मुंबई-पुणे-मुंबई-१

वाचन प्रेमी's picture
वाचन प्रेमी in भटकंती
2 Jul 2015 - 10:45 am

सर्व मिसळपाव रसिकांना नमस्कार !

प्रथमता मी स्वताची ओळख करून देतो. मी मुंबईचा पण नेहमी प्रमाणे मुंबईकर हे आता मुंबईच्या बाहेर राहू शकतात (ठाणे आणि त्या पुढे ).
असाच ऑफिस मध्ये बसल्या बसल्या बेत ठरला. बरेच महिने कुठे बाहेर जाण्याचा योग आला नव्हता. बायकोला फोन करून सांगितला आपण शनिवार रविवार पुण्याला जातोय, थोडी आश्चर्य चकितच झाली की अचानक काय मनात आल?
बायकोची चुलत बहीण राहते पुण्यातल्या नवी पेठेत म्हटलं त्यांना पण भेटता येइल.
नेहमी प्रमाणे माझ्या ऑफिसच्या बॅचमेट्सना whatsapp वर message केला,"शनिवार-रविवार पुणे" कुणी येणार का? २-३ मित्र मैत्रिणी म्हणाले चालेल पण प्लान काय आहे? त्यांना म्हटलं आम्ही मी आणि बायको शनिवारी सकाळी निघतोय,तुम्ही ऑफिस नंतर वाशी वरून बस पकडा किंवा श्रीकांत ची कार आहे. ऐनवेळी गडबड झाली श्रीकांत ने गाडी service centre ला दिलेली आणि बरंच काम निघाल.

शेवटी शुक्रवारी सगळे म्हणाले बस ने जाऊयात पण कुणालाच माहित नव्हते कोण कोण येणार आहे?

शनिवारी सकाळी ठरल्या प्रमाणे मी आणि माझी बायको पुण्यासाठी निघालो.पनवेल डेपो मधून आपला सरकारी लाल डब्बा मिळाला अर्थात ST महामंडळ पकडली. शिवाजीनगरला उतरा अस मेहुणीने सांगितलेलं.

सकाळी १० च्या आसपास आम्ही शिवाजीनगर ला पोहोचलो.

बायकोच अधून मधून येणं जाणं होतं पुण्यात; ती म्हणाली मला माहीत आहे कस जायचं.
रिक्षावाल्यांना विचारल 'नवी पेठेत जायला किती घेणार?' एक जण म्हणाला '९० रुपये'. आमच्या पत्नी साहेब म्हणाल्या 'आम्हाला नाही जायचं खूपच पैसे सांगता'. थोडं बाहेर गेल्यावर एक जण म्हणाला, '६० रुपये'. बायको थोडी गोंधळली काय कराव तेवढ्यात हुशार रिक्षावाला म्हणाला 'ताई मीटर ने चला!' मुंबईत मीटरने जायची सवय. बायको खुश झाली, मला रस्ते दाखवू लागली. तेवढ्यात तिला मी म्हटलं 'अजून किती लांब आहे?' ती म्हणाली अजून ५-१० मिनिट, तिला मीटर दाखवला मग तिथे आधीच ५५ रु झालेले. तिने ड्रायवर ला विचारलं, 'मीटर एवढं कसं झालं?' शेवटी मी म्हटलं आता जाऊ देत.

शेवटी नवी पेठेत पोहोचलो आणि ७० रु झाले. स्वतःवरच हसू येत होतं. सासरे खालीच भेटले, ते म्हणाले ४० रु जास्त होतात. मी म्हटलं जाऊ त्यात आता पुढच्या वेळी लक्ष ठेवू. गम्मत म्हणजे आम्ही दोघे बस मध्ये असताना GPS ने किती अंतर राहील ते पडताळत होतो पण बसमधून उतरल्यावर नवी पेठ किती दूर आहे हे आम्ही पाहीलच नाही !

