१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील.
२०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली.
औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे.
आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे
भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे.
२०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले.
वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली.
थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली.
ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे.
मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे.
थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे.
जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे.
प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे.
५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता.
त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती.
मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला.
काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला.
येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले.
अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती.
मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे.
गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे.
मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता.
जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत.
ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला.
मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye".
याच लेखात पुढील वाक्ये आहेत.
Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing.
चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत.
२ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे.
२००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे.
"संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे.
मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे.
कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे.
देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे.
"भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल.
महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय.
दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित.
सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल.
नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते.
नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते.
मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल.
एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे.
राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते.
काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती.
मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे.
एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे.
"सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही.
लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित.
महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत.
एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे.
विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण.
_________________________________________________________________________________
मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे.
मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते.
_________________________________________________________________________________
एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण.
_________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की!
_________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो.
वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन.
जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल.
Now shoot
_________________________________________________________________________________
प्रतिक्रिया
2 Jun 2015 - 2:53 pm | श्रीगुरुजी
अभिनंदन केजरीवालांचे करा. आता त्यांना पुढचा महिनाभर नवीन विषय मिळेल. मी एका दुसर्या प्रतिसादात केजरीवालांनी साडेतीन महिन्यात कोणकोणती 'महत्त्वाची' कामे केली त्याची यादी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या केजरीवालांना भांडाभांडी आणि आकांडतांडव करायला विषय शिल्लक नाही. हा नवीन विषय त्यांना महिनाभर तरी पुरेल.
1 Jun 2015 - 9:15 pm | श्रीगुरुजी
>>> Modi sarkar fails Kargil martyr: NDA WON'T take Captain Saurabh Kalia's case to international court... despite evidence he was tortured by Pakistan
तुम्ही प्रतिसाद देऊन मोदी सरकारला नावे ठेवण्यात जरा घाईच केलीत. परंतु खालील बातमी वाचून तुमची निराशा होणार आहे.
http://indianexpress.com/article/india/india-others/india-to-approach-in...
या बातमीनुसार भारत सरकार सौरभ कालिया प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायचा विचार करीत आहे.
यापूर्वी २६ सप्टेंबर २०१३ रोजी भारत सरकारने, सौरभ कालिया प्रकरणात आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात का जाऊ शकत नाही, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खालील नमूद केले होते.
India cannot invoke the compulsory jurisdiction of the ICJ in relation to disputes concerning armed conflicts, hostilities etc with Pakistan as they were commonwealth countries.
Now, The government will be requesting the Supreme Court to pronounce on the legality of its stand that India cannot invoke the compulsory jurisdiction of the ICJ in relation to disputes concerning armed conflicts, hostilities etc with Pakistan as they were commonwealth countries.
However, taking into account the “exceptional circumstances” of the case, it will ask whether it could move ICJ.
“This position, which was stated in the affidavit filed by the Government on 26 September, 2013, has now been reviewed. The government will be requesting the Supreme Court to pronounce on the legality of the stand, taking into account the exceptional circumstances.
“Subject to above, Government would be open to invoking the jurisdiction of the International Court of Justice,” the Spokesperson said.
Meanwhile, External Affairs Minister Sushma Swaraj in Udaipur, said the government discussed and reviewed the position held by it and previous governments on the issue. “It has been decided that the way Capt Kalia was tortured created ‘exceptional circumstances’ and therefore, the government will change its affidavit in the Supreme Court and ask whether under legal provisions they could move ICJ. If the Court gives a nod, then we will take the issue to ICJ.”
आता केजरीवालांना स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी काहीतरी दुसरे कारण शोधावे लागणार.
1 Jun 2015 - 6:21 pm | नांदेडीअन
भूसंपदान विधेयकासाठी काल तिसऱ्यांदा अध्यादेश काढण्यात आला.
भूसंपदान विधेयकाच्या समर्थनार्थ काही लोक प्रतिवाद करतात की भूसंपदान विधेयकामुळेच भारतातले अनेक प्रोजेक्ट अडकून पडले आहेत.
त्यांच्या मते, जर आपल्याला विकास हवा असेल, तर या विधेयकाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपण त्याला सपोर्ट करायलाच पाहिजे.
दुसरीकडे माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल स्वतः केंद्रीय वित्त मंत्रालयाने सांगितले आहे की देशातले फक्त ८% प्रोजेक्ट भूसंपदानतल्या अडचणींमुळे अडकून पडले आहेत.
http://www.thestatesman.com/news/business/only-8-projects-stalled-due-to...
अशा वेळी केंद्र सरकारला इतकी घाई कशाची लागली आहे कळायला मार्ग नाही.
1 Jun 2015 - 6:28 pm | मृत्युन्जय
किती टक्के प्रोजेक्ट्स अडकुन पडले असतील तर भूसंपादन विधेयक पास व्हायला हवे?
1 Jun 2015 - 8:42 pm | श्रीगुरुजी
नुसती टक्केवारी उपयोगाची नाही. अडकून पडलेल्या प्रोजेक्ट्सचा साईझ सुद्धा महत्त्वाचा आहे.
4 Sep 2015 - 1:05 pm | कैलासवासी सोन्याबापु
गुरूजी, माफ़ करा पण आपल्या लेखात सुद्धा आकडेवारीच आहे की बरीच शिवाय मार्क दिले म्हणजे ती सुद्धा आकडेवारी झालीच की हो
ती पण महत्वाची नाही का म्हणे मी?
1 Jun 2015 - 6:37 pm | श्रीरंग_जोशी
एकच (प्रकारचा) अध्यादेश किती वेळा काढता येतो यावर घटनेत काही तरतुद आहे का?
नसल्यास भविष्यात ती व्हायला हवी. यासाठी भविष्यात घटनादुरुस्ती झाल्यास त्यासाठी सध्याच्या केंद्र सरकारचे आत्ताच आभार.
1 Jun 2015 - 9:00 pm | पिंपातला उंदीर
कसली घाई आहे हे इथे कळेल
http://indianexpress.com/article/business/business-others/indian-billion...
4 Jun 2015 - 1:06 am | अन्नू
ये रे-ये रे पाSवसा,
तुला देतो पैSसा...
4 Jun 2015 - 8:19 pm | श्रीगुरुजी
भारतात पाऊस केव्हा आणि किती प्रमाणात पाडायचा यावर मोदींचे नियंत्रण आहे असं या ट्विटवरून दिसतंय.
4 Jun 2015 - 10:49 pm | काळा पहाड
नाही तसं नाही, हिच्या नवर्यासारखीच ही बाई पण सायको आहे एवढं यावरून सिद्ध होतंय.
4 Jun 2015 - 11:09 pm | विनोद१८
..यांच्याकडुन यापेक्षा वेगळ्या कोणत्या पत्रकारितेची आपल्याला अपेक्षा आहे ?? लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत त्यांना बसलेल्या अनपेक्षित जोरदार धक्क्यातून ते अजुन सावरलेले दिसत नाहीत, म्हणुन असली मुक्ताफळे ते प्रसवतात. या असल्या वांझोट्या बातम्यांचा जनमानसावर काहीही परिणाम होणार नाही. हा लोकांचे लक्ष वेधुन घेण्याचा क्षुद्र प्रकार आहे त्याकडे लक्ष देउन त्याचे महत्व न वाढ्वलेलेच बरे.
6 Jun 2015 - 12:16 pm | मृत्युन्जय
या बाईची मानसिक स्थिती खालावली आहे का? उद्या हिच्या नवर्याने हिला मारले तरी ही मोदींकडे बोट दाखवले. गेट वेल सून सागरिका.
6 Jun 2015 - 12:24 pm | नांदेडीअन
कॉंग्रेसने त्यांच्या खासदारांच्या ‘फाइव्ह स्टार’ सुविधांवर १० वर्षांमध्ये १९ करोड रूपये खर्च केले होते.
भाजपाने त्यांच्या खासदारांच्या ‘फाइव्ह स्टार’ सुविधांवर एकाच वर्षात २५ करोड रूपये खर्च केले आहेत.
कोण म्हणतंय विकास होत नाही ?
एकाच वर्षात कॉंग्रेसचा रेकॉर्ड मोडून टाकला.
अजून काय पाहिजे ?
http://www.bangaloremirror.com/news/india/UPA-MPs-hotel-bill-in-a-decade...
6 Jun 2015 - 7:08 pm | श्रीगुरुजी
दिलेल्या लिंकमधून . . .
The present Lok Sabha has 330 first-time MPs who did not have accommodation in Delhi. This is the first time in many years that the Lok Sabha is filled with so many debutants, so it is obvious the bill would be higher.
But not all 330 first-timers stayed in five-star hotels. According to sources in the Urban Development Ministry, only 141 MPs were accommodated in Ashoka Hotel. "The bill is so huge because many of them stayed on for nearly a year in the hotel accommodation as they waited for their houses in Delhi.
काँग्रेसचा इतिहास . . .
Priyanka Gandhi is the occupant of a Government bungalow — 35, Lodhi Estate, New Delhi-110003. It is also the official address of Robert Vadra in his legal documents. As per the official website of Directorate of Estates, Ministry of Urban Development, this type-6B accommodation was allotted to Priyanka Gandhi on February 21, 1997. The registration number is 99907375 and the allotment ID is 243820. But in what capacity has she been occupying the bungalow? Her neighbours are either Members of Parliament or even Ministers of State (MoS). Their allotments are co-terminus with the dissolution of 15th Lok Sabha or retirement from Rajya Sabha. But Priyanka’s allotment status is permanent with an expiry date.
She is neither an MP nor a MoS. She is not a bureaucrat/employee of the state. Curiously her designation is shown as ‘Leader’. But she is not known for holding any post in the Congress either. She loves Rae Bareli and Amethi so much that she campaigns only in those constituencies. But she does not love them so much as to be a permanent residentthere.
It is thus not clear in what capacity Priyanka was allotted to this bungalow. Her motherSonia Gandhi and brother Rahul Gandhi, both MPs, have separate bungalows. Sonia’s bungalow at 10, Janpath was allotted to her in her capacity as President of Indian National Congress.
Former Prime Ministers are allotted a Lutyens bungalow during their lifetimes. Under exceptional circumstances that privilege might extend to their widows. But it cannot be extended to their married daughters also. It appears that Priyanka Gandhi Vadra moved into this bungalow in 1997 after her marriage to Robert Vadra. A rediff.com story by Promila Kalhan (February 19, 1997) tells that couple had been allotted the 35, Lodhi Estate bungalow. The CPWD was still busy in readying it for handing over the possession. It also informs that the Vadra family resided at New Friends Colony, a plush locality insouth Delhi.
Priyanka could have stayed with her in-laws in New Friends Colony house as per Indian tradition. The Government could have only provided her the security cover. A bride generally stays either with her in-laws or separately with her husband. Vadra is now a billionaire (by honest means, says Priyanka) and he can certainly afford that second option. Under exceptional circumstances, a husband can come to live in a bride’s family house. Such a husband is called ghar-jamai in India. But here you have ghar-jamai of the Indian state! The HD Devegowda Government allotted them the bungalow on the occasion of their marriage. A billionaire Vadra is being subsidised by tax-payers’ money to stay in a Government bungalow. It might be for a nominal rent, or just a petty license fee.
Rajiv Gandhi’s death was tragic. Compassion for his family once made sense. But it cannot extend for an indefinite period to his daughter who is also married to a billionaire. This is no place for a family drama! The Government cannot resemble a never-ending soap opera on Star Plus or Sony.
________________________________________________________________________________
आआप आणि केजरीवालांचा इतिहास
डिसेंबर २०१३ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर केजरीवालांनी सुरवातीला स्वतःला ५ खोल्यांच्या २ सरकारी सदनिका बहाल केल्या होत्या. फेब्रु २०१४ मध्ये राजीनामा दिल्यानंतर सुद्धा कित्येक महिने ते सरकारी निवासस्थानात तळ ठोकून होते.
आता परत मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी स्वतःला ७ खोल्या असलेला सरकारी बंगला बहाल केला आहे.
http://www.abplive.in/india/2015/02/28/article513909.ece/Arvind-kejriwal...
http://www.abplive.in/india/2015/02/28/article513909.ece/Arvind-kejriwal...
6 Jun 2015 - 7:25 pm | श्रीगुरुजी
पुढील भाग . . .
He had been widely criticised for accepting a government flat at Tilak Marg during his first 49-day stint as Delhi Chief Minister. During 2013 Assembly election campaign, Kejriwal had promised he would not accept a government accommodation.
During 2015 Delhi Assembly elections, Kejriwal steered clear of making such promises, focusing his campaign strictly on civic issues.
काँग्रेसचा इतिहास . . .
A DNA investigation, with extensive use of the Right to Information (RTI) Act, shows that the Central Public Works Department (CPWD) spent more than half a crore (Rs 55.57 lakh in 2006-07) on the civil works in just one residence: the 7 Race Course Road abode of prime minister Manmohan Singh.
Between 2004-05 and 2006-07, the department spent more than Rs 1.5 crore on civil works alone. During the same period, former prime minister Atal Behari Vajpayee’s residence saw a spend of nearly Rs45 lakh on civil works .
The residences of the Gandhi family — Sonia, Rahul and Priyanka — saw a spend of nearly Rs47 lakh collectively during these three years.
While Sonia Gandhi lives at 10 Janpath, Rahul Gandhi is housed at 12 Tughlak Lane, and Priyanka Gandhi at 35 Lodhi Estate.
The CPWD declined to part with complete details of the expenditure, especially on electrical fittings and maintenance.
One of the many departments that does electrical work initially responded saying there was “nil” expenditure, only to swallow its words.
