आजच्या काळात हिंसेचे उत्तर हिंसेने किंवा त्यापेक्षा जास्त हिंसेने देण्यात यावे असा सर्वसाधारण लोकप्रिय समज आहे. कालच्या अतिरेकी कारवाईने प्रत्येक भारतीयाच्या मनात अथवा जगातील शांतताप्रेमींच्या मनात नकळतच एक काळजीची भावना निर्माण झाली आहे.
सगळ्याच्याच मनात भडक विचार येत आहेत. एकदा सोक्षमोक्षच लावू या असाही विचार नकळतच सगळ्याच्या मनात येत असेलच. आरपाराची लढाईतर करून घ्याच. अशा पार्श्वभूमींवर या समस्येच्या मुळातच जाता येईल का? पिढ्यानपिढ्या चालणारा संघर्ष संपेल का / संपवता येईल का?
यात मला थोडाफार आशेचा किरण दोन गोष्टीमध्ये दिसतो.एकतर आपल्या देशात ब्रिटिशाविरुद्ध यशस्वी ठरलेला गांधीवाद (त्याचबरोबर जगाला शांततामय लढ्याला प्रेरणा देणारा) आणि अतिरेकी असली तरी ती माणसेच असावी. काल्पनिक भीतीच्या अथवा आदर्शाच्या पोटी त्यांना दिशाभूल करत असावेत असे मला वाटते. प्रत्येक व्यक्तिच्या मतात परिवर्तन हे काळाच्या ओघात, अनुभवामुळे आणि भ्रमनिरासामुळे होत असतेच.
त्याही अगोदर आपणा सर्वांचे काही मुद्द्याबाबत एकमत झाले तर बरे होईल असे मला वाटते.
1. सर्वसाधारण अतिरेक्यांचे वय हे पक्व नसते. त्यात विवेक नसतो पण कोणत्याही गोष्टीला त्यात धार्मिक शिकवणही आली यात तो स्वतःची दिशाभूल करून घेतो. पुस्तकी माहितीवर, ज्यांची वैचारिक वाढ खुंटली आहे अश्या लोकांच्या साचेबद्ध मार्गदर्शनावर त्याचा धृढ विश्वास बसत जातो.
2. हिंसेने आणि केवळ हिंसेनेच प्रश्न सुटतील असे त्याला वाटत असते.
3. तो कोणाच्याही हातचे बाहुले बनतो आणि त्या त्या पंथाचे नेते, राजकारणी, गुंड पध्दतशिरपणे त्याचा वापर करून घेत असतात.
4. आपल्याला अशा दैवी कार्यात मृत्यू आलातरी भूतकाळाचे ओझे, अन्याय कायमस्वरुपी दूर होईल आणि तेच करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे असे त्याला वाटते.
5. थोडाफार आदर्श आणि सांगितलेले काम पूर्ण करावे असेच त्याला वाटत असते.
6 शि़क्षण, आर्थिकस्थिती अथवा पालकाच्या पार्श्वभूमीचा कधी संबंध असतो तर कधी नसतो.
बहुधा वरील विवेचन सर्वच प्रकारच्या अतिरेक्यांना लागू होत असावे.
आता दुसरा मुद्दा अतिरेकी कोण होऊ शकतो? माझ्या मते माझा स्वतःचा अनुभव यासाठी बोधप्रद व्हावा.
१९८३/८४ च्या सुमारास मी २०/२१ वर्षच असावा. तेव्हा रामजन्मभूमीचे आंदोलन फारच जोरात होते. "मंदिर वही बनायेंगे जहा रामने जन्म लिया, बच्चा बच्चा रामका जन्मभूमी के कामका, अब तो यह झाकी है मथुरा काशी बाकी आहे" अशा घोषणांनी आमच्या सारख्या बर्याच तरुणानं एक आदर्श, जीवनाची दिशा दिली होती. त्यात मोगलांचे अत्याचार, स्त्रिया, मंदिराला बाटवणे इत्यादी गोष्टींनी आता तर बदला घ्यायलाच हवा असे तरुणांचे मत बनत होते. त्यात अयोध्यांची मस्जिद पाडली गेली आणि भाजपाचे सरकार आल्यावर राममंदिर एक औपचारिकताच उरली आहे असे आमच्या मित्रमंडाळीचे मत होते. आता राममंदिर झाल्यावर मग मथुरा आणि काशीचे मंदिर मुक्त करायचे, भारतातील सर्वच मुस्लिमाचे शिरकाण करावयाचे असेही मत, चर्चा आणि योजना आम्ही बनवत होतो / ऐकत होतो.
१००० वर्षाच्या जुलमी कारकीर्दीचा अंत जवळ आला आहे असेच आम्हा सर्वांना वाटत होते. त्यात एकदा नॆस्ट्रोडोमस नावाच्या एका ज्योतिषाचे लेखही माझ्या वाचनात आले होते. त्यात जगातील सर्वच इस्लामी सत्तेचा अंत २००४ च्या सुमारास होईल इत्यादी छापून आलेले आणि मी वाचलेले मला आठवते, नव्हे त्या लेखाने मला तर भारुनच टाकले होते.
साहजिकच आम्हा सर्व हिंदूच्या उत्साही लोकांना आकाश ठेंगणे झाले होते. तर अश्या पार्श्वभुमीवर एकदा भाजपाच्या राज्य अधिवेशनाला जाण्याचा योग आला. तेथे बरीच मोठी एक आसामी होती, सध्या ती स्वर्गात असावी, त्यांच्या भाषणाने आम्हाला वेड लागत असे. काय ते वकृत्व, काय तो भाषेचा ओघ, तर आम्ही दूर उभे असताना कोणीतरी जवळ आला आणि सांगितले की अमुक अमुक नेत्याने काही खोक्यात काम होईल असे आश्वासन दिले आहे. दुसरा कोणी आला आणि सांगितले की त्या नेत्याच्या कनिष्ठ सहायकाने सांगितले की ५० पेटीच्या खाली असेल तर कृपया माझा वेळ घेऊ नका. या दोन्ही वार्तांत कितपत तथ्य असेल; ते एक रामच जाणे, पण मनाला कोठेतरी तेव्हा तडा गेला होता. मग आमच्या बरोबर एक ज्येष्ठ कार्यकर्ता होता त्याने सांगितले की अरे शिवाजीने पण लूटमार केलीच होती ना? रामजन्मभूमीसाठी पैसा कोठेन येणार?
