मिसिंग यु, सद्दाम !

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in काथ्याकूट
28 May 2015 - 7:15 pm
गाभा: 

इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!!

http://i1.wp.com/www.loonwatch.com/wp-content/uploads/2014/08/ISIS_Behea...

प्रतिक्रिया

फोटोचे प्रयोजन कळाले नाही.

कितीही सत्य असले तरी असले फोटो बघवत नाहीत.

+१ मला लेखाचंही प्रयोजन कळलं नाही. अर्धवट प्रकाशित झाला आहे का?

विवेकपटाईत's picture

28 May 2015 - 8:17 pm | विवेकपटाईत

सद्दाम हुसैन कसे ही असले तरी त्यांनी समस्त इराकला एका सूत्रात बांधून ठेवले होते. (जसे आपले कांग्रेसी किती ही भ्रष्ट असले तरी त्यांनी देशाला एका सूत्रात बांधून ठेवले होते). देशात शांती होती. (आपल्या देशात आज ही आहे आणि भविष्यात ही राहील)
इजिप्त, सिरीया, लिबिया आणि इराक सर्व ठिकाणी अमेरिकेने खेळी केली सोशल मेडीयाचा गैर वापर केला (मुख्यत: इजिप्त).
तेलाच्या पैश्याच्या जोरावर मध्य आशियात प्रगती झाली नाही पाहिजे असे धोरण अमेरिकेने १९७४ नंतर अमलात आणायला सुरु केले, त्याचा परिणाम, इराक -इराण युद्ध ते आजचे अलकायदा आणि ईसीस). आपल्या देश्यात ही तथाकथित सोशल मिडीयाच्या (... फ...) सहाय्याने देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होतास पण आपल्या जनतेने त्याला निवडणूकीत प्रतिसाद दिला नाही. अन्यथा आपल्या देशात ही यादवी माजली असती.
(दिल्लीत थोड्या प्रमाणात तो यशस्वी ही झाला- लोकांच्या मनातून लोकतंत्र विषयी विश्वास उडविण्याचा थोडा फार प्रयत्न पुढील ५ वर्ष हे लोक करतील- पण आपल्या देशाचे एक चांगले आहे. इथे गादी आपल्या हिशोबाने नेत्यांना पूर्व परंपरेनुसार चालविते अराजकतेची शक्यता कमीच)

बाबा पाटील's picture

28 May 2015 - 7:32 pm | बाबा पाटील

खर आहे,सद्दामाला अमेरिकेने मारल्याचा भुर्दंड सगळ्या जगाला भरावा लागतोय.

श्रीगुरुजी's picture

28 May 2015 - 8:20 pm | श्रीगुरुजी

सद्दाम हा नरराक्षसापेक्षाही क्रूर होता. त्याने, त्याच्या बायकोने व जवळच्या नातेवाईकांनी अत्यंत क्रूरपणे अनेकांना ठार केले होते. गडाफी, लादेन, सद्दाम अशा नरराक्षसांना मारून अमेरिकेने मोठे काम केले आहे.

जनरल गद्दाफी हा वयाच्या केवळ 27 व्या वर्षी देशाचा प्रमुख होऊन 70-72 व्या वर्षी पर्यन्त अतिशय चांगल्या प्रकारे राज्य चालवणारा शासनकर्ता होता.
अमेरिका विरोध हा त्याचा अजेंडा असल्याने अमेरिका त्याच्या विरोधात प्रचार करणं ओघानं आलंच. शेवटी शेवटी पळून जाण्याची संधी असतानाही त्यानं पळून न जाता आपल्या जन्मगावीच् राहून तो लढत राहिला व शेवटी हाती लागला. आपल्या कुटुंबियाना त्यानं शेजारच्या देशांमध्ये व फ्रांस सारख्या देशांमध्ये स्थलांतरित केलं होतं.
अमेरिका जिथे 'तेल' आहे तिथे तोंड घालतेच् (आतापर्यंत तरी)

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 9:03 pm | संदीप डांगे

सहमत.
गडाफी एक प्रखर राष्ट्रभक्त होता. आपल्या कार्यकाळात त्याने अमेरिकेची हुशारी त्यांच्याच घशात घालून मांडलिकत्व पत्करण्यास नकार दिला. गडाफीचा सद्दामसारखा काटा न काढता आल्याने सोशल-मीडीया-क्रांतीच्या नावाखाली अमेरिकेने कार्यभाग साधला.

माझे काही चुकत असेल तर दुरुस्त करावे ही विनंती.

- (प्रखर राष्ट्रभक्तांच्यात धर्माधारित भेदभाव करू नये असे मानणारा एक राष्ट्रभक्त.)

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Jun 2015 - 3:34 pm | पुण्याचे वटवाघूळ

लाहोरच्या क्रिकेट स्टेडियमचे नाव गड्डाफी स्टेडियम का आहे हे पण जरा सांगा की. गड्डाफीचा पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला सपोर्ट होता. सद्दामचा भारताला सपोर्ट म्हणून त्याला चांगले म्हटले जात असेल तर गड्डाफी पाकड्यांना धार्जिणा होता म्हणून त्याला नावे का ठेवली जात नाहीत? की दोघांच्याही उचलबांगडीमध्ये 'अमेरिका' हा कॉमन फॅक्टर होता म्हणून अमेरिका करेल ते चुकीचे असे म्हणत अमेरिकेला नावे ठेवायची?

संदीप डांगे's picture

3 Jun 2015 - 3:47 pm | संदीप डांगे

ओके. या प्रश्नांचे उत्तर देण्याआधी हिटलर, मुसोलिनी, माओ, शिवाजीमहाराज यांच्याबद्दल आपले काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Jun 2015 - 4:20 pm | पुण्याचे वटवाघूळ

हिटलर, मुसोलिनी, माओ, शिवाजीमहाराज यांच्याबद्दल आपले काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.

त्याआधी हिटलर, मुसोलिनी आणि माओ यांच्या पंगतीत शिवाजीमहाराजांना का न्यावेसे वाटले हे जाणून घ्यायला आवडेल.

संदीप डांगे's picture

3 Jun 2015 - 4:27 pm | संदीप डांगे

हा हा हा. आपणांस मुद्दा कळला नाही.

होबासराव's picture

3 Jun 2015 - 4:04 pm | होबासराव

सद्दामचा भारताला सपोर्ट म्हणून त्याला चांगले म्हटले जात असेल
सद्दाम कसा होता हे सगळ्याना माहित आहे आणि काहि सदस्यांच्या प्रतिसादात याचे डिटेल्स सुद्धा आहे. मि भारतीय असल्याने जर कुठलाही आंतरराष्ट्रीय नेता जर भारताच्या भुमिकेचे समर्थन करत असेल तर एक भारतिय म्हणुन तो माझ्यासाठि चांगला आहे.
गद्दाफी आणि सद्दाम लाख वाईट माणस होते, पण त्याना मारण्याचा अमेरिकेला काय अधिकार होता ?
आजचि लिबिया आणि इराक ची अवस्था पाहता आपल्याला असे वाटत नाहि काय कि हे ह्या वाईट माणसांच्या हातात असताना ह्यापेक्षा हजार पटिने चांगल्या अवस्थेत होते.

होबासराव's picture

3 Jun 2015 - 4:06 pm | होबासराव

बाकि ते हामरिका, व्हिसा, डालरा, ह्याला आपला पास.

संदीप डांगे's picture

3 Jun 2015 - 4:08 pm | संदीप डांगे

गद्दाफी आणि सद्दाम लाख वाईट माणस होते, पण त्याना मारण्याचा अमेरिकेला काय अधिकार होता ?

सहमत.

आता अमेरिकाही पाकिस्तानला सपोर्ट करते भारताविरुद्ध तेव्हा अमेरिकाप्रेमींचा भारतीयपणा डॉलरच्या गंगेत वाहून जातो काय?

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2015 - 12:25 pm | श्रीगुरुजी

गडाफी हुकूमशहा होता. आपल्याच देशातील नागरिकांवर त्याने अत्याचार केले होते. त्याने अनेक देशातील अतिरेकी संघटनांना पाठबळ दिले होते. ब्लॅक पँथर्स पार्टी, आयरीश रिपब्लिकन आर्मी, रेड आर्मी, रेड ब्रिगेड, पॅलेस्टाईनमधील अनेक अतिरेकी संघटना अशा अनेक अतिरेकी संघटनांना त्याने आर्थिक व राजकीय पाठबळ दिले होते. १९७२ मधील म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेत ११ इस्रायली खेळाडूंना मारणार्‍या ब्लॅक सप्टेंबर या अतिरेकी संघटनेला गडाफीचा भक्कम पाठिंबा होता. त्याने त्यावेळी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांचे मृतदेह लिबयाला आणून त्यांना एका हीरोच्या थाटात मूठमाती दिली होती. बांगलादेशाच्या शेख मुजीबर रेहमान हत्याकांडातील दोन आरोपींना गडाफीने लिबयात आश्रय दिला होता. अतिरेक्यांनी लुफ्तांसाच्या फ्लाईट ६१५ चे अपहरण केल्यावर त्यातील प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात मुक्त केलेल्या तीन अतिरेक्यांना गडाफीनेच लिबयात आश्रय दिला होता. १९८८ मध्ये या पॅन अ‍ॅम विमान कंपनीचे विमान बॉम्बने हवेत उडवून देण्यात आले होते. त्यात २४३ प्रवासी, १६ क्रू मेम्बर्स व जमिनीवरील ११ नागरिक अशा एकूण २७० जणांचा मृत्यु झाला होता. हे विमान उडविण्यात अब्देल्बसेत अल-मेगराही व लमिन खलिफा फिमा या दोन लिबयन अतिरेक्यांचा हात होता. या दोघांनाही गडाफीनेच आश्रय दिला होता.

सप्टेंबर २००९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात गडाफीने भाषणात काश्मिरचा उल्लेख करून काश्मिरच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊन काश्मिर भारत किंवा पाकिस्तानात न जाता स्वतंत्र देश व्हायला हवा असा उल्लेख केला होता. त्याच्या या भाषणानंतर तो काश्मिर फुटिरतावाद्यांचा हीरो झाला होता. भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यास सुद्धा त्याने याच भाषणात विरोध केला होता.

हा गडाफी मेला हे चांगलेच झाले.

प्यारे१'s picture

3 Jun 2015 - 1:26 pm | प्यारे१

>>>> आपल्याच देशातील नागरिकांवर त्याने अत्याचार केले होते

या एका वाक्यानंतर गद्दाफीच्या अत्याचारांबद्दल आणखी काहीही माहिती दिलेली दिसत नाहीये. माझ्या कम्पनीचं लीबिया मध्ये काम सुरु होतं आणि तथाकथित उठाव झाल्यावर लोक नेसत्या कपड्यानिशी भारतात परतले आहेत.
त्या लोकांच्या फर्स्ट हैण्ड माहितीनुसार गद्दाफीनं लीबिया च्या नागरिकांना अगदी व्यवस्थित 'पोसून' आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या होत्या. आणि गद्दाफीच्या राजवटीत तुलनेनं अतिशय चांगली प्रगति लीबिया करत होता.(2008 च्या मंदीनन्तर मध्यपूर्वेतले लोक लीबिया ला व्यवसायासाठी संधी मानत होते)
इस्रायल च्या खेळाडूंना मारणं निषेधार्हच तरीही त्या घटनेतील दुसऱ्या बाजुचा समर्थक म्हणून गद्दाफीची काही बाजू असेलच की!
भारतातच काही जण आपण अतिरेकी म्हणत असलेल्या लोकांना स्वातंत्र्य सैनिक म्हणताना गद्दाफी सारख्या कडून भारतावर कशाही रीतीने अवलंबून नसलेल्या व्यकीला आपण कुठल्या बळावर आपला समर्थक बनवणार होतो?

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2015 - 2:58 pm | श्रीगुरुजी

गडाफीने केलेल्या अत्याचारांविषयी खालील लेख वाचा.

http://www.thedailybeast.com/articles/2011/09/03/inside-muammar-gaddafi-...

१९९६ मध्ये अबू सालिम तुरूंगात गडाफीच्या सैनिकांनी कैदेत ठेवलेल्या १२०० विरोधकांची हत्या केली होती. Abu Salim prison massacre या नावाने हे हत्याकांड कुप्रसिद्ध आहे.

http://www.andyworthington.co.uk/2011/03/02/how-the-abu-salim-prison-mas...

http://www.smh.com.au/world/laughter-joy-relief-and-unspeakable-memories...

त्याने लिबयामध्ये काही काळ शरियावर आधारीत कायद्यांची सक्ती केली होती. त्यामुळे नागरिकांवर अनेक बंधने आली होती.

गडाफीने केलेल्या अत्याचारांविषयी एवढे पुरेसे आहे.

मघाशी प्रतिसाद लिहिला आणि नेट प्रॉब्लेम झाला.
आपल्याला गद्दाफी भारत की नजर से हवा आहे की गद्दाफी लीबिया चा नेता म्हणून बघायचा आहे यावर दृष्टीकोन बदलत असल्यानं सध्या पास देतो.
जाताजाता: मध्यपूर्वेत 2008 ला मंदी आल्यानंतर व्यवसाय संधी म्हणून लीबिया कड़े का पाहिलं गेलं होतं? आता तसं पाहिलं जाईल का?