It has been dragging its feet on detailed answers. DNA has filed an appeal under the RTI Act against the stonewalling by the electrical wings.
The CPWD, however, provided detailed replies on the money spent on civil and horticulture work in Lutyens’ Delhi, showing it to be probably the most expensive piece of urban living anywhere in the country.
Though the department did not give overall details of the total cost of maintaining the country’s VIPs in that secluded zone, DNA learns from reliable sources that it spends more than Rs 330 crore in the area for maintaining these bungalows and flats.
The prime minister’s Race Course residence, a complex of at least two bungalows and other buildings spread over several acres, has been witnessing a significant escalation in its maintenance costs during the past five years.
When Manmohan Singh and his wife moved in after the last general elections, the CPWD spent over Rs 47 lakh - actually Rs 18.14 lakh more than the previous year, just for civil engineering works. The Vajpayee family had just moved out.
Strangely, the huge jump in civil expenditure on the PM’s residence wasn’t a one-time affair. The next year, 2005-06, the CPWD spent another Rs 49 lakh, and in 2006-07 it went up further to Rs 55.57 lakh.
There seems to be a spike in civil works after any general election, even if the occupant is the same. Sonia Gandhi’s 10, Janpath, bungalow saw expenses going up from Rs 2.98 lakh in 2003-04 to Rs 8.5 lakh in 2004-05. And between the three Gandhis (Sonia, Rahul and Priyanka), the costs jumped more than twice between 2003-04 and 2004-05 - Rs 8.69 lakh to Rs 19.60 lakh.
Soon after Rahul Gandhi was elected MP, the CPWD spent nearly Rs 5.60 lakh on his newly allotted house, which was more than double what the CPWD spent on 12, Tughlak Lane in 2003-04 (Rs 2.52 lakh). At Priyanka Gandhi’s residence, the civil expenditure jumped from Rs 3.18 lakh to Rs 5.50 lakh in the days after the elections.
To this one should add the gardening expenses at Sonia Gandhi’s residence, which, according to the CPWD, worked out to Rs 2.80 lakh for 2006-07. This is more than double the average spending by the CPWD on maintenance of gardens, and kitchen gardens, in the Lutyens Bungalow Zone residences of VIPs, bureaucrats, judges and their ilk - which comes out to Rs 1.08 lakh a year. These expenditures do not, however, include hidden costs.
The CPWD pays an average of Rs 1.5 lakh per annum to a gardener as his salary. At several VIP residences, there is a brigade of gardeners doing the job.
Atal Behari Vajpayee, who demitted office in 2004 and is in semi-retirement, has a sprawling, ageing bungalow and gardens to maintain. So the government spends nearly Rs 16 lakh on civil works alone at his KM Lane residence.
The high cost of security
It’s not only the bungalows and gardens that cost the taxpayer a pretty penny. Expenses on the Special Protection Group (SPG) protecting prime minister Manmohan Singh and other select VIPs, including UPA chairperson Sonia Gandhi, totalled Rs 154.32 crore against the target of Rs 132.41 crore in 2006-07.
The SPG protects the prime minister and his/her immediate family members. The force was raised in 1985 in response to the assassination of Indira Gandhi. The SPG has about 3,000 personnel and includes recruits from the police and commandos of the National Security Guards.
The Delhi Police is another agency whose hands are full with VIP protection. The law enforcement agency has a separate security unit which is entrusted with the task of providing outer security cover to the president, prime minister, vice-president, home minister and all other ministers, leader of the opposition, judges and other protectees.
The security wing is currently providing security to 439 protectees and other dignitaries visiting Delhi. In all, 3,030 visits of protected persons were covered by the unit in 2007.
According to some estimates, nearly 5,000 personnel of the security wing are involved in providing security to the prime minister and other VIPs alone. Besides this, the unit has another 1,000 personnel who are dedicated to the president of India’s security.
राहुलला दिल्लीत एकापेक्षा जास्त सरकारी बंगले दिले आहेत.
http://rohit-ghosh.blogspot.in/2012/11/the-gandhis-and-bungalows-of-luty...
---------------------------------------------------------------------
सारांश -
(१) हॉटेलात राहण्याच्या खर्चापेक्षा सरकारी निवासस्थानांच्या देखभालीचा खर्च खूप जास्त आहे.
(२) गांधी घराण्याला अनेक सरकारी बंगले दिले गेले आहेत. कोणत्याही सरकारी पदावर नसताना, सरकारी नोकरीत नसताना, लोकप्रतिनिधी नसताना वड्रा कुटुंबियांना सरकारी निवासस्थान दिले गेले आहे. अनेक पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी आपले सरकारी निवासस्थान अजूनही न सोडल्याने नव्याने निवडून आलेल्या खासदारांना हॉटेलमध्ये ठेवावे लागत आहे.
(३) जनकल्याणासाठी २१ व्या शतकात भारतात अवतार धारण केलेल्या अवतारी महापुरूष यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने विसरून स्वतःला ७ खोल्यांचा सरकारी बंगला बहाल केला आहे.
(४) केजरीवाल भक्तांना भाजपच्या डोळ्यातले कुसळ दिसते परंतु काँग्रेसच्या व आआपच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.
8 Jun 2015 - 12:27 pm | मृत्युन्जय
भाजपच्या डोळ्यातले कुसळ दिसते
"नसलेले" कुसळ दिसते अशी एक छोटीशी दुरुस्ती सुचवु इच्छितो.
8 Jun 2015 - 12:51 pm | काळा पहाड
केजरीवालांचा एन डी टी व्ही वरचा इंटरव्ह्यू पाहिला का कोणी? अरेरे काय ती भाषा.. हा माणूस आता जास्तच इरिटेटींग वाटायला लागला आहे.
8 Jun 2015 - 12:53 pm | मृत्युन्जय
नाही हो. काय बोलले युगपुरुष?
8 Jun 2015 - 2:10 pm | श्रीगुरुजी
केजरीवालांच्या कार्यपद्धतीवर हा एक लेख -
http://www.loksatta.com/sampadkiya-news/kejriwal-vs-jung-1111216/
9 Jun 2015 - 9:05 pm | श्रीगुरुजी
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Bold-operation-by-Indian-A...
भारतीय लष्कराने पहिल्यांदाच देशाची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून म्यानमारच्या सीमेत प्रवेश करून भारताविरुद्ध कट रचणा-या दहशतवाद्यांच्या खातमा केला आहे. भारतीय लष्कराचे अशाप्रकारचे हे पहिलेच क्रॉस बॉर्डर ऑपरेशन ठरले आहे. मागील आठवड्यात मणिपूरमधील चांदेलमध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ही कारवाई केली आहे. या मोहिमेमध्ये म्यानमारच्या लष्कराने भारतीय लष्कराला मदत केली.
9 Jun 2015 - 9:13 pm | श्रीरंग_जोशी
चांगली गोष्ट आहे पण भारतीय लष्कराने असे प्रथमच केले असे म्हणू नये.
२००१ सालच्या पाकिस्तान सोबतच्या नियंत्रणरेषेपलिकडे (आंतरराष्ट्रीय सीमा नाहीये पण सीमेपेक्षा काही कमी नाही) जाऊन यशस्वी ऑपरेशन पार पाडले होते.
त्यासंबंधी इथे चर्चा झाली होती.
यासारखी प्रसिद्ध न झालेली अधिक ऑपरेशन्स असू शकतात.
9 Jun 2015 - 9:18 pm | श्रीगुरुजी
वरील बातमीत "पहिल्यांदाच" असा शब्द आहे.
9 Jun 2015 - 9:21 pm | श्रीरंग_जोशी
बरं बरं.
मी बातमीचा दुवा दिला असता. तर "पहिल्यांदाच" अशा उल्लेखावर आवर्जून असहमती नोंदवली असती.
10 Jun 2015 - 10:24 am | पिंपातला उंदीर
यापुर्वी पण अशा अनेक कारवाया झाल्या आहेत. डिटेल्स इथे वाचायला मिळतील
http://indianexpress.com/article/india/india-others/army-crossed-border-...
13 Jun 2015 - 4:49 pm | नांदेडीअन
अवघ्या पाच महिन्यात राज्यात 1088 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं
http://abpmajha.abplive.in/mumbai/2015/06/12/article616601.ece/1088-farm...
13 Jun 2015 - 8:47 pm | श्रीगुरुजी
किती दुष्ट आहेत ना मोदी! पावसाळ्यात पाऊस पाडायचा सोडून फेब्रुवारी-मार्च मध्ये अवकाळी पाऊस पाडतात आणि पिकांचं नुकसान करतात. लहर आली की गारपीट करून सगळी पिके नष्ट करून टाकतात. शेतकर्यांना पैसे देतात पण बँकेचे व्यवहार शिकवत नाहीत. गजेंद्रसिंहला सुद्धा त्यांनीच आत्महत्या करायला लावली होती. अगदी दुष्ट आहेत मोदी!
14 Jun 2015 - 9:22 am | नांदेडीअन
हे असे लॉजिक-सुपरलॉजिक कॉंग्रेसच्या वेळी कुठे जायचे माहित नाही.
13 Jun 2015 - 9:17 pm | पिंपातला उंदीर
आत्महत्येच माहित नाही पण दंगे आणि बनावट चकमकीमध्ये शेकड्याने लोक मारली असे काही खोडसाळ लोक बोलतात बुवा
13 Jun 2015 - 10:50 pm | विनोद१८
आहे का काही ठोस पुरावा तुमच्याकडे असेल तर जाऊ शकता की कोर्टात कोणी अडवलय ?? खोडसाळ लोकांच्या खांद्यावर दंबूक ठेवून फुसके बार उडवू नका. ते आजचे आपले 'पंतप्रधान' आहेत एखाद्या महानगरपालिकेतले 'नगसेवक' नाहीत हे विसरु नका. तेव्हा सांभाळुन बार उडवा.
1 Jul 2015 - 6:03 pm | कर्ण-२
पुरावे असूनही काही फायदा आहे का. सलमान खान आणखीही बाहेरच आहे. शहा सुद्धा सुटलाच कि. आणि तसेही कोर्टात लाखो केस पडून आहेत. ह्याला वरचीच कोर्ट लागेल.
26 Jun 2015 - 6:40 pm | नांदेडीअन
वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, पंकजा मुंडे, स्मृती इराणी, राज पुरोहित, यशवंत सिन्हा, संजय जोशी, राम माधव यांच्या समर्थनात किंवा विरोधात भक्तांनी काय काय सुपरलॉजिक दिले आहेत, हे वाचण्यासाठी मोठ्या आशेने इथे आलो होतो.
भ्रमनिरास झाला. :(
26 Jun 2015 - 10:47 pm | श्रीगुरुजी
ह्या धाग्याचे आयुष्य संपले आहे असे वाटले होते. पण अजून थोडी धुगधुगी शिल्लक दिसत आहे.
निराश व्हायचे कारण नाही. केजरीवालांनी तुमचा कितीही भ्रमनिरास केला असला तरी आम्ही तुमचा अजिबात भ्रमनिरास करणार नाही.
वरील यादीपैकी सुषमा स्वराज, स्मृती इराणी, वसुंधरा राजे यांच्या बाबतीत इतर काही धाग्यांवर बरेच प्रतिसाद आहेत. ते वाचा.
यशवंत सिन्हा, राम माधव, संजय जोशी, राज पुरोहीत इ. बाबतीत प्रतिसाद देण्यासारखे काहीही नाही हे जसे समर्थकांच्या लक्षात आले आहे तसेच विरोधकांच्याही. म्हणूनच सर्वजण थंड आहेत.
पंकजा मुंडेंबद्दल आजच सकाळी एक धागा तयार झाला होता. तो नंतर गायब झालेला दिसतोय.
तुम्हाला इच्छा असल्यास वरील सर्वांबद्दल वेगळा/वेगळे धागा/धागे काढा.
1 Jul 2015 - 10:39 am | dadadarekar
इंटरनेट प्याक तीन जीबी ऐवजी त्याच्पैशात अडीच जीबी मिळणार
1 Jul 2015 - 2:43 pm | dadadarekar
मोदी सरकार्चा पराक्रम.
http://m.rediff.com/news/report/nehrus-grandfather-was-a-muslim-wiki-pag...
1 Jul 2015 - 8:46 pm | अर्धवटराव
सरकारी वैद्यकीय विभागाच्या फ्री सीट वाटप कार्यालयातुन हि विकीपीडीया भानगड करण्यात आलि आहे. मोदी सरकार यावर स्पष्टीकरण देणार काय? हेच का ते अच्छे दिन ??
1 Jul 2015 - 6:00 pm | कर्ण-२
आणखी एक पक्का अंधभक्त … मोदी हा पेड मेडिया ची देणगी आहे हे सांगण्याची गरज नाही, जे काही आकडे दाखवले आहे ते कागदावरच आहेत. महागाई कुठे कमी झाली आहे ते सांगा. रिक्षावाले/चहावाले बोंबलत होते पोस्टर लावून अच्छे दिन आणि चाय पे चर्चा म्हणून. एकीकडे tax मध्ये सुट द्यायची आणि दुसरीकडे सर्विस ट्याक्स च्या नावाने महागाई वाढवायची. ५००० वाचले पण १०,००० जात आहेत, हे अंध्भ्क्ताना समजतच नाही. जे काही जन्धन योजना आणि insurance आहे ते पैसा जमा करण्यासाठी आहे
1 Jul 2015 - 6:20 pm | शंतनु _०३१
निष्कर्षा पर्यंत यायला आणखीन वेळ द्यायला हवा, सध्याची परिस्थिती " ठिक " आहे . पी हळद अन हो गोरी ही कसोटी येथे न वापरणेच उत्तम
2 Jul 2015 - 12:42 pm | dadadarekar
http://m.loksatta.com/desh-videsh-news/mlas-wants-to-be-increase-their-s...
