"टाईंम" साप्ताहीकातील लेख - थोडीशी वेगळ्या पण अखंड भारताची इच्छा...

विकास's picture
विकास in काथ्याकूट
2 Dec 2008 - 10:17 pm
गाभा: 

टाईंम साप्ताहीकाचा संकेत स्थळावर "India's Muslims in Crisis" हा लेख वाचनात आला.

त्यात आत्ताच्या हल्ल्याचा उहापोह केला आहे. त्या प्रमाणे भारतातील मुस्लीम अल्पसंख्य समाज हा आर्थिक दृष्ट्या आणि सामाजीक दृष्ट्या मागासलेले आहेत ह्या अर्थी भाग आहे. तसेच पाकीस्तानी मुस्लीम हे झिया आणि एकंदरीतच राज्यकर्त्यांच्या कारभारामुळे मदरसांच्या हातात कसे गेले वगैरे लिहीले आहे. हे दोन्ही भाग पटणारेच आहेत. कसे ते कळत नाही पण आजही मुस्लीम समाजाला "भारतीय" समाजाचा अविभाज्य भाग करण्याची गरज आहे. किंबहूना कालच्या पेक्षा अधिक. मात्र ते होत असताना मला वाटते त्या प्रमाणे कायद-सुव्यवस्थेचा वापर समान आणि राजकारणविरहीत होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, "जगात एका धर्मातपण लोकं सुखाने राहू शकत नाहीत... अर्थात अनेक धर्म असले म्हणून काही बिघडत नाही, कोणीही कमी नाही आणि कोणीही जास्त नाही अथवा जास्त पवित्र नाही," हे देखील समजणे महत्वाचे वाटते.

असो. पण या लेखाच्या शेवटी असलेले दोन परीच्छेद मी जसेच्या तसे खाली देत आहे. जर वरच्या दुव्यावर गेलात, तर ते परीच्छेद पहाण्यासाठी तुम्हाला दुसर्‍या पानावर जायला लागेल. तर Aryn Baker हा या लेखाचा लेखक शेवटी लिहीत आहे: (डोके शांत ठेवून वाचा)

Still, many South Asian Muslims insist Islam is the one and only force that can bring the subcontinent together and return it to pre-eminence as a single whole. "We [Muslims] were the legal rulers of India, and in 1857 the British took that away from us," says Tarik Jan, a gentle-mannered scholar at Islamabad's Institute of Policy Studies. "In 1947 they should have given that back to the Muslims." Jan is no militant, but he pines for the golden era of the Mughal period in the 1700s and has a fervent desire to see India, Pakistan and Bangladesh reunited under Islamic rule.

That sense of injustice is at the root of Muslim identity today. It has permeated every aspect of society and forms the basis of rising Islamic radicalism on the subcontinent. "People are hungry for justice," says Ahmed Rashid, a Pakistani journalist and author of the new book Descent into Chaos. "It is perceived to be the fundamental promise of the Koran." These twin phenomena — the longing many Muslims feel to see their religion restored as the subcontinent's core, and the marks of both piety and extremism Islam bears — reflect the lack of strong political and civic institutions in the region for people to have faith in. If the subcontinent's governments can't provide those institutions, then terrorists like the Trident's mysterious caller will continue asking questions. And providing their own answers.

तर हे वाचल्यावर आपल्याला काय वाटते? विशेष करून जेंव्हा तारीक जन जो लेखकाच्या मते मिलीटंट नाही त्याला देखील असे म्हणावेसे वाटते की, " भारत, पाक, बांग्लादेश हा इस्लामीक राजवटीखाली एकत्र येण्याची गरज आहे"

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

2 Dec 2008 - 10:38 pm | आजानुकर्ण

तारिक जान हे आपल्याकडच्या अलीगड विद्यापीठातील विद्वानांसाऱखेच बोलत आहेत. पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांमध्ये लोकशाही असणे दक्षिण आशियासाठी महत्त्वाचे आहे.

We [Muslims] were the legal rulers of India, and in 1857 the British took that away from us,—
the longing many Muslims feel to see their religion restored as the subcontinent's core, and the marks of both piety and extremism Islam bears — reflect the lack of strong political and civic institutions in the region for people to have faith in. If the subcontinent's governments can't provide those institutions, then terrorists like the Trident's
mysterious caller will continue asking questions. And providing their own answers.

