गाभा:
सर्वप्रथम शहीद झालेल्या सर्व वीरांना सलाम. आज तुमच्यामुळे आम्हाला भारतीय असण्याचा अभिमान वाटतो.
मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली.
जखमींना लवकर आराम मिळो ही ईश्वराकडे प्रार्थना.
- गेले ३ दिवस चाललेली धुमश्चक्री,
- अतिरेक्यांनी मारलेले सामान्य नागरीक / शहीद झालेले उत्कृष्ट पोलीस अधिकारी,
- न भरून येणार्या, भळभळणार्या जखमा,
- पूर्ण शहराला ठप्प करण्याची करामत.
भारतावर झालेला सर्वात भीषण दहशतवादी हल्ला. आपल्याच घरात घूसून आपल्याला जोरदार चपराक मारली या ईस्लामी अतिरेक्यांनी !!
एवढं होऊन सुद्धा आपलं सर्वोच्च नेतृत्व काय करतंय... तर खडसावून ओरडायला आणि पेटून उठायला कचरतंयं.
आपलं दुर्दैव की आपण एका दुबळ्याला राजा केलाय.
आपल्या घटनेनी फक्त या षंढ नेतृत्वाला दुर्दैवाने संपूर्ण निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे म्हणून हा प्रश्न सर्व मिपाकरंना.....
तुम्हाला काय वाटतं... आज नरेंद्र मोदी किंवा त्यासदृश निर्भय , रोखठोख, क्रियाशील पंतप्रधान हवे होते की नाही ??
(मनापासून प्रतिक्रिया द्या).
--- बबलु..
प्रतिक्रिया
29 Nov 2008 - 12:36 pm | अमोल केळकर
'तुम्हाला काय वाटतं... आज नरेंद्र मोदी किंवा त्यासदृश निर्भय , रोखठोख, क्रियाशील पंतप्रधान हवे होते की नाही ??''
सांगता येत नाही . पंतप्रधान कुणीही असते तरी अश प्रसंगी कुठलिही धाडसी कृती करण्याचा विचार , अंबलबजावणी करणे असंख्य भारतीय नागरिक / परदेशी पाहुण्यांच्या जिवावर बेतले असते. आणि त्यामुळेच कदाचित या संपुर्ण प्रक्रियेला थोडा जास्त कालावधी लागला असावा.
समाधानाची बाब ही आहे की आपल्या सुरक्षा दलाने ३०० ते ४०० ओलिसांची मुक्तता केली.
एवढं होऊन सुद्धा आपलं सर्वोच्च नेतृत्व काय करतंय... तर खडसावून ओरडायला आणि पेटून उठायला कचरतंयं.
आपलं दुर्दैव की आपण एका दुबळ्याला राजा केलाय.
हे मात्र पटलं. नुसतं मुंबईत येऊन जखमिंची विचारपुस केली . पैसे जाहिर केले म्हणजे काम संपत नाही.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
29 Nov 2008 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार
उडदामाजी काळेगोरे काय निवडावे निवडणारे...
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
29 Nov 2008 - 12:49 pm | बबलु
सांगता येत नाही . पंतप्रधान कुणीही असते तरी अश प्रसंगी कुठलिही धाडसी कृती करण्याचा विचार , अंबलबजावणी करणे असंख्य भारतीय नागरिक / परदेशी पाहुण्यांच्या जिवावर बेतले असते. आणि त्यामुळेच कदाचित या संपुर्ण प्रक्रियेला थोडा जास्त कालावधी लागला असावा.
मी operation चालू असतानाच्या वेळाबद्दल बोलत नाहीये. आता सर्वांची सुटका झाल्यावर तरी पाक वर कारवाई नको का ?? किती घाबरायचं पाकींना ??
ते तिकडे हसत असतील आपल्या नेतृत्वाला. आपण असेच बांगड्या भरून चूपचाप बसून राहणार का ??
अरे आपण शिवाजी, महाराणा प्रताप, सरदार पटेलांचे वंशज आहोत रे . आणि घाबरून कसं चालेल ? डर गया सो मर गया.
....बबलु
29 Nov 2008 - 12:55 pm | बबलु
सगळे एका माळेचे मणी
असहमत... अहो.. crisis च्या काळात आपल्याला अशा नुसत्या लोकप्रिय म्हणी फेकून बोलणारे नकोयंत.
ठोस निर्णय घेणार मर्द गडी हवाय. आणि आमचं मत आहे की मोदिंमध्ये ती हिंमत आहे.
....बबलु
29 Nov 2008 - 1:27 pm | परिकथेतील राजकुमार
राजे, सत्तेची उब मिळाली आणी केंद्रात खुर्ची मिळाली कि वाघांची पण मांजरे होतात, आणी दाउद ला बेड्या घालुन रस्त्यावर हिंडवु म्हणणारे स्वता:च्या लाचखाउ मंत्र्याला वाचवायला धावतात आणी मंदिर वही बनायेंगे म्हणणारे जिनांचे गोडवे गायला लागतात !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
29 Nov 2008 - 1:00 pm | अनिल हटेला
माननीय बबलू भाउ !!
तुमचे विचार पटतायेत.....अगदी सर्वाना नाही तरी ...जवळ जवळ प्रत्येकाच्या मनात थोड्याफार फरकाने हेच चालू आहे...
वैयक्तीक रीत्या माझही हेच मत आहे की धाडाडीचा आणी बेडर असा नेता लाभायला हवा...
बाकी कुठलाही नेता आज देश हीता पेक्षा जास्त पक्षाचे महत्त्व जास्त मानतो ,ही आपली शोकांतीका आहे..
बाकी आता तरी काही तरी ठोस पावले उचलयला हवीत...
नाय तर
'ये रे माझ्या मागल्या.......'
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
29 Nov 2008 - 1:21 pm | विसोबा खेचर
काल सकाळी युद्ध सुरू असतांना तिथे मोदींनी जाऊन राजकारण करण्याचं कारण काय? मी असं बोललो होतो अन् मी तसं सांगितलं होतं, पंतप्रधानांनी असं करायला हवं होतं वगैरे बोलण्याची ती वेळ नव्हती, एवढा साधा सेन्सही त्यांना नसावा?
ऐन घटनास्थळी आपल्या येण्यामुळे आधीच तणावात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर अधिकच ताण पडेल हेही त्यांना कळू नये?
साले, सगळे हे राजकारणी इथून तिथून सगळे सारखेच..! पैसा खाणे, कहिबाही गलिच्छ राजकारण करत बसणे, आणि आपली खुर्ची कशी टिकेल एवढाच त्यांचा मतलब..! त्यांना कुणालाही देशाशी, शहिदांशी वगैरे काहीही देणंघेणं नाही..! कुणा एका पक्षाचं नांव घेण्यात काही मतलब नाही.. एकजात सारी किडकी जमात आहे या राजकारण्यांची!
आत्ताच एका वृत्तवाहिनीवर दाखवल्यानुसार काल मोदींनी शहिदांकरता जाहीर केलेली रक्कम शहिद हेमंत करकरे यांच्या पत्नीने नाकारली आहे..!
मला हे खूप कौतुकास्पद वाटते..!
तात्या.
29 Nov 2008 - 1:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तात्या, तुमच्या प्रत्येक वाक्याशी सहमत.
अगदीच जायचं होतं तर फक्त हुतात्मा पोलिस, जवानांच्या घरी जाऊन शांत बसायचं होतं ना! परवाच राजनाथ सिंग म्हणाले होते ना, "हा राष्ट्रावर हल्ला झाला आहे, याचं राजकारण करु नका!"
29 Nov 2008 - 1:39 pm | कोलबेर
तात्या तुमच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत!
सहमत!!
खरंच कौतुक वाटले.
29 Nov 2008 - 8:53 pm | आजानुकर्ण
तात्यांशी सहमत आहे.
करकरेंच्या कुटुंबियांचे फारच कौतुक वाटले. इतक्या अवघड प्रसंगातही विवेकबुद्धी शाबूत असणे फार कौतुकास्पद आहे.
बाकी विलासराव आणि मोदींबद्दल काय बोलणार...
29 Nov 2008 - 1:43 pm | नीधप
तात्यांशी १००% सहमत.
कुणीतरी काहीतरी करायला हवे हे खरेच. आत्ताचे राज्यकर्ते नालायक हेही खरे पण काल मोदींनी तिथे जाउन प्रचाराशिवाय काहीही केले नाही हेही तेवढेच खरे. १ कोट जाहीर केले पण पोचतील तेव्हा खरं ना.
मदत नाकारली असेल तर सौ. करकरेंनाही सलाम माझा.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
29 Nov 2008 - 2:12 pm | ऋषिकेश
तात्यांशी १००% सहमत
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
29 Nov 2008 - 3:55 pm | बिपिन कार्यकर्ते
तात्याशी १००% सहमत.
राजकारणी लोकांचा तर निषेध करतोच पण कुठलाही सारासारविचार न करता आगखाऊ भाषा वापरणे हेही तितकेच चूक आहे. संकटसमयी सगळ्यात पहिल्यांदा साथ सोडते ती, विवेकबुद्धी.
सांभाळा.
बिपिन कार्यकर्ते
29 Nov 2008 - 8:56 pm | कपिल काळे
परवाच्या दिवशीची मोदींची प्रतिक्रिया अस्थानी होती.
मोदींना सगळ्यांपेक्षा मोठे व्हायची इच्छा आहे असे दिसते. ह्यावेळी अश्या घटनांचे भांडवल राजकिय लाभासाठी न करता, एकत्र आले पाहिजे. ठोस कॄती केली पाहिजे. आत्ता ह्या वेळी धर्म, जात, भाषा असे भेदभाव समोर न आणता भारताची एकसंधता समोर आली पाहिजे. ९/११ नंतर अमेरिका जशी एकत्र आली होती, तसेच.
कालच एका पेपरात राजकिय पक्षाच्या जाहिरातीत-- आतंकवादाव्विरुद्ध मत द्या असा उल्लेख आहे. कोणत्या ते सांगायला नको.
हे थांबायला हवे.
तसेच जनतेच्या मनातील चीड आणि रागाचे काही कॄतीत परिवर्तन होण्यासाठी सरकार आणि राजकिय नेत्यांवर दबाव निर्माण झाला पाहिजे.
http://kalekapil.blogspot.com/
29 Nov 2008 - 1:37 pm | कोलबेर
ज्या अतिरेक्यांनी हे घॄणास्पद काम केले त्यांच्या दुरध्वनी वरील मुलाखतीमध्ये, 'तुम्हाला आमचे परिवार दिसत नाहीत?गुजरातमध्ये आमची इतकी माणसे मारली गेली, त्यांचे काय? ती निष्पाप नव्हती?' हा प्रश्न ऐकला आणि सुन्न व्हायला झाले.
२००२ मध्ये गुजरात मध्ये रेल्वेची बोगी जाळणारे समाज कंटक कुणी वेगळेच आणि हकनाक प्राण गमावुन बसलेले निष्पाप कुणी वेगळेच. त्यावेळेस दहशत माजवलेले दंगलखोर वेगळेच आणि आज मुंबईत प्राण गमावलेले निष्पाप वेगळेच. त्यावेळेस ह्याच मोदींच्या आशिर्वादाने अनेक 'भारतीय' प्राणाला मुकले. आज ह्या अतिरेक्यांच्या अमानुषपणामुळे आणखी पुन्हा अनेक 'भारतीय' प्राण गमावुन बसले.
29 Nov 2008 - 2:10 pm | बबलु
तात्या... मी काही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता वगैरे नाही. एक सामन्य नागरीक आहे.... फार चीड आल्येय या सगळ्या नेतागिरी लोकांची.
माझा एक प्रतिसाद पूर्ण उडवलात.
असो... संपादकांचा निर्णय अंतिम. मला मान्य (न मानून जातो कुठे :) )
....बबलु
29 Nov 2008 - 2:14 pm | विसोबा खेचर
आधीच आपल्याला पाठवलेल्या खरडीत म्हटल्याप्रमाणे अपल्या भावना समजू शकतो. आपले विचारही आपण जरूर मांडू शकता, तरीही कृपया भडकावू भाषा, पंतप्रधानांबद्दल अरे-तुरेची भाषा सद्य परिस्थितीत तरी वापरू नका ही विनंती..
असो, माझा मुद्दा समजून घ्याल अशी अपेक्षा..
तात्या.
29 Nov 2008 - 2:50 pm | ऋषिकेश
आमच्या म्हणजे?
बबलू, आपल्याला नम्र विनंती आहे की प्रतिसाद लिहिताना शब्द योजनेकडे लक्ष द्यावे.. असले कैच्या कै शब्दातले प्रतिसाद संस्थळावर लिहू नयेत.. हा खाजगी ब्लॉग नाहि.
-( भारतीय) ऋषिकेश
29 Nov 2008 - 3:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बबलू, कोलबेर यांनी प्रतिसादामधे अतिरेकी काय म्हणतात ते लिहिलं आहे. त्यापुढे त्यांचं मत जे त्यांनी लिहिलं आहे ते काही चुकीचं आहे का? या अतिरेक्यांचंही कोणीही काही बिघडवलेलं नव्हतं हे जेवढं खरं आहे तेवढंच खरं आहे की मुंबईमधे जीव गमावणार्यांनी मुसलमानांचं काहीही घोडं मारलेलं नव्हतं.
मोदींना आता नानावटी (?) आयोगाने "क्लिन चिट" दिली आहे तेव्हा त्याबद्दल मी काय बोलणार?
दुसरा मुद्दा असा की (यावरुन बराच धुरळा उडू शकतो) पण पाकिस्तानामधला प्रत्येक नागरिक भारतद्वेष्टा आहे किंवा प्रत्येक पाकिस्तानीच अतिरेकी आहे किंवा दहशतवादाचा पुरस्कार करतो असं नाही. तेव्हा कृपया सर्वसमावेशक विधान करताना काळजीपूर्वक करा.
भारत हा देश जेवढा आपला आहे तेवढाच सलमान खान, अब्दुल कलाम, इरफान पठाण आणि सामान्य शांतिप्रिय मुसलमानांचाही आहे.
ऋषिकेशप्रमाणे मीपण तुम्हाला विनंती करते की कृपया भडकावू भाषा वापरु नका, त्यातून काहीही साध्य होणार नाही आहे.
29 Nov 2008 - 3:57 pm | बिपिन कार्यकर्ते
बबलु यांचा हा प्रतिसाद काढून टाकावा अशी मी संपादकमंडळाला / मालकांना विनंति करतो.
बिपिन कार्यकर्ते
29 Nov 2008 - 4:01 pm | ऋषिकेश
बबलु यांनी समंजसपणे खाली प्रतिसाद संपादित करण्याची तयारी दाखवली आहेच. बहुदा उपप्रतिसादांमुळे ते तसे करू शकले नाहित. तेव्हा हा विषय इथेच संपवावा व संपादक मंडळाने योग्य ते संपादन करावे
-(समंजस) ऋषिकेश
29 Nov 2008 - 2:49 pm | बबलु
आत्ताच headlinesToday वर पाहिलं....
"Terrorists have revealed ISI, Pakistan Navy connection & training".
....बबलु
29 Nov 2008 - 3:00 pm | बबलु
त्यात काही कैच्या कै वाटलं नाही....
पण संपादकांचा अभिप्राय म्हणून मी माझा प्रतिसाद edit करत आहे.
....बबलु
29 Nov 2008 - 3:01 pm | बबलु
माझाच प्रतिसाद मी edit करू शकत नाहीये :(
....बबलु
29 Nov 2008 - 3:22 pm | विकि
तुम्हाला काय वाटतं... आज नरेंद्र मोदी किंवा त्यासदृश निर्भय , रोखठोख, क्रियाशील पंतप्रधान हवे होते की नाही ?? असे नक्कीच नाही वाटत आणि यापुढे वाटणार ही नाही.
या मोंदीना महाराष्ट्रात येऊन राजकारण करायची काही एक गरज नव्हती.
त्यासदृश निर्भय , रोखठोख असे जे आपण लिहीले आहात त्यानुसार आम्ही हो जरी लिहीले तर त्याचे श्रेय मोदींनाच मिळेल.
निर्भय,रोखठोक असे शब्द लिहायलाच बरे वाटतात.
29 Nov 2008 - 6:26 pm | वेताळ
ज्या अतिरेक्यांनी हे घॄणास्पद काम केले त्यांच्या दुरध्वनी वरील मुलाखतीमध्ये, 'तुम्हाला आमचे परिवार दिसत नाहीत?गुजरातमध्ये आमची इतकी माणसे मारली गेली, त्यांचे काय? ती निष्पाप नव्हती?' हा प्रश्न ऐकला आणि सुन्न व्हायला झाले.
हे तुमच्या कडुन अपेक्षित नव्हते.दहशतवाद्यांना परिवार,धर्म.जातपात इ. माहित नसते.त्याना फक्त माणसे मारायची.मनात भिती निर्माण करायची हेच माहित असते. आपल्या षंढ कृत्याच्या समर्थनासाठी ते काहिही बोलु शकतात. त्यात तुम्ही सुन्न होण्याइतके काहीच नाही.त्यांना इतकेच जर वाईट वाटत असेल तर १९४७ मध्ये घडलेल्या फाळणीच्या दंगलीस हेच मुस्लिम जबाबदार आहेत. भारतावर जी काही आजपर्यंत आक्रमणे झाली आहेत त्यात सर्वात ज्यास्त आक्रमणे ही मुस्लिम परकिय शासकांकडुन झाली आहेत्.त्यात जेवढ्या हत्या झाल्या आहेत त्याचा हिशेब जर आम्ही मागायचा झाला तर एकाही मुस्लिमाला जगात जगायचा हक्क राहणार नाही.
उद्या चोर, दरोडेखोर म्हणतील आम्ही चोरी पोटासाठी करतो ,म्हणुन का त्याना माफ करायचे? पोटासाठी दुसरा उद्योग त्याना करता येण्यासारखा असतो.त्याना फक्त आपले दुष्कृत्य लपवायचे असते त्यासाठी ते कशाचाही संदर्भ देत असतात. गुजरात दंगलीत भारतातल्या मुस्लिमांना हानी झाली होती,त्याबद्दल त्यानी कधी पाकिस्तान सरकार कडे मदत मागितले असे माझ्यातरी एकिवात नाही आहे. मग ह्याना त्यांचा कशासाठी पुळका आला? आज पाकिस्तान मध्ये ७०% जनता अर्धपोटी रहात आहे त्याच्या भल्यासाठी ह्यानी काहीतरी केले असते तर ती गोष्ट वेगळी.इथे भारतात येवुन आमच्या लोकाना मारायचे व वर सांगायचे आम्ही बदला घेत आहोत. पण कसला बदला अन काय? हे साले षंढ आहेत.तीन वेळा मैदानातुन पळ काढलेल्यानी पाकिस्तानाने इथल्या लोकाच्या कळवळ्याचे नाटक आता बंद करावे. त्याच्या पापाचा घडा आता भरला आहे.
वेताळ
29 Nov 2008 - 10:04 pm | कोलबेर
वेताळराव मी 'सुन्न झालो' म्हंटले आहे ते अतिरेक्यांचे 'समर्थन पटल्याने' असा अर्थ तुम्ही का लावलात समजले नाही. गुजरात मध्ये निरपराध लोक मारले तेव्हा, 'आमची बोगी का जाळली?' असे समर्थन देण्यात येते तेव्हा देखिल सुन्नच व्हायला होते. निरपराध लोकांचे जीव घेणारे हे नराधम सारखेच. बजरंग दलाचे असोत वा डेक्कन मुजहिदिन!
असले विचार करणे मात्र आता थांबवा. इतिहास विसरु नये पण इतिहासातच अडकुनही राहू नये!! कारण आज मुसलमानांना जगायच हक्क नाही म्हणाल तर उद्या कधी काळी बहुजन समाजावर केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे ओपन कॅटेगिरीतील एकालाही जगायचा हक्क नाही असं आणखी कुणीतरी म्हणेल. आणि मरत राहतील ते निष्पाप लोकंच!!
1 Dec 2008 - 5:17 pm | ऍडीजोशी (not verified)
वेताळराव मी 'सुन्न झालो' म्हंटले आहे ते अतिरेक्यांचे 'समर्थन पटल्याने' असा अर्थ तुम्ही का लावलात समजले नाही. गुजरात मध्ये निरपराध लोक मारले तेव्हा, 'आमची बोगी का जाळली?' असे समर्थन देण्यात येते तेव्हा देखिल सुन्नच व्हायला होते.
पण बोगी जाळलीच ना. काय करायचं होतं मग अशा वेळी??? ते दर वेळी येऊन ठोकून जाणार आणि आपण दर वेळी सुन्न होत बसणार???
29 Nov 2008 - 6:43 pm | कलंत्री
अतिरेकी ते कोणतेही असोत, तामिळ, हिंदु, ख्रिस्ती अथवा मुस्लिम यांना तसा धर्म नसतोच, कालच्या अतिरेक्यांनीही अनेक निष्पाप आणि निरपराधांची हत्या करुन काय साधले हेच समजत नाही.
अशा हल्ल्याने सर्वसामान्य नागरिकांचा दबाब भारतीय देशावर यावा आणि त्याने पाकिस्तानवर हल्ला करावा अशीच अतिरेक्यांची इच्छा असावी.
उलट अशा प्रत्येक हल्ल्यानंतर आपल्या उपखंडातील सुज्ञ, सुजाण आणि शांतताप्रिय नागरिकांनी एकत्र यावे आणि शांती, बंधुभाव, सामंजस्य याच्या दृष्टीने वाटचाल करावी यातच सर्वांचे हित सामावलेले आहे.
यानिमित्त्याने आपल्या सुरक्षायंत्रणा, प्रशासन, राजकारणी आणि आपणसर्व जण यांनी आपापले यशापयश जोखुन घ्यावे असे सूचवावेसे वाटते.
29 Nov 2008 - 6:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिरेकी ते कोणतेही असोत, तामिळ, हिंदु, ख्रिस्ती अथवा मुस्लिम यांना तसा धर्म नसतोच,
दुर्दैवाने काहींना असतोच, भडकावल्यासारखे होईल म्हणून लिहिण्याचे इथे टाळतो. पण प्रसारमाध्यमांना पाठविलेले 'मुजहीदीन हैदराबद दक्कन'यांची एका पत्रातील भाषा पाहता अतिरिक्यांना धर्म असतो असे म्हणावे लागते.
29 Nov 2008 - 7:34 pm | मदनबाण
अशा हल्ल्याने सर्वसामान्य नागरिकांचा दबाब भारतीय देशावर यावा आणि त्याने पाकिस्तानवर हल्ला करावा अशीच अतिरेक्यांची इच्छा असावी.
काय राव्,,अहो पाकिस्तानला पुर्णपणे माहित आहे की हिंदूस्थान कधीच त्यांच्यावर हल्ला करणार नाही !!त्यांना आपल्या राजकीय नेत्यांच्यावर पुर्ण विश्वास आहे..
उलट अशा प्रत्येक हल्ल्यानंतर आपल्या उपखंडातील सुज्ञ, सुजाण आणि शांतताप्रिय नागरिकांनी एकत्र यावे आणि शांती, बंधुभाव, सामंजस्य याच्या दृष्टीने वाटचाल करावी यातच सर्वांचे हित सामावलेले आहे.
व्वा..उत्तम्,,हे हे ..काय आहे ज्यांच्या घरचे लोक मेले आहेत त्यांना सांगणार का तुम्ही हे??शांतता तेव्हाच शक्य आहे जेव्हा समोरच्याला पण ती हवी असते..पाकिस्तानला जर भारताबरोबर शांतता हवी असती तर हे प्रॉक्सी वॉर चालु ठेवले असते काय??
बंधुभाव..जाऊन दे ह्यावर काय बोलणार ??सांमज्यस्य्..या पाकड्यांच्या डोक्यात शिरणच अशक्य आहे..
यावर एकमेव आणि खात्री लायक उपाय म्हणजे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर चालु असण्यार्या अतिरेक्यांच्या तळावर सरळ हल्ला ..समस्येच मुळच उपटुन काढुन टाकायच..मग बरोबर शांतता..बंधुभाव आणि सांमजस्य सगळ मिळेल तेही लगेच..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
29 Nov 2008 - 7:12 pm | विनायक प्रभू
अंड्यातले बदक रे
बदकाचे अंडे रे
29 Nov 2008 - 7:22 pm | अनामिका
आपल्या राज्याचा (ना)मर्द मराठा गृहमंत्री ज्याला विरोधी पक्ष 'बोलका पोपट " अश्या विशेषणाने संबोधतात.
त्यांच्या मते अतिरेकी ५००० लोकांना मारण्याच्या उद्देशाने आले होते.त्यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ."मोठया शहरांमधुन अश्या छोट्या छोट्या घटना घडत असतात" अशी प्रतिक्रिया ऐकुन मी चक्क स्वतःच्याच कानफटात मारुन घेतली .या माणसाला काही संवेदना नावाचा प्रकार अस्तित्वात आहे याची कल्पना आहे की नाही?
इतका बधिर एखादा माणुस असु शकतो यावर विश्वास बसत नाहि आणि तो ही राज्याचा गृहमंत्री ज्याच्या वर अवघ्या महाराष्ट्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे.
आबा आता खरच तुमचा आणि तुमच्या स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणार्या पक्षाचा कायमचा इलाज करण्याची वेळ जवळ येउन ठेपली आहे.
आबा तुमच्या सगळ्या साथिदारांना अगदी आव्हाडांपासुन पवारांपर्यंत आपल चंबु गबाळ आवरुन टाळ व चिपळ्या घेऊन तासगावात जाऊन भजन कराव हेच योग्य.
"नाथा पुरे आता" च्या चाली वर "आबा पुरे आता"
प्रसाद काथे याच्या मते -"हा महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे की पशुपालनमंत्री" ~X(
http://www.youtube.com/watch?v=xY3h1innGQs
"अनामिका"
29 Nov 2008 - 9:16 pm | आजानुकर्ण
नाथा पुरे आता च्या चालीवर अनामिकाबाई पुरे आता असे म्हणत आहे.
मुंबईवर झालेला हल्ला हा भारतावरचा हल्ला होता शिवसेना, भाजप किंवा हिंदुंवरचा हल्ला नव्हता.
या हल्ल्याचा प्रतिकार भारतीय सैन्य व महाराष्ट्र पोलीसांनी केला... राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाही.
भाजपचे सरकार होते तेव्हाही संसदेवर हल्ला झाला होता. जे नरेंद्र मोदी इथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या राज्यातही अक्षरधाम वगैरे हल्ले झाले आहेत. (राजस्थान मध्ये जयपुरात हल्ला झाला तेव्हा तेथे कोणाचे सरकार होते? कर्नाटकात बेंगळूरुमध्ये हल्ले झाले तेव्हा कोणाचे सरकार होते? अहमदाबाद मध्ये हल्ले झाले तेथे कोणाचे सरकार होते? )
ही उदाहरणे देण्याचे कारण हेच की दहशतवाद्यांचे आव्हान हे केवळ कोणता एकच पक्ष पेलू शकतो असे नाही. हा देशावरचा हल्ला आहे आणि याचा विरोध विद्वेषाचे राजकारण किंवा आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करु नका.
29 Nov 2008 - 10:53 pm | कपिल काळे
अनामिकाताई आपण फारच नी- जर्क आणि एकांगी प्रतिपादन करत आहात.
http://kalekapil.blogspot.com/
30 Nov 2008 - 12:11 am | विकि
आर आर पाटलांची जात काढली .फक्त गृहमंत्री लिहीले असते तरी चालले असते.
29 Nov 2008 - 7:29 pm | विनायक प्रभू
उगाच अपमान करु नका पशुपालनाचा. माझ्याकडे हजारो कोंबड्याचा बरोबर हिशोब असायचा. एखादी मॉर्टॅलिटी पण मला अस्वस्थ करायची. पशुपालन करणारे आपल्या फ्लॉक ची भरपुर काळजी घेतात.
29 Nov 2008 - 9:13 pm | llपुण्याचे पेशवेll
इस्रायलसारखे धोरण अमलात आणणार असेल तर मोदी काय विलासराव पण चालतील पंतप्रधानपदी.
चाणक्याने म्हटले आहे 'संशय आला तर साप लगेच मारून टाकावा. तो मेल्यानंतर विषारी आहे का बिनविषारी हे बघता येईल'.
भले अगदी सगळी पाकीस्तानी जनता नसेल भारताच्या विरुद्ध पण तरीही सगळे अतिरेकी हल्ले तिकडूनच होतात ना! मग काय मी जिवावर उदार होऊन त्या गरीब बिचार्या पाकीस्तानी जनतेला कुरवाळत बसू का?
-(इस्रायल कडून एखादा पंतप्रधान उधार कींवा भाड्याने आणावा का? असा विचार करणारा)
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 9:37 pm | आजानुकर्ण
इस्रायलला या प्रश्नावर रामबाण उपाय सापडला असे म्हणणे हे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे आहे.
केवळ २००८ मध्ये इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये झालेला हिंसाचार पाहाः http://en.wikipedia.org/wiki/Violence_in_the_Israeli-Palestinian_conflic...
याआधीचा सगळा इतिहास येथे पाहाः http://en.wikipedia.org/wiki/Violence_in_the_Israeli-Palestinian_conflic...
हेदेखील वाचनीय आहे. http://www.johnstonsarchive.net/terrorism/terrisraelsum.html
29 Nov 2008 - 9:47 pm | ऋषिकेश
++++१
इस्त्रायलसारखं हवं असेल तर इस्रायली जनता जे सोसते आहे ते सोसायची भारतीय जनतेची तयारी आहे का?
(सुपातला) ऋषिकेश
29 Nov 2008 - 10:24 pm | llपुण्याचे पेशवेll
तशाच प्रकारचे जगणे मुंबईकर गेले २-३ वर्षे सोसत नाहीयेत का?
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 11:08 pm | ऋषिकेश
नाहि!.. अजिबात नाहि
-(गोंधळलेला) ऋषिकेश
29 Nov 2008 - 10:14 pm | कोलबेर
रोजच्या जीवनाची शाश्वती नसलेले नंदनवन काय कामाचे?
29 Nov 2008 - 10:23 pm | llपुण्याचे पेशवेll
आत्ता आहे ते अगदी शहाण्यांचे नंदनवनच आहे.. हींसाचाराला घाबरण्यापेक्षा सरळ ४-५ दिवस जगेन पण स्वाभिमानानेच जगेन अशाप्रकारचे जगणे मला आवडेल.. कृतीशून्य, अनिश्चित शांतीपेक्षा सावध, आणि स्वतःहून स्वीकारलेली अशांती परवडली.
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 10:27 pm | कोलबेर
काय योगयोग पहा. ते अतिरेकी देखिल असलीच भाषा वापरत होते. सतत भ्याडपणे जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखे जगू! हे कुठंतरी थांबावसं वाटत नाही का हो?
29 Nov 2008 - 10:32 pm | llपुण्याचे पेशवेll
काय योगयोग पहा. ते अतिरेकी देखिल असलीच भाषा वापरत होते. सतत भ्याडपणे जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखे जगू! हे कुठंतरी थांबावसं वाटत नाही का हो?
हे थांबेल असे वाटत तर नाहीच. 'ठकासी असावे ठक' या न्यायाने हे कधी थांबेल असे वाटत नाही. जर अगदी गांधीजींचा अहिंसेचा मार्ग वापरला तरी मी काही करत नाही म्हटल्यावर ते बलवान ठरतात त्यामुळे 'बळी तो कान पिळी' या न्यायानेही हे पुढे चालू राहणारच इथे फक्त प्रश्न उरतो तो चॉईसचा(निवडीचा). यातला कुठला मार्ग पत्करायचा तो.
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 10:47 pm | ऋषिकेश
अहिंसा म्हणजे निष्क्रियता नव्हे!.. असू इथे गांधीवादाचा पुरस्कार करा म्हणायचे नाहि मात्र उगाच कशाला जिथे तिथे त्यांना मधे ओढताय..
ना कोणाच्यात गांधींसारखे वागायची हिंमत आहे, ना सावरकरांसारखे!
-(गोंधळलेला) ऋषिकेश
29 Nov 2008 - 10:49 pm | कोलबेर
वा! ऋषीकेश प्रतिसाद आवडला.
29 Nov 2008 - 11:06 pm | llपुण्याचे पेशवेll
सगळेच गांधीजी किंवा सावरकर होऊन राहू लागले तर मग गांधीजी आणि सावरकर यांचे महत्व काय?
आणि जिथे तिथे त्याना ओढण्याचा प्रश्नच कुठे येतो. जिथे तिथे तर ते आहेतच.
१०, २०, ५०,१००, १००० सगळ्या नोटांवर गांधीजी आहेतच. मग आपल्याला हवे असो वा नसो त्यांचे दर्शन होणारच. आणि गांधीजींचे विचार भारतात तरी इतके मानले जातात तर त्याचा संबंध प्रत्येक गोष्टीत येणारच. प्रत्येक गोष्टीवर उपाय जर गांधीगिरी असू शकतो तर त्याचा उहापोह प्रत्येक गोष्टीत होणारच. हृदयपरिवर्तनाचा मार्ग कमीतकमी अतिरेक्यांवर तरी वापरता येणार नाही. कारण अतिरेकी हे अतिरेकी झाल्यानंतरच आपल्याला कळतात त्याआधी नाही. मग त्यांचे हृदयपरिवर्तन करणार कसे? आणि भारतात गांधी आणि सावरकर यांचे दोघांचेही अनुयायी होते त्यानी देखील बरेच थोर कार्य केलं आहे. मग अगदी ते त्यांच्या नेत्यांसारखे १०० टक्के नसतील वागले तरी त्यांची थोरवी कमी होते का?
मग 'ना कोणाच्यात गांधींसारखे वागायची हिंमत आहे, ना सावरकरांसारखे! ' या वाक्याचे प्रयोजन काय.
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 11:24 pm | ऋषिकेश
गांधी किंवा सावरकर होणे कोणालाहि शक्य नाहि म्हणून काय त्यांचा नावाचा उगाचच वापर करायचा?
हे खरच, प्रत्येक भारतीयाच्या मनात ते दोघेहि आहेतच
छोटे करेक्शन गांधीजींचे विचार जगभरात मानले जातात.. असो.
कोण म्हणतंय त्यांचे हृदयपरिवर्तन करा म्हणून? उगाच!? सांगा पाहु या चर्चेत कोण म्हणालं की त्यांचे हृदयपरिवर्तन करा म्हणून.. कैच्या कै!!!!
खरंतर गांधींचा विषयच नव्हता तो कुणी बरं घुसडला? :?
अरेच्या! एकतर काहिहि आगापिछा नसताना उगाच गांधीवादाला मधे तुम्हीच आणता आणि वर मलाच प्रयोजन काय विचारता?
असो. विषयांतर होत असल्याने हा माझा या विषयावरचा (धाग्यावरचा नव्हे :) ) शेवटचा प्रतिसाद
-(गोंधळलेला) ऋषिकेश
29 Nov 2008 - 10:29 pm | आजानुकर्ण
हिंसाचाराला घाबरण्यापेक्षा ४-५ दिवस स्वाभिमानाने जगेन हे पुस्तकात शोभणारे बाळबोध वाक्य आहे. पूर्णपणे impractical आणि अभिनिवेशयुक्त विधान आहे. पुढच्या पिढीचा विचार करा. मी स्वाभिमानाने ४-५ दिवस जगेन... माझ्या शेजाऱ्यानेही तसेच वागावे... प्रत्येकाच्या मुलाबाळानेही तसेच वागावे हे होणे बिलकुल शक्य नाही.
29 Nov 2008 - 10:39 pm | llपुण्याचे पेशवेll
हिंसाचाराला घाबरण्यापेक्षा ४-५ दिवस स्वाभिमानाने जगेन हे पुस्तकात शोभणारे बाळबोध वाक्य आहे. पूर्णपणे impractical आणि अभिनिवेशयुक्त विधान आहे. पुढच्या पिढीचा विचार करा. मी स्वाभिमानाने ४-५ दिवस जगेन... माझ्या शेजाऱ्यानेही तसेच वागावे... प्रत्येकाच्या मुलाबाळानेही तसेच वागावे हे होणे बिलकुल शक्य नाही.
कुठल्याही वाक्याचा बाळबोध अर्थ काढणे सहज शक्य असते जर कृती करायची नसेल तर. स्वतः काही न करता माझ्या शेजार्याला आणि त्याच्या मुलाबाळांना जाऊन हे सांगायला मी काही विचारवंत किंवा लेखक (काही अपवाद वगळता)नाही. बाकी ज्याने त्याने काय करावे ज्याचे त्याने ठरवावे. मुख्य मुद्दा हा की इस्रायल सारखा मार्ग अमलात आणणारा कोणीही खंबीर नेता मला पंतप्रधान म्हणून चालेल.
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 10:45 pm | आजानुकर्ण
कृती म्हणजे नक्की काय करायचे आहे. रोज आपण जगतो - सकाळी उठून प्रातर्विधी करणे, चहा पिणे, ऑफिसात जाणे वगैरे वगैरे, कटाक्षाने सिग्नल वगैरे कायदे पाळणे, - त्यापेक्षा आपण वेगळे काय करु शकतो? आणि काय करणे अपेक्षित आहे.
इस्रायलने तरी काय वेगळे दिवे लावले आहेत. एवढा खंबीर वगैरे पंतप्रधान असूनही त्यांच्याकडे हे रोजतेत प्रकार आहेत सुदैवाने इस्रायलसारखा पंतप्रधान भारतात होणे कधीच शक्य नाही.
29 Nov 2008 - 10:57 pm | llपुण्याचे पेशवेll
कृती म्हणजे नक्की काय करायचे आहे. रोज आपण जगतो - सकाळी उठून प्रातर्विधी करणे, चहा पिणे, ऑफिसात जाणे वगैरे वगैरे, कटाक्षाने सिग्नल वगैरे कायदे पाळणे, - त्यापेक्षा आपण वेगळे काय करु शकतो? आणि काय करणे अपेक्षित आहे.
त्यासाठी खंबीर नेता अगदी मोदी असले तरी त्याना निवडून देऊन इस्रायल सारखी कृती आरंभायला भाग पाडणे. अगदी त्यामुळे उठता बसता अगदी कधीही आपल्यावर हल्ला होऊ शकतो याची जाणीव माणसाला असते पण ते मरण लादलेले न वाटता स्विकारलेलेही वाटू शकेल.
अ)आता मुंबईत एक हल्ला झाला त्यात मी वाचलो न जाणो काही दिवसानी दुसरा हल्ला परत होईल त्यात मी मरेन, म्हणजे 'सकाळी उठून प्रातर्विधी करणे, चहा पिणे, ऑफिसात जाणे वगैरे वगैरे, कटाक्षाने सिग्नल वगैरे कायदे पाळणे' हे करून जीवनाची शाश्वती काहीच नाही.
ब)किंवा मुंबईच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मिरातले व ईतर पाकीस्तानी भागातले दहशवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. त्याचे प्रत्युत्तर म्हणून परत मुंबईवर हल्ला झाला त्यात मी मारला गेलो.
वरील दोन्ही घटना शक्य आहेत. परत प्रश्न आहे चॉईस(निवडीचा) दुसरी निवड ही कृतीपूर्ण आहे. कारण मरणाचे अपरीहार्य सावट निडरपणे मान्य केलं आहे आतासारखे संवेदनाशून्य होऊन नव्हे.
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 11:14 pm | आजानुकर्ण
ह्याच खंबीर मोदींच्या गुजरातेतील पोरबंदरमधून अतिरेकी आले अशी प्राथमिक माहिती आहे... असो.
इस्रायल सारखी कारवाई म्हणजे काय? त्यांनी जसे सगळ्या स्थानिक रहिवाश्यांना एका झटक्यात देशातून हाकलून लावले तसे? भारतात आज १५ कोटी मुसलमान आहेत. त्यांना हाकलून लावायचे? शाहरूख खान, सलमान खान, इरफान पठाण, एपीजे अब्दुल कलाम यांच्यासकट? ज्या मुसलमानांनी फाळणीनंतर हाच आपला देश आहे असे समजून इथेच राहण्याचे ठरवले त्यांनाही?
हा इस्रायली उपाय अभिप्रेत असल्यास तो मान्य होणे फार अवघड आहे. देशात यादवी माजेल.
राहता राहिला प्रश्न मुंबई आणि इस्रायलच्या तुलनेचा. सुदैवाने मुंबईतील परिस्थिती इस्रायलसारखी नाही. सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटी काढल्यास इतकी गंभीर परिस्थिती पुन्हा येऊ नये.
29 Nov 2008 - 11:22 pm | llपुण्याचे पेशवेll
ह्याच खंबीर मोदींच्या गुजरातेतील पोरबंदरमधून अतिरेकी आले अशी प्राथमिक माहिती आहे... असो.
ते आपल्या मुंबईत आले... असो..
इस्रायल सारखी कारवाई म्हणजे काय? त्यांनी जसे सगळ्या स्थानिक रहिवाश्यांना एका झटक्यात देशातून हाकलून लावले तसे? शाहरूख खान, सलमान खान, इरफान पठाण, एपीजे अब्दुल कलाम यांच्यासकट? ज्या मुसलमानांनी फाळ णीनंतर हाच आपला देश आहे असे समजून इथेच राहण्याचे ठरवले त्यांनाही?
अब्दुलकलाम, इरफान सोडले तर बाकीच्यांचे देशासाठी भरीव योगदान काय. सलमान खान - चिंकारा हत्या प्रकरण, मद्यधुंद राहून गाडी चालवणे. आणि जसे आपण त्याना इथे राहू देतो यात उपकार करतो असे आम्ही समजत नाही तसे त्यानीही आम्ही शांतपणे राहतोय म्हणजे उपकार करतोय असे समजू नये. देशाचा गाडा उपरोल्लेखीत असलेले लोक असले किंवा नसले चालणारच आहे. 'जन पळभर म्हणतील हाय हाय'.
भारतात आज १५ कोटी मुसलमान आहेत. त्यांना हाकलून लावायचे? हे वाक्य तर तुम्हीच माझ्या तोंडी घालता आहात. वाचा वरील प्रतिसादातील ब) वाचा.
हा इस्रायली उपाय अभिप्रेत असल्यास तो मान्य होणे फार अवघड आहे. देशात यादवी माजेल.
यादवी आत्ता नाहीच आहे असेही म्हणता येणार नाही.
राहता राहिला प्रश्न मुंबई आणि इस्रायलच्या तुलनेचा. सुदैवाने मुंबईतील परिस्थिती इस्रायलसारखी नाही. सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटी काढल्यास इतकी गंभीर परिस्थिती पुन्हा येऊ नये.
त्यासाठीच इच्छाशक्ती पाहीजे इस्रायल सारखी.
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 11:32 pm | आजानुकर्ण
इस्रायलने दहशतवादाचा प्रश्न त्यांच्या इच्छाशक्तीने किंवा त्यांच्या पद्धतीने सोडवला आहे असे आपण कुठे वाचले?
http://www.johnstonsarchive.net/terrorism/terrisraelsum.html येथे वेगळेच चित्र दिसत आहे.
अवांतरः
आणि मागे भारताने अणुसज्जतेची बोंब मारण्याकरता केलेल्या अणुचाचण्यांमुळे नंतर पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या आणि तेदेखील आपल्यासारखेच अण्वस्रसज्ज आहेत हे माहीत आहे का? तसे इस्रायलचे कोणते शेजारी अण्वस्रसज्ज आहेत?
30 Nov 2008 - 12:23 am | llपुण्याचे पेशवेll
तिथे दिसणारे चित्र फक्त इस्रायलच्या बाजूचे आकडे दाखवतात पॅलेस्टाईनच्या बाजूचे आकडे दाखवतात का? तसा काही विदा असेत तर तो ही दाखवा की.
अवांतरः अण्वस्त्रे असली तरी ती वापरायची सिध्दता आहे का? हा ही प्रश्न महत्वाचा. आणि भारताने अण्वस्त्रे वापरली तर क्षेत्रफळाचा विचार करता भारतापेक्षा पाकिस्तान फारच लवकर संपेल. परिणाम फार भयंकर असतील हे नक्की पण आताच्या हल्ल्याचे परिणामही भयंकर आहेतच.
आणि भारताच्या धोरणानुसार भारत कधीच प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही पण पाकीस्तानने केला तरी त्याला उत्तर देण्याची क्षमता भारतात नक्कीच आहे. आठवा जनरल पद्मनाभन यांचे उद्गार. 'पाकीस्तानने भारतावर अण्वस्त्रांनी प्रहार केला तर त्यांचे जगाच्या नकाशावरून अस्तित्व पुसून टाकण्यात येईल अशी क्षमता आम्ही राखून आहोत'.
पुण्याचे पेशवे
30 Nov 2008 - 1:10 am | आजानुकर्ण
इस्रायलला दहशतवादाचे उत्तर सापडले आहे की नाही हे सिद्ध करायला त्यांना मोजावी लागणारी ही किंमत पुरेशी आहे. पॅलेस्टाईनचे अमुक लोक मेलेत हे दाखवल्याने काहीच सिद्ध होत नाही.
आताच्या हल्ल्याचे परिणाम भयंकर आहेतच पण उपाय हा रोगापेक्षा भयंकर होऊ नये आणि रोगाचा समूळ नाश व्हावा हे पाहणे आवश्यक आहे. पाकिस्तान या हल्ल्यांसाठी जबाबदार असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे याविषयी कोणाचेही दुमत नाही. किंबहुना भारताने अशी पद्धत यापूर्वीही अवलंबली आहेच. मात्र इस्रायलने या प्रश्नासंबंधात काही नेत्रदीपक केले आहे असे वाटले नाही म्हणून वरची आकडेवारी दिली.
30 Nov 2008 - 1:39 am | llपुण्याचे पेशवेll
इस्रायलला दहशतवादाचे उत्तर सापडले आहे की नाही हे सिद्ध करायला त्यांना मोजावी लागणारी ही किंमत पुरेशी आहे. पॅलेस्टाईनचे अमुक लोक मेलेत हे दाखवल्याने काहीच सिद्ध होत नाही.
दुसर्या बाजूच्या आकड्यांची गरज कशी नाही. अर्थातच आहे. त्यावरून तर प्रमाण ठरवता येते ना! अन्यथा अर्धवट पुराव्याच आधारे इस्रायलच्या हातात काहीच लागले नाही असे कसे म्हणता येईल. भारताने यापूर्वी अशी पध्दत अवलंबिल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही. मात्र इस्रायलने एका अधिकार्याला सोडवण्यासाठी गाझापट्टीत रणगाडे घुसविल्याचे नक्की आठवते आहे.माझ्या विधानांचा स्वैर अर्थ काढून तुम्हीच त्याचा अनर्थ करीत आहात.
दहशतवादाच्या प्रश्नावर कोणालाच उत्तर सापडलेले नाही. सापडणारही नाही. जोपर्यंत इस्लामचा मूळापासून विचार कोणी करत नाही तोपर्यंत सार्या गोष्टी वरवरच्या आहेत. मूळात जिहाद पुकारायला इस्लामच शिकवतो. त्यावर जोपर्यंत कोणी कणखर भूमिका घेऊन विचार करत नाही तो पर्यंत हे चालूच राहणार आहे. इस्लामी दहशतवादाचा सर्व जगाकडून गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.
पुण्याचे पेशवे
30 Nov 2008 - 1:47 am | आजानुकर्ण
माझा मुद्दा इतकाच आहे की इस्रायलला त्यांच्या पद्धती वापरूनही हा प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळे आपणही तीच चूक करण्यात अर्थ नाही. त्यासाठी पुरेशी आकडेवारी उपलब्ध आहे.
मात्र तरीही २००८ मधील इस्रायल-पॅलेस्टिन दोघांची मिळून आकडेवारी येथे पाहा. त्यावरून अंदाज येईल
http://en.wikipedia.org/wiki/Violence_in_the_Israeli-Palestinian_conflic...
त्यावरून तर प्रमाण ठरवता येते ना!
मात्र कसले प्रमाण ठरवायचे आहे हे समजले नाही. समजा पॅलेस्टिनचे/इस्रायलचे जास्त लोक मेले असतील तर तो इस्रायलचा/पॅलेस्टिनचा नैतिक(!) विजय वगैरे मानायचा का?
[काल २०-२५ अतिरेक्यांनी २०० भारतीयांना मारले यावरून कसले प्रमाण ठरवायचे?]
29 Nov 2008 - 11:02 pm | अनामिका
अजानु!
तुमची जर काँग्रेसला अथवा रा कॉ ला लक्ष केल म्हणुन तगमग होत असेल तर माझी देखिल उलट कारणास्तव तशीच तगमग होण स्वाभाविक नाही का?
आबांची पोपट्पंची कायमच चालु असते.एरवी ठिक आहे पण जरा वेळ काळाच भान ठेवायला हव कि नको ?.इथे त्यांचे गायकवाड ,भाजपाचे साळुंखे इतर पक्षांचे खासदार वाचले .वाचवले गेले.(जिव मुठीत धरुन बसल्यावर अजुन काय करु शकणार म्हणा?)
जी मृत पावली ,अतिरेक्यांच्या अमानुष गोळीबाराला बळी पडली ती सर्वसामान्य माणसच. ताज ,ओबेरॉय ,सिएसटि येथे पडला तो सामान्य माणसाच्या रक्तामासाचा सडा ,चिखल म्हणा हवा तर?मोदींच्या भेटिने त्रागा करणारे मुख्यमंत्री जेंव्हा अश्या प्रकारच्या घोषणा करतात http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3773280.cms तेंव्हा खालच्या पातळीवरच राजकारण ठरत नाहि वाटत? करकरे यांच्या पत्नीने मोदींनी देऊ केलेली मदत नाकारली ते योग्यच केल आणि मला ते अपेक्षितच होत.
मी कधी म्हणाले की अतिरेक्यांशी लढले ते काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते?असले बाष्कळ व मुर्ख विधान मी अजिबात करणार नाही................... आणि तुम्ही जी वर यादी दिलीत भाजपाचे शासन असलेल्या राज्यात आजतागायत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची .ते सत्य मी तरी कुठे आणि कधी नाकारतेय ?...............
मुंबईवर ओढवलेल्या अशा आपादपरिस्थितीत मोदींनीच काय इतर ज्यांनी ज्यांनी भेटि दिल्या मुंबईला, त्या सगळ्याच भेटि देण्यार्यांनी काळाचे भान ठेवायला हवेच होते. अगदि मान्य..........
पण म्हणुन काय मोकाट सोडल्यासारख आपली जबाबदारी विसरुन असले फिल्मी डायलॉग मारण्याची मुभा दिली आहे का आबांना?...........बोलताना विचार करा की तुम्ही कोणता पदभार सांभाळत आहात याचा?या कारणास्तव उद्या लोकांनी दगड नाही घातले डोक्यात म्हणजे मिळवले? फिल्मी अंदाज मधे भारतमाता की जय म्हणण सोप आहे हो ! तश्याच प्रकारची कृती पण करुन दाखवा मग बघु...............! प्रत्येक वेळेस आबांना अशा प्रकारची वक्तव्य केल्या नंतर माफी मागुन अथवा स्पष्टिकरण देवुन नामुष्की ओढवुन घ्यावी लागते...............त्या पेक्षा जरा काळजी घ्या कायम उचलली जिभ लावली टाळ्याला करायच ते!
आणि हा हल्ला मुंबईवर नाही तर हिंदुस्थानवर आहे असे मी न समजण्याचे अथवा मानण्याचे कारणच काय?मी सुद्धा एक हिंदुस्थानीच आहे आणि त्याचा मला अतिशय अभिमान आहे..................मुंबई हा हिंदुस्थानचा भाग आहे आणि महाराष्ट्राचा तर अविभाज्य भाग आहे.या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने मुंबईला वेगळ पाडण्याच कारस्थान आता सुरु झालय ,लवकरच कळेल कोण करतय ते?
आणि मी कोण विद्वेषाच राजकारण करणारी ?
विद्वेषाच राजकारण करायला आणि राजकीय पोळी भाजुन घ्यायला मी कुणी राजकारणी नाही .
"घाण साफ करावीशी वाटत असेल तर त्या गटारात हात घालुनच ती घाण साफ करावी लागते " उद्या मनात आल तर ते करायची माझी तयारी आहे.
उगाच अपमान करु नका पशुपालनाचा
विप्र तुमच्याशी सहमत मला अनुभव आहे या गोष्टीचा.
चु भु द्या घ्या
"अनामिका"
29 Nov 2008 - 11:08 pm | कोलबेर
अजिबात नाही. तुमची भाजपा विषयी होणारी तगमग स्पष्ट दिसत आहे. पण काँग्रेस आणि राकॉची बाजू इथे कुणीही घेतलेली दिसली नाही. उलट सगळे राजकारणी सारखेच असाच सूर दिसत आहे.
अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादातील हे वाक्य दिसले नाही तुम्हाला बहुदा! इथं पक्षाचं राजकारण करताना (मलातरी)तुम्हीच दिसत आहात.
29 Nov 2008 - 11:19 pm | अनामिका
तुम्ही म्हणताय तर कदाचीत मी चुकत असेन पण म्हणुन मुळ मुद्द्याला बगल देण्यात अथवा दुर्लक्ष करण्यात काय अर्थ आहे?
"अल्पमती अनामिका"
30 Nov 2008 - 9:23 am | लवंगी
असच आपण भांडत बसतो आणि बाहेरचे फायदा घेतात..
1 Dec 2008 - 6:35 pm | आम्हाघरीधन
आज नरेंद्र मोदी किंवा त्यासदृश निर्भय , रोखठोख, क्रियाशील पंतप्रधान हवे होते की नाही ??
अहमदाबादला बोम्ब् स्पोट झाले तेन्व्हा बघितली कि त्यान्ची निर्भयता!!!!!!! स्वत: पोलिस घेवुन फिरत होते जनतेला मरायला सोडुन.
फक्त आणि फक्त सरदार वल्लभ भाई पटेल हवेत कोणताहि इतर आण्डु पाण्डु नाय चालत..........
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.