अघोषित युद्ध..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
27 Nov 2008 - 9:08 am
गाभा: 

मुंबैवरचा आतंकवादी हल्ला अजूनही सुरूच.. ताजमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा फायरिंग ओपन केलं आहे..

छाबडा हाऊसमध्ये बेछुट गोळीबार.. तेथे एक इस्रायली कुटुंब ओलीस. नरिमन हाऊसमध्येही अतिरेकी घुसले आहेत..ओबेरॉय हॉटेलात लष्करी कारवाई जोरात सुरू.. मर्चंट हाऊसमध्येही अतिरेकी लपल्याची शंका..

विधानभवनासमोर दोन हॅन्ड ग्रेनेड मिळाले तेही पोलिसांनी निकामी केले आहेत...अतिरेक्यांकडे ग्रेनेड, एके ४७, एके ५७ यासारखी हत्यारे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर असल्याचा अंदाज..

आता हा हमला केवळ मुबईवर नसून भारतावरच आहे, भारताच्या सार्वभौमत्वावर आहे! भारतावर अचानक लादलं गेलेलं हे अघोषित युद्धच म्हणावं लागेल...

भारत याला पुरून उरेल याबद्दल शंका नाही..

जय हिंद..

तात्या.

प्रतिक्रिया

सर्किट's picture

27 Nov 2008 - 9:13 am | सर्किट (not verified)

शक्यतो ह्या अतिरेक्यांना जीवंत पकडावे, त्यांच्याकडून त्यांच्या बोलवित्या धन्यांची नावे, ठिकाणे उघड करून, मग न्यायालयाकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मराठी_माणूस's picture

27 Nov 2008 - 10:10 am | मराठी_माणूस

फाशीची शिक्षा द्यावी.

फाशी देण्याची गरज नाही.

अवलिया's picture

27 Nov 2008 - 11:14 am | अवलिया

बोलविता धनी जगजाहिर आहे. फक्त राजकारण्यांना तो उच्चारण्याचे धैर्य नाही. कारण मतांची फिकीर आहे. हिंदु एकत्र होवुन याविषयी त्यांची प्रतिक्रिया देत नाहित त्यामुळे हे भोग भोगणे नशीबी आहे. असो.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Nov 2008 - 11:57 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. आणि ते जरी राजकारण्यानी उच्चारले तरी जनता त्याचा फारसा विचार करेल असे नाही. असो. यथा राजा तथा प्रजा या प्रमाणे व्हाईसव्हर्सा अल्सो ट्रू असे म्हणावे लागेल.
पुण्याचे पेशवे

अश्या लोकांना गोळ्या घालण्यापेक्ष्या रस्त्यावर लोकांच्या हातात दिले पाहिजे.. हाल हाल करून नरक यातना दिल्या पाहिजेत .. यांच्या पोसणार्‍या बापांना शोधून खुलेआम ठेचून काढायला हव

अघोषित युद्द किती वर्ष चाललय तात्या.. कधी जाग येणार आपल्याला देवाला ठाऊक .. कधी कधी वाटत सगळ्या स्ंवेदना मेल्यात सगळ्यांच्या..

पांथस्थ's picture

27 Nov 2008 - 10:02 am | पांथस्थ

त्यांना त्यांच्याच धर्मानुसार दगडाने ठेचुन मारण्याची शिक्षा दिली पाहिजे.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 11:11 am | जैनाचं कार्ट (not verified)

मुंबईकर मिपाकरांनी लवकर खुशाली कळवावी .. सर्वजण सुखरूप रहावेत अशी देवाकडे प्रार्थना करतो.

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

सहज's picture

27 Nov 2008 - 11:12 am | सहज

मुंबई पुन्हा हादरली .

मार्च १९९३, जुलै २००६, नोव्हे २००८ मुंबई पुन्हा पुन्हा हादरली. यापुढे किती वेळा हादरेल कल्पना नाही.

