मिपा वर नवीन सदराची आवश्यकता : इस्लामचे सत्य स्वरुप व इतिहास, व भारतीय व पाक उर्दू वृत्तपत्रातील मुख्य उतारे (कानोसा)

सागरलहरी's picture
सागरलहरी in काथ्याकूट
1 Dec 2008 - 7:52 pm
गाभा: 

इस्लामचा इतिहास त्याचे सत्य स्वरूप इ. बाबत मिपा चे अनेक सद्स्य खूप गोंधळ्लेले दिसतात त्यासाठी खास या विषयाला वाहिलेले सदर सुरु करावे. "मुस्लीम मनाचा शोध" या शेषराव मोरे यांच्या पुस्तकाचा त्यांच्या अनुज्ञेने संदर्भ घ्यावा. याबाबत प्रथम कायदेशीर सल्ला घेणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया

या सूचनेवर कोणतीही अनुकूल प्रतिक्रिया नाहि. सबब मी असे समजतो सदर विषयाचे सांगोपांग ज्ञान मिपा करांना मुळातच आहे. तसेच सदर विषय कोणत्याही कारणामुळे दुर्लक्षित करणेच योग्य असे संपाद्काना वाट्ते काय ?
अर्थात हे दुर्लक्ष व उदासीनता अपेक्षे नुसार च होती कारण आपण सर्वांनी गेली शेकडो वर्षे हेच केले आहे. असो. समस्त संवेदन शील मिपा करांचे या विषया बाबत उदासीनतेची दिव्य परंपरा राखल्या बद्द्ल अभिनंदन.

केवळ उलट सुलट व भड्क प्रतिक्रिया देणे पुरेसे नाही. आपल्या पुढील आव्हानाचे स्वरुप जाणणे गरजेचे आहे असे मला मूर्खाला वाटत होते.

आपणास त्यांच्या विषयी काय सत्य माहीत आहे, ते कृपया सांगावे.....

जमल्यास काही प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहे
'अल्लाह' याचे मुळ स्वरूप काय व हे नाव कसे पुढे आले?
शुक्रवार का पाळतात?

ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यास, ह्या लेखाचा खटाटोप वाचेल.

अर्थात हे दुर्लक्ष व उदासीनता अपेक्षे नुसार च होती कारण आपण सर्वांनी गेली शेकडो वर्षे हेच केले आहे. असो. समस्त संवेदन शील मिपा करांचे या विषया बाबत उदासीनतेची दिव्य परंपरा राखल्या बद्द्ल अभिनंदन.

दुसर्‍यावर आरोप करण्याआधी आपले ज्ञान मांडावे......
मी उदासीन राहीलो कारण ---- मला तुमच्या कडून सुरवात अपेक्षित आहे. प्रत्यक्षात चिखलात दगड मारण्याची गरज मला वाटत नाही.

आपणास त्यांच्या विषयी काय सत्य माहीत आहे, ते कृपया सांगावे.....

जमल्यास काही प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहे
'अल्लाह' याचे मुळ स्वरूप काय व हे नाव कसे पुढे आले?
शुक्रवार का पाळतात?

ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यास, ह्या लेखाचा खटाटोप वाचेल.

अर्थात हे दुर्लक्ष व उदासीनता अपेक्षे नुसार च होती कारण आपण सर्वांनी गेली शेकडो वर्षे हेच केले आहे. असो. समस्त संवेदन शील मिपा करांचे या विषया बाबत उदासीनतेची दिव्य परंपरा राखल्या बद्द्ल अभिनंदन.

दुसर्‍यावर आरोप करण्याआधी आपले ज्ञान मांडावे......
मी उदासीन राहीलो कारण ---- मला तुमच्या कडून सुरवात अपेक्षित आहे. प्रत्यक्षात चिखलात दगड मारण्याची गरज मला वाटत नाही.