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2015 - 6:42 pm | श्रीगुरुजी

>>> आपल्याला गद्दाफी भारत की नजर से हवा आहे की गद्दाफी लीबिया चा नेता म्हणून बघायचा आहे यावर दृष्टीकोन बदलत असल्यानं सध्या पास देतो.

भारताच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर गडाफी आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतविरोधी होता. परंतु काश्मिर प्रश्न किंवा संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा समितीत भारताला हवे असलेले कायमस्वरूपी सदस्यत्व इ. बाबतीत जगातील सर्वच देश भारताच्या बाजूने आहेत असे नाही. पण तरीसुद्धा त्या देशांशी आपले राजनैतिक संबंध चांगले आहेत.

लीबियाचा नेता या नात्याने तो हुकूमशहा होता. तसेच तो अनेक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनांना पाठबळ देत होता. या नात्याने तो गेला हे चांगलेच झाले.

>>> जाताजाता: मध्यपूर्वेत 2008 ला मंदी आल्यानंतर व्यवसाय संधी म्हणून लीबिया कड़े का पाहिलं गेलं होतं? आता तसं पाहिलं जाईल का?

कल्पना नाही.

प्यारे१'s picture

3 Jun 2015 - 6:54 pm | प्यारे१

अरे वा!
एक भारतविरोधी हुकुमाशहाची सत्ता असताना भारतीय कंपन्यांना गेली अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळते, अनेक भारतीय वर्षानुवर्षे तिथं राहतात. आजही काहीजण आहेत.
अतिरेकी संघटना तुमच्या दृष्टीनं हो. त्यांच्या दृष्टीनं वेगळे आहेत त्यामुळे त्यांना मदत केली जाते. जगाच्या बाजारात अहिंसा वगैरे तत्व वर्षानुवर्ष फाट्यावरच मारली गेलेली आहेत. अगदी पाकिस्तान बरोबर सुद्धा भारत अतिशय सभ्य मुलासारखा नाकासमोर चालतो असं वाटत असल्यास भाबड़ेपणाचा कळस मानावा लागेल.
व्यावसायिक संधीबाबत कल्पना नाही म्हणत आहात त्याला होकार भरला तरी अशा संधी सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्थैर्य असल्याशिवाय निर्माण होत नाहीत हे मान्य करायला प्रत्यवाय नसावा

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Jun 2015 - 3:38 pm | पुण्याचे वटवाघूळ

हा गडाफी मेला हे चांगलेच झाले.

असं कसं बोल्ता गुर्जी तुम्ही? त्याला अमेरिकेने मारला होता ना? मग अमेरिका करते ते सगळेच वाईट असल्यामुळे गड्डाफी मेला तर ते चांगले कसे होइल?

चिनार's picture

3 Jun 2015 - 12:37 pm | चिनार

थोडी अवांतर माहिती -
झुल्फिकार आली भुट्टो नी पाकिस्तानच्या अणू कार्यक्रम राबवण्यासाठी गद्दाफी कडे आर्थिक मदत मागितली होती. गद्दाफी ने पाकिस्तान ला १ अब्ज USD ची रोख मदत केली होती तीसुद्धा १९७४ साली. गद्दाफी ची फक्त एकच अट होती ती म्हणजे पहिले अण्वस्त्र लिबियाला मिळावे.
तो हुकुमशहा होता का हे माहिती नाही पण २७ व्या वर्षी तत्कालीन हुकुमशहा इद्रिस च्या विरोधात उठाव करून तो सत्ताधीश झाला होता.
सद्दाम काय किंवा गद्दाफी काय ..हे लोकं अमेरिकेपुढे कधीच झुकले नाहीत म्हणून अमेरिकीने त्यांना जास्तीत जास्त बदनाम केले.

काळा पहाड's picture

28 May 2015 - 11:30 pm | काळा पहाड

आपण तर बाबा सद्दाम चांगला होता असंच मानतो. तो काश्मीर प्रश्नावर भारताला युनो मध्ये कायम पाठिंबा द्यायचा. असं करणारा माणूस सैतान असला तरी माझं काही म्ह्णणं नाही.

स्वच्छंद's picture

1 Jun 2015 - 1:42 am | स्वच्छंद

लै भारी..

हुप्प्या's picture

29 May 2015 - 10:01 am | हुप्प्या

९/११ च्या धक्क्यातून अमेरिकन सावरायच्या आत खरे खोटे पुरावे मिसळून असे सादर केले की इराकविरुद्ध घोषित करायला कुठलीही अडचण आली नाही. पाताळयंत्री चेनी आणि महामूर्ख बुश आणि अनेक उद्योग ह्या लोकांनी हे कारस्थान केले. अमेरिकन लोकांच्या करातून मिळवलेले हजार अब्ज डॉलर अक्षरशः जळून राख झाले. त्यातून तेल वगैरे मिळायचे सोडाच. उलट एक अत्यंत अस्थिर, धर्मपिसाट लोकांच्या हातात गेलेला भूप्रदेश एवढेच ह्या नस्त्या उठाठेवाचे फलित. तमाम मध्यपूर्व आता अनेक वर्षे खदखदत ठेवण्याची सोय ह्या लोकांनी केली आहे. चेनीच्या हॅलीबर्टनचे उखळ पांढरे झाले. एक खोटारडा, कुठल्याही मुस्लिम देशावर आक्रमण करणारा भांडकुदळ देश अशी अमेरिकेची प्रतिमा बनली. आता खरोखरच कुठे मदत करायची झाली तर अमेरिकन जनता कच खाणार.
अमेरिकन इतिहासात ह्या घटनांची एक अश्लाघ्य लांछन म्हणून नोंद कायम राहील.
अर्थात आजही डिक चेनीला लाज, पश्चाताप वाटत नाही. नाही म्हणायला बुशचा बंधू राष्ट्राध्यक्ष बनू पहातो आहे त्याची पंचाईत होते आहे. इराकचे युद्ध चुकीचे होते म्हणवत नाही आणि योग्य होते असेही म्हणवत नाही.
राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणारी हिलरीही एकेकाळी इराकविरुद्धच्या युद्धाची मोठी समर्थक होती पण हा इतिहास आता लोक विसरले असावेत.
असो. कोळसा उगाळावा तितका काळाच. ९/११ च्या हल्ल्यामागचा खरा शिल्पकार बिन लादेन आणि त्याची अल कायदा ही पिलावळ ह्यांना विसरून इराकच्या मागे लागणे हे खरोखरच संतापजनक होते.

पैसा's picture

29 May 2015 - 11:03 am | पैसा

ते सगळे हरामखोर एकाला झाका आणि दुसर्‍याला काढा असले! दगडच. वीट कोणी नाही त्यात. मात्र फोटो बघून माणूस प्राणी सुसंस्कृत आहे यावरचा उरलासुरला विश्वास उडाला. हे असले भयाण प्रकार धर्माच्या नावावर होत आहेत? कुठेत सगळे सेक्युलर लोक??

नाखु's picture

29 May 2015 - 11:18 am | नाखु

मोदींचा-संघाचा-पर्यायाने भारताचा-आणि त्यामूळेच मिपाकरांचा हात आहे.

चिनार शेठ उठाओ लेखणी और चलावे इस विषयपर !
हितेसभाई "पुरावे" तयार करायच्या मागे लागाच.

आणि कॅप्टन ते सगळ्या रंगाचे चष्मे वाट रे मिपाकरांना (हिरवे-निळे-लाल्-भगवे-काळे)
जेप्या सत्काराला "चिखल आणि शेण्साडा" आणायला विसरू नको.

गेल्या महिनाभरातल्या मिपा राजकीय धुळवडीला वैतागलेला

कुठेत सगळे सेक्युलर लोक??

ते भाजप्-संघ यांच्या उपद्र्वमूल्यावर बारीक लक्ष्य ठेवून आहेत त्यामुळे या "किरकोळ" बाबींकडे देण्यासाठी वेळ नाहीयं

यशोधरा's picture

29 May 2015 - 8:30 pm | यशोधरा

नाखु +१

विशाल कुलकर्णी's picture

1 Jun 2015 - 10:07 am | विशाल कुलकर्णी

नाखु +१००

चांगला धागा म्हणून वाचायला सुरवात केली तर च्यामारी माझाच उद्धार सुरु आहे इथे !
राहुल गांधी आणि केजरीवाल ची शप्पथ घेऊन सांगतो इराक युद्धामध्ये माझा हात नाहीये हो नाखू साहेब

मार्मिक गोडसे's picture

29 May 2015 - 11:05 am | मार्मिक गोडसे

सद्दामला मारण्यासाठी अमेरिकेने केमिकल वेपन चा बागुलबूवा उभा केला परंतू साधी डांबराची गोळीही तेथे सापडली नाही, तरीही सद्दामला मारलेच. ह्यात अमेरिकेचा मुजोरिपणा व बालिश नेतृत्व दिसून येते.

मृत्युन्जय's picture

29 May 2015 - 11:43 am | मृत्युन्जय

सद्दामची किर्ती ऐकता तो चांगला होता असे म्हणवत नाही. पण तरीही आयसिस पेक्षा १ लाख पटींनी बरा. त्याला फुकटच मारला तेलापायी. अमेरिकेशी पंगा त्याला एकुणात महागच पडला.

तरीही काळा पहाड म्हणतात त्याप्रमाणे सद्दामने भारताला सपोर्ट केले असेल तर तो महान माणूसच म्हणायला हवा.

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 1:14 pm | टवाळ कार्टा

एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट केला तर त्याला चांगला अथवा विरोध केला तर त्याला वाईट म्हणायचे???? का तो जसा वागतो त्यावरून तो कसा आहे हे ठरवायचे???

#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^

बॅटमॅन's picture

29 May 2015 - 1:22 pm | बॅटमॅन

यालाच तर राजकारण म्हणतात. नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे. "वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा" अर्थात राजकारण हे वेश्येप्रमाणे अनेक रूपे बदलणारे असते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 May 2015 - 8:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

यालाच तर राजकारण म्हणतात. नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे. "वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा" अर्थात राजकारण हे वेश्येप्रमाणे अनेक रूपे बदलणारे असते.

अगदी सहमत रे. नैतिक अनैतिकता हे फक्त शब्दभ्रमाचे प्रकार आहेत राजकारणामधे.

विशाल कुलकर्णी's picture

1 Jun 2015 - 10:12 am | विशाल कुलकर्णी

नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे.

अगदी-अगदी ! नैतिकता-अनैतिकता या कालसापेक्ष किंवा फारतर स्थितीसापेक्ष संकल्पना आहेत असे माझे मत आहे.

एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट केला तर त्याला चांगला अथवा विरोध केला तर त्याला वाईट म्हणायचे???? का तो जसा वागतो त्यावरून तो कसा आहे हे ठरवायचे???

१. जोपर्यंत तो भारताला काश्मीर वर सपोर्ट करतोय तोपर्यंत(च) तो चांगला. नाहीतर तो वाईट.
२. राजकारणात कुणीही कायमचा मित्र नसतो. असतात ते फक्त कायमचे हितसंबंध.

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 1:39 pm | टवाळ कार्टा

मग अश्या लॉजिकने प्रत्येकजण त्याच्या त्याच्या दृष्टीने बरोबरच आहे...कोणीच चूक नै

काळा पहाड's picture

29 May 2015 - 1:55 pm | काळा पहाड

नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत का तालिबानी जेव्हा ते रशियाविरुद्ध लढत होते तेव्हा? तसंच असतं सगळं. फक्त लढाई दुसर्‍याच्या भूमीवर लढू द्यायची असते. इराण अमेरिकेला वाईट वाटतो आणि तो अणुबॉम्ब तयार करतो म्हणून तो आपल्याला पण वाईट असं नसतं कै. इराण पाकिस्तानचा गळा आवळू शकतो आणि आपल्या सैन्याला तळासाठी छाबाहार बंदर उपलब्ध करू देतो म्हणून तो चांगला आहे. इस्त्रायलनं वेस्ट कोस्ट आणि गाझा मध्ये बॉंबिंग करून निरपराधांना मारलं तरी आपल्याला रडार सिस्टीम पॅलेस्टीनियन्स देणार नाहीयेत.

अभिजित - १'s picture

29 May 2015 - 8:06 pm | अभिजित - १

+१००० मस्त

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 8:26 pm | टवाळ कार्टा

+१
सहमत :)

अभिजीत अवलिया's picture

31 May 2015 - 1:39 am | अभिजीत अवलिया

सहमत

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 May 2015 - 8:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

इस्राएल ची बाजु न्याय्य आहे. आणी इस्राएल सारखा छोटासा देश फक्त अस्मितेच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर काय करतोय हे बघुन खुप छान वाटतं.

कपिलमुनी's picture

1 Jun 2015 - 1:57 pm | कपिलमुनी

बाजू न्याय्य कशी आहे ते समजेल का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2015 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

जगाच्या सुरुवातीपासून चालत आलेले राजकारणाचे नियम...

नियम क्रमांक १ :

"या जगात हितसंबध हेच अग्रगण्य आणि अचल असतात, मित्र आणि शत्रू त्यावर अवलंबून बदलू शकतात."

नियम क्रमांक २ :

"नियम क्रमांक १ समजू-उमजू न शकणारे एक तर नष्ट होतात किंवा त्या नियमांचे पालन करणार्‍यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गुलाम होतात."

