मिपावर सध्याच्या मूंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात अनेक लेख आणि प्रतिक्रिया प्रसिद्ध होत आहेत. अर्थातच ते साहजिकही आहे. प्रत्येकाच्या मनातील काळजी, चिंता आणि भविष्याबद्दलची साशंकता प्रत्येकाला सैरभैर करीत आहे.
मिपाने संकेतस्थळाच्या बाबतीत अनेक उपक्रम राबवलेले आहे आणि आपला सक्रिय उत्साह मरा्ठी जगतात दाखविला आहे.
सध्याच्या पार्श्वभूमीवरही एखादा कट्टा मुंबई अथवा पुण्यात भरवला गेला तर बरे होईल. त्याचबरोबर पोलिस अथवा सैन्यदलातील कोणा तज्ज्ञांना अनौप्चारिक चर्चेसाठीही पाचारण करण्यात येता येईल.
अशा घटना भविष्यकाळातही घडणार आहेत आणि त्यासाठी काय काय खबरदारी घ्यावी, प्रक्षोभक मनाला कसे नियंत्रणात आणावे, अतिरेकी संघटनेचे बहुविध पदर आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, माणसाचे झालेले अवमुल्यन इत्यादीवरही उहापोह करता येईल.
शेवटी इक्बाल यांच्या कवनाची आठवण येत आहे," वतन फिकर कर ए नादान, मुसिबत आनेवाली है.
या संभाव्य कट्ट्यात हुतात्मा झालेले पोलिसदलातील कर्मचारी आणि आधिकारी यांनाही काही मदत करता येईल.
प्रतिक्रिया
30 Nov 2008 - 1:35 pm | विनायक पाचलग
मी कोल्हापुरात राहतो पण मला ही कल्पना आवडली.
अजुन काही सुचवु इछितो .
आज मिसळ्पावचे बरेच सदस्य आहेत.
हा लढा आजचा नाही .येथुन पुढे तो सतत लढावा लागणार आहे.आ़णि यासाठी सामान्य माणुस हा मुख्य दुवा अस्णार आहे .तेव्हा अशा अनोपचारेक गप्पातुन जी महिती पुढे येइल त्यद्वारे प्रतिबन्धात्मक उपाय ,योजना यासन्बन्धी मिळ्णारी माहीती जालावरुन सर्वाना पोहोचावी ज्यायोगे अनेक्जणान्पर्यन्त हा उपक्रम पोहोचवता येइल
वाट पाहतोय
30 Nov 2008 - 5:58 pm | विसोबा खेचर
चांगली कल्पना आहे...
30 Nov 2008 - 6:03 pm | सखाराम_गटणे™
पुण्यात कट्टा भरवायची असेल तर मी हवे तर नियोजन करेन
30 Nov 2008 - 10:21 pm | कलंत्री
येणारा शनिवार, ०६ डिसे ला आपल्याला असा कट्टा ठेवता येईल का ?
हा कट्टा गंभीर विषयाला वाहिलेला असल्याकारणे आपण हा कट्टा साध्याच स्वरुपात ठेऊ या. चहा, साधा नास्ता इत्यादी इत्यादी.
शनिवारी संध्याकाळचा वेळ सर्व पुणेकरांना आणि मुबैवाल्याना सोईस्कर राहील.
कट्ट्याचे नियोजन प्रमुख म्हणून गटणे यांची निवड मला सार्थच वाटते.
या कट्ट्यामध्ये काय काय विषयावर चर्चा हव्या हे सर्वच सभासदांनी सूचवावे.
बाकी स्विकृती कळवावी ही विनंती.
निमंत्रक समिती.
30 Nov 2008 - 10:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा कट्टा गंभीर विषयाला वाहिलेला असल्याकारणे आपण हा कट्टा साध्याच स्वरुपात ठेऊ या. चहा, साधा नास्ता इत्यादी इत्यादी.
कट्याला हार्दिक शुभेच्छा !!! :)
1 Dec 2008 - 1:51 am | इनोबा म्हणे
शनिवार, ०६ डिसे ला आपल्याला असा कट्टा ठेवता येईल का ?
बाबरी मशिद पाडल्याचाच दिवस धरला का? उशिरा घरी परतणार्यांना पोलिसांच्या तपासण्यांचा त्रास होणार.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
1 Dec 2008 - 10:51 pm | केदार
शेवटी इक्बाल यांच्या कवनाची आठवण येत आहे," वतन फिकर कर ए नादान, मुसिबत आनेवाली है. >>>
नाव नका काढू त्या घाणेरड्या माणसाचे. त्यानेच "पाक" ही कल्पना अस्तित्वात आनली व जिन्हाला वेठीला धरले.
काय आपण साले भारतीय. त्यांना स्वतचा इतिहास देखील माहित नाही.
8 Dec 2008 - 7:26 am | कलंत्री
काय आपण साले भारतीय. त्यांना स्वतचा इतिहास देखील माहित नाही.
कृपया आपणच आपला इतिहास सांगाना.
8 Dec 2008 - 7:25 am | कलंत्री
काल ०६.१२.०८ ला मिपा कट्टा होऊ शकला नाही.
१३.१२.०८ ला किंवा इतर दिवशी कट्टा करावयाचा असल्यास कृपया माझ्याशी किंवा सखाराम गटने यांच्याशी संपर्क साधावा.
५ जण येणार असल्यास कट्ट्याचे आयोजन करण्यात येईल.
8 Dec 2008 - 10:03 am | विनायक पाचलग
नुकतेच कट्टा पुढे गेल्याचे समजले असुदे.
यावर आणखि एक उपाय करता येइल.
आज बर्यच जणन्कदे वेब कॅमेरा आहे.
त्याचा उपयोग करुन कट्टा केल्यास अधिक लोकाना सहभगी होता येइल.
या कट्याचा उद्देश वैचारीक अस्ल्याने साहजीकच खाण्यापिण्याला फार महत्व नसेल.
तेव्हा कल्पना कशी वाटते.