पाषाणभेद's picture

5 Dec 2008 - 10:16 pm | पाषाणभेद

 उदासीनतेचा विजय असो.
(जग कुठे चालले, आपण कुठे चाललो ?)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2008 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरं म्हणजे आपण मांडलेला चर्चा प्रस्ताव अतिशय चांगला आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता केवळ मुस्लीम चर्चेचे टार्गेट होऊ शकतात अशा एका शंकेमुळे केवळ कोणी लिहिले नसावे, मी तरी त्यामुळेच काही लिहिले नाही. 'इस्लाम' इस्लामचा इतिहास,परंपरा, इस्लामचा धर्म, तत्वज्ञान, बदलते प्रवाह, भविष्यातील वाटचाल. मुस्लीमांचे भारतभूमी प्रेम आणि किती-किती विषयावर सखोल चर्चा करता येईल. पण चर्चेपेक्षा वादावादीचीच शक्यता असल्याने आणि सदरील लेखन कायद्याच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा...सद्य स्थितीत तरी चर्चाप्रस्तावाला 'पास' म्हणून सोडून देणे मिपामंडळींना योग्य वाटले असेल.

शेषराव मोरें लेखनाची चिकित्सा करतांना (पुर्वीचे संदर्भ) वाक्य तोडून समज-गैरसमज वाढविणारे व स्वतःसाठी योग्य विधानांचा अर्थ सोयिस्कर काढत असतात असा माझा एक समज आहे, त्यामुळे त्यांच्या लेखनातील त्यांच्या मतांपेक्षा त्यांनी उल्लेखलेले संदर्भ उपयोगाची पडतील इतकेच मला वाटते.

-दिलीप बिरुटे
(उदासीनतेची दिव्य परंपरा राखणारा)

माहितगार's picture

29 Jul 2018 - 10:29 am | माहितगार

धागा प्रस्तावात खूप मोठा आवाका शीर्षकात घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एवढा मोठा केक एका घासात ( धाग्यात) कसा खाता येइल याची शंका वाटते. धागा लेखकाने कायद्याचा अडथळा कॉपीराईटच्या अनुषंगाने उल्लेखीला असण्याची शक्यता असेल तर ते ठीक आहे. पण समीक्षे साठी पुरेसे संदर्भ वापरण्यात कॉपीराईट कायद्यानुसार अनुचित काही नसावे.

...सदरील लेखन कायद्याच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा....

कायद्याच्या समस्या नक्कीच असू शकतात ( उत्पातमुल्याच्याही समस्या असतात) पण भारतातील बहुसंख्य ऑनलाईन वृत्तपत्रांखाली प्रसंगपरत्वे चर्चा चालू दिसतातच. स्वतः शेषराव मोर्‍यांना मोठ्या कायदे विषयक समस्यांना सामोरे जावे लागले असल्याचे ऐकण्यात नाही -तसेही अकॅडेमीक अंगाने केलेल्या चर्चा कायद्याच्या कचाट्यात का सापडाव्यात ? या धाग्या नंतर २०११ मध्ये मन यांची धागा मालिका मिपावर येउन गेली हाताच्या बाहेरचे कोणते विवाद तिथे झाले किंवा कोणते कायद्याचे प्रश्न आले ?

विवादांची भिती वाटते तर विवादांना हात नका लावू. भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा
; राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू ; 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व ; संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ; विवीध अभिव्यक्ती कलांमधील, सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रातील यशवंत मुस्लीमांची व्यक्ती चरीत्रे इत्यादी विषयांवर कायदा आणि विवाद फारसे वाटेत न येता लेखन केले जाऊ शकतेच ना . इतरांच्या धाग्यातून केले पाहीजे असेही नाही स्वतंत्र पणे करु शकताना . सकारात्मक योगदाना पासुन दूर राहून नुसतेच विवाद आणि कायद्याचे बागूलबुवे का उभे करावेत ?

....पण चर्चेपेक्षा वादावादीचीच शक्यता असल्याने ....

एक मिपा बाह्य किस्सा सांगतो, एक प्राध्यापक महोदय एका विषयावर लेखन करत असताना कुणी तरी आले या विषयावर लेखन करु नका वाद होतात म्हणाले, हि कॉमेंट झेलणारे प्राध्यापक महोदय तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते प्रा महोदयांनी लगोलग वाद म्हणजे काय त्याचे प्रकार ते कसे करावेत या विषयावर चार सहा लेखांचे लेखन केले. मराठीच प्राध्यपक होते !