ही वाक्ये आणि

आणि

खालील वाक्ये

दुसरा प्रश्न म्हणजे की जमिन आमची म्हणजे कोणाची?त्याविषयी नि:संदिग्ध उत्तर ती जमिन आम्हा हिंदूंची.मान्य आहे की आपल्या समाजात अनेक दुर्गुण आहेत पण हिंदू म्हणून म्हणवून घ्यायला आपल्याला लाज का वाटते?ज्या भूमीत वेदांची रचना झाली ती जमिन हिंदूंची नाहीतर कोणाची?आमच्या समाजात दोष आहेत म्हणून आमची जमिन स्वत:च्या घशात घालायचा इतर कोणालाही अधिकार नाही. एखादा माणूस सतत जुगार खेळतो आणि इतर अनेक दोष त्याच्यात आहेत म्हणून त्याचे घर बळकावणे समर्थनीय ठरेल का?

यात काहीही फरक नाही.

विकास's picture

2 Dec 2008 - 10:46 pm | विकास

दुसरा प्रश्न म्हणजे की जमिन आमची म्हणजे कोणाची?.... एखादा माणूस सतत जुगार खेळतो आणि इतर अनेक दोष त्याच्यात आहेत म्हणून त्याचे घर बळकावणे समर्थनीय ठरेल का?

हे कोणी लिहीले आहे? जर कुठल्या प्रतिसादात असले तर कृपया दुवा द्या. मी असल्या लिहीण्याचे समर्थन करेन असे आपल्यालातरी वाटणार नाही अशी अपेक्षा :-)

मात्र असले लिहीणे हे टाईम साप्ताहीक नाही तरी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर अथवा त्या विरुद्ध जी कुठली हिंदूत्ववादी पण जनमान्य छापील नियतकालीके असतील त्यात आले असल्यास आणि ते देखील कुठल्या तरी "सेंटर फॉर पॉलॉसी" वगैरे मधे "ऍनॅलीस्ट" असलेल्याने केल्याचे असल्यास अवश्य दाखवा.

तुलना ही "ऍपल टू ऍपल" असूंदेत इतकेच म्हणणे आहे.

आजानुकर्ण's picture

2 Dec 2008 - 11:32 pm | आजानुकर्ण

हे येथे ः http://www.misalpav.com/node/4879#comment-71532 लिहिलेले आहे.

कोलबेर's picture

2 Dec 2008 - 11:38 pm | कोलबेर

म्हणजेज टाइम मासिकात लिहिणारा कोणी पॉलिसी ऍनालिस्टची बिरुदं मिरवणारा असो वा आपल्या मिपाचे पाहुणे संपादक असोत अश्या प्रकारचे लिखाण हे असमर्थनीयच हा सामयिक दुवा.

आजानुकर्ण's picture

2 Dec 2008 - 11:59 pm | आजानुकर्ण

<:P

विकास's picture

2 Dec 2008 - 11:38 pm | विकास

दुव्याबद्दल धन्यवाद! मी ते वाचले नव्हते...

मात्र ते खरे क्लिंटन नाहीत हे आपल्यास माहीती असेल अशी आशा करतो :-) (ह.घ्या.)

बाकी विनोद जाऊंदेत, आधी म्हणल्याप्रमाणे "ऍपल टू ऍपल" लेखन दिसू शकेल का? (परत सनातन प्रभात वगैरे दाखवू नका! कारण ते "पॉलीसी मेकर्स" नाहीत.)

आजानुकर्ण's picture

2 Dec 2008 - 11:55 pm | आजानुकर्ण

हे वाक्य बरोबर आहे.

We [Muslims] were the legal rulers of India, and in 1857 the British took that away from us

जे अर्थातच आपल्या पेशव्यांच्या ऐतिहासिक चुकांमुळे झालेले आहे.. अगदी मराठा साम्राज्य भरभराटीला होते तेव्हाही (पहिला बाजीराव वगळता) पेशवे हे दिल्लीच्या बादशहाचे पंतप्रधान म्हणूनच लढत होते. १८५७ च्या लढ्यातही तात्पुरता का होईना बहादूरशहा जफर यालाच भारताचा राजा बनवण्यात आले होते.

In 1947 they should have given that back to the Muslims.

ही अपेक्षा चुकीची आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही असावी हा भारताच्या सर्व प्रमुख नेत्यांनी निर्णय घेतला होता. जो मान्य करायला हवा. भारतातल्या सामान्य मुसलमानांची परिस्थिती हिंदूंच्या तुलनेत वाईट असली तरी पाकिस्तानातल्या त्याच वर्गातल्या मुसलमानांपेक्षा चांगली असावी असे वाटते.

विकास's picture

3 Dec 2008 - 12:04 am | विकास

आता मी बुचकळ्यात पडलो आहे...

