गोव्याची साद - भाग ३

किणकिनाट's picture
किणकिनाट in भटकंती
5 Jun 2015 - 1:21 pm

गोव्याची साद - भाग २

गोव्याची साद - भाग १

गोव्याची साद - भाग ३

तर पुढचे दोन दीवस म्हणजे नुसते खाणे-पिणे, समुद्रात सकाळ संध्याकाळ २-२ तास डुंबणे आणि जवळपास भटकणे यात घालवले.
भटकंतीमधे किल्ला काबो-डी-रामा ला भेट.

पाळोळेकडून अगोंडा किनारा रस्त्याने अजून बरेच पुढे सरळ सरळ जायचे. जाताना डावीकडे अगोंडा, खोला किनार्यांकडे जाणारे रस्ते लागतात. हा छोटा प्रवाह/नदी जिथे समुद्राला मिळते तेथून अगोंडा किनारा चालू होतो.

Agonda 1

Agonda 2

Agonda 3

या किनार्यांकडे न वळता आम्ही थेट काबो-डी-रामा पर्यंत गेलो. पाळोळे पासून साधारण २५ कि.मी.

Road to kabo-de-rama

road to k-d-r

रस्त्याला बराचसा चढ होता. एक डोंगरच चढून जात होता रस्ता. उजवीकडे डोंगर आणि घनदाट झाडी, डावीकडे अगदी दरी नाही म्हणता येणार, पण तीव्र उतार आणि त्यामधेही दाट झाडी. ८०% पेक्षा जास्त झाडं काजूची होती. काजूच्या मोहोर आणि फळांचा धुंद सुवास भरून राहीला होता. रस्ताभर काजूच्या फळांचा खच पडल होता, हा असा.

Kaaju 1

Kaaju 2

अगदी राहावलेच नाही म्हणून एका मोठ्या झाडाखाली थांबलोच. अगदी डोळ्यासमोर एक पिवळे धम्मक फळ खालच्या पानांच्या सड्यावर पडलं, आणि त्याच्यामागे अजून एक. तो डोंगरी मेव्याचा प्रसाद फुकट घालवला नाही. जवळ जवळ ७-८ वर्षांनी असे पिवळे जर्द काजू चोखून खाता आले; ह्या आधी दापोली जवळच्या डोंगरामधे खाल्ले होते. शहरांमधे ही डोंगरफळे विकत मिळतात पण ती मजा नाही. विकत घेऊन कधी खाल्ले नाही पण यापुढे लक्षात ठेवून विकत घेऊन पण खायचे ठरवले आहे. पुढे किल्ला काबो-डी-रामा
किल्ला काबो-डी-रामा ची प्रकाशचित्रे -

kabo de rama 1

k-d-r 2

k d r 3

k d r 4

किल्ल्यामधे काहीही माहितीचे बोर्ड्स नाहीत. भग्नावस्थेतील बुरुज आणि तट आहे. काही तोफा आहेत. एक सुव्यवस्थेतील चर्च आणि फुलझाडे आहेत.

k d r 5

k d r 6

सभोवताल विहंगम समुद्र आणि निसर्गद्रुश्ये आहेत.

k d r 7

k d r 8

k d r 9

k d r 10

k d r 11

किल्ल्याच्या नावावरून अंदाज येतो आणि काही स्थानीक दुजोरा देतात की श्रीरामांचे वास्तव्य काही काळ येथे होते. कधी ? - माहीत नाही. तर असो.

भटकंतीमधे मल्लिकार्जुन संस्थान देवस्थान. (काणकोण कारवार रस्त्याने ३-४ कि.मी. जाऊन डावीकडे वळायचे - पुढे अजून २.५ कि.मी.)

Mallikarjun 1

Mallikarjun 2

Mallikarjun 3

Mallikarjun 4

पाळोळे गांव असे आहे. गावातील रस्ते, गावातून किनार्याकडे जाणारे आपल्या कोकणातील पांदीसारख्या पाऊलवाटा, पर्यटकांसाठी जिथे तिथे केलेल्या व्यवसायीक व्यवस्था आणि स्वागत.

Palolem 1

Palolem 2

Palolem 3

Palolem 4

(सीझनमधे साधारण ३ ते ४ आठवडे या सर्व व्यवस्था , घरगुती रहण्याच्या सोयी सुद्धा येथे तुटपुंज्या वाटू लागतात.)

Beach 1

खाण्याची चंगळ

Choose your fish

Fish 1

Fish 2

तुम्ही सांगाल त्या प्रकारे सिलेक्ट्वलेला मासा हजर करणारे बीच शॅक्स.

