कृती करूया!

अनंत छंदी's picture
अनंत छंदी in काथ्याकूट
27 Nov 2008 - 3:57 pm
गाभा: 

माझ्या मनात एक विचार आला आहे तो मी आपणा सर्वांसमोर मांडत आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्वांबद्दल आपल्या मनात आदराची भावना आहे. मात्र आता वेळ आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची, या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस वा अन्य खात्यातील कर्मचारी असोत की निरपराध नागरिक त्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींच्या कुटुंबियांना अशावेळी कोरड्या सहानुभूतीपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज असते त्या करिता आपण सर्व मिसळपाववरील सदस्यांनी यथाशक्ती एक निधी जमवावा व त्या गरजूंना शक्य असेल ती मदत करावी. आपण आपल्या मित्रमंडळींनाही या निधी संकलनात सहभागी करून घ्यावे. या कामी तात्या अभ्यंकर यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती आहे. आपणा सर्वांचे मत मांडावे.

प्रतिक्रिया

मैत्र's picture

27 Nov 2008 - 4:42 pm | मैत्र

अनंत छंदी, कल्पना मांडल्याबद्दल धन्यवाद.
मी विचार करत होतो की शहीद झालेले जे कमी हुद्द्यावरचे पोलीस आहेत कॉन्स्टेबल वगैरे त्यांची माहिती घेऊन काही आर्थिक मदत व कृतज्ञता व्यक्त करावी. मिसळपाव वर जर हे झाले तर खुपच चांगलं.
तात्या, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही / विजुभाऊ / मुंबइतील अजून काही मिपाकर पुढाकार घेत असतील तर अकाऊंट डिटेल्स व्य नि द्वारे कळवा.

अधिकः अजून पूर्ण नियंत्रणात नाहिये. किती अतिरेकी शस्त्रं घेऊन कुठे हिंडत आहेत सांगणं कठीण आहे. सर्व मिपाकरांनी काळजी घ्या व सुरक्षितता बाळगा. हे मुंबइ बाहेरील इतर शहरांनाही लागू आहे.

अनामिका's picture

27 Nov 2008 - 5:25 pm | अनामिका

कल्पना खरच चांगली आहे पण मला नेहमी प्रश्न पडतो की पैसे दिल्यानेच सगळे प्रश्न सुटतात का?
त्यांच्या जीविताच मोल पैशाने लावण हेच मुळात चुकीच आहे अस नाहि का वाटत?
जखमींना मदत करण्याच्या बाबतीत या पर्यायाचा विचार होवु शकतो.
"अनामिका"

मैत्र's picture

27 Nov 2008 - 5:32 pm | मैत्र

पैशाने सगळे प्रश्न सुटत नाहीत. थोडे तरी सुटतील ? सामान्य पोलिसाची नोकरी करणार्‍या माणसाची मुलं शाळेत असतील. त्यांनी काय करायचं? सरकारी मदत यायची त्या गतीने येइल. आधार महत्त्वाचा.
समोरा समोर लढून वीरमरण आलेल्या पोलिसां बद्दल कृतज्ञता आहे ती महत्त्वाची. पैसा हा एक मार्ग फक्त.

विनायक प्रभू's picture

27 Nov 2008 - 6:26 pm | विनायक प्रभू

थोड्या दिवसात जे शिपाई शहिद झाले त्यांना समाज विसरुन जाईल. परत सर्व काही नेहेमीप्रमाणे सुरुळित. पुन्हा हल्ला होईपर्यंत. मला मान्य नाही हे. जीव कळवळला. उठलो. गेलो एरियातील पोलिस स्टेशनला. तिथल्या सर्वात मोठ्या अधिकार्-याना भेटलो. कुठ्ल्याही प्रसिद्धिला फाटा देउन शिपायांच्या घरातल्या एका मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे वचन दिले. माझे कार्य शिक्षण
क्षेत्रात असल्यामुळे मी हे करू शकतो. अधिकारी चकित झाले ह्याचे आश्चर्य वाटते.
घरातला कर्ता गेल्यावर काय होते ने मी स्वःत अनुभवलेले आहे.
मी जे करु शकतो ते मी केले, बस्स

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 6:28 pm | जैनाचं कार्ट (not verified)

वा !

प्रभू सर छान काम केलंत !
अभिनंदन !

अश्याच पध्दतीने त्या विरांचा सम्मान होईल !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

अनामिका's picture

27 Nov 2008 - 6:56 pm | अनामिका

मैत्र ,अनंत छंदी
तुमच्या या मोहिमेत सहभागी व्हायला नक्कि आवडेल.
मला जे त्याक्षणी वाटल ते मी लिहिल होत .
कुणिहि राग मानु नये.
"अनामिका"

सर्वसाक्षी's picture

27 Nov 2008 - 7:51 pm | सर्वसाक्षी

असा निधी संकलीत करणे उचीत ठरेल. मिपा तर्फे व्यवस्थापनाने असा निधीकोष स्थापन करावा. सदस्यांनी स्वखुषीने जे द्यायचे ते द्यावे.
इथे संकलन व व्यवस्थापन हे पगारी नोकर वा व्यापारी संस्थेकडुन होणार नसून ते काम काही व्यक्ती केवळ सामाजिक जाणीव म्हणुन करणार असल्याने पावती/ हिशेब वगरेला थारा नसावा. मिपा व्यवस्थापन व निधी व्यवस्थापन या निधीचा योग्य वापर करेल असा ज्यांना विश्वास आहे, केवळ त्यांनीच सहभागी व्हावे.

'कुठल्याही आर्थिक बाबीत ताळेबंद् आवश्यक आहे' असे मत असलेल्यांनी केवळ तशी सूचना वा अपेक्षा व्यक्त न करता ती जबाबदारी स्विकारावी.

माझी एक सूचना: समजा मिपा हे जर सशुल्क संकेतस्थळ असते तर मी काय शुल्क मोजायला तयार झालो असतो? असा विचार करुन त्या शुल्काइतकी रक्कम सदस्यांनी द्यायला हरकत नाही.

विनायक प्रभू's picture

27 Nov 2008 - 8:32 pm | विनायक प्रभू

मला कसलीही पावती नको. मला मिपा हीच मोठी पावती. तात्यांनी पुढाकार घ्यावा. ताबोडतोब हजर होईन.

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 8:38 pm | कपिल काळे

/<<माझी एक सूचना: समजा मिपा हे जर सशुल्क संकेतस्थळ असते तर मी काय शुल्क मोजायला तयार झालो असतो? असा विचार करुन त्या शुल्काइतकी रक्कम सदस्यांनी द्यायला हरकत नाही>>

येस्स, सर्वसाक्षी मनातलं बोललात. काहीच हरकत नाही. तात्यांनी एखादे खाते उघडून त्यांचा नंबर द्यावा. सगळे त्याच्यात आपली मदत जमा करतील

http://kalekapil.blogspot.com/

यशोधरा's picture

27 Nov 2008 - 8:50 pm | यशोधरा

>>तात्यांनी एखादे खाते उघडून त्यांचा नंबर द्यावा. सगळे त्याच्यात आपली मदत जमा करतील

सहमत. सद्ध्या तरी एवढेच करु शकते.
याचा अर्थ फक्त पैसे देऊन जबाबदारी टाळायला पहात आहे वगौरे, असा कृपया लावू नका कोणी...

ऋषिकेश's picture

27 Nov 2008 - 9:31 pm | ऋषिकेश

स्तुत्य योजना मात्र माझ्यामते आज या घडीला त्या पोलिस कुटुंबांवर मदतीचा वर्षाव होईल आणि पुढे, काहि महिन्यांनी लोक त्यांना विसरतील... आणि तेव्हाच या कुटुंबांना खर्‍या मदतीची गरज असेल..

थोडक्यात आज खरोखर जर मदत करायची असेल तर गेल्या रेल्वे बॉम्बस्फोटात मेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना करा असे सुचवावेसे वाटते.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

टुकुल's picture

27 Nov 2008 - 9:36 pm | टुकुल

विप्र, मान गये आपको.
आम्ही तुमच्या एवढ नाही करु शकलो तरी काही तरी करायची इच्छा आहे. फुल ना सही फुलाची पाकळी.

टुकुल's picture

27 Nov 2008 - 9:36 pm | टुकुल

विप्र, मान गये आपको.
आम्ही तुमच्या एवढ नाही करु शकलो तरी काही तरी करायची इच्छा आहे. फुल ना सही फुलाची पाकळी.

विसोबा खेचर's picture

28 Nov 2008 - 7:47 am | विसोबा खेचर

मिपावर व माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवून केलेल्या सर्वांच्या सूचनांबद्दल, आग्रहाबद्दल मनापासून आभारी आहे..

परंतु मी स्वत: किंवा मिसळपाव डॉट कॉम सध्या तरी कुठल्याही आर्थिक जबाबदारीत अडकू इच्छित नाही.. कुठल्याही आर्थिक व्यवहारात मिसळपाव डॉट कॉम सहभागी होऊ इच्छित नाही..

सभासदांनी व्यक्तिगतरित्या ज्याला जी मदत करायची असेल ती जरूर करावी, मीही करणार आहे. परंतु मी किंवा मिसळपाव डॉट कॉम कुठल्याही आर्थिक व्यवहारात मध्यस्थ म्हणून काम पाहू शकत नाही असे अत्यंत विनम्रपणे सांगावेसे वाटते..

पुनश्च एकदा आभार...

तात्या.