मिसिंग यु, सद्दाम !

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in काथ्याकूट
28 May 2015 - 7:15 pm
गाभा: 

इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!!

http://i1.wp.com/www.loonwatch.com/wp-content/uploads/2014/08/ISIS_Behea...

प्रतिक्रिया

"तुमच्यामुळे मटण महाग झालं" ची आठवण झाली एकदम.

मिरच्या म्हटल्या की मिरज का आठवतं ते कै कळत नै.. ;)

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 4:17 pm | पुण्याचे वटवाघूळ

का हो इतरांना प्रश्न विचारताय== मी तुम्हाला प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर मिळेल काय?

एखादा माणूस मिपाचा सदस्य होण्यापूर्वी सदस्यत्वासाठी तरसत असेल आणि त्याचवेळी मिपाला हरामखोर संकेतस्थळ म्हणत असेल तर त्याला तुम्ही ढोंगी म्हणणार की नाही? मी तरी अशा माणसाला म्हणेन-- कोणी सांगितले आहे लेका तुला मिपाचा सदस्य व्हायला? कोणाचाही आग्रह नाही. इतके मिपा आवडत नसेल तर कशाला सदस्यत्वासाठी तरसत आहेस? आता मिपाऐवजी अमेरिका ठेवा म्हणजे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 4:33 pm | संदीप डांगे

ओके बॉस. चल आता होऊन जौदे.

या विशिष्ट धाग्यावर काही सदस्यांनी अमेरिकन धोरणाविरुद्ध प्रतिसाद दिलेत. ओके?

अमेरिकेच्या प्रवेशासाठी तरसणार्‍यांनी तिच्यावर टीका का करावी असं तुम्ही म्हटलंय. ओके?

आता इथल्या अमेरिका विरोध दर्शवणार्‍या सदस्यांपैकी कुणी अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी तरसत आहे हा जावईशोध तुम्ही कुठून लावला? 'मी कुणाचं नाव घेतलं नाही' वैगेरे सबब इथे चालणार नाही. तुमचे या धाग्यावरचे सर्व प्रतिसाद अमेरिका विरोध दर्शवणार्‍या इथल्याच सदस्यांना उद्देशून याच संस्थळावर याच धाग्यावर केले आहेत. त्यामुळे ते जनरल स्टेटमेंट होत नाही.

तुमच्या उदाहरणातले वाक्य तुमच्या सूचनेप्रमाणे बदलूनः
इतकी अमेरिका आवडत नसेल तर कशाला सदस्यत्वासाठी तरसत आहेस?

अमेरिका आवडत नाही असे कोण तरीपण अमेरिकेसाठी तरसत आहे सांगा?

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 4:37 pm | पुण्याचे वटवाघूळ

आय.टी कंपनीत लोक ऑनसाईटसाठी कसे तरसत असतात हे तुम्ही बघितले नाहीत का? असो.

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 4:53 pm | संदीप डांगे

आता उत्तरापासून पळ का काढताय? तुमच्या प्रतिसादांमधे तुम्ही इथल्या सदस्यांना टार्गेट केलंय. त्याबद्दल मी प्रश्न विचारलाय बंधू. ते आयटी कुठून आलं मधेच? सोडणार नव्हते ना विषय? मग काय झाले अता?

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 4:58 pm | पुण्याचे वटवाघूळ

मी कोणालाही टारगेट केलेले नाही. इथली हरामखोर कंपनी म्हणजे हरामखोर या शब्दाचा या चर्चेत ज्या प्रकारे वापर झाला आहे त्यावरून अमेरिकेला हरामखोर म्हणणारी कंपनी असा अर्थ सगळे घेतील असे मला वाटले होते. आणि तुम्ही सोडून इतर कोणालाही यात कोणालाही व्यक्तिगत टारगेट केलेले आहे असे वाटले नाही यातच सगळे काही आले. पिंपातल्या उंदिर यांनी त्या प्रतिसादाविषयी सहमतीही दर्शविली आहे म्हणजे त्याचा नक्की अर्थ काय हे त्यांच्याही लक्षात आलेच होते हे नक्कीच.

तरीही संपादकांना विनंती आहे की हरामखोर कंपनी ऐवजी-- 'अमेरिकेला हरामखोर म्हणणारी कंपनी' असा बदल करावा.

आणि हो मी कुणाला टारगेट केले आहे की नाही याचा खुलासा मी केवळ संपादकांनाच करेन.त्यात तुम्ही पडू नये हे इष्ट.

