गाभा:
पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांचा आणि तेथील तथाकथित सुरक्षातज्ञांचा चाललेला भारताविरूद्धचा प्रचार पाहून हसावे की रडावे हेच कळेना. पहिल्यांदा हा कुठला तरी विनोदी आणि विडंबनात्मक कार्यक्रम असावा असे वाटले.
http://www.youtube.com/watch?v=5F4_qwtM5yY&feature=related
http://www.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&feature=related
http://www.youtube.com/watch?v=tQT9cgqdJ6U&feature=related
प्रतिक्रिया
1 Dec 2008 - 9:22 pm | प्राजु
स्वतःला आधी नीट बोलायचे कसे ते समजावून घ्या आणि मग अन टोल्ड स्टोरी सांगा म्हणावं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Dec 2008 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ताजवरील हल्ला हे एक नाटक होते आणि त्याचे विश्लेषन करतांना पाकिस्तानी प्रसारमाध्यमे ज्या ज्या गोष्टींना जवाबदार धरत आहेत, ते पाहता पाकीस्तानी प्रसारमाध्यमांची दया येते. खरं म्हणजे वृत्तीच असते काही लोकांची, काय भडकाऊ बोलतात. खरं म्हणजे हा धागा ठेवू नये, उगाच मनस्ताप होतो आणि तीव्र संताप येतो.
1 Dec 2008 - 9:51 pm | शक्तिमान
मलाही हे पाहून प्रचंड राग आला होता.
पण कदाचित असाच भडकाऊ विचार ऐकून तिथले लोक भारताविषयीचे मत बनवत असावेत आणि अशाच गोष्टी अतिरेकी विचारसरणीला खतपाणी म्हणून काम करत असाव्यात. (हे तर फक्त प्रसारमाध्यमांमध्ये झाले.. अतिरेकी संघटनांमध्ये काय काय सांगत असतील याची कल्पनाही करवत नाही.)
[मिपाच्या धोरणांमध्ये जर हा धागा बसत नसेल तर उडवून टाका. पण हा प्रकार पाहून राहवले नाही आणि म्हणून येथे हे दुवे दिले आहेत.]
1 Dec 2008 - 10:01 pm | टारझन
व्हिडिओ पाहून क्लियर आहे की पाकिस्तानी जनतेचा दृष्टीकोण काय आहे .
ही माध्यमांची चुक नाही, पाकड्यांचा चेहरा आहे हा. आता तरी आपल्यातले लोक जागे होओत ज्यांना वाटते की पाकड्यांना सुधारलं पाहिजे
- टारझन
1 Dec 2008 - 10:03 pm | संजय अभ्यंकर
दुव्यांबद्दल धन्यवाद!
नेहमी दुसर्यांचेही मत ऐकावे!
झैद हमीदची मुक्ताफळे आमच्या नेत्यांनी जरूर ऐकावीत!
एके ठीकाणी तो भारतीयांना अक्कल नाही असेही म्हणतो!
सारे ऐकून बरीच करमणूक झाली.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
1 Dec 2008 - 10:07 pm | चतुरंग
पाकिस्तानचा हा कांगावा अजिबात नवीन नाही! खोट्या गोष्टी ओरडून ओरडून जगाला सांगायच्या आणि त्याचे भांडवल करायचे.
आपण ह्या गोष्टींकडे आत्तापर्यंत कानाडोळा करत आलो, त्यांना मूर्ख म्हणत आलो. ते तसे नाहीत तर पक्के, धूर्त आणि कपटी आहेत!
दुर्दैवाने आजचा दहशतवाद हा कोणत्याही भूमीत घडला तरी त्याचे धागेदोरे आणि संदर्भ आंतरराष्ट्रीय असतात.
आंतरराष्ट्रीय दबाव गट निर्माण करुन त्यात भारताला एकटे पाडणे आणि त्याद्वारे त्याला मिळणारी कोणतीही मदत तोडून टाकणे हा त्यातला मुख्य भाग आहे. हा एकप्रकारचा माध्यमातला दहशतवादी हल्लाच आहे! मुंबईतल्या हल्ल्याचे कंटीन्युएअशनच म्हणाना!!