केवळ प्रा.डॉ. सरांबद्दल नाही. जवाहरलाल नेहरुंचे भारताचा शोध लेखना बद्दल अत्यंत आदर आहे पण त्यात जवाहरलाल नेहरु नोंदवतात की तत्कालीन कोणते काँग्रेस अध्यक्ष मुस्लीम निवडले गेले होते, त्यांना धार्मिक विषयावरची चर्चा करावयाची असे पण आम्ही दोघेही अशा चर्चे नंतर इरीटेट होऊ म्हणून मी अशी चर्चा टाळत असे ! हि इंटेलेक्च्युअल डिसऑनेस्टी नाही का ? नेहरुंचे क्षणभर बाजूस ठेवा. फाळणी पूर्व काळात जीना आणि सावरकर दोघेही मुंबईत असुन आपण दुसर्‍याच्या घरी जाणार नाही ह्या इगो वरुन परस्पर भेटी टाळल्या , त्यांना त्रयस्थ ठिकाणी भेटता आले नसते का ? भेटीतून सगळे प्रश्न निकालात निघाले असते असे नाही पण एकमेकांच्या कार्यकर्त्यांचे रस्त्यावर संघर्ष होण्या पेक्षा एक वैचारीक चर्चा या दोन्ही नास्तिकांना करता आली नसती का ? १४०० वर्षांपासून गल्लो गल्ली अधून मधून पेटणारी समस्या भारतीय आणि वैश्विक समाजापुढे आहे त्याच्या आयडियॉलॉजीकल बाजूचा मागोवा चर्चा विवादांच्या भिती पोटी करावी वाटत नाही ? महाराष्टातला रस्त्यावर आलेला मागचा संघर्ष झालेल्याला किती आठवडे झालेत ? विचारांनी सोडवायचे प्रश्न रस्त्यावर येतात आणि १४०० वर्षांनतरही आम्ही आयडीयॉलीजींना हात घालत नाही , वैचारीक दिवाळखोरी नाही का ही ? आणि हि वैचारीक दिवाळखोरी टाळण्याची पहिली जबाबदारी असलेले समाजातील घटक कोण कोणते ?

तरीही आंतरजालीय वाद विवादांना सामोरे जायचे नाही, हरकत नाही संबंधीत विषयांवर अकॅडेमीक स्टडी आणि लेखन करता येऊ शकते ? जिवंतपणी ते पब्लिश करुन विवादांना सामोरे जायचे नाही हरकत नाही अबुल कलाम आझादांना स्वतःची विवाद्य वाटलेला भूमिकेचा भाग त्यांनी लिहून ठेवला आणि मृत्यू नंतर २५ वर्षांनी प्रकाशित करण्यास सांगून ठेवले . भारतीय अभ्यासक तेवढीही जबाबदारी घेत नाहीत ?

....सध्याची परिस्थिती पाहता केवळ मुस्लीम चर्चेचे टार्गेट होऊ शकतात

यात ठळक केलेल्या शब्दात वैचारीक दुटप्पी पणा नाही ? निरपेक्षतेत हि सापेक्षतेची भेसळ नाही. या पोस्टीनंतर दहा वर्षांनी दुसर्‍या धाग्यावर सर माझ्या मागे टार्गेट वाला आ़षेप घेऊन आले . माझी ज्या मिपासदस्याशी चर्चा चालू होती त्यांच्याशी धर्मसंस्थांचा राजकारणात कोणत्याच बाजूने हस्तक्षेप नसावा यावर कबुली घेऊनही महाशय धर्मांध राजकीय पक्षाची भलावण करत होते . एका राजकीय पक्षाच्या धर्मांशतेच्या भलावणीस लक्ष्य केले तर लेखकाच्या लेखनाची पूर्ण पार्श्वभूमी लक्षात न घेता टार्गेटचा आक्षेप घेऊन तथाकथीत निरपेक्ष लोकच तेल ओतण्यास आणि गैरसमज निर्माण करण्यात पुढे ? आणि तेही सामाजिक सौहार्द विषयक लेखन असलेल्या लेखकाच्या मागे असले प्रथम दर्शनी योगदान नसलेली मंडळी केवळ आम्हीच काय ते निरपेक्ष म्हणून सेंसॉरशीपसाठी मागे लागतात कोणत्या नैतीक आधिकाराने ?

* Criticism of religious groups is good for religion

लेखातील काही वाक्ये क्वोट करतो, कुणी जमल्यास अनुवादीत करुन द्यावीत.

* Criticism of religious groups is good for religion

* Whatever is motivating members of the NCCM or others of like mind to shut down critique of Islam, such thinking is misleading and misplaced. It’s misleading because it conflates criticism and discrimination. It’s misplaced because religion is at its best when subjected to constant and fervent critique. Criticism leads to necessary correction.

