भारतातील केंद्र व राज्य सरकारी वास्तूमध्ये सहजपणे प्रवेश मिळणे नक्कीच सोपे नसते. संसदेच्या किंवा विधिमंडळांच्या अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीमध्ये बसता येते पण निवांतपणे वास्तूचे निरीक्षण करायला मिळणे तर अशक्यच. तेथे जाऊन फोटो काढण्याबद्दल तर आजकाल विचारही केला जाऊ शकत नाही.
अशा सरकारी संस्कृतीचा अनुभव घेतलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला अमेरिकेतील अशा वास्तूंना भेट देणे हा खूप सुखद अनुभव असतो. माझा असाच एक अनुभव म्हणजे आम्ही अमेरिकेत ज्या राज्यात राहतो त्याची राजधानी सेंट पॉल येथील स्टेट कॅपिटॉलला दिलेली भेट. कुठलीही अपॉइंटमेंट घेणे नाही, गेल्यावर नावनोंदणी व सुरक्षा तपासणीही नाही. मिनेसोटा हिस्टॉरिकल सोसायटीच्या स्वयंसेवकांकडून गायडेड टूर घेऊन कॅपिटॉल विषयी रोचक माहिती मिळवावी अन सोबत स्थापत्यसौंदर्याचा आस्वाद घ्यावा.
कॅपिटॉलची सध्या वापरात असलेली इमारत ही तिसरी इमारत आहे. पहिली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दुसऱ्या इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच तिच्यात गंभीर त्रुटी निर्माण झालेल्या होत्या व तिचे क्षेत्रफळ कॅपिटॉलच्या गरजांसाठी फारच तोकडे होते. सध्याच्या इमारतीचे बांधकाम १८९६ साली सुरू झाले व १९०५ मध्ये संपले. ही इमारत बांधताना तत्कालीन धोरणकर्त्यांचा उद्देश होता की पूर्वेकडील श्रीमंत राज्यांना दाखवून द्यायचे की संपन्नतेच्या बाबतीत मिनेसोटाही काही कमी नाही.
त्या काळात कॅपिटॉलची इमारत बांधण्यास ४.५ दक्षलक्ष डॉलर्स खर्च आला. आजची किंमत ४०० दशलक्ष डॉलर्सच्या घरात आहे. कॅपिटॉलचे वास्तूरचनाकार आहेत कास गिल्बर्ट. मिनेसोटाखेरीज त्यांनी अर्कान्सास व वेस्ट व्हर्जिनिया या राज्यांच्या कॅपिटॉल्सची वास्तुरचना केली आहे. या इमारतीचे डिझाइन रोममधील सेंट पीटर्स बॅसिलिकाप्रमाणे आहे. कुठलाही आधार नसणारा या इमारतीचा संगमरवरी घुमट आकारमानाच्या बाबतीत (संगमरवरी व आधार नसलेल्या घुमटांच्या यादीत) सेंट पीटर्सनंतर जगात द्वितीय क्रमांकावर आहे.
कॅपिटॉलच्या बाह्य दर्शनी भागात घुमटाशेजारी रथाचे सोनेरी शिल्प आहे. रथाचे चार अश्व निसर्गाच्या चार घटकांचे प्रतिनिधित्व करतात. ते घटक म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी व जल. आपल्या पंचमहाभूतांपैकी केवळ आकाश नाही. रथावरील स्वार माणूस संपन्नतेचे प्रतिनिधित्व करतो. घोड्यांशेजारील स्त्रिया नागर संस्कृती दर्शवतात. आपण जर हिवाळ्याखेरीज इतर काळात कॅपिटॉलला भेट दिली तर गायडेड टूरदरम्यान इमारतीच्या टेरेसवर जाऊन या रथाचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळते. यावेळी भोवताली असलेले डाऊनटाऊन सेंट पॉल व कॅथेड्रलची भव्य इमारत दिसते. तसेच जरा लांब असलेले डाऊनटाऊन मिनियापोलिसही दिसते.
कॅपिटॉलमधली मध्यवर्ती जागा.
कॅपिटॉलच्या इमारतीमध्ये गवर्नर ऑफ मिनेसोटा यांचे कार्यालय, लेजिस्लेटिव ऑफिसेस, मिनेसोटाचे सुप्रीम कोर्ट, सिनेट व राज्य प्रतिनिधिगृह ही सभागृहे आहेत.