दरवेळी प्रमाणे पोलीस, राज्यकर्ते यंव करु त्यंव करु, मृतांना नुकसान भरपाईच्या घोषणा इ. इ. मधे सारवासारव होईल.

स्वार्थी राजकारणी, निष्क्रिय पोलीस केवळ आपल्या स्वार्थात मग्न. व खरा विकासीत देश, समाज हे ध्येय कोणापुढेच नाही. परिस्थीती इतक्यात् बदलणार नाही. सर्वच पक्ष व सरकारी संस्था इदं न मम म्हणून ही जबाबदारी टाळतात.२००१ मधे संसदेवर हल्ला झाला असता एक आशा वाटली होती की सर्व राजकीय पक्ष निदान आता तरी दहशतवादाताचा योग्य बिमोड करण्याचे मनावर घेतील पण .... अजुन असे काही हल्ले झाले तर कदाचित ह्या निद्रिस्त सरकारी व्यवस्थेत कोणाला तरी जाग येउन परिणामकारक उपाययोजना होईल अन्यथा गेट् युज्ड् टु इट्, इफ यु हॅव्ह नॉट ऑलरेडी.

सामान्य लोकांना ना कसले अधिकार, ना मतदान करताना लायक पक्ष की जो ही परिस्थीती बदलू शकेल. त्यामुळे केवळ जागरुक रहाणे एकमेकांना मदत करणे इतकेच करु शकतात. पण हे सगळे असे हल्ले टाळायला पुरेसे नाही.

हे असेच घडणार.

इंग्रजांनी आपल्यावर १५० वर्षे राज्य केले व ते भारताच्या दृष्टीने काही बाबत कसे बरे होते, याचा भविष्यात उहापोह होईलच. त्याप्रमाणे दहशतवाद्यांमुळे भारताला सुरक्षाव्यवस्था कशी शिकावी लागली व मजबुत करावी लागली. पुढे मागे पाकिस्तान व दहशतवाद्यांना धन्यवाद् द्यावे लागतील की त्यांच्या मुळेच सुरक्षेबाबत जागरुक झालो.

आता ही परिस्थीती आता बदलायची असेल तर ते काम बहुतेक दहशतवादीच करु शकतील. पुर्वी बॉम्बस्फोट घडवुन आणणे ही एक प्रचलित पद्धत झाली होती. आता हा नव्या जमान्यातील अतिरेकी अजुन विकृत झाला आहे व हल्ले अजुन भीषण होत आहेत. ही काही एखादी दुर्देवी "घटना" नाही हे एक युद्धच आहे हे केवळ अतिरेकीच आपल्या सर्कारी व्यवस्थेला समजवुन देउ शकतील. तुम्ही आम्ही कितीही ओरडलो तरी फारसा उपयोग होणार नाही कोणा शिवराज, कोणा विलास्, कोण्या आबावर. देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय, राजकारण, समाजकारण या सर्व पातळीवर हे युद्ध आपल्याला आज ना उद्या लढावेच लागेल. अमेरिकेवर ९/११ यायची पाळि आली तोवर अमेरिका देखील दहशतवादाबद्दल जागरुक नव्हती. केवळ आपला फायदा बघत होती. निदान ह्या हल्ल्याने भारताची सुरक्षानीती व कारभार अजुन कार्यक्षम व्हावे ही अपेक्षा.

ही एक दीर्घ काल चालणारे युद्ध आहे व ते आता आपल्याला गंभीरपणे खेळलेच पाहीजे.

अभिजीत's picture

27 Nov 2008 - 11:16 am | अभिजीत

दुर्दैवाने सहमत म्हणावसं लागतंय.

- अभिजीत

मैत्र's picture

27 Nov 2008 - 12:01 pm | मैत्र

खरंच दुर्दैवाने सहमत.

क्लिंटन's picture

27 Nov 2008 - 12:45 pm | क्लिंटन

आपल्या मताशी मी सहमत आहे. हे लिहिताना अत्यंत वेदना होत आहेत पण गेल्या काही वर्षांमधील घटना बघता हे संकट आपणच आपल्यावर ओढावून घेतले आहे असे वाटते.

