नमस्कार मंडळी! सदस्यांकडून आलेल्या अभिप्रायांनुसार सध्याची गमभन प्रणाली काही जणांना गैरसोयीची वाटते. विशेषतः गूगल क्रोम आणि गूगल Input Method वापरणार्या आणि विशेषतः मोबाईलवरून लॉग इन करणार्या मंडळींना गमभनशी जुळवून घेणे जरा त्रासाचे वाटते. याव्यतिरिक्त गूगल क्रोम वापरताना अक्षरे सरमिसळ होणे अशाही काही अडचणी अनेकांना येतात.
काही जणांना inscript कीबोर्ड वापरणे सोयीचे वाटते. अशा सर्व लोकांच्या सोयीसाठी आम्ही आता आपल्याला या तीनही लिहिण्याच्या पद्धतीतून आपल्याला सोयीस्कर वाटेल ती पद्धत निवडण्याची सोय आता देत आहोत.
ही Input Method कशा प्रकारे निवडता येईल? अगदी सोपे आहे.
१) मिपावर लॉग इन केल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला "आवागमन" विभाग दिसतो. यामध्ये सर्वात वर आपले सदस्यनाम दिसते. या सदस्य नामावर क्लिक केल्यानंतर आपल्या खात्याचे संपादन करता येते. यासाठी सर्वप्रथम आपले सदस्यनाम क्लिक करा.
२) यानंतर आपल्या खात्यातील द्रश्य, वाचनखुणा, संपादन, यांचे सर्व लेखन असे ऑप्शन्स दिसतील. यापैकी "संपादन" वर क्लिक करा.
३) यानंतर खात्यात प्रवेश केल्यानंतर User "Input Method Settings" हे शीर्षक दिसेल. त्याखाली "Select your choice for Input Method Editor" हे उपशीर्षक आणि त्याखाली एक छोटा चौकोन दिसेल. या चौकोनात Gamabhana आणि त्याच्या उजव्या बाजूला निवडीसाठी एक बाण दिसेल.
हा बाण क्लिक केल्यानंतर त्या चौकोनात ३ ऑप्शन्स दिसतील. Gamabhana, Google Input, Inscript.
४) या तीनपैकी तुम्हाला पाहिजे ती लिहिण्याची पद्धत निवडा.
५) सर्वात शेवट खात्याच्या तळाच्या भागात "प्रकाशित करा" या लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्ही मिपावर Gamabhana, Google Input, Inscript यापैकी तुम्हाला जी सोयीची वाटत असेल अशा पाहिजे त्या पद्धतीने लिहू शकता. हि सुविधा केवळ मिपावर लॉग इन झाल्यावरच वापरता येईल.
उत्तमोत्तम लेखनासाठी शुभेच्छा!
प्रतिक्रिया
6 Jul 2015 - 11:57 pm | श्रीरंग_जोशी
मिपावर टंकताना अनेक सदस्यांना गमभनं वापरणे अवघड जात होते.
विशेष करून टचस्क्रीन किबोर्ड वापरणार्यांना तर अधिकच.
हे दोन नवे पर्याय उपयुक्त वाटत आहेत.
मनःपूर्वक धन्यवाद.
7 Jul 2015 - 12:00 am | सूड
नवीन पर्यायांबद्दल धन्यवाद!!
7 Jul 2015 - 12:08 am | संदीप डांगे
धन्यवाद मालक!
7 Jul 2015 - 12:08 am | अद्द्या
मस्तच .
धन्यवाद :)
7 Jul 2015 - 12:13 am | उगा काहितरीच
यापेक्षा होमपेजवरच नाही का देता येणार ? जसं मराठी किंवा इंग्रजी आहे तसाच अजून एक रेडिओ बटन कॉम्बो . असा असेल तर लॉगइन करतांनाही सोयीची पद्धत वापरता येईल शिवाय बदल करताना ही सोपं पडेल .
7 Jul 2015 - 12:45 am | अनन्त अवधुत
.
7 Jul 2015 - 7:09 am | एस
मिपावर जिथेजिथे लिहिण्यासाठीचा चौकोन आहे, त्याच ठिकाणी हे टंकन पर्याय आणि मराठी/इंग्रजी भाषेचा पर्याय जवळच त्या टेक्स्ट बॉक्स च्या वर किंवा खाली द्यावा. याचा सर्वात मोठा फायदा हा मोबाइलवरून टंकन करणार्यांना होईल. (मोबाइलची स्क्रीन लहान असते, त्यामुळे सुचवलं.)
