मागच्यावेळी "रानमळा"ला झालेल्या कट्ट्याला वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या मिपाकरांना बोलवायला जमले नाही...यावेळी काळ्या दगडावरची रेघ असणार्या मध्यवर्ती ठिकाणी होणार्या कट्ट्यामुळे पुणेकरांची जळजळ होऊ नये या उदात्त हेतूने पुण्यातसुध्धा कट्टा होऊन जाउदे असे ठरवले...अनायसे पनीर शेखसुध्धा पुण्यात होते (कट्टेवालोंको कट्टे का सिर्फ बहाना चाहिये). हा कट्टा करायचे ठरवले आणि त्यातच मुविंनी आकुर्डीच्या कट्ट्याची घोषणा केली त्यामुळे हा कट्टा होणार की नाही...झालाच तर मिपाकर येतील की नाही याची धाकधूक होतीच.
पण नुसता कट्टा करायचे असे म्हटले आणि काय तो पुणेकरांचा "उत"साह दिसला...चक्क ३ धागे आणि जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त प्रतिसाद...प्रतिसाद + सूचना यांचा भडिमार नुस्ता...एखादा नवखा मिपाकर कैच्याकै हुरळून जाईल अश्याने (मी अनुभवी होतो म्हणून ठिक आहे :D ) काही जणांचा उतसाह इतका की पक्षी+तीर्थ कट्ट्यासाठी शुध्द सात्विक शाकाहारी जेवण मिळण्याचे ठिकाण सुचवले गेले (आता हा पुणेरी खौचट्टपणा होता हे मी लग्गेच ओळखलेले llllllluuuullllluuuu)
बाकी सगळ्या हौश्या + नवश्या + गवश्यांनी भरलेल्या ३ धाग्यांच्या जवळपास साडेतीनशे प्रतिसादांत उपयोगाचे कैच नव्हते...यालाच पुण्यात चोखंदळपणा म्हणतात अशी जुनीच माहिती नव्याने समजली...काही अतीउतसाही मिपाकरांनी या चोखंदळपणाचा संबंध लग्गॆच पुण्यात (न झालेली) मेट्रो, पुण्यातले खड्डे याच्याशीही लावायचा प्रयत्न केला परंतू पुणेकरांनी त्यांना तितक्याच तत्परतेने फाट्यावर मारले...शेवटी पुणेकरच हो ते...स्वतःचा मुद्दा कितीही चुकीचा असो शेवटचे वाक्य स्वतःचेच असले पाहिजे हा अट्टहास =))
तर शेवटी कट्टा करण्यास काही टाळकी तरी जमली तर काहींनी व्यवस्थित टांग मारली त्यातील काही मानाचे टांगारू (पुराव्यासकट)
नाखू (http://www.misalpav.com/comment/691942#comment-691942)
मितान (http://www.misalpav.com/comment/692016#comment-692016)
देवांग (http://www.misalpav.com/comment/692055#comment-692055)
पिलीयन रायडर (http://www.misalpav.com/comment/692115#comment-692115)
ठरल्याप्रमाणे ६ तारखेला संध्याकाळी पनीर शेख सगाकडे पोहोचले आणि दोघांनी मिळून शेजारीच सूडच्या घराकडे कूच (मराठीतला) केले...मी फ़ूरसूंगीहून व्हाया स्वारगेट सगाकडे पोहोचायला PMPML च्या कृपेने फक्त १ तास लागला. सूडच्या घरी पोचत असतानाच २ चेहरे खिडकीच्या गजांमधून डोकावून माझ्या दिशेने हातवारे करताना दिसले...इतके अतिउत्साही लोक मिपाकर सोडून दुसरे कोणी असूच शकत नै याची खात्री होतीच :) सूडच्या घरी मात्र अगदी दोन शेजारी मिळून रोजच्या शिळोप्याच्या गप्पा कराव्या तश्या गप्पा रंगल्या
