उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्या आहेत. पुढच्या महिन्यापासून मुलांची शाळेची वारी सुरु होईल. सहकुटुंब गावी जावे तर बजेट कोलमडतय. पण मुलांना याचा भुर्दंड का? म्हणून एक दिवशीय पिकनिक करायची ठरवली आहे. पण सारखेच रिसोर्टला जाऊन पाण्यात बेडकासारखे डुंबत बसणे याचा कंटाळा आला आहे. तेव्हा मिपाकरांनो … मुंबईच्या जवळपास असे कोणते ठिकाण ज्यात रिसोर्टची मज्जा, थोडे निसर्गसौंदर्य, गावचा फील येईल असे जेवण, बैलगाडीची सफारी असे कोणते ठिकाण असेल ते सुचवा.आम्ही सगळ्या लेडीज आहोत त्यामुळे जास्त लांबचे ठिकाण नको आहे. साधारण वसई ते पालघर किंवा ठाणे भागात असेल असे काही. आंजावर खूप शोधाशोध केली पण मामाचा गाव या शिवाय काही पर्याय दिसत नाही आहे म्हणून मिपाकराच्या मदतीच्या अपेक्षेत.
प्रतिक्रिया
14 May 2015 - 6:38 pm | आदूबाळ
सगुणा बाग - नेरळजवळ.
http://www.sagunabaug.com/about_us.htm
स्वतः कधी गेलो नाहीये, पण तो सगळा भाग एकंदरच फार छान आहे.
15 May 2015 - 12:54 pm | राजेंद्र मेहेंदळे
हेच ठीकाण सुचवणार होतो. पण त्यांना सेंट्र्लवर ठाण्यापुढे नकोय असे वाटल्याने गप्प बसलो.
मुरबाडजवळ सरळगाव येथे माझ्या मित्राचे फार्म हाउस आहे. लिंक देतोय
http://www.visawaresort.com/about.html
15 May 2015 - 3:30 pm | गवि
..तरीच..
14 May 2015 - 7:42 pm | रेवती
मुंबईजवळ हवे म्हणतीयेस मग माझा पास, नायतर बारामतीला असे ठिकाण असल्याचे ऐकले आहे.
15 May 2015 - 3:32 pm | गणेशा
कुठं वो बारामतीला...
15 May 2015 - 10:58 pm | श्रीरंग_जोशी
कदाचित अॅग्री टुरिझम असावे. बारामतीचे पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटनाच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली.
माझ्या भविष्यातल्या भारतभेटीत माझ्या बारामतीच्या कॉलेजला भेट द्यायची आहे. त्यावेळी या ठिकाणी भेट देण्याचा मानस आहे.
18 May 2015 - 1:37 pm | गणेशा
सांग मग तेंव्हा.... मी येइल .. विद्या प्रतिष्टान जवळच नविन घर घेतलेले आहे... जाऊ मग
18 May 2015 - 10:14 pm | श्रीरंग_जोशी
फारच छान. पुढच्या भारत भेटीत तुझ्याबरोबर बारामतीला जाण्याचा पूर्ण प्रयत्न करीन.
18 May 2015 - 11:06 pm | रेवती
मला नक्की माहित नाही पण शरद पवारांनी काहीतरी एक उपक्रम केलाय म्हणे!
14 May 2015 - 7:48 pm | खेडूत
नेहमीची सहल ठिकाणे कधीही पहाता येतात.
मुले बऱ्यापैकी मोठी - दहा वगैरे वर्षे असतील तर सूरत हे छान ठिकाण आहे. मुलाना ट्रीपचा प्लान बनवायला सांगावा. आपण आपला बनवून ठेवावा.
मुंबईतून सुरतला जायला रेल्वेने चारपाच तास लागतात. ते हिरे आणि कपड्याचे निर्मिती- व्यापार केंद्र आहे. याशिवाय ऐतिहासिक महत्व अभ्यासून जावे. तुघलकाने बांधलेला १४ व्या शतकातला किल्ला आहे . शहराच्या मधोमध तापी नदी वहाते. १९९४ मधल्या प्लेगच्या साथीनंतर सुरतने कात टाकली आहे. तेव्हा सर्वात गलिच्छ शहर असलेले सुरत आता देशातले सर्वात छान आणि स्वच्छ शहर झालंय. भारतातल्या एका सुंदर शहरात राहण्याचा अनुभव आनंददायक असतो. मी नोकरीनिमित्य बऱ्याचदा घेतलाय .
एक दिवस राहिल्यास मस्त खरेदी आणि फिरणे दोन्ही होऊ शकते. मी जुलैमधे अशी एक तीन दिवसांची ट्रीप करतोय.
19 May 2015 - 10:57 am | कविता१९७८
विरार वसई पासुन लग्नसराईची खरेदी करायला सर्व सुरतलाच जातात इथल्या भागातले.
15 May 2015 - 1:01 pm | वेल्लाभट
आनंदा व्हॅली - तळेगाव जवळ
15 May 2015 - 3:10 pm | कंजूस
वाडा येथे (विक्रमगड) ठाण्याच्या दिवेकरांचा रिझॅाट आहे ,महागडा आहे .डिजे सोडा रेडिओ पण लावायला बंदी आहे .हल्लीचे रेटस माहित नाहीत पण आमच्या कंपनीतील गट जाऊन मजा करून यायचे .
15 May 2015 - 3:16 pm | नंदन
डहाणू-बोर्डी हाही एक चांगला पर्याय आहे. बोर्डीत एमटीडीसीतर्फे अलीकडे काही सोय झाली आहे, असं वाचलं - त्याशिवाय खासगी छोटेखानी रिसॉर्ट्सही आहेत.
15 May 2015 - 3:22 pm | कंजूस
दुसरा एक रिझॅाट विरार वेस्टला आहे त्याची पुर्वी जाहिरात यायची -एक दिवस फक्त महिलांनाच प्रवेश असायचा. नाव आठवत नाही परंतू तिकडे तो फेमस आहे.
आता उन्हाळ्याचे एक दिवसात होणार नाही{आणि यावर्षी डिसेंबर पर्यंत नाही} परंतू त्र्यंबकेश्वर मार्गे सापुतारा खासच आहे.
15 May 2015 - 3:29 pm | गणेशा
हे बघा बरे ..
बहुतेक पाल्घर- वाडा येथे आहे.. मी गेलेलो नाही, परंतु फोन करुन विचारपुस केलेली आठवते आहे.. चांगले वाटले होते.
http://hideout.co.in/
15 May 2015 - 3:32 pm | गवि
..बोर्डी,डहाणू (नरपड )
..उत्तन (यू टॅन रिसॉर्ट)
..
15 May 2015 - 10:49 pm | नूतन सावंत
तारपा,बोर्डी.उत्तन,पाली रीसोर्ट.
17 May 2015 - 9:47 pm | चारु राऊत
आलिबागला या आमच्याकडे
17 May 2015 - 10:36 pm | टवाळ कार्टा
किती वेळा बोलवणार...अशाने मिपाकर शिरेस घेतील ;)
18 May 2015 - 3:52 pm | बापू नारू
नाव सार्थक करतायत त्या... :)
18 May 2015 - 2:46 pm | अजया
=))
19 May 2015 - 10:55 am | कविता१९७८
हेमे, त्र्यंबकेश्वर च्या पुढे नाशिकला एन्ट्री मारण्याआधी संस्कृती नावाचं रीसोर्ट येतं, छान गावच्या थीमवर आहे, जेवणाला भारतीय बैठक आहे, गरम गरम पुरणपोळ्याही बनवुन मिळतात.