मेहुणीच्या कुटुंबाशी ओळख वैगरे झाली गप्पा मारल्या.
मेहुणी मार्केट मध्ये निघालेली तिने म्हटलं चला फिरून येऊ.
चालत मग आम्ही श्रीमंत दगडू शेठ गणपती आणि बाकी सगळ्या मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले.
तुळशीबागेत पण जाण्याचा योग आला, तुळशीबाग मी फक्त मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातच पाहिलेली, मुक्ता बर्वे ला दुकानदाराशी भांडताना.

तिकडे गेल्यावर मनातल्या मनात विचार आला कि बायकोला खरेदी करायचं मनात नको यायला.थोडा स्वार्थी विचार होता पण मला वाटत प्रत्येक नवऱ्याला असा विचार येतच असणार.

मेहुनीने खूपच ट्रेकींग करून घेतली( चालत-चालत पुणे दर्शन), शेवटी परत जाताना पाउस आला म्हणून रिक्षा पडकली आणि घरी आलो.

मस्त श्रीखंडाच जेवण झालं. बायको सारखी विचारात होती आपला plan काय आहे आज दिवसभर आणि उद्या आपण काय करणार आहोत. मी म्हटलं मलाच माहित नाही.
मित्रच group discussion चालू होत whatsapp वर कोण कोण येतंय कुठून निघणार.

श्रीकांत सगळ्यांना जमा करून घेऊन येणार होता पण कोण कोण येणार ते माहित नव्हत.
३च्या आसपास श्रीकांत ला फोन केला त्याने उत्तर नाही दिल, मग सारिका माझी batchmet तिला फोन केला तिने उचलला आणि म्हणाली आम्ही गाडी मध्ये आहोत, श्रीकांत, सारिका आणि विषया.

अखेर श्वासात श्वास आला आणि वाटल आता काहीतरी प्लान होणार.
ते पोहोचू पर्यंत आम्ही तिघे मूवी ला निघालो 'जुरासिक world ३d' मंगला theater मध्ये तिकीट online मिळत होतं, मग तिकडे निघालो.

चित्रपट अप्रतिम होता. मध्ये मध्ये बायको आणि मेहुणी घाबरलेले, पण चित्रपट आवडला त्यांना.
चित्रपट संपला आणि आम्ही ५ च्या आसपास रिक्षा पकडून घरी जाण्यासाठी निघालो.
श्रीकांत ला फोन केला पुन्हा रिसीव नाही केला, सारिका ला केल्यावर कळाल कि ते वाकड ला पोहोचले आणि कर्वे नगर ला श्रीकांत ची मैत्रीण राहते तिकडे श्रीकांत ने विषय आणि सारिका च्या राहण्याची सोय केली आहे.
आणि श्रीकांत त्याच्या मित्राच्या रूमवर राहणार होता.

नवी पेठेत पोहोचताच मेहुनीची प्लेजर होती ती घेतली आणि आम्ही निघालो कर्वे नगरला.

वाटेत कळाल सगळी मंडळी cummins college जवळ भेटणार आहेत.
आम्ही google maps वर navigation चालू ठेवून कर्वे नगर ला पोहोचलो.

सगळी मंडळी भेटली आणि गप्पा रंगल्या, श्रीकांत ची मैत्रीण येणार होती जिच्या कडे सारिका आणि विषया राहणार होत्या. Rudra हॉटेल समोर पराठा आणि sandwich restaurants होते तिथेच बसलो.
कॉलेजला येणारे मुले मुली पण मोठ्या संखेने तेथील पदार्थ चाखत होते.

कुणी पराठे, कुणी sandwich order केली आणि गप्पा रंगल्या तेवढ्यात श्रीकांत ची मैत्रीण आली.
तिला पण सगळ्यांनी काहीतरी ओर्डर करायला सांगितलं तिने कॉल्ड कॉफ्फी ऑर्डर केली.

गप्पांचा मुद्दा एकच आजचा आणि उद्याचा बेत काय.
रात्री hangout आणि रविवारी सिंहगड आणि लवासा ला जायचा प्लान झाला.
६ सीटर XYLO बुक केली.