सूडचे घर म्हणजे खरोखर त्याने घरावर सूड उगवल्यासाराखेच आहे =)) मी जास्त काही सांगणार नै नाहीतर तो घर आवरायला लावेल ;) पण त्याच्याकडचे रसगुल्ले (पिणे अनिवार्य असणार्या पाकासकट) मात्र भन्नाट होते...बोलता बोलता असे समजले की सूड त्याच्या मावशीकडे(?) स्वारगेटला जाउन मग कट्ट्याला येणार होता. खाखोदेजा कारण १० मिनीटांत येतो सांगून तो जो सटकला ते जवळपास अर्ध्या-पाउण तासाने आला तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी सगाच्या घरी गप्पांचा अड्डा जमवला, बुवाबाजी करणारे एक अत्तरवाले सुध्धा विदाउट अत्तर आले (कदाचित अत्तरे खास लोक येणार असतील तेव्हाच जवळ बाळगीत असावेत :), आल्या आल्या लग्गेचच त्यांनी बूच लावण्याचे उपाय यावर एक काथ्या कुटला :)
पनीरबाबा अत्तरबुवांशी गप्पा मारत असतानाच अचानक सगा "अरे मला कोणीतरी मिस कॉल देत आहे" असे बोंबलला...त्या नंबरला फोन करताच "अर्रे (आळश्यांन्नो) कुठे (उलथला) आहात...पोचलात का (शिंच्यांन्नो)...माझा इथे (सद्गुणांचा) पुतळा झालाय" अशी आर्तमग्न मधुर वाणी ऐकू आली. नेमक्या त्याच वेळी माझ्या चतुरभ्रमणध्वनीवरसुध्धा तस्साच मेसेज आलेला आणि मग लक्षात आले...धाग्यावर येणार असे न सांगून एक मृत्युंजय असणारा पुणेकर (तो पुणेकर आहे हे त्याचे मत) शोरबामध्ये पोहोचलेला...मग मात्र आम्ही कट्ट्याच्या ठिकाणी कूच केली...या वेळेस तरी ती मिपाप्रसिध्ध उडनमांडी बघायला मिळेल या आशेने पनीरबाबा बुवांच्या activa वर स्थानापन्न झाले परंतू त्यांची ती इच्छा अपूर्णच राहीली आणि नंतर कदाचित मत्स्याहार व सोनेरी पाण्याच्या आस्वादाने ती इच्छा विसरली गेली असावी ;)
कट्टा सुरु करताना काही मिपाकरांची वेगवेगळ्या कारणांसाठी तीव्रतेने आठवण काढली गेली (मुवि, नाखू, वल्ली, औरंगजेब उचक्या लागलेल्या का?). सूड सुध्धा तोपर्यंत (एकदाचा) आला...मग जी धमाल सुरु झाली त्यातून शोरबाचे वेटरसुध्धा सुटले नाहीत :) प्रत्येकाने आपापल्या आवडीने सामिष/गवताळ खाणे आणि (झेपेल ते व झेपेल तितकेच) रंगीत पाणी मागवले...आणि मग आजकाल मिपावर सर्वांत लोकप्रिय असलेले गणपति व सरस्वती कसे आहेत याची चौकशी कथानायकाकडे करावी अशी बुवांना गळ घालण्यात आली (काही आगोबा मिपाकर यालाच गळाला लावणे असे बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही)...त्यातच ती सिंड्रेला आली आणि मग सिंड्रेलाची वैजू बनेल की बुवांचा पाद्री बनेल यावर एक दू दू संवाद रंगला :) पण बुवांनी विदेशी सिंड्रेला आणि विदेशी कार्बयुक्त पाणी एकमेकांत मिसळले की "लोहा ही लोहे को काटता है" या लॉजीकने विदेशी विदेशी क्यँसल होऊन ते देशी बनते असे शास्त्रीय कारण देऊन सिंड्रेलाची वैजू केली आणी तिचा आस्वाद घेतला (म्हणजे पेयाचा) ;)
बुवांनी शिताफीने वैजूच्या गोष्टींवरून गाडी हळूच कोकणावर वळवली आणि मग नेहमी प्रमाणे कोकणातल्या भुतांच्या गोष्टी सुरु झाल्या. बोलता बोलता नकळत कोकणातल्या एका holy ghost चा पर्दाफाश त्या दू दू भुताने स्वत:च केला =)). मग प्रत्येकाने आपापले सुपर नॅचरल अनुभव कथन केले पण त्यामुळे एक इब्लिस मिपाकर मात्र टरकला ;) आणि लगेच त्या रात्रीचा त्याचा मुक्काम सगाकडे असेल असे सगाला न विचारताच जाहिर केले :D. कट्टा सुरु असतानाच चिमणूचा फोन येउन गेला, लगेच सगाब्रोब्र काहीतरी कुजबुजसुध्धा करून घेतली...तीर्थकट्टा असल्याने कोणाचे विमान किती हवेत आहे याची जमिनीवरुनच चाचपणी करून मिपावरील तीर्थंकरांबद्दलचे त्याचे अज्ञान उघड केले.
