महाराष्ट्रातील सध्याच्या अनेक घडामोडी पाहता नजिकच्या काळात विधानसभा निवडणुका कधीही होऊ शकतात यात शंका नाही. मराठी- अमराठी वाद, मराठा आरक्षण याचबरोबर आता ही राजकीय कुरघोडी मराठी खाद्यपदार्थांपर्यंत पोहोचली आहे.
शिवसेनेने नुकताच शिवाजी पार्क वर वडा पाव संमेलन आयोजीत केले होते. महाराष्ट्रातील २७ नावाजलेले वडापावचे स्टॉल्स होते. त्यातील एकाला शिववडापावचे हक्क मिळणार आहेत. या शिववडापावला जागतीक बाजार उपलब्ध करुन देण्याचे शिवसेनेने ठरवले आहे.
झुणका भाकर केंद्रासारखी याची अवस्था होऊ नये तसेच यात काम करणारे केवळ मराठीच असतील याकडे शिवसेना विशेष लक्ष देणार आहे.
याच धर्तीवर काँग्रेसने ही कांदे पोहे संमेलन आझाद मैदानावर घ्यायचे ठरवले आहे. वडा पाव आणि कांदे पोहे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ( बटाटा, पाव, कांदा, पोहे ) हे कुठल्या प्रदेशातून आणले जातात त्यावरुन ही राजकारण जोर धरु लागले आहे.
एकंदर मराठी माणसाला आता वडापाव की कांदा पोहे याचा मनसे निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
मुंबईत घराबाहेर कांदे-पोहे मिळणारी ठिकाणे मला तरी माहित नाहीत. त्यामुळे नेहमीच्या वडापाव खाण्यात थोडा बदल म्हणून कधीतरी कांदे-पोहे खाण्याची संधी मिळणार यात आनंद आहे
अगामी निवडणुकीच्या काळात राहिलेले पक्ष आणखी कुठले मराठी पदार्थ मुंबईत ( आणि महाराष्ट्रात ) रुजवतात ते पाहू .
पण सध्या तरी मुंबईत वडापावचे मार्केट काबिज करणे हे इतर पदार्थांना अवघड आहे . आपणाला काय वाटते ?
प्रतिक्रिया
26 Nov 2008 - 10:50 am | कपिल काळे
झुणका भाकर पण झाली
आता पदार्थ कोणते राहिले आहेत?
१थालीपीठ
२फोडणीचा भात
३फोडणीची ( कालची)पोळी
४उपमा ( हा मराठी आहे का?)
५शिरा ( नको बुवा साजुक तुपामुळे एखाद्या जातीसमूहापुरता मर्यादित अपील )
६. मिसळ पाव ( आपली रॊयल्टी आहे)
७. अजून काय? कांदा भजी वगैरे?
एकेका पक्षाने त्याला साजेसा पदार्थ घ्यावा
आपण सगळ्यांनी एका पक्षाला एक पदार्थ सुचवला तर??
सुचवा पाहू..
26 Nov 2008 - 12:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि सांजा, उकड, घावन, धिरडी यांनी काय हो घोडी मारली आहेत, कपिल काका? ते झानटामाटीक भाताचं पण कायतरी बघा ब्वॉ!
(खादाड) अदिती
26 Nov 2008 - 10:50 am | शक्तिमान
वडा पाव हा घाईगडबडीत खायचा पदार्थ आहे.
तर कांदे पोहे हा आरामात बसून मजा लुटत खायचा पदार्थ आहे.
त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही. आणि snack म्हणून वडापावचे स्थान अबाधितच राहणार आहे.
26 Nov 2008 - 11:58 am | बिपिन कार्यकर्ते
मर्द मावळ्या...
एकदा आमच्या इंदौरला फिरून ये... पोहे 'कसेही - कुठेही - कधीही' कसे खाता येतात ते समजेल मग तुला. :)
बिपिन कार्यकर्ते
26 Nov 2008 - 12:37 pm | अमोल केळकर
इंदौर चे पोहे आणि शेव मस्तच असते-
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
26 Nov 2008 - 1:16 pm | भिंगरि
साबुदाणा खिचडि/साबुदाणा वडा ह्यापैकि एक मस्ट आहे :).