त्यातल्या दृश्य माध्यमावर आणि भडक विधानांवर भरदेऊन उरलेल्या लोकांचे ब्रेन वॉशिंग सोपे असते. भारतातल्या हिंदू-मुस्लिमात दुही अधिक कशी होईल ह्याच प्रयत्नाचा तो भाग आहे.
ह्याचा व्यवस्थित वापर आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणात आपल्या केंद्राला करावा लागेल.
अमेरिकेच्या समोर, ते ज्या पाकिस्तानला आत्तापर्यंत चुचकारत आलेत, त्यांचा लेखाजोखा सज्जड पुरावे देऊन मांडावाच लागेल. त्याने अमेरिका-भारत जवळीक साधायला मदत होईल. अमेरिका-पाकिस्तान संबंधात दुही कशी येईल हे आपण पाहिले पाहिजे. 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' हीच भूमिका इथे आपल्याला घ्यावी लागेल! हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग आहे.
चतुरंग
2 Dec 2008 - 10:41 am | मनिष
चतुरंगशी बहुतांशी सहमत, पण हे नाही पटले.
अमेरिकेला का 'जागतिक पोलीस' करायचे? त्यांनी युनोचे ऐकले का? फारतर आपले पुरावे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर आक्रमकपणे आणि ठामपणे सादर करावेत आणि लवकरात, लवकर पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या तळावर कारवाई करावी; पण ती स्वतःच निर्णय घेऊन - अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही.
2 Dec 2008 - 12:21 pm | ऍडीजोशी (not verified)
अमेरिकेच्या समोर, ते ज्या पाकिस्तानला आत्तापर्यंत चुचकारत आलेत, त्यांचा लेखाजोखा सज्जड पुरावे देऊन मांडावाच लागेल. त्याने अमेरिका-भारत जवळीक साधायला मदत होईल.
ह्याचे अमेरीकेकडे आपल्यापेक्षा जास्त पुरावे असतील. अमेरीका कुणाचीही मित्र नाही. डॉलर मजबूत ठेवण्यासाठी व जगावर दादागिरी करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशावेळी गरज आहे ती जगाला फाट्यावर मारून स्वतःचे देशहीत जपण्याची.
2 Dec 2008 - 12:36 pm | धमाल मुलगा
अमेरिकेला मध्ये घालण्यामागे एक राजकारण करता येऊ शकतं,
जर अमेरिका मध्ये हस्तक्षेप करत असेल तर हा देश, जो सगळ्या जगाला हत्यारं विकणारा देश आहे (वॉरलॉर्ड) त्याची इथे गोची होऊ शकते. पाकिस्तानला सढळ हस्ते चालु असलेली शस्त्रास्त्रांची मदत करणं त्यांना अवघड होऊन बसेल..आणि ह्या वरदहस्ताशिवाय सीमेपलिकडच्या कळसुत्री बाहुल्यांना जिहांदींशिवाय दुसरा आश्रय राहणार नाही.. कारण अशा परिस्थितीत शक्यतो चीन हा आता धंदेवाईक झालेला देश पाकिस्तानला उघड मदत करुन स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेईल.
आणि जेव्हा अल-कायदा आणि तत्सम संघटनांच्या जोडीला पाकिस्तान जाईल तेव्हा सहाजिकच भारत(पीडीत म्हणुन मुख्य शत्रु), अमेरिका+इंग्लंड(मुस्लिम दहशतवादाशी लढण्यासाठी(!) सतत सज्ज असणारे देश म्हणुन आणि/किंवा जागतीक पोलीस म्हणुन), इस्त्राईल(अरबांशी असलेली जुनी दुश्मनी) आणि इतर काही देश(जे मनापासुन्/इच्छेविरुध्द पण आंतरराष्ट्रीय हितसंबंध जपण्यासाठी म्हणून) अशा मोठ्या आघाडीशी त्यांना सामना करावा लागेल.
मान्य, ह्या अशा परिस्थितीमध्ये भारताला सर्वच निर्णय मनासारखे घेता येणार नाहीत, पण निदान डोकेदुखी तरी नष्ट होण्याची आशा आहे ना???
आणि सर्वात महत्वाचं: अमेरिकेनं मदत नाकारली, इतर देशांनी अंग काढून घेतलं तर...गेले साले बारा गडगड्याच्या विहीरीत! आपल्या लष्कर, नौदल आणि हवाईसेनेत इतकी धमक नक्कीच आहे की ते योग्य कारवाई करु शकतात...फक्त गरज आहे ती खंबीर, दृढ नेतृत्वाची...कोणितरी लाल बहादुर शास्त्रींसारखा खमक्या नेताच हे करु जाणे...इतर सगळे नुसते....
असो,
*पानिपतामध्ये जर बाजारबुणगे नसते तर....
1 Dec 2008 - 10:50 pm | सर्वसाक्षी
पाकिस्तान हे नेहेमीच कांगावा करीत आले आहे. आता आपल्याविरुद्ध परिस्थिती जात आहे असे पाहता त्यांनी बोंबा मारायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे या घटनेत अमेरिकी व खास करुन ज्यु नागरीकांचा मृत्यु ओढविल्याने यांना हुडहुडी भरु लागली आहे. म्युनिच ऑलिंपिक मध्ये इस्राएलच्या खेळाडुंना ठार करणार्यांचे काय झाले आहे ते त्यांना आता आठवले असेल. इस्राएलमध्ये भारतासारखे सहिष्णु लोक नाहीत जे आपल्या लोकांची अमानुष कत्तल करणार्यांवर प्रेम करायचा विचार करतील.
शिवाय तिथल्या विरोधी पक्षाला सरकारला धारेवर धरायची ही आयती संधी आली आहे. या ध्वनिचित्रफितीमध्ये आव तर असा आणला आहे की आम्ही किती गरीब आणि हिंदुस्थान आमच्याविरुद्ध कसे कुंभांड रचीत आहे. मात्र या लोकांनी एकाच वेळी अनेक गोष्टींची असंबद्ध सांगड घालायचा प्रयत्न केल्यामुळे कार्यक्रम विस्कळीत झाला आहे, ही चित्रफीत प्रचारवादी आहे हे अगदी सहज समजुन येते.
मात्र या फितीमधील अत्यंत गंभीर बाब अशी की आपलेच सरकार केवळ राजकारणाखातर तमाम हिंदु संघटनांना 'दहशतवादी' ठरवीत आहे आणी त्याचा रोज उच्चार करीत आहे नेमका याचाच फायदा पाकिस्थानी घेउ पाहत आहेत. मताच्या राजकारणासाठी हिंदु संघटनांना बदनाम करण्याच्या प्रयत्नात सरकार स्वतःच देशाला बदनाम करत आहे. सरकार आपल्या फायद्यासाठी उघडपणे हिंदु संघटनांना व हिंदुत्ववादी नेत्यांना नाहक सरसकट बदनाम करीत असल्याने पाकिस्तनचे भारतातील हिंदुएतर धर्मियांना चिथावण्याचे व ते असुरक्षित असल्याचे भासवीण्याचे काम सोपे करीत आहे.
2 Dec 2008 - 8:42 am | सत्यवादी
हे पाहा CNN वरती : हुसैन हक्कानी : अमेरिके मधला पाकिस्तानी राजदूत ,
हुसैन हक्कानी
याची उत्तेरे ऐकून या इंटरव्यू ची तयारी महिनाभर आधीच केली होती असे वाटते
2 Dec 2008 - 8:48 am | सत्यवादी
विडियो एम्बेडेड केला आहे .. थोडा वेळ लागेल , वर्थ to वॉच
Embedded video from CNN Video