पराठे आलेले पहिले तर बघतो तर नेहमी restaurant मध्ये जेवढ्या आकाराचा पराठा असतो त्या पेक्षा दुप्पट आकाराचा तो पराठा होता पूर्ण संपवण्या साठी खूप मेहनत घ्यावी लागली.

क्रमशः

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

2 Jul 2015 - 10:53 am | उगा काहितरीच

अच्च जालं होय.

शब्दबम्बाळ's picture

2 Jul 2015 - 11:16 am | शब्दबम्बाळ

डेंजरच लिहिताय कि राव!
बाकी पुणे आलाय म्हणजे अर्धशतक तरी होऊ शकेल! त्यात पण पुण्यातल्या रिक्षावाल्यांकडून फसवणूक?!
कमिन्स कोलेजच्या "आजूबाजूचे" फोटो तरी टाकायला पाहिजे होते! :)
क्रमशः लिहायचं राहिलंय का?

काळा पहाड's picture

2 Jul 2015 - 12:05 pm | काळा पहाड

"आजूबाजूच्यां" च्या लक्षात आलं असतं हे फोटो घेतायत म्हणजे मग? कमिन्स कॉलेज-शाश्वत हॉस्पिटल-मुंबई असा नवीन लेख लिहायला लागला असता ना त्यांना !!

शब्दबम्बाळ's picture

2 Jul 2015 - 12:13 pm | शब्दबम्बाळ

अहो मग मिपावर "पुणे सफरीने झालो सफर" असा एखादा थरारक लेख तरी आला असता ना!!!

आता पुढच्या लेखांची कल्पना मी करू शकतो:
- सिंहगडावर स्वारी
- मेहुनीची प्लेजर पार्ट २
- लवासा चे रहस्य

कपिलमुनी's picture

2 Jul 2015 - 12:34 pm | कपिलमुनी

हहपुवा !

मराठी भाषा लै वंगाळ !

वेल्लाभट's picture

2 Jul 2015 - 12:35 pm | वेल्लाभट

लौल ! ! ! ! ! ! !

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Jul 2015 - 1:02 pm | अनिरुद्ध.वैद्य

जोरदार!!

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 11:27 am | वाचन प्रेमी

पहिल्यांदा लिहतोय आणि पहिल्यांदाच पुणे ट्रीप काही चुका असतील तर सांगा.
फोटो टाकायचा प्रयत्न केला पण जमले नाही.
attach कसा करयाचा सांगू शकाल ?

शब्दबम्बाळ's picture

2 Jul 2015 - 11:32 am | शब्दबम्बाळ

फोटो टाकण्यासाठी माहिती येथे मिळेल.
तसेच मिपाच्या उजव्या कोपर्यात साहित्य संपादकांची माहिती देखील मिळेल, तेही तुम्हाला मदत करू शकतील.
लेखनासाठी शुभेच्छा!

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 11:36 am | वाचन प्रेमी

माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !

टवाळ कार्टा's picture

2 Jul 2015 - 11:41 am | टवाळ कार्टा

मुपि-मुपि म्हणतात ते हेच्च कै? ;)

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 11:50 am | वाचन प्रेमी

नक्की कशा बद्दल म्हणत आहात कळाल नाही ?

शब्दबम्बाळ's picture

2 Jul 2015 - 12:05 pm | शब्दबम्बाळ

पूर्वीच मुपी राहील नाही आता! :(

काळा पहाड's picture

2 Jul 2015 - 11:54 am | काळा पहाड

काय भयंकर अनुभव तो. माझी वाचतानाच दातखिळ बसली. तुमचं काय झालं असेल! हरहर. कुणावरही येवू नसेल असा प्रसंग.
ता.क. सकाळ मुक्तपीठ ला लेख टाकावा ही विनंती.

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 12:21 pm | वाचन प्रेमी

अति भयंकरच समजा !हाहा
लहान मुलांची चेष्टा करू नये सर ! lol

१० पैकी ५ मार्क्स. सुवाच्य अक्षरासाठी अर्धा मार्क जादा!

- सुनील सर
वर्गशिक्षक, ७ वी फ

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 12:19 pm | वाचन प्रेमी

सर असच काही समजा ! शाळेनंतर आता लिहतोय हे तर होणारच होत !
लिह्लाच नाही तर विकास होणार कसा ?
मार्गदर्शन केलेलं आवडेल !

काळा पहाड's picture

2 Jul 2015 - 12:21 pm | काळा पहाड

विकास सर, काय हे !! सांगा जरा त्यांना..

ऑ, अच्च बोल्ले, वाचन पेमी बाबुला शग्गे,

वा कलु हा आपन श्ग्यांना

ठीक आहे. काही प्रतिसादांनी लगेच बिचकू नका. तुम्ही इथे जरा रुळलात की तुम्हीपण असा दंगा कराल.

लेखन हे नुसते रनिंग कॉमेंट्री वाटायला नको. त्यानुसार लेख लिहून झाल्यावर त्यातले हायलाइट्स परत एकदा वाचून ते जास्त रंगवा, आणि जे किरकोळ, अनावश्यक वाटेल ते वगळा. या तंत्राने तुम्हांला थोडे मुद्देसूद, विस्कळीत नसलेले लेखन करण्याचे अवगत होईल.

नंतरच्या टप्प्यात वाचकांची अभिरूची आणि तुमची अभिव्यक्ती यांची सांगड घालायला जमू लागेल.

पुढील लेखनास शुभेच्छा!

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 1:37 pm | वाचन प्रेमी

सल्ला आत्मसात करण्याचा नक्की प्रयत्न करेन !
आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

उत्साहाने लिहिताय!लिहीत रहा.हे वरचं थोडंसं रॅगिंग समजा!त्यात तुम्ही स्फोटक विषयाला हात घातलाय;)
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 1:33 pm | वाचन प्रेमी

रैगिंग होत आहे ते तर कळालच !
पण वाचकांचे प्रतिसाद मिळाले तरच सुधारणा होईल !

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Jul 2015 - 1:06 pm | अनिरुद्ध.वैद्य

तुळशीबागेत पण जाण्याचा योग आला आणि तुम्ही जाऊनही आलात? नमस्कार असो :D
बाकी, बाजूच्या चितळ्यांच्या बाकरवड्या घेतल्यात की नाही?

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 1:23 pm | वाचन प्रेमी

चितळेंची भाकरवडी पुण्यावरून निघताना घेतली !

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Jul 2015 - 1:30 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

प्यारे१'s picture

2 Jul 2015 - 2:10 pm | प्यारे१

भाकर नाही ओ बाकरवडी. ब बडव्यां मधला ब!
-वाचनप्रेमींचा लिखाणप्रेमी

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 2:32 pm | वाचन प्रेमी

भावनांना समझा साहेब !
तुम्ही पुणेकर दिसताय !

प्रमोद देर्देकर's picture

2 Jul 2015 - 2:45 pm | प्रमोद देर्देकर

नाही हो ते ठाणेकर आहेत.
आणि बाकरवडी चितळ्यांचीच का घेतलीत ? संदर्भासहित स्पष्टीकरण द्या बघु.

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 2:56 pm | वाचन प्रेमी

गोष्टी बायको म्हणेल म्ह्नुन्न घ्याव्या लागतात !
याच संदर्भासहित स्पष्टीकरण जमेल अस वाटत नाही !

प्यारे१'s picture

2 Jul 2015 - 3:42 pm | प्यारे१

मी ठाणेकर नाही. धन्यवाद.

प्यारे१'s picture

2 Jul 2015 - 3:40 pm | प्यारे१

समझा नाही समजा.
ज ज जाऊ दे...

यसवायजी's picture

2 Jul 2015 - 1:08 pm | यसवायजी

श्रीखंड कसं किलो म्हणे?

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 1:30 pm | वाचन प्रेमी

दुर्दैवाने श्रीखंड मी नव्हत आणल ! :P

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Jul 2015 - 1:39 pm | अनिरुद्ध.वैद्य

श्रीखंड कसं किलो म्हणे?
>>
श्रीखंड कसं काय किलो म्हण्णार?

तसं विचारायची पद्धत असते (पुण्यात)!!