मिनेसोटा सुप्रिम कोर्टाचे कक्ष.
त्या कक्षाच्या छताचा हा फोटो. Lex हा कायद्यासाठी वापरला जाणारा लॅटिन शब्द आहे.
कॅपिटॉलमध्ये जागोजाग दिसणारी अप्रतिम कलाकुसर व पेंटिग्ज डोळ्यांचे पारणे फेडतात.
ऑफिस ऑफ गवर्नर बाहेरील चेंबर्समध्ये जुन्या काळातल्या युद्धांची मोठाली पेंटिंग्ज लावली आहे. तत्कालीन सरकारने नेटिव्जबरोबर केलेल्या कराराचेही भव्य पेंटिंग आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या करारानुसार ठरलेली रक्कम नेटिव्जला कधीही दिली गेली नाही. हा अप्रिय इतिहासही टूर गाइडस आपल्यापासून लपवत नाहीत.
या फोटोत दिसणारे स्तंभ बांधकामाच्या वेळी उलटे लावले गेले. ती चूक वेळेत लक्षात आल्याने सुधारली गेली.
रात्रीच्या वेळी लांबून दिसणारे कॅपिटॉल.
आणखी एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे स्थानिक भारतीय समुदायातर्फे भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी कॅपिटॉलच्या प्रांगणात साजरा केला जातो. मिनेसोटाचे गवर्नर गेल्या वर्षीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या प्रसंगी भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम व भारतीय खाद्यपदार्थांची रेलचेल असते.
कॅपिटॉलला केवळ एकदा भेट देऊन समाधान होणे अवघड आहे. एवढेच नव्हे तर इतर राज्यांच्या कॅपिटॉल्सलाही भेट देण्याची इच्छा निर्माण होते.
माहितीचे स्रोत - कॅपिटॉलची गायडेड टूर व विकी.
टीपः मोठ्या आकारमानात फोटोज पाहायचे असल्यास त्यांवर क्लिक करावे.
प्रतिक्रिया
14 Jun 2015 - 8:26 am | मुक्त विहारि
आवडले..
14 Jun 2015 - 7:14 pm | रामदास
पुढचा कट्टा इथेच !!!
14 Jun 2015 - 8:28 am | कैलासवासी सोन्याबापु
वा वा वा वा श्रीरंगभाऊ अप्रतिम प्रचि आहेत! सुबक मांडणी!! माझी आयुष्यात एकदा फ़क्त "लिंकन मेमोरियल, स्प्रिंगफ़ील्ड , इलेनॉइस" इथे "दर्शन" घ्यायला जायची इच्छा आहे!!.
14 Jun 2015 - 8:36 am | सतिश गावडे
मस्त !!!
14 Jun 2015 - 8:44 am | चौकटराजा
एकूण रोमन शैली चा मस्त प्रभाव रोटांडा चा फ़टॊ लाजवाव.
14 Jun 2015 - 8:49 am | कंजूस
अगदी झटपट आणि सुटसुटीत ,मस्तच.भारतीय स्वातंत्र्यदिन- ----काय म्हणता काय!!!
14 Jun 2015 - 9:03 am | मनोज श्रीनिवास जोशी
भटकंती आणि वर्णन आवडले !
14 Jun 2015 - 9:13 am | अत्रुप्त आत्मा
झक्कास फ़ोटो आणि लेखनंहि.
14 Jun 2015 - 9:19 am | अजया
मस्त माहिती आणि फोटो.आतुनही इमारत सेंट पिटरसारखी दिसते आहे!सुरेखच आहे.
14 Jun 2015 - 9:33 am | तुषार काळभोर
आपल्याकडे जर अशी इमारत प्रचंड खर्च करून बांधली वा त्यात अशी पेंटिंग्ज लावली तर पहिली टीका होईल, देशात करोडो लोकांना २ वेळ पुरेसे खायला मिळत नाही, हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत, लाखो मुले कुपोषित आहेत अन् हे स्वतःसाठी 'असलं' विधानभवन बांधताहेत.
अशी टीका राष्ट्रपती भवनावर, परदेशी प्रतिनिधींना दिल्या जाणार्या मेजवान्यांवर आणि चंद्र-मंगळयानावरसुद्धा होते.
14 Jun 2015 - 9:33 am | संदीप डांगे
छान लेख. सुंदर इमारत. फोटो मस्त आलेत. तुम्ही काढलेत का?