या सगळ्या बरोबरच ह.भ.प.बुवांच्या सुरस कथा, गूळ पाडणे म्हणजे काय यांसारख्या कुतुहलांच्या विषयांबद्दल परिसंवाद झाले (तीर्थ म्हटले की असे विषय आपोआप येतात). गवताळ लोकांबरोबर बोलत असताना म्र्युत्युन्जय सगाचा गेल्या ३ वर्षांपासून शेजारी असल्याचा साक्षात्कार सगाला झाला :) न आलेल्या मिपाकरांपैकी काहीजण सक्काळपासून कोण येणार आहे, कोण आलेले आहेत असे सारखे थोड्या थोड्या वेळाने विचारात होते...पुढल्यावेळी त्यांनी कट्ट्याला कोण उपस्थित हवे आहे हे आधीच कळवावे...अपहरण फेम अन्या दातारांना वेळेत सुपारी पोचती केली जाईल :)
हे सगळे होत असतानाच सगळ्यांना आणखी एका चकमकीची उत्सुकता होती जी ७ च्या कट्ट्याला होणार होती...अस्मादिक व अनाहितांची ऐतिहासिक भेट :D कसे भेटावे काय बोलावे असे सल्लॆ मिळत असतानाच मघासच्याच (घाबरलेल्या) इब्लिस डोक्यातून एक सुपीक कल्पना निघाली की मी ७ च्या कट्ट्याला एखादा दुसरा आयडी बनून जावे आणि अनाहिता माझ्याबाबत काय काय बोलतात हे आयडीचे वेशांतर करून जाणून घ्यावे. कोणता आयडी कोणता आयडी ठरवता ठरवता सध्ध्या मिपावर गाजत असलेल्या "दमामि" हा (माझाच???) आयडी मुक्रर झाला ;)
(७ च्या कट्ट्याला काय काय झाले ते दुसर्या वृत्तांतात येईलच)
कट्ट्याची सांगता पानाच्या ऐवजी खत्री आईस्क्रीमने झाली...आईस्क्रीम संपवता संपवता "एकापेक्षा जास्त मुलांची अव्यवहार्हता" यावर एक छोटा परिसंवाद झाला...सर्व संवादपटूमात्र अविवाहित आहेत ;)
हा कट्टा पुण्यात झालेला तरीही तो नॉन-पुणेकरांचा* कट्टा होता...
*बुवांचा संचार इहलोकी सर्वत्र असतो त्यामुळे बुवांना आम्ही पुणेकर मानत नाही :D
प्रतिक्रिया
11 Jun 2015 - 3:59 pm | एस
उत-साह उतू चाललेला दिसत आहे. गुड गुड! :-D
11 Jun 2015 - 4:02 pm | दमामि
फोटु???
11 Jun 2015 - 4:16 pm | प्रमोद देर्देकर
मस्तच. असा पाहिजे वृ वृ वृत्तांत हहपुवा .
अवांतर :- हायला आमचं गुरुजी अकलुजला गेले आहेत म्हणुन. त्यांनी एकदा का हा वृ त्तांत चावला आपलं ते हे वाचला की तुला बुकललाच समज त्यांनी.
गुरुजींचा एकमेव शिष्य पम्या कळ(ला)वेकर.
12 Jun 2015 - 4:15 pm | टवाळ कार्टा
तू तांब्या धरलेला नाहीस...तस्मात तू (ऑफिशीअल) शिष्य नाहिस
वरचे वाक्य "मी शेंगदाणे खाल्ले नाहीत..." या चालीवर वाचावे
11 Jun 2015 - 4:28 pm | सूड
पुढल्या वेळी तुला घर आवरायला लावतो बघ!!
12 Jun 2015 - 4:16 pm | टवाळ कार्टा
रसगुल्ल्यांचा अख्खा डब्बा (तो सुध्धा रसगुल्ल्यांन्नीच भरलेला) देणार असतील तर येतो :)
11 Jun 2015 - 4:34 pm | मृत्युन्जय
फर्स्ट थिंग्स फर्स्ट. मी कट्ट्याला येणार हे आधीच जाहीर केले होते पण बहुधा ३ धाग्यांच्या महापूरात माझा प्रतिसाद वाहुन गेला.
दुसरी गोष्ट म्हणजे मी पुणेकर नाही हे समजल्यावर निम्म्या मिपाकरांना आणि किमान चिनारला तरी तु खोटे बोलतो आहेस याची खात्री पटेल. तर इथे खुलासा करणे गरजेचे आहे की मी जन्माने अ पुणेकर असलो तरी कर्माणे पुणेकर आहे. (जगात या दोनच क्याटेगर्या असतात असे पुणेकरांना वाटते. पु लं देशपांडे मुळचे मुंबईकर असल्याने त्यांनी उगा ३ क्याटेगर्या काढल्या बाकी काही नाही)
बाकी मिपाच्या जगप्रसिद्ध आशिका बद्दल झालेली चर्चा इथे का म्हणे उद्धृत नाही केली?
11 Jun 2015 - 4:43 pm | टवाळ कार्टा
शक्यता नाकारता येत नाही
काहिही घोळ न घालता कट्ट्याला आलात...इतकेच पुरेसे आहे पुणेरीपणा अजून व्यवस्थित भिनला नाहीये हे दाखवायला =))
12 Jun 2015 - 5:59 pm | चिनार
माझं नाव का आलं ते कळलं नाही..
हलकं घेतलंय...पण मुद्दा कळला नाही..
12 Jun 2015 - 9:56 pm | टवाळ कार्टा
असे जाहिरपणे सांगायचे नस्ते...आता नेक्ट टैम पासून जपून ;)
12 Jun 2015 - 10:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
12 Jun 2015 - 11:05 pm | टवाळ कार्टा
तुमने हे मिसल्या
13 Jun 2015 - 11:52 am | मृत्युन्जय
हलकं घेतलंय...पण मुद्दा कळला नाही..
ऑ मुद्दा कळाला नाही? तुम्हीच ना ते? तेच ना तुम्ही?
http://www.misalpav.com/node/30724
13 Jun 2015 - 1:07 pm | चिनार
।होय . तो मीच..
पण त्याचा इथे काय सम्बन्ध ते कळल नाही...
असो..... हलकच घेतो...
11 Jun 2015 - 4:35 pm | पैसा
मस्त लिहिलंय!
11 Jun 2015 - 4:44 pm | टवाळ कार्टा
ठ्यांकू :)
11 Jun 2015 - 4:39 pm | नाखु
वृत्तांत. फोटो कुठे "शीक" आहेत?
"फोटो नाय तर कट्टा नाय"
सदर अवरतरण सूड यांचेंकडून या धाग्यापुरते उसने घेतले आहे.
सातचे कट्याबाब्त आम्चे बारा वाजले हे कबूल !
सात्-बाराचा नाखुस
11 Jun 2015 - 4:58 pm | पिलीयन रायडर
पुन्हा एकदा फोटो नाहीत तर हा कट्टा झालाच नाही.. हे खयाली पुलावच आहेत!!
आणि तुम्ही ५६ धागे आणि १५२७२८९२ प्रतिसाद द्याल तर कसं समजावं की नक्की काय ठरलय! ;)
असो.. मी पुण्यात नव्हतेच ६-७ जुनला, नाही तर आलेच असते कट्ट्याला. मी ह्या कट्ट्यांच्या एकाही धाग्यावर प्रतिसाद न देताही मी मानाची टांगारु कशी हे कळाले नाही. मागे एका धाग्यावर "माहिती असतं, तर आले असते" असं म्हणलं ते केवळ १. कट्टा घरापाशी होता आणि २. मी रिकामी होते ह्या कारणांमुळे.. ती काय मी आजन्म कट्ट्याला येईनच अशी कमिटेमेंट केली नव्हती!! बरं ते ही असोच..
आठवण काढल्याबद्दल धन्यवाद!
असेच खयाली पुलाव पकवत.. आपलं कट्टे करत रहा हो..
पुलावाची डिट्टेल रेसेपी आवडली!
12 Jun 2015 - 4:22 pm | टवाळ कार्टा
हे आम्ही नाही तर "चोखंदळ" पुणेकरांना समजायला हवे llllluuuuuullllluuuuuu
यावर एका मिपाकराची प्रतिक्रिया "आत्याबाईला मिश्या असत्या तर..." अश्शी होती
कट्ट्याला यायचे असेल तर घरापासूनचे अंतर हा मुद्दा गौण असतो...शिका जरा काहितरी मुंबैकरांकडून
कट्ट्याला काय फक्त रिकामटेकडे/पेन्शनर मिपाकरच येतात? अभ्यास वाढवा llllluuuuuullllluuuuuu
धन्यवाद :)
वो तो चालूईच रैगा
भेटून वाचून आनंद झाला
11 Jun 2015 - 5:03 pm | लालगरूड
आवडला
टवाळ लालगरूड :-D
11 Jun 2015 - 5:07 pm | अजया
झालेला वाटतं कट्टा!का मनाचे श्लोक लिहिले आहेस रे!
12 Jun 2015 - 4:23 pm | टवाळ कार्टा
खिक्क
11 Jun 2015 - 5:19 pm | खटपट्या
मस्त व्रुत्तांत !!
कट्टा मिसल्यामुळे हळहळ आणि जळजळ...
11 Jun 2015 - 5:33 pm | स्पा
मस्त रे
11 Jun 2015 - 5:49 pm | दमामि
अनाहिता माझ्याबाबत काय काय बोलतात हे आयडीचे वेशांतर करून जाणून घ्यावे. कोणता आयडी कोणता आयडी ठरवता ठरवता सध्ध्या मिपावर गाजत असलेल्या "दमामि" हा (माझाच???) आयडी मुक्रर झाला ;)
अनाहितानी बिंग ओळखले हे खरे, म्हणतात ना, गिऱ्या लेकिन नाक उप्पर!:)
12 Jun 2015 - 12:06 pm | बॅटमॅन
जर गिर्या असेल तर त्याला काहीही शक्य आहे, नै का?
12 Jun 2015 - 4:24 pm | टवाळ कार्टा
संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या आणि इतके जळ्ळू नका ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
11 Jun 2015 - 5:56 pm | जेपी
फालतु लेख.अत्यंत हिणकस प्रतिसाद देणार होतो पण आवरत घेतो.
मुळात प्रतिसादच देणार नव्हतो पण टक्या सारख्या मित्राला योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.
(इनोप्रेमी)-जेपी
किती करायचे ते कळवा.
12 Jun 2015 - 4:25 pm | टवाळ कार्टा
तुझे नाव टांगारूंच्या यादीत टाकायचे राहीले
11 Jun 2015 - 7:33 pm | मुक्त विहारि
काही अपरिहार्य कारणामुळे २ही कट्टे हुकले, पण २ही कट्ट्याचा व्रुत्तांत एकदम खुसखूशीत.
फोटो नाही टाकलेत तरी चालेल.
मिपाकर नेहमीच आमच्या मनांत असतात.
कट्ट्याला हजर राहू शकलो नाही, त्याची हळहळ मात्र अज्जून वाटत आहे.
11 Jun 2015 - 7:44 pm | स्रुजा
छान लिहिलंय, आवडेश .. तुझे पुणेकरांबद्दल चे सगळे कॉमेंट्स फाट्यावर मारण्यात आले आहेत मोठ्या मनाने, तुला तरी कधी कळायचा आमचा मोठेपणा, नाही का? ;)
बाकी टका, अनाहिता तुझ्याबद्दल काही ही बोलत नाहीत हां, काळजी नसावी.
12 Jun 2015 - 4:27 pm | टवाळ कार्टा
हम भाव नै देते lllluuuuulllluuuu
ते "कल्जी क्रू न ये" असे ल्हितात ना? ;)
12 Jun 2015 - 10:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अच्रत बव्लट मेला.
12 Jun 2015 - 11:05 pm | टवाळ कार्टा
हे सुध्धा "अचत बव्लत" असे ल्हितात =))
13 Jun 2015 - 2:40 pm | इरसाल
माजेशी मय्तरी कर्नार कं ?
14 Jun 2015 - 4:09 pm | टवाळ कार्टा
खिक्क...हे कोणत्याच अनाहितेला + मिपाकरणींना (रंगा इज वॉचींग) विचारायचे नै....माझ्या टैपची इथे कुण्णीच्च नै :(
11 Jun 2015 - 8:02 pm | प्रीत-मोहर
छान लिहिलाय. पण हा खयाली पुलावच आहे!!!!
फोटो नाय तर कट्टा नाय
श्रेय-अव्हेरः मा. मिपाकर
11 Jun 2015 - 9:53 pm | नूतन सावंत
वृतांत आवडला पण फोटो कुठे आहेत?
11 Jun 2015 - 11:14 pm | जुइ
फोटो कुठे आहेत?
11 Jun 2015 - 11:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
अपवाद नसलेला मिपा नियम : "फोटो नाय तर कट्टा नाय" !
12 Jun 2015 - 3:55 pm | सूड
+१
12 Jun 2015 - 4:10 pm | टवाळ कार्टा
जल्ला तु पनं
12 Jun 2015 - 4:43 pm | सूड
तरी मी सांगत होतो फोटो काढा, माझ्याकडे त्या हैदराबादी का कायशा कबाबांचा आणि रसगुल्ल्यांचा फोटो आहे. पण तुला अपलोड करावा लागेल. मला पिकासावर अपलोड करायची पावर नाय हापिसातून.
12 Jun 2015 - 4:57 pm | टवाळ कार्टा
फटू तु आणि गुर्जींनी काढलेत ना? गुर्जी दौर्यावर आहेत
11 Jun 2015 - 11:47 pm | इशा१२३
झाला का कट्टा.बर .फोटो कुठ आहेत?
12 Jun 2015 - 6:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
फोन रिसिव्ह करायचं बटणं सापडलं का रे वेळेत तुला? =))
12 Jun 2015 - 4:28 pm | टवाळ कार्टा
माझ्याकडे अँड्रॉईड फोन आहे, त्याला स्वाईपचा पर्याय असतो...बटण नस्ते कै lllluuuuullllluuuuu
13 Jun 2015 - 1:31 pm | यसवायजी
ओ टेकग्रू, अभ्यास कमी पडतोय का?
14 Jun 2015 - 4:10 pm | टवाळ कार्टा
म्हांज्याकडे कार्बन १२+ आहे रे...गरिबांचा फोन
12 Jun 2015 - 7:10 am | मदनबाण
कट्टा झाला, फोटो ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Uncensored Trailer [Full Version] Nagrik Marathi Movie
बोला विठ्ठल ! :- नागरिक
12 Jun 2015 - 4:31 pm | मॅक
फोटो तरी टाका की राव.....
12 Jun 2015 - 5:18 pm | अत्रुप्त आत्मा
>>> बाळ टक्कू... तुला तुझ्या सदर कट्टा करण्यामधील गंभीर दोष सांगतो. तू "पुण्याला कट्टा करायचा आहे,तेंव्हा पुणेकरांनो ठिकाण सुचवा" अशी सरधोपट विचारणा केलीस. हे कट्टा आयोजन नव्हे. हे नुसते इच्छा प्रदर्शन झाले. कट्टा घडवून आणवण्यासाठी आपल्याला ज्या शहरात तो करायचा तेथील..एखाद्या नेहमीच्या किंवा आपल्याला योग्य वाटणार्या कट्टा आयोजकाला स्वतःहून वैयक्तिक संपर्क साधायला हवा. मग त्याच्या आपल्या मतानी जागा तारिख वेळ इत्यादी गोष्टी फायनल करुन्, कट्ट्याचा धागा काढायला पाहिजे... यातले तू काय केलेस. नुसता ढोबळ धागा काढलास. कट्टा व्हावा,असे तुला वाटत होते...मग त्याची नीट जबाबदारी घ्यायला नको का? हे म्हणजे स्वतःच्या लग्नासाठी एकदम पाच पन्नास वधुवर संशोधन मंडळांना, "मी लग्नेच्छू आहे, तस्मात मुली सुचवा" एव्हढाच निरोप धाडून... "एकही आला नाही स्थळ-घेऊन" असा कांगावा करण्यासारखा प्रकार आहे. रीतसर एखाद्या पुणेकर कट्टा आयोजकाला गाठलं असतस्,तर तो साडे(माडे)तीनशे वाला धागा (धागा..) अ'खंड विणलाची गेला नसता.
12 Jun 2015 - 5:33 pm | यशोधरा
"मी लग्नेच्छू आहे, तस्मात मुली सुचवा" एव्हढाच निरोप धाडून.. >> त्यासाठी पण धागा काढलेला की त्याने, हो क्की नै रे टका? =))
छाने वृ.
12 Jun 2015 - 10:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
नव्या स्पेसिफिकेशन्स ऐकल्या का त्याच्या? लिहि रे टक्या...मुलगी किमान ५ फुट २ इंच उंच असावी ई.ई.
13 Jun 2015 - 3:56 pm | यशोधरा
अजून एक नवा लेटेश्ट धागा काढ रे टका.
14 Jun 2015 - 4:15 pm | टवाळ कार्टा
बरं
सगा आणि मोदक या दोघांच्या संपर्कात होतो
वेगवेगळ्या मिपाकरांची सोयीची वेळ त्यांना न विचारात घेताच ठरवायची???
कट्टा आणि लग्ण यातला फरक सम्ज्तो हो :)
15 Jun 2015 - 12:22 pm | अत्रुप्त आत्मा
@ सगा आणि मोदक या दोघांच्या संपर्कात होतो>> मग दोघांनी काय केलं? लक्षच दिलं नाही. की नकार दिला? (सदर दोन्ही व्यक्ति स्वत:ला पुणेकर म्हणवितात काय?)
@ वेगवेगळ्या मिपाकरांची सोयीची वेळ त्यांना न विचारात घेताच ठरवायची???>> होय! तसेच करायचे असते,अति गोंधळाचि परिस्थिति झाल्यावर. नाहीतर आयुष्यभर कुठचाच कट्टा ठरणार नाही.
@ कट्टा आणि लग्ण यातला फरक सम्ज्तो हो :)>> नाही समज(ले)ला अजुन तुला! असो.
========
स्वत: चुका करुण आंम्हाला दिलेली दू्षणे , एक पुणेकर म्हणुन आम्मी आजाबात खपवून घ्येनार नाsssssय! :P lllllluuuuu :P
15 Jun 2015 - 12:34 pm | टवाळ कार्टा
याचे उत्तर तेच देतील...मी नै
खिक्क...यातच आले सगळे...म्हणजे पुणेकरांना जर्रा म्हणून दुसर्याचा विचार करून सर्वसमावेशक उपाय शोधता येत नै...नेहमी आपलेच घोडे दामटायचे...नाहीतर मेंढरांसारखे दुसरा जाईल त्याच्या मागे मागे जायचे? दोन्हीपैकी नक्की खरे ते काय? ल्ल्ल्लूऊऊऊउ
कट्टा ही सार्वजनीक बाब आहे व लग्न ही खाजगी....ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ
15 Jun 2015 - 1:53 pm | अत्रुप्त आत्मा
@ खिक्क...यातच आले सगळे...म्हणजे पुणेकरांना जर्रा म्हणून दुसर्याचा विचार करून सर्वसमावेशक उपाय शोधता येत नै...नेहमी आपलेच घोडे दामटायचे...नाहीतर मेंढरांसारखे दुसरा जाईल त्याच्या मागे मागे जायचे? दोन्हीपैकी नक्की खरे ते काय?>> खिक्क! :-D पुन्हा तोच कांगावा!