१९४६ च्या निवडणुकांमध्ये अगदी उत्तर प्रदेश आणि बिहारमधीलही मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या जागांमधून मुस्लिम लीगचे उमेदवार निवडून आले तेव्हा तेथील मुसलमानांचा आमच्या देशाच्या फाळणीला पाठिंबा होता हे उघड आहे. तरीही त्यांना पाकिस्तानात हाकलवून न देता उलट ५५ कोटींची दक्षिणा देणार्‍या हलकट माणसाला आपण 'महात्मा' आणि 'राष्ट्रपिता' मानतो!

याच देशात शिवराज पाटील सारखे षंढ लोक सरदार पटेलांच्या गृहमंत्री पदावर बसू शकतात, महंमद अफझलला आणि त्याच्या पिट्ट्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावूनही जिवंत सोडले जाते, 'हिंदू दहशतवाद' लोकमान्य टिळकांपासून सुरू झाला असा जावईशोध लावणारे प्रवीण स्वामींसारखे महामूर्ख पत्रकार याच हिंदू समाजात जन्माला येतात, सावरकरांचा अपमान करणारा डुक्कर मणिशंकर अय्यर मंत्रीपदी राहतो आणि इतकेच नव्हे तर भारतात दहशतवादाची सुरवात बाबरी पाडल्यामुळे झाली अशा कल्पना लढवतो आणि अशी हजारो उदाहरणे आपल्या डोळ्यादेखत दररोज घडतात तेव्हा आपल्या देशात दुसरे काय घडणार?

नथुराम गोडश्यांनी सांगितल्याप्रमाणे गरज आहे की संक्रांतीला तीळगूळ नाही तर शस्त्रे वाटण्याची आणि अंतर्गत दुश्मनांची खांडोळी करायची. गरज आहे ज्यू लोकांनी ज्याप्रमाणे त्यांची जमिन २००० वर्षांनंतर सुध्दा परत मिळवली त्याप्रमाणे जिद्द बाळगून पाकड्यांचे नामोनिशाण मिटवून, सिंधू नदी भारतभूमीत परत आणून सावरकरांचे स्वप्न पूर्ण करायची! पण दुर्दैव असे की माझ्यासारखे बहुसंख्य हिंदू एखाद्या झुरळाला मारताना सुध्दा हजारदा विचार करणारे! आम्ही कशा बंदुका आणि बॉम्ब चालवणार आणि पाकिस्तान समर्थकांचे रक्ताचे पाट वाहवणार! तेव्हा आमच्या हातात आहे संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे 'तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पहावे' आणि 'ठेविले अनंते तैसेची राहवे चित्ती असू द्यावे समाधान' असे म्हणणे!

(अत्यंत खिन्न आणि विमनस्क) विल्यम जेफरसन क्लिंटन

धमाल मुलगा's picture

27 Nov 2008 - 1:01 pm | धमाल मुलगा

एक अन् एक शब्द जळजळीत निखारा जणु!!!
पण अस्सल सोन्यासारखा खरा....

आपल्याकडे पध्द्त आहेच की साप साप करुन भुई धोपटण्याची..तोवर साप बरोब्बर 'कुंपणापलिकडे' जाऊन 'बिळात' लपुन बसतो!

>>आम्ही कशा बंदुका आणि बॉम्ब चालवणार आणि पाकिस्तान समर्थकांचे रक्ताचे पाट वाहवणार!
जाऊदे हो क्लिंटनसाहेब,
चला आपण दोघं मिळुन एक दिवसाचा उपास करु...पार्थना करु संध्याकाळी...मारणार्‍यांसाठी आणि मरणार्‍यांसाठी!!!!

सबको सन्मती दे भगवान....
- (*ष्ट्र'पीता') ध मा ल.

विकास's picture

27 Nov 2008 - 11:15 am | विकास

भारतावर अचानक लादलं गेलेलं हे अघोषित युद्धच म्हणावं लागेल...