त्यात मनाची कोठेतरी समजूत घातली आणि नेमके वर्ष आठवत नाही पण भाजपाने सत्तेत येताच रामजन्मभूमीचा मुद्दा बरोबर बासनात बांधून ठेवला. नंतर रामजन्मभूमी असा मुद्दाच नाही असाही प्रतिवाद सुरू झाला. (९०/९२ वर्ष असावे.) त्यात सर्वच संधीसाधुपणा नसावा,काही मर्यादाही असाव्यात असे आज वाटते. त्याहीपेक्षा लोकांच्या आकलनाच्या मर्यादा असाव्यात असे माझ्या अनुभवाने वाटते.
पण या सर्व काळखंडात आमचा बराच भ्रमनिरास झाला, मनाचेही बरेच परिवर्तन झाले. शेकडो गांधींना जे जमले नसते ते भाजपासारख्या एका प़क्षाने एका झटक्यातच आम्हा तरुणांना आमच्या विचारसरणीवर आणि हिंसामय कार्यक्रमावर विचार प्रवृत्त केले यासाठी मी तरी भाजपाचा ऋणीच आहे, तरीपण या आंदोलनात कितीतरी कारसेवक मारले गेले, दंगली झाल्या, वित्त, जीवहानी झाली त्याचा विचार करुच नये असे मला वाटू लागले. मुख्य म्हणजे आपण किती मूर्ख असू शकतो याचेही ज्ञान झाले. सुबहाका भुला शामको घर लौट आया तो उसे भुला नही कहते.
आता इतके पाल्हाळ लावण्याचे कारण म्हणजे की जर भाजपाने आमचा भ्रमनिरास केला नसता तर मीसुद्धा कोठेतरी बॊम्ब बनविणे, गोळ्या झाडणे अथवा निरपराधाच्या मृत्यूने स्वतःची पाठ थोपटण्यात धन्यता मानली असती. माणूसकी पेक्षा धर्म कसा श्रेष्ट आहे यावर आयुष्य घालवले असते. शिवाजी, गोविंदसिहजी, राणाजी यांच्या जीवनाचा चुकीचा अर्थ लावला असता.
त्यामुळे जेव्हा केव्हाही असे हल्ले होतात, अतिरेकी, सामान्यजन आणि पोलिस मारले जातात कदाचित आपणही असे केले असते या कल्पनेने अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.
सारांश : अतिरेकी कोणीही थोडाश्या प्रभावित भाषणाने निर्माण केले जाऊ शकतात. मग ते हिंदू असोत अथवा मुस्लिम असोत.काही वयोगटात नकळतच असले विष भिनवणे फारच सोपे असते. असा अतिरेकी कदाचित तुमच्या घरातही निर्माण होऊ शकतो.
( पुढच्या भागात मला समजलेला गांधीवाद म्हणजे काय?)
प्रतिक्रिया
29 Nov 2008 - 8:50 pm | आजानुकर्ण
लेख फार विस्कळित आहे. मला अजिबात समजला नाही.
स्पष्ट बोलल्याबद्दल माफ करा.
29 Nov 2008 - 9:04 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =))
लेख वाचला नाही, पण कलंत्री साहेबांचं एवढा चांगला विनोद केल्याबद्दल हाबिणंदण ...
इथे गांधीवाद कराल तर अरिरेक्यांऐवजी माझ्यासारखा कोणी नथू गोडसे त्याला गोळ्या घातल्याशिवाय रहाणार नाही.
जे निष्पाप जिवांची हत्या करतात त्यांना गांधीवाद *ट समजेल ?
नॉटीगीरी: बाकी आपल्याबरोबर गांधीवाद होतोय हे कळून अतिरेकी हसून हसून नक्कीच मरतील आणि त्यांचा बिना लष्कर, गोळ्या आणि कोणतेही एफर्ट्स न घेता खात्मा होईल.
-(सावरकर वादी) टारझन
29 Nov 2008 - 10:48 pm | llपुण्याचे पेशवेll
टारूशेठशी सहमत. कलंत्री साहेबानी मनापासून लिहीलेले असल्याने त्याला अगदी मी विनोद नाही म्हणणार म्हणून टारूला +१ नाही. :)
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 11:27 pm | टारझन
पेशवे साहेब , कलंत्री साहेब , वरील विनोद कोणालाही वैयक्तिक टार्गेट करून केलेला नाही, त्यामुळे वाईट वाटून घेउ नये. पण गांधीवाद आणि आतंकवाद याचा संबंध जोडणे हे हस्यास्पद वाटले म्हणून विचारावर आणि परिस्थितीवर एक गंभीर विनोद केला आहे.
आमचा इतिहास कच्चा असला तरी आम्ही इतिहासात नापास मात्र झालो नव्हतो. गांधीच्या सत्याग्रहांमुळे आणि असहकारामुळे इंग्रज भारत सोडून गेले नाहीत. उलट गांधीवादामुळे आपलं स्वातंत्र्य लांबलं. दुसर्या महायुद्धा नंतर सर्व राजवट करणार्या देशांना आपल्या वसाहती मुक्त करणे भाग होते. इंग्रजांना सोडून जाणे जिवावर आलेलं, म्हणून त्यांनी जाता जाता देशाची फाळणी केली, आणि आपल्या प्रिय परमपुज्य शांतीवादी गांधीबाबांनी त्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि वर कितीतरी कोटी रुपये (जे अर्थात त्यांच्या मालकीचे नव्हते) पाकिस्तान राष्ट्र उभारणीसाठी दिले. पाकिस्तान ने तोच पैसा भारतावर आक्रमण करण्यासाठी वापरलेला. क्राँग्रेसच छगन सरकार हे गांधी-नेहरूंचच पिल्लू. त्यांच्या नितीने चालाल तर तुम्हाला तुमच्या सैन्याला व्हिआरएस द्यावा लागेलच. वरिल माहिती काहीशी चुकीची असू शकते पण त्यात सत्यता आहे हे आपणास माहीत असेलच. गोडसे भाउंनी त्यांचं काम करायला ४०-५० वर्ष उशिर केला. असो
वरिल गोष्टींमुळे मला कलंत्री साहेबांचा मुद्दा हस्यास्पद वाटला. अर्थात माझा कोणावर रोष नाही. संपादकांना काही अक्षेपार्ह वाटल्यास त्यांची आगाउ माफी मागतो आणि प्रतिसाद उडवावा वाटल्यास माझी ना नाही.
- टारू गोडसे
29 Nov 2008 - 8:52 pm | बिपिन कार्यकर्ते
कलंत्री साहेब,
मी या मुद्यावर बोलण्यापूर्वी तुमच्या पुढच्या भागाची वाट बघेन. मला तुम्हाला कश्या प्रकारचा गांधीवाद अभिप्रेत आहे ते बघायचे आहे.
बिपिन कार्यकर्ते
29 Nov 2008 - 10:28 pm | कलंत्री
समोरच्याला संधी देणे म्हणजे गांधीवाद. एक उदाहरण म्हणून सांगावेसे वाटते. शिवाजी महाराज शिस्तप्रिय, कठोर शासक म्हणून सगळेच समजतात. त्यांच्या आयुष्यात त्यांचे आणि त्यांच्या सेनापतीचे पाहिजे तसे जमले नाही. उदा. नेताजी ( बडतर्फ), प्रतापराव ( खफामर्जी) आणि अजून एक ( नाव आणि कृती विसरलो.),
त्याच शिवाजीने मात्र आपल्या पुत्रासाठी ( मोगलाला जाऊन मिळालेले असतानाही), त्यांना मोगलाच्या तावडीतुन आणले आणि त्यांना समर्थाच्या सहवासात ठेवले. त्यांना संधी दिली आणि इतिहास म्हणतो की धर्मासाठी बलिदान करावे तर संभाजीसारखे. जर शिवाजीमहाराजानी शिस्त आणि शिक्षाकेली असतीतर?
आता शिवाजीचा हा गांधीवाद नाही काय?
29 Nov 2008 - 11:09 pm | बिपिन कार्यकर्ते
साहेब, माफ करा, २-३ वाक्यात खूप मोठा आवाका मांडता येणार नाही म्हणून असेल, पण खूप उथळ वाटले. तरी पण मी तुमच्या दुसर्या लेखाची वाट बघेन. त्या लेखात तुम्ही नक्की काय आणि कसे करू इच्छिता ते पूर्ण पणे मांडाल अशी आशा करतो. तरच काही बोलता येईल.
समोरच्याला संधी देणे म्हणजे गांधीवाद.
मी तेच करतोय. :)
अवांतरः वर उथळ शब्द वापरल्याबद्दल गैरसमज नसावा. दुसरा यथार्थ शब्द लक्षात नाही आला पटकन. धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
29 Nov 2008 - 11:15 pm | शक्तिमान
आपण इतिहासामध्ये गफलत करत आहात.
हे आपले व्यक्तिगत मत चुकीचे आहे.
जर सेनापतींचे आणि राजांचे पटत नसते तर एवढ्या मोठ्या परकीय सत्तेशी लढताच आले नसते आणि स्वराज्याची उत्कृष्ट व्यवस्था राखताच आली नसती. आणि ज्याच्याशी पटत नाही अशा माणसाला कोण कशाला सेनापती म्हणून नेमेल?
नेताजी पालकरांना नंतर खुद्द शिवाजीराजांनी हिंदुधर्मात आणि हिंदवी स्वराज्याच्या कामी समाविष्ट करुन घेतले होते.
बहलोलखानाला ठार न करता एकदा प्रतापरावांनी त्याला सोडून दिल्यामुळे राजांचा त्यांच्यावर रोष होता. यात प्रतापराव आणि राजे यांच्या पटण्या-न-पटण्याचा काय संबंध?
संभाजीराजे मोगलांना का जाऊन मिळाले याची पार्श्वभूमी वेगळी आहे. आणि ते हिंदवी स्वराज्याविरूद्ध लढण्यासाठी तिकडे गेले नव्हते. शिवाय शिवाजीराजे स्वतः संभाजीराजांना आणायला गेले नव्हते - संभाजीराजांना आपली चूक समजून आल्यावर ते स्वतः परत आले होते. राजांनी नेताजी आणि संभाजीराजे या दोघांनाही समानच न्याय लावला होता.
शिवाय या वरील उदाहरणांचा गांधीवादाशी काय संबंध आहे ते स्पष्ट होत नाही.
30 Nov 2008 - 9:55 am | कलंत्री
शिवाजी महाराजांशी सध्याच्या मूळ धाग्याचा संबंध नाही म्हणून मी प्रतिवाद देत नाही. आपण एकदा पुन्हा शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावे असे सूचवावेसे वाटते.
29 Nov 2008 - 11:48 pm | इनोबा म्हणे
आता शिवाजीचा हा गांधीवाद नाही काय?
नाही, हवं तर त्याला शिवाजीवाद म्हणा.
आणि हो, संभाजी महाराजांना संधी दिली गेली कारण शिवाजी महाराजांना आपल्या पुत्रावर विश्वास होता, आणि तो विश्वास संभाजी महाराजांनी सार्थ ठरवला. हीच संधी महाराजांनी अफजल्याला दिली असती तर कदाचित इतिहास बदलला असता.
पृथ्वीराज चौहानने महंमद घौरीला दिलेल्या संधीने काय झाले हे माहित आहे ना?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
29 Nov 2008 - 11:58 pm | ऋषिकेश
बापरे! हे बात कुछ हजम नहि हुई :)
-(हाजमोलाच्या शोधात गोंधळलेला) ऋषिकेश
30 Nov 2008 - 10:23 am | सर्वसाक्षी
<समोरच्याला संधी देणे म्हणजे गांधीवाद. एक उदाहरण म्हणून सांगावेसे वाटते. शिवाजी महाराज शिस्तप्रिय, कठोर शासक म्हणून सगळेच समजतात. त्यांच्या आयुष्यात त्यांचे आणि त्यांच्या सेनापतीचे पाहिजे तसे जमले नाही. उदा. नेताजी ( बडतर्फ), प्रतापराव ( खफामर्जी) आणि अजून एक ( नाव आणि कृती विसरलो.)>
समयास का पावला नाहीस? - आपला सेनापती आपल्या हुकुमानुसार वागत नसेल तर राजाला तो व्यक्ति म्हणुन प्रिय असला तरी त्यावर कारवाई करावीच लागते. नपेक्षा सैन्याची शेंदाड - बेशिस्त फौज झाली असती. द्वारकानाथजी, याच नेताजीचा जेव्हा महंमद कुलिखान झाला व जेव्हा पुढे त्याने आपल्या चुकीच्या परिमार्जनार्थ पुन्हा हिंदु होण्याचा व हिंदवी स्वराज्यात येण्याचा मानस व्यक्त केला तेव्हा याच राजांनी त्याचे स्वागत केले व त्याला आपल्यात सामावले. एखादा दाखला देताना पूर्ण हकिकत सांगावी, सोयिस्कर असे अर्धसत्य सांगु नये.
