मुंबई एटीस प्रमुख हेमंत करकरे याम्च्या संदर्भात इंडीयन एक्सप्रेस.कॉम वर भाप्रवे ८:५९ रात्र, खालील बातमी प्रसिद्ध झाली. त्यातील संबंधीत उतारा येथे देत आहे. उरलेली बातमी साध्वी प्रज्ञा संदर्भात होती:
Posted: Nov 25, 2008 at 2059 hrs IST
Print Email Feedback Discuss
Sadhvi Pragya Singh Thakur has alleged that Anti-Terrorism Squad has tortured her in the custody.
New Delhi : The Pune cyber cell officer on Tuesday received a call from an unknown caller who issued death threat to Mumbai's Anti-Terrorism Squad (ATS) chief Hemant Karkare, TV channels reported.
सदानंद दाते.
Mr. Date is an officer of Indian Police Service and deputy inspector general of police in the Central Bureau of Investigation (CBI).
आत्ताच बघितलेल्या बातमिमधुन समजले.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
ते शूर होते याबाबत शंकाच नाही. त्या सर्वांना आदरांजली. पण जाताजाता हे लक्षांत आणून द्यावेसे वाटते की साध्वी प्रकरणांत याच करकर्यांविरुध्द टाहो फोडणारे आता त्यांना श्रध्दांजली वहात आहेत. हा ढोंगीपणा नाही का ?
यात काहितरी प्रीप्लॅन्ड किंवा काळबेर नक्कीच असावं. कारण मुळात पोलिसातल्या इतक्या वरिष्ठ पदाची तीन अधिकारी मंडळी अशी तडकाफडकी मरतात हीच गोष्ट पचण्यासारखी नाही..!
ही म.टा. तील बातमी वाचा. तीच सकाळमधे पण आली आहे.... एकदा सांगितले गेले की मानेत गोळी मारली (कारण त्यांनी चिलखत आणि हेल्मेट घातलेले होते), आता म्हणतात की, "दोघा अतिरेक्यांनी एके-४७ मधून अंदाधुंद गोळीबार केला. यात करकरे , कामटे व साळसकर यांच्याबरोबरच माझ्या बाजूला बसलेले दोन पोलिस शिपाई जागीच ठार झाले."
शिवाय इतके मोठे अधिकारी हे कधीच एकत्र जाता कामा नयेत हे रणनितीचे सूत्र असते. त्यातपण करकरे तर "कमांड सेंटर" मधे हवेत. जर तरी ते गेले असतील तर त्यांची चूक आहे, पण "बाय बूक" जाणारा कर्तबगार अधिकारी अशी चूक सहजासहजी करेल का हा प्रश्न पडतोच.
प्रतिक्रिया
27 Nov 2008 - 4:33 am | विकास

27 Nov 2008 - 7:12 am | स्नेहश्री
सदानंद दाते.
Mr. Date is an officer of Indian Police Service and deputy inspector general of police in the Central Bureau of Investigation (CBI).
आत्ताच बघितलेल्या बातमिमधुन समजले.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
29 Nov 2008 - 3:41 am | विकास
के ई एमच्या डॉक्टरांनी आज दात्यांना "आउट ऑफ डेंजर" म्हणून घोषीत केले!
इन्स्पेक्टर दात्यांना आणि तसेच पोलीस/सैन्यदलाला अशाच सुदैवी घटना ऐकायला मिळोत ही मनःपुर्वक शुभेच्छा!
तुम जीयो हजारो साल!
27 Nov 2008 - 7:40 am | आजानुकर्ण
दहा पोलीस कर्मचारी या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्याचे वाचले.
या प्रसंगाला तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वर सर्व ती शक्ती देवो.
27 Nov 2008 - 8:25 am | विसोबा खेचर
शहीद हेमंत करकरे
शहीद विजय साळसकर
शहीद शशांक शिंदे
शहीद अशोक कांन्ते
माझाही सलाम..!
तात्या.
27 Nov 2008 - 8:57 am | पांथस्थ
त्रिवार सलाम!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
27 Nov 2008 - 8:57 am | पांथस्थ
त्रिवार सलाम!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
27 Nov 2008 - 11:16 am | जैनाचं कार्ट (not verified)
सलाम !!!!!!!
जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...
आपले संकेतस्थळ
27 Nov 2008 - 11:40 am | मैत्र
जिवाची पर्वा न करता लढणार्या आणि देशासाठी शहीद झालेल्या सर्व पोलीस व कमांडोज ना सलाम !
जय हिंद
27 Nov 2008 - 6:58 pm | अनामिका
अशोक कामते असे नाव आहे बहुदा,
"अनामिका"
29 Nov 2008 - 6:39 am | नेटकिडा
अशोक कामठे हे बरोबर नाव आहे.
27 Nov 2008 - 3:24 pm | निखिलराव
दुर्देवाने आता शहीद झालेल्याचा आकडा २० झालाय.
28 Nov 2008 - 8:24 pm | हेरंब
ते शूर होते याबाबत शंकाच नाही. त्या सर्वांना आदरांजली. पण जाताजाता हे लक्षांत आणून द्यावेसे वाटते की साध्वी प्रकरणांत याच करकर्यांविरुध्द टाहो फोडणारे आता त्यांना श्रध्दांजली वहात आहेत. हा ढोंगीपणा नाही का ?
(कायमच ढोंगबाजीच्या विरोधात आवाज उठवणारा) हेरंब
29 Nov 2008 - 9:15 am | विसोबा खेचर
यात काहितरी प्रीप्लॅन्ड किंवा काळबेर नक्कीच असावं. कारण मुळात पोलिसातल्या इतक्या वरिष्ठ पदाची तीन अधिकारी मंडळी अशी तडकाफडकी मरतात हीच गोष्ट पचण्यासारखी नाही..!
असो..
तात्या.
29 Nov 2008 - 9:36 am | विकास
ही म.टा. तील बातमी वाचा. तीच सकाळमधे पण आली आहे.... एकदा सांगितले गेले की मानेत गोळी मारली (कारण त्यांनी चिलखत आणि हेल्मेट घातलेले होते), आता म्हणतात की, "दोघा अतिरेक्यांनी एके-४७ मधून अंदाधुंद गोळीबार केला. यात करकरे , कामटे व साळसकर यांच्याबरोबरच माझ्या बाजूला बसलेले दोन पोलिस शिपाई जागीच ठार झाले."
शिवाय इतके मोठे अधिकारी हे कधीच एकत्र जाता कामा नयेत हे रणनितीचे सूत्र असते. त्यातपण करकरे तर "कमांड सेंटर" मधे हवेत. जर तरी ते गेले असतील तर त्यांची चूक आहे, पण "बाय बूक" जाणारा कर्तबगार अधिकारी अशी चूक सहजासहजी करेल का हा प्रश्न पडतोच.
29 Nov 2008 - 11:18 am | विसोबा खेचर
जर तरी ते गेले असतील तर त्यांची चूक आहे, पण "बाय बूक" जाणारा कर्तबगार अधिकारी अशी चूक सहजासहजी करेल का हा प्रश्न पडतोच.
करेक्ट..! करकरेंच्या मृत्युबदल संदिग्धता वाटते आहे!
तात्या.
29 Nov 2008 - 11:17 am | विकास
या पोलीसांनी पण या युद्धात आपले बलीदान केले आहे. त्यांनापण भावपूर्ण श्रद्धांजली:
अरुण चित्ते, प्रकाश मोरे, बापूराव दुर्गुडे, विजय खांडेकर, नानासाहेब भोसले, तुकाराम ओंबळे, योगेश पाटील, जयवंत पाटील, अंबादास पवार, एम.सी. चौधरी