3 Jul 2015 - 10:26 am | dadadarekar
इंग्लंडमध्ञे गुंतवणूक करण्याच्या मोबदल्यात इंग्लंड हे ललि मोदीला नागरिकत्व देणा आहे म्हणे .
इस्ट इंडिया कंपनी गाढव होती. दुसर्या देशात जा , युद्ध करा , राज्य करा , पैसा मिळवा .... किती ते श्रम.
त्यापेक्षा परक्या देशातील भ्रष्ट लोकाना तिथला काळा पैसाइंग्ल्लंडात गुंतवायला सांगून नागरिकत्व देणे हा किती सोपा उपाय आहे.
बायद वे , पाकिस्य्तानात ५५ कोटी घातले म्हणुन बापूजीना ठार मारले ते योग्यच आहे , असे गर्वाने मिरवणारा पक्ष भारतातील भ्रष्ट मनुष्य करोडो रुपये इंग्लंडात गुंतवणूक करुन देत असताना मुकाट्याने गप्प बसतो , शिवाय त्यालाच मदतही करतो, हे आश्चर्यजनक नाही का ?
कुठे नेऊन ठेवलाय नथुराम माझा ?
3 Jul 2015 - 10:41 am | कपिलमुनी
>>कुठे नेऊन ठेवलाय नथुराम माझा ?
लौकरच नानांप्रमाणे तुम्हीसुद्धा नथुराम आणि बापूंच्या भेटीला जाणार आहात :)
3 Jul 2015 - 11:04 am | चिनार
ह्या सगळ्या घडामोडी २००९ पासून सुरु आहेत. २००९ -२०१४ च्या दरम्यान कोणत्या पक्षाचे सरकार होते हे आपल्याला माहिती असेलच. तत्कालीन सरकार २०१४ पासून सत्तेत आहे.
अर्थात या एका वर्षात त्यांनी खालील सगळे काम करणं अपेक्षीत होते.
१. गंगा शुद्धीकरण
२. विदेशातील काळा पैसा वापस आणणे
३. अर्थव्यवस्था सुरळीत करणे (जी कोणामुळे बिघडली ह्यावर चर्चा नकोय)
४. भ्रष्टाचार निर्मुलन
५. स्त्री सुरक्षा
६. वैद्यकीय सुविधांमध्ये आमुलाग्र सुधारणा
७. जातीय सलोखा
७. शैक्षणिक धोरणामध्ये सुधारणा. देशात १०१ टक्के साक्षरता.
८. देशाचा वीज प्रश्न -पाणी प्रश्न सोडवणे (हे प्रश्न का निर्माण झाले ह्यावर चर्चा नकोय)
९. पाकिस्तान वर हल्ला करून काश्मीर प्रश्न सोडवणे
आणि असेच अजून कितीतरी छोटे मोठे कामं......
पण या सरकारने वरील एकाही काम पूर्ण केलं नाही. शिवाय ललित मोदीला भारतात आणू शकले नाही (मुळात २००९ साली तो पळून गेलाच कसा ह्यावर चर्चा नकोय)
तुझ्या गतजन्मात मी नेहमीच तुला पाठींबा दिला आहे. तुला आठवत असेलच. मी आजही म्हणतो ,राहुल गांधीला पंतप्रधान करा !!
3 Jul 2015 - 11:31 am | dadadarekar
त्याशिवाय का तो वरूण गांधी ललित मोदी प्रकरणात सोनियांना भेटणार होता ?
3 Jul 2015 - 11:46 am | चिनार
फक्त बेस्ट म्हणून राहुल भाऊ आणि सोनियाजींचा अपमान केल्याबद्दल जाहीर निषेध !!
साक्षात बृहस्पतीने ज्यांचे शिष्यत्व पत्करावे असे विद्वान, कर्तुत्ववान, धोरणी आहेत राहुल गांधी. आणि अश्या पुत्राला ज्या मातेने जन्म दिला तिच्याविषयी बोलायला शब्द नाहीयेत मराठी भाषेत.
कोण कुठला तो वरुण गांधी ? ललित मोदीला मदत करण्यासारख्या फालतू कामासाठी सोनिया- राहुल यांना भेटणार होता .. सोनियाजींच्या मनात आले तर बकिंगहम राजवाड्यात इंग्लंडच्या राणीच्या शेजारच्या खोलीत राहण्याची व्यवस्था करतील.
3 Jul 2015 - 12:23 pm | श्रीगुरुजी
+१
मोदी सरकार १ वर्षात पूर्ण अपयशी ठरले आहे ते दिसतेच आहे. मनमोहन सिंगांची शिकवणीही वाया गेली.
आता राहुल शिवाय तरणोपाय नाही.
राहुलको परदेशसे लाओ, देश बचाओ!
3 Jul 2015 - 9:39 pm | ट्रेड मार्क
जाहीर निषेध आणि मिपाच्या कट्ट्यावर धरणे धरले जाईल...
महामहीम श्री श्री केजारीवालांना संधी नाही?
14 Jul 2015 - 10:44 am | मृत्युन्जय
महामहीम श्री श्री केजारीवालांना संधी नाही?
ये तो सब काँग्रेस और भाजपा की मिलीभगत है जी. सब अंदर से एकदुसरे को मिले हुए है जी. ये तो सब आम आदमी को ठगने की कोशिश है जी. हम ऐसा कभी नही होने देंगे जी. हम इंडिया गेट पे धरना देंगे जी.
14 Jul 2015 - 2:05 pm | श्रीगुरुजी
आजचीच बातमी आहे.
आआप पक्षाला मिळालेल्या देणग्यातून जमा झालेले सगळे पैसे संपले म्हणे. आआपला अजून देणग्या द्या असे अवतारी महापुरूष केजरीवाल यांनी नागरिकांना आव्हान केले आहे. केजरीवालांचा उदोउदो करणार्या जाहिराती तर सरकारी खर्चातून सुरू आहेत. दिल्लीच्या अंदाजपत्रकात केजरीवालांचा उदोउदो करणार्या जाहिरातींसाठी ५१६ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. असो.
11 Jul 2015 - 7:41 pm | अभिजित - १
३ लाख कोटी रु वेगवेगळ्या उद्योजकांनी हडपले ( बँक NPA ). मोदी त्याच्यावर काही करू शकत नाहीत. गेली दहा वर्षे ऐकतो कि पुण्यातील तो कुप्रसिद्ध तबेलेवाला "हसन अली" ज्याची tax थकबाकी आता १ लाख कोटी रुपये ला पोचलीय. मस्त फिरतोय तो आणि रेस मध्ये घोडे खेळवतो आपले . मोदी साहेब त्याचे पण काहीच वाकडे करू शकले नाहीत. गुलछबु विजय मल्ल्याने ७००० कोटी रु उडवले. युनायटेड बँक ने पण आता हात टेकले त्याच्यापुढे. मोदी त्याचे पण काही वाकडे करू शकले नाहीत. परदेहातून काळा पैसा आणणे तर "चुनावी जुमला " होता असे अमित शहा ने कबूल करून टाकले.
सरकारला पैसा तर हवा. आणायचा कुठून ? घाल मध्यम वर्गीयांच्या खिशात हात. निवृत्त लोक बिचारे दर वर्षीच्या वाढत्या महागाई ला कसेबसे तोंड देत असतात. भागधारक बनून सहकारी बँक मध्ये पैसा ठेवतात. त्यांना जे काही व्याज मिळते त्याच्यावर यांचा आता डोळा. कायदा बदलला आणि भागधारकांचे लाभ काढून घेतले. जागतिकी करणा नंतर कितीतरी मराठी लोक परदेशात जाऊन नशीब काढू लागली. कष्टाचे फळ जरा कुठे मिळू लागले. तर आता त्यांना मिळणाऱ्या ४०१ के वर या लोकांची आता धाड पडली आहे. आणि यात काही कुचराई केली तर त्या IT professional ना सरळ १० लाख रु दंड आणि तुरुंगवास . वा !! छान मोदी सरकार. चांगले पांग फेडलेत. अमेरिका सरकार सोशल सिक्युरिटीचे पैसे खाते त्याच्यवर मोदी काही करू इच्छित नाहीत. पण ४०१ के वर मात्र tax .
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/government-...
11 Jul 2015 - 11:45 pm | श्रीगुरुजी
>>> तर आता त्यांना मिळणाऱ्या ४०१ के वर या लोकांची आता धाड पडली आहे. आणि यात काही कुचराई केली तर त्या IT professional ना सरळ १० लाख रु दंड आणि तुरुंगवास . वा !! छान मोदी सरकार. चांगले पांग फेडलेत. अमेरिका सरकार सोशल सिक्युरिटीचे पैसे खाते त्याच्यवर मोदी काही करू इच्छित नाहीत. पण ४०१ के वर मात्र tax .
वरील लिंकमधून -
Anyone who's worked in the US and opened a 401k account may need to inform the Indian tax authorities or face harsh penalties under the black money law that came into force on July 1. Thousands of India's IT professionals and others who've worked overseas will potentially have to declare such investment plans as these will be considered foreign assets. The law prescribes stiff penalties for non-disclosure even if the asset is from income that's accounted for.
४०१-के योजनेतील गुंतवणूक जाहीर करायची आहे. त्यावर कर भरायचा आहे असे कोठे लिहिले आहे?
While the source of the investment can be explained, not reporting it risks a penalty of up to Rs 10 lakh under the new black money law. Violations could also lead to jail time. "The core of the black money law is that if a person has an offshore asset (say a bank account or subscription to such plans) and that is not reported in India even after moving back to India, such foreign asset will not be treated as 'undisclosed asset' as long as the source of that asset can be explained," said Sanjay.
वरील स्पष्टीकरण पुरेसे बोलके आहे.
>>> निवृत्त लोक बिचारे दर वर्षीच्या वाढत्या महागाई ला कसेबसे तोंड देत असतात. भागधारक बनून सहकारी बँक मध्ये पैसा ठेवतात. त्यांना जे काही व्याज मिळते त्याच्यावर यांचा आता डोळा. कायदा बदलला आणि भागधारकांचे लाभ काढून घेतले.
व्याजावर पूर्वीपासूनच आयकर भरावा लागत होता. मोदींनी तो नव्याने सुरू केला नाही. एक बदल केला. सहकारी बँकांनी बिनव्याजी भांडवल मिळविण्यासाठी एक नवीन शक्कल शोधून काढली होती. जर एखाद्याने सहकारी बँकेत मुदत ठेवीत पैसे गुंतविले आणि जर त्याने सहकारी बँकेचे समभाग विकत घेतले तर त्याच्या मुदत ठेवीच्या व्याजावर उद्गम कर कपात होणार नाही अशी ती योजना होती. त्यामुळे सहकारी बँकेला भागधारकांचे पैसे फुकट मिळायचे व गुंतवणुकदारांची उद्गम कर कपात टळायची. जरी उद्गम कर भरला नाही तरी वर्ष संपल्यावर आयकर परतीचा अर्ज भरताना जमलेल्या व्याजावर पूर्ण कर भरावा लागतोच. त्यामुळे या नवीन बदलामुळे गुंतवणुकदारांना १ रूपयासुद्धा अधिक कर द्यावा लागणार नाही. कराचा काही भाग उद्गम कर कपातीतून व उर्वरीत भाग आयकर परतीचा अर्ज भरताना असा कर द्यावा लागेल. जर उद्गम कर कपात झाली नाही तर संपूर्ण कर आयकर परतीचा अर्ज भरताना द्यावा लागेल. द्याव्या लागणार्या करामध्ये १ रूपयाची सुद्धा वाढ झालेली नाही.
तरीसुद्धा उद्गम कर कपात टाळायची असेल तर १५-जी किंवा १५-एच हा अर्ज देऊन उद्गम कर कपात टाळता येते.
त्यामुळे 'कायदा बदलला आणि भागधारकांचे लाभ काढून घेतले' हा एक पूर्ण खोटा आरोप मोदींवर केलेला आहे.
बादवे, 'उद्गम कर कपात' आणि 'सेवा कर' नावाच जिझिया कर या दोन गोष्टींचे जनक कोण होते याची कल्पना आहे का?
>>> गुलछबु विजय मल्ल्याने ७००० कोटी रु उडवले. युनायटेड बँक ने पण आता हात टेकले त्याच्यापुढे.
विजय मल्ल्या आणि हसन अली या दोघांवरही न्यायालयात खटला सुरू आहे. मल्ल्याच्या कंपन्यांची काही मालमत्ता जप्त होऊन त्याचा लिलाव देखील झालेला आहे. मल्ल्याचे प्रकरण खूप गुंतागुंतीचे आहे. तो अनेक कंपन्यांचा प्रवर्तक व मोठा भागधारक आहे. या कंपन्यांची Limited Liability असते. मल्ल्याची मालमत्ता कितीही असली तरी ज्या कंपन्या नुकसानीत आहेत केवळ त्या कंपन्यांचीच मालमत्ता विकून संबंधितांना नुकसानभरपाई देता येते. फायद्यातील इतर कंपन्यातील पैसा नुकसानीतील कंपन्यांच्या भरपाईसाठी वळविता येत नाही. किंगफिशर एअरलाईन मधील नुकसान मल्ल्याच्या मद्यनिर्मिती कंपन्यांच्या नफ्यातून देता येत नाही.
>>> परदेहातून काळा पैसा आणणे तर "चुनावी जुमला " होता असे अमित शहा ने कबूल करून टाकले.
परदेशातील काळा पैसा, १५ लाख रूपये इ. वर याच धाग्यात अनेक प्रतिसादातून पुरेशी माहिती दिलेली आहे. ती वाचल्यास गैरसमज दूर होतील.