बाय डिफॉल्ट गमभन असावं. पण प्रत्येक प्रतिसादासाठी आणि प्रतिसादातही लिहीत असताना तिन्ही पर्यायांची अदलूनबदलून निवड करता आली पाहिजे. यात अजून एक आव्हान असेल ते मध्येच इनपुट पर्याय बदलल्यास आधी जेवढे टंकून झाले आहे त्यात काही गडबड नको व्हायला.
यावर लोकांचे काय म्हणणे आहे?
7 Jul 2015 - 8:18 am | dadadarekar
मायबोलीवर असा ऑप्शन आहे.
7 Jul 2015 - 12:45 am | अनन्त अवधुत
.
7 Jul 2015 - 12:49 am | रातराणी
मस्त! धन्यवाद!
7 Jul 2015 - 12:53 am | Jack_Bauer
धन्यवाद !
7 Jul 2015 - 12:57 am | मेघनाद
अतिशय आभारी आहोत ..... गुगल आयमई साठी.
7 Jul 2015 - 1:19 am | वॉल्टर व्हाईट
होय गुगल आयमईमुळे टंकणे आता फार सोपे झाले आहे.
7 Jul 2015 - 6:55 am | मदनबाण
धन्यवाद नीलकांत... गुगल इनपुट हा पर्याय निवडला आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका
7 Jul 2015 - 8:49 am | मदनबाण
परत गमभन हा पर्याय निवडला ! मला "स्टॉक" हा शब्द गुगल इनपुट वापरुन टंकणे जमला नाही, बहुधा गमभनची सवय हे कारण असावे. कोणाला हा शब्द गुगल इनपुटवर कसा टंकावा ते ठावूक आहे का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका
7 Jul 2015 - 10:27 am | लई भारी
साधारण असाच अनुभव येतो मला. अशी जोडाक्षरे विशेषतः अॅ/ऑ स्वर वापरताना येतो. त्यामुळे मी बहुतांश टंकलेखन गुगल वरुन आणि असे विशिष्ट शब्द 'गमभन' वापरुन करायचो.
टंकतानाच पर्याय बदलण्याची सोय दिल्यास खूप बरे होईल.
7 Jul 2015 - 2:08 pm | आतिवास
हेच झाल्याने गाडी परत 'गमभन'वर आणली!
7 Jul 2015 - 8:57 am | ब़जरबट्टू
हे बेस्ट झाले बघा..
7 Jul 2015 - 9:36 am | टवाळ कार्टा
स्वागतार्ह बदल
7 Jul 2015 - 9:43 am | सतिश गावडे
अतिशय उत्तम सुविधा आहे ही.
काही तांत्रिक कारणास्तव माझ्या इथे गमभनने मराठी अक्षरे उमटत नसत. मला इतरत्र कुठेतरी मराठी टंकून ते इथे चिकटवावे लागत असे. मी माझा कळफलक गुगल आयएमई केल्याने ही समस्या दूर झाली आहे.
इन्स्क्रिप्ट हा कळफलक टंतैउ (टंके तैसा उमटे) नाही असे दिसते. हा कळफलक कसा वापरावा हे कोणी सांगेल का?
7 Jul 2015 - 10:23 am | प्रभो
भारी!!!
7 Jul 2015 - 10:25 am | एक एकटा एकटाच
मस्त
7 Jul 2015 - 10:35 am | सुहास झेले
चांगली सुविधा... धन्स रे नीलकांत :)
7 Jul 2015 - 11:17 am | स्पा
उत्तम सुविधा
अजून एक विनंती :- आपले लेखन अप्रकाशित ठेवायची सोय व्हायला हवी, म्हणे एखादा लेख लिहिताना , मध्येच काही इतर काम निघाले तर लेख आहे त्या स्थितीत "सेव्ह" करायची सोय असेल तर बराच उपयोग होईल
7 Jul 2015 - 11:27 am | सुनील
सहमत.
पण तोपर्यंत झालेले लेखन स्वतःलाच व्यनि करीत रहा. मी हेच करीत असे (जेव्हा लिहित असे तेव्हा!)
7 Jul 2015 - 12:52 pm | स्पा
हे कर्ता येइलच
7 Jul 2015 - 9:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर लेखन अप्रकाशितची सोय नाही. मी लेखन करतो आणि स्वत:लाच व्य.नि करतो, म्हणजे अर्धवट किंवा पूर्ण लेखन सुरक्षित
ठेवता येते.
-दिलीप बिरुटे
7 Jul 2015 - 9:14 pm | श्रीरंग_जोशी
दर तीन चार वाक्ये टंकून झाल्यानंतर मी ड्राफ्ट इमेलमध्ये पेस्ट करत राहतो.
8 Jul 2015 - 8:00 am | माहितगार
व्यनिची आयडीया आवडली धन्यवाद.
11 Aug 2015 - 12:27 am | स्वामी संकेतानंद
मी आधी दुसरीकडे लिहतो आणि तिकडून इकडे पेस्ट करतो. सध्या तरी संपूर्णपणे मोबाइल वरच वापर सुरु आहे तेव्हा लेख मी स्टिकी नोट मध्ये टाइप करतो जे आपोआप सेव होत असते. मग इथे पेस्ट करतो. म्हणजे लेख उडायची भीती नाही.
7 Jul 2015 - 12:04 pm | मित्रहो
आभारी आहे.
धन्यवाद
7 Jul 2015 - 1:38 pm | गवि
उत्कृष्ट सुविधा..!!!
7 Jul 2015 - 8:26 pm | श्रीरंग_जोशी
सौजन्य - आयआयडिसी
तसेच बाराहाचा ऑनलाइन कळफलक उपयुक्त आहे.
12 Aug 2015 - 12:20 am | अभ्या..
मला लै उपयोग होतोय. इतकी वर्षे मी इन्स्क्रीप्ट मधूनच टायपतोय. गमभन गंडले तरी काही फरक पडत नाही.
12 Aug 2015 - 12:25 am | श्रीरंग_जोशी
मिपावर आता उपलब्ध असलेल्या इन्स्क्रीप्ट टंकनसुविधेचा वापर कुणी करतोय हे प्रथमच कळले.
मला आता गमभनची एवढी सवय झाली आहे की दुसरे पर्याय तपासावेसेही वाटत नाहीत.
12 Aug 2015 - 12:32 am | अभ्या..
श्रीरंगा अरे ते खूप वर्शे आधीपासुन वापरतोय मी. गुगल इनपूट डिव्हाईस मध्ये देवनागरी इन्स्टॉल करुन उनिकोड टायपायची फॅसिलीटी बरीच वर्शे आहे. खाली स्टेटस बार वर आयकॉन येतो. त्यात भाषा बदलली की चालू इन्स्क्रीप्ट. ;) कुठल्याही सॉफ्टवेअरात चालते. एमेस ऑफीसात पण.
7 Jul 2015 - 8:54 pm | पैसा
धन्यवाद! गुगल कीबोर्ड ट्राय केला. ओके. inscript ची काही अक्षरे उमटत नाहीयेत. शिफ्ट + p शिफ्ट + O
7 Jul 2015 - 9:32 pm | वगिश
गुगल कीबोर्ड वरून टाईप करणे सोपे वाटत आहे.
8 Jul 2015 - 7:57 am | मनुराणी
धन्यवाद
8 Jul 2015 - 10:29 am | साधा मुलगा
आता लिहायला सोपे झाले आहे.
9 Jul 2015 - 3:20 pm | तुडतुडी
मी पा वर स्माय्ल्या टाकायची सोय करा प्लीज
3 Aug 2015 - 11:21 pm | मंदार कात्रे
मायक्रोसॉफ्ट इंडिक लॅंगवेज इनपुट हा सर्वाधिक योग्य पर्याय वाटतो. कोणत्याही साइटवर व हवे तेव्हा toggle करून उत्तम मराठी लिहिता येते. ऑफलाइन मोड मध्ये सुद्धा .
भाषाइंडिया. कॉम साइटवर उपलब्ध आहे. डाऊनलोड करून वापरावे !
10 Aug 2015 - 11:52 pm | जव्हेरगंज
mobile var marathi lihita yet nahi.
what exactly need to do?
10 Aug 2015 - 11:55 pm | जव्हेरगंज
using opera mini browser with Samsung Android.
any solution?
10 Aug 2015 - 11:59 pm | पैसा
गूगल हिंदी इनपुट कीबोर्ड डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी सुहास झेलेचा "तुमच्या एंड्राइडसाठी" हा धागा बघा.
11 Aug 2015 - 12:01 am | श्रीरंग_जोशी
तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी...
11 Apr 2016 - 7:03 pm | जव्हेरगंज
खूप धन्यवाद. याचा खूप उपयोग झाला.
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.in...
11 Apr 2016 - 7:04 pm | जव्हेरगंज
खूप धन्यवाद. याचा खूप उपयोग झाला.
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.in...
12 Nov 2015 - 2:45 pm | bela
धन्यवाद
11 Apr 2016 - 6:13 pm | विदेशी वचाळ
गेले दोन दिवस एक लेख टाकायचा प्रयत्न करत आहे . दर वेळेस एर्रोर येते. काही प्रोब्लेम आहे का? का मीच चुकत आहे ? २०१६ एप्रिल ११