* While exposure to criticism can make religion better, sheltering it from critique makes it worse.

* Last year when speaking before the Pontifical Commission for the Protection of Minors about the Catholic Church’s sex abuse scandals, Pope Francis blamed a religious culture hostile to challenge for the tragedies that occurred. “The old practice… of not facing the problem,” he said, “kept our consciousness asleep.”

* .............Official investigations concluded school, social service, and government personal were aware of a problem but didn’t speak out fearing their comments would be viewed as Islamophobic.

** While fear of seeming bigoted may drive some non-Muslims to keep quiet, most Canadians — Muslim and non-Muslims alike — who want to restrict criticism of Islam are more nobly motivated. They believe that such action fosters unity in society.

** But censorship is an acid, not a glue, when it comes to progress and social cohesion.

खुप लिवायची ईच्छा हाय पन सुरुवार होत नाही
वेताळ

खुशि's picture

28 Jul 2018 - 11:42 am | खुशि

मी या बाबतीत फारच अडाणीआहे.त्यामुळे काही बोलणे लिहिणे योग्य नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2018 - 2:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा प्रतिसाद मूळ लेखासाठी फार्फार (सुमारे दहा वर्षे) उशीरा आहे हे तुमच्या ध्यानात आले आहे का ?! =))

जर फक्त धागा वर काढण्यासाठीचा हा गनिमी कावा असेल, तर मिपाकर फार्फार कसलेले मावळे आहेत, हे ध्यानात ठेवावे ! ;) (तसे नसेल तर, हघ्याहेवेसांन)

सतिश गावडे's picture

29 Jul 2018 - 12:31 pm | सतिश गावडे

धागा दहा वर्षांपूर्वीचा असला तरी तुम्ही तुमच्या अज्ञानाची प्रामाणिक कबुली अगदी योग्य वेळी दिली आहे. आता माहितीच्या भडीमाराने अगदी गार सॉरी शहाणे होऊन जाल. :)

>>खास या विषयाला वाहिलेले सदर सुरु करावे. >> नको.

नाखु's picture

29 Jul 2018 - 11:37 am | नाखु

वाहून गेलेले, वाहत्या पाण्यात हात धूऊन घेण्यासाठी "वायफळ "सदराची आवश्यकता आहे

वायाच्या वाटेला न गेलेला नाखु वाचकांची पत्रेवाला

कपिलमुनी's picture

30 Jul 2018 - 9:48 am | कपिलमुनी

खास या विषयाला वाहिलेले वेगळे संस्थळ सुरु करा . आणि एकटेच गारेगार व्हा !

माहितगार's picture

30 Jul 2018 - 11:06 am | माहितगार

हा प्रतिसाद नेमका कुणासाठी आहे. मी या धागा लेखाचा लेखक नाही, आणि धागा लेखकाने गेल्या दहा वर्षात आपली सुचना आमलात आणली का हे कळण्यस मार्ग नाही.पण धागा लेखकाने त्यांच्या प्रतिसादात व्यक्त केलेले वाक्य तसे सूचक आहे.

केवळ उलट सुलट व भड्क प्रतिक्रिया देणे पुरेसे नाही. आपल्या पुढील आव्हानाचे स्वरुप जाणणे गरजेचे आहे असे मला मूर्खाला वाटत होते.

म्हणजे धागा लेखक केवळ उलट सुलट व भड्क प्रतिक्रिया देणारा सोम्या गोम्या नक्कीच नसावा, ज्यास दोन्ही बाजूच्या पोटदुखीचे कारण समजत नाही असा कुणि मनमोकळी चर्चा करु इच्छित असावा अशी एक शक्यता असू शकते. केवळ उलट सुलट व भड्क प्रतिक्रियांच्या पलिकडे जाउ इच्छिता पेक्षा ' खास या विषयाला वाहिलेले वेगळे संस्थळ सुरु करा . आणि एकटेच गारेगार व्हा !' हा आपला सेंसॉरवाद खूप मोठा आहे यातील व्यक्तिगततेसाठी आपणास अब्जावधी नोबल पारितोषिके बहाल,

खास या विषयाला वाहिलेले वेगळे संस्थळ सुरु करा . आणि एकटेच गारेगार व्हा !'