पर्याय - फीश बार्बेक्यू, तंदूर, तवा फ्राय, रवा फ्राय, मसाला फ्राय (रशाड, गोवन, मंगलोर, कॅफ्रियल, विंदालू [शक्यतो प्रॉन्स विंदालू]) फीश करीज (सर्व प्रकार ), कलामारी (स्क्वीड्स), क्रॅब्स (सूप्स, स्ट्फ्ड् मसाला बेक्ड, स्ट्फ्ड् बेक्ड विथ चीझ, मसाला, करी, ई.) माशांच्या विदेशी पा.क्रु. ईथे अजून एक गंमत आहे. ठणकवून जेन्यूईन मेक्सीकन, ईटालियन, थायी , रशियन, ई. सांगीतलेलि डीश अगदी वेगळ्या रंग-रूप-चवी मधे पेश करणारेच बहुसंख्य - पण ती ओरिजिनॅलिटीची कल्पना सोडली तर चव, सर्विंग, क्वांटीटी एकदम मनास पसंत पडेल याची खात्री. रेड स्नॅपर / व्हाईट स्नॅपर बार्बेक्यू, तंदूर, तवा फ्राय कलेजा खलास (जर त्याची बारीक हाडे वगळून व्यवस्थीत खाता येत असेल तर - अहो काटे कसले - बारिक बारीक हाडेच ती.

व्हेज सिझलर्स

veg 1

बीच रोड्वर एक रेस्टॉरंट आहे - मॅजिक इटली. (दिवसा बंद) संध्या. ५ ते रा. ११ चालू.

Magic Itali

ईटालियन आवडणार्यांसाठी ही मेजवानी होऊ शकते. येथे पिझ्झा बनवायला वूड ओवन आहे आणी ते असे लिहितात की पिझ्झ्यासाठी लागणारे चीझ ते इटलीहून इंपोर्ट करतात. नॉनव्हेज मेनूकार्ड पाने भरून आहे. व्हेज पर्याय फार कमी. ६ एक वर्षांपासून पक्षी-मटन खाणे सोडल्याने आणि पिझ्झ्यावर टॉपिंग म्हणुन मासा पसंत पडत नसल्याने शाकाहारी खाण्याची जबरदस्ती होते. पण तरिही दर ट्रीपला एकदातरी आवर्जून भेट देतो असे हे ठीकाण आहे. त्याचे कारण ह्या खालच्या दोन डीशेस. मॅजिक इटली स्पेशॅलिटी - फोर चीझ पिझ्झा आणी स्पिनॅच पिझ्झा.

pizza

चीझ लाजवाब आणि चव २००% . दोन डिश पण तिघांत संपवताना मारामार होते.

मॅजिक इटली साधारणपणे १ जून ते १५ सप्टेंबर पर्यंत बंद ठेवले जाते . (विदेशी आणि देशी दोन्ही पर्यटकांचा ऑफ सिझन)

भटकंतीमधे राजबाग बीच आणि ललीतचा गोल्फ कोर्सचा छोटा भाग

Raajbag 1

Raajbag 2

Raajbag 3

Lalit 1

Raajbag 2

Lalit 3

या वेळी एक नव्याने परत चालू केलेले रेस्टॉरंट हेरले - पळोळे गावात शिरतानाच सू-माया . एकदा ट्राय करायला हरकत नाही म्हणून एका दुपारच्या जेवणासाठी गेलो आणि अजून एक चांगला अनुभव आणि जेवण पदरात पाडून घेतले.

Sumaaya 1

Su Maayaa 2

याच्या मालकाला तीन वेळा त्याचे नाव विचारले, प्रत्येक वेळि म्हणे "माझे मित्र मला बेकहेम म्हणतात." परत विचारले की बाबा खरे नाव काय तर म्हणे "मै फूटबॉल बहोत अछ्छा खेलता. मेरे फ्रेंड्स मुझे बेकहेम बुलाते." जेवण चांगले होते. बांगडा रशाड मसाला, प्रॉन्स, फिश करी वगैरे नेहमीचेच. कालवं मसाला ची ऑर्ड्रर दिली तर बेकहेम बाबा कालवं ओल्या खोबर्यात मसाला ड्राय फ्राय करून घेऊन आला. चित्रात दिसतायत. त्याला म्हटले कि बाबा ड्राय फ्राय नको होते तर म्हणे "इसे खानेका." (म्हणजे त्याचा अर्थ - ते नेहमीच खाता हो, हे खाऊन तर बघा, आपल्यासाठी प्रेमाने केले आहे. हे समजून घ्यायचे) ; आमचा गोव्यातला बहुतेक टिकाणचा अनुभव असा आहे की नेटीव गोवन माणूस मराठी, हिंदी, इंग्लीश मधे सफाईदार संभाषण करू शकत नाही. तुटक तुटक बोलतो. त्याचा भावार्थ समजून घ्यायला काही संभाषणांचा दीर्घ अनुभव हवा. जर त्याचे प्रिपरेशन आवडले नाही म्हटले असते तर त्याने बिलात पण लावले नसतेन याची खात्री आहे. चित्रातल्या तिसर्या अचानक आणुन ठेवल्यान आम्ही म्हटले की आम्ही नाही ऑर्ड्रर केली तर म्हणाला काँप्लीमेंटरी आहेत. त्यापण तिसर्यो वाटी नाही, चांगली मोठी प्लेट भरून

Su Maayaa 3

Su maya 4

जेवण आणि बेकहेम बाबांशी संभाषण २ एक तासांचा अंक होता. परत गेल्यावर याला जाता जातानाच " हाय " म्हणुन जाणार आणि एक-दोन जेवणं याच्याकडे लागली.

तर एकंदरीत अजून एक आवडत्या बीच वरील ३ दिवसांचा मुक्काम एंजॉय केला, मनसोक्त खादाडी, समुद्रात डुंबणे, भटकंती केली आणि १ एप्रिलला सकाळी परत उत्तर गोव्याकडे कूच केले. आता दोन दिवस आमचे बुकिंग होते - वॅगॅतॉर जवळ - आसागावला - रॉयल आसागांव क्लबमधे. पुढच्या भागात अंजुना, वॅगॅतॉर, आसागांव आणि आसपासची आणि एकंदरीतच गोव्यातील पर्यटक आणि स्थानीक लोकांत आवडणारी खादाडीच्या ठिकाणांची यादी आणि त्या ठिकाणांबाबतची आमची मते सांगीन. आणि हो - वॅगॅतॉर समुद्रकिनार्यावर अनुभवलेला एक फिल्मी स्टाईल, थरारक आणि अतिगंभीर असा प्रसंग पण सांगेन.

हा भाग टाकायाला जरा उशीरच झाला. क्षमस्व.कार्यबाहुल्या हो. प्रकाशचित्रे चांगल्या प्रतीची दिसतील हा प्रयत्न केला आहे. त्या साठीच्या मोलाच्या सल्ल्यांसाठी रंगाशेठ, एक्काकाका आणि सर्वांचेच आभार. भेटू पुढच्या भागात.

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

5 Jun 2015 - 1:33 pm | प्रमोद देर्देकर

लय भारी फटु आणि वर्णन पण मस्तच.

हा भाग सर्वात जास्त आवडला... फोटो पण खुपच छान

मुक्त विहारि's picture

5 Jun 2015 - 1:51 pm | मुक्त विहारि

मस्त लिहीले आहे.

गोवा म्हणजे आमच्या द्रुष्टीने तीर्थक्षेत्र.

बर्‍याच फोटो बाबत आमचा गणेशा झाला.

(स्वगतः फार जळवले ह्या माणसाने.)

मस्तच भटकंती आणि गोवन खादाडी वर्णन.
(फोटोत हिरवट झाक का दिसते आहे? व्हाइट बॅलन्स सेटींग ओटोवरचे निघून इनकँडेसन्सवर होते का? )

आनंदराव's picture

5 Jun 2015 - 1:56 pm | आनंदराव

तोंडाला पाणी सुटले...
आता तांबडा पांढर्‍यावर तहान भागवुन घेतो.
मस्त भटकंती !

मोहनराव's picture

5 Jun 2015 - 2:16 pm | मोहनराव

वा काय ते फोटु.. सगळंच छान!

किणकिनाट's picture

5 Jun 2015 - 4:05 pm | किणकिनाट

प्रमोदजी, गणेशा, मु.वि., श्री. कंजूस, आनंदराव, मोहनराव चांगल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

श्री. कंजूस, विचारले काय समजलेच नाहि. बाउंसर गेला. काहीतरी कॅमेरा सेटींगबद्दल आहे हे समजले. काय आहे, ग्लास आणि घंटी हातात आली की किणकिनाट करायचा आणि कॅमेरा आला की क्लिकक्लिकाट करायचा एवढेच समजते. त्यात ह्या वेळेचे बरेचसे फोटो सौं. च्या नव्या लिनोवो ए-६००० ने घेतलेत. Aim & shoot. रोख आणि ठोक.