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 5:18 pm | संदीप डांगे

अस्सं का. बरंय मग. शब्दांच्या कोलांट्याउड्या मारून शरसंधान काही नविन नाही.

सगळं स्पष्ट असतांना अजून काय बोलायची गरज नाही. धन्यवाद!

पुण्याचे वटवाघूळ's picture

1 Jun 2015 - 9:24 pm | पुण्याचे वटवाघूळ

एकूणच काही जणांच्या धोतराच्या सोग्याला हात घातला आहे मी असे दिसते :)

ईश्वरसर्वसाक्षी's picture

2 Jun 2015 - 3:22 pm | ईश्वरसर्वसाक्षी

बरुब्बर अज्जाबात सोडु नका. एक सांगा तुमच्या परिचयातला कोणि असेच हाम्रीकेला श्या देनारा व्हिसा मिळाल्या बरोबर तेरे बिन लादेन सारखा हाम्रीकेला पळाला वाट्त्...आणि तुम्हि इतके प्रयत्न करुन सुद्धा इथेच राहिलात. आयेगा वाघुळ साब आपका भी व्हिसा आयेगा.

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 4:12 pm | पुण्याचे वटवाघूळ

आयेगा वाघुळ साब आपका भी व्हिसा आयेगा.

हा हा हा. अहो मी १९९९ पासून अमेरिकेत ५ वेळा गेलो आहे हो. माझा व्हिसा आधीच आलेला आहे :)

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 4:17 pm | संदीप डांगे

ओके ओके. समजलं. एकूण खाल्ल्या मिठाला जागताय तर...

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jun 2015 - 4:30 pm | पुण्याचे वटवाघूळ

ओके ओके. समजलं. एकूण खाल्ल्या मिठाला जागताय तर...

हा हा हा. अमेरिकेत जायची कोणीही माझ्यावर सक्ती केली नव्हती. तो माझा चॉईस होता.आणि अमेरिकन व्हिसासाठी मी पण इतर अनेक तरसतात तसाच एकेकाळी तरसलेलो आहे. तसे असेल तर ज्या देशात जायला मी इतका तरसत असेन त्याच देशाला (मी त्या देशाचा नागरिक नसताना) हरामखोर वगैरे म्हणणे हा शुध्द ढोंगीपणा आहे इतकेच.

काळा पहाड's picture

2 Jun 2015 - 4:36 pm | काळा पहाड

एकूणच मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम.

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 4:37 pm | संदीप डांगे

हा हा हा अगदी अगदी...

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 4:43 pm | संदीप डांगे

तुम्ही तरसत होतात हे सांगून बरे केले बघा. ते तरसणेही तुमचा चॉईस होता, नै?

पण ते अमेरिकेत जायची कोणीही सक्ती केली नव्हती हे वाक्य काय आहे? अमेरिकेत जायची सक्ती होते? मग लोकं तरसतात का बुवा?

मृत्युन्जय's picture

2 Jun 2015 - 4:20 pm | मृत्युन्जय

सद्दामच्या धाग्याचे काश्मीर झाले ;)

पैसा's picture

2 Jun 2015 - 5:00 pm | पैसा

सगळ्या प्रतिक्रियांच्या शेवट धागा काय होता तेच आठवेना!

काळा पहाड's picture

2 Jun 2015 - 5:03 pm | काळा पहाड

तो तुमचा समज आहे.

पैसा's picture

2 Jun 2015 - 8:20 pm | पैसा

तुम्हाला मुद्दा कळलेला नाही.

इरसाल's picture

2 Jun 2015 - 5:08 pm | इरसाल

ठरलं का मग एकदाचं काय ते ?

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 5:19 pm | संदीप डांगे

आमी अमेरिकन व्हिसासाठी अजिबात तरसायचे नाही असे ठरवले आहे. अमेरिकेत जायची सक्ती झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही.

चिनार's picture

2 Jun 2015 - 5:47 pm | चिनार

सहमत !
(कारण आम्ही तरसलो,बोम्बल्लो,केकाटलो तरी आम्हाला व्हिसा मिळणार नाहीये याची पूर्ण खात्री !)

अखिल भारतीय 'आम्हाला अमेरिकेला हाकला रे संघटनेचे अध्यक्ष - चिनार !

