बेंगळूरूचा आंबा मोहोत्सव

मनोज श्रीनिवास जोशी's picture
मनोज श्रीनिवास जोशी in भटकंती
14 Jun 2015 - 4:47 pm

मुंबई प्रमाणेच बंगलोर च्या पोटात लालबाग आहे. कोणेएके काळी ही बाग समस्त बेंगळूरुकरांचे ‘पर्वती’ सारखे विश्रांती विरंगुळ्याचे स्थान होते. तशी ही बाग Botanical Garden म्हणून ओळखली जाते. १९८० पूर्वी पर्यटनाला / हनिमूनला येणार्यांचे ‘लालबाग’ हे खास आकर्षण असे. आता बंगलोर अफाट वाढले आहे आणि लालबागेचे महत्व ओसरले.
माझ्या पत्रिकेत काय ग्रह आहेत माहिती नाही २००६ सालापासून जी देशविदेशात भ्रमंतीला सुरवात झाली आहे ती अजून सुरूच आहे. सध्या बेंगळूरु मध्ये मुक्काम आहे. कुटुंबापासून लांब असल्यावर वीकांताचा विरंगुळा ही एक मोठी जटील समस्या असते. प्रसिद्ध बासरी वादक श्री. अवधूत फडके यांच्या सुरेल मैफिलीने मागचा रविवार फक्कड गेला. सकाळी सकाळी भिन्न षड्जाने त्यांनी मैफिल मारून नेली. सुरुवात तर छान झाली. आता ह्या आठवड्याची ‘भैरवी” कशाने करायची ह्याचा विचार सुरु होता. कार्यालयातील एका सहकाऱ्याकडून ‘लालबाग’ मधील आंबा मोहोत्सावाची माहिती समजली. येस – आंबा मोहोत्सव – जायलाच हवे.

कोकणात दापोली तालुक्यात ‘मुरुड’ नावाचे नितांत सुंदर समुद्र किनार्यामुळे अलीकडे प्रसिद्धीस आलेले खेडेगाव आहे. शेतात भरपूर भात आणि बागेत भरपूर नारळ , सुपारी आणि आंबे पिकवणारे ते एक चिमुकले खेडे होते. ह्या गावी माझा जन्म आणि दहावी पर्यंत शिक्षण झाले. हिंदुत्वाचे विचार , नाटक –संगीताची आवड आणि आंब्यांचे व्यसन हे वारश्याने आले. घरी आणि गावात भरपूर आंबे होते. थंडी पडू लागली की आंबे मोहरू लागत. ( बोली भाषेत आंबा फुटला ) आणि वाढत्या उन्हाळासोबत आंबे आकार घेत. वार्षिक परीक्षा आणि कैर्या ह्यांचे समीकरण सुटले कि आंबे पिकायला सुरवात ! मग दोन अडीच महिने दिवस रात्र आंबे , आंबे आणि आंबे. सकाळी सकाळी आंबे काढायचे ( उतरवायचे) दुपारी आडी लावायची , आमरस काढायचा , साठे ( आंबापोळी) घालायची ,परत संध्याकाळी आंबे काढायचे आणि दिवसभरात २५ /३० आंबे चोखायचे , ५/१० वाट्या रस ओरपायचा ! चांगल्या गाण्याच्या मैफलीचे पचन अंतर्मुख होवून आणि मौन पाळून होते तर भरपूर आंब्यांचा खुमार सुपारीचा तोबरा आणि यथेच्छ झोपेमुळे वाढतो. मुंबई-पुण्यात आंबा म्हणजे हापूसआंबा असा एक समज आहे. पण आमच्यासाठी तो फक्त व्यापार –व्यवसायाचा भाग होता. आपले प्रेम हापूस व्यतिरिक्त इतर आंब्यांवर , ज्याची संभावना ‘रायवळ’ अशी उपहासाने केली जाते त्यांच्यावर अधिक – अनवट रागाप्रमाणे त्यामध्ये अनोळखी असण्याचे मुग्ध सौंदर्य असते ! तर अशी ही ह्या फळांच्या राजाशी आपली बालमैत्री !! त्यामुळे विचार पक्का आणि लालबाग कडे कूच !
मुरुड - आंबे महामूर

दक्षिण भारतात कमानीला महत्व फार ! तशाच एका कर्नाटक राज्याच्या कामानीने ‘मोहोत्सवात’ दाखल झालो.


बागेच्या मध्यभागी प्रशस्त जागेत आंबा विक्रेत्यांचे जवळपास १०० दुकाने होती. प्रथम नुसतीच एक चक्कर मारली आणि फळांच्या जाती आणि भाव यांचा अंदाज घेतला.
दुकाने

दक्षिणेत पिकणारी आणि मुंबईमध्ये सहज मिळणारी तोतापुरी , केसर , मलगोबा ही काही ओळखीची फळे दिसली , तर खास कर्नाटकी ढंगाची बैनगांपल्ली , इमाम पसंद , रुमानी , काला-पहाड ह्या अनोळखी नावानी उत्सुकता वाढवली.
टेबल टेनिस च्या चेंडू एवढ्या छोट्या आंब्यांना आम्ही लिटी ( लिटील ? ) म्हणतो. अस्सल आंबे खाणारा दर्दी हा पूर्ण आंबा तोंडात घेवून मिनिटभरात पिवळी असलेली बाठ पांढरी करून बाहेर काढतो. त्या लिटी ला इकडे शक्कर-गुटी म्हणतात. लिटी सराईत पाने चोखून मी हात आणि तोंड रसाने बरबटवण्यास सुरवात केली. थोडासाच पण उगाळलेल्या गंधा सारखा घट्ट आणि मधुर रसाने नांदी झाली.

साखर लिटी

एका खोक्यावर चांगले टोकदार आंबे रचलेले होते आणि नाव लिहिले होते – रसपुरी ! जवळ जवळ आपल्या कडील पायरी सारखा पण किंचित अगोड असा रस. पायरीच्या तुलनेत अंमळ बेताचाच !
पायरी

रुमानी , नावाप्रमाणेच निघाला. अतिशय पातळ सालीच्या आंब्याचा गर खाताना – साल तुटत होती. शेवटी न राहून त्याला सालासकट त्याला सद्गती दिली. रसपुरीने कलेली निराशा रुमानी ने नाहीशी केली.

रुमानी
मग ‘काळा-पहाड’ हा बाबुराव अर्नाळकर ह्यांच्या व्यक्तीरेखेचे नाव धारण केलेला आंबा कापला – काळा-पहाड अति गोड , रसाळ आंबा ! खुप आवडला म्हणून अजून एक मागून घेतला. भरपूर रेषा असलेल्या ह्या आंब्याने मजा आणली !

बैनगांपल्लीला बेनिषा असे उपनाव आहे. पण त्याने साफ निराशा केली. आकाराने मोठा , अगोड , पांचट आणि पिका पिवळा आंबा – हाच तो फ्रुट सलाड मध्ये घालत असावेत !
निराशा

खुडूस च्या चवीने परत सुखद धक्का दिला – दुधासारखा स्वाद असलेला आणि घट्ट गराचे फळ नावात गेले.
दुधांबा
एवाना पोट चांगले भरत आले होते आणि म्हणून मरे-गौडा हे एखाद्या नेत्याचे नाव असलेला ‘टग्या’ आंबा खाण्याचा मोह टाळला.एका दुकानदराने सिंदुराची केलेल्या स्तुतीने भाळलो आणि रुमानी प्रमानेचे सिंदुरा आवडून गेला. मल्लिका मुंबई सहज मिळतो आणि नावाप्रमाणे चांगला असतो म्हणून तोही खाल्ला ! नीलम आणि केसर मात्र टाळले. वाढत्या वयाबरोबर १०-१२ आंबे खाणेही कठीण जाते आहे याची चांगली जाणीव झाली आणि आता निघायला हवे असे वाटू लागले.
मल्लिका

हा मोहोत्सव २७ जून पर्यंत सुरु आहे . कोणी बंगलोर निवासी उत्सुक असतील तर कट्टा करू २७ जून ला लालबागेत !
लालबागचा राजा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Jun 2015 - 5:53 pm | मुक्त विहारि

थोडे फोटो असते तर अज्जून बहार आली असती.

बाकी, बंगळूरू म्हटले की, आम्हाला एकच आठवते, एम.टी.आर.चे जेवण.

लालबागच्या बोटॅनिकल गार्डनला फिरायचे आणि ११:३० झाले की, एम.टी.आर.च्या लायनीत उभे रहायचे.जेवण झाले की, लगेच महाराष्ट्र मंडळाच्या खोलीत ताणून द्यायची.

बंगळूरू मधील दू:खाच्या दिवसांत तोच एक दिवस सुखाचा.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

14 Jun 2015 - 5:58 pm | मनोज श्रीनिवास जोशी

फोटो चढवणे जमत नाही....परत प्रयत्न करतो..

मुक्त विहारि's picture

14 Jun 2015 - 6:09 pm | मुक्त विहारि

खालील लिंक उपयोगी पडॅल, असे वाटते.

http://www.misalpav.com/node/13573

किंवा,

http://www.misalpav.com/node/31597 ह्या धाग्यातील मिपाकरां कडून मदत मागीतलीत तरी चालेल.

(अनाहूत सल्लेगार) मुवि

जुइ's picture

14 Jun 2015 - 6:25 pm | जुइ

लेख आवडला थोडे फोटो असते तर आणखीन छान वाटले असते. आईच्या बालपणीच्या आठवणींमध्ये बर्‍याचादा उन्हाळ्याच्या सुट्टीत अढी लावणे, दिवस रात्र अंबे खाणे या गोष्टी येत. बाकी नगर आणि परिसरात 'लालबाग' आंबा यायचा.

मुक्त विहारि's picture

14 Jun 2015 - 8:43 pm | मुक्त विहारि

पुढच्या वर्षी जमल्यास एखादा आम्र-कट्टा बंगळूरूला करायला हरकत नाही.

बॅटमॅन's picture

14 Jun 2015 - 11:02 pm | बॅटमॅन

क्या बात है!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jun 2015 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा

मज्जा मज्जा आली,फोटू बघत बघत वाचायला!

पैसा's picture

14 Jun 2015 - 11:57 pm | पैसा

मी पण यावर्षी बरेच प्रकार खाल्लेत. हापूस, पायरी, मानकुराद, केसर, साखरी, रायवळ, आणि आता पाऊस येता येता नीलम. त्यामुळे लेख वाचून आणि फोटो बघून जळजळ अजिबात झाली नाही!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jun 2015 - 6:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वजन कमी करत असल्यानी यंदा फक्त ६ आंबे खाल्ले आख्ख्या सिझनमधे :(

a

दु दु दु पैसातै

आंब्यांनी सरसकट वजन वाढत नाही हो. जेवणासोबत आंबा खाल्ला किंवा बाकीचा आहार तसाच ठेवून आंब्यावर ताव मारला तर वाढते. शास्त्रीय दृष्ट्या काहिही असो पण मी गेली ४ वर्षे स्वत:वर प्रयोग करून सिध्द केले आहे. दिवसाला ६-७ आंबे खाल्ले तरी वजन वाढत नाही. फक्त जेवण टाळावे. :)
मी अख्खा सीझन एका जेवणाऐवजी ३-४ हापूस आंबे खाते. जर बाकिची जेवणे तशीच ठेवली तर वजन वाढत नाही. जर दिवसाला १० आंबे खाल्ले आणि एकही धान्ययुक्त जेवण केले नाही तर वजन कमी होते असा अनुभव आहे. ट्राय करून बघा एकदा. :) डायबेटिक लोकांनी ट्राय करू नये.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jun 2015 - 9:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही माझं वजन फटाफट वाढतं आंबा खाल्ल्यावर. एकदा वजन ८० किलो रेंजमधे आलं की हाकानाका.

नाखु's picture

16 Jun 2015 - 9:04 am | नाखु

तू इतरांना न देता, एकट्यानेच आंबे फस्त केल्याने तो शाप लागला होता असे मला कळाले आहे.

जेपी बत्तीसी या पुस्तकातील "अंदाजपंचे" गणितावरून भविष्यकथन
नाखु कुडमुडे

पैसा's picture

16 Jun 2015 - 8:57 am | पैसा

काल मांगीलाल आणलेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jun 2015 - 11:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी काही वाचलचं नाही. जळजळ व्हायचा धोका नाही.

श्रीरंग_जोशी's picture

15 Jun 2015 - 1:13 am | श्रीरंग_जोशी

आंबा हे फळच मोहित करणारे, केवळ सुगंधानेही आनंद देणारे आहे. आंब्यासारखाच मधुर लेख.

पॉइंट ब्लँक's picture

15 Jun 2015 - 9:27 am | पॉइंट ब्लँक

कोणी बंगलोर निवासी उत्सुक असतील तर कट्टा करू २७ जून ला लालबागेत !

जर घरी गेलो नाही तर यायला आवडेल :) वेगळा धागा काढा ह्यासाठी.

मस्त लिहिलेय. लालबागला आंबा महोत्सवात एकदाच जाणे झालेय पण फुलांचा शो असतो तेह्वा मात्र बरेचदा जाणे झालेय. सुरेख आहे लालबाग. तिथे एका बाजूला ओळीने सोनचाफ्याची झाडे आहेत, तिथून चालत जाणे हा एक सुगंधी अनुभव आहे!

लालबाग ही कोणे एके काळी सुंदर होती. आता तिची रया गेली आहे. त्यापेक्षा पुण्यातल्या इटुकल्या कोपरा-बागाही खूप सुंदर वाटतात.

हो,ते आहेच, पण ती चाफ्यांची झाडे आठवली एकदम. :)

शशांक कोणो's picture

15 Jun 2015 - 9:38 am | शशांक कोणो

नशीबवान आहात मनोज
आंब्याचा इतका भरभरून सहवास लाभतो तुम्हांला... लेख आवड्या बॉस

नाखु's picture

15 Jun 2015 - 11:13 am | नाखु

हा धागा उघ्डला नाही
वाच्ला तर नाहेच नाही

पिंचीमन्पाच्या सर्कारी पुचाट आंबा महोत्सव अनुभवी
हिर्मुस नाखुस

चौथा कोनाडा's picture

15 Jun 2015 - 12:08 pm | चौथा कोनाडा

मस्त धागा ! आंबा मोहोत्सवचा तोंडातुन गळवयास लावणारा सुरेख गोषवारा !
वर्णन वाचले अन फुटु पाहायची आस लागली ! मश्रीजोंनी लेखाला फुटु लावले अन धागा आणखी रसाळ झाला !
वा, अब आया मझा !

लिखते रहियो मश्रीजो !

संचित's picture

15 Jun 2015 - 1:28 pm | संचित

मी बंगळूर मधेच राहतो. पुढच्या विकेंड ला नक्की जाणार. धन्यवाद.

सुनील's picture

15 Jun 2015 - 2:10 pm | सुनील

माहिती आवडली.

बेंगळूरात लालबाग नावाचा भाग आहे आणि तिथे चक्क बाग आहे, हे आश्चर्यच!!

बाकी आंब्याची खरी मौज उन्हाळ्यातच. पावसाबरोबर आंब्याचा मजा उतरतो.

विअर्ड विक्स's picture

15 Jun 2015 - 9:02 pm | विअर्ड विक्स

२७ ला बंगळुरुत असण्याबाबत साशंक होतो म्हणून आजच भेट दिली.

रायवळ सदृश्य आंब्याच्या दोन जाती पहिल्या नी खाल्ल्या.

सुगर बेबी नि आम्रपाली… यातील सुगर बेबी घरी आणले आहेत. दोन दिवसांनी पिकतील.

तुमचे आभार…. बंगळुरु - मुंबई गेले सहा महिने चालू आहे. त्यामुळे २७ बाबत नक्की सांगू शकत नाही.

रुपी's picture

16 Jun 2015 - 4:45 am | रुपी

तोंपासु!

मदनबाण's picture

16 Jun 2015 - 1:42 pm | मदनबाण

जय अंबे ! ;) फोटो आणि माहिती आवडली ! :)
काही काळा पूर्वी अंब्याची वाईन हा प्रकार बहुधा टिव्हीवर पाहिलेच्या स्मरते... फार शॉलिट्ट प्रकार वाटला होता. :)

{हापुस प्रेमी} ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

मनोज श्रीनिवास जोशी's picture

16 Jun 2015 - 8:19 pm | मनोज श्रीनिवास जोशी

धागा पसंत पडला याचे समाधान आहे !प्रतिसाद कर्त्यांचे आभार आणि मु.वि. आणि श्रीरंग यांचे तत्परतेने मदत केल्याबद्दल विशेष आभार !