12 Jul 2015 - 7:03 am | dadadarekar
जी गोष्ट फक्त जाहीरच करायची आहे, ति न जाहीर केली तर इतकी मोठी शिक्षा कशासाठी ? हा नियम लागू कधीपासुन होणार ? असा असा कायदा आला हे अमेरिके बसलेल्याना कसे समजणार ?
12 Jul 2015 - 11:45 am | अभिजित - १
काय आहे गुरुजी झोपलेल्या माणसाला जागे करता येते. झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला नाही. भाजप चा मुख्य मतदार वर्ग या सगळ्या प्रकाराने दूर होणार हे नक्की. कितीही भ्रष्टाचार / मुस्लिम तुष्टीकरण / शह्जदे गिरी असली तरी कोन्ग्रेस बरी असे आता वाटायला लागले आहे.
12 Jul 2015 - 6:55 pm | श्रीगुरुजी
मी व्यवस्थित मुद्दे मांडून तुम्ही सुरवातीला दिलेल्या प्रतिसादातील फोलपणा दाखवून दिला आहे. 'नावडतीचे मीठ अळणी' या उक्तीप्रमाणे मोदींची प्रत्येक कृती काही जणांना खटकते. त्याला कोणाचाच इलाज नाही. भाजपचा मुख्य मतदार वर्ग कोणत्या कारणांमुळे भाजपला मतदान करतो आणि नक्की कोणत्या कारणांमुळे तो भविष्यात भाजपपासून दूर होऊ शकेल याची तुम्हाला अजिबात कल्पना नाही. प्रतिसादातील फोलपणा दाखवून देऊनसुद्धा तुम्हाला काँग्रेस बरी वाटत असेल तर वाटू दे.
'झोपलेल्या माणसाला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला नाही' हे पुन्हा एकदा तुमच्या प्रतिसादावरून दृग्गोचर झालं हे नक्की.
13 Jul 2015 - 6:54 am | dadadarekar
धर्म नावाच्या अफूची नशा चार वर्षानी उतरेल तेंव्हा लोक आपोआपच जागे होतील.
आपणदेखील तोवर सुखनिद्रा घ्यावी.
शुभरात्री.
12 Jul 2015 - 1:27 pm | dadadarekar
आम्हाला न का देइनात , पण काळा पैसा आणू हे तर बोल्ले होते ना ?
13 Jul 2015 - 6:37 am | अरवीन्द नरहर जोशि.
योग्यरीतीने केलेले समतोल विवेचन आहे . वेगळी चर्चा करण्याची गरज नाही .
13 Jul 2015 - 11:59 am | अभिजित - १
समतोल विवेचन ? :) :) :)
विचारलेल्या प्रश्नावर काहीही ठोस उत्तर न देता भरताड माहिती देऊन समोरच्या माणसाला भंजाळून टाकण्यात गुरु आहेत.
वद्रा , पप्पू , ममा मादाम या सर्व लोकांनी जो काही पैसा खाल्ला देशाचा तो या ४ वर्षात परत मिळणार का देशाला ? बहुतेक नक्की नाही. कारण त्याची तर काही सुरुवात पण झालेली दिसत नाही. पण जनतेच्या खिशात हात घालायला पुढे. मग तुमच्यात आणि त्यांच्या त फरक काय ?
13 Jul 2015 - 12:23 pm | काळा पहाड
जर असाच जावून घ्यायचा असेल तर ठीक आहे. पण जर कोर्टाचा वापर करून हे करायचं असेल तर केस, पुरावे, सिद्धता वगैरे गोष्टी येणारच. बोला कशा करायच्या? कि सगळी कोर्टंच बरखास्त करूया?
13 Jul 2015 - 12:54 pm | संदीप डांगे
निवडून येण्यापूर्वी हे माहिती नव्हतं...?
13 Jul 2015 - 2:35 pm | श्रीगुरुजी
>>>> विचारलेल्या प्रश्नावर काहीही ठोस उत्तर न देता भरताड माहिती देऊन समोरच्या माणसाला भंजाळून टाकण्यात गुरु आहेत.
कमाल आहे. तुम्ही उपस्थित केलेल्या कोणत्या मुद्द्यावर ठोस उत्तर न देता नुसती भरताड माहिती दिली आहे?
तुमचा आरोप क्र. १) अमेरिकेतील ४०१-के योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर भारतात कर भरावा लागणार.
माझे स्पष्टीकरण - या गुंतवणुकीवर भारतात कर भरावा लागणार नसून किती गुंतवणूक केली आहे ते जाहीर करावे लागणार. तुम्ही जी लिंक दिली आहे त्यात हे स्पष्ट शब्दात लिहिले आहे. तुम्ही स्वतः लिंकमधील बातमी काळजीपूर्वक आणि संपूर्ण वाचली असती तर मला हे स्पष्टीकरण द्यावेच लागले नसते. दुर्दैवाने आपण दिलेली बातमी न वाचताच तुम्ही दोषारोप केलेत.
या स्पष्टीकरणाव्यतिरिक्त अजून कोणते ठोस उत्तर तुम्हाला हवे आहे.
तुमचा आरोप क्र. २) मध्यमवर्गीय सहकारी बँकेत ज्या मुदत ठेवी ठेवतात ते सहकारी बँकेचे भागधारक असूनसुद्धा त्या मुदत ठेवींवरील व्याज सरकार हडप करणार व भागधारकांचे लाभ काढून घेणार.
माझे स्पष्टीकरण - तुम्ही सहकारी बँकेचे भागधारक असला किंवा नसला तरी मुदत ठेवींवरील व्याज हे कायमच करपात्र होते. त्यावर वर्ष संपल्यावर कर द्यावा लागतोच. जर वर्षातील व्याज १०००० रूपयांपेक्षा जास्त असेल तर बँक उद्गम कर कपात करते (टॅक्स अॅडव्हान्समध्येच कापून घेणे). सहकारी बँकांनी स्वतःला बिनव्याजी भांडवल मिळविण्यासाठी एक युक्ती केली. तुम्ही जर आमच्या बॅकेचे शेअर्स घेतले तर आम्ही उद्गम कर कपात करणार नाही अशी योजना आणून मध्यमवर्गियांच्या गळ्यात स्वतःचे शेअर्स मारले. जरी टॅक्स अॅड्व्हान्समध्ये कापला गेला नाही तरी पूर्ण टॅक्स वर्ष संपल्यानंतर व्याजासहीत भरावाच लागतो. टॅक्सचा काही भाग अॅड्व्हान्समध्ये भरला तर वर्षाच्या शेवटी फक्त टॅक्सचा उर्वरीत भाग भरावा लागतो. परंतु सहकारी बँकेचा भागधारक झाल्याने टॅक्समध्ये १ रूपयाची सुद्धा सूट मिळत नाही.
मोदी सरकारने फक्त १ बदल केला. तो म्हणजे तुम्ही सहकारी बँकेचे भागधारक असला तरी तुमचा अॅडव्हान्स टॅक्स कापला जाईल असा तो बदल होता. या बदलामुळे तुम्हाला द्याव्या लागणार्या करामध्ये १ रूपयाची सुद्धा वाढ होणार नाही. त्यामुळे मुदत ठेवींवरील व्याजावर सरकारने डोळा ठेवला आहे हा आरोप निव्वळ अज्ञानातून आलेला आहे.
तसेच, जर तुम्हाला उद्गम कर कपात टाळायची असेल तर बँकेकडे १५-जी/१५-एच हा अर्ज भरून देणे ही सोय अजूनही कायम आहे. त्यामुळे 'कायदा बदलला आणि भागधारकांचे लाभ काढून घेतले' हा आरोपही निव्वळ अज्ञानातून आलेला आहे. सहकारी बँका उद्गम कर कपात टाळण्याचे प्रलोभन दाखवून आपले शेअर्स ग्राहकांच्या गळ्यात मारत होत्या. या नवीन नियमामुळे हा प्रकार बंद होईल हा ग्राहकांचा फायदाच आहे.
तुमचा आरोप क्र. ३) कुप्रसिद्ध हसन अली व विजय मल्ल्याचे मोदी काहीही वाकडे करू शकलेले नाहीत.
माझे स्पष्टीकरण - हसन अली व विजय मल्ल्याचे प्रकरण अनेक वर्षांपूर्वी बाहेर आले ते युपीएच्या काळात. त्या काळातही अनेक वर्षे मिळूनसुद्धा तुमची आवडती काँग्रेस त्यांचे काहीही करू शकली नाही. मोदी येऊन तर फक्त १३ महिने झालेत. तरीही त्यांच्यावर दोषारोप.
आधीच लिहिल्याप्रमाणे दोघांवरही न्यायालयात खटले सुरू आहेत. न्यायालयीन प्रक्रीया सुरू असताना इतरांना हस्तक्षेप करण्यास वाव नसतो. मल्याची काही मालमत्ता आधीच बँकानी लिलाव करून विकून काही प्रमाणात वसूली केली आहे. मल्या अनेक कंपन्यांचा अध्यक्ष/संचालक असला तरी किंगफिशरचे कर्ज फेडण्यासाठी त्या इतर कंपन्यांचा निधी वापरता येत नाही. किंगफिशरच्या थकीत कर्जासाठी मल्या एकटा दोषी नाही. सर्व संचालक मंडळ दोषी आहे. हे कर्ज फेडणे ही त्याची एकट्याची जबाबदारी नाही. ही जबाबदारी सर्व संचालकांची पर्यायाने कंपनीची आहे. तो कितीही राजेशाही थाटात रहात असला तरी या कर्जासाठी त्याची जबाबदारी अत्यंत मर्यादीत आहे. ही बेसिक गोष्ट तुम्हाला समजावी अशी अपेक्षा आहे.
याबाबतीत आजचीच नवीन न्यायालयीन घडामोड वाचा.
विजय मल्ल्या यांना पुन्हा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
http://www.loksatta.com/desh-videsh-news/sc-dismisses-vijay-mallyas-appe...
हसन अलीच्या बाबतीत १४ मे २०१४ ची (मोदी सत्तेवर येण्याआधी) ही बातमी वाचा.
http://www.dnaindia.com/india/report-hasan-ali-khan-case-may-end-in-a-wh...
he high-profile case of alleged tax evasion and money laundering against Pune-based stud farm owner Hasan Ali Khan is turning out to be a damp squib as the government is said to have come to a conclusion that probe agencies do not have enough evidence to nail him on the charge of having stashed away a huge amount of black money abroad.
म्हणजे युपीएच्याच काळात हसन अलीच्या केसमध्ये काहीही दम नाही असे दिसून आले होते. असे असताना आता मोदी त्याचे काय वाकडे करू शकणार?
'कुप्रसिद्ध हसन अली व विजय मल्ल्याचे मोदी काहीही वाकडे करू शकलेले नाहीत' हा आरोपसुद्दा निव्वळ अज्ञानातून आलेला आहे.
तुमचा आरोप क्र. ४) परदेशातून काळा पैसा आणण्याबाबत मोदींना खोटे आश्वासन दिले.
माझे स्पष्टीकरण - परदेशातील काळा पैसा, १५ लाख इ. वर याच धाग्यात अनेक प्रतिसादातून वस्तुस्थिती मांडलेली आहे. तेच तेच पुन्हा लिहिण्याची इच्छा नाही. ते प्रतिसाद वाचल्यास पूर्ण माहिती मिळेल.
२-३ नवीन घडामोडी झालेल्या आहेत. (१) संसदेच्या अंदाजपत्रकी अधिवेशनात काळा पैसा साठविणार्यांना १० वर्षे तुरूंगवासाची कठोर शिक्षा देणारे विधेयक संसदेत मंजूर झाले आहे. (२) त्याचप्रमाणे परदेशात कोणत्याही स्वरूपात पैसे ठेवणार्यांना (परदेशातील बँक खात्यात, अमेरिकेतील ४०१-के योजनेत, सिंगापूरमधील सीपीएफ मध्ये इ.) त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. (३) परदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एक एसआयटी स्थापन झालेली असून काळा पैसा परत आणण्याच्या योजना ही एसआयटी नक्की करणार आहे.
त्यामुळे 'परदेशातून काळा पैसा आणण्याबाबत मोदींना खोटे आश्वासन दिले' हा आरोप देखील निव्वळ अज्ञानातून आले आहे.
तात्पर्य - तुमचे वाचन कमी पडत आहे व कदाचित त्यामुळे किंवा मोदींबद्दलच्या आकसाने तुम्ही मोदींवर निव्वळ अज्ञानातून आरोप करीत आहात.
इतके सविस्तर लिहून व सर्व वस्तुस्थिती दाखवून देउन सुद्धा तुमचा हेका कायम असेल तर मात्र माझा नाइलाज आहे.
>>> वद्रा , पप्पू , ममा मादाम या सर्व लोकांनी जो काही पैसा खाल्ला देशाचा तो या ४ वर्षात परत मिळणार का देशाला ?
पुन्हा एकदा कमाल आहे. अहो, हेच लोक तुम्हाला हवे आहेत. तुमचेच आधीच्या प्रतिसादातील वाक्य पहा.
"कितीही भ्रष्टाचार / मुस्लिम तुष्टीकरण / शह्जदे गिरी असली तरी कोन्ग्रेस बरी असे आता वाटायला लागले आहे."
13 Jul 2015 - 5:08 pm | अभिजित - १
१. ४०१ K मधली माहिती जर का सादर केली नाही तर सरळ १० लाख रु दंड आणि तुरुंगवास ? हि इतकी कठोर शिक्षा का ? नक्की काय कारण / logic आहे याच्या मागे ? हे म्हणजे सिग्नल तोडल्या वर सरळ फाशी दिल्या सारखे आहे.
२. माझे ओळखीत ७५ वर्षाचे गृहस्थ एका सहकारी बँक चे भागधारक आहेत . त्यांची २५ FD cert आहेत अंदाजे. त्याच्यावर ते नियमित पणे कर भारतात. बँक चे इंटरेस्ट cert दर आर्थिक वर्षाच्या शेवटी घेऊन. फक्त भागधारक असल्याने त्यांना आत्तापर्यंत कधीही १५ H भरावा लागत नव्हता. आता या नवीन नियमा मुले त्यांना 15 फोरम ( ५ x ३ ) भरावे लागतात. कारण २५ FD एका form मध्ये मावत नाहीत. त्यांनी सरकारचे काय घोडे मारले म्हणून त्यांना हा त्रास सरकार देत आहे ?
३. हसन आली - म्हणजे थोडक्यात मोदी सरकार आता काही करू इच्छित नाही तर. आनंद आहे. १ लाख कोटी रु असेच हसत सोडून द्यायला खरेच ५६ इंची छाती लागते.
विजय मल्ल्या हे त्यांच्या खान्ग्रेसी हित संबध मुळे मस्त मजेत बाहेर आहेत असे जनतेला वाटत होते. तसे काहीच नाही तर . म्हणजे कोन्ग्रेस खरेच स्वच्छ आहे तर. कमीत कमी त्यांनी सहारा श्री रॉय यांना आत टाकले हे खूप मोठे काम केले. मोदी मात्र अजून १ वर्ष झाले तरी भ्रष्ट्चारा विरुद्ध काही ठोस काम करू शकले नाहीत. बाकी शरद पवार त्यांचे राजकीय सल्लागार आहेत म्हटल्यावर अजून काय अपेक्ष ठेवणार ?
४. >>> वद्रा , पप्पू , ममा मादाम या सर्व लोकांनी जो काही पैसा खाल्ला देशाचा तो या ४ वर्षात परत मिळणार का देशाला ?
पुन्हा एकदा कमाल आहे. अहो, हेच लोक तुम्हाला हवे आहेत. तुमचेच आधीच्या प्रतिसादातील वाक्य पहा.
माझे उत्तर - मला काय वाटते ते सोडा. अक्खी निवडणूक या लोक विरुद्ध हवा तापवून मते फिरवली. आणि आता याच्या विरुद्ध काही करायची वेळ आल्यावर गप्प ??
आता मी थांबतो इथे. जनतेचे खरे feedback वरती पाठवत चला. नाहीतर पुढची निवडणूक कठीण आहे हे नक्की. दिल्ली , नवी मुंबई मध्ये ते दिसलेच आहे. माझी पण भाजप ला मत द्यायची इच्छा आहे. आज पर्यंत नेहमीच देत आलो आहे. पण भाजपचा कारभार सुधारला नाही तर कठीण आहे त्यांचे.
13 Jul 2015 - 5:53 pm | चिनार
अभिजित साहेबांचे बरोबर आहे..राहुल गांधींना पंतप्रधान करा. त्यांचं खेळून झालं की केजरीवाल यांना पंतप्रधान करा. त्यांचे व्हाईट हाउस समोर धरणे देण्याचे स्वप्न पूर्ण झाले की रामदास आठवले यांना पंतप्रधानपद द्या. संसदेचे सर्कशीत रुपांतर झाले की मायावती, जयललिता आणि ममता दीदी यांना आळीपाळीने त्या पदाचे मानकरी होऊ द्या. मग ठाकरे बंधूंना एकदा अटकेपार झेंडे गाडू द्या. शेवटी पवार साहेबांना पंतप्रधान पद द्या एकदाचे. त्यांनी अक्ख्या देशाचा सातबारा सुप्रियाच्या नावे करून टाकला की आपण मोकळे !!
एवढे लायक उमेदवार असताना त्या गुज्जूभाई मोदींना कशाला पंतप्रधानपदी बसवले आहे कळत नाही राव ?
13 Jul 2015 - 8:49 pm | ट्रेड मार्क
बँकेतल्या ठेवींवर कर - जास्त कर भरायला लागतो हा अडचण आहे का जास्त फॉर्मस भरायला लागतात हा आहे? उत्तर वर दिलेच आहे की कर जास्त भरायला लागत नाही.
काळा पैसा - तुमची समजूत अशी आहे का की एक बोईंग भरून पैसे Switzerland मधून घेवून यावे. कुठल्याही गोष्टीला एक procedure असते, जी चालू केलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच tax heaven देशांनी आपल्याला account holders ची माहिती देण्याचे काबुल केले आहे.
त्याचाच परिणाम म्हणून प्रत्येकाला परदेशातील मालमत्ता जाहीर करायला सांगण्यात आले आहे. जर का शिक्षा केली नाही तर ज्यांना tax चुकवायचा आहे ते कुठली न कुठली क्लृप्ती काढून पैसे लपवतील. हे फक्त भारतातच चालू आहे हा आपला गैरसमज आहे. अमेरिकेत सुद्धा प्रत्येकाला त्याच्या परदेशातील assets declare करायला सांगितले आहे. जास्त माहितीसाठी FATCA असा google search करा
हसन अली आणि विजय मल्ल्या - केसेस कोर्टात आहेत, बँका जप्तीचे काम आहेत. यात मोदींनी काय करणे अपेक्षित आहे?
कॉंग्रेसने पैसा खाल्लेला ४ वर्षात परत मिळणार का? - हे तरी मान्य करताय म्हणजे की पैसा खाल्लेला आहे. तो परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. सगळ्या गोष्टी public करायच्या नसतात. हा काही हिंदी सिनेमा नाही की हिरो जातो villain च्या घरी आणि त्याच्या बाथरुमच्या छतातून आणि बेडरूमच्या भिंतीतून सगळे पैसे शोधून काढतो.
मोदी आणि मंडळी जे काही करत आहेत त्याचा लेखाजोखा मांडला जाईलच. चिनार यांनी म्हणल्याप्रमाणे RG वा AK इ. पर्याय आहेतच ४ वर्षांनंतर, पण उगाच टीका करायची म्हणून कशाला करताय?
अवांतर: बाहेरील संपत्ती जाहीर करण्यासाठीच्या नियमाला फाटका (FATCA) हा किती विरोधाभास आहे :)
14 Jul 2015 - 2:16 pm | श्रीगुरुजी
>>> जास्त कर भरायला लागतो हा अडचण आहे का जास्त फॉर्मस भरायला लागतात हा आहे?
यांच्या काकांच्या एकाच सहकारी बँकेत २५ मुदत ठेवी आहेत. आर्थिक वर्ष संपल्यावर कर परतीचा अर्ज भरताना ते या ठेवींवरील व्याजावरील कर भरतात. म्हणजेच ठेवींवरील मिळणारे एकूण व्याज स्टँडर्ड डिडक्शनपेक्षा जास्त आहे. जेव्हा तुमचे संभाव्य वार्षिक उत्पन्न हे करसवलतीच्या मर्यादेपेक्षा जास्त असते तेव्हा बँकेने उद्गम कर कपात करू नये यासाठी १५-जी/१५-एच हा अर्ज देणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे काका जर हे अर्ज देत असतील तर ते आयकर विभागाच्या कायद्याविरूद्ध आहे.
>>> अमेरिकेत सुद्धा प्रत्येकाला त्याच्या परदेशातील assets declare करायला सांगितले आहे.
चांगले. परदेशात ठेवला जाणारा काळा पैसा रोखण्यासाठी मोदी सरकारने उचललेले हे एक चांगले पाऊल आहे.
>>> केसेस कोर्टात आहेत, बँका जप्तीचे काम आहेत. यात मोदींनी काय करणे अपेक्षित आहे?
मोदींनी हसन अली व मल्याच्या मानेला धरून तुरूंगात नेऊन बसवावे अशी बहुतेक अपेक्षा असेल.
>>> हे तरी मान्य करताय म्हणजे की पैसा खाल्लेला आहे. तो परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.
बरोबर
13 Jul 2015 - 9:12 pm | श्रीगुरुजी
>>> ४०१ K मधली माहिती जर का सादर केली नाही तर सरळ १० लाख रु दंड आणि तुरुंगवास ? हि इतकी कठोर शिक्षा का ? नक्की काय कारण / logic आहे याच्या मागे ? हे म्हणजे सिग्नल तोडल्या वर सरळ फाशी दिल्या सारखे आहे.
माहिती देण्यामध्ये नक्की काय समस्या आहे आणि का विरोध आहे? जरा खालील वाक्ये नीट वाचा.
"The core of the black money law is that if a person has an offshore asset (say a bank account or subscription to such plans) and that is not reported in India even after moving back to India, such foreign asset will not be treated as 'undisclosed asset' as long as the source of that asset can be explained,"
जर परदेशातील संपत्तीच्या स्त्रोताचे स्पष्टीकरण देता येणे शक्य असेल, तर, भारतात परतल्यानंतरसुद्धा जर परदेशातील गुंतवणुकीची माहिती दिली नाही तरीसुद्धा अशी गुंतवणुक "उघड न केलेली संपत्ती" मानली जाणार नाही व त्यामुळे ती व्यक्ती अर्थातच शिक्षेस पात्र नाही. या वाक्याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. वैध मार्गाने परदेशात गुंतवणुक केली असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. जरी ४०१-के योजनेतील माहिती दिली नाही तरी जोपर्यंत त्या योजनेत कायदेशीर मार्गाने श्वेत उत्पन्न गुंतविले असेल तरी ते सरकारला मान्य आहे.
त्यामुळे ४०१ K मधली माहिती जर का सादर केली नाही तर सरळ १० लाख रु दंड आणि तुरुंगवास ही समजूत चुकीची आहे.
हा नवीन कायदा काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठीच आहे. श्वेत मार्गाने संपत्ती मिळविणार्यांना अजिबात घाबरायचे कारण नाही.
>>> माझे ओळखीत ७५ वर्षाचे गृहस्थ एका सहकारी बँक चे भागधारक आहेत . त्यांची २५ FD cert आहेत अंदाजे. त्याच्यावर ते नियमित पणे कर भारतात. बँक चे इंटरेस्ट cert दर आर्थिक वर्षाच्या शेवटी घेऊन. फक्त भागधारक असल्याने त्यांना आत्तापर्यंत कधीही १५ H भरावा लागत नव्हता. आता या नवीन नियमा मुले त्यांना 15 फोरम ( ५ x ३ ) भरावे लागतात. कारण २५ FD एका form मध्ये मावत नाहीत. त्यांनी सरकारचे काय घोडे मारले म्हणून त्यांना हा त्रास सरकार देत आहे ?
टीडीएस व अॅडव्हान्स टॅक्स भरणे हा जुना नियम आहे. सर्व नोकरदार व्यक्ती, उद्योगपती, व्यावसायिक, कलाकार अशा सर्वांसाठी टीडीएस व अॅडव्हान्स टॅक्स भरणे सक्तीचे आहे. या कायद्यातून एक पळवाट निघाली होती. एखाद्या सहकारी बँकेचा १०० रूपयांचा १ शेअर घेतला तरी तुम्ही बँकेचे भागधारक होता व बँकेच्या भागधारकांसाठी टीडीएस सक्तीचा नव्हता. अशा भागधारकांनी बँकेत कितीही रक्कमेच्या मुदत ठेवी ठेवल्या व त्यावर कितीही जास्त व्याज येत असले तरी बँक अशांचा टीडीएस कापत नव्हती. भागधारक नसलेल्या एखाद्याला एका सहकारी बँकेत वार्षिक फक्त १०००० रूपये व्याज मिळणार असले तरी बँक त्यातून १० टक्के उद्गम कर कपात करायची. पण भागधारक असलेल्या एखाद्याला त्याच बँकेत १ लाखाहून अधिक व्याज मिळणार असले तरी केवळ १०० रूपयांच्या एका शेअरमुळे बँक त्याचा टीडीएस कापत नव्हती.
नवीन कायद्यामुळे ही पळवाट बुजलेली आहे. आयकर विभाग यापुढील काळात करभरणा व्यवस्थेतील अशा सर्व पळवाटा बुजवून करसंकलन वाढविणार आहे.
यात सरकारने कोणाचे घोडे मारायचा प्रश्नच उद्भवत नाही. कायद्यात सुधारणा केल्यामुळे कायद्यातील विषमता दूर झाली आहे (फक्त ठराविक लोकांनाच टीडीएस पासून मुक्ती व इतरांवर सक्ती ही विषमता) व त्यामुळे काळा पैसा निर्माण होण्यावर आपोआपच प्रतिबंध येणार आहे.
१५-एच/१५-जी अर्ज बहुसंख्य गुंतवणुकदार भरतात. तुमचे काका असे कोण लागून गेले आहेत की त्यांना हे अर्ज भरण्यापासून मुक्ती हवी? जर ते वर्षाच्या शेवटी नियमित कर भरतात, तर त्यातला काही भाग आधीच भरायला विरोध का? इतर सर्व नागरिक हे करीत असताना एखाद्या २-३ शाखा असलेल्या सहकारी बँकेचा १०० रूपयांचा एक शेअर घेतला म्हणजे लगेच त्यांना उद्गम कर कपातीपासून सुटका द्यायची का?
>>>> हसन आली - म्हणजे थोडक्यात मोदी सरकार आता काही करू इच्छित नाही तर. आनंद आहे. १ लाख कोटी रु असेच हसत सोडून द्यायला खरेच ५६ इंची छाती लागते.
पुन्हा एकदा चुकीचा निष्कर्ष. हसन अलीवरील खटला न्यायालयात सुरू आहे. गेल्या ५-६ वर्षात तपास यंत्रणांना हसन अली विरोधात पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. आता त्याला मोदी काय करणार? का त्यांनी बनावट पुरावे तयार करावे अशी तुमची इच्छा आहे? १ लाख कोटी हा आकडा कोठून आला? १ लाख कोटी सोडून दिले हा जावईशोध कोणी लावला?
जरा अभ्यास वाढवा. असले हास्यास्पद निष्कर्ष काढण्यापेक्षा थोडासा शोध घेतला असता तर असे हसू झाले नसते.
लेटेस्ट बातमी वाचा.
http://www.hindustantimes.com/mumbai/mumbai-sessions-court-stays-hasan-a...
The case against Pune-based stud farm owner Hasan Ali, who allegedly evaded taxes to the tune of Rs 74,000 crore, may be crumbling. A sessions court on Monday stayed Ali’s trial, which was pending before a magistrate’s court.
>>>> विजय मल्ल्या हे त्यांच्या खान्ग्रेसी हित संबध मुळे मस्त मजेत बाहेर आहेत असे जनतेला वाटत होते. तसे काहीच नाही तर . म्हणजे कोन्ग्रेस खरेच स्वच्छ आहे तर. कमीत कमी त्यांनी सहारा श्री रॉय यांना आत टाकले हे खूप मोठे काम केले. मोदी मात्र अजून १ वर्ष झाले तरी भ्रष्ट्चारा विरुद्ध काही ठोस काम करू शकले नाहीत. बाकी शरद पवार त्यांचे राजकीय सल्लागार आहेत म्हटल्यावर अजून काय अपेक्ष ठेवणार ?
पुन्हा एकदा अत्यंत हास्यास्पद निष्कर्ष. तुम्हाला पब्लिक लिमिटेड कंपनी व अशा कंपन्यांची कर्जे व कर्जाची जबाबदारी इ. विषयी अजिबात माहिती नाही. तस्मात अभ्यास वाढवा.
>>> अक्खी निवडणूक या लोक विरुद्ध हवा तापवून मते फिरवली. आणि आता याच्या विरुद्ध काही करायची वेळ आल्यावर गप्प ??
आजतगायत सोनिया व राहुल विरूद्ध एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आलेले नाही. वड्राला राजस्थान व हरयानामध्ये जवळपास फुकटात दिलेल्या जमिनी राज्य सरकारने परत घेतल्या आहेत. हरयाना सरकारने वड्राला दिलेल्या जमिनींची चौकशी सुरू केली आहे. तस्मात मोदी सरकारने यांच्याविरूद्ध काही केले नाही हा (पुन्हा एकदा) खोटा आरोप आहे.
>>> जनतेचे खरे feedback वरती पाठवत चला. नाहीतर पुढची निवडणूक कठीण आहे हे नक्की. दिल्ली , नवी मुंबई मध्ये ते दिसलेच आहे. माझी पण भाजप ला मत द्यायची इच्छा आहे. आज पर्यंत नेहमीच देत आलो आहे. पण भाजपचा कारभार सुधारला नाही तर कठीण आहे त्यांचे.
मी असला फीडबॅक भाजप किंवा इतर कोणालाही पाठवित नाही कारण भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षाचा माझा काहीही संबंध नाही आणि मला तसे करण्याची अजिबात गरज वाटत नाही. त्याचप्रमाणे भाजपला असला हास्यास्पद फीडबॅक समजून घेण्याची अजिबात गरज नाही. खराखुरा फीडबॅक मिळविण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःची सक्षम यंत्रणा आहे. भाजपला निवडणुक कठीण आहे का सोपी याची काळजी भाजपपेक्षा तुम्हालाच जास्त दिसते. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा राष्ट्रीय निवडणुकांशी संबंध लावणे यातून फक्त राजकीय अज्ञान दिसते. असो.
16 Jul 2015 - 7:03 am | dadadarekar
http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48092983§ion=top-sto...
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश सोनी, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य प्रभात झा, त्यांचे दोन पुत्र अत्यन आणि तृष्मूल झा तसेच मध्य प्रदेशचे राज्यसभा सदस्य अनिल दवे यांच्या विमानप्रवासांचा आणि अन्य खर्च 'व्यापमं' घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुधीर शर्मा याने केल्याचा दावा काँग्रेसने बुधवारी पुराव्यांनिशी केला.
16 Jul 2015 - 11:39 am | dadadarekar
http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48093109§ion=desh
बहुमत नसतानाही काँग्रेअने जनतेच हिताचे निर्णय घेतले.
स्वार्थी भाजपा बहुमत असुनही उताणेपडत आहे.
19 Jul 2015 - 8:15 am | dadadarekar
http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48129717§ion=top-sto...
भारतात लोकोपयोगी योजनांचा धडाका लावत, कार्यक्षम सरकार म्हणून जनतेसमोर छबी मांडताना प्रत्यक्षात राजकीय पडद्याआड कोणत्या घडामोडी घडतात, हे अमेरिकन सरकारने उघड केले आहे. गोव्यातील पाणी व मलनि:सारण प्रकल्प आखणीचे कंत्राट मिळवण्यासाठी लुइस बर्जर या प्रतिष्ठित कंपनीने एक मंत्री तसेच सरकारी अधिकाऱ्यांना सुमारे ६ कोटी ३५ लाख रुपयांची लाच दिल्याचे खुद्द अमेरिकन कायदा मंत्रालयाने जाहीर केले आहे
20 Jul 2015 - 11:53 am | पुण्याचे वटवाघूळ
अहो पोस्ट करण्यापूवी वाजत जा हो जरा. हे प्रकरण काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. पर्रिकरांनीच म्हटले आहे की या लोकांनी गोव्याला लुटले आहे. वाचा जरा--http://timesofindia.indiatimes.com/india/Bribes-by-US-firm-give-BJP-ammo...
20 Jul 2015 - 1:25 pm | dadadarekar
त्यात गुवाहाटीही आहे ना ?
http://m.timesofindia.com/home/news/An-EVM-that-votes-only-for-BJP-stuns...
20 Jul 2015 - 1:39 pm | पुण्याचे वटवाघूळ
हो गुव्हाटीपण आहे. आणि तुमच्या दुर्दैवाने आसामात भाजप कधीच सत्तेत नव्हता. :)
19 Jul 2015 - 2:42 pm | dadadarekar
http://indianexpress.com/article/cities/lucknow/ram-temple-in-ayodhyahin...
अरारा.....
Hindu organisation Akhil Bharatiya Hindu Mahasabha (ABHM) has accused Vishwa Hindu Parishad (VHP) and its associate units of pocketing more than Rs 1,400 crore in cash and “quintals of gold bricks”, which were collected from across the world as donations for construction of Ram temple in Ayodhya. The charge has been vehemently denied by the VHP.
20 Jul 2015 - 11:26 pm | dadadarekar
चौदा वर्षे वनवास भोगलेल्या देवाच्या भक्तानी चौदाशे कोटी हडपले,
बजरंगी भाईजान याना चौदावे रत्न दाखवो हीच प्रार्थना.
7 Aug 2015 - 11:52 am | श्रीगुरुजी
मोदींच्या पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यानंतर प्रथम वर्षातील दौर्यावर काही विघ्नसंतोषी मंडळींनी टीका केली. त्यांच्या परदेश दौर्याचे महत्त्व समजण्यास अपात्र असणार्यांनी मोदींचा अनिवासी भारतीय असा उल्लेख केला. मोदी परदेशातून परत आले की मोदी भारतभेटीवर आलेत अशी कुत्सित टीका केली गेली.
परंतु त्यांनी भेट दिलेल्या देशातून गेल्या वर्षभरात भारतामध्ये जवळपास २० अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणुक झालेली आहे.
India received $19.78 billion FDI from nations visited by Narendra Modi in FY15
http://economictimes.indiatimes.com/news/economy/finance/india-received-...
9 Sep 2015 - 1:58 pm | श्रीगुरुजी
मोदींच्या परदेश दौर्याचे अजून एक चांगले फलित -
http://www.dnaindia.com/india/report-uae-begins-crackdown-on-dawood-ibra...
UAE begins crackdown on Dawood Ibrahim's properties
10 Sep 2015 - 5:19 pm | अभिजित - १
सत्य हे आहे कि आज पण दाउद भारतातून हप्ता गोळा करतोच आहे. तो आधी थांबवा . त्याचे इथले नेटवर्क तोडून टाका. पण तितकी इच्छा शक्ती / ताकद पाहिजे. UAE ला लिस्ट देऊन काय उपयोग ? UAE काय त्या सगळ्या मालमत्ता विकून त्याचे पैसे भारताला परत देणार काय ? हि जी लिंक तुम्ही दिली आहे ना ती नुसती एक पोकळ बातमी आहे. ह्याच्यावर पुढे काहीही होणार नाही हेच सत्य आहे.
7 Aug 2015 - 1:18 pm | dadadarekar
त्याच्या आधीच्या वर्षातील आकडे बघा.
http://m.thehindubusinessline.com/economy/fdi-inflows-up-8-at-243-bn-in-...
7 Aug 2015 - 4:32 pm | dadadarekar
Foreign direct investment into India grew 8 per cent year-on-year to $24.3 billion in 2013-14, according to the Department of Industrial Policy and Promotion (DIPP) data.
In 2012-13, FDI totalled $22.4 billion.
Foreign investment inflows more than doubled to $3.53 billion in March this year from $1.52 in the same month last year.
The highest FDI came in services ($2.22 billion), followed by automobiles ($1.51 billion), telecommunications ($1.3 billion), pharmaceuticals ($1.27 billion) and construction development ($1.22 billion) in 2013-14.
...................* .................
तुमचा धागा म्हंजे कमळाबाईची जाहिरात आहे हे आता तरी मान्य कराल का ?
....................*..................
लोकं हसत्यात तुमास्नी !
8 Aug 2015 - 12:09 am | ट्रेड मार्क
जरा बातमी उघडून तरी बघायची. वाचा जरा… फक्त लिंक वर क्लिक तर करायचं असतं.
India received $19.78 billion foreign direct investment (FDI) from 12 countries visited by Prime Minister Narendra Modi in financial year 2014-15, Parliament was informed today.
The total outflow and inflow of foreign investment in general for 2014-15 fiscal was $6.42 billion and $75.71 billion, respectively, Commerce and Industry Minister Nirmala Sitharaman said in a written reply to Rajya Sabha.
In 2014-15, FDI in India increased by 27 per cent to $30.93 billion
8 Aug 2015 - 12:05 pm | श्रीगुरुजी
+१
हेच काल लिहावंसं वाटलं होतं. परंतु लिहिणं जाणूनबुजून टाळलं.
8 Aug 2015 - 5:05 pm | dadadarekar
....
तरीही कमीच हो ! इतके तर मनमोहन न बोलताच आणि न फिरताच आणत हो.
मोदीनी इतका गाजावाजा करून आणि इतकी पायपीट करुन त्यामानाने कमीच आणले नै ?
8 Aug 2015 - 5:20 pm | चिनार
दादाचं बरोबर आहे…. राहुल गांधींना पंतप्रधान करा
11 Sep 2015 - 5:20 pm | नया है वह
राहुल गांधींना पंतप्रधान करा आणि विपश्यनेच्या प्रचारार्थ देश विदेश फिरा..
8 Aug 2015 - 11:21 pm | श्रीगुरुजी
ट्रेडमार्क,
आता लक्षात आलं असेल मी लिहिणं का टाळलं ते.
9 Aug 2015 - 1:32 am | dadadarekar
सेना भाजप्यानी मुम्बैत साडेतेन हजार रु चे ट्याबलेट्स साडेसहा हजारला खरेदी केले.
मुम्बैत क्वीन्स नेकलेस वरेल दिव्यंच्या गोंधळात लाको रु च नुकसान होणार ?
गुर्जी यवरही लिहिणार की तेही टाळणार ?
9 Aug 2015 - 7:29 am | प्रदीप
गुरूजींचा लेख केंद्रातील सरकारविषयी आहे.
तुमच्या गोट्या हरवल्या का परत? (Lost your pebbles, sir?)
9 Aug 2015 - 8:12 am | dadadarekar
संघराज्य आहे म्हणजे केंद्र शासनाच्या शिस्तीतच राज्य सरकारने काम करायचे असते.
राज्य व केंद्र दोन्हीत एकच पक्ष असेल तर राज्य हे केंद्राचाच पोटसंच उर्फ सबसेट असल्यासारखे असते.
मोदी सत्तेवर असताना त्यांच्याच पक्षाचे लोक राज्य सरकारात भ्रष्टाचार करतात . मग मोदींचे शासन भ्रष्टाचारमुक्त आहे हे सत्य की थोतांड ?
हवे तर एक वर्षानंतर -- महाराष्ट्र राज्य असा धागा काढावा.
10 Aug 2015 - 1:35 pm | होबासराव
संघराज्य आहे म्हणजे केंद्र शासनाच्या शिस्तीतच राज्य सरकारने काम करायचे असते.
ह्जरत मंदार कुमठे ताम्हनकर आपले हे मौलिक विचार दिल्लि सरकार (सर्कस) ला सुद्धा लागु होतात का?
10 Aug 2015 - 3:06 pm | श्रीगुरुजी
http://www.thehindu.com/news/national/economy-shifting-gears-results-of-...
Economy shifting gears, results of CII survey show
More sectors clock ‘excellent’ growth during first quarter.
At a time when government data give mixed signals of an economic recovery, a survey by the Confederation of Indian Industry’s Associations’ Council (CII ASCON) sees early signs of a revival.
Of the 93 sectors surveyed, the proportion that recorded “excellent” growth (faster than 20 per cent) during the April-June quarter of 2015-16 was higher, at 16.1 per cent, than the 7.1 per cent in the corresponding quarter of the last fiscal.
27 Aug 2015 - 1:41 pm | श्रीगुरुजी
सुरूवात तर झाली.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/rajiv-gandhi-trust-land-in-amet...
राजीव गांधी ट्रस्टची जमीन औद्योगिक महामंडळाला परत करा ; न्यायालयाचा आदेश
28 Aug 2015 - 9:29 am | dadadarekar
आरक्षणासाठी पटेल समाजाची गुज्रातेत हिंसक आंदोलने.
30 Aug 2015 - 12:42 am | होबासराव
भारत हा विशाल देश आहे अश्या गोष्टि इथे होतच राहणार.
वो जाने दो मियां अबी तुम किधर को लापता हुये हो वो तुम्हारे नुक्क्ड का खय्यात तुम्हे ढुढंरेला है मियां सारे मोहल्ले को बताता फिर रहा है कि एक सतरंजी मे १० चड्डीया बना लिये तुम और उसको सीलाई के नाम पे पाकिस्तान से आया हुआ ५०० का नकली नोट थमाके चले गये.
30 Aug 2015 - 6:45 pm | श्रीगुरुजी
ते कुंभमेळ्याला गेले असावेत. तिथे आलेले बरेच साधूमहंत सतरंजीवर झोपतात असं कानावर आलंय.
30 Aug 2015 - 10:46 pm | dadadarekar
कुंभमेळे फिरत बसलो तर मक्केला जायला पैसे कसे साठणार ?
31 Aug 2015 - 9:54 am | सुबोध खरे
हितेसराव/ दादा द रेकर
हाज ला जाताना तुमची मालमत्ता आमच्या नावावर करून पुण्य मिळवणार होतात काय झाले? आम्ही वाट पाहत आहोत?
अब उस वादेसे मुकर जाने केलीये मक्का के लिये पैसा इकठ्ठा करने का बहाना ?
ला हौल वला कुव्वत
31 Aug 2015 - 10:00 am | dadadarekar
आमची मालमत्ता तुम्हाला देऊ , असे मी कधीही म्हटलेले नाही.
31 Aug 2015 - 12:38 pm | dadadarekar
आमची प्रॉपर्टी एकच .. 'अल्ला ! '
इतकी सुंदर प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला का द्यायची ?
31 Aug 2015 - 3:14 pm | प्यारे१
ऐसा कहना हराम है मियां.
आप अल्लाह कि प्रॉपर्टी हो सकते हो. ये काफरोंकी सोचकी काली छाया अभी भी तुमपर मंडरा रही है.
थोडा सब्र करो. बनोगे एक दिन तुम पाक बंदे बनोगे.
30 Aug 2015 - 10:59 pm | dadadarekar
आठवतय का मोदीजी म्हंटले होते,
"ना खाऊंगा.. ना खाने दूंगा"
.
.
.
च्यायला, 'कांद्या' बद्दल बोलत होते !
31 Aug 2015 - 12:31 am | होबासराव
अरे म्हणुन का कोणी सतरंजी चोरुन त्याच्या चड्ड्या शिवते का ? आणि शिलाई काय तर नकली ५०० रु ची नोट.
आता राहिला प्रश्ण कांद्याबद्द्ल तर ईतक्यात सतरंजि बरोबर तोहि चोरिला जायला लागलाय :)
तीसर्या (नवीची नवी) मुबंईतुन ७०० किलो चोरिला गेलाय, शंका आहे ह्यात सुद्धा चड्डी गँगचा हात असणारेय.
31 Aug 2015 - 2:56 pm | श्रीगुरुजी
पूर्वी यांचा औरंगजेब टोप्या शिवायचा म्हणे आणि आता काहीतरी वेगळंच शिवणकाम सुरू आहे!
31 Aug 2015 - 6:51 am | dadadarekar
सतरंजी चोर भाजपा शासन नमले
... भूसंपादनाच्या नावाने सतरंज्या ढापून उद्योगपतीना त्याच्या चड्ड्या शिवणारे भाजप स्र्कार नमले.
.....
भूसंपादन विधेयकातील वादग्रस्त तरतुदींना होत असलेला तीव्र विरोध, विरोधी पक्षांचे प्राबल्य असलेल्या राज्यसभेत अडलेले या विधेयकाचे गाडे आणि बिहार विधानसभेच्या निवडणुका अशा सगळ्या पार्श्वभूमीवर या विधेयकावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अखेर माघार घेतल्याचे रविवारी स्पष्ट झाले.
भूसंपादन विधेयकातील अनेक तरतुदींना देशभरातून विरोध होत असतानाही ते रेटून नेण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत होते. राज्यसभेत विधेयक मंजूर होणे अशक्य असल्याने सरकारने तीन वेळा त्याबाबत वटहुकूमही काढला. त्यातील तिसऱ्या वटहुकुमाची मुदत आज, सोमवारी संपत आहे. त्याआधी, रविवारी 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'याबाबत सरकार पुन्हा वटहुकूम काढणार नाही', असे स्पष्ट केले
1 Sep 2015 - 7:11 am | dadadarekar
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त विविध माध्यमांतून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भाषण ऐकविण्याची सक्ती केली आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच शिक्षक दिन साजरा होणार असून, पंतप्रधानांनीही शिक्षकांची 'मन की बात' जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
यंदा शिक्षक दिन शनिवारी असल्यामुळे शुक्रवारी, ४ सप्टेंबरला सकाळी १० ते ११.४५ या वेळेत पंतप्रधान मोदींचे भाषण होणार आहे. याचे प्रक्षेपण विविध माध्यमांमार्फत सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळांनी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या असून, त्यानुसार काही दिवसांत तो अहवालही सरकारला पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत
1 Sep 2015 - 7:31 am | अर्धवटराव
बरं वाटलं.
मोदिभक्तांमधे एक एडवला. कसं होणार या देशाचं...
1 Sep 2015 - 7:37 am | अभय म्हात्रे
खुप छान आनि खरे लिहिले आहात तुम्हि. तुमच्याबरोबर १०० % सहमत. आणखी १ वर्षानी मोदि सरकारला नक्किच १० पैकी १० गुन नक्किच मिळ्तील.
3 Sep 2015 - 6:57 am | dadadarekar
केंद्र सरकार बदल करू पाहत असलेल्या कामगार धोरणाला विरोध करण्यासाठी बुधवारी देण्यात आलेल्या संपाच्या हाकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोळसा उत्पादने, बँकिंग, वाहतूक सेवेला सर्वाधिक फटका बसला. पश्चिम बंगालमध्ये संपाचा सर्वाधिक फटका बसला असून, संतप्त जमावामुळे हिंसाचारही उफाळून आला. येथे २०० आंदोलकांना अटक करण्यात आली.
केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करण्याची भूमिका घेतली आहे; तसेच सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले जात आहे. त्याच्या निषेधार्थ देशभरातील दहा कामगार संघटनांनी हा संप पुकारला होता. यात १५ कोटी कामगार सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. या संपात भाजपसंलग्न भारतीय मजदूर संघासह अन्य काही कामगार संघटनांनी भाग घेतला नाही. तर बँक, सरकारी आस्थापने, वाहतूक संघटनांनी भाग घेतला होता. कोल इंडियाला या संपाचा सर्वाधिक फटका बसला. देशभरातून सुमारे चार लाख कर्मचारी संपात सहभागी झाले होते
3 Sep 2015 - 8:10 pm | श्रीगुरुजी
4 Sep 2015 - 9:03 am | तुषार काळभोर
लेगस्टम्प उघडा राहिला चुकून. लगेच काय पाडायचा का तो, श्री?
श्रेयाव्हेरः आदूबाळ
7 Sep 2015 - 11:34 am | श्रीगुरुजी
(१) १९७३ पासून प्रलंबित असलेला OROP (One Rank One Pension) हा प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आहे. सैनिकांच्या सर्व १००% मागण्या मान्य झाल्या नसल्यातरी निदान काही मागण्या मान्य झाल्यामुळे गेली ४२ वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नावर बर्याच प्रमाणात तोडगा निघालेला आहे.
अर्थात काँग्रेसने लगेच टीका सुरू केली आहे. त्याची कारणे २.
(अ) जे मोदींना जमू शकले ते आपण का करू शकलो नाही या भावनेतून आलेले वैफल्य आणि
(ब) OROP म्हणजे "Only Rahul Only Priyanka" अशी समस्त कॉंग्रेसजनांची असलेली समजूत.
(२) गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला मालेगाव बाम्बस्फोटाचा खटला ५ सप्टेंबर २०१५ या दिवशी सुरू झाला. घटना घडल्यावर तब्बल ७ वर्षानंतर हा खटला सुरू झाला. या खटल्यात सुरवातीला काही स्थानिक मुस्लिमांना अटक केली होती. त्यांना काही काळानंतर जामिनावर सोडण्यात आले. नंतर ऑक्टोबर २००८ मध्ये साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद पुरोहित, स्वामी असीमानंद इ. सह १०-१२ जणांना अटक करून त्यांच्यावर मकोका लावण्यात आला व त्यामुळे ते सर्वजण विनाजामीन आजतगायत तुरूंगात आहेत. मे २०१४ पर्यंत सत्तेवर असलेल्या काँग्रेसने इतक्या वर्षात आरोपपत्र सुद्धा दाखल न करता हा खटला सुरूच होऊन दिला नाही आणि त्यामुळे वरील आरोपी आयुष्यभर विनाजामीन, विनाखटला तुरूंगातच राहतील अशी व्यवस्था झाली.
सुदैवाने हा खटला आता सुरू झाला आहे. या खटल्याचा लवकरात लवकर निकाल लागावा अशी इच्छा आहे. जर हे आरोपी दोषी आढळले तर त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. परंतु जर ते निर्दोष आढळले तर त्यांची तातडीने मुक्तता करावी. परंतु काहीतरी तांत्रिक खुसपटे काढून खटला लांबवू नये.
7 Sep 2015 - 1:29 pm | नाव आडनाव
OROP - Only Rahul Only Priyanka
LBT - लुटो बांटो टॅक्स
हे असले फुलफॉर्म बनवून बोअर नाही होत का?
7 Sep 2015 - 1:38 pm | श्रीगुरुजी
नाही. असले फुलफॉर्म खिल्ली उडविण्यासाठी केले जातात. व्यंगचित्रातून जो संदेश असतो, साधारणपणे तसेच यातून होते.
9 Sep 2015 - 2:31 pm | सुजित पवार
मला स्वताला मोदि सरकारने जे काहि केले आहे ते ठिकठाक वाटते.
OROP जो खुप काळ प्रलम्बित होता तो सोडवला.
१२ रुपये वालि विमा योजना उत्तम आहे.
कोळसा खानिन्च वाटप पार्दर्शिपनाने केले.
मागिन रेल्वे बजेट हे समतोल साध्नार होत. फुकाच्या घोशना नाहि होत्या.
स्मार्ट सिटि योजना सध्यातरि देशासठि फायदेशिर वाटत आहे.
नमोच्या परदेश वारि या मेक इन इन्डिआ साठि परकिय गुन्तव्नुक आनतिल असे वाटते.मेक इन इन्डिआ साठि ज्या प्रकारे नमो प्रयत्न करत आहेत ते प्रशन्सेच्या पात्र आहेत.
दुसरिकडे, रस्त्यचि नावे बदलने, हे खाउ नका, ते विकु नका अश्या बन्दि आणन बन्द कराय्ला हव. अश्याने त्यन्चि Pro development वालि प्रतिमा खराब होउ शकते.
10 Sep 2015 - 5:25 pm | नया है वह
अगदी बरोबर
10 Sep 2015 - 5:50 am | dadadarekar
http://m.economictimes.com/news/politics-and-nation/patel-agitation-may-...
Patel community settled in US want a refund of $3 million out of $5 million raised during Modi's earlier visit to US.
"$3 million was given by Patels for that grand event in Madison Square and remained unused and now we want the money back, so that it can be channelised for the movement
,मोदींच्या कार्यक्रमावर खर्च केलेल पैस पटेल समाजाने परत माग्तले.
10 Sep 2015 - 8:58 pm | ट्रेड मार्क
देशात अशांतता पसरते आहे त्याचा का मोदींना कुठेतरी कोणीतरी बोलतय याचा? एखाद्या व्यक्तीचा एवढा द्वेष करताना आपण देशविरोधी पण होतोय याचा बऱ्याच लोकांना विसर पडत चालला आहे बहुतेक.
त्याहून वरचढ म्हणजे परदेशी स्थायिक झालेले लोक पण आरक्षण मागतात किंवा पाठींबा देतात?
11 Sep 2015 - 6:49 am | dadadarekar
मोदींच्या विरोधात बोलले तर तो देशविरोध का ?
11 Sep 2015 - 6:52 pm | ट्रेड मार्क
हार्दिक पटेल आणी मंडळी आरक्षणासाठी भांडतायेत. इथे व इतरत्र आरक्षण आपल्या देशाच्या दृष्टीने किती धोकादायक आहे त्याची बरीच चर्चा झाली आहे. आणि आनंद तुम्हाला याचा होतोय का की आता अनिवासी भारतीय सुद्धा यात सामील झाले? आणी का तर त्यांनी मोदींना पैसे परत मागितले म्हणून?
आरक्षणाला पाठींबा देताय का तुम्ही? म्हणून मी देशविरोधी म्हणतोय…
12 Sep 2015 - 9:59 am | dadadarekar
का आनंदी व्हायचे , हेही आता तुम्हीच ठरवणार काय ?
11 Sep 2015 - 2:40 pm | dadadarekar
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्याच्या उद्देशानं मुंबई महापालिकेच्या शाळेतील आठवीत शिकणाऱ्या २२ हजार विद्यार्थ्यांना टॅब देण्याची, शिवसेनेनं मोठा गाजावाजा करत सुरू केलेली योजना 'फ्लॉप' ठरण्याचीच शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वितरित केलेले २० टॅब्लेट विलेपार्ल्यातील एका शाळेनं दुसऱ्याच दिवशी 'ई-क्लास'कडे परत करून टाकलेत. विद्यार्थ्यांना टॅब वापरता येत नाहीत आणि त्यांना ते शिकवण्यासाठी शिक्षकांना कुठलंही प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्याचा गैरवापरच होऊ शकतो, असं स्पष्टपणे सांगत त्यांनी सेनेच्या 'डिजिटल एज्युकेशन' मोहिमेला धक्का दिला आहे.
दुसरीकडे, टॅबमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणं, व्हिडिओचा सुमार दर्जा, शैक्षणिक अॅपचा अभाव आणि मुलांकडे अगोदरच असलेल्या पुस्तकांच्या पानांच्या स्कॅन कॉपींचा भरणा, यामुळे हे 'एज्यु-टॅब' फारसे परिणामकारक नसल्याचं विश्लेषण टेक तज्ज्ञांनी केलंय. त्यामुळे शिवसेनेच्या डिजिटल 'प्रबोधना'बद्दलही शंका निर्माण झाली आहे
11 Sep 2015 - 5:06 pm | तुषार काळभोर
आणि 'केंद्रातल्या' भाजपा सरकारचा सुद्धा निषेध असो....
11 Sep 2015 - 7:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सवंग लोकप्रियतेसाठी अविचारीपणे काहीतरी करणे ह्या पलिकडे शिवसेनेचे योगदान मला स्मरत नाही.दुसरी सेना वेगळी असेल असे वाटले होते पण भ्रमनिरास.
सुदैवाने राज्य भाजपाचे नेते अजूनतरी काम करताना दिसत आहेत.
12 Sep 2015 - 12:09 am | श्रीगुरुजी
बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट यापुढे भल्याभल्यांचे काही चालत नाही. राहुलबाळाच्या बालहट्टामुळे कॉंंग्रेस मेटाकुटीला आली आहे आणि आदित्यबाळाच्या टॅबहट्टामुळे उधोजींना टॅबपलिकडे दुसरे काही दिसतच नाहीय्ये. अर्थात या बाळांचे हट्ट इतरांवर बंधनकारक नसल्याने मुलांना टॅब देणे या प्रकाराने फारसे बाळसे धरलेले नाही.
12 Sep 2015 - 11:19 am | dadadarekar
आजच्या लोकसत्तातील बातमी
उद्योग प्रकल्प गुंतवणूक २७ टक्क्य़ांनी रोडावली
व्यापार प्रतिनिधी, मुंबई | September 12, 2015 06:20 am
२०१४-१५ नवीन प्रकल्पांवर अवघी ७१,८०० कोटींची भांडवली गुंतवणूक
केंद्र व राज्य सरकारकडून अर्थचक्राच्या गतिमानतेचे, गुंतवणूक व उद्योग-व्यवसायास अनुकूल वातावरणनिर्मितीचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात सरलेल्या आर्थिक वर्षांत उद्योग क्षेत्रातून प्रकल्प गुंतवणूक ही वर्षांगणिक २७ टक्क्य़ांनी रोडावल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते
12 Sep 2015 - 4:41 pm | Ram ram
95/96 sali shivseneche sarkar Astana sarkha overdraft ghyava lagat hote. Rajyavaril karj vadhavnyachi parampara suru Karun aaj karj itke vadhle Ki, mantri santri nokranche pagar Ni karjavaril vyaj bharnyatach tijori rikami hot ahe. Shetisathi he sarkar kharch karu shakat nahi.phadanvis sarkar changale ahe.pan khadse sarkhe mantri nako hote. Phadanvisanna pach varsh milavet. Ajunahi bhrashtachar samplela nahi.
16 Sep 2015 - 7:41 pm | dadadarekar
मोदी सरकारने इंदिरा व राजीव यांचे चित्रे असलेली पोस्टाची तिकिटे बंद केली.
17 Sep 2015 - 5:25 pm | दुर्गविहारी
जरा इतरानही तिकीटावर झळकण्याची सन्धी मिळु द्या हो. किती दिवास तेच चेहेरे बघायचे.
12 Oct 2015 - 8:30 am | dadadarekar
१. मोदीजी एकेक देश फिरत आहेत. दिवसला १६ वेला कपडे बदलतात म्हणे.. वस्त्रोद्योगाला चालना देण्याच्या गांधीव्रताचा हा भाजपी अवतार.
२. बीफ खाल्ल्याच्याआरोपावरुन काही धर्मांध भाजप्यानी मुस्लिम मनुष्याची हत्या केली.
३. तूरडाळ १५० .... २०० !
४. मुबैत डॉ. बाबासाहेबाम्च्या स्मारकासाठी मोदी आले. पण सेनेला निमंत्रण नव्हते म्हणे.
12 Oct 2015 - 11:24 am | dadadarekar
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे माजी राजकीय सल्लागार आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकण्यात आली. कुलकर्णींच्या घराजवळच ही घटना घडली. शिवसैनिकांनीच ही शाईफेक केली, असा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केला
12 Oct 2015 - 1:14 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
समारंभ होणारच हे सुधींद्र ह्यांनी ठणकावून सांगितले होते.पोकळ देशभक्तीचा वसा घेतेलेल्या शिवसैनिकांना आयते कोलीत मिळाले.
पूर्वी जावेद-मियॉदादला मातोश्रीवर बाळासाहेबांनी आवताण दिले होते.२००४ साली.तेव्हा मर्द मावळ्यांनी शाई-शेण काही उडवले होते का राज-उद्धव,बाळासाहेबांवर,? वय झाल्याने स्मृती दाद देत नाही आता.
12 Oct 2015 - 1:20 pm | टवाळ कार्टा
हायला....असे पण झालेले?
12 Oct 2015 - 2:05 pm | गॅरी ट्रुमन
हो असे झालेच होते. जावेद मियांदादने शारजामध्ये चेतन शर्माला शेवटच्या चेंडूवर मारलेला 'तो' षटकार आपण कधीच विसरू शकणार नाही असे बाळासाहेबांनी जावेद मियांदादला सांगितले होते. (रच्याकने-- ज्यांनी ज्यांनी तो षटकार मॅचमध्ये बघितला आहे त्यांना तो विसरता येणे खरोखरच शक्य नाही. मी पण त्यातलाच :). तेव्हा या बाबतीत बाळासाहेबांची बाजू मला पटते :) )
तसेच बाळासाहेब गेल्यानंतर जावेद मियांदादनेही आपल्याला स्वतःला दु:ख झाले आहे असे म्हटले होते.
12 Oct 2015 - 3:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
तो षटकार आवडला म्हणून तथाकथित देशप्रेम बाजूला ठेऊन घरी आमंत्रण द्यायचे ? मग एवढेच कलाप्रेमी म्हणवताय तर गुलाम अलीच्या कार्यक्रमाला विरोध का? अदनान सामीला विरोध का नाही?
असल्या माकडचाळ्यांमुळे शिवसेना स्वबळावर सत्तेवर येणे कदापी शक्य नाही असे हे पूर्वीच म्हणाले होते.
12 Oct 2015 - 3:33 pm | गॅरी ट्रुमन
अहो माई, तो षटकार विसरता येणे शक्य नाही ही भूमिका पटते हो. दाऊदच्या व्याह्याला घरी बोलावायची भूमिका पटते असे कुठे म्हटले आहे?
(जावेद मियांदादच्या त्या षटकाराचा आणि गुलाम अलींच्या बर्याचशा गझलांचा प्रचंड मोठा फॅन) गॅरी ट्रुमन
12 Oct 2015 - 3:46 pm | प्यारे१
https://www.youtube.com/watch?v=vNOy6AeULNk
एक मजेशीर प्रकार ;)
12 Oct 2015 - 4:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यात भूमिका कसली आली रे ट्रूमना? मग ईमरान खान हा थोर खेळाडू होता,परवेझ मुशर्र्फ हे कसलेले सेनानी होते.. उद्या अशीच वाक्ये राहूल गांधीने फेकून त्यांना आमंत्रीत केले तर तुझी भूमिका अशीच असेल का?
12 Oct 2015 - 6:27 pm | बॅटमॅन
माईशी सहमत. (काञ दिवस आलेत =)) )
12 Oct 2015 - 1:51 pm | प्यारे१
शिवसेनेच्या म्हणण्यापेक्षा प्रमुखांच्या आणि नंतर कार्यकारी अध्यक्षांच्या (ते एकटे कसे असतील कधी? ते विथ सगळे गणगोत) राजकीय कोलांट्याउड्या हा एक विनोदाचा (अर्र्र्र्र्र्र चुक्कून आलं) अभ्यासाचा विषय आहे.
12 Oct 2015 - 8:53 pm | श्रीगुरुजी
अरे माईसाहेब,
तुझे वय झाले असले हे खरे असले तरी स्मृती दाद देत नाहीत अशी थाप मारू नकोस. तुला सोयिस्कर गोष्टी बरोब्बर आठवतात आणि गैरसोयीच्या गोष्टींचे विस्मरण झाल्याची सबब पुढे करतोस.
२००४ मध्ये बाळासाहेबांनी जावेदला आमंत्रण दिलेले नव्हते. त्याला आमंत्रण देण्याची बाळासाहेबांना शष्प गरज नव्हती. जावेद स्वतःहून बाळासाहेबांना भेटायला गेला होता. त्याला मातोश्रीवर कर्नल (दिलीप वेंगसरकर) घेऊन गेला होता. पाकिस्तान अतिरेक्यांचा पाठिंबा जोवर थांबवित नाही तोपर्यंत पाकड्यांना मुंबईत खेळू देणार नाही अशी बाळासाहेबांची भूमिका होती. पाकड्यांना भारतात खेळू द्यावे अशी विनंती करण्यासाठी जावेद बाळासाहेबांना भेटला होता. बाळासाहेबांनी अर्थातच आपली भूमिका कायम ठेवली.
अजून एक. २००४ मध्ये तो दाऊदचा व्याही झाला नव्हता. तो दाऊदचा व्याही २००५ किंवा २००६ मध्ये झाला. त्यामुळे बाळासाहेबांनी दाऊदच्या व्याह्याला घरी यायचे आमंत्रण दिले होते हा शुद्ध अपप्रचार आहे.
12 Oct 2015 - 12:53 pm | श्रीगुरुजी
हा धागा परत जिवंत झालेला दिसतोय.
12 Oct 2015 - 3:50 pm | dadadarekar
अच्चे दिन आ गये अशी पिप्पाणी फुंकून आपण गायब झालात . म्हणून धागा वर काढला.
बीफही नाही आणि तूरडाळही नाही अशी दारूण अवस्था झालीय.
सरकार सोने व घरकर्जावर अजुन ट्याक्सेस लावणार आहे असे काल ऐकले.
कसं काय गुर्जी बरं हाय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का ?
12 Oct 2015 - 4:04 pm | dadadarekar
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्व स्नानासाठी येणाऱ्या परराज्यातील भाविकांची वाहतूक पोलिसांकडून सर्रास लूट होत आहे. महाराष्ट्रात प्रवेश केल्याबरोबर होत असलेल्या लुटीचा त्रास नाशिकपर्यंत वाढतच जातो. असेच पैसे वाटून थकलेल्या एका परप्रांतीय कुंटुबाचा आज पारा चढला आणि त्यांनी थेट रामकुंडावरील पोलिस चौकीतच अक्षरशः धिंगाणा घातला. यातून पोलिसी रूबाब मिरवणाऱ्या दादांची मात्र चांगलीच गोची झाली
12 Oct 2015 - 6:15 pm | हेमंत लाटकर
मोदी सरकारने 1 वर्षात काय केले, काय केले नाही हे कसे काय ठरवणार.
55 वर्षात काॅग्रेसने काय केले हे कोणी विचारत नाही.
12 Oct 2015 - 6:27 pm | बॅटमॅन
आयला, म्हणजे शाळेत अभ्यास का करत नाहीस असे बापाने मुलाला विचारले तर
"गेली ५० वर्षे तुम्ही काय करत होता? तुम्ही कामे केली असती तर मला अभ्यास करायची गरजच पडली नसती" असे म्हणण्यापैकी आहे हे.
12 Oct 2015 - 6:49 pm | कैलासवासी सोन्याबापु
ठ्ठो!! :D
गॉथम नरेश न पार ब्याटमोबिल चालवलीन
12 Oct 2015 - 7:46 pm | बॅटमॅन
धन्यवाद सरजी :)
12 Oct 2015 - 8:47 pm | श्रीगुरुजी
थोडा फरक आहे. इथे बाप मुलाला विचारत नसून अनेक वर्षे सातत्याने नापास झालेला एक भाऊ दुसर्याला अभ्यासाबद्दल विचारत आहे. त्यावेळी दुसरा भाऊ जे उत्तर देईल तेच उत्तर भाजप कॉंग्रेसला देत आहे.
23 Oct 2015 - 7:28 am | नाना स्कॉच
काँग्रेस अन बीजेपी "भाऊ भाऊ" असल्याचे मानलेत! आनंद जाहला!!
12 Oct 2015 - 9:37 pm | नाव आडनाव
:)
लैच जोरदार टोला हाणलाय !
12 Oct 2015 - 7:56 pm | प्यारे१
भारतास प्रगतीपथावर नेण्यास काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा हात आहे. भारताबरोबर स्वतंत्र झालेली अनेक राष्ट्रे पाहून असा निष्कर्ष काढता येतो. अजूनही प्रगती निश्चित करता आली असती मात्र म्हणून केलेल्या प्रगतीबाबत नकार देता येणार नाही.
आसो!
12 Oct 2015 - 8:57 pm | श्रीगुरुजी
"India has developed not because of Congress but in spite of Congress" असे अनेक ठिकाणी वाचलेले आहे.