26 Nov 2008 - 1:26 pm | विनायक प्रभू
बिस्किट आंबाडे तर मस्त चालतील. आधी दोघांनाही घरी बोलवुन खायला घालीन. ते दोघेही एकाचवेळी येतील असे बघीन. कोणीतरी एकाने हो म्हटले तर चालेल.
26 Nov 2008 - 1:44 pm | मनस्वी
व्हेज / चिकन फ्रँकी प्रमाणे भाजी-पोळी-रोल उपक्रम पण राबविता येईल.
आहाराच्या दृष्टीने चांगला, कॅरी करण्यास सोपा (वडापावसारखा), स्वस्त (वडापावइतकाच), रुचकर - आत एकदम टेष्टी भाज्या टाकायच्या (वडापावसारखाच) आणि पोट भरेल असा.
26 Nov 2008 - 1:51 pm | परिकथेतील राजकुमार
सर्व पक्ष मिळुन खिचडी का विकत नाहित ? :?
++++ प्रसाद ++++
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
http://papillonprasad.blogspot.com/
26 Nov 2008 - 2:26 pm | किट्टु
मनस्वी, तुझी आयडीया आवड्ली. इथे "नेदरलेंड" मधे पण 'रोटी रोल ' खुप प्रसिद्द आहे.
आहाराच्या दृष्टीने चांगला आणि स्वस्त.
:) -किट्टु.
26 Nov 2008 - 8:43 pm | कलंत्री
लापशी ही नाश्त्यामध्ये ठेवायला हरकत नाही.
सध्या पक्षापक्षामध्ये असे वाटप होत असेल तर बसपाने लापशीचा प्रचार / प्रसार करावा असे नकळतच मनात आले.
चला यानिमित्त्याने मराठी खाद्यपदार्थांना आणि खवैयांना चांगले दिवस येत असतील तर बरेच आहे.
26 Nov 2008 - 9:03 pm | गुंड्या
अळु वड्या आणि कोथिंबिरीच्या वड्या !!!
26 Nov 2008 - 9:54 pm | झकासराव
हे कुठल्या प्रदेशातून आणले जातात त्यावरुन ही राजकारण जोर धरु लागले आहे>>>>>>>>>>
हा कॉन्ग्रेसचा रडीचा डाव आहे हे न कळणारा मुर्ख म्हणावा लागेल.
शिवसेना शिववडा प्रसिद्ध करण्याच्या मागे बरेच दिवस आधीपासुन होतीच. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या नावाचा मक्ता काय फक्त शिवसेनेकडेच आहे का अशा प्रकारचा विरोध झालेला माझ्या लक्षात आहे.
कदाचित शिवसेनेला मिळालेली प्रसिद्धी बघुन "इनो" पिउन कॉन्ग्रेस ने कांदापोहेचा कार्यक्रम ठेवला असेल. :)
डिसक्लेमर : मी कोणत्याच पक्षाचा पुरस्कर्ता नाहि. इथे कॉन्ग्रेसचा सरळ सरळ रडीचा डाव दिसला म्हणुन लिहिल. (खरतर अस करुन आपण आपली लायकी काय आहे हे दाखवत आहे हे कळत नसेल का विद्वान लोकाना?? )
अवांतर : आता कांदापोहेचे कार्यक्रम बाहेरच्या बाहेर उरकता येतील नै :?
अति अवांतर : स्टार प्रवाह नावाच एक नवीन चॅनेल सुरु झाल आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर एक सिरियल सुरु होणार आहे. निर्माता आहे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाइ. :)
सध्या टेस्ट सिग्नल वर जे जे प्रोमोज पाहिले त्यावरुन तरी आश्वासक वाटत आहे सिरियल. जे आषुतोष गोवारीकरने कराव अशी माझी वैयक्तीक इच्छा होती ती नितीन देसाई यानी पुर्ण केली बॉ.
बघाच.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao