गाभा:
अतिरेकी हल्ल्यानंतर अडचणीत आलेले मुख्यमंत्री विलासराव आज राजिनामासत्रात पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. हल्ल्यानंतर ताजची पहाणी करायला गेलेल्या मुख्यमंत्र्यानी बरोबर सिनेस्रुष्टीतील त्यांचे चिरंजीव रितेश आणि निर्माता राम गोपाल वर्माला बरोबर नेल्याने आय.बी.एन्.लोकमत ने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
जाड कातडीचा, निष्क्रीय्,बेजबाबदार,गुलछब्बू अश्या विशेषणे त्याना लावण्यात येत आहेत.
विलासरावांची ही क्रुती नक्कीच निंदनीय आहे. यानंतर विलासरावानी पदावर रहावे काय? आणि लोकानी पुढच्या टर्मसाठी त्याना निवडून द्यावे काय?
प्रतिक्रिया
30 Nov 2008 - 5:30 pm | अनामिका
विलासरावांसारखा बधिर माणुस मी भारताच्याच काय जगाच्या राजकारणात मला कळायला लागल्यापासुन बघितलेला स्मरणात नाही.
परिस्थितीच गांभिर्य लक्षात घ्यायच असत हेच या गुलछबूला माहित नसाव्,इतका संवेदनाशुन्य,तारतम्य नसलेला इसम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे याची खरच लाज वाट्ते.
गेंड्याच्या कातडिचे राजकारणी तयार करण्याची काँग्रेसची परंपरा विलासराव पुढे नेत आहेत.
लोकांनी भर रस्त्यात जेथे जातिल तेथे यांची खेटराने पुजा बांधावी...... X(
"अनामिका"
30 Nov 2008 - 8:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गेंड्याची कातडी ही कोणत्याही एका किंवा समान विचारसरणीच्या पक्षाची मक्तेदारी नाही असं एक वैयक्तिक मत! (उगाच इतरांना जखमा होण्याचं नाटक करायला का भाग पाडताय?)
बाकी देशमुख पिता-पुत्र आणि रामू यांचा निषेध.
30 Nov 2008 - 5:45 pm | परिकथेतील राजकुमार
>>>लोकांनी भर रस्त्यात जेथे जातिल तेथे यांची खेटराने पुजा बांधावी......
= खेटरांचा अपमान केल्याबद्दल "अनामिका" ताईंचा जाहिर निषेध !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
30 Nov 2008 - 5:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पूजाच्या अपमानाला वगळल्याबद्दल राजकुमाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
"विनाशकाले विपरीतबुद्धी" असं यत्ता आठवीच्या संस्कृतच्या पुस्तकात लिहिलं होतं.
अदिती
30 Nov 2008 - 6:29 pm | परिकथेतील राजकुमार
>>पूजाच्या अपमानाला वगळल्याबद्दल राजकुमाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
== ह्या अपमानाला वगळण्यामागे पुजा नावाविषयी वैयक्तिक आकस असावा काय ? :?
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
30 Nov 2008 - 5:47 pm | सहज
खुर्ची जाईल हे कळाले असावे. निदान मुलाच्या सिनेमाचे व कदाचित विशेष सहाय्याचे काही टक्के कशाला सोडायचे. कमाई चालू राहीली पाहीजे हो कीनई?
:-)
30 Nov 2008 - 7:05 pm | दत्ता काळे
बांडगुळांना कसली आलीये अडचण ?
विलास आणि आबा हि बांडगुळं उलंट दुसर्याचीच अडचण करतील.
30 Nov 2008 - 7:10 pm | शक्तिमान
"पप्पा, आज सुट्टी आहे... चला ना कुठेतरी..." इति (डोक्याने) 'रिते'श.
"असं म्हणतोस का... ताज महाल पाहुयात का?" - विलासी तात
"हो sssss! कित्ती मज्जा! ताज पाहू.. गेट वे ऑफ इंडिया पाहू. रामूकाकांना पण घेऊन जाऊ..."
"चालेल हां बेटा... नंतर चौपाटीवर भेळही खाऊ"
30 Nov 2008 - 7:20 pm | आजानुकर्ण
हाकला. शिवराज पाटलाप्रमाणे या विलासरावालाही हाकला. ताबडतोब शरद पवारांना महाराष्ट्रात परत बोलवा. या प्रसंगी पवारांव्यतिरिक्त परिस्थितीचे गांभीर्य जाणून निर्णय घेणारा व प्रशासनावर नियंत्रण असणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही.
त्या विलासरावाला सांगा की रितेशचे पिक्चर बघण्यासाठी तरी माणसे जिवंत राहायला हवी आहेत.
30 Nov 2008 - 8:21 pm | विकास
एकदम मान्य!
जरी लोकशाहीत केवळ एकाच व्यक्तीवर (आणि कुठल्याही एकाच पक्षावर) सर्व अवलंबून राहण्याची वेळ यावी असे होणे चांगले नसले आणि तसे होऊ नये असे वाटले तरी, पवार आत्ता योग्य या विषयी दुमत नाही.
पण मला तर पवारांना आत्ता गृहमंत्री (प्रधानमंत्री होणे शक्य नाही) झाले तर योग्य वाटते कारण सध्याचे हल्ले हे केवळ मुंबई आणि महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत नाहीत.
30 Nov 2008 - 8:48 pm | टारझन
सहमत ... हे आज नाही तर उद्या होणारच आहे
अरे काय रे कर्णा, महाराष्ट्राच्या मदतीसाठी पवारांना बोलवावं लागावं ? काय देव बिव आहेत का रे ते ? शरद पवार जेंव्हा मुख्यमंत्री होते, तेंव्हाच्या ,मुंबई बाँबस्फोटाच्या वेळी त्यांनाही घामच फुटलेला. क्रिकेट मधे रमलेला माणूस , काय गांभिर्य ओळखणार रे ? मला तरी कोणीच दिसत नाहीये. कदाचित ठाकरे आले तर ते काही तरी आडवा निर्णय घेतील,त्याने ही नुकसान होइल पण आता होतंय त्यापेक्षा ते बरं असं वाटेल .
अँटीपवार - टारझन
30 Nov 2008 - 9:56 pm | आजानुकर्ण
या प्रसंगी जनतेला धीर देणारा समंजस निर्णय हवा आहे. दुर्दैवाने पवार वगळता महाराष्ट्रात इतर नेता नाही याचा खेद वाटतो.
ठाकरे आले तर त्यांच्याकडे सर्व प्रश्नांना वडापाव हे एकच उत्तर आहे. अतिरेक्यांविरुद्ध लढण्यासाठी शिववड्याचा वापर करा असेही ते सांगण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे तर नकोच नको.
30 Nov 2008 - 7:52 pm | लवंगी
सगळे एकाच माळेचे मणी आहेत.. जनतेने हाकलून लावायला पाहिजे .. र र पाटील म्हणे "मी का राजीनामा देऊ. मी योग्य कारवाई केली"..
अरे जरातरी लाज बाळगाकी? जबाबदरीची लोकलाजेस्तव तरी जणिव ठेवा..
1 Dec 2008 - 12:40 am | विसोबा खेचर
सगळे एकाच माळेचे मणी आहेत..
हेच खरं..!
सगळेच नालायक आहेत... गलिच्छ राजकारण करत बसणं आणि स्वत:ची तुंबडी भरणं एवढंच त्यांना जमतं!
तात्या.
30 Nov 2008 - 8:06 pm | सखाराम_गटणे™
क्रुपया, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बद्दल लिहीताना योग्य शब्द वापरवेत. सदर बाबी कायद्याच्या कचाट्यात येउ शकतात.
पदांचा उपमर्द करु नये.
30 Nov 2008 - 8:32 pm | लवंगी
पदांवर मिरवणार्यानी आपापली जबाबदारी विसरल्यास त्याना जराही जाब विचारायला नको का? किती ते घाबरून जगायच! तरीही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व
30 Nov 2008 - 8:23 pm | तिमा
या रामूला याच्यावर फिल्लम् काढायची असंल म्हनून ग्येलं असेल तिकडे त्ये बेनं! प्रेताच्या टाळुवरचं लोनीच की!
30 Nov 2008 - 8:31 pm | लवंगी
हा पदांचा उपमर्द मुळीच नाही.. पदांवर मिरवणार्यानी आपापली जबाबदारी विसरल्यास त्याना जराही जाब विचारायला नको का? किती ते घाबरून जगायच! तरीही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व..
30 Nov 2008 - 8:42 pm | ब्रिटिश टिंग्या
आजकाल कोणीही शिंकले तरीही मिडीया त्याची ब्रेकिंग न्युज बनवते. त्याधर्तीवर मुख्यमंत्र्यांनी तरी थोडेफार तारतम्य पाळायला हवे होते!
असो, मुख्यमंत्र्यांनी (अन् गृहमंत्र्यांनी?) या हल्ल्याची नैतीक जबाबदारी स्वीकारुन आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे!
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
30 Nov 2008 - 9:16 pm | रेवती
हद्द झाली.
अरे काही लोकोपयोगी कामं केली नाहीत (असं तरी कसं म्हणायचं, रामूला विध्वंस दाखवून आणलाय ते कामच आहे.)
आता निदान पोराला बरोबर घेऊन जायचं हास्यास्पद काम तरी नको.
राजीनामा द्यायलाच हवा (निदान मनाची तरी ).
रेवती
1 Dec 2008 - 3:00 am | अविनाशकुलकर्णी
विलास राव जाउ द्यात राखी सावंत ला मुख्य मंत्री बनवा
1 Dec 2008 - 10:16 am | अनामिका
२ पाटिल गेले आता देशमुख कधी राजिनामा देतात ते बघु?
पुंन्हा "अंतरात्मा की आवाज" हा तकिया कलाम ऐकावा लागेल आता.
कानावर हात ठेवण्याची स्माईली नाही का मिपावर
?
"अनामिका"
1 Dec 2008 - 12:24 pm | अनिरुध्द
प्रसंगाचं गांभिर्य ओळ्खून नुसताच राजिनामा मागणं हे पुरेसं आहे का? राजीनामा मागून हे सगळं थांबेल असं वाटतं का? हे नाहीतर दुसरे कोणीतरी ह्या खुर्चीवर बसायला आसुसलेले आहेतचं. सडलेल्या राज्यव्यवस्थेला नेताबदल कितपत परवडू शकतो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नविन आलेले पुन्हा निवडणुकिच्या बाजारात 'आम्ही हे केलं, आम्ही ते केलं' असं बोंबलायला तयार कारण निवडणुकांपर्यंत ह्याचा काहीतरी सुगावा लागणारच.(जो सगळ्यांना माहीत आहे. पण लोकांपुढे नव्याने तिच माहीती द्यायची). ह्यावर कायमचा उपाय एकच. सर्व नेत्यांना भर रस्त्यात उभं करुन फटके मारावेत. कामं करा नाहीतर मरायला तयार व्हा असं पाहीजे. सामान्य जनता अशी चिडून उठल्याशिवाय नेते हादरणार नाहीत. एकाला धडा शिकवला की बाकीचे सुतासारखे सरळ येतील आणि तिच खरी लोकशाही असेल.
1 Dec 2008 - 6:51 pm | आम्हाघरीधन
या सर्व काथ्याकुटात कुठेहि मुळ समस्येला हात घालण्याचा प्रयत्न केलेला नाहि.
केवळ कुणा मन्त्र्या सन्त्र्याने राजिनामा दिला म्हणजे राज्य सुरळित सुरु राहिल आणि हे दहशत वादि पुन्हा असे हल्ले करणार नाहित असे कुणि समजत असेल तर ती एक शोकान्तिका आहे.
कुणिहि मन्त्रि असो तो सर्व प्रथम भारतिय आहे त्याच्या विषयी सन्मान पुर्वक भाषा वापरावि ही एक विनन्ती. आपण आपल्याच देशातिल व्यक्तिला लाखोलि वाहात असतान्ना आपले देश प्रेम सिद्ध होते, कारण ती व्यक्ति आपल्याच मतदानामुळे तिथपर्यन्त पोहोचलि आहे (मुळ चुक आपलिच..... काळ्जी आपणालाच नाहि).
या सर्व परिस्थितित देशात राष्ट्रपती शासन लागु करुन देश लष्कराच्या स्वाधीन करावा आणी या सर्व उपद्व्यापान्चा बन्दोबस्त झाल्यावरच कोण ती लोक शाहि कि काय म्हणतात ती लागु करावि.................
पाक अब नापाक हो चुका है | उसे अब भारत मे शामिल करना हि होगा |span>
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.