कोल्हापूर कट्टा वृत्तांत

अद्द्या's picture
अद्द्या in भटकंती
14 May 2015 - 12:21 am

सोमवार आणि मंगळवार झालेल्या प्रचंड पाउस आणि विजांमुळे हापिसातच २ दिवस वस्तीला होतो . बरेचसे नेटवर्क इक्विपमेंट जळाले होते . त्यामुळे मिपा वर येणं जमलेलं नाही . आणि त्यामुळेच वृत्तांत पोस्ट करण्यास उशीर झाला
----------------------------------------------------------------------------------------

स्थळ : राजारामपुरीतली एक खोली . . वेळ :- १०.५५

तरीही वेळ काळ आपल्यासाठी नाहीतच . . या अविर्भावात नाश्ता करत बसलेला तो . आणि यात मधेच फोन वाजतो

" हेल्लो ? मी काशीकर बोलतोय !! "
" काशीकर?? समजलं नाही . "
"अहो मी ' अकौंटंट ' "
"हो हो . बोला . काय म्हणताय?? "
" अहो काय म्हणतोय काय . ११ वाजता भेटणार होतो ना सगळे आपण ? "
"अं . . हो . पोचलात का तुम्ही ? "
"हो . . अगदी वेळेवर . पण इथे कोणीच नाही . येताय ना?"
"हो . पोचतोच . ५ मिनटात "

असं म्हणून त्याने फोन ठेवला . आणि परत समोर असलेल्या ७-८ इडल्या आणि २-३ वड्यांनी भरलेल्या प्लेट वर ताव मारायला सुरुवात केली . . आणि परत फोन . .

"हेल्लो . पोचलास का? "
"कोण बोलतंय ?? "
"मी रे स्नेहांकिता ताई . . कधी पोचतोस . . मी समोरच आहे हॉल च्या . लग्गेच ये "
"हो . हे काय , निघालोच "

परत इड्ल्यांची चिरफाड सुरु . . आणि एकदम आठवून तोच फोन लावतो . .

"वल्लिशेट . कधी येताय? कुठे आहात ? सगळे पोचलेत . तुमची वाट बघ्ताएत . . "
"हो रे, फडतरे ला आहे . . १५ मिनिटात पोचतो . '
"बरं या लवकर . "
"हो अर्ध्या तासात येतो "

१० सेकंदा पूर्वी १५ मिनिटात पोचतो म्हणून आता लगेच अर्धा तास . . मिसळ आली असावी समोर . असं म्हणत तो कसाबसा तयार होत , सुसाट गाडी चालवत पोचतो हॉल ला . . आणि मग त्याच्या लक्षात येतं . . मांडे घरीच राहिले . . मग गाडी आणि गडी जरी कर्नाटकचा असला आणि रस्त्याचे नियम पाळायची सवय असली . तरी टिपिकल कोल्हापुरी ष्टैल ने सिग्नल / वन वे सारख्या क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करीत तो घरी जाऊन मांडे घेऊन परत येतो . .
आणि राव साहेब असं भारदस्त नाव असलेला हा कसा बसा ६५ किलो चा चालता फिरता हाडांचा सापळा भारतीय प्रमाण वेळेनुसार ११ वाजता सुरु होणाऱ्या कट्ट्याला पावणे बारा ला पोचतो . .

हॉल मध्ये जवळपास सगळी मंडळी जमली होती . . अन्या कुठे तरी पाळण्याच्या तयारीत होता . . आणि मग सगळ्यांनी आपापल्या आयडी चं नाव सांगितलं . . तिथे "नाद खुळा " असं नाव ऐकल्यावर जसा माणूस समोर येईल तसाच दंगा ते करत होते . प्रगो शांतपणे सगळं ऐकत हळूच पिन टोचत होते . . हळू हळू सगळ्यांनी आपापले अनुभव मांडायला सुरुवात केली . नाखू काकांनी डबल डेकर यष्टी पण होती हे सांगून जवळपास सगळ्यांची यष्टी उडवून दिली . . ह्या सगळ्या गप्पा चालू असताना 'वेताळ ' नि प्रवेश केला . . त्यांचे पाय सरळच आहेत हे पाहून मी मनातल्या मनात हुश्श केलं . . मधेच स्नेहांकिता ताइनि भिंगरी ताई आणि अनन्या ताईंचा फोन आला आणि त्या त्यांना घेऊन आल्या . .

थोड्या वेळात यमगर्निकर , जिनेन्द्र वगेरा मंडळी हि आली . . . ७ वाजता सुटलेला सूड १ वाजता पोचला कसाबसा आणि त्याने आणलेले रसगुल्ले सदृश बासुंदी / मलई चा जेवणात स्वीट डिश म्हणून देण्यात येईल असं जाहीर केलं . .

कट्ट्यात खरी जान आणली ती शाह काकांनी . . पुण्यात राहणारे शाह बरेच दिवस मिपा फॉलो करतात . त्यांनी स्वतःचा आयडी नाही बनवला . पण रोज इथे दंगा मस्ती करणाऱ्या सगळ्या आयडीना ते ओळखतात . .

अनन्या ताई आणि भिंगरी ताई आल्यावर आम्हा गरीब बिचाऱ्या भोळ्या भाबड्या सालस निरागस गुणी आणि कर्तव्यदक्ष मुलांवर कंपू करून अनाहीतांना त्रास देण्याचा आरोप करण्याचा प्रयत्न केला . पण नाखू काकांनी लग्गेच तो प्रयत्न हाणून पाडला . . (मेलो आता . पळा )

वल्ली , प्रगो , वेताळ , आणि नाखू यांनी मिळून गणपती उचलणे आणि तो विसर्जित करण्या दरम्यान गणपती आणि त्याला उचलणारे , या दोघांच्याही मनात चालणारे विचार बोलून दाखवले . . (याचा संदर्भ नाखू काकांच्या वृतांतात आलाय ) .

याच दरम्यान आलेला सूड . . साडे सहाची गाडी सात ला आली , आणि साताऱ्यापर्यंत त्याने ती बस नसून बैलगाडी आहे या समजात अन त्याच वेगात मारली . आणि पुढे कोल्हापूर कमानी पासून बस स्टेन्ड ला हि त्याच वेगात आला . आणि आधी मला त्याला घेऊन येताना रस्त्यात आणि मग हॉल मध्ये आल्यावर प्रत्येकाला एकदा सांगून घेतलं . .
पण नंतर "साय" वाचून त्याने या सगळ्याची भरपाई हि केली .

हे सगळं होई पर्यंत दीड वाजत आलेच होते . हॉल पासून जवळच असलेल्या ' श्रीकृष्ण ' हॉटेल मध्ये स्नेहांकिता ताइनि जेवणाची व्यवस्था केली होती . आणि तिथली स्पेशालिटी म्हणजे मुंडी आणि पाया थाळी .
तिथे आधी अनन्या ताईंनी आणलेल्या फणसाच्या चिवड्यावर सर्वांनी ताव मारला . याच दरम्यान यमगार्निकरांनी लिव इन रिलेशन बद्दल आपला अनुभव सांगितला . .
आम्हा सगळ्या लहान मुलांच्या दंग्याला न जुमानता ' श्री कृष्ण ' वाल्यांनी अगदी शांतपणे सगळ्यांना जेवण वाढलं आणि जीभ आणि पोट तृप्त अगदी केलं .

या कट्ट्या दरम्यान झालेले काही ठराव : -

१ ) यमगर्निकर आपले लिव इन रिलेशन चे अनुभव लेख स्वरूपात इथे लवकरच मांडतील आणि आम्हा शिंगल मुलांना उपकृत करतील ( आणि त्या पुढचे प्रगो सांगतील ).

२) शाह काका स्वतःचा आयडी घेतीलच, त्यांच्या बोलण्यावरून प्रेम पुजारी असा काहीसा आयडी त्यांना हवा होता . संपादक मंडळाने या कडे लक्ष घालणे .

३ ) सूड ने डब्यातून आणलेला पदार्थ नक्की काय आहे याचा पुरावा म्हणून फोटो अडकवणे.

आणि सर्वात महत्वाचा भाग . .
कट्ट्याच्या दरम्यान काही कमी जास्त झालं असल्यास लहान समजून विसरून जावं . आणि पुढे हि नक्कीच भेटूच . . माझा हा पहिलाच कट्टा . त्यामुळे मनात थोडी भीती होती . पण सगळ्यांनीच वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारखं अगदी आपल्यात सामावून घेतलं . सगळ्यांचेच पाय कायम जमिनीला टेकलेले आहेत . सर्वांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा .

मोबाइल गंडलाय . त्यामुळे माझ्याकडे फोटो नाहीत . अन्या , वल्ली , प्रगो , यस वाय जी , यांनी फोटो धाग्यात टाकावेत . .

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 May 2015 - 12:22 am | यशोधरा

आला! आता वाचते!

यसवायजी's picture

14 May 2015 - 10:51 am | यसवायजी

थोडी भर-
पुण्याहून एक ग्यांग शनिवारी पहाटे पहाटे निघाली आणी ती व्हाया इच्चलकरंजी-वाडी-खिद्रापूर वगैरे करत संध्याकाळी कोल्हापुरात पोचली. मी एका मित्राचे लग्न अटेंड करुन घरी परत आलो आणी अद्द्याची वाट बघत बसलो. बेळगाववरुन निघून ५ ला निपाणीला पोहचतो म्हणालेला अद्द्या ६ वाजले तरी पत्ता नाही. फोन केल्यावर कळाले की मांडे अजून मिळाले नाहीत म्हणून उशीर होईल. तोपर्यंत लै ब्याक्कार पाऊस चालू झाला. तरी अद्द्या ८ पर्यंत बाईकवरुन माझ्या घरी पोहोचला. चहा पाणी झालं. तशी माझी भिजण्याला काही हरकत नव्हती. पण जर अद्द्याच्या जागी कुणी 'अदिती' (!) असती तर मज्जा आली असती. तर, माझ्याकडे रेनकोट किंवा जर्कीन वगैरे काही नसल्याने मी केयस्सारटीशीच्या बसने कोल्हापुरला येण्याचा ठराव पास झाला.
कोल्हापुरात पुणेकर ग्यांगला भेटलो. वल्ली, नाखुकाका, प्रगो, अद्द्या, अन्या दातर आणी मी असे ६ जण 'देहाती' नावाच्या एका हाटेलात जेवायला गेलो. प्रगो म्हणाला, "च्यायला कोल्हापुरात आलोय आणी ह्या असल्या देहाती नामक बिहारी हाटेलात जेवायचं?" म्हटलं, "अरे ते 'दे हाती' आहे". पुढे तासभर त्याला नक्की कुणाच्या हातात काय द्यायचे आहे ते समजत नव्हते. असो. तर वल्ली आणी नाखु यांनी आम्हाला लाज आणली आणी कोल्हापुरात चक्क शाकाहारी थाळी मागवली. वेटर आमच्याकडे विचित्र नजरेने बघत होता. बाकीच्यांनी मस्त तांबडा-पांढरा हाणला. सोलकढी किंवा ताक न मिळाल्याने थोडा मनस्ताप झाला. वल्ली दर दोन मिनिटानी बुवांची आठवण काढत होता. आहाहा. काय ते मित्रप्रेम!!! बुवाला शनिवारी लै उचक्या लागल्या असतील. सन्नीबाईंनंतर इतक्या उचक्या फक्त बुवालाच्च.
नंतर पान-तंबाखू-विडी-काडी आवरुन पावसात सगळे रंकाळ्याच्या दिशेने निघाले. अन्याने रंकाळ्याचा असा एक कोपरा शोधला होता की जिथे काळं कुत्र पण नव्हतं. पुर्ण अंधार आणी आम्ही ६ जण. एका मोठ्या दरोड्याच्या तयारीतली टोळी म्हणून पोलीसांनी आत घातलं असतं च्यामारी. रंकाळ्याच्या मस्त वार्‍यात आणी थंडगार हवेत पावसाची रिमझिम चालू होती. गप्पांना ऊत आला होता. हास्याचे फवारे उडत होते. मिपा-मिपाकर-डू-ऐडी वगैरे मस्त अर्धा-पाऊण तास गेला. मग दुसर्‍या दिवशी सगळे वेळेवर ११ वाजता पोहचण्याचे ठरले आणी झोपायला आपापल्या घरी/हाटेलात/रुमवर गेली मंडळी.

- क्रमशः

कोल्हापुरात चक्क शाकाहारी थाळी >> अरारा! घोर अपमान!
>>सन्नीबाईंनंतर इतक्या उचक्या फक्त बुवालाच्च. >>म्हंजे सन्नी वल्ल्याची मित्र हाये?? ह्ये नव्हतं म्हायती!! =))

क्रमशः - वाट बघत आहे.

अद्द्या's picture

14 May 2015 - 12:25 am | अद्द्या

तीज्यायला . मोबाईलवर तर लई मोठा दिसत होता . . इथे एवढूसाच आहे

आनन्दिता's picture

14 May 2015 - 2:19 am | आनन्दिता

=))

टवाळ कार्टा's picture

14 May 2015 - 2:44 am | टवाळ कार्टा

लिहिले आहे एक आणि त्यातून अर्थ निघतोय भलताच =))

तू मेल्या नाव विसरू नको कधी स्वतःचं. =))

मनी वसें ते व्यनिं दिसे!! =))))

छान लिहिला आहे वृत्तांत.. पण आनखिन लिहायला हवे होते असे वाटते.. येवुद्या अजुन

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2015 - 12:52 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

छान आहे वृत्तांत पण एवढासा का? अजुन लिहा.

वृत्तांत आवडला. फटू हवेतच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 May 2015 - 6:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या कुठे तरी पाळण्याच्या तयारीत होता . .

त्याला कांदे चिरायचे होते आणि पोहे भाजायचे होते असं खात्रीलायक सुत्रांकडुन समजलेलं आहे.

"हो . पोचतोच . ५ मिनटात "

पुढच्या वेळी कोल्हापुरकर अन्याला भेटीन तेव्हा निघायच्या आधी अर्धा तास मी पोचलोय असा फोन करीन :)

श्रीरंग_जोशी's picture

14 May 2015 - 6:34 am | श्रीरंग_जोशी

वृत्तांत आवडला. पण एवढ्या घडामोडींबाबत वाचूनही काही तरी अपूर्णता वाटली. कदाचित फोटोज नसल्याने तसे वाटत असेल. धागाकर्त्यालाही यामुळेच वृत्तांत एवढासाच वाटतोय.

एकंदरित कट्टेकर्‍यांनी सदर वृत्तांत येईपर्यंत कट्ट्यातल्या घडामोडींबाबत अन फोटोजबाबत पुरेपूर गुप्तता पाळली आहे असे दिसते. बाहेरगावहून गेलेल्यांनी कोल्हापूर दर्शनाबाबत तपशीलवार लिहावे ही विनंती.

यसवायजी's picture

14 May 2015 - 8:49 am | यसवायजी

१ २ दिवसात भर टाकण्यात येईल

नाखु's picture

14 May 2015 - 9:04 am | नाखु

पण त्यात शविवारी रात्री

देहाती मधील "बहुढंगी+बहुरंगी" चर्चेस फाटा दिला

आणि "रंकाळ्यावर एक अंधार बोळ्कांडी" या अनुभुतीस वगळ्याल्या बद्दल जोरदार निषेध.

विसू:तू अन्याला घाबरून जर "काही भाग" संपादीत केला असशील तर तसे सांग "चिमण" परत आलाय तेव्हा काळजी इल्ले

बाकी सूड रावांचे घोषवाक्य पुन्हा एकदा "फोटो नाय तर कट्टा नाय" (हे तंटा नाय तर घंटा नाय अश्या ष्टाईलीत वाचावे)

छोटेखानी वृ चांगला लिहिलाय.
तलवारींविषयी स्नेतै लिहिणारेत का? =))

मुक्त विहारि's picture

14 May 2015 - 11:13 am | मुक्त विहारि

आता पुढील कट्टा, पुण्याला.