आता राहीलाच प्रश्न या सुचनेचा तर मिपावरचा प्रत्येक लेखकाला हि सुचना करता येऊ शकते , मिपा या कॉमन प्लॅटफॉर्म देणार्‍या संकेतस्थळाची तशी आवश्यकताच शिल्लक रहाणार नाही अशा भन्नाट सूचनेसाठीही अब्जावधी नोबल पारितोषिके. आता हि पारितोषिके मिळालीच आहेत तर आपण स्वतः लिहिलेल्या विवीध विषयांवर स्वतंत्र संकेतस्थळे काढावीत खासकरुन खेळाडू वृत्तीचा अभाव असलेल्या खेळांबाबतही एक विशेष संकेतस्थळ जरुर काढावे आणि दुसरे पुर्वग्रहदुषित व्यक्तिगट टिकाकरणारे ट्रोलींग कसे करावे या विषयावरही जरुर धागा काढून स्व सुचवण्या आणि स्वाअदर्शांचे पालन स्वतःपासून करणार्‍या आदर्श नोबलतेस खरे उतरावे. आणि आपल्या पुढील स्वतंत्र संकेतस्थळांसाठी पुलेशु.

माहितगार's picture

30 Jul 2018 - 11:10 am | माहितगार

क्षमा असावी, 'पुर्वग्रहदुषित व्यक्तिगट टिकाकरणारे ट्रोलींग कसे करावे या विषयावरही जरुर धागा काढून ' एवजी पुर्वग्रहदुषित व्यक्तिगट टिकाकरणारे ट्रोलींग कसे करावे या विषयावरही जरुर स्वतंत्र संकेतस्थळ काढावे' असे वाचावे. आणि आपल्या भावी यशासाठी मनमोकळ्या शुभेच्छा.

माहितगार's picture

30 Jul 2018 - 2:37 pm | माहितगार

...खास या विषयाला वाहिलेले वेगळे संस्थळ सुरु करा . आणि एकटेच गारेगार व्हा !...

ग्रेट असे सल्ले देणारी मंडळी, केवळ चार तासाच्या अंतराने दुसर्‍या धाग्यावर वेगळ्या वादात "झेपत नसेल तर वाचत जाउ नका ! अक्षता घेउन बोलवले नाही." अशी सोईस्कर भूमिका घेतात . संदर्भा साठी नोंदवून ठेवतो.

करुणानिधींची चिंता; धक्क्याने २१ जणांचा मृत्यू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Aug 1, 2018, 10:05PM IST

चेन्नई :

द्रमुक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे समर्थक आणि चाहते चिंतेने व्याकुळ झाले असून या धक्क्यातून आतापर्यंत राज्यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत करुणानिधी यांचे पुत्र आणि द्रमुकचे कार्याध्यक्ष स्टॅलिन यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

करुणानिधी यांच्यावर कावेरी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या तब्येतीच्या चिंतेने पक्षाचे कार्यकर्ते तसेच समर्थक अस्वस्थ झाले आहेत. त्याच अस्वस्थतेतून आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहताना अशाप्रकारचे टोकाचे पाऊल कुणीही उचलू नये, असे आवाहन स्टॅलिन यांनी केले आहे.

दरम्यान, करुणानिधी यांची प्रकृती आता स्थिर असली तरी खबरदारी म्हणून आणखी काही दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे, असे कावेरी रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

+++++++

बाप रे, मला तर हे वृत्त खोटे वाटतेय !
खरं असेलतर या प्रांताची मनोचिकित्सा करावी लागेल.
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या या सारखाच ही समस्या गंभीर होइल !
मग, परत पॅकेज वैगरे द्यावे लागेल !
अवघड आहे !

पुंबा's picture

16 Aug 2018 - 12:22 pm | पुंबा

चौको, आकडा अतीरंजीत असतो परंतू अनेक लोक मरतात. जे नैसर्गिक मृत्यू असतात ते लोकल कार्यकर्ते आत्महत्या भासवतात. छोटे कार्यकर्ते आपले राजकिय वजन)पक्षातले) वाढावे म्हनुन घरातील वृद्ध, नकोसे झालेले, अपंग, मानसिक विकलांग यांना मारून देखिल टाकतात असे वाचले होते(जयललिता=तुरूम्गात गेलेली तेव्हा लोक मेलेले त्यासंदर्भात). दुर्दैवाने आता, संदर्भ मिळत नाहीये.