सला काय निमित्त्ये केला? - सरसेनापती प्रतापराव गुजराने जिंकलेला बहलोल आपल्या अखत्यारीत दयेपोटी सोडुन दिला. आता तुमच्याच गांधीवादी भाषेत त्याला संधी दिली. त्याने काय केले? पुन्हा स्वराज्यावर उलटला! निवडुंगाच्या फडाला प्रेमाने कुरवाळले तरी तो तुमचा हात ररक्तबंबाळ करणारच. आता प्रतापरावावरील कारवाई विषयी - शत्रूशी तह करणे हा राजाचा अधिकार असतो, सेनापतीचा नव्हे. १९७१ विसरलात काय? कै. फिल्ड मार्शल माणेकशॉ यांनी 'तीन दिवसात कराची साफ करतो' अशी तयारी व तेख अंगी असतानादेखील पंतप्रधानांच्या आदेशादाखल कूच रोखली. जर सेनापती शत्रूला दया दाखवायचा निर्णय स्वतः घेऊ लागले तर लगोलग शिपाई देखील असे निर्णय घेऊ लागतील व सैन्याचा बोजवारा उडेल.
द्वारक्कानाथजी पुन्हा तेच सांगतो. एखादा दाखला देताना पूर्ण हकिकत सांगावी, सोयिस्कर असे अर्धसत्य सांगु नये.
राज्याभिषेक प्रसंगी राजांनी याच बहाद्दर सेनापतीची आठवण सिंहासनस्थ होण्याआढी आवर्जुन काढली होती व ते नसल्याचा शोकही केला होता. शिवाय प्रतापरावांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या पराक्रमाची नुसती तारिफ करुन ते थांबले नव्हते तर त्यांनी त्याच्या घराण्याशी सोयरिकही केली होती.
राजाला प्रसंगी कठोर निर्णय हे घ्यावेच लागतात. दोन्ही सेनापतींविषयी इतिहास हेच सांगतो. असे असताना 'राजांचे सेनापतिंशी जमले नाही' हे विधान अत्यंत खोडसाळ वाटते - जणु राजाची चमचे गीरी नकेल्यानेच राजे नाराज झाले होते असे भासविणारे.
30 Nov 2008 - 7:21 pm | कलंत्री
सर्वसाक्षी महाराज,
आपण मी जे काही लिहिले होते ते अर्धसत्य या सदारात टाकले. धन्यवाद. प्रत्येक गोष्टीचा अन्वनार्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढला जाऊ शकतो. संदर्भ बदलतात त्याप्रमाणे खुलासे, स्पष्टीकरणही बदलले जाते.
मला माझे मत प्रतिपादन करण्याचा आधिकार दिला पाहिजे.
आपण ज्येष्ट आहात आणि शब्दाच्या योग्य वापराबद्दल जागृत रहाल अशी अपेक्षा आहे. ( खोडसाळ या शब्दाला आक्षेप आहे.)
बाकी आपला प्रतिसादात अनेक दुबळ्या जागा आहेत आणि त्याचा समाचार घेणे शक्य असले तरी मूळ लेख सद्यस्थितीत अतिशय महत्त्वाचा असल्यामूळे आपणच आपला प्रतिसाद वाचावा आणि त्या जागा एका इतिहासकार म्हणून वाचाव्यात ही विनंती.
सस्नेह,
द्वारकानाथ कलंत्री
30 Nov 2008 - 10:59 pm | सर्वसाक्षी
दुबळ्या जागा आवश्य दाखवुन द्या. मी आभारी राहीन
<मला माझे मत प्रतिपादन करण्याचा आधिकार दिला पाहिजे. > अर्थातच! आपण आपल्याला जे वाटेल ते अवश्य लिहा, पण ते सर्वांना स्विकारार्ह असेल व आपलेच ते सत्य असेल असा अट्टाहास ठेवु नका. सत्याचा स्विकार करायची तयारी ठेवा.
आता आपण आपले मत हे केवळ 'आपले मत' मत म्हणुन देत असाल व त्यामुळे शिवरायांचा अवमान होत असेल तर त्याला खोडसाळ्च म्हटले पाहिजे.
30 Nov 2008 - 3:36 pm | भडकमकर मास्तर
मी पण हेच म्हणतो...
पुढच्या भागाची वाट बघेन ...मात्र असले ब्रेनवॉश्ड आतिरेकी गांधीवादाला ऐकतील हे शक्य नाही...
तालिबानसारख्या राजवटीपुढे गांधीवाद अजिबात अयशस्वी झाला असता असे माझे मत आहे....
पण कलंत्री यांची काही विधाने विचार करायला लावणारी आहेत...
(वेळीच भान आले नसते तर आपणही कदाचित याच हिंसेच्या मार्गाला लागलो असतो वगैरे..)हे वाचून विचारमग्न झालो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
29 Nov 2008 - 9:03 pm | सागर
कलंत्रीभाऊ,
विचार छान आहेत. चर्चेस अतिशय योग्य, मांडणी अजून सुटसुटीत हवी हे मात्र खरे.
माझे थोडेसे विचारः
परत एका अहिंसावादाच्या पोकळ श्रद्धेला खतपाणी घालण्याएवढी आजची पिढी एवढी मूर्ख नक्कीच नाहिये ,
मुंबई च्या अतिरेक्यांवर विजय कोणी मिळवला?
संसदेवरचा हल्ला कोणी परतवून लावला?
कारगीलच्या वेळी काय झाले?
एकदा अहिंसेमुळे स्वातंत्र्य मिळायला वेळ लागला. तेव्हा सगळे भारतीय अशिक्षित होते, मर्यादीत जीवनसरणी होती.
आज सर्वसामान्यांच्या बुद्धीचा आवाका जागतिक झेप घेऊ शकतो.
पण परत एकदा गांधीबाबांच्या शिकवणीचा पाठपुरावा?
त्यापेक्षा शूराचे मरण मी जवळ करेन.
(देशभक्त) सागर
29 Nov 2008 - 10:47 pm | कलंत्री
लढा अहिंसाचा असो अथवा हिंसेचा. त्यात तयारी आणि शौर्य एकाच दर्जाचे लागते. पकिस्तानातील अतिरेक्यांच्या संदर्भात आपण गांधीवादाचा पुरस्कार भितीपोटी करत नाही.
शेवटी तळहातावर शिर ठेऊनच लढा लढावा लागतो.
त्याचप्रमाणे अतिरेकी आणि हिंसा याचा बिमोड शांतता आणि सद्भावनेनेच करावा लागेल असे माझे भाकित आहे.माझ्या माहितीप्रमाणे तो भाग अजूनही आपल्यात यायचाच आहे.
29 Nov 2008 - 9:05 pm | सर्वसाक्षी
<यात मला थोडाफार आशेचा किरण दोन गोष्टीमध्ये दिसतो.एकतर आपल्या देशात ब्रिटिशाविरुद्ध यशस्वी ठरलेला गांधीवाद (त्याचबरोबर जगाला शांततामय लढ्याला प्रेरणा देणारा) आणि अतिरेकी असली तरी ती माणसेच असावी. काल्पनिक भीतीच्या अथवा आदर्शाच्या पोटी त्यांना दिशाभूल करत असावेत असे मला वाटते>
ब्रिटिशांविरुद्ध गांधीवाद यशस्वी ठरला म्हणजे नक्की कसा? त्या लढ्याचे साध्य काय? मुळात गांधीवाद म्हणजे काय?
जगाला सोडा, शांततामय लढा तर आपल्यालाही पटला नाही. काश्मिर, गोवा, हैद्राबाद, पाकिस्तान, चीन....... सर्वत्र शस्त्रच कामी आले, अर्जविनंत्या वा प्रार्थना नाही.
द्वारकानाथजी,
एका हातात पुंगी आणि दुसर्या हातात दुधाची वाटी घेउन श्रीकृष्णाच्या यमुनाकाठी बसण्याने जर कालियाचे हृदयपरिवर्तन झाले असते तर त्याला काही हिंसेची हौस नव्हती.
रावणाने सीतेचे हरण केले नसते व आपला दुराचार सोडला असता तर रामाला लंकेत जाऊन हिंसा करायचे कारण नव्हते
अफझलखान जर सदिच्छाभेटीवर आला असता तर शिवरायांनी नक्कीच त्याचा कोथळा काढला नसता.
असो.
29 Nov 2008 - 10:38 pm | कलंत्री
भेकडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा कौतुकास्पद असते. आपल्याचा दाखल्याप्रमाणे, रामाने रावणाला सिता परत करण्याची संधी दिली होती, अंगद शिष्टाई प्रसिद्धच आहे. रावणाने जर सिता परत केली असती तर रावणही मारला गेला नसता.त्याच प्रमाणे अफजल खान जर कपट न करता तर तोही परत जीवंत नक्कीच गेला असता. शिवाजीने सुद्धा विनाकारण हिंसा केली नाही. सुरतच्या लूटीत खानाच्या वकिलाने त्यांच्यावर हल्ला केला असता मराठ्यांनी सर्वच मुस्लिमसैनिक कापायला सुरवात केली होती. त्याला प्रतिबंध शिवाजीनेच केला होता.
काश्मिरचा भाग गांधीच्याच जींवत असताना मिळवळा गेला होता. हैद्राबाद, गोवा किंवा इतरत्रही अगोदर सत्याग्रह, चर्चा केली होती.
विचारपरिवर्तन हा गांधीवादी विचारसरणीचा गाभा आहे.
30 Nov 2008 - 10:55 pm | सर्वसाक्षी
<काश्मिरचा भाग गांधीच्याच जींवत असताना मिळवळा गेला होता. हैद्राबाद, गोवा किंवा इतरत्रही अगोदर सत्याग्रह, चर्चा केली होती.>
हे सांगितलेत तर पुढचे ही कबुल करा की या सर्व प्रकरणात चर्चा, सत्याग्रह याचा उपयोग झाला नाही. झाला असता व हृदयपरिवर्तन होऊन शत्रू निघुन गेले असते तर भारत हा काही उगाच शस्त्रबळाचा वापर करणारा युद्धखोर नाही. सर्वत्र केवळ सशस्त्र लढा व वीरांचे बलिदान यामुळेच यश आले.
काश्मिरात सत्याग्रह झाल्याचे ऐकिवात नाही. सरदार पटेलांचा तडफदार व त्वरित निर्णय आणि आपल्या सेनेची कुर्बानी यामुळेच काश्मिर वाचले.
29 Nov 2008 - 9:40 pm | मृदुला
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
29 Nov 2008 - 9:54 pm | ऋषिकेश
अजून पुढील भाग येऊ द्यात.. या भागावर काहिच प्रतिक्रिया नाहि
-(गोंधळलेला) ऋषिकेश
29 Nov 2008 - 10:21 pm | कलंत्री
या लेखाद्वारे अतिरेकी कसे घडतात या प्रक्रियेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मी केला आहे. माझ्या खर्या अनुभवाप्रमाणे, १००० वर्षातील हिंदू-मुस्लिमाचा संघर्ष आणि त्याचा दोन्ही बाजूने हवा तसा लावलेला अन्वनार्थ, फक्त स्त्रीयांच्यावर बलात्कार, विटंबनेचे किस्से ऐकवित जाणे, भारत फक्त आपलाच(म्हणजे हिंदुंचाच) आहे असा प्रचार करणे, कुराणातील हवे तसे दाखले देणे असा गोबेल्सप्रमाणे मनावर बिंबवत गेले तर हिंदुही अतिरेकी बनु शकतात/ बनतात.
आता येथे पाकिस्तान / मदरश्यात हिंदु म्हणजे काफर, मुर्तीपुजक, त्यांना मारले तर जन्नत, भारतातील मुस्लिमावर अत्याचार होतात ( कपोलकल्पित कहाण्या), मुस्लिमांनी भारतावर ७००/८०० वर्ष राज्य केले आता हिंदु कसे राज्यकर्ते झाले असा भडिमार केला तर त्यांचे रक्त खवळणार नाही तर काय?
परंतु या प्रक्रियेला गतीमान करणार्यांच्याच वर्तनात विसंगती दिसत जाते, प्रत्यक्ष जीवनात जगतांना खरे जिवन पुस्तकाच्या पलिकडे वेगळेच असते, हिंदु-मुस्लिमात शौर्य, भिती, प्रेम, लालसा सारखीच असते, शेवटी आपण सर्व एकाच मातीतुन बनलेलो आहे असे समजते तेंव्हा सर्व वृथा अभिमान गळुन पडतो.
फक्त या प्रक्रियेत सर्व पायर्यांवरुन जाण्याची संधी कोणाला मिळते आणि कोणी मध्येच गोळीला बळी पडतो इतकाच काय तो फरक.
लेखनात काहीसा विस्कळीतपणा असलाच तरी पुढच्या लेखात तो काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
30 Nov 2008 - 2:07 am | विकास
गांधीवादाने अतिरेक्यांचा खातमा करता येईल का?
उत्तर नाही असे आहे.
बाकी अतिरेक नक्की कशाला म्हणत आहात? कारण ह्या लेखात अतिरेकी कारवाया, त्या ज्यातून निर्माण झाल्या आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न त्यावर गांधीवाद कसा योग्य याचा उहापोह दिसण्यापेक्षा भाजपावरच लेख दिसला..
म्हणून शिर्षक एकतर, "गांधीवादाने भाजपाचा खातमा करता येईल का?" असे तरी हवे अथवा, "गांधीवादाच्या अतिरेकाने भाजपाचा खातमा करता येईल का?" असे असल्यास उत्तम.
आणि हो, आधीपण म्हणल्याप्रमाणे, गांधीवादाची भाषा करणार्याच्या लेखनात "खातमा' वगैरे शब्द योग्य वाटत नाहीत. गांधी तसे शब्द वापरत नसत. ;)
30 Nov 2008 - 2:54 am | प्रियाली
१. गांधींना आणि त्यावेळी देशाला शत्रू कोण याची पूर्ण कल्पना होती. सद्य परिस्थितीत आपल्याला ती नाही. आजही दहशतवादी कोणत्या गटाचे आहेत, देशी आहेत का परदेशी आहेत यावर आपण आश्चर्य व्यक्त करत आहोत. अदृश्य शत्रूला (च्यामारी या त्रू ला काय धाड भरली आहे?) सत्याग्रहाने तोंड कसे द्यावे ते कळत नाही.
२. गांधींना ब्रिटिशांना भारताकडून काय अपेक्षित आहे ते नेमके माहित होते. त्यामुळे त्याला विरोध करणे त्यांना आणि इतरांना शक्य झाले.
३. गांधी स्वतः ब्रिटनमध्ये शिकलेले, ब्रिटिश विचारसरणीशी ओळख असणारे होते. साऊथ आफ्रिकेत तळागाळात काम केल्यानंतर त्यांनी भारतात येऊन काम सुरू केले तेव्हा ते भारताला समाजसेवक, सत्याग्रही म्हणून ठाऊक होते. त्या ताकदीचा कोणताही नेता जो लोकांना बांधून ठेवू शकेल असा, मला भारतात दिसत नाही.
४. ब्रिटिश अधिकारी हे राणीचे नोकर होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा जाब त्यांना द्यावा लागत होता (त्यात खरे किती आणि नाटक किती वगैरे भाग वेगळा पण ब्रिटिश म्हणजे दहशतवादी अतिरेकी निश्चित नाहीत) त्यामुळे सरसकट सर्वच जनरल डायर ;) नव्हते.
अशी अनेक कारणे असावीत ज्यामुळे ब्रिटिश आणि दहशतवादी यांत साम्य नाही आणि जर दोन शत्रूत साम्य नाही तर त्यांच्या विरुद्ध एकच एक धोरणही योग्य नसावे.
30 Nov 2008 - 10:05 am | ऋषिकेश
+१
याकारणांव्यतिरिक्त, मुद्दा#१ ला पुरवणी : ब्रिटीश हे आजच्या अतिरेक्यांसारखे भ्याड व भेकड नव्हते .. ते आपले खूलेआम शत्रु होते.. इथे अतिरेकी समोरच येत नाहित तेव्हा विचारपरिवर्तन करणार कोणाचे?
-(गोंधळलेला) ऋषिकेश
30 Nov 2008 - 10:15 am | कलंत्री
अतिरेक्याची समस्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. कोणत्याही मार्गाने का होइना समाधान तर शोधावे लागेलच ना?
आपण गोंधळुन जाल तर आम्ही कोणाकडे पहायचे?
30 Nov 2008 - 9:58 am | एकलव्य
बिन लादेनच्या ९/११ ला विवेकानंदांचे ९/११ (http://hinduism.about.com/library/weekly/extra/bl-sv1.htm) हेच उत्तर आहे. पण हे शिवधनुष्य पेलणे सोपे नाही.
- एकलव्य
30 Nov 2008 - 10:09 am | कलंत्री
अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे. वेळेच्या आणि माझ्या अंगभूत लेखनकौशल्याच्या मर्यादेमूळे योग्य ते उत्तर देता येत नाही.
माझा प्रत्येक वाचकाच्या प्रामाणिकपणाबद्दल पूर्ण विश्वास आहे. तरीही त्यांनीही गांधीवादावरील पुस्तके ( वाचलेली नसल्यास) वाचावी ही शिफारस करावीशी वाटते.
या पुस्तकात सत्याचे प्रयोग, मेरे सपनोंका भारत, हो,रामनावाने रोग बरे होऊ शकतात, अनासक्त योग इत्यादींचा समावेश होऊ शकेल.
त्याचबरोबर विनोबाजींची आणि प्यारेलाल यांचीही पुस्तके वाचावीत.
गांधींचे विपुल लेखन आजही उपलब्ध आहे. त्याचबरोबर गांधीवरील इतरही लोकांनी दोन्ही बाजूनी लिहिलेले आहे. जि़ज्ञासूनी त्याचाही लाभ घ्यावा अशी नम्र विनंती.
आज नकळतच अतिरेकी कारवायामूळे आपल्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अतिरेक या समस्येवर आपण एक तज्ज्ञ व्हावेत आणि आपली विचारसरणी, तर्कमिमांसा, माहिती बिनतोड असावी अशीच माझीही अपेक्षा आहे.
30 Nov 2008 - 10:11 am | अवलिया
ज्या गोष्टीमुळे समस्या सुरु झाली तिचाच आधार घेवुन समस्या सोडवायची. उत्तम.
शुभेच्छा !!
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
30 Nov 2008 - 10:33 am | क्लिंटन
गांधीवादाने दहशतवादावर उत्तर जरूर मिळेल.
घरोघरी रघुपती राघव राजाराम म्हणा आणि मारणार्यांसाठी आणि मरणार्यांसाठी प्रार्थना करा. चरख्यावर भरभर सूत कातून स्वतःचे पंचे स्वतःच तयार करा. ते सीमेवर आणि समुद्रकिनारी वाळत घाला. पंच्यांची अभेद्य तटबंदी मोडून अतिरेकी भारतात घुसूच कसे शकतील?सामाजिक ऐक्यासाठी वाटेल तितकी उपोषणे करा. पण उपोषणे सोडताना मोसंबीचा रस पिऊ नका तर दहशतवाद्यांनी मारलेल्या निरपराध लोकांचे रक्त प्या! तुमची हजारो उपोषणे सुटू शकतील इतके रक्त अतिरेक्यांनी एकट्या मुंबईतच सांडले आहे. पदयात्रा करत भरभर गांधींचे अपत्य पाकिस्तानपर्यंत चालत जा आणि सत्य आणि अहिंसेचा संदेश द्या. शत्रूला प्रेमाने जिंका. आपण शरीर नसून आत्मा आहोत ही भगवद्गीतेची शिकवण आपल्या मनात खोल रुजली पाहिजे. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ' तेव्हा दहशतवादी आपल्या शरीराला मारू शकतील, आत्म्याला नाही हे विसरू नका.
हे सर्व केलेत तर दहशतवाद कसा चुटकीसारखा मिटतो तेच बघा.
(गांधींचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) विल्यम जेफरसन क्लिंटन
30 Nov 2008 - 12:23 pm | कलंत्री
क्लिंटन साहेब,
असे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाते म्हणजे अतीच झाले. गांधींचे नाव घेत अनेक लोक हुतात्मे होऊ शकतात हे ऐकले होते पण कोणाच्या नावाने शरीरात आग होते असे प्रथमच ऐकत आहे.
कृपया योग्य तो उपचार करुन घ्या.
कोणत्याही गोष्टीकडे शांतपणे बघता आले पाहिजे. उद्या तुम्हाला जर या देशाचे प्रंतप्रधान केले तर तुम्ही काय काय कराल अशा भुमिकेतुन विचार करा.
जबाबदारीच्या भावनेतून मनाला शांती मिळते. जमल्यास पंचके मुहसे परमेश्वर ही प्रेमचंदाची कथा नक्की वाचा.
कलंत्री
30 Nov 2008 - 1:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कलंत्री साहेब,
गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन वगैरे सद्य परिस्थितीत जरा कैच्या कै वाटून एखाद्याची तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते तेव्हा योग्य उपचार वगैरे जरासे अप्रस्तूत वाटले. प्रत्येकाला मताचे स्वातंत्र्य आहे तेव्हा एखाद्याला तसे वाटणे काही गैर नसावे.
-दिलीप बिरुटे
30 Nov 2008 - 4:18 pm | अनामिका
लेखक सोडुन प्रतिसाद देणार्या सगळ्यांशी सहमत
(गांधींचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा /जाणारी) L) (मी पण) ~X(
"अनामिका"
30 Nov 2008 - 8:27 pm | टारझन
लो एक और आ गया !! मी पण
- टारझन
1 Dec 2008 - 1:57 am | आपलाच गम्पु
आम्हि पन हेच बोलु रहिलो.
30 Nov 2008 - 4:25 pm | परिकथेतील राजकुमार
ताणतणावातुन थोडी मुक्ति देउन मनमुराद हसवल्याबद्दल लेखकाचे आभार !!
ह्या विनोदि लेखाच्या दुसर्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. तो भाग प्रथम भागापेक्षा जास्ती विनोदि असेल हि अपेक्षा !
आतुरलेला
चतुर
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
30 Nov 2008 - 4:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ताणतणावातुन थोडी मुक्ति देउन मनमुराद हसवल्याबद्दल लेखकाचे आभार !!
ह्या विनोदि लेखाच्या दुसर्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. तो भाग प्रथम भागापेक्षा जास्ती विनोदि असेल हि अपेक्षा !
आतुरलेला
चतुर
=))
परिकथेतील राजकुमारा, कलंत्री सरांच्या छड्या खाणार तुम्ही :)
30 Nov 2008 - 7:25 pm | कलंत्री
प्राध्यापक सर,
अहो, गांधीवादात छ्ड्या मारायच्या नसतात तर स्वत खायच्या असतात. फार तर एखादे उपोषण करायला हवे....हलके घ्या.
30 Nov 2008 - 7:30 pm | मदनबाण
गांधीवादात छ्ड्या मारायच्या नसतात तर स्वत खायच्या असतात.
म्हणजे उध्या अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या तर आम्ही अभिमानाने खायच्या काय ?
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
30 Nov 2008 - 7:44 pm | परिकथेतील राजकुमार
>>>फार तर एखादे उपोषण करायला हवे....
== का ? त्यामुळे काय होईल ? आमच्या विचारात फरक पडेल असे आपणास वाटत असल्यास वेळिच सावध व्हा !! हा उपाय आमच्या मातोश्रींनी अनेकदा वापरुन बघितला आमच्या लहानपणी पण उपयोग शुन्य !! "का वाळलीस ग बाई येव्हडी ?" ह्या सहानभुती पेक्षा जास्त काहि मिळाले नाही तिला ;)
आपलाच
टुण्णा हजारबाराशे
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
30 Nov 2008 - 4:56 pm | तिमा
आपल्या काश्मीरवरचा तसेच देशावरचा हक्क सोडून द्या. त्यांच्यातलेच एक व्हा. मग बघा, लगेच सर्व अतिरेकी कारवाया थांबतील.
प्रतिसाद संपादित केला आहे. -चित्रा
30 Nov 2008 - 5:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नक्की कोणत्या डोकेदुखीबद्दल बोलत आहात आपण अनामिकाताई? यावेळी आलेले सगळे दहशतवादी भारताबाहेरचे होते.
अवांतरः भावनेच्या भरात विचारशत्रू बनून भडकावू विधाने करण्यापासून प्रत्येकाने स्वतःला रोखावे अशी नम्र विनंती.
30 Nov 2008 - 5:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कुठे झाला ? जिथे शिक्षण घेतले तीच त्यांची जन्म आणि कर्मभूमी !
30 Nov 2008 - 9:12 pm | चित्रा
काही प्रतिक्रिया संपादित केल्या आहेत, एक प्रतिक्रिया ही वरील प्रतिक्रियेतील जो भाग वगळला त्याच्याशीच केवळ संबंधित असल्याने अप्रकाशित केली आहे.
1 Dec 2008 - 12:09 am | अनामिका
चित्राताई !
मीच ते लिखाण उडवणार होते पण संपादन करणे शक्य झाले नाही.
तश्या प्रकारच्या भाषेचा उपयोग केल्या बद्दल मी तुम्हा समस्त मिपा करांची क्षमा मागते.
या पुढे अशी चुक होणार नाही याची खात्री बाळगा
"अनामिका"
1 Dec 2008 - 9:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तश्या प्रकारच्या भाषेचा उपयोग केल्या बद्दल मी तुम्हा समस्त मिपा करांची क्षमा मागते.
वयक्तिक म्हणाल तर आपल्या प्रतिसादातील बरीच वाक्य पुरुषमंडळी सर्रास बोलतांना वापरतात. मात्र एका स्त्रीला ( म्हणजे आपण स्त्री आहात असे ग्रहीत धरलेले आहे.) असे लिहितांना जरा आश्चर्यच वाटले तरी ती भावना योग्यच होती, या बाबतीत वयक्तीक माझ्या मनात तरी कोणती शंकाच नाही. पण आपल्याबरोबर मीही स्ट्रीक संपादकांचा आदर करतो :)
30 Nov 2008 - 5:52 pm | अनामिका
एक वाक्य काढून टाकीत आहे. कृपया काही विषय हे सध्याच्या काळात भावना भडकावणारे आणि मिपाच्या दॄष्टीने दूरगामी परिणाम करणारे असू शकतात, त्यामुळे शब्दरचना जपून करावी ही विनंती. - चित्रा
यावेळी आलेले सगळे दहशतवादी भारताबाहेरचे होते तिच तर खरी शोकांतिका आहे...........ते भारताबाहेरचे असले तरी त्यांचे लागेबांधे इथे कुणाशी तरी असणारच.
"अनामिका"
30 Nov 2008 - 5:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती की सरसकट अपमानास्पद (?) विधाने करु नयेत, भले ती स्त्रियांच्या गाडी चालवण्याच्या कौशल्याबाबत असोत वा राजकारण्यांच्या चारित्र्याबद्दल वा इतर काही .... !
९३च्या दंगलींच्या खटल्यात अनेक बहुसंख्यांपैकी(!) लोकांनाही शिक्षा झाल्या आहेत, त्यांना कुठे हाकलणार होतो (होतात) आपण?
(बिहारी मित्र उज्ज्वल, पटकथाकार सलीम खान, क्रिकेटपटू इरफान पठाण, माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ अब्दुल कलाम, वर्गमित्र इमरान खान पठाण आणि सर्वसामान्य मुसलमानांबद्दल काहीही आकस नसलेली) अदिती
30 Nov 2008 - 5:52 pm | वेताळ
त्यानी अहिंसेचा मार्ग आयुष्यभर पाळला व वापरला. त्यात त्याना यश आले. परंतु तो मार्ग सुसंस्कृत समाजात वापरण्या योग्य आहे. तो जर रानटी लोकांसमोर वापरला तर ते आपले मटण सुप बनवुन खातील.तेच आज दिसत आहे. लेखकाने समजुन घेणे गरजेचे आहे की अहिंसा हे तत्व गांधीजी फक्त स्वातंत्र्य मिळवण्याकरिता वापरणार होते. देशाच्या रक्षणाकरिता सैन्य बाळगावे लागणार व त्याचा वापर करावा लागणार हे त्याना माहित होते.अंतर्गत सुरक्षा करताना बळाचा वापर करावा लागणार हे त्यानी १९४७ मध्ये कलकत्ता येथे दंगलीनिमित्त झालेल्या त्याच्या उपोषनावेळी सांगितले होते.
मी गांधीजीचा कट्टर विरोधक आहे. पण त्याच्यावर जाहिर टिका करण्याइतपत मोठा नक्कीच नाही.फक्त त्याची तत्वे समजावुन घ्या. त्याचा विपर्यास अर्थ काढु नका.
वेताळ
30 Nov 2008 - 6:01 pm | सखाराम_गटणे™
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
मी स्वतः गांधीवादी असल्याने उत्सुकता आहे.
30 Nov 2008 - 6:01 pm | अनामिका
जे खरच राष्ट्रवादी आहेत त्यांनी रहाव की ज्यांना पकिस्तान प्रिय आहे त्यांच काय?
"अनामिका"
30 Nov 2008 - 7:43 pm | दत्ता काळे
मला वाटते नाही.
कारण आजकाल एकूण नितीमूल्ये (आंतरराष्ट्रीय स्तरावरसुध्दा ) बदललेली आहेत. त्यामुळे गोळीला गोळी हेच उत्तर आहे. मला वाचलेली दोन वाक्ये आवडतात, कि जी खरोखरच आत्ताच्या परिस्थितीला लागू होतात, ती अशी :
१. "गांधीच्या रक्षणासाठीसुध्दा देशाला शिवाजीची गरज आहे " - स्वातंत्र्यवीर सावरकर.
२. 'ह्या देशाला शांतता हवी आहे' हे देखील युध्द करुन सांगावे लागेल - व. पु. काळे
30 Nov 2008 - 9:24 pm | अनंत छंदी
अहो, इथे आता गांधीवादाचेच निर्मूलन करण्याची वेळ येऊन ठेपलीय आणि गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन कसले करताय? तुम्हाला काय वाटलं गांधींचे उपास आणि सत्याग्रह यांनी क्षणार्धात कालच्या अतिरेक्यांचे मतपरिवर्तन झाले असते? ह्या भ्रमात राहू नका! आता हा दहशतवाद ठेचणे हाच एकमात्र मार्ग आहे.
30 Nov 2008 - 9:49 pm | नीलकांत
गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन करता येईल का? -१
माझं मत आहे - नाही येणार ! त्याला अतिशय कणखर भाषेत उत्तर दिले पाहिजे.
आतंकवादाच्या कौलात विकासरावांनी वरील तीन पर्याय दिलेत काही येथील संदर्भातसुध्दा लागू होतात.
"ज्यांच्यावर आक्रमण होत आहे त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी या आक्रमणाला हिंसेने उत्तर देऊ नये, तर खुशाल मरणाला कवटाळावे, असे करून तुम्ही शत्रुच्या ह्रुदयातील मानुसकीला हात घालाल. तुम्ही जरी मेलात तरी स्वर्गात तुमचे स्थान अटळ आहे." - माझा राष्ट्रपीता. :(
गांधींचं योगदान आणि त्यांचा नेहमी वादात असलेला वाद हे सगळं जाणून घेण्यासाठी कलंत्री साहेबांच्या पुढील लेखाची वाट पाहत आहे.
नीलकांत
1 Dec 2008 - 2:26 am | अविनाशकुलकर्णी
खळखळाट