हे अघोषित नव्हे तर घोषित युद्ध अनेक वर्ष चालू आहे. देशाच्या सीमेवरून घराच्या सीमेवर कधी आले ते पटकन समजत नाही आहे इतकेच. (हे मी तात्या तुम्हाला अथवा इतर मिपाकरांना म्हणत नाही. गैरसमज नसावा. हे आत्तापर्यंत ज्या पद्धतीने धोरणे राबवली गेली त्या संदर्भात त्राग्याने म्हणत आहे..)

विसोबा खेचर's picture

27 Nov 2008 - 11:18 am | विसोबा खेचर

हे आत्तापर्यंत ज्या पद्धतीने धोरणे राबवली गेली त्या संदर्भात त्राग्याने म्हणत आहे..)

खरं आहे..!

ब्रिटिश's picture

27 Nov 2008 - 11:21 am | ब्रिटिश

आता हा हमला केवळ मुबईवर नसून भारतावरच आहे, भारताच्या सार्वभौमत्वावर आहे! भारतावर अचानक लादलं गेलेलं हे अघोषित युद्धच म्हणावं लागेल...

हा फक्त मुंबईवर झालेला हल्ला नसुन देशावर युद्ध लादले आहे असे समजुन पाकीस्तानाती दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर भारताने सरळ सरळ हल्ला करावा. त्याशिवाय हे थांबणार नाही

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Nov 2008 - 12:03 pm | llपुण्याचे पेशवेll

दहशतवाद्यांचे अड्डे आणि प्रशिक्षण केंद्र पाकीस्तानातच नाहीत तर महाराष्ट्रातही आहेत. जळगाव, मालेगाव, पुणे इतकेच काय पण मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या बेळगावातही(म्हणजे लष्करी केंद्रात नव्हे पण बेळगाव शहरात) ही प्रशिक्षण केंद्रे चालवल्याचे आतापर्यंत घडले आहे. पाकीस्तानातील केंद्रे नष्ट करणे एकवेळ करता येईल पण अंतर्गत केंद्रांचे काय.
पुण्याचे पेशवे

धमाल मुलगा's picture

27 Nov 2008 - 12:55 pm | धमाल मुलगा

गेल्यावर्षी (बहुतेक) पुण्याच्या 'एन.डी.ए.' मध्येही एक आय.एस.आय. हस्तक सापडला अशी बातमी वाचली होती!

तिच्याआयला, उद्या देशाचा एखादा संरक्षणमंत्री जरी अतिरेकी/त्यांचा हस्तक्/स्लिपर सेलमधला सापडला तरी आश्चर्य वाटायचे नाही अशी परिस्थिती आली आहे.

डिसक्लेमरः इथे मी अतिशयोक्ती अलंकार वापरला आहे, विद्यमान मंत्र्यांबद्दल हे विधान नाही.

मदनबाण's picture

27 Nov 2008 - 11:22 am | मदनबाण

अत्त्ताच पाहिलेल्या बातमी नुसार ताज जवळ ८ किलो आरडीएक्स सापडले आहे !!

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

अभिजीत's picture

27 Nov 2008 - 11:40 am | अभिजीत

नागरी दहशतवाद -

>>भारत याला पुरून उरेल याबद्दल शंका नाही
नक्कीच.
यशस्वीपणे आपण याचा बिमोड केला तर नागरी दहशतवादाचा सामना कसा करावा याचं एक पाथदर्शी उदाहरण जगापुढे येइल आणि दहशतीलाही आळा बसेलच.

काश्मिर, पंजाब इथला त्या वेळचा दहशतवाद मोडुन काढुन आपण हे यापुर्वी सिद्ध केलं आहे.
यात खूप मोठी किंमत आपण दिली, काश्मिरचा दहशतवाद नव्यानं उभा राहिला हे जरी तितकंच खरं असलं तरीही...

- अभिजीत

अतिशय उत्तम आणि संयत प्रतिक्रिया धमु, काहीही अस्थानी नाही.

हा देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. त्यात धर्म असलाच तर तो त्या अतिरेक्यांनी जी काही कथित मागणी केली आहे तेवढाच. गोळी झाडणारा आणि निरपराधी लोकांचे जीव घेणारा एक गुन्हेगार असतो. त्याची जात धर्म हा त्याच्या नावाचा किंवा आयडेंटिफिकेशन चा भाग आहे बस.
ए टी एस वरच्या वादाला सध्या पडदा टाकावा. हेमंत करकरे यांना अभिवादन होत आहे कारण ते प्रमुख होते मोठे अधिकारी होते तरी जिवावर उदार होऊन पहिल्या आघाडीत लढले. पण नाव नसलेले बाकी नऊ कर्मचारी तितकेच महत्त्वाचे. त्यांना मरणानंतर सुद्धा तो मान नाही. एका चॅनेलवर एक साधा हवालदार पाहिला काल रात्री ज्याच्या पोटात गोळी लागली होती. त्यांना चक्कर यायला लागली. काही लोक गोळा झाले. एका बलदंड माणसाने चक्क त्या पोलिसाला हातावर उचलून घेतले आणि काहीही दुसरे साधन नव्हते म्हणून एका स्प्लेंडर च्या मागे हातात घेऊन ते हॉस्पिटल ला गेले. मला अक्षरशः पोटात ढवळलं.. केवळ भयाण.
तो मनुष्य गेला तर एका कॉन्स्टेबलला काय मदत मिळणार. अतिशय वाईट वाटलं.
दुसरा एक मुद्दा: हे इतके मोठे अधिकारी पुढे का गेले. करकरे यांच्या शेवटच्या व्हिडिओ मध्ये ते सैन्या सारखं हेल्मेट व बुलेटप्रूफ जॅकेट घालताना दिसले. मग त्यांना छातीत तीन गोळ्या कशा लागल्या? यात या शूरवीराचा अवमान करण्याचा हेतू नाही.
उलट या माणसांचे जीव अति महत्त्वाचे आहेत. इतके स्वस्त नाहीत ... ते आले आणि आता तयार होत आहेत ही बातमी पाहून झोपलो आणि सकाळी करकरे डेड वाचून विलक्षण त्रास झाला.
सर्व शहीद, पोलिस आणि जीव धोक्यात घालून लोकांना बाहेर काढणार्‍या अग्निशमन दलाच्या जवानांना विनम्र अभिवादन.
आत्ताच वाचलं की हा राष्ट्रावर हल्ला आहे. सरकारवर कुठलीही टीका न करता सर्व पक्षांनी एकत्र यावे. इतक्या जहाल नेत्याकडून हे ऐकून वाटलं की अजून सगळं संपलं नाही. हीच संधी आहे एकत्र येण्याची.. आणि ही गरज आहे -मँडेटरी म्हणतात तशी. http://www.ndtv.com/convergence/ndtv/story.aspx?id=NEWEN20080074274&ch=6...

अवांतर: झेंडा अर्ध्यावर आणून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करावा आणि भारतीय सेनेच्या इतिहासाला आणि नावाला शोभेल असा प्रतिहल्ला करावा.
जय हिंद.

(अतिशय दु:खी)....

दुसर्‍या धाग्यावरील हा प्रतिसाद इथे संबंधित वाटला म्हणून पुन्हा टाकला आहे.

»

काल पासून मी सर्व वृत्त वाहिन्यांवर पहात आहे. जे पाहिले ते सगळे सुन्न करुन टाकणारे आहे
अतिरेक्यांच्या एका गोळीला हजार गोळ्यांनी उत्तर दिले पाहिजे

अनेक प्रश्न उपस्थित राहतात
१.
आलेले अतिरेकी सगळे गुजरात मधून मुंबईला थेट गेट वे ऑफ इंडिया मधून आले आणि सगळीकडे पसरले अशी बातमी आहे न्यूज चॅनल्स ची.
सागरी सीमा सुरक्षा दले काय झोपा काढत होती का? की पैसे खाऊन बोटी चेक न करण्याच्या विलासी शौक पायी कर्तव्याचा विसर पडला ?
२.
मुंबई पोलिस चा एक हवालदार गोळी लागलेला चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहिले. काय करावे त्याने? बिचार्‍याच्या हातात काठी होती
काठीने लढावे की काय त्याने एके-४७ बरोबर? हा सरकारचा नाकर्तेपणा आहे की पोलिस स्वतःच्या कर्मचार्‍यांनाच सुरक्षा देऊ शकत नाही तर सामान्य जनतेला काय कप्पाळ देणार?
मुंबईत राहणार्‍या आपल्या बांधवांचे आयुष्य एवढे स्वस्त आहे?
सरकारने याचा जाब दिला तर पाहिजेच. पण एवढी वर्षे झोपा काढत होते की काय सरकार?

ना सागरी सीमेवर लक्ष, ना भूसीमेकडे लक्ष
सगळे लक्ष आपले मतांच्या लाचारीकडे..... बांगला देशी लाखोंच्या संख्येने राजरोस भारतात सगळीकडे रोज पसरत आहेत आणि सरकार डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहे.

ज्यांची निष्ठा सीमेपार वाहिलेली आहे अशांना आपल्या देशाचे नागरिकत्व? अरे कुठे फेडतील हे पाप काँग्रेसवाले... नरकातही यांना जागा मिळणार नाही. त्यांच्यासाठी यमालाही खास नरक तयार करावा लागेल.
राष्ट्रहित हे सगळ्या राजकारणापेक्षा पहिले आहे हे काँग्रेसच्या लक्षात का नाही येत?

घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध आणि मुंबईकरांचे अभिनंदन की अशा आतंकी कारवायांमधेही पळून न जाता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून जखमींना मदत केली.

आणि इंग्लंड टीमचाही जाहीर निषेध की असल्या अतिरेकी हल्ल्याचे कारण काढून मोठ्या पराभवाची मानहानी टाळून मैदानातून पळ काढला...

(देशभक्त) सागर

मदनबाण's picture

27 Nov 2008 - 11:57 am | मदनबाण

बोरिवली मधे एका लक्झरी बस मधे स्फोट झाला आहे इति CNBC- आवाज न्युज चॅनल.

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

मैत्र ,धमु ,यांच्याशी सहमत.
आता खरच वेळ येऊन ठेपली आहे कायमचा सोक्षमोक्ष लावण्याची.
करकरेंबद्दल ऐकुन खरच धक्का बसला ,त्यांना विरमरण आलय या कथानकावर विश्वास ठेवणे जड जातय.कदाचीत याला मालेगाव प्रकरणाची पार्श्वभुमी आहे म्हणुन माझा पुर्वाग्रह देखिल असु शकतो .पण आतुन कुठे तरी वाटतय की हे सगळ प्रकरण जितक सरळ दिसतय तितकस सरळ नाही आहे. सत्य पुन्हा एकदा लोकांसमोर येणार नाहीच याची खात्री आहे.
सगळ्या शहिद अधिकार्‍यांना अभिवादन्.त्यांच्या आप्तस्वकियांना हे अपार दुखः पेलण्याची शक्ती इश्वर देवो.
काल संध्याकाळ पासुन चित्त थार्‍यावर नाही.
"अनामिका"

वेताळ's picture

27 Nov 2008 - 12:02 pm | वेताळ

मुंबई वर परत दहशतवाद्यानी हल्ला केला.आता खर तर मुंबईची अवस्था कुणीपण यावे टिकली मारुन जावे अशी झाली आहे.परवा कोण्या बिहार्‍याने एका गावटी कट्याने मुंबईमध्ये एक बेस्ट बस ओलिस ठेवुन दाखवली,पण त्याला कळाले नाही कि तो कोणते नवे हत्यार दहशतवाद्याच्या हातात देत आहे. आता पाचपंचविस एके ५६ बंदुकानी सगळी मुंबई ओलिस ठेवायचा धाडसी प्रयत्न दहशतवाद्यानी केला.
त्याना जिवंत पकडा अथवा मृत,ह्याचा काहिच उपयोग पुढे होणार नाही.कारण हल्ल्याआधी ह्या मुस्लिम दहशतवाद्याना भारताच्या कायद्याचे शिक्षण देण्यात येत असावे.काल त्यांनी हवातसा गोळीबार करुन अगणित लोकांना ठार मारले व शिधा संपल्यावर पांढरे बावटे पुढे करुन शरणागती पत्करली.उद्या त्याच्यावर खटला चालेल. विशेषतः ते अल्पसंख्याक गटाचे आहेत म्हणुन त्यांना तुरुंगात चांगल्या सोयीसुविधा उपलब्द करुन दिल्या जातील.त्याना कोणती कडक शिक्षा द्यावी ह्यावर पुढिल १०/१२ वर्षे बौध्दिक चर्चा झडतील. तो पर्यंत एकादे विमान ओलिस ठेवुन परत त्याची सुटका केली जाईल.ज्या भारताच्या अस्मिता असणार्‍या संसदेवर हल्ला केला त्याचा आरोपी अफझलगुरु अजुनही तुरुंगात विर्याणी झोडत बसतो. मग आपला कायदा नेमके काय करत असतो?
काहीच नाही. कारण दहशतवादी हल्ल्यात मरायला अजुन खुप लोक ह्या देशात जिवंत आहेत.तोपर्यंत तरी दहशतवाद्याना काळजी करण्याची गरज नाही.अजुन कुठपर्यंत आपला देश बोटचेपे धोरण ठेवणार आहे? चौहबाजुने शत्रुने वेढलेला इस्त्राईल देश जर दहशतवाद व त्याचे पाठिराखे ह्यांना चोख उत्तर देत असेल तर आपण का नाही? कारण आपल्या नेतृत्वात तशी इच्छाशक्ती नाही आहे.
जीवाची बाजी लावुन ज्या पोलिसांनी व पोलिस अधिकार्‍यानी ह्या भ्याड हल्ला निष्प्रभ केला त्याना सलाम,सर्व शहिद पोलिस अधिकार्‍याना मानाचा मुजरा. हल्ल्यात मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांतता लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
वेताळ

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 1:16 pm | जैनाचं कार्ट (not verified)

१० किलो आरडीएक्स मिळाले आहे ओबेराय हॉटेलच्या समोर !
सकाळी ८ किलो मिळाले होते.... ताज समोर .... बापरे !
हे काय मुंबई उडवायला आले होते शक्यतो ... देवा वाचव रे गरिबांना !

फोटो अपडेट आले आहेत !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 1:29 pm | जैनाचं कार्ट (not verified)

देशावर कलंक !

देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विदेशी खेळाडूंनी देशात खेळण्यास नकार दिला व देश सोडून गेले !
चॅपीयन लिग व भारत इंग्लंडचे मॅच रद्द झाले !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

महेश हतोळकर's picture

27 Nov 2008 - 1:40 pm | महेश हतोळकर

मान्य आहे आपल्याच देशावर कलंक लागतो आहे. पण सगळ्या नाड्या आवळल्याशिवाय सरकार बोटचेपं धोरण सोडेल असं वाटत नाही. आता दुसरा झटका बसेल -विदेशी पर्यटकांचा ओघ घटला!

नाहीतर एका झटक्यात 'झाले गेले विसरून' भारतीय लोक 'मिडलसेक्स भारी का राजस्थान रॉयल्स? कोणत्या टीमवर बेटिंग करावे?' या जास्त महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर विचार सुरू करतील.

नकोच!

विनायक प्रभू's picture

27 Nov 2008 - 1:50 pm | विनायक प्रभू

दे दी हमे आझादी बिना खडग बिना ढाल
साबरमती के संत तुने कर दिया कमाल
ही कमाल पुढे चालू आहे.
दसमुखे नी परंपरा चालू ठेवली आहे.
शिपायांच्या हातात काठ्या द्या
अतिरेक्यांशी लढा द्यायला.
जमल्यास ढाल म्हणून संताची तसबिर
बघितल्यावर अतिरेक्यांचे हृदयपरिवर्तन होइल.
गुप्त हेर खात्याची पुर्वसुचना नव्हती असे म्हणतात. ते काय फोन करुन येतात काय चहा पानाला..
शेंबड्या पोरांना पण हे होउ घातले आहे म्हणुन.
कपडे सुकावायला वापरा तुमचे.

राघव's picture

27 Nov 2008 - 3:32 pm | राघव

गुजरात पोलिसांनी म्हणे ५ दिवस आधीच याबाबत सूचना दिलेली. आजच्या सकाळ मधे आहे अशी बातमी.

केंद्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी गट स्थापन करण्यासाठीही ज्या देशात चर्चा व्हावी लागते, राज्यांचे हितसंबंध जपावे लागतात, तेथे आणिक काय होणार?? मन अगदी विषण्ण होऊन जाते.. विजय साळसकरांसारखे अनेक फुक्कट मरतात पण राजकारण्यांना सोयरसुतक नाही त्याचे. त्यांचे स्वत:चे घरचे कुणी असे गेले ना तर समजेल लेकांना..

(अत्यंत दु:खी) मुमुक्षु

अनंत छंदी's picture

27 Nov 2008 - 2:02 pm | अनंत छंदी

अतिरेक्यांच्या हल्ल्याला बळी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली!

ऋषिकेश's picture

27 Nov 2008 - 3:42 pm | ऋषिकेश

अधोषित कसलं हे तर घोषित युद्ध!.. अजून काय घोषण हवी आहे? :(

"त्यांच्या" हाती एके४७ आणि "आपल्या" शूरांकडे लाकडी दांडके नाहितर गावठी पिस्तूल बघून काळजात गलबललं+धस्स झालं + वाईट वाटलं+राग आला+........

एकूणच काहि सुचत नाहि आहे :(

या "थंड" (का मुर्दाड?) समाजव्यवस्थेमुळे आणि त्यातूनच जन्मलेल्या सरकारी धोरणांमुळे गेलेल्या सर्व बळींच्या दु:खात सहभागी आहे

(सुपातला) ऋषिकेश

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 6:02 pm | जैनाचं कार्ट (not verified)

ओबेरॉय हॉटेल मधुन ३० बंधक सुरक्षित बाहेर काढण्यात आले ... !!

सगळेच वाचावेत व सुखरुप बाहेर यावेत हीच देवा चरणी प्रार्थना !

डेक्कन मुजाईद्दीन ह्या संघटनेने जबाबदारी घेतली आहे.. हल्ल्याची !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

१.५ शहाणा's picture

29 Nov 2008 - 10:09 pm | १.५ शहाणा

फाशी देण्याची गरज नाही.त्यांना अफजलगुरु बरोबर ठेवावे

देवदत्त's picture

30 Nov 2008 - 6:22 pm | देवदत्त

इकडे ताजवर ताबा परत मिळवून २४ तास झाले नाहीत, तिकडे नालायक मंत्र्यांनी राजकारण खेळायला सुरूवात केली.
लाईव्ह टीव्ही वर मुख्तार नकवी ह्यांनी काँग्रेसवर टीका केली पण जेव्हा संपादकाने भाजपाच्या काळातील जबाबदारीवर उत्तर मागितले तेव्हा काही उत्तर न देता संपर्क तोडून टाकला.

संपूर्ण घटनेवर आता काही भाष्य करावेसे वाटत नाही.
अतिरेक्यांचा खात्मा केल्याबद्दल पोलिस दल व सुरक्षा पथकाचे आभार आणि अभिनंदन. तसेच वीरमरण पत्करलेल्या पोलिस, जवानांना आणि त्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.