बाकी अमेरिकेने आम्हाला स्वतः आमंत्रण दिल्याशिवाय हे सगळे पाहायला येणे शक्य नाही. बिचार्या अमेरिकेतल्या सुंदर सुंदर जागा, एका दर्दी माणसाच्या कौतुकाला मुकतील. असो.
14 Jun 2015 - 10:42 am | जेपी
मस्त...
14 Jun 2015 - 11:40 am | फारएन्ड
सुंदर फोटो आणि माहिती. आर्किटेक्चर स्टाईल 'इटालियन रेनेसान्स' आहे असे विकीपेडिय सांगतो. अनेक सरकारी इमारतींची स्टाईल तीच दिसते. बाकी मिनेसोटाच्या इतिहासाबद्दल काहीच माहिती नाही. आता कुतूहल निर्माण झाले आहे.
सॅक्रमेण्टोला कॅलिफोर्नियाची इमारतसुद्धा पाहण्यासारखी आहे. तेथेही सहज जाता येते.
14 Jun 2015 - 3:37 pm | सानिकास्वप्निल
सेंट पॉल कॅथीड्रल (लंडन) सारखी साधारण दिसणारी इमारत आहे.
सुंदर माहिती दिलीत व फोटो ही छान आले आहेत.
14 Jun 2015 - 3:52 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो, सेंट पॉल्ससारखीच दिसणारी इमारत आहे. (तू कधी गेला होतास? असो.)
बाकी लेख अनेक फोटो व माहितीमुळे खूपच मस्त झालाय. कॅपिटॉलची इमारत अत्यंत देखणी आहे.
ते घुमटाबद्दल एक विचारायचं म्हणजे नक्की यांचा घुमट साईझप्रमाणे क्र. २ चा आहे का? गोलघुमटाबद्दलही जालावर हेच वाचलेय म्हणून इच्यारतो, बाकी कै नाही.
14 Jun 2015 - 4:17 pm | आतिवास
कुतूहल शमवणारा आणि वाढवणाराही लेख!
14 Jun 2015 - 4:35 pm | पद्मावति
मला अमेरिका म्हणजे ठराविक पर्यटक-स्थळे माहित होती. पण हे तुम्ही वर्णन केलेले मिनीसोटा स्टेट कॅपिटॉल वेगळच दिसतय. खरोखर अप्रतिम.
14 Jun 2015 - 5:03 pm | मधुरा देशपांडे
उत्तम लेख. फोटो अप्रतिम.
14 Jun 2015 - 5:10 pm | स्पा
वाह रंगा काका
खत्रुड फोटो येकदम
मजा आली
14 Jun 2015 - 5:43 pm | यसवायजी
लै भारी.
14 Jun 2015 - 6:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम लेख आणि सुंदर फोटो !
अश्या प्रभावशाली इमारती नागरिकांच्या मनात अभिमान निर्माण करतात आणि परकियांच्या मनात देशाच्या प्रतिमेला उजळ करतात. केवळ आपली, आपल्या पक्षाची प्रतिमा आणि आपले बँक खाते उजळ करण्याच्या नादात भारतात इकडे लक्ष देणे विसरून गेले आहे ! :( याशिवाय असे काही केले तर सार्वज्ञिक पैशाची उधळपट्टी या आरोपाची तलवार घेऊन विरोधी पक्ष आणि त्यांचे 'विचारवंत' धावून येतील ते वेगळेच.
15 Jun 2015 - 9:31 pm | चिगो
भव्यतेशी अभिमान निगडीत असतो, इतिहासपण जुळलेला असतो कित्येकदा. अतिप्रचंद देवालयं, राजभवनं इत्यादींशी जुळलेला अभिमान आणि त्या अभिमानाला साजेसंच वागण्याचं आणि आपल्या प्रदेशाची, देशाची उजळणारी वागणूक ठेवण्याचं आमचं 'स्पिरीट' मरुन गेलंय. 'ग्रॅन्ड्युअर','भव्यता'ह्याचं वावडं आहे आपल्याला आता.. इंग्रजांनी 'ल्युतेअन्स देल्ही'बांधली म्हणून बरं, नाहीतर आम्ही गरीबीच्या नावाखाली त्यालाही नावं ठेवली असती..
रंगाशेठ, सुंदर छायाचित्रं आणि वर्णन.. वाचनीय, दर्शनीय धागा..