उदा: काय झालं म्हणे?/कुठेशिक आहे म्हणे? इत्यादि.

वाचकांनीही आपले पहिले वहिले अनुभव ( पुणे ,ठिकाणे,वगैरे हो) इथेच लिहायचे /लिहिले तरी चालतील का इतर वाचकप्रेमींना/दृष्यप्रेमींना ?
बाकी पजेरो एकदम सुसाट बरं का.

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 1:28 pm | वाचन प्रेमी

प्रतिक्रिये प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
कल्पना चांगली आहे !
पुण्याबद्दल अजून माहीती मिळेल !
आणि पहिला अनुभव नाही पण पुणे पहिल्यांदा होता !

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Jul 2015 - 1:31 pm | अनिरुद्ध.वैद्य

नशीब … पुणे … ठिकाणे वगैरे लिहिले :P

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2015 - 1:53 pm | अत्रुप्त आत्मा

आजारी वरणात पडला प्लेन पापडिचा चुरा
आजारी वरणात पडला प्लेन पापडिचा चुरा

याच्यापेक्षा साधा तूप मिठ भात बरा! ;-)
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
आता तो हा येइल हं हे घेऊन! :P

खेडूत's picture

2 Jul 2015 - 2:02 pm | खेडूत

प्रा. बारटक्के?

मृत्युन्जय's picture

2 Jul 2015 - 2:43 pm | मृत्युन्जय

मुंबईकर हे आता मुंबईच्या बाहेर राहू शकतात (ठाणे आणि त्या पुढे ).

स्वतःला मुंबैकर समजणार्‍या बर्‍याच जणांची विकेट गेली. ;)

प्रमोद देर्देकर's picture

2 Jul 2015 - 2:49 pm | प्रमोद देर्देकर

ओ मृत्युन्जय साहेब ज्यांची जायची आहेत त्यांची विकेट जावु दे आम्ही ठाणेकर समजतो. काय टक्क्या बरोब्र नै.

तुळशीबाग मी फक्त मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातच पाहिलेली, मुक्ता बर्वे ला दुकानदाराशी भांडताना.

मुक्ताने भाव केला - ती भांडली असं आठवत नाही!

ते (तथाकथित) मुंबैकर असल्याने त्यांना ते भांडण वाटलं.

ता.क. भांडण काय असतं हे शिकण्यासाठी पुण्यात* येवून शिकवणी लावावी ही सूचना करतो.
*= हे कुठं सुरू होतं आणि कुठे संपतं हे कळण्यासाठी** वेगळी शिकवणी ठेवावी लागेल ही उपसूचना.
**=कळलं तरी वळतंच असं नाही. कुठल्या बोळातून कुठे गाडी*** वळवली असता कुठला सिग्नल टाळता येईल यासाठी तिसरी शिकवणी ठेवा.
***= याची व्याख्या एम-८० ते डुकाटी आणि मारूती-८०० ते रोडरोलर अशी बृहद आहे.

मुंबई वरून पुण्याला आले त्याचं एवढं कौतुक !!!!
मुंबईकर तर अश्या गोष्टी फाट्यावर मारतात असं टक्या सांगतो..
असो..लिहित राहा..

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 3:58 pm | वाचन प्रेमी

जवळच्या गोष्टीच राहतात पहायच्या !

खेडूत's picture

2 Jul 2015 - 4:24 pm | खेडूत

सहमत !

यावरून आपल्याकडे दूरदृष्टी आहे असे स्पष्ट होते!

आदिजोशी's picture

2 Jul 2015 - 6:33 pm | आदिजोशी

असं टक्या सांगतो..

टक्या मुंबईकर नाही.

सर्वसाक्षी's picture

2 Jul 2015 - 4:21 pm | सर्वसाक्षी

झकास!

वाचकांची छान विकेट काढलीत. आणखी लिहा

शब्दबम्बाळ's picture

2 Jul 2015 - 4:40 pm | शब्दबम्बाळ

अभिनंदन! पदार्पणातच अर्धशतक! :)
भवितव्य उज्वल आहे!

वाचन प्रेमी's picture

2 Jul 2015 - 4:51 pm | वाचन प्रेमी

धन्यवाद !

आनंदराव's picture

2 Jul 2015 - 5:50 pm | आनंदराव

ती पानपत ची लढाई पुण्यात कुठेशी झाली हो?

कवितानागेश's picture

2 Jul 2015 - 5:55 pm | कवितानागेश

विडंबकांच्या प्रतीक्षेत! ;-)

जेटमाऊली, अगो हेच विडंबन आहे. ;)

तिमा's picture

2 Jul 2015 - 6:20 pm | तिमा

जीमो गेल्यापासून आम्ही फार उदास होतो. तुम्ही त्यांची उणीव भरुन काढाल असा विश्वास वाटतो.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2015 - 6:25 pm | अत्रुप्त आत्मा

अगदी अगदी! :-D

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jul 2015 - 7:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा जीमोंचा डूआयडी नसेल कशावरून ? (कदाचित जीमोंच्या लेखणीने प्रभावीत झालेला डू/आयडीही असू शकेल म्हणा !) =))

काळा पहाड's picture

2 Jul 2015 - 7:58 pm | काळा पहाड

नसावा. हे शुद्ध लिहितायत.

कधी भाडं मिळतं शवारगेटचं तेव्हा दगडुशेटला जातो.पुण्याबद्दल चांगलं लिवा.

ऋतुराज चित्रे's picture

3 Jul 2015 - 10:35 am | ऋतुराज चित्रे

भाग १
पराठे आलेले पहिले तर बघतो तर नेहमी restaurant मध्ये जेवढ्या आकाराचा पराठा असतो त्या पेक्षा दुप्पट आकाराचा तो पराठा होता पूर्ण संपवण्या साठी खूप मेहनत घ्यावी लागली.
भाग २
पराठ्याचा दुप्पट आकार पाहुन भुक दुप्पट खवळली. पराठ्याचा एक तुकडा तोडला चवीने खाल्ला अहो तोही दुपटीने स्वादिष्ट होता. दुसरा तुकडा तोडला ...... तिसरा.... अर्धा पराठा संपला.. क्रमशः
भाग ३

पराठा संपवला... मझा आली....आज खर्‍या अर्थाने पोटभर स्वादिष्ट पदार्थ खाल्याचे समाधान मिळाले. क्रमशः
भाग ४
बिल मागवले. पराठ्या प्रमाणे बिलही दुप्पट होते (किंमतीने, आकाराने नव्हे). तिकडून दुप्पट वेगाने पळालो. मनातल्या मनात म्हनालो गड्या आपला गांव बरा. पुन्हा कधी मारुतिच्या बेंबीत बोट घालणार नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2015 - 7:00 am | कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही टेंशन नका घेऊ हो लिहित रहा! आमच्या अंडा रेसिपी चे ही सुरुवातीला scrambled egg झालते! हळूहळू लिखाणाच्या खाचाखोचा शिका मात्र जसे शिकत जाल इथे टंगड़ी ओढणारी मंडळी भरभरुन प्रेमही देतील! उरता उरला ह्या लेखाचा प्रश्न इकडे साईकल वर लद्दाख ते विदेश फिरणारी अरभाट माणसे आहेत त्यांना अन मला सुद्धा मुंबई-पुणे-मुंबई हे लुटुपुटु वाटते! लिहिल्यासारखे आपण घरा बाहेर पडलात हे ही नसे थोड़के! तुम्हाला खुप खुप शुभेच्छा फिरते रहा

(बदलीची नोकरी असलेला) बाप्याव

वाचन प्रेमी's picture

6 Jul 2015 - 8:41 am | वाचन प्रेमी

पुणे हे आता २ आठवडे आधी गेलेलो म्हणून लिहिल.
तस आमच पण लद्दाख सोडून बाकी पूर्ण भारत फिरून झालेलं आहे.
या लेखातून वाचकांना प्रवास वर्णना पेक्षा ठिकाणे महत्वाची वाटत आहेत अस वाटत आहे. आणि शेवटी घर कि मुर्गी दाल बराबर.