इरसाल's picture

2 Jun 2015 - 5:42 pm | इरसाल

मग बाकीचं कोण ठरवणार आहे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2015 - 8:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

या धाग्यावरची शेवटचे ५०% प्रतिसाद वाचून, आपल्यावरच्या चर्चेचा रोख अमेरिकेवर गेल्याचे पाहून, सद्दाम त्याच्या थडग्यात खदखदा हसत असेल..... हह्हा हह्हा हह्हा ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा =))

संदीप डांगे's picture

2 Jun 2015 - 9:26 pm | संदीप डांगे

अहो रोख अमेरिकेवर नाही गेलाय. अमेरिकेला हरामखोर म्हणणार्‍यांवर, न म्हणणार्‍यांवर गेलाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jun 2015 - 3:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकूण तेच ते. म्हण्जे...

"अमेरिकेला श्या घालणे" किंवा "अमेरिकेला श्या घालणार्‍यांना श्या घालणे" इकडे सर्व लक्ष केंद्रीत झाल्याने "सद्दाम खूश हुवा !" असेच होणार ना ?!

आजचा सवाल : मिपावर सोगावाले धोतर घालणारे लोक किती आणि इतर डांगी धोतर घालणारे लोक किती?

डांगी नाही दुटांगी म्हणायचे होते. मोबल्यावर टाइप करताना घोळ झाला. टांगावाल्यानो माफ़ करा

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Jun 2015 - 3:53 pm | पुण्याचे वटवाघूळ

एक गोष्ट कळत नाही.

सद्दामचा मूलतत्ववाद्यांना विरोध होता आणि त्याच्या काळात इराकमध्ये त्यांना कधीच थारा मिळाला नाही. पण सध्या आय.एस.आय.एस मध्ये सद्दाम समर्थकांचाच भरणा आहे. भारतीय नर्सना परत आणले तेव्हा भारताने आय.एस.आय.एस मधील सद्दाम समर्थकांनाच कॉन्टॅक्ट करून त्यांची मदत घेतली होती. सद्दामचे आणि भारताचे काहीच वाकडे नसल्यामुळे त्यांनी मदत केलीही. पण तरीही सद्दामच्या पाडावानंतर त्याचे समर्थक आय.एस.आय.एस मध्येच गेले हे कसे नाकारणार?

म्हणजे स्वतः सद्दामचा अशा तत्वांना विरोध असला तरी तो वरवरचा होता की असा विरोध करणे हे पण त्याचे एक राजकारण होते?आणि योग्य संधी मिळताच त्यानेही अशा मूलतत्ववाद्यांच्याच बाजूने उडी घेतली असती? १९९१ च्या पहिल्या गल्फ वॉरच्या वेळी सद्दामनेही जिहादचाच कॉल दिला होता हे कसे विसरून चालेल? म्हणजे खरोखरच मूलतत्ववादाला विरोध असलेला माणूस जिहादचा कॉल कसा देऊ शकेल?

सद्दामचा भारताला पाठिंबा होताच. तसाच पाठिंबा एकदा स्वाझीलँड या देशानेही यु.एन मध्ये भारताला दिला होता. हा देश नक्की कुठे आहे हे बहुतेकांना माहितच नसेल. दक्षिण आफ्रिकेत दोन देश सर्व बाजूने दक्षिण आफ्रिकेच्या भूभागाने वेढले आहेत. त्यातला एक स्वाझीलँड आणि दुसरा लेसोथो. अशा देशाने भारताना पाठिंबा दिला तरी त्यामुळे आपला नक्की काय फायदा झाला? त्याचप्रमाणे सद्दामने भारताला पाठिंबा दिला तरी त्यामुळे भारताचा नक्की काय फायदा झाला? त्यापेक्षा इराक वॉरमुळे जर अल कायदा आणि तालिबान इत्यादी मंडळी अमेरिकेविरूध्द गेली तर अमेरिकेच्या काठीने काही साप परस्पर मारले जातीलच हा आपला फायदा नाही का? राहता राहिला प्रश्न कल्याण आणि इतर ठिकाणांहून आय.एस.आय.एस मध्ये सामील झालेल्यांचा. ही तत्वे मुळातच भारतविरोधी होती/आहेत. त्यामुळे असे लोक कुठल्याही कारणाने भारताविरूध्द कधीतरी उलेटलेच असते. आझाद मैदान मोर्चात अमर जवान जोतीवर हल्ला करणारे लोक कुठल्या आय.एस.आय.एस्मुळे प्रेरित झाले होते? तेव्हा भारतविरोध हा मुख्य मुद्दा-- सद्दाम, आय.एस.आय.एस वगैरे कारणे. असे लोक आय.एस.आय.एस मध्ये सामील होऊन परस्पर अमेरिकेकडून मारले जात असतील तर ते आपल्याला चांगले नाही का?

सद्दामला पाठिंबा देणार्‍यांची जरा गंमतच वाटते.

संदीप डांगे's picture

3 Jun 2015 - 9:37 pm | संदीप डांगे

विश्वाचा पसारा आपल्या दिव्यचक्षूंच्या परिघात आला की जागतिक बुद्धीबळाच्या पटावरची सगळी प्यादी-मोहरे दिसू लागतात. पण ज्यांना निव्वळ काळं पांढरंच बघायची सवय असते त्यांना काही चाली समजत नाहीत. ज्यांना खरे रंग दिसतात त्यांच्याबद्दल अशांना गंमतच वाटेल.

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2015 - 6:35 pm | श्रीगुरुजी

>>> पण तरीही सद्दामच्या पाडावानंतर त्याचे समर्थक आय.एस.आय.एस मध्येच गेले हे कसे नाकारणार?

सद्दाम सुन्नी होता. त्याला फाशी दिल्यावर इराकमध्ये शियांचे वर्चस्व वाढले आहे. मोक्तदा अल सद्र नावाचा एक इराकी पुढारी शियांच्या एका अतिरेकी संघटनेचा प्रमुख आहे. सद्दामला फाशी देताना मोक्तदाचे समर्थक तिथे हजर होते व त्यांच्यापैकी एकाने फाशीचे चित्रीकरण करून आंतरजालाच्या माध्यमातून पसरविले होते. इराण मध्ये शिया बहुसंख्य आहेत. (बहुतेक) सीरीया आणि येमेनेमध्येही शिया मोठ्या प्रमाणात आहेत (चूभूदेघे). इराण देशाकडून इराकमधील शिया गटांना नेहमीच समर्थन मिळत असे. इसिसचा उदय होण्यामागे सद्दामनंतर इराकमध्ये शियांचे वाढते वर्चस्व हे एक कारण आहे. त्यामुळेच सद्दामच्या पाडावानंतर त्याचे सुन्नी समर्थक इसिसमध्ये गेले असावे.

सिद्धेश महाजन's picture

3 Jun 2015 - 8:50 pm | सिद्धेश महाजन

यु ट्युब व्हिडिओ कसा टाकावा.

श्रीरंग_जोशी's picture

3 Jun 2015 - 9:00 pm | श्रीरंग_जोशी

युट्युबवर व्हिडिओ खाली खालील बटन्स / पर्याय दिसतात

Subscribe
त्याखाली
Share - यावर क्लिक केल्यास

Share Embed Email असे तीन पर्याय दिसतात.

त्यापैकी Embed वर क्लिक केल्यास खालीलप्रमाणे कोड जनरेट होईल. ते मिपावर पेस्ट केल्यास व्हिडिओची विंडो दिसेल.

<iframe width="420" height="315" src="https://www.youtube.com/embed/mw95rjdgRHo" frameborder="0" allowfullscreen></iframe>

शिव कन्या's picture

3 Jun 2015 - 9:40 pm | शिव कन्या

यात ओमानचे शांतता प्रिय आणि प्रगतीशील राजे सुलतान काबूस बिन साईद यांची आठवण येते. दुर्दैवाने, असे राज्यकर्ते जगाला माहित नसतात. जे शांतपणे न्यायाने राज्य करतात, ते कधीच चर्चेत नसतात. असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2015 - 1:13 am | डॉ सुहास म्हात्रे

+१,०००,०००

श्रीरंग_जोशी's picture

4 Jun 2015 - 1:17 am | श्रीरंग_जोशी

धाग्याचा विषयच क्रूर हुकूमशहा असल्याने कदाचित कुणाला यांची आठवण आली नसावी.

ओमान आखातातला बहुधा एकमेव देश आहे जिथे हिंदू मंदिर आहे.

माझ्या शाळेतला एक मुलगा सातवीपर्यंत ओमानच्या भारतीय शाळेत शिकला होता.
त्या शाळेत एनसीइआरटीचा अभ्यासक्रम शिकवला जायचा. त्या काळात (९०च्या दशकात) त्याच्या तोंडून ओमानचे बरेच कौतुक ऐकायला मिळायचे.