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2015 - 3:09 pm | श्रीगुरुजी

सद्दामने आपल्या राजवटीत आपल्या अनेक विरोधकांना ठार मारले होते. अनेक विरोधकांना व महिलांना कैदेत ठेवून त्याच्या सैनिकांनी अनन्वित अत्याचार केले होते. सद्दामला अमेरिकेने डिसेंबर २००३ मध्ये पकडले व डिसेंबर २००६ मध्ये फाशी दिले. त्याच्या मृत्युनंतर एका शियांच्या अतिरेकी संघटनेचा प्रमुख असलेल्या मुक्तदा अल सद्र याचे वर्चस्व इराकमध्ये वाढले. सद्दाम सुन्नी होता. इराकमध्ये शियांचे वाढते वर्चस्व सहन न झाल्यामुळे सुन्नींच्या इसिसचा उदय झाला. इसिसच्या उदयामागे इतर कारणांप्रमाणे हे एक प्रमुख कारण होते. या अतिरेकी संघटनेला सुरवातीच्या काळात सौदी अरेबियासारख्या काही सुन्नी देशांनी मदत केली असण्याची शक्यता आहे. इसिसचा पुढे भस्मासूर होईल असे कोणालाच वाटले नसावे. इसिस जे अत्याचार करीत आहे तसेच अत्याचार सद्दामनेही केले होते.

समजा अमेरिका २००३ मध्ये सद्दामच्या मागे लागली नसती तर २००३ पासून आजतगायत सद्दामनेसुद्धा हजारो लोकांचे प्राण घेतले असते. कदाचित पुन्हा एकदा कुर्दिश बंडखोरांवर रासायनिक अस्त्रांचा प्रयोग करून क्रूरतेचे प्रदर्शन घडविले असते. इसिसचा उदय झाला हे वाईटच झाले पण सद्दाम गेला हे चांगलेच झाले. सद्दाम असता तर इसिसचा उदय झाला नसता हे नक्की, परंतु लोकांवर अत्याचार व ठार मारण्याचे प्रकार सुरूच राहिले असते. सद्दाम आणि इसिस हे एकाच माळेचे मणी आहेत.

अमेरिकेसारखे दहशदवादी राष्ट्र या जगात दुसरे नसावे !
इराक,अफगणिस्तान ची वाताहत तर केलीच पण पाकड्यां वरच्या प्रेमाचा पाझर काही आटत नाही ! ज्या मुक्त हस्ताने ते पाकिस्तानला मदत करत आहेत ते पाहता आपल्याला भविष्यात भयानक हानीला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे !
आपल्याला एकाच वेळी दोन ठि़काणी युद्ध करण्याच्या स्थितीला सामोरे जावे लागेल असे दिसते ज्याला टू-फ्रंट वॉर असे म्हणतात. रशिया सुद्धा पाकिस्तानला भरघोस मदत करु लागला आहे आणि चीनला सुद्धा !
रशियाने पाकिस्तान बरोबर Mi-35 ची डील केली आहे तर चीन बरोबर S-400 Missile Systems ची डील केली आहे,एव्हढेच नव्हे तर रशियाने चीब बरोबर cyber-security agreement देखील केले आहे ! यात कमी म्हणुन की काय Russia-China Superjet-100 ची $3 billion ची डील सुद्धा झाली.
बरं अमेरिकेचा पाकड्यांना होणारा मदतीचा ओघ आणि त्याचे डिटेल्स पाहता पाकिस्तान किती विविध प्रकारे सज्ज होत आहे ते पाहुन प्रचंड काळजी वाटते !
Major U.S. Arms Sales and Grants to Pakistan Since 2001

जाता जाता :- आपली अवस्था एका पाण्याच्या पातेल्यात बसलेल्या बेडका सारखी झाली आहे, या पातेल्यातले पाणी तापते आहे आणि बसलेल्या बेडकाला हळु हळु वाढत्या तापमानाच्या पाण्याचे भानच नाही ! जेव्हा पाणी उकळुन चटका बसेल तो पर्यंत वेळ गेलेली असेल !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- What are Chinese submarines doing in the Indian Ocean, far from China’s maritime backyard? :- Chellaney.net

अमेरिका हे महाहरामखोर राष्ट्र आहे. त्यांनी केलेल्या अत्याचारांचा बदला घ्यायचा तर मग अख्खा देशच बेचिराख करावा लागेल.
बाकी सद्दाम कसाही असला तरी भारताला सपोर्ट देत असेल तर माझाही सपोर्ट त्याला आहेच.

अन सद्दाम कसाही असो, अमेरिकेचा नैतिक हक्क काय होता तिकडे जाऊन राडे करायचा? अन वर तोंड करून शहाणपणा शिकवताहेत *****चे! यांच्या ************. असो.

काळा पहाड's picture

29 May 2015 - 1:18 pm | काळा पहाड

प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या फायद्याचंच राजकारण करतं. अमेरिकेनं केलं ते त्यांच्या फायद्याचं. भारत तेवढा शक्तिशाली असता तर भारतानंही असंच करायला हवं. जे राष्ट्र हे करत नाही आणि बाकीच्यांच्या मताबद्दल काळजी करतं ते रसातळाला जातं.

मुद्दा तो नाही. अमेरिकेने सद्दामला संपवले हे लै भारी काम केले असे इथे काहीजणांना वाटतेय ते चूक आहे इतकेच सांगायचा प्रयत्न आहे.

संदीप डांगे's picture

29 May 2015 - 2:27 pm | संदीप डांगे

सहमत...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 May 2015 - 8:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बळी तो कान पिळी हेच्चं खरं.!!

मालोजीराव's picture

29 May 2015 - 1:40 pm | मालोजीराव

इराक ला असले स्वातंत्र्य मिळण्यापेक्षा, सद्दामी हुकुमशाहीच्या काळातली नोकरी अन चटणी भाकरी बरी होती.

सौन्दर्य's picture

29 May 2015 - 10:08 pm | सौन्दर्य

"अमेरिका हे महाहरामखोर राष्ट्र आहे. त्यांनी केलेल्या अत्याचारांचा बदला घ्यायचा तर मग अख्खा देशच बेचिराख करावा लागेल."

आवो, आमी हिथच अमेरिकेत आहोत वो, थोडी दया दृष्टी असू द्या म्हंटलं. (हलकेच घ्या)

स्वच्छंद's picture

1 Jun 2015 - 1:49 am | स्वच्छंद

:-D

सुबोध खरे's picture

29 May 2015 - 8:07 pm | सुबोध खरे

बाण राव
एक लक्षात ठेवा अमेरिकेला जशी चीन ची भीती वाटते तशीच भारताची पण वाटते. न जाणो हे ( भारतीय) उद्या आपल्याला डोईजड झाले तर( ज्याची शक्यता बरीच आहे. म्हणू तुम्हाला नियन्त्रणात ठेवण्यासाठी ते पाकिस्तानचा वापर करत राहणारच. पाकिस्तानला ते मदत करतात ते काही पाकिस्तान बद्दल प्रेम आहे म्हणून नाही हे लक्षात घ्या. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाने एकदा संतापून जाहीर वक्तव्य केले होते कि अमेरिका आम्हाला निरोध सारखे वागवते. वापरून झाले कि फेकून द्या. सर्वसामान्य पाकिस्तानी जनता आणि लष्कर अमेरिकेचा द्वेषच करते.उद्या तुम्ही त्यांचे एक्कावान्नावे राज्य( इंग्लंड सारखे) म्हणून मान्य करा कि ते पाकिस्तानचा विध्वंस करतील कि नाही ते पहा

श्रीरंग_जोशी's picture

29 May 2015 - 8:54 pm | श्रीरंग_जोशी

पाकिस्तानला भारतासारख्या देशाचा शेजारी अन शत्रु असण्याचा नैसर्गिक फायदा मिळतो.

पाकिस्तानकडे गमावण्यासारखे काहीच नाही. तेथील जनता गवत खाऊन जगायला पण तयार असते.

पाकिस्तानला ते मदत करतात ते काही पाकिस्तान बद्दल प्रेम आहे म्हणून नाही हे लक्षात घ्या.
डॉक अर्थातच हे माहित आहे मला, पण त्याचा "परिणाम" तर आपल्यालाच भोगावा लागेल की नाही ?

अवांतर :- इसीसच्या आणि तिच्या सारख्या क्रूर संघटना त्यांचे काम करतच राहणार, कारण त्यांना रोखणारे आत्ता तरी कोण आहे ? मनुष्याने मनुष्याचा केलेला हिंसाचार तर इतिहासाच्या पानांमधे आढळुन येतोच त्यात नव्या पानाची भर पडते इतकेच ! :(
पिंजर्‍यात उभे करुन जिवंत जाळणे { मला वाटत जॉर्डनच्या वैमानिकाला काही काळापूर्वी असेच ठार केले गेले होते} स्फोटके लावुन उडवुन देणे आणि इतर ! क्रूरपणा करण्याला कुठली मर्यादा आहे का ? ह्या आणि इतर घटना पाहिल्या आणि वाचल्या की मन प्रचंड अशांत होते ! माणसा सारखा स्वार्थी प्राणी निर्माण करुन विधात्याने नक्की काय साधले ? असा विचार हल्ली बर्‍याच वेळा टाळक्यात येतो... एक सांगतो हल्ली दिवसेन दिवस मन "मुर्दाड" बनत चालले आहे ! :(
माणुस प्राण्यांशीही भयानक क्रूरतेने वागतो... आत्ताच एक व्हिडीयो पाहिला ! गो-हत्या बंदीला विरोध करण्याचा एक क्रूर प्रकार पाहुन मन मेले !
https://www.youtube.com/watch?v=_xRo7LpRZps { ही लिंकी त्रासदायक आहे, आपल्या विवेकानेच ही लिंक उघडावी. }
मध्यंतरी असेच एका गाईला एका छोट्या कार मधे कोंबुन नेताना पाहिले होते { https://www.youtube.com/watch?v=xYw-hpJ2PVg } तेव्हा माणसा मधल्या हैवानपणाचे दर्शन घडले !
असो.... हल्ली आजुबाजुला जे काही पाहतो तेव्हा माणसातले राक्षसच अधिक झाले आहेत अशी खात्रीच पटत चालली आहे.

जाता जाता :- ‘2,300 Humvees in Mosul alone’: Iraq reveals number of US arms falling into ISIS hands

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कॅप्टन सौरभ कालिया मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार नाही- मोदी सरकार

बादवे, ग्वाटानामो बे मध्ये अमेरिकेने तरी काय वेगळे केले?

काळा पहाड's picture

1 Jun 2015 - 5:35 pm | काळा पहाड

पण ग्वटानामो बे मध्ये अमेरिकेनं आणखी काय करणं एक्स्पेक्टेड होतं? जिहादी हे जगावरचा कलंक मानला तर कोणत्याही प्रकारे हा कलंक पुसून काढणे हे समर्थनीय आहे. या लोकांवर साम-दाम-भेद याचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळं दंडाचा अतिरेकी वापर करूनच त्यांच्या साथीदारांबद्दल माहिती काढणे इत्यादी गोष्टी करता येतात. अमेरिकेच्या सैनिकांनी वापरलेले उपाय हा जिहादींचं मनोबळ तोडणारे होते. याचं एक मवाळ उदाहरण म्हणजे कर्नल आठल्येंचा लेखः http://www.rediff.com/news/2008/dec/19mumterror-no-islamic-burial-for-mu...
एक आणखी मवाळ उपाय म्हणजे मेलेल्या जिहादी अतिरेक्यांवर डुकराचं रक्त शिंपडून आणि त्यांना उघड्यावर फेकून देणे (आणि बाकी अतिरेक्यांना हे पहायला लावणे). अमेरिकेनं ग्वा.बे. मध्ये वापरलेल्या उपायांमध्ये या कैद्यांना कडक उन, वारा, पाउस यामध्ये छप्पर नसलेल्या पिंजर्‍यात ठेवणे वगैरे आणि इतर सुद्धा उपाय सुद्धा केले होते आणि ते समर्थनीयच आहेत.

कपिलमुनी's picture

1 Jun 2015 - 5:56 pm | कपिलमुनी

माणूस कोंबडी , बोकड सर्रास खातात आणि त्यांना सुद्धा असेच ( निर्दयीपणे ) मारले जाते .

जो न्याय गायीला तोच कोंबडी आणि बोकडांना हवा

माणूस कोंबडी , बोकड सर्रास खातात आणि त्यांना सुद्धा असेच ( निर्दयीपणे ) मारले जाते .
जो न्याय गायीला तोच कोंबडी आणि बोकडांना हवा

ह्म्म्म... तस म्हणायच झालं तर हत्ती / डास / मुंगी / यांना मारले आणि माणसांना मारले तरी मग फरक पडु नये कारण "आत्मा" प्रत्येक देहात असतो, बदलते ते फक्त स्थुल शरीर !
आता गायी बद्धल :- मनुष्य प्राणी गाय या प्राण्यावर अवलंबुन राहत आलेला आहे,या गाय प्राण्याचे दुध मनुष्य प्राणी आजन्म पीत असतो आणि ज्या प्रमाणे नारळ हा कल्पवॄक्ष समजला जातो त्याच प्रमाणे गायीला कामधेनु आणि गोमाता ही उपाधी प्राप्त आहे. तेव्हा जन्मा पासुन मॄत्यु पर्यंत { मनुष्याच्या } कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगी पडणार्‍या या पशुची हत्या होउ नये असे वाटण्यास काय गैर आहे ?
अघोरी लोक { मेलेल्या} मनुष्याचे मांस खातात मग तुम्ही का खाउ शकत नाहीत ? मांसाहार हा मांसाहारच असतो... जो न्याय कोंबडी / बोकड / खेकडा यांच्या मांसाला लागतो तोच न्याय मनुष्य मांस भक्षणाला का लागु शकत नाही ?
असो...

मदनबाण.....
आत्ताची बदललेली स्वाक्षरी :- एनडीए सरकारचा यूटर्न... सुप्रीम कोर्टाने अनुमती दिली तर कॅ. कालिया प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार...

बायदवे, किती लोक गायीचे दूध पितात आणि किती लोक म्हशीचे दूध पितात याचा जरा तौलनिक अभ्यास केला तर गायीबद्दलच सिलेक्टिव्ह पुळका येणं हे अंमळ रोचक आहे.

मला जितके माहित आहे,वाचले आणि ऐकले आहे त्यानुसार गायीचे दूध हे म्हशीच्या दूधा पेक्षा अधिक उत्तम मानले गेले आहे.
काही काळा पूर्वी जालावर वाचले होते की हिंदूस्थानी जातीच्या काही गायी लुप्त झाल्या आहेत,तसेच गाय आणि म्हैस यांच्या संख्येची तुलना करावयाची झाल्यास गायींची संख्या फारच कमी आहे.
काही संदर्भ :-
औषधाविना उपचार : गायीचे दूध - पृथ्वीवरील अमृत
A spoon of ghee full of health: 'Poses no danger to cardiac health' and could protect us from cancer

दूधाला "पूर्णअन्न" असे म्हंटले जाते, पण देशात मिळणार्‍या दूधा पैकी जवळपास ८० ते ८५ टक्के दूध हे भेसळ युक्त आहे { नक्की किती टक्के ? खरा आकडा कोणता ? } यावरुन भेसळयुक्त दूध विकुन किती पैसा मिळत असावा याचा अंदाज यावा ! हिंदूस्थान जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश असुन या देशात शुद्ध दूध मिळण्याची मारामार आहे हे कटु सत्य असुन त्याचा परिणाम नवजात बालकां पासुन वॄद्ध माणसां पर्यंत होतो कारण हे सर्व दूध पितात. येणार्‍या काळात देशाची वाढती लोक संख्या आणि घटते पशुधन संख्या पाहता दूध आणि दूधाची पावडर आयात करायची वेळ येउ नये म्हणजे झाले !
काही संदर्भ :-
दूध…अमृत की विष ?
गाय आणि म्हैस - दुध कुणाचे प्यावे ?
The Desi Cow – Almost Extinct
Maneka Gandhi for country-wide ban on cow, buffalo slaughter
India’s livestock population decreases by 3.33 percent: Census

जाता जाता :-

सत्तेवर येण्या आधी मोदींचे विचार... एक हिंदूस्थानी म्हणुन या विचारांना माझे पूर्ण समर्थन आहे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela

मुद्दा गायीचे दूध उत्तम की म्हशीचे हा नाहीच.

मुद्दा हा आहे की दूध पिणार्‍या समस्त भारतीयांपैकी कितीजण गायीचे दूध वा गोदुग्धजन्यच पदार्थ सेवन करतात? अन किती % म्हशीचे दूध व तज्जन्य पदार्थ सेवन करतात? हा आहे. त्या अनुषंगाने विदा असेल तर बोला.

मुद्दा हा आहे की दूध पिणार्‍या समस्त भारतीयांपैकी कितीजण गायीचे दूध वा गोदुग्धजन्यच पदार्थ सेवन करतात?
मुद्दा,कमी संख्येने असलेल्या या जीवाचे रक्षण असा आहे. मी तरी गायीचेचे {पिशवी बंद } दूध पितो,बाकीच्या जनतेचे काही माहित नाही बाँ...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela

हर्कत नाही. तुम्ही गायीचे दूध पिता म्हणून तुम्हांला गायीबद्दल विशेष कळवळा असणे समजू शकतो. पण म्हशीचे दूध पिऊनही फक्त गायीबद्दलच कळवळा येणार्‍यांना नक्की काय वाटतं ते समजत नाही.

पिलीयन रायडर's picture

29 May 2015 - 12:23 pm | पिलीयन रायडर

तुम्ही ह्या धाग्यावर आत disturbing फोटो आहेत असं लिहाल का प्लिझ?
जागत हे असं काही घडतय आणि त्यासाठी आपण काहिही करु शकत नाही ह्याचा त्रास होत असतोच.. पण हे फोटो पाहिले की ह्याच जगात आपलंही बाळ आहे हे आठवतं आणि तटकन आत काही तरी तुटतं.

.सद्दाम क्रूर होताच.पण त्याच्या राजवटीत इराकमधे लोक बरेच स्वातंत्र्यात आणि मोकळे सुसह्य जगणं जगत होते असं ऐकलंय.स्त्रियांनाही बरोबरीने नोकर्‍या,हक्क,ड्रायव्हिंग,जबाबदारीची पदं होती म्हणतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2015 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरेरावी; एका राष्ट्राध्यक्षाचा दुखावलेला स्वाभिमान; अनेक (सामरीक साहित्य तयार करणार्‍या; तेल उद्योगातल्या आणि इतर काही) कंपन्यांचा आर्थिक फायदा; जागतीक वरचढपणा साधण्याचा स्वार्थ; तेल जगतावर कायम स्वामित्व स्थापन करण्याची अमेरिकेची महत्वाकांक्षा; इ इ इ... इराक बट्ट्याबोळ प्रकरणामागे आहेतच.

पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुवेत स्वतंत्र करण्यासाठी केलेल्या युद्धातल्या विजयाच्या उन्मादात अमेरिकन लष्करी डावपेच तज्ञ (मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट) इराक युद्धात "इराक = कुवेत" हे समिकरण खरे नसून "इराक = व्हिएतनाम" हे समिकरण खरे आहे हे समजून घ्यायला विसरले ! :(

व्हिएतनाम युद्ध आणि इराक युद्ध या दोन्ही युद्धांत अमेरिकेची अपरिमित आर्थिक, राजकीय आणि मान हानी झाली आहे. परंतू, युद्धस्थळांच्या स्थानिक वस्तूस्थितींमुळे त्या युद्धांचे जागतिक पडसाद एकदम विरुद्ध टोकांचे आहेत...

१. व्हिएतनाममध्ये कडवे देशाभिमानी व एकसंध कम्युनिस्ट होते. तेथे अमेरिकेचे कोणतेही स्थानिक दीर्घकालीन आर्थिक हितसंबध नसल्याने तेथून पळून जाणे ही अमेरिकेसाठी मानहानीची का होईना पण आपली फासात अडकलेली मान सोडविण्याची एक पळवाट होती.

व्हिएतनाम युद्धानंतर तेथे सत्तेत आलेले सरकार कडवे राष्ट्रवादी आणि बर्‍यापैकी लोकाभिमुख होते. तसेच त्यांनी परिस्थितीचे भान राखून उदार आर्थिक धोरण अबलंबिल्यामुळे आज व्हिएतनाम दक्षिण पूर्वेतला एक विकसनशील पण सर्वसामान्य नागरीकांना बर्‍यापैकी सुस्थितीत आणणारा; चीनला टक्कर देणारा *; आणि मुख्य म्हणजे जागतिक शांततेला धक्का न लावणारा देश आहे. त्या युद्धात व्हिएतनामी जनतेने नरकयातना भोगल्या आणि अमेरिकेची आर्थिक, राजकीय व मान हानी झाली, पण बाकी जगाला त्याची फारशी झळ पोचली नाही.

याविरुद्ध...

२. इराक (अ) शिया विरुद्ध सुन्नी विरुद्ध कुर्द; (आ) धर्मांध विरुद्ध निधर्मी (सद्दामच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेली बाथ पार्टी); (इ) पाश्चिमात्य प्रभाव असणारे शहरी विरुद्ध देशाच्या ३/४ भागांत विखुरलेल्या भटक्या जमाती (नोमॅडीक ट्राईब्ज) अश्या एकमेकाविरुद्ध असलेल्या असंख्य तत्वांमध्ये विभागलेला देश होता. असे असले तरी सद्दामने आपल्या क्रूर लष्करी पकडीत ठेवलेला हा देश मध्यपूर्वेतला आर्थिक स्थैर्य, राजकीय स्थैर्य आणि (सद्दामला राजकीय विरोध न करणार्‍या नागरिकांसाठी) सुस्थिर जीवन असलेला देश होता.

इराकमध्ये मूळ युद्धात विजय मिळूनही अमेरिका आपल्याला धार्जिणे सुस्थिर सरकार आणण्यात अपयशी ठरली... कारण ते घडून यावे असे केवळ दिवास्वप्न बाळगून अमेरिका त्यासंबंधी अनुसंधान व कृती (प्लॅनिंग अँड अ‍ॅक्शन) करायला विसरली. याचे मुख्य कारण म्हणजे या दोन युद्धस्थळांत आस्तित्वात असलेली वर विषद केलेली विरुद्ध टोकाची स्थानिक वस्तूस्थिती जाणण्यात अमेरिकन राजकारणी आणि युद्धतज्ञ अपयशी ठरले... काहींच्या मते अहंकार आणि केवळ संकुचीत आर्थिक फायद्यांकडे लक्ष दिल्यामुळे ही चूक झाली. त्यामुळे, युद्धानंतर इराक सुस्थिर करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी पूर्वीच्या राज्यव्यवस्थेतील महत्वाच्या माणसांना वेचून खटले, शिक्षा, उपेक्षा, इत्यादीव्दारा दूर करण्यात आले. परिणामी शासनव्यवस्था ताब्यात ठेवणारी सर्वच यंत्रणा नष्ट झाली आणि सद्दामच्या पोलदी पकडीत खूप काळपर्यंत दबून राहीलेल्या एकमेकविरोधी गटांचा उद्रेक उफाळून वर आला व अराजक माजले.

अर्थातच, "जगातल्या सर्वात मोठ्या विक्रियोग्य तेलसाठ्यावर (मध्यपूर्वेवर) दीर्घकालीन नियंत्रण ठेवून जागतीक अर्थव्यवस्था आणि राजकारण आपल्या पकडीत ठेवणे" हा या युद्धातला अमेरिकेचा मुख्य उद्देश असफल झाला. युद्धानंतर दशकापेक्षा जास्त वेळ अनेक तर्‍हेचे प्रयत्न करून आणि अपरिमित आर्थिक व (दोन्ही बाजूंची) जीवहानी झाल्यानंतर अमेरिकेला इराकमधून सावध पलायन करणे भाग पडले आहे.

मागे ठेवलेल्या शासकीय पोकळीत जन्मलेल्या अराजकाने इराक व सिरियात अनेक अतिरेकी तत्वांना जन्म दिला आहे. ISIS ही त्यातली अग्रगण्य अतिरेकी संघटना तर इतकी प्रबळ झाली आहे की तिचा अर्ध्या इराकवर आणि सिरियाच्या काही भागावर ताबा आहे. ताब्यातल्या भूभागातले खनिज तेल विकून आणि हितसंबंधियांकडून मिळणार्‍या देणग्या असे मिळून ISIS कडे जवळ जवळ २ बिलियन डॉलर्स जमले आहेत असा अंदाज आहे. ISIS च्या ताब्यातला भूभाग आणि तिचे उत्पन्न जगातील अनेक देशांपेक्षा जास्त आहे. या भस्मासूराच्या वल्गना आणि कारवाया पहाता त्याच्या आजूबाजूचे मध्यपूर्वेतले अनेक देश आणि सर्व जगही फार मोठ्या आणि दीर्घकालीन अनावस्थेत ढकलले गेले आहेत यात शंका नाही.

======

* व्हिएतनाम हा असा एकुलता एकच देश आहे की ज्याने अमेरिका (व्हिएतनाम युद्ध) आणि चीन (कंबोडियन युद्ध) या दोन आधुनिक जागतीक सामरी सत्तांना युद्धात पाणी पाजले आहे.

संदीप डांगे's picture

29 May 2015 - 2:24 pm | संदीप डांगे

* व्हिएतनाम हा असा एकुलता एकच देश आहे की ज्याने अमेरिका (व्हिएतनाम युद्ध) आणि चीन (कंबोडियन युद्ध) या दोन आधुनिक जागतीक सामरी सत्तांना युद्धात पाणी पाजले आहे.

व्हिएतनामीज 'अमेरिका सेव्ज मॅनकाइंड' वाले सायकोलॉजिकल प्रोपागंडा सिनेमे बघत नसतील.

विवेचन अगदी योग्य आणि माहितीपूर्ण.

बॅटमॅन's picture

29 May 2015 - 2:48 pm | बॅटमॅन

जबरी विवेचन!!!!!

नाखु's picture

29 May 2015 - 3:11 pm | नाखु

एक चांगले फलीत.

देवा अश्या धाग्यांच पीक येऊ दे रे !!

या सगळ्या निर्नायकी देशांच्या वाताहतीच्या पार्श्वभूमीवर नेल्सन मंडेलांचं नेतेपण (Leader आणि visionary या दोन्ही प्रकारे चोवीस कैरेट सोन्याप्रमाणं उजळून दिसतं)

एक्कामालकांचं विवेचन नेहमीप्रमाणेच भारी

राही's picture

29 May 2015 - 4:05 pm | राही

फार सुंदर प्रतिसाद.
विसाव्या शतकाचा उत्तरार्ध सदैव रक्तरंजित राखण्याचे 'श्रेय' अमेरिकेकडे जाते. शिवाय खोमैनी, सद्दाम, लादेन यांसारख्या भस्मासुरांच्या निर्मितीचेही.
पहिल्या इराण-इराक युद्धाच्यावेळी टीवीवर अमेरिकेने तुफान प्रचार केला होता. अमेरिकेची 'पेट्रियट' क्षेपणास्त्रे इराकच्या (सोविएतदत्त) स्कड क्षेपणास्त्रांची कशी धूळदाण उडवीत याच्या चित्रफिती तेव्हा सी एन एन दाखवीत असे. त्या सर्व खोट्या होत्या असे नंतर पुढे आले. ते काहीही असले तरी त्या क्षेपणास्त्री लढाया आपल्या रामायण-महाभारत मालिकांतल्या बाणांच्या लढायांप्रमाणे लुटुपुटीच्या वाटत. म्हणजे टीवी स्क्रीनच्या एका कोपर्‍यातून स्कड अस्त्र निघालेले दिसे . तेवढ्यात दुसर्‍या कोपर्‍यातून पेट्रियट निघे आणि दोघांची हवेत टक्कर होऊन पडद्यावर धूर आणि आग पसरे. वगैरे. स्टार-वॉर्सप्रमाणे ही युद्धे पाहाण्यास मजा येई.

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 2:12 pm | पुण्याचे वटवाघूळ

विसाव्या शतकाचा उत्तरार्ध सदैव रक्तरंजित राखण्याचे 'श्रेय' अमेरिकेकडे जाते.

बरोबर आहे. पण केवळ अमेरिकेला नावे ठेऊन विचारवंतीपणा मिरवायचा हा प्रकार आपल्याकडे चालतो त्याचा मात्र भयंकर संताप येतो.अमेरिकेने व्हिएटनाममध्ये जे काही केले ते समर्थनीय नाहीच.पण मग रशियाने पूर्व युरोपात, अफगाणिस्तानात केले त्याचे काय? सर्वत्र पोलादी पडद्याआड रशियाने कोट्यावधी लोकांना कशा हालापेष्टा भोगायला लावल्या त्याचे वर्णन अलेक्झांडर सोल्झेनिस्टीनच्या गुलाग या कादंबरीत आहे-- आणि हो हा लेखक मुळातला रशियनच बरं का? अमेरिकेला नावे ठेवणारे लोक रशियाने जे काही केले त्याविषयी मात्र कायम मौन बाळगतात. मी तर म्हणतो की दुसर्‍या महायुध्दानंतर रशियाने पूर्व युरोप गिळंकृत केला नसता तर पुढचे सगळे रामायण कदाचित घडलेही नसते. तरीही केवळ अमेरिकेला नावे ठेवायची हा स्वतःचा विचारवंतीपणा मिरवायचा एक मार्ग म्हणून अनेक लोक वापरतात (आणि त्याचवेळी अमेरिकेत जायलाही धडपडतात) त्याचा मात्र नक्कीच संताप येतो.

राही's picture

29 May 2015 - 4:14 pm | राही

विएत्नाममधले 'मा लाय' मॅसॅकर हे जगातील रक्तरंजित घटनांमध्ये आणि नरसंहारामध्ये 'मानाचे पान' मिळवून बसले आहे. किंवा अमेरिकेच्या मुकुटातले एक मानाचे पीस म्हणा हवं तर. कोपोलाच्या 'अ‍ॅपॉकलिप्स नाव्' या अप्रतिम चित्रपटातली अशी नापाम बॉम्बची जळिते अंगावर काटा आणतात.

राही's picture

29 May 2015 - 4:15 pm | राही

माय लाय हा अमेरिकन उच्चार. खरा उच्चार काय कोण जाणे.

सुरेख प्रतिसाद.धागा वाचणे सार्थक झाले विवेचन वाचुन.

पिंपातला उंदीर's picture

29 May 2015 - 2:22 pm | पिंपातला उंदीर

आयसिस क्रूरकर्मा आहेच पण सद्दाम हा पण त्याच माळेचा मणी आहे . अनेक निष्पाप लोकांच्या मृतदेहावर त्याचा राज्यशकट उभा होता . त्याचा मुलगा उदय तर निव्वळ कसाई होता . या उदयवर एक 'devil's double ' नावाचा जबरी चित्रपट आहे . या क्रूरकर्मा उदय चा एक 'body double ' होता त्याच्या निवेदनावर आणि सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे . अर्थातच हा चित्रपट म्हणजे सगळे सत्य सांगणारा चित्रपट आहे असा माझा गैरसमज आहे . पण तुम्ही गुगल वर जरी उदय हुसेन असा सर्च केला तरी हा कसला नर राक्षस होता याची भरभरून माहिती मिळेल

कपिलमुनी's picture

29 May 2015 - 2:42 pm | कपिलमुनी

इथे दगडापेक्षा वीट मऊ एवढेच !
दोघेही वाइटच.

हुप्प्या's picture

29 May 2015 - 4:51 pm | हुप्प्या

सद्दाम हलकट होता तो त्याच्या देशापुरताच. भारतातील कल्याण नामक नगरातून काही तरूण सद्दामकरता लढायचे ह्या ध्येयाने प्रेरित होऊन इराकला रवाना झाले असते का? आयसिसने ते केले आहे. जगभरातून डोकी फिरलेले, धर्मपिसाट लोक भरती करण्याची ताकद त्यांच्या खिलाफती संदेशात आहे.

काळा पहाड's picture

29 May 2015 - 5:50 pm | काळा पहाड

सद्दाम हा हुकुमशहा होता पण धर्मयोद्धा नव्हता. किंबहुना सुन्नी असून सुद्धा तो जिहादींचा तिरस्कारच करे. इराण इराक युद्धात सद्दाम अमेरिकेचा लाडका होता आणि इराणला संपवण्याचा प्रयत्न म्हणून अमेरिकेनं त्याला शस्त्रास्त्र पुरवली. अमेरिकेनं याच्या पूर्वी इराणच्या शहाला (म्हणजे खोमेनीच्या विरोधी सत्ताधीशाला) सुद्धा शस्त्रास्त्रं पुरवली होती. जेव्हा खोमेनीनं सत्ता ताब्यात घेतली, तेव्हा अमेरिकन्स नी विमानांच्या चिप्स नष्ट करून देश सोडला आणि ती विमानं बेकार केली.
मध्य पूर्वेतलं राजकारण बरंच गुंतागुंतीचं आहे.

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 7:56 pm | टवाळ कार्टा

जेव्हा खोमेनीनं सत्ता ताब्यात घेतली, तेव्हा अमेरिकन्स नी विमानांच्या चिप्स नष्ट करून देश सोडला आणि ती विमानं बेकार केली.

परत पेट्रोल भरून घेउन नै गेले?

काळा पहाड's picture

29 May 2015 - 9:49 pm | काळा पहाड

नाही, तसं बहुधा शक्य नसावं कारण एकतर पायलट्स इराणी होते. १४० एफ-१४ इराणींच्या ताब्यात होती आणि त्यावर लावण्यासाठे ४०० फिनिक्स मिसाईल्स सुद्धा त्यांच्याकडे होती. दुसरं म्हणजे विमानं पळवून नेण्यासाठी तेवढं इंधन कुठून आणणार? त्या विमानांना रिफ्युएल कसं करणार? कुठे करणार? अमेरिकन्स नी या मिसाईल्स वापरण्यासाठीच्या विमानातल्या चिप्स पळवून मग देश सोडला.

गूगलच्या सहाय्याने:
As the Iranian revolution gathered speed in the final months of 1978, the possibility of all those weapons falling into unfriendly hands became a terrifying reality. The American intelligence community was seized with panic, for the fatal flaw of the Nixon Doctrine - the "special relationship" that had existed between Washington and Tehran - had finally surfaced, dashing a throne and a major alliance as inexorably as the furies of Greek tragedy.

In the dark hours that preceded the Shah's flight from Iran, the CIA station chief in Tehran hastily dismantled US listening posts stretched along Iran's 1200 mile-long border with the Soviet Union. Sensitive equipment was destroyed or shipped out. Grumman technicians left the country carrying top secret repair manuals for the F-14 fighter. Others pocketed computer chips powering the "brains" of the Phoenix missiles that armed them

http://www.iran.org/tib/krt/fanning_ch5.htm

सत्ता मिळवणे आणि तिचा विस्तार करणे या मूलभूत मानवी प्रवृत्ती नुसार सगळेच जण वागत असतात आणि आलेले आहेत.
राजकारणात सारं काही माफ़ असतं या उक्तिनुसार ISIS च्या तथाकथित 'विचार'सरणी नं प्रेरित काही लोक या विचाराना पाठबळ देत आहेत. बरेच मुस्लिम लोक या विचारसरणीच्या लोकांना मुस्लिम मानत नाहीत. they are crazy people असं म्हणून बोळवण करतात. तरीही पाटला चं बाद पोर असल्यानं पाटलाच्या घरावरच दोष येतो यात नवल नाही (अर्थात पाटलांच्या घरात ज़रा जास्तच उद्योगी लोक आधीपासूनच आहेत हे लपून राहिलेलं नाहीच्च म्हणा)

द-बाहुबली's picture

30 May 2015 - 9:25 am | द-बाहुबली

स्त्रियांना स्वातंत्र्य.

इराकमधे अल-कायदा प्रभावी होउ न देणं. ट्विन टॉवर हल्ल्यानंतर अफगाणीस्तान आधी इराकमधे आश्रय मिळेल का याची चाचपणी ओसामाने केली होती त्याला सद्दामने नकार दिला होता.

धार्मीक कट्टरतेपेक्षा आधुनीकतेची कास धरणे. उदा. मी लोकांना त्यांची हातली आहेत ती कामधाम सोडून दिवसातुन ५ वेळा नमाजाची सक्ती करु शकत नाही वगैरे वगैरे विधाने.

भारताने काश्मीर प्रश्नी युनोत जितके ठराव मांडले त्याला पाठींबा दिला.

असे सद्दामचे काही नक्किच चांगले गुण आहे.

पण तो क्रुरही तितकाच होता. उदा. त्याच्या दरबारात जेंव्हा तो विनोद करत असे तेंव्हा सर्वांना त्यावर हसणे बंधनकारक असे. एक जण हसला न्हवता तर तिथेच त्याला गोळी घातली होती :)

मृत्युन्जय's picture

1 Jun 2015 - 1:13 pm | मृत्युन्जय

स्त्रियांना स्वातंत्र्य.

सद्दाम आणि त्याचा मुलगा उदय हे दोघेही बलात्कारांबद्दल बदनाम होते. त्यातही उदय फारच वाईट. असे म्हणतात की त्याच्या काळात त्याचे बॉडीगार्डस शाळा / कॉलेजांच्या बाहेर सुंदर मुलींची टेहळणी करत उभे रहायचे. त्यांच्याबरोबर उदय देखील असायचा. तो ज्या मुलीकडे बोट दाखवेल तिला उचलुन नेले जायचे आणि मग तिचे मर्जी असो अथवा नसो, उदयचे समाधान होइपर्यंत उदय तिला ठेउन घ्यायचा. जर तिने त्रागा केला किंवा ती त्रासदायक ठरेल असे वाटले तर तिची रवानगी तुरुंगात अथवा वेश्याघरात व्हायची. जर तिने सहकार्य केले तर काही दिवसांनी जेव्हा उदयचे समाधान होइल तेव्हा तिची सुटका व्हायची. असहकार्य करणार्‍या मुलींना त्याने दिलेल्या यातनांवर एक लेख वाचला आहे तो तर फारच हॉरिबल होता.
त्यामुळे त्यांनी स्स्त्रियांना स्वातंत्र्य दिले आणि दुसरीकडे त्यांचे स्वातंत्र्य हिरावुन घेतले असेच म्हणावे लागेल.

सध्या बरं चाललंय का इराकमधे स्त्रियांचं ? सद्दाम आणि उदय गेल्यापासून?

उपरोध सोडून देऊ, पण तुलना सद्यस्थिती आणि सद्दामराज्य यांच्यात चालली आहे.

जंगलात बिबट्या लांडग्यांनी हरणं ससे मारुन खाणं हे हरीण ससा यांच्या दृष्टीने निश्चित दुर्दैवीच.. पण त्याच जंगलात बिबट्याच्या भीतीने मनुष्यप्राणी येत नसे, तो आता आला.. त्याउपर हजारो लाखोंच्या झुंडी घेऊन आला.. बंदुका घेऊन आला.. हरीण ससे यांची दिवसरात्र कत्तल केली, जमीन उजाड करुन स्वतःच्या ताब्यात घेतली..

इत्यादि.

यात बिबट्या, लांडगा म्हणजे थोर मसीहा असा अर्थ नसून तुलनेत ते परवडले अशी स्थिती सर्व हरीणसशांची या निर्नायकीमुळे झाली असा अर्थ अभिप्रेत आहे.

मृत्युन्जय's picture

1 Jun 2015 - 4:58 pm | मृत्युन्जय

सध्या जे चाललय ते घ्रुणास्पद आहे. पण त्यामुळे सद्दाम स्त्रियांचा रक्षणकर्ता होत नाही. दगडापेक्षा वीट मऊ म्हणायची असेल तर म्हणु शकतो आपण. हिटलर जर्मनीमधुन गेला आणि रशियन्सनी नंगानाच घातला. तेव्हाही परिस्थिती काही फार सुधारली नव्हतीच पण म्हणुन हिटलरला ज्युप्रतिपालक म्हणता येइल का?

द-बाहुबली's picture

2 Jun 2015 - 9:05 pm | द-बाहुबली

सद्दामने बुरखा सक्ति केलि न्हवती. स्त्रियांनी घराबाहेर पडणे, नोकरी करणे, शिक्षण घेणे त्याला गैर वाटत नसे.

मृत्युन्जय's picture

3 Jun 2015 - 11:09 am | मृत्युन्जय

बुरखा सक्ती केली असती. घराबाहेर पडण्यावर बंदी घातली असती, शिक्षण घेणे थांबवले असते तर उदयला बायका कश्या हेरता आल्या असत्या? एवढे सगळे केलेच तर उदयला सगळ्यात पहिल्यांदा तुरुंगात टाकायला हवे होते. अर्थात थोड्या फार फरकाने सद्दामही तसाच होता म्हणतात.

संदीप डांगे's picture

1 Jun 2015 - 2:21 pm | संदीप डांगे

अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले शत्रू मानते किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांचे जे शत्रू असतात त्यांच्या राष्ट्रप्रमुखांविरुद्ध अतिरंजित, भडक, चिथावणीखोर बातम्या पसरवल्या जातात असं निरिक्षण आहे. सद्दाम, गडाफी इत्यादींविरुद्ध आपल्याला जे काही कळते त्यांचे स्त्रोत हे पाश्चिमात्य पत्रकार असतात. ते जे लिहितात ते सत्यच असं एकंदर जनमानस असतो.

जगातल्या इतर कोणत्याही देशातल्या समस्येबद्दल आपले मत बनवतांना एक काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे की आपले मत कुठल्याही प्रोपगंडातर्फे प्रेरित किंवा आधारित नसावे.

अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले शत्रू मानते किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांचे जे शत्रू असतात त्यांच्या राष्ट्रप्रमुखांविरुद्ध अतिरंजित, भडक, चिथावणीखोर बातम्या पसरवल्या जातात असं निरिक्षण आहे. सद्दाम, गडाफी इत्यादींविरुद्ध आपल्याला जे काही कळते त्यांचे स्त्रोत हे पाश्चिमात्य पत्रकार असतात. ते जे लिहितात ते सत्यच असं एकंदर जनमानस असतो.

अगदी अतिप्रचंड नेमके. यामुळे अमेरिकन्सचा हरामखोरपणा अजूनच अधोरेखित होतो. अर्थात असे म्हणणे म्ह. सद्दाम = संत म्हणणे नव्हे हेवेसांनल. पण सॉफ्ट पॉवरमध्ये अमेरिकेची बरोबरी कुणीच करू शकत नाही, सबब असं होणारच.

संदीप डांगे's picture

1 Jun 2015 - 5:49 pm | संदीप डांगे

सद्दाम = संत म्हणणे नव्हे याच्याशी बाडीस.

सॉफ्ट पॉवरमध्ये अमेरिकेची बरोबरी कुणीच करू शकत नाही, सबब असं होणारच.

म्हणूनच सावध पवित्रा घेऊन बातम्या वाचल्या तर मनोरंजनाव्यतिरिक्त काही हेतू ठेवू नये.

कुणीतरी कुठेतरी दाबू पाहतं ती बातमी. बाकी सगळ्या जाहिराती.

संदीप डांगे's picture

1 Jun 2015 - 6:01 pm | संदीप डांगे

आता क्रमांक उत्तर कोरियाच्या साहेबांचा आहे. गेल्या वर्षीपासून जनमानस बनवायला सुरुवात झाली आहे. येत्या तीन वर्षात उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांनी आपल्या जनतेला वेटीस धरले आहे आणि जनता स्वातंत्र्य मागत आहे अशी बातमी येईल. मग सद्दाम, गडाफी, अरब स्प्रींगची पुनरावृत्ती होईल.

अमेरिकेचे टेबलाखालून प्रतिस्पर्ध्याचे पाय तुडवल्या जातात. प्रतिस्पर्धी वेदनेने ओरडला की बघा किती असभ्य म्हणून पार्टीत त्याला बदनाम केले जाते. अशा असभ्य माणसाला पार्टीतून हाकलून लावणे किती आवश्यक आहे हे कुणाला पटवून द्यायची गरज पडत नाही. आणि त्या माणसाला पार्टीतून उचलून 'अत्यंत सभ्यपणे' बाहेर फेकले जाते.

पुण्याचे वटवाघूळ's picture

1 Jun 2015 - 6:34 pm | पुण्याचे वटवाघूळ

अगदी अतिप्रचंड नेमके. यामुळे अमेरिकन्सचा हरामखोरपणा अजूनच अधोरेखित होतो.

एक गोश्त कळत नाही. इथे सगळे अमेरिकेला शिव्या घालत आहेत आणि त्यातले बरेचसे आय.टी हमाल आहेत (माझ्यासारखे). जर अमेरिकेत ऑन-साईट ओपोर्ट्यूनिटी मिळाली तर अमेरिकेला हरामखोर वगरे म्हणणारे बरेचसे लोक लंगडी घालत अमेरिकेत जायला तयार होतील. तसेही आय.टी मध्ये कधी ऑनसाईट जायला मिलते यावर सगळ्यांचे डोळे असतातच. आणि त्याचवेळी अमेरिकेला शिव्याही घालायच्या--हरामखोर म्हणायचे. आणि यात आपण काही विसंगत वागत आहोत हे त्यांच्या गावीही नसते.

जय हो आय.टी मानसिकता. जय हो भारतीय ढोंगीपणा.

श्रीरंग_जोशी's picture

1 Jun 2015 - 6:43 pm | श्रीरंग_जोशी

जरा असहमती. एखादा देश म्हणजे केवळ त्याचे सरकार नव्हे.
सरकारच्या अनेक धोरणांना अन कारनाम्यांना त्या देशातल्या जनतेचा (कधी अल्पसंख्य कधी बहुसंख्य) विरोध असतोच.

पुण्याचे वटवाघूळ's picture

1 Jun 2015 - 6:51 pm | पुण्याचे वटवाघूळ

ही पळवाट झाली हो. आणि अनेक आय.टी हमालांचे प्रोजेक्ट अमेरिकन सरकारच्या कुठल्यातरी डिपार्टमेन्टचेही असतात. मी स्वतः डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरचा प्रोजेक्ट केला आहे. चांगले सहा महिने वॉशिंग्टनमध्ये होतो मी. आणि जरीही प्रोजेक्ट प्रायव्हेटचा असला तरी अमेरिकेतल्या प्रायव्हेट कंपन्या कशा आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. तिकडे चांगले बक्कळ पैसे मिळतात त्यालाच नुसते महत्व. बाकी तत्वज्ञान गेले भाड्यात. पैशाला महत्व देण्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही.पण मग ज्या देशात जायला आपण टपून बसलेले असतो त्यालाच (विशेषतः आपण स्वतः त्या देशाचे नागरिक नसताना) हरामखोर वगैरे म्हणणे हा ढोंगीपणाच आहे. स्वतःच्या बायकांची बाळंतपणे अमेरिकेत करावीत म्हणजे आपल्या मुला/मुलीला जन्मजात अमेरिकेचे नागरिकत्व मिळेल यासाठीही धडपडणारे महाभाग आहेत आमच्या हापिसात. अशांनी परत अमेरिकेला हरामखोर म्हणणे यात काहीच ढोंग नाही?आणि ज्यांना कधीच अमेरिकेत ऑनसाईट जावेसे वाटत नसेल त्यांनी काहीही म्हटले तरी हरकत नाही.पण आपण स्वतः ज्याची इच्छा ठेवतो त्यालाच विसंगत वागताना लोक दिसले तर त्या ढोंगीपणाची कीव याते.

श्रीरंग_जोशी's picture

1 Jun 2015 - 7:20 pm | श्रीरंग_जोशी

तुमचे म्हणणे पटत आहे पण 'हरामखोर' किंवा त्या प्रकारचे शब्द न वापरता विरोध दर्शवला किंवा आक्षेप घेतला तर?

अमेरिकेत किंवा कुठल्याही देशात काम करायला जाणे अन asylum (मराठीत शरणागती बहुधा) घेणे यामध्ये त्या व्यक्तिच्या वर्तनातला फरक अपेक्षित आहे. आमच्या शहरात ९० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेने asylum दिलेल्या सुमारे ५० हजार सोमालियन लोकांना वसवले गेले. काही महिन्यांपूर्वी त्या लोकांच्या इथे जन्मलेल्या मुलांनी (वय १९-२० वगैरे) आयसिसमध्ये सामिल होण्यासाठी टर्की वगैरे कडे कूच केले. तर काही जण इथल्या विमानतळावरच पकडले गेले.

तर इथल्या सोमालियन समाजातील धुरिणांनी या तरुणांच्या कृत्याचे समर्थन केले तर तो ढोंगीपणाच काय द्रोहच समजला जाईल.

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 2:01 pm | पुण्याचे वटवाघूळ

तुमचे म्हणणे पटत आहे पण 'हरामखोर' किंवा त्या प्रकारचे शब्द न वापरता विरोध दर्शवला किंवा आक्षेप घेतला तर?

माझा आक्षेप दुटप्पीपणावर आहे.एकीकडे अमेरिकेला नावे ठेवायची (शब्द कुठलेही असले तरी) आणि दुसरीकडे त्याच अमेरिकेत जायला धडपडायचे हा दुटप्पीपणा आहे. काही लोक म्हणतात की अमेरिकन लोक चांगले असतात पण अमेरिकन सरकार हरामखोर आहे.पण मग असे म्हणणारे भारतीय त्याच हरामखोर अमेरिकन सरकारच्या भारतातील दूतावासात जातात आणि त्याच हरामखोर सरकारकडून मिळालेला व्हिसा (एच-१) आपल्या सी.व्ही वर मोठ्या अभिमानाने मिरवतात.हल्ली अपॉइन्टमेन्ट सिस्टिममुळे रांगेत उभे राहावे लागत नाही.पण मी सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेत गेलो (सन १९९९) त्यावेळी रात्री ३ पासून कॉन्सुलेटपुढे रांगेत उभे राहणारे लोक होते. हा दुटप्पीपणा नाहीतर काय आहे? एकीकडे इराकमध्ये अमेरिकेने लोक मारले म्हणून मगरीचे अश्रू ढाळायचे आणि दुसरीकडे त्याच अमेरिकेत जाऊन प्रोजेक्ट करायचे, अमेरिकन इकॉनॉमीमध्ये आपल्या परिने खारीचा वाटा उचलायचा आणि त्याच अमेरिकन सरकारचे हात बळकट करायचे ते सगळे चालते अशांना.

शेवटी काय की तुम्ही त्या देशाचे नागरिक नसूनही तुम्हाला तिथे जायला मिळते, तिथल्या चांगल्या लाईफस्टाईलचा उपभोग घेता येतो आणि बक्कळ पैसे साठवता येतात या सगळ्यात अमेरिकन सरकारचा काहीच वाटा नाही? ठिक आहे तुम्ही तिथे जाता ते उपकार करायला नाही आणि तुम्ही जे काम करता त्याचा फायदा त्यांनाही होतो.पण त्यातून तुमचा फायदा काहीच होत नाही का? म्हणजे आपला फायदा होत असेल तिथे त्याच हरामखोर अमेरिकन सरकारपुढे रांगायलाही हे लोक कमी करणार नाहीत.

समजा असे समजले की अमेरिकन सरकार सर्व व्हिसाच्या अर्जदारांनी सोशल मिडियावर कुठल्याही भाषेत काय लिहिले आहे हे तपासून मग व्हिसा देत असेल तर ही सगळी हरामखोर कंपनी कशी चिडीचूप होईल बघा. मग अमेरिका किती थोर याचे गोडवे गायलाही हे कमी करणार नाहीत.

शेवटी आपला स्वार्थ साध्य होत असेल की सगळे काही चालते.

पण,

हरामखोर सरकारकडून मिळालेला व्हिसा (एच-१)

एच-१ म्हणजे हरामखोर-१ का?

पिंपातला उंदीर's picture

2 Jun 2015 - 2:47 pm | पिंपातला उंदीर

समजा असे समजले की अमेरिकन सरकार सर्व व्हिसाच्या अर्जदारांनी सोशल मिडियावर कुठल्याही भाषेत काय लिहिले आहे हे तपासून मग व्हिसा देत असेल तर ही सगळी हरामखोर कंपनी कशी चिडीचूप होईल बघा.

वटवाघूळ यांच्याशी दणकून सहमत

बॅटमॅन's picture

2 Jun 2015 - 3:23 pm | बॅटमॅन

श्रीरंगरावांशी सहमत आहे. पाकिस्तान सरकार व आर्मी हरामखोर आहे म्हणजे एखादा सर्वसामान्य 'पाकडा' हरामखोर असेलच असे नाही.

अन राहता राहिला ढोंगीपणाचा मुद्दा, ढोंगी तर आपण आहोतच पण या केसमध्ये ते लागू होत नाही. पण काळापहाड साहेबांनी उपस्थित केलेले लॉजिकच अजून ताणल्यावर त्यातला फोलपणा दिसून येईल.

अमेरि़का हरामखोर आहे तर मग तिकडे ऑनसाईटची संधी मिळाल्यास कशाला जायचे?

जर तिकडे जाऊन त्यांचे पैसे पगाररूपाने आपल्या देशात आणता येत असतील तर का नाही जायचे? तेवढीच अद्दल घडणार नाही का हरामखोरांना? तेवढीच लूट अजून येईल आपल्या देशात, नै का? तस्मात सैद्धांतिकरीत्याही अमेरिकेला शिव्या घालणे आणि संधी मिळाल्यास तिकडे पळणे या भूमिकेत दुटप्पीपणा नाही. भले मग वापरलेले लॉजिक कितीही हास्यास्पद असो.

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 3:54 pm | पुण्याचे वटवाघूळ

जर तिकडे जाऊन त्यांचे पैसे पगाररूपाने आपल्या देशात आणता येत असतील तर का नाही जायचे? तेवढीच अद्दल घडणार नाही का हरामखोरांना? तेवढीच लूट अजून येईल आपल्या देशात, नै का?

याला शुध्द मराठीत मल्लीनाथी म्हणतात. स्वतःची ऑनसाईट ऑपॉर्ट्यूनिटी असल्यास आपण स्वतःही ढोंगी दिसू नये म्हणून का खटाटोप हा?

लूट आणा हो पण मग ती लूट आणून दोन बी.एच.के चे फ्लॅट, फॅट बॅन्क बॅलन्स इत्यादीमध्ये भरणार असाल तर ती लूट स्वतःसाठी झाली हो. ती लूट दान थोडीच करणार आहात?

याला शुध्द मराठीत मल्लीनाथी म्हणतात. स्वतःची ऑनसाईट ऑपॉर्ट्यूनिटी असल्यास आपण स्वतःही ढोंगी दिसू नये म्हणून का खटाटोप हा?

काय पायजे ते समजा. मूळ आक्षेपच इतका हास्यास्पद आहे की त्याचे प्रत्युत्तरही असेच येणे क्रमप्राप्त आहे.

लूट आणा हो पण मग ती लूट आणून दोन बी.एच.के चे फ्लॅट, फॅट बॅन्क बॅलन्स इत्यादीमध्ये भरणार असाल तर ती लूट स्वतःसाठी झाली हो. ती लूट दान थोडीच करणार आहात?

माझ्या रूपाने देशालाही थोडे का होईना पैसे मिळतातच. अन मीही देशाचाच एक भाग आहे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 4:49 pm | पुण्याचे वटवाघूळ

माझ्या रूपाने देशालाही थोडे का होईना पैसे मिळतातच. अन मीही देशाचाच एक भाग आहे.

पण तो पैसा हरामखोरांच्या देशात जाऊन आणि हरामखोरांची चाकरी करून मिळालेला असतो त्याचे काय?

बॅटमॅन's picture

2 Jun 2015 - 4:59 pm | बॅटमॅन

पण तो पैसा हरामखोरांच्या देशात जाऊन आणि हरामखोरांची चाकरी करून मिळालेला असतो त्याचे काय?

त्यात तर अजून आनंद आहे. हरामखोरांचा पैसा अतिशय अत्यल्प प्रमाणात का होईना आपण हडपू शकलो हे समाधान नाही काय? =))

कपिलमुनी's picture

2 Jun 2015 - 5:00 pm | कपिलमुनी

पण तो पैसा हरामखोरांच्या देशात जाऊन आणि हरामखोरांची चाकरी करून मिळालेला असतो त्याचे काय?

हा स्वदेशासाठी केलेला त्याग असतो ;) :)

काळा पहाड's picture

2 Jun 2015 - 4:08 pm | काळा पहाड

दोन बी.एच.के चे फ्लॅट

फ्लॅट घेतले की रियल इस्टेट सेक्टर ला बूस्ट मिळतो, सरकारला सर्व्हिस चार्जेस, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे मिळतात, एजंट लोकांना फ्लॅट भाड्याने देता येतो, भाड्याने घेणार्‍यांवर किराणा मालाची दुकानं चालतात, फ्लॅट मध्ये काम करणार्‍या लोकांना रोजगार उपलब्ध होतो, झाडूवाले, रद्दीवाले, चहा टपरीवाले, फूलवाले यांची दुकानं चालतात. म्हणजे एका फ्लॅट मुळे बर्‍याच प्रकारे इकॉनॉमीला चालना मिळते.

फॅट बॅन्क बॅलन्स

बँकेची लिक्विडिटी वाढते, बँक ते पैसे कर्ज देवू शकते, कर्ज घेणारा त्यातून उद्योग उभा करू शकतो, बँक कर्मचार्‍यांना काम मिळते, कर्जाच्या एजंट लोकांना काम मिळते. म्हणजे परत इकॉनॉमीला चालना मिळते.

मी माझ्या मुनशीपालीटी,आमदार्,खासदार्,राज्यसरकार, आणि केंद्र सरकार यांना नेहमी चांगलेच म्हणायचे.
अगदी हबीब तन्वीर प्रहार मध्ये पोलिसांना म्हणतो "कोई प्रोब्लेम नही ". कुणीतरी लिंकाळे अड्कवा इथे.

चला मिपा सशक्त व्हावे म्हणूनही टिका-टिप्पणी करू नका (अन्यथा मिपावर येऊ नका)
घाबरट नाखु

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 4:45 pm | पुण्याचे वटवाघूळ

म्हणजे एका फ्लॅट मुळे बर्‍याच प्रकारे इकॉनॉमीला चालना मिळते.

देअर यू गो. मग त्याच न्यायाने भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या पैशानेही इकॉनॉमीला चालना मिळते. मग ते पण समर्थनीय व्हायला हवे. हरामखोरांची चाकरी करून मिळालेला पैसाही हरामच नाही का?

वॉल्टर व्हाईट's picture

3 Jun 2015 - 3:37 am | वॉल्टर व्हाईट

बरं बरं, राहिलं बुवा. आम्ही आहोत हरामखोर, बास ?

चिनार's picture

2 Jun 2015 - 4:48 pm | चिनार

काळा पहाड , बॅटमॅन आणि श्रीरंग भाऊ
अमेरिकत जाऊन पैसा कमावणे (मग तो स्वत: साठी असो किंवा देशासाठी) ह्यात काहीही वावगं नाही. प्रत्येकाने भरपूर पैसा कमवावा आणि त्याला वाट्टेल तसा खर्च करावा. काहीही आक्षेप नाही

पण एक अवांतर प्रश्न :
अमेरिकत गेलेल्या काही (किंवा बहुतांश) भारतीयांना रुपयाची किम्मत घसरली की फार आनंद होतो आणि वाढली की दु:ख होतं. कारण रुपयाच्या चढ उतारावर त्यांची गंगाजळी अवलंबून असते. अश्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांना काहीही देणघेण नसते.हे वर्तन समर्थनीय आहे का ?

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 4:51 pm | पुण्याचे वटवाघूळ

अमेरिकत जाऊन पैसा कमावणे (मग तो स्वत: साठी असो किंवा देशासाठी) ह्यात काहीही वावगं नाही. प्रत्येकाने भरपूर पैसा कमवावा आणि त्याला वाट्टेल तसा खर्च करावा. काहीही आक्षेप नाही

अहो त्याला आक्षेप कोणाचाच नाही हो. आक्षेप जिथे जाण्यासाठी जीव वरखाली होतो त्याच देशाला हरामखोर वगैरे म्हणण्यावर आहे. म्हणजे ज्या ताटात खायचे त्याच ताटात ह*यचे या प्रवृत्तीला.

रुपयाच्या चढ उतारावर त्यांची गंगाजळी अवलंबून असते. अश्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांना काहीही देणघेण नसते

पण रुपयाची किंमत घसरली की वाईट हे कोण सांगितलं? रुपया स्ट्राँग म्हणजे इकॉनॉमी स्ट्राँग असं नस्तं कै. कित्येक वेळा तर रुपयाचं डिव्हॅल्यूएशन ही एक विचारपूर्वक केलेली स्टेप असते.

चिनार's picture

2 Jun 2015 - 5:10 pm | चिनार

मी गृहीत धरतो की माझ्या प्रश्नाचा रोख तुम्हाला कळला आहे !
तरीसुद्धा तुमच्या मुद्द्याला प्रतिसाद देतोय..

रुपयाचं डिव्हॅल्यूएशन -

मी रोज होणाऱ्या पाच -दहा पैशांच्या चढ उतरविषयी बोलत नाहीये . ६०-६२ रुपयांवरून USD ची किंमत जेंव्हा ६८ वर गेली होती तेंव्हा ती एक भारत सरकारची विचारपूर्वक स्टेप होती असे मला तरी वाटत नाही.

कृपया मुळ प्रश्नावर उत्तर द्यावे. माझा हेतू कोणावर टीका करण्याचा नसून ही मानसिकता समजून घेण्याचा आहे.

अहो मी तुमच्या मूळ प्रश्नाचंच उत्तर देतोय.
तुम्ही म्हणालात,

अमेरिकत गेलेल्या काही (किंवा बहुतांश) भारतीयांना रुपयाची किम्मत घसरली की फार आनंद होतो आणि वाढली की दु:ख होतं. कारण रुपयाच्या चढ उतारावर त्यांची गंगाजळी अवलंबून असते. अश्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांना काहीही देणघेण नसते.हे वर्तन समर्थनीय आहे का ?

रुपयाचं डिव्हॅल्यूएशन झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला धोका उत्पन्न झाला तरी अमेरिकेतल्या भारतीयांना त्यांच्या पैशाला जास्त किंमत येत असल्यामुळे आनंद होतो हा तुमचा मुद्दा आहे.
माझं म्हणणं असं आहे की रुपया घसरला की भारतीयांना आनंद होतो हे खरंच आहे. पण त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तुम्ही स्ट्राँग आणि वीक या शब्दांच्या ढोबळपणामुळे एका विशिष्ट प्रकारे गृहीत धरत आहात. डिव्हॅल्यूएशनमुळे इकॉनॉमी वर काय परिणाम होईल हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं आणि ती गोष्ट इतकी साधी नाही. त्यामुळे डिव्हॅल्यूएशन म्हणजे वाईट हे गृहीतकच चुकीचं आहे.

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 5:38 pm | संदीप डांगे

सहमत

त्यामुळे डिव्हॅल्यूएशन म्हणजे वाईट हे गृहीतकच चुकीचं आहे.

+१
आणि इथे अनिवासी भारतीयच नव्हे तर भारतात राहूनच आयात्/निर्यात करणारेही त्यानुसार आनंदी/दु:खी होतील कारण इथे आनंदी होणारे फक्त ट्रेडर म्हणून आनंदी असतात आणि प्रत्यक्षात भारतीय अर्थव्यवस्थेस सक्रीय हातभार लावत असतात.

डिव्हॅल्यूएशनने आनंदी होणारे अनिवासी भारतीय तर रुपयांचा दर वाढलेला असताना परकीय चलन विकून (आणि रुपये विकत घेऊन) ही घसरण थांबवण्यात सक्रिय सहभाग घेतात असेही म्हणू शकता.
म्हणून दुसर्‍या बाजूने बोलायचे झाले तर जर तुम्ही असे मानत असाल की डिव्हॅल्यूएशनने (मग ते ५० पैसे असो की १० रुपये) रुपया कमजोर (आणि पर्यायाने अर्थव्यवस्था कमकुवत) होतोय तर तुम्ही अशी आशा करायला हवी की डिव्हॅल्यूएशनने आनंदी होणारे अनिवासी भारतीय अजून वाढायला हवेत. :)

चिनार's picture

3 Jun 2015 - 9:31 am | चिनार

ओके !
या विषयावर ज्ञान नसल्यामुळे वरील प्रश्न विचारला होता.
विनिमय दर, कच्च्या तेलाचे भाव, सोने चांदीचा भाव आणि एखाद्या देशाची अर्थव्यवस्था याचा परस्परांशी काय संबंध आहे हे सांगू शकाल का ?
वेगळा धागा काढला तर उत्तम ..

श्रीरंग_जोशी's picture

3 Jun 2015 - 4:43 am | श्रीरंग_जोशी

डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव घसरल्यास मला आनंद होतो. निर्यात हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असल्याने अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण अशा वेळी तुलनेत कमी होतो. बाकी परदेशात राहणार्‍या भारतीयांपैकी एक असल्याने देशाची परकीय गंगाजळी थेट वाढवण्यास अमीबाएवढा का होईना आपला वाटा असतो याचेही समाधान असते.

कुठलाही सामान्य माणूस पहिले स्वतःचा फायदा तोटा बघणार. एखाद्याने २००६ मध्ये १० लक्ष रुपयांना घेतलेला फ्लॅट २०१४ मध्ये ४० लक्ष रुपयांना विकला गेल्यास आनंद मानणारा माणूस पाहायला मिळतो की त्याच वेळी घरांच्या किमती अवाजवी वाढल्याने सर्वसामान्यांचे जिणे अवघड होताना पाहून मनापासून दु:खी कष्टी झालेला पाहायला मिळतो?

इथे आम्हाला जेव्हाही भारतात बनलेल्या वस्तु जसे कपडे वगैरे दुकानात दिसतात तेव्हा खरेदी करायच्या वेळी आवर्जुन त्यांना प्राधान्य देतो.

अवांतर - गेली अनेक वर्षे डॉलर रुपया विनिमय दर बर्‍यापैकी स्थिर आहे. जुलै २०१३ मध्ये काही दिवसांसाठीच हा भाव ₹६८ प्रति डॉलर वर गेला होता.

संदीप डांगे's picture

1 Jun 2015 - 7:38 pm | संदीप डांगे

जय हो आय.टी मानसिकता. जय हो भारतीय ढोंगीपणा.

अरेवा. अजब तर्कट लावून भारतीय ढोंगीपणाचे सरकटीकरण केल्याबद्दल अभिनंदन.

इथे अमेरिकेतच काय गल्फ आणि इतर मुस्लिम देशांमधे नोकरीस असणारेही लोक आहेत. मुस्लिमांचा प्रचंड राग करणारे विप्रोमधे हिरिरिने काम करायला जातात.

एखाद्या देशाची परराष्ट्र धोरणं आणि एखाद्या कामकरी माणसाचं पोटपाणी याचा तुम्ही जबरदस्त संबंध लावलाय. वा, मजा आली.

पुण्याचे वटवाघूळ's picture

1 Jun 2015 - 9:23 pm | पुण्याचे वटवाघूळ

एखाद्या कामकरी माणसाचं पोटपाणी ....

हे वाचून मात्र मस्त मनोरंजन झाले बघा. आमचे कामकरी हिंजवडीला २ बी.एच.के घेतात. आपला दोन बी.एच.के कलिगच्या २ बी.एच.के पेक्षा ५० स्क्वेअर फूट कमी असेल तरी ते त्यांना कमीपणाचे वाटते. म्हणून कुठेतरी रो-हाऊस घेतात नाहीतर सेकंड होम म्हणून दुसरा फ्लॅट घेतात. असे हे कामकरी लोक :)

अमेरिकेविषयी इतका राग असेल तर कोणी जायला सांगितले आहे तिथे? कोणाचाही आग्रह नाही.

रच्याकाने का हो मिसळपावचा सदस्य नसलेले लोक सदस्य व्हायला धडपडत असतील आणि त्याचवेळी मिसळपावला 'हरामखोर' संकेतस्थळ म्हणत असतील तर त्यात तुम्हाला काहीच ढोंगीपणा वाटणार नाही का हो?

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 2:15 pm | संदीप डांगे

कामकरी हा शब्द वर्किंग प्रोफेशनल या अर्थाने घेतलाय साहेब. गरिब, हातावर पोट असणार्‍या मजूराचा अर्थ तुम्ही काढताय.

तसेही भारत सरकार विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करत होते म्हणून बरेच लोक ठो-ठो करायचे. त्यांनाही देश सोडून जायला सांगायला पाहिजे, नाही?

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 2:29 pm | पुण्याचे वटवाघूळ

तसेही भारत सरकार विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करत होते म्हणून बरेच लोक ठो-ठो करायचे. त्यांनाही देश सोडून जायला सांगायला पाहिजे, नाही?

असेच लोक सौदी अरेबियात गेले तर त्यांना हाकलायचा सौदी सरकारला नक्कीच हक्क आहे आणि तसे त्यांनी केले तरी त्यात काहीच चुकीचे नाही. एकीकडे एका विशिष्ट धर्माचे नावही सहन होणार नाही आणि दुसरीकडे त्याच विशिष्ट धर्माच्या सर्वात महत्वाच्या दोन प्रार्थनास्थळांचा प्रतिपालक असे बिरूद मिरविणार्‍या राजाच्या सरकारने दिलेल्या व्हिसासाठी खटपट करणे हा पण तसाच दुटप्पीपणा झाला.

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 3:06 pm | संदीप डांगे

रावसाहेब. ते व्हिसा व्हिसा सोडून द्या. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल काय? भारत सरकारची धोरणं पटत नाहीत तरी भारतात राहणार्‍यांना तुम्ही ढोंगी म्हणाल काय?

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 3:13 pm | पुण्याचे वटवाघूळ

ते व्हिसा व्हिसा सोडून द्या.

का बरं? नाही सोडणार व्हिसा व्हिसा. कारण माझा मुद्दा अमेरिकेचा व्हिसा मिळावा म्हणून जीव वरखाली होत असलेल्यांविषयी आहे.

माझा मुद्दा अमेरिकेचे नागरिक नसलेल्या पण अमेरिकेत जाण्यासाठी आसुसलेल्या आणि त्याच वेळी अमेरिकेला हरामखोर म्हणणार्‍या लोकांविषयी आहे.अमेरिकन नागरिकही अमेरिकन सरकारवर टिका करतच असतात आणि तो त्यांना त्या देशाच्या नागरिकत्वाबरोबर मिळालेला अधिकार आहे. माझा मुद्दा त्यांच्याविषयी नाहीच. माझा मुद्दा इथल्या हरामखोर कंपनीविषयी आहे. इतकी अमेरिका आवडत नसेल तर कशाला जाता तिथे?

काळा पहाड's picture

2 Jun 2015 - 3:18 pm | काळा पहाड

का बरं? नाही सोडणार व्हिसा व्हिसा.

बरं नका सोडू पण शांत व्हा. उगीच रक्तदाब वाढेल तर काय घ्या?

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 3:31 pm | संदीप डांगे

बरं बरं. पण कुणी अमेरिकेविरुद्ध बोलतंय तर तुमचा का जीव वरखाली होतोय? जगात शांतता राहावी म्हणून जगाचा नागरिक म्हणूनही कोणत्याही देशाच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. फसलेल्या अमेरिकन धोरणांमुळे भारताला झळ पोचत असेल तर अमेरिकेवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. अशा भारतीयाला कामानिमित्त अमेरिकेत जावे लागत असेल तर त्यात काय ढोंगीपणा आहे? कित्येक अमेरिकन मुस्लिम देशांना शिव्या घालत असतील पण त्यांनी मुस्लिम देशात जाणे सोडले काय?

तुमचं अमेरिकाप्रेम इतकं उफाळून आलंय की त्या नादात इथल्या सदस्यांना तुम्ही चक्क हरामखोर म्हणत आहात? की काही वैयक्तिक स्कोर सेट्लिंगचा मामला आहे?

बायदवे, तुम्ही हरामखोर हा शब्द वापरून ही चर्चा कुठल्या कुठे नेऊन ठेवली आहे. आशा आहे तुम्हाला या शब्दाचा योग्य अर्थ माहित असेल.

बॅटमॅन's picture

2 Jun 2015 - 3:39 pm | बॅटमॅन

जर अमेरिकेचा ढोंगीपणा चालतो तर भारतीयांनीच काय घोडं मारलंय? आमचाही सो कॉल्ड ढोंगीपणा चाललाच पाहिजे, नै का?

(मुळात आहे ती भूमिका ढोंगी म्हणावी का इथून सुरुवात आहे. समजा ती भूमिका ढोंगी आहे असे सिद्ध झाले तरी मग एकतर कुणाचाच ढोंगीपणा सहन करायला नको किंवा सगळ्यांचा करा. असं एकाला एक न्याय अन दुसर्‍याला दुसरा असला प्रकार नको.)

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 3:48 pm | संदीप डांगे

मक्काय्तर...

जिथं रुपये-डॉलर-पाउंड्स-युरो-दिनार-रुबल्स चा प्रश्न येतो तिथं माणसानं खमक्या क्यापीटालिस्ट व्हावं. तेवढं सोडलं तर बाकी जगात ढोंगीपणाशिवाय काय नाय असं आमच्या बाचं ठाम मत हाय.

काळा पहाड's picture

2 Jun 2015 - 3:59 pm | काळा पहाड

पण मला तर ते म्हंतात ते बरोबर दिस्तंय. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरणार्‍यांनी चीन वर टीका करू ने. हॉलिवूड मूव्हीज बघणार्‍यांनी अमेरिकेवर, जपानी कार/कॅमेरा वापरणार्‍यांनी जपानवर, वाईन पिणार्‍यांनी शरद पवारांच्यावर, आधार कार्ड असणार्‍यांनी युपीए वर आणि बुलेट ट्रेन मधे बसणार्‍यांनी (जेव्हा होईल तेव्हा) मोदींवर टीका करू ने.

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 4:00 pm | संदीप डांगे

_/\_ _/\_ _/\_

टीका करण्यात नक्की प्रॉब्लेम काय आहे? वरील एंटिटीज़ काही घटकांचा पुरवठा करतात म्हणजे कै उपकार करत नाहीत. आज शरद पवार आहेत, उद्या दुसरा कुणीतरी येईल. टीका केली तर जणू त्या घटकांचा पुरवठा बंद होईल अशी भीती आहे की काय तुम्हांला? =))

काळा पहाड's picture

2 Jun 2015 - 4:13 pm | काळा पहाड

मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम.

चालुद्यात निरर्थक अत्मरंजन. =))

एकूणच काही जणांच्या धोतराच्या सोग्याला हात घातला आहे मी असे दिसते :)

बॅटमॅन's picture

2 Jun 2015 - 4:20 pm | बॅटमॅन

तो तुमचा समज आहे.

काळा पहाड's picture

2 Jun 2015 - 4:22 pm | काळा पहाड

एकूणच आपण तर बुवा या दोन वाक्यांवर बेहद्द खूष आहे. एकूणच कुठेही वापरता येतातः
१. एकूणच मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम.
२. एकूणच काही जणांच्या धोतराच्या सोग्याला हात घातला आहे मी असे दिसते :)

बॅटमॅन's picture

2 Jun 2015 - 4:27 pm | बॅटमॅन

अगदी अगदी.

अशा वनलायनर्सचा एक शेप्रेट धागा पायजे. तूर्त वनलायनर असे:

१. तो तुमचा समज आहे.
२. आपणास मुद्दा कळालेला नाही.
३. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात.
४. चालुद्यात निरर्थक अत्मरंजन! ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ
५. एकूणच मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम.
६. एकूणच काही जणांच्या धोतराच्या सोग्याला हात घातला आहे मी असे दिसते :)

तरी तबियतदार मिपाकरांनी या लिष्टीत यथाशक्ती यथामती भर टाकून सहकार्य करावे ही विनंती!!!! ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊ

नाव आडनाव's picture

2 Jun 2015 - 5:29 pm | नाव आडनाव

७. बाकी तुमचं चालु दया. :)

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 4:09 pm | पुण्याचे वटवाघूळ

एकूणच मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम.

कसली मिरची आणि कसले झोंबणे? मनोरंजन केल्याबद्दल खरे तर तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 4:08 pm | पुण्याचे वटवाघूळ

जगात शांतता राहावी म्हणून जगाचा नागरिक म्हणूनही कोणत्याही देशाच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

करा की टिका.

अशा भारतीयाला कामानिमित्त अमेरिकेत जावे लागत असेल तर त्यात काय ढोंगीपणा आहे?

अमेरिकेत जावे लागत असेल? असो अमेरिकेत जायला लोक तरसत असतात नुसते. आणि परत दुसर्‍या तोंडाने अमेरिकेला हरामखोर म्हणतच असतात.हा दुटप्पीपणा आहे एवढेच.

तुमचं अमेरिकाप्रेम इतकं उफाळून आलंय की त्या नादात इथल्या सदस्यांना तुम्ही चक्क हरामखोर म्हणत आहात? की काही वैयक्तिक स्कोर सेट्लिंगचा मामला आहे?

बायदवे, तुम्ही हरामखोर हा शब्द वापरून ही चर्चा कुठल्या कुठे नेऊन ठेवली आहे. आशा आहे तुम्हाला या शब्दाचा योग्य अर्थ माहित असेल.

हरामखोर हा शब्द या चर्चेत नक्की कुणी आणि कुणाला सगळ्यात पहिल्यांदा वापरला आहे हे वाचा. या शब्दाचा वापर मी इतरांसाठी करत आहे हा जावईशोध लावल्याबद्दल तुम्हाला नोबेल पारितोषिकच द्यायला हवे.

काळा पहाड's picture

2 Jun 2015 - 4:10 pm | काळा पहाड

हरामखोर हा शब्द या चर्चेत नक्की कुणी आणि कुणाला सगळ्यात पहिल्यांदा वापरला आहे हे वाचा.

बापरे, पैसा तैं वर डायरेक्ट टीका..

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 4:14 pm | संदीप डांगे

माझा मुद्दा इथल्या हरामखोर कंपनीविषयी आहे

हे तुमचेच वाक्य आहे. हे नक्की कुणासाठी आहे?

काळा पहाड's picture

2 Jun 2015 - 4:16 pm | काळा पहाड

एकूणच मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम.

काय सारखं मिरची-मिरची करताय ओ मिरचीसेठ?

(सरफरोश प्रेमी) बॅटमॅन.

अशानेच मिरच्या महाग होतात हे मी आपल्या निदर्शनास आणून देत आहे.