ही चर्चा पेशव्यांवर चालली आहे का (संपुर्ण भागात नाही, तरी) भारतात स्वातंत्र्यापूर्वी मुसलमान राज्यकर्ते होते का नव्हते याच्यावर चालली आहे? मला वाटते या बाबत काही दुमत नसावे... अर्थात आत्ताच्या हल्ल्याला म्हणून तुम्हाला पेशवाई कारण आहे असे म्हणायचे असेल तर मग मुद्दा वेगळा आहे :-)

मात्र माझ्या मते चर्चेचा मुद्दा हा केवळ तारीक जान सारखे पॉलीसीवर अभ्यास करणारे आणि पर्यायाने पॉलीसी तयार करायला मदत करणारे "नॉन मिलींटंट" कसे विचार मनात भरवून देतात आणि त्याबद्दल काय वाटते हा होता. त्या संदर्भात शेवटी प्रश्न होता की,
तर हे वाचल्यावर आपल्याला काय वाटते? विशेष करून जेंव्हा तारीक जन जो लेखकाच्या मते मिलीटंट नाही त्याला देखील असे म्हणावेसे वाटते की, " भारत, पाक, बांग्लादेश हा इस्लामीक राजवटीखाली एकत्र येण्याची गरज आहे"

आजानुकर्ण's picture

3 Dec 2008 - 12:15 am | आजानुकर्ण

चर्चा पेशव्यांवर नाही. मराठ्यांची सत्ता असतानाही मुसलमान हेच (नामधारी का होईना) पण राजे कसे होते हे मला सांगायचे होते. कृपया गैरसमज नसावा. आताच्या हल्ल्याला पेशवाई कारण नाही. मी पहिल्या बाजीरावाचा खूप मोठा फॅन आहे (आणि मस्तानीचा सुद्धा)

तर हे वाचल्यावर आपल्याला काय वाटते? विशेष करून जेंव्हा तारीक जन जो लेखकाच्या मते मिलीटंट नाही त्याला देखील असे म्हणावेसे वाटते की, " भारत, पाक, बांग्लादेश हा इस्लामीक राजवटीखाली एकत्र येण्याची गरज आहे"

तारीक जानकडे लक्ष देऊ नये असे मला वाटते. उलट त्याची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करून त्याच्या मूर्खपणावर सडकून टीका करावी. असे पंचमस्तंभी लोक हेसुद्धा अतिरेकी आहेत. इस्लामिक राजवट म्हणजे काय? शरियत का?

विकेड बनी's picture

3 Dec 2008 - 12:03 am | विकेड बनी

लीगल रूलर्स म्हणून ब्रिटिशांना बोलवू आणि पुन्हा भारत+पाकिस्तान+बांग्लादेशवर १५० वर्षे राज्य करायला लावू. शक्यता आहे की त्यामुळे भारतीय+पाकिस्तानी+बांग्लादेशी एकत्र येतील.

जानही खूश आणि बिलवाही खूश.

लंबूटांग's picture

2 Dec 2008 - 10:54 pm | लंबूटांग

" भारत, पाक, बांग्लादेश हा इस्लामीक राजवटीखाली एकत्र येण्याची गरज आहे".
सगळा मोट्ठा प्रॉब्लेम हाच आहे ना. जर त्याला खरच शांती आणि काहीतरी चांगले पाहिजे असेल तर इस्लामीक राजवटीखाली कशाला. " भारत, पाक, बांग्लादेश ह्यांनी एकत्र येण्याची गरज आहे". असे म्हण ना.

the golden era of the Mughal period in the 1700s माझा इतिहास कच्चा आहे तसा पण मुघल निर्दयीपणे अत्याचार करत होते त्याला हा भौ golden era संबोधतो त्यातच सगळे कळून चुकले.

याचा अर्थ असा नाही की की मला वाटते हिंदूच राजवट पाहिजे. असे म्हटले तर मग तारीक जन आणि माझ्यात काहीच फरक नाही.

"जगात एका धर्मातपण लोकं सुखाने राहू शकत नाहीत... अर्थात अनेक धर्म असले म्हणून काही बिघडत नाही, कोणीही कमी नाही आणि कोणीही जास्त नाही अथवा जास्त पवित्र नाही," लाखमोलाचे बोललात.

-(धर्मनिरपेक्ष) लंबूटांग

मुक्तसुनीत's picture

2 Dec 2008 - 11:08 pm | मुक्तसुनीत

"भारत, पाक, बांग्लादेश हा इस्लामीक राजवटीखाली एकत्र येण्याची गरज आहे" असे मत मांडणे म्हणजे दिवास्वप्न बघण्यासारखे आहे. अर्थात , असे लोक मिलिटंट या अर्थानेच नाहीत ज्या अर्थाने गोबेल्स सारखे लोक नाझींच्या लक्षावधी लोकांच्या हत्याकांडाच्या संदर्भात मिलिटंट नाहीत. या न्यायाने जिहादाकरता माथे भडकविणारे चिथावणीखोर मुल्ला-मौलवी सुद्धा मिलिटंट नाहीतच ; कारण त्यांनी बंदूक कुठे हातात धरली आहे ? वाटल्यास मिलिटंट हा शब्द वापरू नका , पण माथे भडकवणारे , हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे , हिंसा-अत्याचार यांचे सौदागर असे म्हणूया. हाच न्याय "अखंड भारता"ची भगवी स्वप्ने पहाणार्‍या/दाखवणार्‍यांना लावायलाही हरकत नाही.

तारिक जान यांना मुघल साम्राज्याकडे सत्ता होती म्हणून त्याना सगळा उपखंड मुस्लिम हवा. मग त्याआधीचे राज्यकर्ते हिंदू होते. त्याआधी अशोकाने आपल्या साम्राज्यातील एका बर्‍यापैकी मोठ्या भागात बौद्ध धर्माचा प्रसार केला (म्हणजे नवबौद्धांना वहिवाटीचा हक्क ?) , त्याआधी द्रवीड वंशाचे लोक येथे वसले होते , त्यांची काही एक राज्यव्यवस्था असणार. त्याआधी ... त्याआधी ... त्याआधी.. याला अंत नाही आणि असल्या मूर्ख लॉजिकला अर्थ नाही.

संदीप चित्रे's picture

2 Dec 2008 - 11:21 pm | संदीप चित्रे

मुक्तसुनीत... साधारण असाच अभिप्राय द्यायला इथे आलो आणि पाहिले तर तुम्ही माझे टायपायचे कष्ट वाचवले आहेत !!
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याआधी... त्याधी ... ह्याला अंत नाही... अंत शोधायचाच तर पार पहिल्या मानवापर्यंत मागे जावे लागेल :)

लिखाळ's picture

2 Dec 2008 - 11:24 pm | लिखाळ

>> अंत शोधायचाच तर पार पहिल्या मानवापर्यंत मागे जावे लागेल <<
काय योगायोग.. मी आत्ताच पहिल्या मानवाच्या पायावर धोंडा ठेऊन आलो ;)
खालचा प्रतिसाद पाहा.
-- लिखाळ.

लिखाळ's picture

2 Dec 2008 - 11:22 pm | लिखाळ

भारताबद्दल (भारताच्या संस्कृतीबद्दल, तिथल्या लोकांबद्दल) इमान न राखणारे, आपलाच धर्म सर्वत्र व्हावा अशी ईच्छा बाळगणारे आणि त्यासाठी बळाचा-ब्रेनवॉशींगचा वापर करणारे लोक अशांतता पसरवत आहेत.
-- (सफरचंद खाल्ले आणि सगळे सुरु झाले. सफरचंदांवर बंदी आणली पाहिजे :) ) लिखाळ.

कोलबेर's picture

2 Dec 2008 - 11:25 pm | कोलबेर

सफरचंद खाल्ले आणि सगळे सुरु झाले. सफरचंदांवर बंदी आणली पाहिजे

'ऍपल टू ऍपल' तुलना केल्याबद्दल अभिनंदन :)

लिखाळ's picture

2 Dec 2008 - 11:27 pm | लिखाळ

:) आभार.
-- लिखाळ.

विकास's picture

2 Dec 2008 - 11:28 pm | विकास

>>>सफरचंद खाल्ले आणि सगळे सुरु झाले.

असे "आम्ही" नाही समजत ना! तिथेच तर खरी गोम आहे. :-)

प्राजु's picture

2 Dec 2008 - 11:48 pm | प्राजु

मुक्तसुनित यांच्याशी सहमत आहे.

त्याआधी ... त्याआधी ... त्याआधी.. याला अंत नाही आणि असल्या मूर्ख लॉजिकला अर्थ नाही.
१००% खरं आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अभिजीत's picture

3 Dec 2008 - 2:28 am | अभिजीत

>> ...विशेष करून जेंव्हा तारीक जन जो लेखकाच्या मते मिलीटंट नाही त्याला देखील ...
धार्मिक मूलतत्ववादाचं उदात्तिकरण करुन (मूलतत्ववाद्यांच्या) राजकीय आकांक्षांना एक (ढोंगी) बौद्धिक परिमाण देण्याचा प्रयत्न आहे असे वाटते.

>>"In 1947 they should have given that back to the Muslim>>.."
बाकी द्विराष्ट्र संकल्पना स्विकारल्यानंतर दोन्ही देशात ज्या घटना निर्माण झाल्या तिथेच इतिहासातले संदर्भ गैरलागु झाले.

- अभिजीत

पाषाणभेद's picture

3 Dec 2008 - 2:33 am | पाषाणभेद

अशी चर्चा पाकडे (वाकडे ??) व ईतर करतील काय ?

-( सणकी )पाषाणभेद

मृदुला's picture

3 Dec 2008 - 3:14 am | मृदुला

तर हे वाचल्यावर आपल्याला काय वाटते?

चर्चा वाचून पाकिस्तानी पंडित इतिहासात जास्तच रममाण झाले आहेत असे वाटते. त्यांना वस्तुस्थितीचे भान येणे गरजेचे आहे. उत्तर भारतातील व पाकिस्तानातील पुष्कळ प्रदेश अनेक वर्षे न-इस्लामी राज्यकर्त्यांच्या अंमलाखाली होता. तिथे टप्प्याटप्प्याने इस्लामी आक्रमणे झाली. नंतर इस्लामी - मोगल सत्ता क्षीण झाल्याने, व बाकी गटांतून धुरंधर नेता न मिळाल्याने, इंग्रजांचे फावले व त्यांनी साम्राज्यात आणखी प्रदेश सामील करून घेतला. त्या जोरावर, दक्षिण दिग्विजयही करून घेतला. मात्र दक्षिण भारतातील पुष्कळ प्रदेश इंग्रज येईपर्यंत न-इस्लामी राज्यकर्त्यांचा होता. जगभर झालेल्या क्रांत्यांच्या माध्यमातून अनेक लोकसत्ताक राज्ये अस्तित्त्वात आली. तसेच इंग्रजांच्या पश्चात भारतातही झाले. अश्या वेळी काळ उलटा फिरवून पुन्हा मोगलांच्या काळातल्यासारखे असावे असे दिवास्वप्न बघणे 'पंडित' माणसाला साजेसे नाही. शिवाय सर्वसामान्य मुस्लिम मनुष्याला मोगल सत्तेविषयी ओढ असावी असे काही वाटत नाही. न पेक्षा खुद्द मोगल काळात एकही मुस्लिम माणूस इतर पक्षांत आढळला नसता.

एकंदरित हे दोन परिच्छेद वाचून टाइम नियतकालिक उगीच काही पिल्लू सोडत आहे असे वाटते. दहशतवादाला आधीच पुष्कळ कारणे असताना त्यात एक आणखी वाढवत आहे असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Dec 2008 - 11:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुक्तसुनीत, विकासराव, कोलबेर, कर्ण, मृदुला आदींशी सहमत.

एकंदरित हे दोन परिच्छेद वाचून टाइम नियतकालिक उगीच काही पिल्लू सोडत आहे असे वाटते. दहशतवादाला आधीच पुष्कळ कारणे असताना त्यात एक आणखी वाढवत आहे असे वाटते.
मागे एक "खुदा के लिये" नावाचा पाकिस्तानी चित्रपट आला होता. त्यात असेच विचार सो कॉल्ड आधुनिक, नॉन फॅनॅटिक पाकिस्तानी मुसलमान तरूणाच्या तोंडी घातले आहेत.

तारिक जान सारखे वायफळ बुडबुड्यांमुळे आपल्या देशाला फरक नाही पडत.
अहो आसेतु हिमाचल , हिंदुकुश पर्वतापर्यंत (सध्याचे अफगणिस्तान- इराणची सरहद्द) अखंड भारताचे स्वप्न २३०० वर्षांपूर्वीच चंद्रगुप्त-चाणक्य यांनी पाहिले होते आणि बर्‍याच प्रमाणात यशस्वीपणे ते साध्यही केले होते. तेव्हा भारतात पहिला हक्क मुस्लिमांचा आहे असे इतिहासातील दाखले देणार्‍या या डुकरांनी (दुर्दैवाने आपले पंतप्रधान मनमोहनसिंग हेही यात आहेत) याही इतिहासाकडे बघण्याची गरज आहे. २३०० वर्षांपुर्वी मुस्लिम तरी अस्तित्वात होते का? आज का बरे हक्क जागा होत आहे? शासन करायचे काय तुम्हाला? खास तुमच्यासाठीच ज्या देशाची निर्मिती झाली तिकडे जा की?... करा तिकडे शासन आणि निर्माण करा तुमचा स्वर्ग.... कोणी अडवले आहे?

जय हिंद
सागर

अवलिया's picture

3 Dec 2008 - 7:56 pm | अवलिया

काय आचरटपणा आहे.....

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी