कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात?

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in काथ्याकूट
28 May 2015 - 12:12 pm
गाभा: 

कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात?

नुकतीच एक सेकंडहँड Wagon-R Lxi कार विकत घेतली आहे...माझी पहिलीच कार :) त्यामुळे शिकणे सुरु आहे.
कार घेतल्यानंतर नातेवाईकांनी + मित्रांनी बरेच सल्ले दिले...त्यातले बरेचसे कार अ‍ॅक्सेसरीजसाठी होते. कोणी म्हणाले बंपर प्रोटेक्टर लाव...तर कोणी म्हणाले लॅमिनेशन करून घे...कोणी म्हणाले फॉग लँप लाव, कारच्या बॅटरीवर चालणारा व्हॅक्युम क्लीनर घे,...ई.
मी स्वत: www.amezon.in (Amezon fulfilled only) वर बर्याच अ‍ॅक्सेसरीज बघीतल्या आहेत आणि त्यातल्या काही घ्याव्याश्या वाटल्या त्या इथे लिहित आहे. बर्याच मिपाकरांकडे स्वत:च्या कार असल्याने तुमचे मत कळवावे अशी विनंती...
डॉ.खरेंनी आधीच whatsapp वर बरेच उपयोगी सल्ले दिले आहेत त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार :)

कार कव्हर
http://www.amazon.in/Dios-Body-Cover-Maruti-Estilo/dp/B00SVCTTBA/ref=sr_...

फुट मॅट
http://www.amazon.in/Vheelocity-73911-Premium-Rubber-Maruti/dp/B00QIS25R...

सन शेड
http://www.amazon.in/Raaisin-Car-sunshade-Set-4/dp/B00J2SV532/ref=sr_1_1...

ऑटोमॅटिक टायर इंफ्लेटर
http://www.amazon.in/Coido-Electric-Inflator-Compressor-Tyres/dp/B00K7B3...

किंवा

मॅन्युअल टायर इंफ्लेटर
http://www.amazon.in/Heavy-Compressor-Cylinder-Cycles-vehicles/dp/B00KQU...

रॅट गार्ड
http://www.amazon.in/Release-On-Rat-Guard-400-g/dp/B00U0ZTIV2/ref=sr_1_7...

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

28 May 2015 - 12:20 pm | प्रसाद गोडबोले

बोराट ह्या चित्रपटा मध्ये बोराटला त्याच्या गाडीला एक अ‍ॅक्सेसरी बसवुन हवी असते ती , अ‍ॅक्सेसरी सर्वात महत्वाची !

तुम्हाला मिळाली तर मलाही कळवा ;)

अवांतर : अधिक माहीती करिता चित्रपट पहावा .

वेल्लाभट's picture

28 May 2015 - 12:50 pm | वेल्लाभट

हाहाहा हाहाहाहहाहाह
हाहाहाहाहाहहा

बोराट _/_

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 8:52 pm | टवाळ कार्टा

चायला....त्यासाठी सोन्याची गाडी बनवून घे ;)

सतिश गावडे's picture

30 May 2015 - 11:31 am | सतिश गावडे

कुठली अ‍ॅक्सेसरी?
चित्रपट खुप पूर्वी पाहिला असल्यामुळे आता विसरल्या गेल्या आहे.

टवाळ कार्टा's picture

30 May 2015 - 11:38 am | टवाळ कार्टा

मांजरीचे लवचुंबक =))

सुनील's picture

28 May 2015 - 12:25 pm | सुनील

सर्वप्रथम अभिनंदन!

माझे (फुकटचे) सल्ले -

कार कव्हर - जर गाडी दिवसेंदिवस पडिक राहणार असेल तर कवर घेण्यात अर्थ आहे. अन्यथा सुरुवातीचे काही दिवस वापरले जाईल नंतर रोज काढण्या-घालण्याचा कंटाळा येईल.

फुट मॅट - जनरली गाडीसहित येते. परंतु, सेकंड हॅन्ड असल्यामुळे मिळाले नसेल तर घेणे.

सन शेड - मी घेतलेले नाही तरीही एसीचा परिणाम जाणवण्यासाठी उपयोगी पडू शकेल.

ऑटोमॅटिक टायर इंफ्लेटर / मॅन्युअल टायर इंफ्लेटर - गरज नाही. शहरात तरी प्रत्येक ठेचेला 'पंचरवाले' आहेत.

रॅट गार्ड - माझ्याकडे नाही. तरीही प्रकार उपयोगी दिसतोय. तुमच्या घराच्या आसपास उंदीर्/घुशी असतील तर घ्या.

अन्य बाबतीत सवडीने लिहीन.

Mobile चार्गेर घ्या सगळ्यात पहिला.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 12:42 pm | टवाळ कार्टा

हो तो घेणारच आहे...त्याबद्दल दुमत नै म्हणून इथे लिहिले नै :)

सदस्यनाम's picture

28 May 2015 - 12:38 pm | सदस्यनाम

ग्यारेज घ्या
(संदर्भ काळ्या पहाडाला इचारावा)

चार्जर, मोबाईल होल्डर आणि मला फार उपयोगी पडलेली गोष्ट म्हणजे रीअर पार्किंग क्यामेरा. नवशिके असाल तर त्या क्यामेराचा फारच उपयोग होतो आणि गाडी एकदाही न ठोकता नीट पार्क करता येते.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 12:44 pm | टवाळ कार्टा

रिअर पर्किंग सेंसर्स आधीच लावलेले आहेत...अंतराचे आकडे दाखवतात

सुबोध खरे's picture

28 May 2015 - 12:48 pm | सुबोध खरे

अधिकृत विक्रेत्याकडे काहीही घेऊ नका कारण ते तिप्पट भावाने मिळते. माझ्या माहितीच्या अधिकृत विक्रेत्याने मला हे सांगितले होते कि गाडी विकून जितका नफा मिळतो तितका किंवा त्यापेक्षा जास्त नफा आम्हाला अ‍ॅक्सेसरीज विकून मिळतो. मुंबईत सायन कोळीवाडा येथे गेलात तर अ‍ॅक्सेसरीज अजून स्वस्त मिळतील. आणि तेथे न लाजता चार दुकानात त्याच वस्तूंची किंमत विचारायची आणि जेथे जे स्वस्त असेल तेथे ते घ्यायचे. कार घेतल्यावर बर्यच लोकाना "असं कसं करायचं" म्हणून भीड पडते. लक्षात ठेवा भीड भिकेची बहिण हि म्हण आहे.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 1:02 pm | टवाळ कार्टा

सायन कोळीवाड्याजवळचे मार्केट नै माहित पण बीकेसीच्या बाजूला जे मार्केट आहे तिथे चक्कर टाकायचीच आहे

नितिन थत्ते's picture

30 May 2015 - 6:13 am | नितिन थत्ते

>>बीकेसीच्या बाजूला जे मार्केट आहे तिथे चक्कर टाकायचीच आहे

तिथे चक्कर टाका पण कार तिथे नेऊ नका. :D

टवाळ कार्टा's picture

30 May 2015 - 10:56 am | टवाळ कार्टा

खिक्क...ब्येश्टने जाणार आहे...तिथे स्वतःची कार्/बाईक नेली तर स्वतःच्याच गाडीचे पार्ट दुकानात टांगलेले दिसू शकतात असे ऐकून आहे =))

खंडेराव's picture

28 May 2015 - 12:56 pm | खंडेराव

टायर इनफ्लेटर ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पंचरवाल्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे मुर्खपणा ( मिपावरच एक धागा आहे )
लिंक बघता येत नाहीये, पण मी कोइडो चा हवामापक वापरतो, अमेझोन वर मिळतो, ३०० -४०० ला असेल, अचुक आहे.
हवा भरण्यासाठी एक पायपंप घेतका आहे लोकल मार्केट मधुन, ६०० ला, तो निट काम करतो. गेल्या १२ महिण्यात कोणत्याही वाहनाला पंचर झालेले नाही, हवा घरीच भरतो.
कवर शोपक्लुस वर स्वस्त मिळतात.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 1:02 pm | टवाळ कार्टा

फोटो टाकता का? अथवा लेखात जी लिंक दिली आहे ती चेक करता का?

खंडेराव's picture

28 May 2015 - 1:41 pm | खंडेराव

ओफ्फिस मधुन चालत नाहीत

https://www.google.co.in/search?q=coido+tyre+pressure&ie=utf-8&oe=utf-8&...

यातला तिसरा फोटो जो आहे ना पेटीम चा, तो. तिथे कॅशबॅक ही असेल.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 1:45 pm | टवाळ कार्टा

पायपंपाचा फोटो हवा होता

खंडेराव's picture

28 May 2015 - 1:52 pm | खंडेराव
टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 1:59 pm | टवाळ कार्टा

ब्रोब्र...तोच घ्यायचा विचार आहे पण प्रेशर मीटर ३५० आणि पंप ६०० मिळून ९५०...त्यापेक्षा कार बॅटरीवर चालणारा पंप १००० ला आहे

खंडेराव's picture

28 May 2015 - 2:27 pm | खंडेराव

ऐकिव माहिती अशी आहे की बॅटरीवर चालणार्याने वेळ जास्त लागतो. आणि बॅटरीही डिस्चार्ज होत रहाते. मेकॅनिकल जास्त भरवशाचा.. दोन्ही मिळुन ७०० मधे यायला पाहिजे, सध्य्या असलेले डिस्काउंट बघुन

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 2:41 pm | टवाळ कार्टा

बॅटरीवर चालणारा म्हणजे कारच्या बॅटरीवर चालणारा

खंडेराव's picture

28 May 2015 - 2:58 pm | खंडेराव

म्हणतोय..गाडी जर कमी चालणार असेल, तर बॅटरी चार्ज कमी होते, अशात हे डिवायसेस खेळ करतात.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 3:03 pm | टवाळ कार्टा

ओह्ह...समजले...पायपंपच चांगला आहे मग...४०० मध्ये मिळतोय :)

http://www.amazon.in/Heavy-Compressor-Cylinder-Cycles-vehicles/dp/B00KQU...

अत्रन्गि पाउस's picture

29 May 2015 - 2:29 pm | अत्रन्गि पाउस

सारखी सारखी हवा भरावी लागत नाही...मी ३ पेट्रोल पंपापाशी भरतो ...पण बर्याच ठिकाणी आहे ..

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 3:23 pm | टवाळ कार्टा

http://www.flipkart.com/coido-kd-98-twin-cylinder-foot-operated-air-pump...

शोधाशोध करताना हे सापडले

सुबोध खरे's picture

28 May 2015 - 1:00 pm | सुबोध खरे

मूषक प्रतिबंधक औषध मुळीच घेऊ नका. ते सारखे चार दिवसांनी फवारत बसावे लागते. आणि इंजिन चा भाग गरम झाल्याने ते उडून जाते. मुळात हे उग्र वासाचे द्रव्य असते ज्यामुळे उंदीर त्यापासून लांब राहतात. यापेक्षा साधे ओडोनिल (बाथरूम मध्ये वापरतो ते) किंवा डांबराच्या गोळ्या जास्त दिवस टिकतात. पावसाळ्यात/ हिवाळ्यात आपण परत आलात कि बाहेर थंडी असते पण कार चे इंजिन गरम असते त्या उबेला उंदीर येतात किंवा पाण्यापासून दूर म्हणून तेथे चढून बसतात. आणि मग सवयीने तेथील वायरी कुरतडतात. एकतर कार च्या खालच्या बाजूला मिळणारी लोखंडी जाळी तेथे बसवा किंवा ratol सारखे मूषक नाशक विष वापरा. आणि मधून मधून डांबराच्या गोळ्या चुरा करून टाका. (अक्खी गोळी कार बाहेर काढली कि घरंगळून खाली पडून जाते.)

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 1:04 pm | टवाळ कार्टा

उंदरांचा प्रतिबंध करायला बर्याच लोकांनी इंजिनाच्या आजूबाजूला तंबाखूच्या पुड्या बांधायला सांगितल्या आहेत

कपिलमुनी's picture

28 May 2015 - 1:04 pm | कपिलमुनी

gps

SMARTPHONE MOUNT विकत घे . जीपीएस चालू असताना फार उपयोगी पडतो . डॅशबोर्ड किंवा काचेवर लावता येतो .

वेल्लाभट's picture

28 May 2015 - 1:15 pm | वेल्लाभट

येस !

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 1:34 pm | टवाळ कार्टा

मुनिवर SMARTPHONE MOUNT मला सध्ध्यातरी उपयोगाचे नै...मला गाडी चालवत असताना फोन वापरायला नै आवडत...जीपीएसचे म्हणाल तर पान-टपरीवरसुध्धा पत्ता विचारू शकतो

कपिलमुनी's picture

28 May 2015 - 2:10 pm | कपिलमुनी

अशामुळेच फुरसुंगीला पोचतोस ;) :)

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 2:42 pm | टवाळ कार्टा

ऐला...किती वेळा ऐकवणार हे lllllluuuuuuulllllluuuuuu

gogglya's picture

29 May 2015 - 12:31 pm | gogglya

+१

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 May 2015 - 11:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फुरसुंगी तरी खरा पत्ता का नाही हे देवालाचं ठाउक. नाहीतर जायचं असायचं आळंदीला आणि सांगायचा धनकवडीला (धनकवडी आयबीएम :P) आणि निघायचा फुरसुंगीला.

टवाळ कार्टा's picture

30 May 2015 - 12:14 pm | टवाळ कार्टा

:P

काळा पहाड's picture

28 May 2015 - 2:31 pm | काळा पहाड

ते घ्याच घ्या. मोबाईल बदलून स्मार्ट फोन घ्या आणि त्यावर मॅप्स टाका. प्रवास करते समय मोबाईल पॅक भी डालो. पान-टपरीवरसुध्धा पत्ता विचारू शकतो वगैरे ठिकाय, पण रात्री प्रवास करताना (विशेषतः कोकणात वगैरे) अंतर्गत रस्ता चुकलात तर समोर माणूस दिसायची पण मारामार असते. त्यावेळी फायदा होतो.

वेल्लाभट's picture

28 May 2015 - 2:07 pm | वेल्लाभट

वैयक्तिक अनुभव. पहिली वस्तू तुटकी आली. परत पाठवली. पुढची वस्तू वेगळ्याच मेक ची. तकलादू. कसेबसे सहा महिने चालली. टाकून दिली.

त्यामुळे शक्यतो बघून घ्या प्रत्यक्ष. ऑनलाईन नको.

विनोद१८'s picture

28 May 2015 - 1:09 pm | विनोद१८

अगदी अत्यावश्यक त्याच अ‍ॅक्सेसरीज घ्याव्यात, काही दुकानदार गरज नसतान अनावश्यक गोष्टी गळ्यात मारतात गाडी बरोबर काय मिळालेय हे जर कळले तर काही सांगता येइल.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 1:35 pm | टवाळ कार्टा

काय असायला हवे ते लिहा...आधीच मिळालेले असेल तर लिहिनच तसे

वेल्लाभट's picture

28 May 2015 - 1:13 pm | वेल्लाभट

कव्हर - नव्याची नवलाई. काही दिवसांनी कंटाळा येतो. कव्हर घालूनही सोसायटीत जेंव्हा गाडीवर चरा येतो (येऊ नये; पण) तेंव्हा रागाने ते कव्हर कायमचं डिकीत टाकलं जातं.
मोबाईल चार्जर - १२व्ही सॉकेट असेल तर घ्याच. अतिशय उपयोगी.
फूट मॅट - घ्या. गाडी स्वच्छ रहायला मदतीची. पण चांगली घ्या. काळी रबरी नको. एक आणखी पर्याय म्हणजे गाडीचा फ्लोअर व टॉप (आतून) लॅमिनेट करून मिळतो आफ्टरमर्र्केट शॉप्स मधे.
रॅट्गार्ड कुचकामी
सनशेड शिवाय काही अडणार नाही.
इन्फ्लेटर ठीक आहे घ्या; पण मुळात स्टेपनीसकट बाकी सर्व चाकं ठणठणीत असली की विशेष अडू नये.

वर नमूद न केलेल्या अ‍ॅक्सेसरी

कार परफ्यूम - चांगलासा तुम्हाला आवडेल असा. अँबी प्युअर वैयक्तिक मला खूप उग्र वाटले. गोदरेज एअर ठीक्ठाक. जेल्/हँगिंग मला अधिक आवडतात. किंवा सरळ स्प्रे. अपहोल्स्ट्री स्प्रे सुधा मिळतो.

जीपीएस - महागडी अ‍ॅक्सेसरी. आजकाल मोबाईल मधे मॅप्स अस्तात. पण कधीकधी हवंहवंसं वाटतं ते जीपीएस.

फ्रंट गार्ड / स्टिकर / एलईडी इत्यादी गोष्टी लावून मूळ गाडीची ग्रेस जाते असं माझं तुम्हाला सांगणं आहे. (अवांतर - झेन च्या दारांवर भलं मोठं ४*४ लिहिलं म्हणजे झेन डोंगर चढत नाही. काय एक एक करतील ना माणसं मानसिक समाधानासाठी !)

डॅक बद्द्ल कुणी कसं बोललं नाही? एलेक्साय ला डेक येत नाही. तो आफ्टरमार्केट घेत असाल तर वेगळा धागा काढा. मोठा विषय आहे.

अ‍ॅलॉय व्हील्स - आणखी एक महागडी अ‍ॅक्सेसरी. पण नीट शोभेल असे अ‍ॅलोयज लावले तर चार चांद लागतात गाडीला.

फॉग लँप्स - उपयोगी. धुकं बिकं जात नाही जे गाडीसोबत येतात त्या फॉगलँप्स नी. ते वेगळे असावे लागतात. पण असेही, इट्स अ गुड कॉस्मेटिक अ‍ॅक्सेसरी टू हॅव.

नेक रेस्ट - नेक सपोर्ट - हा उपयोगी ठरतो.

डॅशबोर्डवर देवाची मूर्ती - श्रद्धेनुसार.

स्टिअरिंग कव्हर - केंव्हाही चांगलं.

स्टिअरिंग नॉब (ते जात्यासारखं फिरवायला) - युसलेस

एकदा टेफलॉन पॉलिश, डेशबोर्ड पॉलिश करून घेतलंत तर उत्तम.

सुरुवातीला इतकं पुरेसं ठरू शकतं. पुढे घ्यालच अजून.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 1:44 pm | टवाळ कार्टा

कव्हर घालूनही सोसायटीत जेंव्हा गाडीवर चरा येतो (येऊ नये; पण)

दोनच दिवसांपूर्वी एका आरश्याची काच फुटलेली दिसली...आणि मागच्या बाजूचा पार्किंग सेंसर बाहेर आलेला

फ्लोअर व टॉप (आतून) लॅमिनेट करून मिळतो आफ्टरमर्र्केट शॉप्स मधे.

येस्स...हे करणारच आहे

कार परफ्यूम - चांगलासा तुम्हाला आवडेल असा. अँबी प्युअर वैयक्तिक मला खूप उग्र वाटले. गोदरेज एअर ठीक्ठाक. जेल्/हँगिंग मला अधिक आवडतात. किंवा सरळ स्प्रे. अपहोल्स्ट्री स्प्रे सुधा मिळतो.

हे घेणारच्च...ब्रँड सुचवावेत :)

फ्रंट गार्ड / स्टिकर / एलईडी इत्यादी गोष्टी लावून मूळ गाडीची ग्रेस जाते असं माझं तुम्हाला सांगणं आहे. (अवांतर - झेन च्या दारांवर भलं मोठं ४*४ लिहिलं म्हणजे झेन डोंगर चढत नाही. काय एक एक करतील ना माणसं मानसिक समाधानासाठी !)

असले कै करणार नाहीये...कारण ही गाडी शिकायला घेतली आहे...

डॅक बद्द्ल कुणी कसं बोललं नाही? एलेक्साय ला डेक येत नाही. तो आफ्टरमार्केट घेत असाल तर वेगळा धागा काढा. मोठा विषय आहे.

डॅक???

अ‍ॅलॉय व्हील्स - आणखी एक महागडी अ‍ॅक्सेसरी. पण नीट शोभेल असे अ‍ॅलोयज लावले तर चार चांद लागतात गाडीला.

फॉग लँप्स - उपयोगी. धुकं बिकं जात नाही जे गाडीसोबत येतात त्या फॉगलँप्स नी. ते वेगळे असावे लागतात. पण असेही, इट्स अ गुड कॉस्मेटिक अ‍ॅक्सेसरी टू हॅव.

कॉस्मेटिक अ‍ॅक्सेसरी वगैरे नवीन गाडी घेतानाचे चोचले :)

नेक रेस्ट - नेक सपोर्ट - हा उपयोगी ठरतो.

डॅशबोर्डवर देवाची मूर्ती - श्रद्धेनुसार.
स्टिअरिंग कव्हर - केंव्हाही चांगलं.

आधीच आहे :)

डॅक म्हणजे ढिश्चिक ढिश्चिक रे !

स्टिरियो.

स्पीकर, स्तिरियो इत्यादी.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 2:43 pm | टवाळ कार्टा

सध्ध्यातरी आधीच्या मालकाने लावलेलाच डेक वापरणार....नवीन गाडी घेतल्यावर मग नवीन डेकचा विचार केला जाईल

डेकचा विचार केला नाहीतरच बारा होईल .
मी बसवलेला माज्या गाडीमध्ये JBL चा दोन बेस & अम्प्लीफायार लावून .
चांगला वाजविला ३ महिने आणि कडून ठेवलो .
करणे : १) घराचे असतील तर आवाज वाडवू देत नाहीत.
२) ३ महिन्यात गाडीच्या काचा सगळ्या खुलाखुल्या झाल्या .

डेकच नाही? सुवर्णमध्य काढायचा त्यापेक्षा. काय तुम्ही.

वेल्लाभट's picture

28 May 2015 - 2:28 pm | वेल्लाभट

असे ब्रँड नाही सांगता येणार. अँबी युअर, गोदरेज एअर हे वर नमूद केले. पण ते मला तरी फार जमले नाहीत. तुझं मत वेगळं असू शकतं. हँगिंग मधे लिटिल ट्रीज आहे. जेल मधे माय शेल्डन आहे, लिबोनि आहे एरिऑन आहे. अनेक आहेत अनेक. वापरो और ठरवो.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 2:44 pm | टवाळ कार्टा

त्यापेक्षा गुर्जींना विचारतो ;)

अत्रन्गि पाउस's picture

29 May 2015 - 2:32 pm | अत्रन्गि पाउस

उत्तम प्रतीचा कापूर (१० १२ गोळ्या गाडीत पसरून) ठेवा .... सकाळी सकाळी दरवाजा उघडला कि फार मस्त वाटते ..

शैलेन्द्र's picture

30 May 2015 - 11:28 am | शैलेन्द्र

अगदी बरोबर..एका सछिद्र कापडी पीशवीत थोडे तांदुळ व कापुर घालुन ठेवुन द्यावे..

खंडेराव's picture

28 May 2015 - 1:45 pm | खंडेराव

फक्त एकच..

कार परफ्यूम - चांगलासा तुम्हाला आवडेल असा. अँबी प्युअर वैयक्तिक मला खूप उग्र वाटले. गोदरेज एअर ठीक्ठाक. जेल्/हँगिंग मला अधिक आवडतात. किंवा सरळ स्प्रे. अपहोल्स्ट्री स्प्रे सुधा मिळतो

हे फारच हानिकारक असतात, वापरु नयेच, लहान मुल असल्यास तर नकोच. नेटवर शोधल्यावर अजुन माहिती मिळेल.
अगदीच गरज असेल तर निलगिरी वगैरे सारख्या तेलाची बाटली ठेवावी एक.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 1:47 pm | टवाळ कार्टा

अजून लहान मूल नै ओ...त्याची तयारी करायची तर पाखरांना आवडणारे पर्फ्युम कोणते? ;)

वेल्लाभट's picture

28 May 2015 - 2:12 pm | वेल्लाभट

मस्क, वूडी किंवा अ‍ॅक्वा नोट्स वाले मस्त वाटतात. व्हेरी एलिगंट. पाखरा पाखरानुसार आवड बदलू शकते हे नमूद करतो.

कपिलमुनी's picture

28 May 2015 - 2:13 pm | कपिलमुनी

गुर्जीं कडून अत्तर घे

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 2:44 pm | टवाळ कार्टा

होय होय....त्येच कर्नार

पाटील हो's picture

28 May 2015 - 2:50 pm | पाटील हो

पर्फ्युम पेक्ष्या पाखरांना मोठा IRVM खूप आवडतो, सारखा फिरवून त्यात तोंड बागात बसतात
म्हणून Glove box मध्ये एक आरसा घेवून ठेवा .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 May 2015 - 6:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चिल्ड्रेन इन बॅकसीट कॉझेस अ‍ॅक्सीडेंट अँड अ‍ॅक्सीडेंट्स इन बॅकसीट्स कॉझेस चिल्ड्रन!!! =))

-चतुर्चाकीप्रेमी अनिरुद्ध-

वेल्लाभट's picture

28 May 2015 - 1:15 pm | वेल्लाभट

आजवर उंदरांसाठी एकही उपाय प्रभावी ठरलेला नाही हे सांगू इच्छितो.

झकासराव's picture

28 May 2015 - 2:04 pm | झकासराव

ट का अभिनंदन. :)

वेलकम टु द वॅगन आर क्लब.
माझीही पहिली चारचाकी सेकन्ड हॅन्ड वॅगन आरच.

अ‍ॅक्सेसरीज मध्ये सर्वप्रथम घेतलेल्या गाडीत काय काय आहे ते पहा.
१) म्युजिक सिस्टीम स्पीकर सहीत. (ब्लु टुथ नवीन सिस्टीम मध्ये येतं. फोन जास्त येत असतील तर चांगली सोय)
२) रिव्हर्स पार्किन्ग सेन्सर
३) फॉग लॅम्प
४) सीट कव्हर्स
५) स्टेअरीन्ग व्हील कव्हर
६) मड फ्लॅप
७) फ्लोअर मॅट
८) चार्जर ड्युअल वाला घ्या. तो ही ब्रॅन्डेड. एक गट्टु येतो तो गाडीच्या पॉइन्ट मध्ये खुपसायचा.
त्याला दोन युएसबी केबल चार्जिन्ग जोडु शकतो. सॅमसन्ग वै चे २५० ते ३५० मध्ये येतील.

हे बेसिक असावे.

१) डोअर सील गार्ड
२) क्रोम प्लेटेड डोअर हॅन्डल्स
३) डे लाइट रनिन्ग
आणि ही यादी वाढवत न्याल तितकी....

वेल्लाभट's picture

28 May 2015 - 2:15 pm | वेल्लाभट

२) क्रोम प्लेटेड डोअर हॅन्डल्स
३) डे लाइट रनिन्ग

अतिशय झँग (झगरमगर) ! आरारारा

आणि आहेत ते लाईट्स काढून फेक झेनॉन च्या पांढ-या भगभगाटाला भुलू नकोस टका.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 2:45 pm | टवाळ कार्टा

आहेत ते लाईट्स काढून फेक झेनॉन च्या पांढ-या भगभगाटाला भुलू नकोस टका.

बाईक अथवा कारमध्ये ईलेक्ट्रॉनिक बदल करूच नये या मताचा आहे मी

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 2:47 pm | टवाळ कार्टा

१) म्युजिक सिस्टीम स्पीकर सहीत. (ब्लु टुथ नवीन सिस्टीम मध्ये येतं. फोन जास्त येत असतील तर चांगली सोय)
२) रिव्हर्स पार्किन्ग सेन्सर
४) सीट कव्हर्स
५) स्टेअरीन्ग व्हील कव्हर
६) मड फ्लॅप

हे सगळे आधीच आहे

३) फॉग लॅम्प
७) फ्लोअर मॅट
८) चार्जर ड्युअल वाला घ्या. तो ही ब्रॅन्डेड. एक गट्टु येतो तो गाडीच्या पॉइन्ट मध्ये खुपसायचा.
त्याला दोन युएसबी केबल चार्जिन्ग जोडु शकतो. सॅमसन्ग वै चे २५० ते ३५० मध्ये येतील.

हे घेणे बाकी आहे

१) डोअर सील गार्ड
२) क्रोम प्लेटेड डोअर हॅन्डल्स
३) डे लाइट रनिन्ग

हे सगळे कॉस्मेटिक अ‍ॅक्सेसरीजमध्ये येते त्यामुळे सध्ध्या विचार नाही करणार

झकासराव's picture

29 May 2015 - 10:17 am | झकासराव

चांगला निर्णय अभिनंदन. :)
कॉस्मेटिक मध्ये जास्त लक्ष घालुच नये.
गाडीचे वायपर चेक करुन घ्या.
त्यातले रबर बदलुन घ्या. फार पैसे नागत नाहीत.
सध्या पावसाळा जवळ येइल त्यमुळे तितकी गरज नाहिये पण पुढच्या काचेला सन कन्ट्रोल फिल्म लावलेली चांगली.
त्याने पुढच्या काचेतुन येणारी उष्णता कमी होइल.
मिपावर आधी एक धागा होता त्यावरच वाचलेल आहे. मलाहि हे करुन घ्यायच आहे राहुनच गेलय.
आता पुढच्या उन्हाळ्याच्या आधीच.

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 12:51 pm | टवाळ कार्टा

सन कन्ट्रोल फिल्म साठी परमिशन नै ना???

झकासराव's picture

29 May 2015 - 1:26 pm | झकासराव

ट्रान्सपरन्ट सन कन्ट्रोल फिल्म मिळते. पुढच्या काचेला लावायला.
गरवारे आणि अजुन एक कंपनी आहे.
दोन कंपन्यांची आहे. २५ टक्के ४० टक्के असे प्रमाण असते.
व्हिजिबिलिटी कमी होत नाही.

काहिजण हीच फिल्म डोअर विन्डॉज आणि मागच्या काचेला लावतात.
पैसे जास्त आहेत ह्या फिल्मचे. पण आरटिओ कटकट नाही.

धर्मराजमुटके's picture

28 May 2015 - 2:34 pm | धर्मराजमुटके

महत्त्वाची अ‍ॅसेसरी विसरली वाटतं ! लिंबू, मिरची, कोळसा एकत्र बांधलेले सुरक्षा यंत्र विकत घ्या. भारतात तेच वापरतात म्हणून महागड्या सेफ्टी फीचर्स असलेल्य गाड्या जास्त खपत नाहित असा अंदाज आहे. (कृ. ह. घ्या.) :)

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 2:44 pm | टवाळ कार्टा

खिक्क :)

लालगरूड's picture

28 May 2015 - 2:52 pm | लालगरूड

ठो . . . मेलो ... टका इकडे लक्ष दया

लालगरूड's picture

28 May 2015 - 2:53 pm | लालगरूड

ठो . . . मेलो ... टका इकडे लक्ष दया

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.टवाळ कार्टा यांचा सत्कार तिन हिरव्या मिरच्या ,दोन लिंबु आणी एक बिब्बा देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम बाइक कार्यकर्ते.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 3:33 pm | टवाळ कार्टा

काळी भावली नस्ल्याबद्दल णिशेध

कपिलमुनी's picture

28 May 2015 - 3:37 pm | कपिलमुनी

limbu

हल्ल्ली तर लिंबु-मिरची कीचेन सुद्धा मिळते ! ;)
P1

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado

नाखु's picture

28 May 2015 - 3:41 pm | नाखु

फलकात शब्द पूर्ण लिहिल्याबद्दल आणी टक्याचे गाडीबद्दल (आधी गाडी मग आपोआप बाय्डी) अभिनंदन.

चुकार नाखु

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 3:54 pm | टवाळ कार्टा

हा हा...हे भारीये
अपना लक साथ लेके चलो
:)

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 4:12 pm | टवाळ कार्टा

चायला वाटलेच होते इतका वेळ कोणी या बोक्याची आठवण कशी नै काढली =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 May 2015 - 6:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मामोऑ-

नै मी काय म्हणते. अ‍ॅक्सेसरीजवर एवढे पैसे उडवण्यापेक्षा आधी ड्रायव्हर लायसन काढ हो टका. आणि गाडीही शिकुन घे हो चिमणकडुन. ;)

मामोऑ

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 12:52 pm | टवाळ कार्टा

खिक्क...यावेळी माई म्हणाल्या...माईंचे हे गेले कै?

gogglya's picture

29 May 2015 - 12:37 pm | gogglya

शीडी Rear View Mirror ला टान्गुन घ्या !
झालेच तर "हीच माझी BMW / Mercedes / [आपला लाडका Brand ] असे रेडीयम स्टीकर लावून घ्या!

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 12:53 pm | टवाळ कार्टा

खिक्क....नाय ओ...मी त्या टैपचा नै

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 12:53 pm | टवाळ कार्टा

खिक्क....नाय ओ...मी त्या टैपचा नै

काळा पहाड's picture

29 May 2015 - 1:11 pm | काळा पहाड

१. पाठीमागे "बग्तुस काय रागानं, वरटेक केलंया वागानं" असं लिवा.
२. नंबरप्लेटला घड्याळ किंवा कमळ चिक्टवा (हाताची व्हॅल्यू घसरलेली आहे).
३. काळ्या किट्ट सन फिल्म लावा. त्यावर दोन पैलवान लढतायतचा स्टिकर आणि "पैलवान" लिहिलेला स्टीकर लावा.
४. पुढे बंपरच्या पुढे "उपसरपंच - मुणगे बुद्रूक" असा काहितरी अर्ध वर्तुळाकार लिहिलेला बोर्ड (फक्त पितळेचा) लावा. त्याला हार पण घाला.
५. एक किलोमीटर अंतरावर ऐकू येणारे दोन स्पीकर बसवा. शिवाय तमाशा गाण्यांची एक आणि ढाकचिक ढाकचिक वाली एक अशा दोन सीडी खरेदी करा.

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 1:25 pm | टवाळ कार्टा

यापैकी तुमच्या गाडीला काय काय आहे?

काळा पहाड's picture

29 May 2015 - 1:45 pm | काळा पहाड

आमच्या गाडीला असलं बसवता येत नाही. उगीच काही लोक भारतात त्या मेक्सिकन हॅट घालून फिरतात तसं वाटेल. पण साधारण पणे सगळ्या महिंद्राच्य गाड्यांना, सुमो, इंडिका, व्हिस्टा, पजेरो, एंडेव्हर, क्वालीस आदी गाड्यांना आणि आल्टो व सॅन्ट्रो ला हे सगळं चालेल. वॅगन आर, आय टेन, आय ट्वेन्टी, पोलो आदी गाड्यांना नाही चालणार विचित्र वाटेल.

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 2:24 pm | टवाळ कार्टा

हे म्हैत न्हव्हते...मला वाटायचे आत बसणार्याच्या मर्जीमुळे गाडीला बाहेरना असे सगळे लावावे लागते

वेल्लाभट's picture

29 May 2015 - 3:04 pm | वेल्लाभट

खलास !!!!!

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 3:21 pm | टवाळ कार्टा

खिक्क

काळा पहाड's picture

29 May 2015 - 3:38 pm | काळा पहाड

अहो बसणार्‍याचा प्रोफाईल सांगितला.

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 3:58 pm | टवाळ कार्टा

कुठे? कधी? कोणत्या प्रतिसादात?

काळा पहाड's picture

29 May 2015 - 4:04 pm | काळा पहाड

जौ दे झालं..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 May 2015 - 12:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांना गावगुंड आणि गुंठामंत्र्यांच्या आवडीनिवडीविषयी बोलायचय रे. सर ब्लॅकमाउंटन त्याला असलं काही झेपत नाही.

टवाळ कार्टा's picture

30 May 2015 - 12:26 pm | टवाळ कार्टा

सर ब्लॅकमाउंटन >> =))

खटपट्या's picture

30 May 2015 - 7:09 am | खटपट्या

सर्वप्रथम ट्का यांचे गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन,
वर वेल्लाभट यांनी फ्लोअर लॅमीनेशन करुन घ्यायला सांगीतले आहे. ते करताना जास्त सुळ्सुळीत मटेरीअल वापरु नका. कारण त्यावरुन पाय्/मॅट घसरते आणी कालांतराने ते लॅमीनेशन फाटते. आणी मग लॅमीनेशनच्या आतमधे गेलेली माती काढताना खूप त्रास होतो. मी एक मोठे पाय पुसणे स्क्वेअर फुटाच्या भावाने खरेदी करुन ते हव्या त्या आकारात कापुन त्याचा मॅट म्हणून वापर करतोय.. खूप स्वच्छ वाटते.

टवाळ कार्टा's picture

30 May 2015 - 10:57 am | टवाळ कार्टा

हे लक्षात ठेवले आहे :)

योगी९००'s picture

30 May 2015 - 9:00 am | योगी९००

टका यांचे गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन...

बर्‍याच जणांनी सल्ले दिले आहेत त्यामुळे मी वेगळा सल्ला काय देणार..? रिवर्स सेन्सर आणि कॅमेरा, मोबाईल स्टॅड आणि चार्जर ह्याच मला उपयोगी पडलेल्या अ‍ॅक्सेसरीज आहेत.

मी left blind spot mirror पण वापरतो. पण याचा उपयोग wagan-R ला होणार नाही कारण tall boy design असल्याने डाव्या बाजूला ब्लाईंड स्पॉट तुम्हाला जाणवत नसावा.

बाकी कबूतरांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणी अ‍ॅक्सेसरीज सुचवाल काय? एक धागा ह्यावर काढावा म्हणतो.

खटपट्या's picture

30 May 2015 - 9:23 am | खटपट्या

बाकी कबूतरांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणी अ‍ॅक्सेसरीज सुचवाल काय? एक धागा ह्यावर काढावा म्हणतो.

गाडी झाडाखाली पार्क करु नये. कारण बाकीचा कचरा साफ करता येतो पण कावळे,कबुतर आणि इतर पक्षांनी केलेली घाण साफ करताना खूप त्रास होतो. निघता निघत नाहीत ते डाग.

टवाळ कार्टा's picture

30 May 2015 - 10:58 am | टवाळ कार्टा

गाडी झाडाखाली पार्क करु नये.

हा एकच उपाय आहे...माझी कार मोकळ्या जागेत आहे...ती स्वच्छ असते पण बाईक मात्र रंगून गेलेली असते

गाडी झाडाखाली पार्क करु नये

दुसरी जागाच नाही हो...सोसायटीत तिच जागा आहे..!! ज्यांच्या गाड्या झाडाखाली नाहीत त्यांवर देखील थोड्याफार प्रमाणात रंगरंगोटी केलेली असते. कव्हर टाकून उपयोग नाही कारण कव्हर टाकले तर गाडी वाचेल पण कव्हर खराब होईल. आणि कव्हर टाकले तर उंदीर आतमध्ये जाण्याची शक्यता वाढते.

कबुतरांना घाबरवायला एखादे बुजगावणे चालेल काय?

टवाळ कार्टा's picture

31 May 2015 - 11:09 am | टवाळ कार्टा

कबुतरांना घाबरवायला एखादे बुजगावणे चालेल काय? >> मांजर ठेवा =))

खटपट्या's picture

31 May 2015 - 11:52 am | खटपट्या

हाच विचार मनात आला होता. गाडीच्या टपावर बुजगावण्याचे चित्र काढू शकतो. :) पण जे पक्षी झाडावर बसुन हवाई हल्ला करतात, त्यांना प्रतिबंध करणे निव्वळ अशक्य आहे.
असेही कबुतरांचा त्रास दीवसेंदीवस वाढत चालला आहे. कबुतरांना दाणे टाकल्यामुळे पुण्य मिळते अशी गुजराती लोकांची अंधश्रध्दा आहे. खिडकी उघडी ठेवु शकत नाही एवढा त्रास आहे.

टवाळ कार्टा's picture

31 May 2015 - 12:05 pm | टवाळ कार्टा

माझ्या सोसायटीमध्येच भरपूर (घरटी १ कबुतराचे जोडपे) झाली आहेत....झाडांच्या कुंडीत आत्तापर्यंत कबुतरांची २-३ बाळंतपणे झाली आहेत...एकदा कबुतराचे अंडे दिसले की ते फेकून देववत नै म्हणून मग कैच नै कर्ता येत

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 May 2015 - 2:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मग त्या गुज्जु लोकांना सायनाईडचे दाणे टाका.

-निळा महाड-

खटपट्या's picture

31 May 2015 - 2:57 pm | खटपट्या

निळा महाड .... ळॉळ

संदीप डांगे's picture

31 May 2015 - 10:08 pm | संदीप डांगे

हा हा निळा महाड.

आज मिपावर फक्त घोडे चालतायत वाटतं --- बुद्धीबळातले हो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2015 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्ह्याकुम क्लियर ऐवजी प्रेशर ने हवा मारता यॆईल ज्यामुळे गाडीतील धुळ काढता येईल असं एसी व्होल्टवर असलेलं मशीन मिळतं का ?? आणि कोणतं चांगलं ???

-दिलीप बिरुटे

योगी९००'s picture

31 May 2015 - 7:39 am | योगी९००

प्रेशर ने हवा मारली तर ती पसरायचा धोका जास्त असेल...त्यापेक्षा व्ह्याकुम क्लिनर बरा..

नाखु's picture

30 May 2015 - 12:47 pm | नाखु

या "लाडी गाडी"ने शंभर पार केल्या बद्दल एक आत लटकवायची बाहुली,एक झेंडा,"येतीस का जाऊ" हा स्टीकर आणि एक चांगला डस्टर कपडा देऊन सत्कार करण्यात येत आहे.

सत्कारार्थी जेपी आणि मित्रपरीवार.

स्वगत :जेप्या माझ्या गळ्यात ही जबाबदारी टाकून कुठे गेलाय ते कळेना आणि चिमण त्याला बोल्वायला जातो सांगून दोन दिवस गायब आहे

टवाळ कार्टा's picture

30 May 2015 - 1:33 pm | टवाळ कार्टा

namaskaar

सुबोध खरे's picture

30 May 2015 - 12:51 pm | सुबोध खरे

स्टीकर "पाहतेस काय? प्रेमात पडशील" असा हवा

टवाळ कार्टा's picture

30 May 2015 - 1:33 pm | टवाळ कार्टा

doc

श्रीरंग_जोशी's picture

31 May 2015 - 8:55 am | श्रीरंग_जोशी

टक्याचे अभिनंदन व पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा.

अनेक प्रतिसाद माहितीपूर्ण अन रोचक आहेत.

gogglya's picture

3 Jun 2015 - 4:50 pm | gogglya

तर मिनी फ्रिज घ्या. १२ वोल्ट वर चालतो. मध्ये गोदरेज चा छोटु कूल नावाचा आला होता.

हे अ‍ॅक्सेसरीज घेणं म्हणजे वेळकाढू लोक्ससाठी गाडीचे लाड पुरवणे. गरजेच्या सगळ्या सोई गाडीच्या उत्पादकांनी केलेल्या असतात. पण नवीन नवीन गाडीवानांसाठी गाडीचे सुख अनुभवण्यात हा प्रकार जरा मजा आणतो.
गरज म्हणून गाडी घेणारे काहीही घेत नाहीत. पण हौस म्हणून गाडी घेणारे बर्‍याच गोष्टी घेतात. आपली हौस म्हणून घेतलेली गाडी सजवण्यात प्रचंड मानसिक समाधान असते.
दर दोन तीन महीन्यांनी परफ्यूम बदला. आणि पेन ड्राईव्हला मूड प्रमाणे गाणी वर्गवारी करून भरून घ्या. कितीही ट्राफिक लागलं तरी चीडचीड होत नाही.