their services out on a short-term basis.

इन्फोसिस या व्याख्येत कोठेच बसत नाही. इन्फोसिसचे अनेक ग्राहक १५ वर्षाहून जुने आहेत. वरील व्याख्येत दिल्याप्रमाणे इन्फोसिसचे शॉर्ट टर्म ग्राहक एकही नाही. बॉडीशॉपिन्ग कम्पन्या स्वतः कोणतेही काम न करता ग्राहकान्ना बॉडीज म्हणजे आवश्यकतेनुसार कन्त्राटी माणसे पुरवितात. इन्फोसिस अश्या पद्धतीने कधीच माणसे पुरवित नाही. आपल्या ग्राहकान्साठी निव्वळ बॉडीज पुरविण्याऐवजी इन्फोसिस ग्राहकान्ना पाहिजे असलेले सॉफ्टवेअर बनवून देते. खालील परिच्छेदातून हे जास्त स्पष्ट होईल.

During Q310, Infosys launched Flypp, an application platform that enables mobile service providers to improve the customer experience with a host of ready-to-use experiential applications across several devices.

A major health insurance firm bought the iTransform product suite, which helps clients to comply with the U.S. federal government’s mandates efficiently and cost effectively.

A major consumer packaged goods (CPG) firm bought the Procurement module of the Supply Chain Visibility product suite to cut sourcing cycle times and plug leaks in procurement spend through better monitoring, compliance, and governance mechanisms.

A major retailer selected Infosys as a partner in its Future Store Initiative to advance cutting-edge technologies and innovative shopping concepts.

Infosys has been chosen for its ShoppingTrip360 solution, an innovative managed service that offers retailers and CPG companies insights into real-time shopper and shelf activity.

A grocery retailer in the UK partnered with Infosys to develop a new multi-channel Web platform to bring about an integrated online experience.

A leading provider of security testing software solutions engaged Infosys to engineer leading-edge penetrative testing products.

The company is building a patient appointment scheduling system for a provider of medical laboratory tests and services. The system will allow a patient to schedule an appointment at any of the company’s more than 1,000 patient service centers.

Infosys is helping a leading provider of virtualization, networking and Software-as-a-Service (SaaS) technologies to design its architecture for master data management.

Infosys is also working with a major communications company in wireless 4G development.

A specialty retailer engaged Infosys to develop a SaaS solution.

On December, 24, Infosys was selected to implement an 3.87 billion rupee ($83 million) IT project for the state of Karnataka’s power distribution utilities. The project is part of a central government-funded program to use information technology to cap electricity losses in the country.

There is significant opportunity for IT companies within India since many government projects are expected to be awarded in the coming years, and Infosys, with its strong brand name and an ambassador, former CEO Nandan Nilakani, inside the government, is the forefront to win a large number of these projects.

The company is building on its capabilities and even in a downturn market.

अजूनही इन्फोसिस ही बॉडी शॉपिन्ग कम्पनी आहे असेच वाटत असेल, तर माझा नाईलाज आहे.

संदीप डांगे's picture

19 Jul 2015 - 10:15 pm | संदीप डांगे

मुद्दा काय आहे आणि चर्चा कशा वर चालली आहे...

जरा आठवण करून देतो.
मुद्दा १: भारतात गेल्या साठ वर्षात जग बदलणारे शोध लागले नाहीत. (हे एक साधारण विधान आहे जे कोणीही येता-जाता म्हणत असतो.)
मुद्दा २: वरील वाक्य श्रीयुत मूर्ती यांनी म्हटले आहे जे स्वतः एक आयआयटीयन आहेत.
मुद्दा ३: १९८०-२००० चे सुरवातीचे दिवस जाऊ द्या. परिस्थिती संपूर्णपणे सकारात्मक असतांना गेल्या पंधरा वर्षात मूर्ती यांनी जग बदलणारे शोध लावण्याचा कसलाही विचार स्वतः केला नाही.
मुद्दा ४: अशा व्यक्तीस वरील मुद्दा क्र. १ चे वाक्य पिंकटाकू पद्धतीने उच्चारायचा काय अधिकार आहे?

इन्फोसिस आणि मूर्ती यांचे कार्य उपलब्ध परिस्थितीत उत्कृष्टच आहे. त्याला कोणीही नावे ठेवत नाहीये. मुळात मूर्ती आपल्या व्यवसायिक जगात काय करतायत हा प्रश्नच नाहीये. प्रश्न स्वतः त्यांनी उपस्थित केलाय तेव्हा त्यांच्याकडेच या प्रश्नावर काय उत्तर आहे हे विचारल्या जाणारच.

एक उदाहरण म्हणून मी टाटा नॅनो चे देतो. रतन टाटांनी एक अशक्य स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवले. असंख्य अडचणींचे पर्वत असतांना नॅनो ठरल्याप्रमाणे, ठरल्या किंमतीत बाजारात आली. त्या तारखेला एक लाख रुपयात इतकी उत्कृष्ट कार जगात कुणीच बनवली नव्हती. आजही ते शक्य नाही. टाटांनी ते करून दाखवले. आपल्यापरीने टाटांनी जग बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या प्रयत्नाचे जगभरच्या वाहनक्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले आहेत. आणि हे भारताचे स्वतःचे (भारतातच आर अँड डी झालेले) उत्पादन आहे. वरील वाक्य टाटांनी स्वतः उच्चारले असते तर मला ते योग्यच वाटले असते कारण काय म्हटलंय यापेक्षा कोणी म्हटलंय हेही बरेचदा महत्त्वाचं असतंच.

बाकी इन्फोसिस जे करतंय ते जर जगात एकुलती एक (युनिकली) फक्त इन्फोसिसच करत असेल तशा (इनोव्हेटीव कंपनी) प्रकारचा सन्मान इन्फोसिसला मिळायला काहीच हरकत नाही. पण एक तुलना करावीशी वाटतेच. अ‍ॅपल कंपनीच्या एकूण रेवेन्यूच्या फक्त पाच टक्के इन्फोसिसचा रेवेन्यू आहे. ज्यांना आयटीतला 'बिलींग' प्रकार समजत असेल त्यांना हा फरक भयंकर आहे आणी याचे कारण काय आहे हेही कळेल. इन्फोसिस ने फार तीर मारलेत असं काहीच नाहीये.

देअर इज अ डीफरंस बीटवीन 'अल्सो रन' अँड 'ओन्ली वन'.

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2015 - 12:27 pm | श्रीगुरुजी

इन्फोसिसने फार तीर मारलेत, इन्फोसिस जे काही करीत आहे ते जगात युनिक आहे असे मी म्हटलेच नाही. वर कोणीतरी लिहिले की इन्फोसिस ही बॉडी शॉपिन्ग कम्पनी आहे. परन्तु इन्फोसिस ही बॉडी शॉपिन्ग कम्पनी नाही आणि नव्हती. याचे अनेक दाखले मी वर दिलेले आहेत. इतकेच.

आयटीतला बिलिन्ग हा प्रकार मला चान्गलाच माहिती आहे. मी बिलिन्गशी जवळून सम्बन्धित होतो. अ‍ॅपल इन्फोसिस किन्वा इतर भारतीय कम्पन्यान्च्या तुलनेत खूपच ग्रेट आहे यात वादच नाही. ज्या काळात कम्पनीला स्वतःचे फोन कनेक्शन मिळण्यात १ वर्षाहून अधिक काळ लागत होता आणि ज्या काळात स्वतःचा पहिला सन्गणक बाहेरून मागविण्यास १ वर्षाहून अधिक काळ लागला त्या काळात अत्यल्प भान्डवलावर कम्पनी स्थापन करून आज इतकी पुढे आणली आहे हे नक्की कौतुकास्पद आहे. मुख्य म्हणजे आपल्याबरोबर कर्मचार्‍यान्ची उन्नती सुद्धा कम्पनीने साधलेली आहे.

अभिजित - १'s picture

22 Jul 2015 - 6:08 pm | अभिजित - १

वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देऊन समोरच्या नामोहरम ( कि नमो हरम !! ) करायचे तुमचे स्किल वादातीत आहे.
Flypp आज कुठे आहे ? बहुतेक flop झाले आहे. बाकी ची सगळी उदाहरणे हि शेवटी client ला त्याच्या " बिल्डिग उभारणीत " मदत याच स्वरुपाची आहेत.
Infosys चे top product फ़िनकल. कंपनीच्या revenue मध्ये त्याचा हिस्सा फक्त ४ टक्के आहे. मला वाटते हि माहिती पुरेशी आहे. कंपनी चे खरे उत्पन्न कुठून येते हे सांगायला.
बाकी संघाने पण आता IIT आणि IIM ना हिंदू विरोधी ठरवले आहेच. तुम्ही इथे एकदम infosys च्या मुद्या वर उडी मारलीत. तर आता infosys राहू दे बाजूला. मुख्य मुद्द्यावर तुमचे मत प्रदर्शित करून टाकाच.

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2015 - 11:26 pm | श्रीगुरुजी

>>> वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देऊन समोरच्या नामोहरम ( कि नमो हरम !! ) करायचे तुमचे स्किल वादातीत आहे.

माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आहे हे मान्य केल्याबद्दल व त्यामुळे समोरचा नामोहरम होतो हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद!

>>> Flypp आज कुठे आहे ? बहुतेक flop झाले आहे.

बहुतेक? नक्की काय ते सान्गा.

>>> बाकी ची सगळी उदाहरणे हि शेवटी client ला त्याच्या " बिल्डिग उभारणीत " मदत याच स्वरुपाची आहेत.

असली म्हणून?

>>> Infosys चे top product फ़िनकल. कंपनीच्या revenue मध्ये त्याचा हिस्सा फक्त ४ टक्के आहे. मला वाटते हि माहिती पुरेशी आहे. कंपनी चे खरे उत्पन्न कुठून येते हे सांगायला.

आपले उत्पन्न कोठून येते हे इन्फोसिसने कधीच लपविलेले नाही. ग्राहकान्ना त्यान्च्या व्यवसायासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर भारतातून (व काही भाग ग्राहकाच्या कार्यालयात काम करून) कमी खर्चात बनवून देणे, त्यान्च्या असलेल्या व बनवून दिलेल्या सॉफ्टवेअरची देखभाल इ. कामातून इन्फोसिसचा बहुसन्ख्य महसूल येतो. फिनॅकलसारखे प्रॉड्क्ट्स, हाय एन्ड कन्सल्टिन्ग, बीपीओ इ. मधून काही प्रमाणात महसूल येतो. इन्फोसिसने हे कधीच लपविलेले नाही. असे असताना इन्फोसिस ही बॉडीशॉपिन्ग कम्पनी कशी? बॉडी शॉपिन्गची व्याख्या माहित नसल्यास माझ्या आधीच्या प्रतिसादात दिलेली व्याख्या वाचावी.

>>> बाकी संघाने पण आता IIT आणि IIM ना हिंदू विरोधी ठरवले आहेच. तुम्ही इथे एकदम infosys च्या मुद्या वर उडी मारलीत. तर आता infosys राहू दे बाजूला. मुख्य मुद्द्यावर तुमचे मत प्रदर्शित करून टाकाच.

आता या धाग्यात सन्घ कोठून आला? विषय कोणताही असला, म्हणजे नायजेरियात बाजरीच्या पिकावर झालेला मावा आणि तुडतुडे यान्चा प्रादुर्भाव किन्वा ब्राझिलम्धील ऑलिम्पिक असा कोणताही विषय असला तरी काही जण बादरायण सम्बन्ध नसताना सुद्धा सन्घ, भाजप इ. मधे आणतात. आता सन्घाला आणलेच आहे तर गेलाबाजार मोदी, गोध्रा, बाबरी मशीद, गान्धी घराण्याचा त्याग, नथुराम इ. पण आणा.

बादवे, इन्फोसिसचा मुद्दा तुम्ही काढलात, मी नाही. इन्फोसिस ही बॉडीशॉपिन्ग कम्पनी हा तुमचाच दावा. मी फक्त योग्य ती माहिती देऊन तो दावा खोटा आहे हे दाखवून दिले. आणि आता तर तुम्ही थेट सन्घाला मध्ये आणायला निघालात. हरकत नाही. सन्घाबद्दल तुमचे काही आक्षेप असतील तर तेही इथे मान्डा. जमल्यास प्रतिवाद करेन.

अभिजित - १'s picture

23 Jul 2015 - 5:45 pm | अभिजित - १

संघा बद्दल माझे काहीही वाईट मत नाहीये. त्या मुळे इथे काहीही मांडण्याचा प्रश्न नाही.
दुसर्या कोणी तरी मूर्ती न इथे आणले त्या मुले मला Infosys चा विषय काढावा लागला.
मुख्य मुद्द्यावर तुमचे काय मत आहे ?

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2015 - 8:49 pm | श्रीगुरुजी

लेखातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

>>> किंबहुना आयआयटी करनारांचे उद्दीष्ट अमेरिकेत सेटल होणे हेच असते ,

कशावरून?

>>> मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला?

भारतीय करदात्यांच्या पैशातून अनेक वायफळ खर्च केले जातात. (उदा. नेत्यांची सुरक्षा व्यवस्था, कर्जमाफी, मदरशातील मुल्लांना पेन्शन, हाजयात्रेला अनुदान इ.). हे खर्च तरी कशाला करायचे?

परदेशात गेलेल्यांपैकी बहुतेक मंडळी रेमिटन्सच्या स्वरूपात पैसे भारतात पाठवून देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी हातभार लावतात. वर उदाहरणात दिलेले खर्च मात्र पूर्ण वायफळ आणि अनुत्पादक आहेत. त्यामुळे वरील खर्चांवर आक्षेप असावा, आयआयटीवाल्यांवर नसावा.

>>> मला वाटते आयआयटी मध्ये प्रवेश देतानाच अमेरिकेत जॉब करायचा असेल तर नोकरी लागल्यानंतर 3 ते 5 वर्षात 5 ते 10 कोटी रुपये आयआयटी ला भारतीय चलनात भरण्याचे बंधपत्र करून घ्यावे व ते वसूल करून घ्यावेत ...\

वर उत्तर दिलेले आहे.

अभिजित - १'s picture

24 Jul 2015 - 11:47 am | अभिजित - १

वा गुरुजी. तुमच्याशी पूर्ण सहमत !!

अभिजित - १'s picture

17 Jul 2015 - 4:20 pm | अभिजित - १

अहो पण ते १ टक्के लोक बाहेर गेले. त्यांना दीड कोटी / २ कोटी रु पगार मिळाला तर, US $ मध्ये तो नॉर्मल च आहे. किती तरी लोक तसा पगार आत्ता पण घेत आहेतच. पण काय होते, पेपर मध्ये IIT ची बातमी छापून आली कि काही लोकांच्या पोटात लगेच दुखायला लागते. मग ते वेडेपिसे होऊन इकडे तिकडे बोंबाबोंब करत फिरू लागतात. काय करणार ? :)

राहिली गोष्ट जनतेच्या पैशाची. बबनराव घोलप, नाशिक मध्ये एक दिवा लावून राहिले आहेत कुंभात. पहिल्या दिवशी २५ हजार लिटर तेल प्यायला तो, तिळाचे. ३० ते ३५ कोटी चा दिवा आहे तो. इतर सगळे खर्च ( मंडप , AC , शाही जेवणावळी ) खूप वेगळे. कुठून आला हा इतका पैसा ?

बॅटमॅन's picture

17 Jul 2015 - 5:12 pm | बॅटमॅन

मी तर म्हणेन मेडिकलवाल्यांनाही लावू नका बाँड. इंजिनिअरिंग व मेडिकलमध्ये फरक असेल-नाही, आहेच फरक- पण म्हणून डॉक्टरांना असे राबवण्यात कै अर्थ दिसत नाही. असो. आय मीन राबवण्यात चूक आहे असे नाय पण डोंट पे देम पीनट्स अ‍ॅटलीस्ट.

सरसकट सर्वाना बॉन्ड लावण्याची गरज नाही जे लोक येथे शिक्षण घेऊन परदेशी जातात त्यांना पाच वर्षात त्यांच्या शिक्षणाचा खर्च परत करण्याचा बॉन्ड असण्यास काय हरकत आहे?पाच वर्षात परत आले तर हे पैसे भरायची गरज नाही. मग तो आय आय टी असो किंवा झाडबुके बुद्रुक येथील इंजिनियरिंग कोलेज असो. यात वैद्यकीय विद्यार्थी सुद्धा अंतर्भूत करायला हरकत नाही. कारण जे बाहेर जातात त्यांना पुढच्या पाच वर्षात हा खर्च परत करणे फार अवघड नाही.

माहितगार's picture

17 Jul 2015 - 5:50 pm | माहितगार

मी खालील एका प्रतिसादात म्हटले तसे प्रश्न केवळ पैसे वापस करण्याचा नाही. हजार जणांना जनतेच्या पैशातून संधी दिली जाताना दुसर्‍या हजारोंची संधी हिरावली जात असते. या संधी न मिळालेले हजारो एखाद मार्कानेच मागे असतात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Jul 2015 - 11:37 am | माईसाहेब कुरसूंदीकर

वाचतेय. भारतात राहून भारत्मातेची सेवा करणार म्हणजे नक्की काय?
मोठ्या प्रमाणावर कर चुकवून स्वतःचे उखळ पांढरे करणार्या एखाद्या मारवाड्याकडे आय.आय.टी./भारतीचा
अभियंता कामाला लागला तर ती भारतमातेची सेवा होते का ?भारताबाहेर राहून प्रामाणीक्पणे काम करणारा व भारतात राहून घरभाड्याच्या खोट्या पावत्या देणारा... नक्की कोणता चालेल रे मंदार?
ज्याला जेथे जायचेच तेथे जाऊदे. फारतर अधिक फी आकारावी.

वगिश's picture

17 Jul 2015 - 1:49 pm | वगिश

सहमत. मी स्वतः शासकीय अभियांत्रिकी मधून अमेरिकन कंपनी त निवडलो गेलो. काही वर्षांनी ब्रेन ड्रेन,देशसेवा आदी गोष्टींना भुलून भारतीय कंपनीत कामाला सुरुवात केली. यातील पोकळपणा लगेच लक्षात आला. तत्व, मुल्य यांना इथे काहीही महत्त्व नाही. येनकेन प्रकारे मालक आपली पोतडी भरत आहे.

ज्यांना आर्थीक असामाधानामुळे भारतात मन लागत नाही त्यांनी परदेशात जाणे केव्हाही उत्तम. पण आर्थिक समस्या नसेल तर ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो आहे/होतो आहे हे समाधान हवेच. पण मालक भारतातला नसेल आणि आमेरीकेतला मालक असेल तर पोतडी भरणार नाही असे होत नसावे. तत्व, मुल्य आमेरीकन व्यावसायीक त्यांच्या वेगळ्या पद्धतीने बासनात गुंडाळत असणार उडदा माजी काळे गोरे सारीकडेच असावे. भारतातील परंपरागत कंपन्यातील मालकांची नवी पिढीही बर्‍यापैकी उच्चशिक्षीत असते.

भारतात अभियांत्रिकी शिकलेल्या नव उद्योजकांना भांडवलाची सुलभ उपलब्धता आणि लालफित शाहीतून सोडवणूक हे खरेतर महत्वाचे प्रश्न असावेत.

संदीप डांगे's picture

17 Jul 2015 - 5:57 pm | संदीप डांगे

भारतात अभियांत्रिकी शिकलेल्या नव उद्योजकांना भांडवलाची सुलभ उपलब्धता आणि लालफित शाहीतून सोडवणूक हे खरेतर महत्वाचे प्रश्न असावेत.

आयआयटीयन्स ना हे प्रश्न इतके भेडसावत नाहीत हे दुसर्‍या एका प्रतिसादात लिहिले आहेच. पण उद्योग उभा करणे आणि कालांतराने त्यातून (परदेशातल्या नोकरीत आजच मिळेल) तेवढाच पैसा उद्या कधीतरी मिळवणे अशी परिस्थिती असल्याने कदाचित सोयिस्कर पर्याय निवडणे होत असावे. उद्योग उभारणे प्रत्येकाला शक्य होत नाही. किंवा कोअर कंपिटंसी सोडून उद्योगाची इतर महत्त्वाची न टाळता येण्यासारखी कामे जमत नाहीत. जिथे संधी उपलब्ध होते तिकडे लोक जातीलच.

पासआउट विद्यार्थ्यांना काय समस्या आहेत त्यापेक्षा प्रस्तुत संस्थेचं उद्देशविहिन जे कार्य चाललंय त्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे असं मला वाटतं.

सहमत. पोतडी भरण्यात तसे वाईट काहीच नाही .

पण आपल्या बहुतेक उद्योजागांची मानसिकता अशी आहे :
१ . दुसर्याला फासावाल्याशिवाय आपला फायदा होणार नाही.
२. नवीन काही ज्या कल्पना असतील त्या पास्च्यात्यांना राबवू दे ,आपण फक्त उचलेगिरी करू .
३. टेक सपोर्ट वैगेरे कामे स्वीकारणे ज्यामुळे पैसा मिळतो पण संशोधन आणि विकास क्षेत्रात भर पडत नाही .
४. Intellectual Property निर्माण व जतन करण्याविषयीचे अज्ञान .
५. Corporate Social Responsibility चा अभाव.

ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो आहे/होतो आहे हे समाधान हवेच

नेमकी हीच बोंब आहे. आपल्या ज्ञानाचा वापराच इथे होत नाही( किंवा खूप कमी होतो).
एक ढोबळ उदाहरण देतो:
Semiconductor Chip Design and Manufacturing ह्या क्षेत्रात २-३ भारतीय कंपन्या आहेत त्याही फक्त minor sections design करतात. ह्या क्षेत्रात IIT मध्ये कुशलता मिळवलेला तंत्रज्ञ कशाला भारतात थांबेल?

अवांतर :

१. औद्योगिक क्षेत्र आणि तंत्रशिक्षण संस्था ह्यांची सांगड आपल्या देशात नाही हे कटू सत्य आहे आणि ह्याला जबाबदार सरकार आणि पर्यायाने आपणच आहोत फक्त तेथील विद्यार्थीच नाहीत. आता हि सांगड नेमकी कशी असते ह्यासाठी आपण पाश्चिमात्य तंत्रशिखन पद्धतीचा दाखला घेऊ शकता. आज १२वि (माहिती तंत्रज्ञान ) शिकलेले लोक जे काम सहजतेने करू शकतील अशी कामे अभियंते करत आहेत हे आपल्या शैक्षणिक धोर्न्नांचे अपयश आहे.

२. बर्याचदा असा युक्तिवाद केला जातो कि भारत सरकारच्या कंपन्यांमध्ये (नवरत्न , पंचरत्न )IIT मधून बाहेर पडलेले अभियंते नगण्य असतात . आपल्या ज्ञानाची खुमखुमी असलेल्या अभियंत्यास ग्यास सिलिंडर चे किती truck बाहेर गेले ह्याच्या रोजच्या नोंदी तपासण्याचे काम दिले तर ह्यात कंपनीचा ,देशाचा,समाजाचा,त्या अभियंत्याचा नेमकी कुणाचा फायदा आहे?
३. शासकीय संशोधन संस्थामध्ये IITians का नाहीत ह्याचा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे.
४. अभियांत्रिकी ची तुलना वैद्यकीय क्षेत्राशी करणे कृपया थांबवावे. वैद्यकीय हे सेवा क्षेत्र आहे. भारतातील ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांविषयी आपल्याला नेमकी परिस्थिती काय आहे हे माहित आहे आणि सरकारने सर्व डॉक्टर लोकांना आपली सेवा तेथे देण्याची सक्ती केली आहे. परंतु एका अभियंत्याकडून देशाला काय अपेक्षित आहे तेच आपल्याला माहित नाही. नेमक्या समस्या मांडून त्यावर जर अभियंत्याकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र नक्कीच वेगळे दिसेल.
५. देशात राहून काम केले कि देशाचा फायदा होतो हा समाज चुकीचा आहे. ह्यात एक तर बुद्धिमत्तेचा योग्य वापर होत नाही(वरील करणान्मुळे ) शिवाय परकीय गंगाजालीस हि आपण मुकतो .

आनंदी गोपाळ's picture

23 Jul 2015 - 9:20 pm | आनंदी गोपाळ

बाकीच प्रतिसाद बरा आहे, सहमतही होत होतो, पण मधेच हे पचकलात →

४. अभियांत्रिकी ची तुलना वैद्यकीय क्षेत्राशी करणे कृपया थांबवावे. वैद्यकीय हे सेवा क्षेत्र आहे. परंतु एका अभियंत्याकडून देशाला काय अपेक्षित आहे तेच आपल्याला माहित नाही. नेमक्या समस्या मांडून त्यावर जर अभियंत्याकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र नक्कीच वेगळे दिसेल.

आता याचे विच्छेदन करू.

अभियांत्रिकी ची तुलना वैद्यकीय क्षेत्राशी करणे कृपया थांबवावे.
<<
अ‍ॅबसोल्यूटली. For the sole reason, that you don't have ANY idea, what medical field is. कृपया थांबवा.

वैद्यकीय हे सेवा क्षेत्र आहे.
<<
अभियांत्रिकी नक्की कसले क्षेत्र आहे? संपूर्णपणे मूलभूत संशोधन, मूल्य/संपत्तीची निर्मिती की अजून काही? आपण आपल्या रोजच्या कामात नक्की काय करीत असता?

भारतातील ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांविषयी आपल्याला नेमकी परिस्थिती काय आहे हे माहित आहे
<<
काय प्रॉब्लेम्स आहेत नक्की ग्रामीण वैद्यकीय सेवांमध्ये? नेमकी परिस्थिती काय आहे, हे तुम्हास माहित आहे??? वॉव! जरा सांगा पाहू प्रॉब्लेम्स?

आणि सरकारने सर्व डॉक्टर लोकांना आपली सेवा तेथे देण्याची सक्ती केली आहे.
<<
किस खुशी मे? यांच्या तीर्थरूपांचे वेठबिगार नोकर म्हणून परमेश्वराने डॉक्टर जमात उत्पन्न केली आहे काय? मला हवा तो व्यवसाय मला हवा तिथे करण्याच्या स्वातंत्र्याचे काय झाले? की डॉक्टरकी ही शार्पशूटर्स, वेश्याव्यवसाय वा दारू दुकानांसारखी समाजविघातक अ‍ॅक्टिव्हिटी आहे, जिला सरकारी कंट्रोल हवाच?

नेमक्या समस्या मांडून त्यावर जर अभियंत्याकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र नक्कीच वेगळे दिसेल.
<<
अन नेमक्या समस्या मांडून त्यावर जर डॉक्टरांकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र काय काळे निळे पडेल की काय?

उचल्ला कीबोर्ड..

आनंदी गोपाळ's picture

23 Jul 2015 - 9:23 pm | आनंदी गोपाळ

बाकीच प्रतिसाद बरा आहे, सहमतही होत होतो, पण मधेच हे पचकलात →

४. अभियांत्रिकी ची तुलना वैद्यकीय क्षेत्राशी करणे कृपया थांबवावे. वैद्यकीय हे सेवा क्षेत्र आहे. भारतातील ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांविषयी आपल्याला नेमकी परिस्थिती काय आहे हे माहित आहे आणि सरकारने सर्व डॉक्टर लोकांना आपली सेवा तेथे देण्याची सक्ती केली आहे. परंतु एका अभियंत्याकडून देशाला काय अपेक्षित आहे तेच आपल्याला माहित नाही. नेमक्या समस्या मांडून त्यावर जर अभियंत्याकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र नक्कीच वेगळे दिसेल.

आता याचे विच्छेदन करू.

अभियांत्रिकी ची तुलना वैद्यकीय क्षेत्राशी करणे कृपया थांबवावे.

अ‍ॅबसोल्यूटली. For the sole reason, that you don't have ANY idea, what medical field is. कृपया थांबवा.

वैद्यकीय हे सेवा क्षेत्र आहे.

अभियांत्रिकी नक्की कसले क्षेत्र आहे? संपूर्णपणे मूलभूत संशोधन, मूल्य/संपत्तीची निर्मिती की अजून काही? आपण आपल्या रोजच्या कामात नक्की काय करीत असता?

भारतातील ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांविषयी आपल्याला नेमकी परिस्थिती काय आहे हे माहित आहे

काय प्रॉब्लेम्स आहेत नक्की ग्रामीण वैद्यकीय सेवांमध्ये? नेमकी परिस्थिती काय आहे, हे तुम्हास माहित आहे??? वॉव! जरा सांगा पाहू प्रॉब्लेम्स?

आणि सरकारने सर्व डॉक्टर लोकांना आपली सेवा तेथे देण्याची सक्ती केली आहे.

किस खुशी मे? यांच्या तीर्थरूपांचे वेठबिगार नोकर म्हणून परमेश्वराने डॉक्टर जमात उत्पन्न केली आहे काय? मला हवा तो व्यवसाय मला हवा तिथे करण्याच्या स्वातंत्र्याचे काय झाले? की डॉक्टरकी ही शार्पशूटर्स, वेश्याव्यवसाय वा दारू दुकानांसारखी समाजविघातक अ‍ॅक्टिव्हिटी आहे, जिला सरकारी कंट्रोल हवाच?

परंतु एका अभियंत्याकडून देशाला काय अपेक्षित आहे तेच आपल्याला माहित नाही. नेमक्या समस्या मांडून त्यावर जर अभियंत्याकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र नक्कीच वेगळे दिसेल.

अन नेमक्या समस्या मांडून त्यावर जर डॉक्टरांकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र काय काळे निळे पडेल की काय? डॉक्टरांकडून काय अपेक्षा आहेत? फुकट ट्रीटमेंट अन वेठबिगारी??

उचल्ला कीबोर्ड..

पहिला प्रतिसाद माझ्या कावळा कंस वापरायच्या सवयीमुळे सगळा नीट उमटला नाही. संम याम्नी मदत केली तर आभारी राहीन.

मित्रहो's picture

17 Jul 2015 - 4:06 pm | मित्रहो

- बऱ्याचदा या पगाराच्या रकमेत दोन भाग असतात परफऑर्मन्स बोनस आणि पगार. त्यातून मिळनारा पगार न्यूयॉर्क सारख्या शहरात फार मोठी रक्कम नसते.
- या कंपन्या ९ CGPA च्या खालील मुलांना परिक्षेला बसू सुद्धा देत नाही. तेंव्हा अशा कंपन्यात जाणारी मुले 2-3 प्रतिशत फक्त. बहुतेक मुले ही नंतर GRE करुन परदेशात जातात पण तसे NIT किंवा BITS Pilani ची मुले पण करतात.
- आपण बहुतेक सारेच अगदी प्राथमिक शाळेपासून सरकारी अनुदानित शाळेत शिकलो. त्यापैकी 90 प्रतिशत सरकारी कामात किंवा किंवा डॉक्टरांसारखे कुठे गावात जाउन काही काम करीत नाही.
- भारतात राहून काय करनार. उदाहरण द्यायचे झाले तर डॉ. सुहास पाटील, आयआयटी खरगपूर मधे बीटेक केल्यावर MIT ला गेले. मग भारतात नोकरीला आले इथली कामाची पद्धत, इथे चालनारे कामाला कंटाळून अमेरीकेत गेले. तिथे गेल्यावर फॅबलेस सेमीकंडक्टरचा शोध लावला. पीसी असो की मोबाइल की कंझुमर इलेक्ट्रॉनिक्स या साऱ्याची वाढ होण्यात त्या शोधाने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली. भारतातलाच काय जगातला आयटीचा विस्तार त्यामुळे झाला. अशी बरेच उदाहरणे आहेत. रश्मी बंसलचे पुस्तक वाचा.
- चीनने NRC (Non Resident Chinese) या लोकांना आव्हान करुन त्या देशातली गुंतवणुक वाढवली. आज मोीदीही ते करीत आहेत. यात अमेरीकेत स्वतःच्या कंपन्या असनाऱ्यांमधे आयआयटीतले बरेच आहे.
- बरेच आयआयटीवाले भारतात परत आले. माझ्या एका बॉसने भारतात आल्यावर शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर यावर काम करनारी कंपनी काढली.
- भारतात सरकारी नोकऱ्यात आजही बरेच आयआयटीवाले आहेत. पेट्रोलियमची भेसळ आणि हायवेतला भ्रष्टाचार यात मारल्या गेलेले दोघेही आयआयटीतलेच होते. राजकारणात तीन वेगवेगळ्या पार्टीत आयआयटीवाले आहेत. जयराम रमेश, केजरीवाल आणि मनोहर परीकर.
- डॉ झुनझुनवाला सारख्यांनी RTBI च्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला.

उच्च शिक्षणाचा खर्च सरकारने उचलावा की नाही हा वेगळा प्रश्न आहे. तो फक्त आयआयटीवाल्यांसाठीच नाही तर सर्वांना लागू होतो. त्याकडे त्या दृष्टीने बघायला हवे आयआयटीवाले अमेरीकेत जाउन भरपूर पगार मिळवतात त्याचा आकस म्हणून नव्हे.

आनंदी गोपाळ's picture

17 Jul 2015 - 5:30 pm | आनंदी गोपाळ

केजरीवाल, शेतक्री संघटनावाले जोशी हे दोघे आयायटीयन आहेत ना हो?

माहितगार's picture

17 Jul 2015 - 5:36 pm | माहितगार

उच्च शिक्षणाचा खर्च सरकारने उचलावा की नाही हा वेगळा प्रश्न आहे. तो फक्त आयआयटीवाल्यांसाठीच नाही तर सर्वांना लागू होतो. त्याकडे त्या दृष्टीने बघायला हवे आयआयटीवाले अमेरीकेत जाउन भरपूर पगार मिळवतात त्याचा आकस म्हणून नव्हे.

शासनाचा शिक्षणावरच्या खर्चाचे मुख्य दोन उद्देश असतात पहिला कपॅसिटी बिल्डींग थ्रू नॉलेज कॅपिटल. दुसरा उद्देश जो जात्याच हुशार आहे त्याला पैसा कमी पडू नये. यासाठी जनतेच्या पैशांची (किमान काही प्रमाणात तरी) गुंतवणूक अटळच असते.

प्रश्न केवळ आकसाचा नाही १००० आयआयआयटीयन्स पैकी ९०० केवळ पाठांतर आणि प्रायव्हेट क्लासेसच्या भरवशावर आयआयटीत पोहोचत असतील तर ते भारतात राहीले काय परदेशात गेले काय भारतातील नॉलेज कॅपीटल ला डायरेक्ट फरक पडत नाही. पण जे खरेच जात्याच हुशार असतात त्या १००च्या ब्रेन ड्रेनचा फरक पडतोच मग त्यांनी परदेशात डोक लावण्याच्या एवजी भारतात लावल असत तर फुल न फुलाची पाकळी फरक पडला असता असे मानावयास जागा शिल्लक राहतेच.

जे ९०० परदेशात गेले त्यांनी देशात पैसे वापस पाठवले का नाही सरकारी खर्च वापस केला का नाही एवढाच प्रश्न नाही. भारत सरकारच्या (जनतेच्या पैशाने) शैक्षणिक गुंतवणूकीचे उद्देश कपॅसिटी बिल्डींग थ्रू नॉलेज कॅपिटल. दुसरा उद्देश जो जात्याच हुशार आहे त्याला पैसा कमी पडू नये हे असतील तर त्या उद्देशांना हरताळ फासला जातो याचा आकस असण्या नसण्याशी संबंध नाही.

एखादा आय आयआयटियन परदेशात जाऊन तेथील ज्ञान येन केन प्रकारेण भारतात पाठव असेल त्याने केलेल्या संशोधनाने भारतात गुंतवणूक घडून उत्पादन भारतात घडत असेल तर तो भारतात नसून परदेशात असेल तरीही फरक पडत नाही. मी माझ्या पालकांना भारतात माझ्या पालकांना पैसे पाठवले एका घरात गुंतवणूक केली मी माझी आर्थीक परत फेड केली हे एखाद्या सर्वसामान्य अभियांत्रिकी विद्यार्थ्याचे विचार असतील तर ठिक पण तुम्ही राष्ट्रीय संस्थेतून बाहेर पडता तेव्हा खरेतर तुमचा पैसा नव्हे भारताच्या नॉलेज कॅपिटल आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीस तुमचा हातभार काय ? हे महत्वाचे प्रश्न आहेत असे वाटते.

संदीप डांगे's picture

17 Jul 2015 - 5:41 pm | संदीप डांगे

ते तुमचं सगळं बरोबर आहे. पण इकडे वातावरण नाही, संधी नाही, किंमत नाही म्हणून जे गळे काढतात त्याच्यावर काय उत्तर आहे?

माहितगार's picture

17 Jul 2015 - 6:20 pm | माहितगार

मी तर म्हटल आहे की परदेशात राहूनही भारतात सबस्टँशियली काम करता येईल की, एका आय आय आयटीयनच्या दहा पेटंटांपैकी एक पेटंटच भारताती उद्योजकां देता येइल त्याला इथे कस निपटायच ते इथले उद्योजक बघून घेतील ना पण घेतलेल्या ज्ञानाची आणि वापरलेल्या संधींची परतफेड पैशात नव्हे सबस्टँशियल ज्ञानाच्या परतफेडीने होणे महत्वाचे.

संदीप डांगे's picture

17 Jul 2015 - 6:39 pm | संदीप डांगे

अनुभव व ज्ञानाच्या स्वरूपात परतफेड ही संकल्पना उत्तम आहे. फक्त जे इथून कायम बाहेर पडण्याचीच स्वप्ने बघत असतात त्यांच्यात इतका देशभक्तीभाव असला पाहिजे. इंडिया इज थर्ड वर्ल्ड टॉयलेट म्हणून आम्ही पळून आलो असे आभिमानाने सांगणारे बघितले आहेतच.

माहितगार's picture

17 Jul 2015 - 6:50 pm | माहितगार

फक्त जे इथून कायम बाहेर पडण्याचीच स्वप्ने बघत असतात त्यांच्यात इतका देशभक्तीभाव असला पाहिजे. इंडिया इज थर्ड वर्ल्ड टॉयलेट म्हणून आम्ही पळून आलो असे आभिमानाने सांगणारे बघितले आहेतच.

जे मनानी भारतीय नव्हतेच ते भारता बाहेर जात असतील तर उत्तमच, त्यांना भारताबाहेर हाकलण्यावरही सरकारने खर्च करावयास हरकत नाही पण परदेशात हाकलण्यासाठी भारतीय संस्थांमध्ये खर्च करून चांगले आंबे नासवण्या पेक्षा देशप्रेम नसलेल्या थर्ड वर्ल्ड टॉयलेट म्हणण्या पर्यंत हिम्मत जाणार्‍यांना मालवाहू नौकांच्या टॉयलेट मध्ये बसवून परदेशात गच्छंती करावी हेच उत्तम.

मित्रहो's picture

17 Jul 2015 - 7:04 pm | मित्रहो

एखादा आय आयआयटियन परदेशात जाऊन तेथील ज्ञान येन केन प्रकारेण भारतात पाठव असेल

हे असे होतचे असते, भारत उगाचच तंत्रज्ञानात पुढे नाही गेला. हे रोजचेच असते. फक्त त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात येत नाही.

मी माझ्या पालकांना भारतात माझ्या पालकांना पैसे पाठवले एका घरात गुंतवणूक केली मी माझी आर्थीक परत फेड केली हे एखाद्या सर्वसामान्य अभियांत्रिकी विद्यार्थ्याचे विचार असतील तर ठिक पण तुम्ही राष्ट्रीय संस्थेतून बाहेर पडता तेव्हा खरेतर तुमचा पैसा नव्हे भारताच्या नॉलेज कॅपिटल आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीस तुमचा हातभार काय ?

हा विचार म्हणून ठीक आहे मुळात साऱ्यांना आयुष्यात पैसे कमावायचे असतात, सुखासीन जीवन जगायचे असते. काही अपवाद असतात. आयआयटी मुंबई आणि खरगपूर दोन्ही ठीकाणची स्टार्ट अप इको सिस्टिम चांगली आहे. बरीच मुले भारतात राहत आहेत, अशा कंपन्यात काम करीत आहेत. त्यांच्या बातम्या व्हायला काही वर्षे लागतील.

सुबोध खरे's picture

17 Jul 2015 - 7:16 pm | सुबोध खरे

इकडे वातावरण नाही, संधी नाही, किंमत नाही
साहेब हि वस्तुस्थिती आहे. माझा भाऊ एके काळी आय आय टी मध्ये नाव आलेले असताना आवडीचा विषय मिळत नाही म्हणून व्ही जे टी आय मधून इंजिनियर झाला तेन्व्हा त्याला बर्याच लोकांनी सल्ला दिला होता कि अमेरिकेत गेलास तर तुझ्या बुद्धीचे चीज होईल. (त्याला मुळात तेथे जाण्यात रस नव्हताच) परंतु आज हि तो तीन कंपन्या चालवितो त्यात त्याच्या बुद्धीचे काम १० टक्के आहे आणी ९० % वेळ सरकारी कामात आणी कागदी घोडे नाचविण्यात जातो हि वस्तुस्थिती आहे. (पैसे खाऊ घालणे किंवा पटवा पटवी करणे हे रक्तात नसल्यामुळे). आज त्याचे अमेरिकेतील मित्र त्याला हेच सांगत असतात कि तू या फालतू गोष्टीत वेळ घालवतोस जो तुला जास्त चांगल्या कामात लावता आला असता.
आज आपण आय आय टी तील इंजिनियरनि काही केले नाही याला शिव्या घालतो त्याचे मूळ कारण वर म्हटल्याप्रमाणे सरकारी यंत्रणेशी कायम झगडण्यात आपला वेळ जातो हे हि आहे. सगळेच आय आय टी यन काही "पैलतीरी" नेत्र लावून बसलेले नाहीत. परंतु जर ते तिथे पैसे कमावत असतील तर निदान त्यांच्यावर झालेला खर्च त्यांनी देशाला परत केला तर त्यात वावगं काही नाही असे "मला वाटते".

संदीप डांगे's picture

17 Jul 2015 - 7:41 pm | संदीप डांगे

खरेसाहेब, मुळात त्यांच्यावर होणारा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा ही कल्पनाच अनाठायी आणि आकसपूर्ण वाटते.

संस्थेचे जे मूळ कर्तव्य व उद्देश आहे तो पूर्ण होण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मला वाटते. जर लाखो विद्यार्थ्यांमधून काही हजारच निवडले जात असतील तर ते सर्वोत्तम आहेत म्हणून त्या सर्वांकडून एक भारतीय म्हणून माझ्या अपेक्षा असणारच. त्या सर्व हजार विद्यार्थ्यामधून किमान ८०% तरी विद्यार्थी भारताच्या कामी येऊ शकतात. त्यांच्यासाठी योग्य वातावरण निर्माण करायचे सोडून अमेरिकेत जाऊन पैसे छापणार्‍या मुलांवर डोळे वटारणे चूक आहे. तसेही त्यांच्यापेक्षाही हुशार मुले आयआयटीशिवाय अमेरिकेत जात असतीलच. मुळात बाँड वैगेरे सरकारी-बाबू छाप कल्पना आपण सोडून देऊन जे इथे राहतात त्यांच्यासाठी काही विधायक होऊ शकतं का याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

आयआयटीच्या मुलांना लाखो-करोडोंची पॅकेजेस मिळतायत अशा बातम्या पेपरमधून येतात पण आयआयटीने काही संशोधन केले, शोध लावले, ब्रेक-थ्रू मिळवला अशा बातम्या वरचेवर येणे आवश्यक आहे. त्या कधीच आलेल्या मी तरी बघितल्या नाहीत. किंवा इतक्या कमी आहेत की आठवतही नाहीत. खुद्द आयआयटी ही संस्था स्वतःला उत्कृष्ट कॅम्पस प्लेसमेंट देणारी (थेट भाषेत प्लेसमेंट एजंसी) अशी म्हणवून घेते, जिथे उत्तम शैक्षणिक वातावरण व संशोधनासाठीचे उत्कृष्ट वातावरण अशी प्रतिमा असायला पाहिजे. सरकारी संस्था असून तद्दन लवली युनिवर्सिटी छाप प्रचार करतात. यावर काय करता येईल हा प्रमुख प्रश्न आहे. कोण किती कमावतं ह्यावर डोळा ठेवणे पोटात दुखण्याचे लक्षण आहे असे वाटते.

अभिजित - १'s picture

17 Jul 2015 - 7:55 pm | अभिजित - १

सम्पूर्ण सहमत !!

सुबोध खरे's picture

17 Jul 2015 - 8:08 pm | सुबोध खरे

साहेब हि योजना कमीत कमी २५ वर्षांची आहे.
मी ए एफ एम सी तून एम बी बी एस झालो तेथे आपण लष्करात भरती झालात तर आपल्याला शिक्षण शुल्क द्यायला लागत नाही. पण जर सोडून जायचे असेल तर माझ्या वेळेस ७५ ०००/- भरून सोडता येत असे.( तेवढे पैसे माझ्या आईबापांकडे सहज होते) मी ठरवून लष्करात भरती झालो. यात डोळा ठेवणे किंवा पोटात दुखणे हा भाग नाहीच.
आता ए एफ एम सी सोडायचे असेल तर ३५ लाख रुपये आहेत.
तेंव्हा शिक्षण शुल्क परत घेण्यात गैर काही नाही असे मला वाटते. कारण डोक्यावर बसून कुणाला देशभक्त किंवा समाजसेवक करता येत नाही. तो संस्काराचा भाग आहे. आणी हे संस्कार बालपणापासून हवेत. पाच लाख रुपये आय आय टी च्या क्लाससाठी देणाऱ्या पालकांचीच वृत्ती तशी नसेल तर पाल्याची कुठून होणार. मी मुलावर पाच लाख रुपये गुंतवतोय तर त्याचा परतावा मला पाच कोटी पाहिजे हि वृत्ती असेल तर आपण म्हणताय ते कसे साध्य होणार? मग निदान सरकार जेवढे पैसे गुंतवत आहे ते तरी परत घेण्यात काय गैर आहे? मारून मुटकून वैद्यबुवा बनवण्यात काय हशील आहे?

संदीप डांगे's picture

17 Jul 2015 - 8:24 pm | संदीप डांगे

जरी प्रतिसाद तुम्हाला असला तरी तुम्ही तो वैयक्तिक घेऊ नका.

तुम्ही जे उदाहरण दिलंय ती व्यवस्था आणि आयआयटी या दोन्ही संस्था, त्यांची कार्ये व उद्देश्य वेगवेगळे आहेत. आपण फक्त सरकार करत असलेला खर्च एवढाच निकष लावत आहात. तुम्ही ज्या संस्थेतून शिकला आहात त्या संस्थेने अत्यावश्यक सेवांसाठी तुम्हाला तयार केलेले असते. सगळं शिकून तुम्ही सहज सोडून गेलात तर तेवढीच मेहनत, पैसा आणि वेळ परत दुसर्‍यावर घालवायला ती संस्था तयार असणे शक्यच नाही. कारण त्या संस्थेचा उद्देश वेगळा आहे म्हणून.

आयआयटीचा उद्देश वेगळा आहे. त्याची तुलना इतर अभ्यासक्रम व संस्थांशी करून उपयोग नाही एवढेच मत आहे.

:) तुम्ही अमी चर्चा किंवा भांडत बसलोय पण वातावरण आणि संधी निर्माण करण्यासाठी लागणारी पोषक व्यवस्था करणारे अतिहुशार आयएस कारभारी उर्फ सरकारारी बाबू आणि त्यांच्या संगनमताने काम करणारे राजकारणी ह्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही बघा. जोपर्यंत गळ्याशी येत नाही तोपर्यंत भारतात पॉलिसि बदल होत नाहीत. १९९२ साली भिकेले लागलो तेंव्हा सुधाराणा झाल्या. नंतर ठप्प. पुन्हा आता जेंव्हा कंगाल होवून अनेक भीषण प्रश्न तयार होतील तेंव्हा काहीतरी होईल. सध्याचे सरकार युपीए३ आहे असे माझे मत बनत चालले आहे. थोडा फार काय १९-२०चा फरक. मोदिबाबा ह्या बिनडोक सरकारी बाबू लोकांवरच अवलंबून आहे. आणि ते स्वतःचे नुकसान अजिबात करणार नाहीत. ह्या सगळ्या १०००० लायसनसाठी ह्यांच्या हातापाया पडावे लागते हे त्यांना लई भारी वाटते. जोपर्यंत तिथे काम न करण्याला हाकलून दिले जात नाही तोपर्यंत विशेष काही फरक पडणार नाही. म्हणजे आपले जुगाड करत बसायचे. आणि इथे वादावादी करून आपल्या आपल्यातच किल्मिषे तयार करायची.

आनंदी गोपाळ's picture

23 Jul 2015 - 9:31 pm | आनंदी गोपाळ

ह्या सगळ्या १०००० लायसनसाठी ह्यांच्या हातापाया पडावे लागते हे त्यांना लई भारी वाटते.

रात्री दारूच्या पार्ट्या कुण्या लायसन मागणार्‍याच्या खर्चाने करीत, नवी लायसन तयार करण्याच्याच चर्चा हे महान लोक करीत असतात. फायर ऑडिट नामक एक नवा आयटम सुरू आहे. ज्या दिवशी तुमच्या आस्थापनेत बांबू येईल, त्या दिवशी कळेल, हे नक्की काय प्रकरण आहे व याचा जनतेच्या सुरक्षिततेशी नक्की काय संबंध आहे.

आनंदी गोपाळ's picture

23 Jul 2015 - 9:40 pm | आनंदी गोपाळ

जोपर्यंत तिथे काम न करण्याला हाकलून दिले जात नाही तोपर्यंत विशेष काही फरक पडणार नाही.

कंप्लीटली सहमत.

सरकारी नोकरीत घुसल्यावर पहिली गोष्ट शिकावी लागते तिचे २ भाग असतात.
१. स्वतःच्या पार्श्वभागास आयर्न प्लेटिंग.
२. झाकू एकमेकांची, अवघे धरू सुपंथ.

सरकारी नोकरांनी, सरकारी लोकांचे, सरकारी लोकांसाठी बनविलेले काही नियमः

सरकारी नोकरांना फक्त सस्पेंड करता येईल, नोकरीतून काढता येणार नाही. ← कुणी ठरवलं?
अगदी लाच घेताना पकडून सस्पेंड केलं तरी निम्म्या पगारावर मज्जा मारायला मोकळे ← कुणी ठरवलं?
पेन्शन मिळेल ← कुणी ठरवलं?
फॅमिली पेन्शन मिळेल. पेन्शर नोकर मेला तरी बायकोच नव्हे, 'धाकटा' डिपेंडंट नोकरीस लागेल तोवर पेन्शन मिळेल ← कुणी ठरवलं?
शक्यतो कुणा फ्यामिली मेंब्रास 'कंप्याशनेट बेसिसवर' नोकरीत घ्यावेच लागेल. ← कुणी ठरवलं?
पेन्शलाही वेतन आयोग, महागाई भत्ते लागू. ← कुणी ठरवलं?
प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी मिळेल. ← कुणी ठरवलं?
सरकारी नोकरांनी सरकारी हॉस्पिटलात ट्रीटमेंट न घेता खासगीत गेल्यास 'रिइंबर्समेंट मिळेल' ← कुणी ठरवलं?
नुसत्याच सिनिऑरिटीने प्रमोशन मिळेल. काम करा की नका करू. ← कुणी ठरवलं?

सही करायचा पगार, अन काम करायची लाच! हे भारतीय शासकीय सेवांचे ब्रीदवाक्य ठरवून टाकण्यास हरकत नसावी.

जय हो!

श्रीरंग_जोशी's picture

17 Jul 2015 - 8:29 pm | श्रीरंग_जोशी

खूप मोठ्या प्रमाणात नसल्या तरी आयआयटीत झालेल्या उपयोगी संशोधनांच्या बातम्या पूर्वीपासून वाचत आलेलो आहे.

९० च्या दशकाच्या शेवटीत जहाजवाहतूकीत अन्नपदार्थांसाठी वापरल्या जाणार्‍या इंडस्ट्रियल रेफ्रीजरेशन सिस्टिम्समध्ये लिक्विड नायट्रोजन वापरून व्यावसायिक दॄष्ट्या उपयुक्त बदल करण्याचे यशस्वी संशोधन आयआयटी मुंबईत झाल्याचे वाचले होते.

नारबा मूर्ती कैतरी बोलणार आणि लोकं डोळे झाकून माना डोलावणार.

जग बदलणारं संशोधन म्हणजे डैरेक्ट हिग्स बोसॉन, कंप्यूटर वगैरेच अपेक्षित आहे काय? अनेक शोध आपल्याकडेही लागलेले आहेत आणि त्यांचा उपयोगही कमीअधिक प्रमाणात झालेला आहे. इतकी जर पडली असेल तर इन्फोसिस वगैरे कंपन्यांऐवजी एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूटला का नाय पैशे देत म्हणावं? मूर्ती क्लासिकल लायब्ररीला पैशे देता येतात तर याला काय झालं?
तस्मात असोच.

चिरोटा's picture

23 Jul 2015 - 12:12 am | चिरोटा

हा प्रतिसाद http://www.misalpav.com/node/32069 इकडे पाहिजे काय?
मूर्ती,आय.टी,आय.आय.टी,मोदी... सगळा गुंता झालाय मिपावर.