@ कट्टा ही सार्वजनीक बाब आहे व लग्न ही खाजगी....ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ>> नुसतच म्हायत्ये तुला हे! असो...
15 Jun 2015 - 2:23 pm | सतिश गावडे
आम्ही जन्माने पुणेकर नाही. मात्र सोयीनुसार जे स्वत:ला पुणेकर (पुणे३०) किंवा मुंबईकर (दादरमुंबई२८) किंवा कोकणवासी (हरिहरेश्वर) समजतात त्यांचे आम्हाला नेहमीच कौतुक वाटते.
15 Jun 2015 - 3:16 pm | टवाळ कार्टा
=))
15 Jun 2015 - 4:41 pm | अत्रुप्त आत्मा
@ आम्ही जन्माने पुणेकर नाही.>> मूळ प्रश्नाचं उत्तर "स्वत:" टाळलेलं चालतं,बरं का ह्यांना! :P
@मात्र सोयीनुसार जे स्वत:ला पुणेकर (पुणे३०) किंवा मुंबईकर (दादरमुंबई२८) किंवा कोकणवासी (हरिहरेश्वर) समजतात त्यांचे आम्हाला नेहमीच कौतुक वाटत>> नाही ते संदर्भ नको त्या जागी (नेहमी प्रमाणे-"आपले आपणच ठरवून टाकुन!") ओढुन ताणुन आणायचे,आणि काहीतरी दिव्य शोध लावाल्याच्या निरर्थक ( :-D ) आविर्भावात फिरायचं म्हटलं,की हे असलेच परती साद ( :P ) येणार! :-D
15 Jun 2015 - 5:04 pm | सूड
आपणांस मुद्दा कळलेला नाही!! =))
15 Jun 2015 - 5:16 pm | अत्रुप्त आत्मा
चालू द्या तुमचे निरर्थक आत्मरंजन!
15 Jun 2015 - 7:26 pm | सतिश गावडे
आम्ही पुणेकर असण्यावर तुम्हीच संशय घेतलात. आणि अंगावर शेकताच नेहमीची वापरुन वापरून गुळगुळीत झालेली "निरर्थकास्त्रे" काढलीत.
आपण निरुत्तर झालोय हे लपवण्यासाठी काहीतरी नवा शब्दप्रयोग शोधा बुवा आता.
16 Jun 2015 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा
अत्यंत अपेक्षित आत्ममनोरंजक प्रतिसाद!
धागाकर्ता तुम्हाला पुणेकर गृहीत धरतो,तसं तुम्ही स्वत:ला मानता काय? हेच विचारलं होतं. मानत असाल,तर उत्तर द्या..त्यानी तुम्हाला विचारलं असं जे म्हणतोय,त्या बद्दलचं! मानत नसाल तर तो माणुस चुकला ,म्हणुन मी पकड केलि असती.
पण एकदा का एखाद्यानी चेष्टेनी ,गांभिर्यानि विचारलं,तरी त्यात सदैव आपली टवाळिच उडवलेलि आहे,असं गृहितक पक्कं करून घेतलं,की समजावणाय्रानि डोकं फ़ोडलं स्वत:चं तरी काहीही उपयोग व्हायचा नाही.
13 Jun 2015 - 8:57 am | अजया
आणि दारु प्यायला आवडणारी हे विसरु नये =))
13 Jun 2015 - 9:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्या अतिभुतपुर्व कंपनीमधल्या काही ललना चालतील असा माझा अंदाज आहे.
14 Jun 2015 - 4:16 pm | टवाळ कार्टा
चालेल की ;)
15 Jun 2015 - 6:02 pm | काळा पहाड
कंपनीमधल्या काही अतिभुतपुर्व ललना?
15 Jun 2015 - 6:54 pm | खटपट्या
कंपनी अतीभूतपूर्व हो, ललना काय करायच्यात अतीभूतपूर्व ?
16 Jun 2015 - 6:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सुचवल्या असत्या पण त्यांची दारुची बिलं भरता भरता टक्या जेपीमार्गे गेला असता. =))
16 Jun 2015 - 10:30 am | टवाळ कार्टा
माझ्या एकाचे बिल भरणे त्यांना जड नै जाणार....तु पाठव काँटॅक्ट ;)
16 Jun 2015 - 11:55 am | काळा पहाड
सुचवा हो. "घी देखा लेकिन बडगा नही देखा" या म्हणीचा प्रत्यय त्याला असा ना तसा येणारच आहे लग्नानंतर.
16 Jun 2015 - 12:10 pm | टवाळ कार्टा
तो कोणाला चुकतो ;)
13 Jun 2015 - 10:33 am | पैसा
५० झाल्याबद्दल टवाळ कार्ट्याचा सत्कार सोडा आणि पुण्यातील वधुवर सूचक मंडळाचा पत्ता देऊन करण्यात येत आहे.
13 Jun 2015 - 10:40 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही ते काम अंगावर घेतलं होतं असं ऐकुन आहे. ख.खो. तुम्ही, टका आणि देव जा.
13 Jun 2015 - 12:11 pm | पैसा
पण पुणेकर त्याला इतके आवडतात म्हटल्यावर तिथे संशोधन करणे जास्त बरे.
13 Jun 2015 - 1:21 pm | अत्रुप्त आत्मा
खिक्क!
पण पुन्हा धागा काढताना केलि, तीच चुक करेल. कारण अजुनही मी दाखाविलेल्या दोष दर्शनाकडे बाळ टक्कु नि पाहिलंहि नाहिये! ;-)
14 Jun 2015 - 4:16 pm | टवाळ कार्टा
http://www.misalpav.com/node/31612#comment-706753
वाचा हे
14 Jun 2015 - 4:17 pm | टवाळ कार्टा
मी सोडावाला नै...आणि आता पुण्यातला चोखंदळपणा बघितलै...कुठचेच काम द्यायला नक्को पुणेकरांकडे
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ
14 Jun 2015 - 3:51 pm | सानिकास्वप्निल
वृत्तांत आवडला.
पण खरचं कट्टा झाला का ? बरं मग फोटो कुठे आहेत?
15 Jun 2015 - 10:52 am | नाखु
मॉनीटर साफ करावा लागेल!
मी असे वाचले की ५० झाल्याबद्दल टवाळ कार्ट्याचा सत्कार, पुण्यातील वधुवर सूचक मंडळांतर्फे "सोडा" देऊन करण्यात येत आहे.
आला पावसाळा आरोग्य संभाळा
घोषवाक्यी नाखु
15 Jun 2015 - 10:56 am | पैसा
=)) तो आता पुणेकरांवर काहीच काम सोपवणार नैय्ये!
15 Jun 2015 - 12:06 pm | अत्रुप्त आत्मा
खिक्क!
15 Jun 2015 - 12:12 pm | टवाळ कार्टा
तर तर...नुस्ता घोळ घालत बसतात
आज्चा ठाणे कट्टा कस्सा झटक्यात प्लान झालाय...पुणेकरांना बसूंदेत चोखंदळपणा करत lllllluuuuuulllluuuuu
15 Jun 2015 - 3:14 pm | मृत्युन्जय
आम्ही चोखंदळ तर आहोतच शिवाय आमचे प्लॅन्सही नेमके असतात पण तुम्ही पुण्यात येउन कट्टे ठरवताना पुणेकरांनाच विचारात न घेतल्याने सगळा गोंधळ झाला. शेवटी ७ च्या कट्ट्याचे आयोजन पुणेकरांनी नीट केल्यामुळे कसे बरोबर झाले बघा. आधीपासुन सांगत होतो ६ चा कट्टा ग्रीनपार्क ला करा, आधी हजेरी घ्या म्हणजे कोण कोण येइल ते कळेल म्हणजे नीट्ट प्लॅन करता येइल हे देखील सांगितले होते. ते ही झाले नाही. त्यामुळे सगळा गोंधळ,. शेवटी तर आयोजकांना कोण कोण येणार हे ही माहिती नव्हते हे कळाले ;) कृपया ह.घ. :)
15 Jun 2015 - 4:35 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
तेच तर!
स्वत: बेजवाबदारपणा करायचा आणि दुसय्राच्या नावानी बोंब मारायची!
16 Jun 2015 - 10:35 am | टवाळ कार्टा
खिक्क...बघितले तुम्चे नेमके प्लान =))
३ धागे काढले (उसवले) गेलेले...आणखी काय करणे अपेक्षित आहे?
बरं...ग्रीनपार्क सोयीचे पडेल याला किती जणांनी सहमती दर्शवलेली???
हजेरी घेण्यासाठी आपण स्वतः "बाबारे तू येणार का कट्ट्याला?" असे विचारत फिरायचे असते की ज्यांना यायचे असते त्यांनी स्वतः धाग्यावर "मी येणार" असे जाहिर करायचे अस्ते?
हम दिल पे लेत्ताईच नै...शिद्दा फाटेपे मारताय lllllluuuuuuullllllluuuuuuu
16 Jun 2015 - 10:39 am | मृत्युन्जय
उल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु