भारतीय सैन्यातील निवृत्त तोफखाना अधिकारी असलेले आपल्या मिपाचेच एक सभासद अशोक गोडबोले यांच्याशी काल चर्चा करताना ते असं म्हणाले की ताज, नरीमन भवन, आणि ओबेरॉय येथे लपलेल्या अतिरेक्यांना खणून काढणे हा अतिशोयोक्ति वाटेल परंतु भारतीय कमांडोजकरता तो अक्षरश: १० मिनिटांचा खेळ होता! तरीही केवळ आतल्या बंधकांच्या सुरक्षेचा विचार करता त्यांनी चिकाटीने, होता होईल तो जितक्या बंधकांना वचवता येईल तितक्यांना वाचवून ही ऑपरेशन्स यशस्वी केली आहेत..
अर्थात, आपली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, तसेच सागरी सुरक्षा व्यवस्था यांची मात्र ही हार आहे असेच म्हणावे लागेल. ही अतिरेकी मंडळी इथे आली केव्हा, एवढा प्रचंड दारुगोळा त्यांनी सोबत आणला केव्हा, सगळं प्लॅनिंग केव्हा अन् कसं केलं याचा आपल्या अंतर्गत यंत्रणेला थांगपत्ताही लागू नये ही हारच म्हणावी लागेल..
असो,
शून्य इच्छाशक्ति असलेल्या राजकारण्यांमुळे ढिल्या पडलेल्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमुळे भारतीय सैन्याला विनाकारण ताण पडला आणि १० मिनिटांच्या कामाकरता सैन्याचे बहुमोल ६० तास खर्ची झाले याचे मात्र वाईट वाटते..!
प्रतिक्रिया
29 Nov 2008 - 12:21 pm | स्वप्निल..
लेख मस्त आहे..
अवांतरः व्ययक्तिक मतः ह्यासाठी एक नविन धागा सुरु करणे पटत नाही..खफचा वापर केलेला चांगला..
स्वप्निल
29 Nov 2008 - 12:26 pm | बबलु
सुहास फडके यांचा अतिशय परखड लेख. फारच छान.
अतिशय योग्य लिहिलंय.
हा लेख छापल्याबद्दल म.टा. विषयी आदर वाटतोय.
....बबलु
29 Nov 2008 - 1:40 pm | ऋषिकेश
लेख ठिक वाटला..
लेख वाचून संपल्यावर हाती फारसे काहि लागले नाहि असे वाटले
मात्र आपण काल-परवातरी हरलो हेर खरेच :(
-( :( ) ऋषिकेश
29 Nov 2008 - 1:57 pm | विसोबा खेचर
भारतीय सैन्याचा विजयच झाला आहे असे मी म्हणेन..
कारण -
भारतीय सैन्यातील निवृत्त तोफखाना अधिकारी असलेले आपल्या मिपाचेच एक सभासद अशोक गोडबोले यांच्याशी काल चर्चा करताना ते असं म्हणाले की ताज, नरीमन भवन, आणि ओबेरॉय येथे लपलेल्या अतिरेक्यांना खणून काढणे हा अतिशोयोक्ति वाटेल परंतु भारतीय कमांडोजकरता तो अक्षरश: १० मिनिटांचा खेळ होता! तरीही केवळ आतल्या बंधकांच्या सुरक्षेचा विचार करता त्यांनी चिकाटीने, होता होईल तो जितक्या बंधकांना वचवता येईल तितक्यांना वाचवून ही ऑपरेशन्स यशस्वी केली आहेत..
अर्थात, आपली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, तसेच सागरी सुरक्षा व्यवस्था यांची मात्र ही हार आहे असेच म्हणावे लागेल. ही अतिरेकी मंडळी इथे आली केव्हा, एवढा प्रचंड दारुगोळा त्यांनी सोबत आणला केव्हा, सगळं प्लॅनिंग केव्हा अन् कसं केलं याचा आपल्या अंतर्गत यंत्रणेला थांगपत्ताही लागू नये ही हारच म्हणावी लागेल..
असो,
शून्य इच्छाशक्ति असलेल्या राजकारण्यांमुळे ढिल्या पडलेल्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमुळे भारतीय सैन्याला विनाकारण ताण पडला आणि १० मिनिटांच्या कामाकरता सैन्याचे बहुमोल ६० तास खर्ची झाले याचे मात्र वाईट वाटते..!
आपला,
(भारतीय सैन्याचा अभिमानी) तात्या.
30 Nov 2008 - 6:04 am | llपुण्याचे पेशवेll
भारतीय संघराज्य या व्यवस्थेने हे युध्द हरले पण भारतीय सैन्यदलानी मात्र भारताची अब्रू वाचवली आहे.
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 5:47 pm | प्रथमेश गोखले
या लेखावरील माझी प्रतिक्रिया 'तिथेच' पहावी.
30 Nov 2008 - 5:20 am | सत्यवादी
सौजन्य बीबीसी
- सत्यवादी