जाता जाता: मायावतीनं जर तो अफाट पैसा आपल्या स्वतःच्या, काशीरामच्या आणि हत्तींच्या भरमसाठ मुर्त्या न बनवता हे असलं काही भव्य-दिव्य, सुंदर स्मारक बनवण्यात घालवला असता, तर शतशः ऋणी झालो असतो त्यांचा.. पण असोच..
14 Jun 2015 - 6:03 pm | विकास
मस्त ओळख...
मॅसॅचुसेट्स स्टेट हाऊस मधे देखील अनेकदा जाणे झाले आहे. कामानिमित्तानेच गेलो असल्याने कधी बाकी लक्ष दिले नव्हते.
मात्र काही वर्षांपूर्वी त्यावेळेस पाचवीत असलेल्या आमच्या लेकीने काढलेले एक चित्र कसल्यातरी आर्टच्या काँपिटीशनमधे निवडले गेले. नंतर ती चित्रे (सर्व पाचवीतल्या मुलांची) आमच्या स्टेट रिप्रेसेंटेटीव्हने (आमदाराने) त्याच्या स्टेट हाऊस मधील ऑफिसात शोभेसाठी लावली आणि एक सोहळा केला. त्याला गेलो असताना, त्याने आणि अजून एका आमदाराने आलेल्या सर्व पालकांना मॅसॅच्युसेट्स स्टेट हाऊसचा इत्यंभूत इतिहास आणि काही ठळक जागा दाखवल्या.
तेंव्हापासून माझं स्वप्न आहे असंच मुंबईत विधान सभेत जाऊन कुठल्याही पक्षाच्या एका आमदाराकडून विधानसभेबद्दलचा इतिहास ऐकायचा म्हणून! :(
14 Jun 2015 - 6:35 pm | तुषार काळभोर
मुंबई विधानसभा सद्स्याकडून विधानसभेबद्दलचा इतिहास ऐकताय!!!
त्याला त्याच्या बाप-आजा-पणजा याच्यापुढं काही पाहिती नसणार. (अन् कदाचित तो त्यावेळी ज्या पक्षात असेल त्या पक्ष-प्रमुखाचा थोडाफार इतिहास माहिती असेल.-पक्षाचा नाही, प्रमुखाचा)
14 Jun 2015 - 6:33 pm | श्रीरंग_जोशी
भटकंती प्रकारात हे माझे पहिलेच लेखन होते. मिपावरील स्थलवर्णनाचे उत्तमोत्तम लेख वाचून प्रेरणा मिळते. पण त्याबरोबर आपल्याला असे लेखन तेवढ्या परिणामकारकपणे जमणार नाही तर कशाला उगाच लिहावे हा विचारही मनात येतोच. पण जमणार नाही म्हणून प्रयत्नच करू नये असेही नाहीच.
सोन्याबापू - यावा अमेरिकेत आपले स्वागत आहे. स्प्रिंगफिल्ड इलिनॉयची राजधानी आहे. तिथे जाण्याची अजून संधी मिळाली नाही भविष्यात प्रयत्न करीन.
संदीप - हो फोटोज मीच काढले आहेत. या स्थापत्यसौंदर्याला न्याय देण्यासाठी एखादा कसलेला फोटोग्राफरच हवा.
बॅट्या - तुझ्या प्रतिसादामुळे एक चूक लक्षात आली आहे. माहितीचे भाषांतर करताना माझे इंग्रजीचे तोकडे ज्ञान यास कारण आहे. मी लेखनासाठी आधार म्हणून वापरलेले विकिवरचे वाक्य
विकिपानावरील संदर्भ दुव्यावरील वाक्य
त्या प्रकारच्या संगमरवरी घुमटांच्या यादीत आकारमानाने हा घुमट द्वितीय क्रमांकावर आहे.
आकारमानाने मोठ्या अन आधार नसलेल्या घुमटांच्या विकीवरील यादीत या घुमटाचा उल्लेख कुठेच नाही.
साहित्य संपादकांच्या मदतीने मूळ लेखात दुरुस्ती करून घेतो.
फारएन्ड व विकास - हो अमेरिकेतील सर्वच राज्यांच्या कॅपिटॉल्सच्या इमारती आवर्जून पाहण्यासारख्या असतील. मी आणखी एक कॅपिटॉल पाहिले आहे. अजून इतरही पाहण्याच्या यादीत आहे.
मराठी आंतरजालावर व्हरमाँट स्टेट कॅपिटॉलविषयी एक लेख आहे.
इस्पिकचा एक्का व विकास - भारतातील सरकारी इमारतीही याबाबतीत काही कमी नसाव्यात असे बाहेरून पाहून वाटते. परंतु बहुधा त्यापैकी बहुतांश इंग्रजांच्या काळातल्या आहेत. आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी अमरावती हे आधुनिक काळात वसवले जाणारे पहिले मोठे शहर असणार आहे. तिथे होणारे विधानभवन, मंत्रालय, राजभवन, उच्च न्यायालय स्थापत्य बाबतीत कसे असणार याबाबत कुतूहल आहे.
15 Jun 2015 - 11:46 am | मिहिर
तुम्हीपण साहित्य संपादक आहातच ना?
16 Jun 2015 - 12:42 am | श्रीरंग_जोशी
हो, मी पण साहित्य संपादकांपैकी एक आहे. स्वतःचे लेखन दुरुस्त करण्यासाठी जी प्रक्रिया एखादा मिपाकर पाळेल तीच मी देखील पाळायला हवी असे मला वाटते.
15 Jun 2015 - 9:06 pm | वॉल्टर व्हाईट
वरच्या वाक्यासाठी विषेश +१
छायाचित्रे आणि वर्णन छान आहे. नेहमीच्या पटेल स्पॉट्स पेक्षा वेगळ्या डेस्टिनेशन बद्दल वाचायला मिळाले याचा आनंदही आहेच.
16 Jun 2015 - 6:02 pm | मृत्युन्जय
+११११
तुमच्या मनाला ही भावना शिवली याबद्दल तुमचे अभिनंदन.
15 Jun 2015 - 11:54 am | बॅटमॅन
धन्यवाद सरजी! किमान संगमरवरी घुमटांमध्ये तरी दुसर्या क्रमांकाचा आहे हेही नसे थोडके. :) तेवढीच माहितीत भर पडली.
14 Jun 2015 - 6:57 pm | श्रीरंग_जोशी
सानिका - हो लंडनच्या अन इथल्या सेंट पॉल कॅथेड्रल्सच्या इमारतींमध्ये फोटोजवरून काही कोनांतून पाहिल्यास थोडे साम्य असावे असे वाटते. आमच्या इथले कॅथेड्रल म्हणजे स्थापत्यसौंदर्याच्या आस्वादकांना एक पर्वणीच आहे.
या फोटोत माझे आई वडील उभे आहेत.
हे कॅथेड्रल आतून पाहण्याचा अजुन योग आला नाही.
14 Jun 2015 - 8:17 pm | रेवती
माहिती व फोटू आवडले. पूर्वेकडील राज्यांना आता अगदी पटले आहे की मिनेसोटा हे संपन्नतेच्या बाबतीत कमी नाही. डोळे उघडले आमचे! ;)
15 Jun 2015 - 8:32 pm | राघवेंद्र
प्रतिक्रिया आवडली
15 Jun 2015 - 8:20 am | अमृत
उत्तम माहिती व प्रचि. अजुन भटकंती वाचायला आवडेल.
15 Jun 2015 - 10:33 am | सांगलीचा भडंग
मस्त ओळख. फोटो माहिती दोन्हीही एक नंबर
15 Jun 2015 - 11:32 am | मृत्युन्जय
मस्त माहिती जोशी साहेब.
15 Jun 2015 - 11:58 am | स्वाती दिनेश
फोटो आणि लेख दोन्ही आवडले.
स्वाती
15 Jun 2015 - 1:49 pm | खटपट्या
फोटो हाफीसात दीसत नाहीत त्यामुळे वाचनही घरी जाउनच होईल.
15 Jun 2015 - 2:53 pm | कपिलमुनी
उत्तम लेख. अप्रतिम फोटो ..
फक्त इथे भारतीय सरकारी वास्तू आणि परदेशी वास्तू यात मिळणारा प्रवेश यांची तुलना अप्रस्तुत वाटली.
आपल्या देशामध्ये घुसखोरी करायला भरपूर जागा आहेत आणि खोडसाळ शेजारी आहेत. या सरकारी महत्वाच्या वास्तू कायम आतंकवाद्यांच्या हिटलिस्ट वर असतात त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सहज प्रवेश मिळत नाही.
15 Jun 2015 - 4:44 pm | श्रीरंग_जोशी
लेख आवडल्याच्या पोचपावतीसाठी धन्यवाद.
या दोन गोष्टींमध्ये तुलना करण्याचा उद्देश नव्हता. एक सामान्य माणूस ज्याने असा अनुभव पूर्वी कधीच घेतला नसेल (या ठिकाणी मी स्वतः) त्याला पूर्णपणे वेगळ्या अनुभवातून आशचर्याचा जो धक्का बसतो त्याबाबत लिहावेसे वाटले.
15 Jun 2015 - 7:10 pm | खटपट्या
सेंट लूईस येथील जगप्रसीद्ध आर्क मधून काढलेला तेथील कॅपीटल ईमारतीचा फोटो
15 Jun 2015 - 7:55 pm | श्रीरंग_जोशी
फोटो छानच पण ती इमारत तिथल्या ओल्ड कोर्टहाउसची आहे. सेंट लुईस हे राजधानीचे शहर नाही. मिरुरीची राजधानी जेफरसन सिटी येथे तेथील स्टेट कॅपिटॉल आहे.
मी सेंट लुईसमध्ये एक वर्ष राहिलो आहे. हा माझा गेटवे आर्च खालील फोटो.
अन हा आर्चमधून काढलेला ओल्ड कोर्टहाउस व भोवतालच्या परिसराचा.
15 Jun 2015 - 8:50 pm | बॅटमॅन
फटू छान आहेत, फक्त पोज़ जरा अजून ढिश्क्यांव द्यायला पाहिजे होती.
15 Jun 2015 - 9:15 pm | श्रीरंग_जोशी
वरचा फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे अन हा सहा वर्षांपूर्वीचा... हा पण आर्चच्याच प्रांगणातला आहे.
15 Jun 2015 - 11:41 pm | रेवती
आर्कमध्ये जाण्याच्या लिफ्टा आठवतायत का? तिथेच जीव जाईल असे वाटत होते. वर सगळे निरिक्षण झाल्यावर पुन्हा खाली येताना तोच प्रश्न!
15 Jun 2015 - 11:44 pm | श्रीरंग_जोशी
हो त्या लिफ्ट्स आठवतात.
आर्चमध्ये वर गेल्यावर लिफ्टशेजारी खाली जाण्याच्या पायर्याही दिसतात.
वीजपुरवठा खंडित झाल्यास अथवा यांत्रिक बिघाड झाल्यास अन आणिबाणिच्या परिस्थितीत त्या पायर्यांचाच आधार आहे ;-) .
16 Jun 2015 - 12:36 am | विकास
म्हणूनच म्हणतात की माणसांन कितीही उंची गाठली तरी पायरी ओळखून राहावे! ;)
16 Jun 2015 - 12:39 am | श्रीरंग_जोशी
एकदम मार्मिक वाक्य.
:-)
15 Jun 2015 - 8:34 pm | राघवेंद्र
लेख आवडला. स्टेट कॅपिटल बघायचा विचार करेल.
15 Jun 2015 - 9:33 pm | श्रीरंग_जोशी
धन्यवाद.
कॅपिटल अन कॅपिटॉल मधला फरक.
15 Jun 2015 - 10:11 pm | अनामिक२४१०
अप्रतिम ...
आवडले .
15 Jun 2015 - 11:14 pm | गणेशा
एकदम मस्त
16 Jun 2015 - 7:48 am | श्रीकृष्ण सामंत
नमस्कार श्री,
काही ही ही श्री!
असं मी म्ह्टलं तर गैर होणार नाही.कारण हे फोटो पाहून, मी माझ्या भूतकाळात ढकलला गेलो,अर्थात बरं वाटलं म्हणा.
हे सर्व फोटो पाहून मी १९८०-८१ म्हणजेच ३५ वर्षापूर्वीच्या ट्वीन सिटीत गेलो.
कंप्युटर हार्डवेअर(सायबर मेनफ्रेम),CDCकंप्युटर कंपनीत,शिकण्यासाठी आठ महिने मिनायापोलिसला होतो.अशीच भटकंती केली होती.नवीन कॅमेरा घेतला होता.फक्त फोटो रोल फिल्मवर होते.त्या फिल्मस आता फिक्कट झाल्या आहेत.सेंट-पॉलला नेहमीच जावं लागायचं.
आभार
सामंत
16 Jun 2015 - 8:06 am | श्रीरंग_जोशी
या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
ट्विन सिटिजमध्ये आजही आपले स्वागत आहे. कदाचित सेंट पॉल तेवढेही बदललेले नसावे. मिनियापोलिस मात्र चांगलेच बदललेले असेल. बादवे तुम्ही ज्या काळात इथे होता त्या काळात मी जन्मायचाही होतो :-) .
कॅपिटॉलच्या टेरेसवरून सेंट पॉल डाउनटाउन एअरपोर्टसुद्धा दिसतो. ७० अन ८० च्या दशकात तिथून मिनियापोलिस-सेंट पॉल इंटरनॅशनल एअरपोर्टची फ्लाइट चालत असे. तिकिट होते $५. रस्त्याने या दोन एअरपोर्ट्सचे अंतर आहे साडेअकरा मैल :-) . त्या काळात विमानतळावरील सुरक्षा तपासणी अगदीच जुजबी असल्याने तशी फ्लाइट व्यावहारिक होती असे म्हणता येईल :-) .
16 Jun 2015 - 9:11 am | सुनील
२००३ चा हिवाळा मिनियापोलिसात काढण्याचे "भाग्य" लाभले होते.
लाइट रेलचे काम सुरू असल्यामुळे डाउनटाऊन खणलेले होते. फूटभर बर्फातून चालत इमारतीत शिरायचे आणि मग सतरा इमारती पहिल्या मजल्यावरून 'ओलांडून' कार्यालयात पोचायचे, हा दिनक्रम!
मॉल ऑफ अमेरिकाला भेट हा विकांती विरंगुळा.
वसंत ऋतू आल्यावर हवामान जरा सुधारले आणि लेक सुपिरियरला वगैरे फेरफटके मारता येऊ लागले. पण तेवढ्यात प्रोजेक्ट संपला आणि मुक्काम हलवावा लागला. पुन्हा कधी जाणे झाले नाही.
16 Jun 2015 - 9:45 am | श्रीरंग_जोशी
नेमके आम्ही इथे स्थायिक झाल्यापासून मिपाकर कुणीच आले नाही :-( .
आम्ही आल्यापासून लाइट रेल डाउनटाउन सेंट पॉलमध्ये पण सुरू झाली.
16 Jun 2015 - 4:42 pm | गणेशा
आयेंगे .. हम जरुर आयेंगे.. एक दिन ऐसा आयेगा जरुर
16 Jun 2015 - 5:39 pm | श्रीरंग_जोशी
अवश्य या.
गणेशासारखा मिपाकर इथला रहिवासी झाला की पूर्व अन पश्चिम दोन्हीकडल्या मिपाश्रीमंत राज्यांना दाखवून देऊ की मिपासंपन्नतेच्या बाबतीत मिनेसोटाही काही कमी नाही.
:-)
16 Jun 2015 - 6:30 pm | राघवेंद्र
आवडलं.
16 Jun 2015 - 11:38 am | मदनबाण
सुरेख फोटो ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
16 Jun 2015 - 3:14 pm | बेकार तरुण
सुरेख
16 Jun 2015 - 5:23 pm | पुण्याचे वटवाघूळ
छान. या कॅपिटॉलला २००२ मध्ये भेट दिली होती.त्या आठवण्नींना उजाळा मिळ्ला. कधी जमल्यास मिन्नेसोटा राज्यातील तळ्यांविषयीही सफोटो लिहा. या राज्याला दहा हजार तळ्यांचे राज्य (स्टेट ऑफ टेन थाऊजंड लेक्स) असे म्हणतात. अमेरिकेतही कोणी आचार्य अत्रे होते तर.
16 Jun 2015 - 5:36 pm | श्रीरंग_जोशी
या प्रतिसादासाठी धन्यवाद. आणखी एक मिपाकर येथे येऊन गेले होते तर.
तुम्ही सुचवलेला विषयही मनात आहेच.
मिनेसोटाला स्टेट ऑफ टेन थाऊजंड लेक्स म्हणत असले तरी शेजारच्याच विस्कॉन्सिन राज्यामध्ये मिनेसोटापेक्षा अधिक तळी आहेत. ही बाब माझ्या मिनेसोटात जन्मलेल्या ११ वर्षीय भाच्याला सांगितली की त्याचा जाज्वल्य अभिमान उफाळून येतो अन विस्कॉन्सिनचा उद्धार होतो ;-) .
16 Jun 2015 - 5:40 pm | पैसा
लिखाण, फोटो, सगळेच छान!
19 Jun 2015 - 1:35 pm | पाटील हो
अप्रतिम.