'शेषराव मोरेंकृत मुस्लिम मनाचा शोध : एक चिकित्सा' - बशारत अहमद, हरिती पब्लिकेशन्स, ह्या समिक्षा ग्रंथाचा आढावा श्री. दयानंद कनकदंडे यांनी अलिकडे म्हणजे ३ ऑगस्ट रोजी घेतलेला असावा. (डॉ. बशारत अहमद यांच्या ग्रंथाची प्रकाशन तारीख माहित नाही पण हा धागा दयानंद कनकदंडे यांचा लेख अक्षरनामावर येण्याच्या काही दिवसच आधी वर आणला गेला हा योगायोग कि नाही याची कल्पना नाही)

मी श्री. दयानंद कनकदंडे यांच्या आढाव्यावर अवलंबून आहे.

मोरे यांचे ग्रंथ वाचकांनी वाचून, प्रा.मोरे यांच्यावर पूर्णपणे विसंबून न राहत, पूर्ण विश्वास न ठेवता, स्वतंत्रपणेदेखील इस्लामचा अभ्यास करावा आणि सत्य जाणून घ्यावे असा सल्ला त्यांनी (डॉ. बशारत अहमद) दिला आहे.

...वास्तविक पाहता ‘मुस्लीम मन’ अतिरेकी, असहनशील, उग्रवादी आणि हिंसाप्रिय होण्यामागे, मुस्लीम जगतावर होत असलेला सततचा अन्याय आणि अत्याचार कारणीभूत आहे याची दखल घेण्याची गरज त्यांनी (डॉ. बशारत अहमद) समारोप करताना व्यक्त केली आहे. ...

हि अशा प्रकारची सारवासारव प्रत्येक धर्मीयच करतील म्हणून अतिरेकी, असहनशील, उग्रवादी आणि हिंसाप्रियतेचे समर्थन किंवा पांघरुण घातले जाण्याचे कारण नसावे. मी मागच्या माझ्या पक्षपाताच्या टिकेचे आव्हान धाग्यात भारतातील सामाजिक सद्भाव वाढवण्यासाठी Truth and reconciliation commission सारखी व्यवस्था असण्या बद्दलची गरज व्यक्त केली त्याची आठवण झाली. डॉ. बशारत अहमद यांनी त्यांच्या ग्रंथातून मुस्लिमांकडूनही वेळोवेळी झालेल्या अन्यायांची दखल त्यांच्या ग्रंथांमधून तटस्थपणे घेतली असेल अशी अपेक्षा करुया.

...मुस्लीम मन बिघडवण्यासाठी इस्लामची शिकवणच सर्वस्वी कारणीभूत आहे, हेच मोरे सिद्ध करू पाहताहेत...जमाते इस्लामी या स्कूल व्यतिरिक्त अन्य जे इस्लामी स्कूल आहेत, त्यांची व अन्य इस्लामी विचारवंत मांडत असलेल्या जिहादविषयक विचारांची व्यापक दखल न घेता मौलाना मौदुदिप्रणीत चर्चाविश्वाचीच दखल घेण्याच्या मोरे यांच्या प्रयत्नास त्यांनी पक्षपाती संबोधले आहे...

कोणत्याही धार्मिक ग्रंथाची एकापेक्षा अधिक इंटरप्रीटेशन होऊ शकतात नाही असे नाही. मी शेषराव मोरे आणि डॉ.बशारत अहमद या दोघांचीही दोन्हीही पुस्तके वाचली नाहीत पण आतपर्यंतच्या आंतरजालीय वाचन आणि आकलनावरुन अतिरेकी, असहनशील, उग्रवादी आणि हिंसाप्रियतेस कारणीभूत असलेल्या इंटरप्रीटेशनला लक्ष्य केले जाणे सहाजिक असावे. डॉ. बशारत अहमद यांच्या स्वतःच्याच सप्टेंबर २६, २०१३ लोकसत्तातील लेखातून मदरसा विषयक माहिती देताना बशारत अहमद स्वतः च म्हणतात "....कारण त्यांना आपल्या कारभारावर कोणाचेही (अगदी ... समाजाचेदेखील) नियंत्रण नको आहे. " हे वाक्य आहे. त्या आधीच्या परिच्छेदात "...वेगवेगळ्या विचारधारे (मसलक)च्या शाळांमध्ये आपापल्या ‘मसलक’चे शिक्षण देतानाच अन्य ‘मसलक’विरुद्ध द्वेष भावना आणि घृणा निर्माण करणारे शिक्षण दिले जाऊ लागले..." त्या आधीच्या एका परिच्छेदात ते म्हणतात "...सुन्नी मुस्लिमांमध्ये अनेक उपपंथ आणि विचारधारा आहेत. त्यांनी आपापल्या विचारांचे मदरसे स्थापण्यास सुरुवात केली..." म्हणजे काही मदरसांमध्ये आदर्श नसलेल्या द्वेषमुलक इंटरप्रीटेशनच्या आधारावर शिक्षण दिले जात असण्याची शक्यता असणार. (इंग्लंडमधील स्टिंग ऑपरेशनच्या युट्यूब सादरीकरणे ह्या शक्यतेस दुजोरा देतात) . आदर्श नसलेल्या द्वेषमुलक इंटरप्रीटेशन वर शेषराव मोरे असोत वा इतर अनेक टिकाकार असोत बोट ठेवत असतील तर टिकाकार चुकताहेत म्हणण्यापेक्षा आणि शांततावादी इंटरप्रीटेशन केवळ विरोधीपक्षास दाखवण्या पलिकडे जाऊन डॉ. हमीद दलवाईं प्रमाणे मुस्लीम धर्मीयांतर्गत सुधारणावादी आणि प्रबोधनवादी चळवळीस प्रोत्साहन देणारी पाऊले उचलणे योग्य होणार नाही का ? डॉ. बशारत अहमद यांनी काही सुधारणावादी आणि प्रबोधनवादी चळवळीस प्रोत्साहन देणारी पाऊले उचलली असतीलही पण ती मेनस्ट्रीम माध्यमातून तरी पुरेशा प्रमाणात माहिती होताना दिसत नाहीत.

१८५७ च्या उठावातील मुस्लिम सहभागालाही शेषराव मोर्‍यांनी जिहाद संबोधणारे पुस्तक लिहिले आहे त्याचे खंडण करण्याचा प्रयास डॉ. बशारत अहमद यांनी केला असावा असे दिसते. दोघेही लेखक ससंदर्भ युक्तिवाद मांडणारे आहेत. दोन्ही बाजूचे युक्तिवाद वाचल्या शिवाय मत प्रदर्शन अवघड होते पण आता पर्यंत ची जी सर्वसाधारण माहिती आहे त्यानुसार आपण १८५७ च्या उठावातील मुस्लिम सहभागाला सहसा जिहाद संबोधत नाही. या बाबत दोन्ही बाजूंचे परिशिलत होण्याची गरज असावी, हे खरेच त्याच वेळी डॉ. बशारत अहमद यांच्याही बाजूने काही निसटत्या बाजू काही तार्कीक उणीवा राहुन जात असू शकण्याची प्रथम दर्शनी शक्यता वाटते.

* ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक दयानंद कनकदंडे (अक्षरनामा डॉट कॉमवरील लेख) हाच लेख डेली हंट डॉट कॉमवर

* मुस्लिम मनाचा शोध - शेषराव मोरे यांच्या ग्रंथाचा बुकगंगा डॉट कॉमवरील प्रीव्ह्यू

* शेषराव मोरेंकृत मुस्लिम मनाचा शोध : एक चिकित्सा' - बशारत अहमद, हरिती पब्लिकेशन्स, बुकगंगा डॉट कॉमवरील प्रीव्ह्यू

* ‘मदरसा’ अनुदानातील अनुनय डॉ. बशारत अहमद | दैनिक लोकसत्ता लेख Published on: September 26, 2013 1:01 am

सर्व हिंदूंनी इस्लाम स्विकारला तर पाकिस्तानला शांती लाभेल काय? इस्लाम मध्ये किती मजाहे ना? चार बायका करता येतील. हवे ते कधीही खा. नको श्रावण एकादशी सोमवार. शिवाय देवळं मठ सत्संगावरील खर्च किती वाचेल.

माहितगार's picture

15 Aug 2018 - 9:05 pm | माहितगार

आक्षेप असावयास हरकत नाही - मीही बर्‍याचदा मांडत असतो, आक्षेप परसेप्शन पेक्षा अधिक अभ्यासपूर्ण असावेत असे वाटते. युक्तिवाद अभ्यासपूर्ण नसेल, कुठे कच्चेपण राहीले की कोसळतात आणि दुसर्‍या बाजूला कन्व्हिन्स करणे अधिक कठीण होत असावे.

शिवाय देवळं मठ सत्संगावरील खर्च किती वाचेल.

इतर धर्मीयही मुस्लिम धर्मियही त्यांच्या प्रार्थनास्थळांवर , कथित सत्संगावर, औकाफसाठी दानधर्म करत असावेत. मुस्लीम धर्मीयांनी
स्थानिकांच्या भाषातून संवाद साधल्यास अशा सहज टाळण्याजोग्या गैरसमजांना दूरकरणे आणि वाजवी आक्षेपांना लक्षात घेऊन सुधारणावादी, प्रबोधनवादी चळवळीकडे वाटचाल करणे सुकर व्हावे असे वाटते.

...हवे ते कधीही खा. नको श्रावण एकादशी सोमवार...

नेमके असेच काही नाही; त्यांचे त्यांचेही उपवास असतात, अर्थात प्राण्यांच्या मेटींग आणि नवसृजन कालावधीत स्वेच्छेने वाटणाणार्‍या मुस्लिमांनी श्रावण अथवा चातुर्मासात मांसाहार टाळण्यास हरकत नसावी (अर्थात स्वेच्छेने हा शब्द आहेच एपिजे अब्दुल कलाम शाकाहारी होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही दिग्गजांना मांसाहार चालत असे ऐकुन आहे). हे जमण्यासाठी संस्कृती आणि धर्म यांची गल्लत टाळता यावयास हवी.

...चार बायका करता येतील...

विशेष कायद्यांचा आग्रह धरला की असे टोमणे येणे स्वाभाविक असते. त्यांचा युक्तिवाद आमच्यात हिंदूंपेक्षा कमीच प्रमाणात बहुपत्नी विवाह होतात असा असला तरी कायद्यात विशेष सुविधेची अपेक्षा करण्यासाठी वस्तुतः असा युक्तीवाद पुरेसा नसावा. सर्वांनाच बहुपती बहुपत्नी विवाहाची मुभा किंवा कुणालाच नको हे अधिक श्रेयस्कर असावे. मुख्य म्हणजे आजच्या काळात जनतेस उपयूक्त कायद्यांबद्दल चर्चा करण्यासाठी चर्चा माध्यमे आहेत, कायदे करण्यासाठी कायदा मंडळे तेव्हा कुटूंबसंस्थेत धर्मसंस्थेची दखलंदाजी नसावी. बहुपती बहुपत्नी विवाहांचे फायदे तोटे आणि सर्वांना सारख्या कौटूंबिक कायद्यांचे स्वरुप काय असावे हा स्वतंत्र चर्चेचा विषय असावा .

सर्व हिंदूंनी इस्लाम स्विकारला तर पाकिस्तानला शांती लाभेल काय?

तसे पहाता शांतीचा आणि सर्व हींदूंनी मुसलमान होण्याचा अर्था अर्थी संबंध असण्याचे कारण नाही. जिथे हिंदू किंवा परधर्मीय नाहीत तेव्हा आपापसातही मुस्लीम धर्मीय आपापसात एकमेकां सोबत प्रत्येक वेळी शांततेच जगत राहीले असा त्यांचा अंतर्गत इतिहास नसावा. अगदी सुरवातीच्या इतिहासातही त्यांचे काही आदरणीय अगदी त्यांच्याच लोकांकडून अगदी प्रार्थना करतानाही मारले गेले असावेत, ते मगोलीयातील चेंगिज खानाने मध्यपुर्वेतील सत्ता मुस्लिम आहेत म्हणून दया माया दाखवली नाही, कि आजच्या काळात येमेन सारख्या देशातील हिंसेस इतर धर्मीयांच्या अस्तित्वाचा काही संबंध आहे. त्यांच्यातही पाच पन्नास उपपंथ आहेत जे एकमेकांचे जिवन हैराण करतात. जसे ख्रिश्चन धर्मिय उपपथांनी आपापसात केलेल्या हिंसेला वैतागून त्यांना विवीधतेचे महत्व पटले तसे एक दिवस मुस्लिम धर्मीयांचेही होईल असे वाटते.