एकदम आठवून तोच फोन लावतो . .

"वल्लिशेट . कधी येताय? कुठे आहात ? सगळे पोचलेत . तुमची वाट बघ्ताएत .

निमंत्रक साहेब काय म्हनायचंय काय आपल्याला? तो फोन लावतो मंजे काय? आमीपन आप्ल्यासारखे घरातून फोन करून र्‍हायलो हुतो की काय? अवं, तारीक गवाह हय!! आमी त्यातले न्हवं...

स्नेहांकिता तै, व अन्याशेट दातार, या छुप्या हल्ल्याला अजून जास्त सडेतोड उत्तर द्यायची जबाबदारी, ज्येष्ठ सहनिमंत्रक म्हणून आपण घ्यावी ही विनंती...

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2015 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे

अरे काय हे ?

कट्ट्यामध्ये मजा आली असावी अशी शंका यायला वाव आहे.

पण कट्ट्याच्या तयारीच्या मैलभर लांब धाग्यापुढे हे हातभर लांब वर्णन, त्ये बी फटूबिगर, कोल्लापूरी ठसक्याला काय शोभून नाय दिसू राह्यलं राव !

मदनबाण's picture

14 May 2015 - 2:21 pm | मदनबाण

+१
एक्का काकाशी सहमत... फोटु नाय ! कोल्हापुरी मिसळ खाल्ली की नाही त्याचा पण काय पत्ता लागला नाय !
बाकी रंकाळ्यावर जिथे बसला होतात तिथुन शालिनी पॅलेस तरी दिसत होता की नाही ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व
Why on earth is Narendra Modi going to Mongolia?
Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China
Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li
India’s foreign policy must continue to move past the parochial
Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery guns

नाखु's picture

14 May 2015 - 2:39 pm | नाखु

बाणराव आम्ही जिथे पोहोचलो होतो (म्हणजे अन्याने नेले तिथे) अंधारामुळे आम्हीच एकमेकांना नीटसे दिसत नव्हतो आणि या गडबडीत शालिनी पॅलेस बघितलाच नाही (नेमके सांगायचे तर अन्याने ना (त्याची) शालिनी दाखविली ना कोल्हापूरचा शलिनी पॅलेस. त्यामुळे अधिक तपशील एसवायजी देऊ शकेल.
दिवाभीत नाखु

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2015 - 11:44 am | प्रभाकर पेठकर

वृत्तांत सुटसुटीत आहे. तरीपण शब्दांबाबत बराच कंजूषपणा केल्याने त्रोटक वाटतो आहे. असो.
ते सारखं सारखं 'आम्ही लहान मुलं' वगैरे काळजाला घरं पाडणारं लेखन जरा कमी करायला पाहिजे असे वाटते.

सानिकास्वप्निल's picture

14 May 2015 - 1:32 pm | सानिकास्वप्निल

छान लिहिला आहे वृत्तांत, आवडला.
फोटो ही येऊ द्या लवकर.

बरं झालं आम्ही म्हातारे आलो नाही ते .नाहीतरी रंकाळ्याला फेरी मारत खारे दाणे खाण्यापलीकडे काही करणार नव्हतोच.

चौकटराजा's picture

14 May 2015 - 2:41 pm | चौकटराजा

१सो१ टक्का !

कट्ट्याला येईन असं सांगितलं खरं पण शन्वार सकाळपर्यंत काही केल्या कळत नव्हतं नक्की काय करावं. कारण सकाळी साडेपाचला जरी निघालो तरी कोल्हापूरात जाईस्तवर अकरा-साडेअकरा होणार. हो-नाही करत जावं असं ठरवलं.

रविवारी सकाळी सहा-सवासहाकडे स्वारगेट गाठलं, एरवी कर्नाटकाच्या बसेस शोधतो. पण आज विनावाहक निमआराम बसच्या रांगेत उभं राह्यलो. रांग कमी होती पण तिकीट खिडकीवर कोणीच नाही.

"तिकीट द्यायला कोणी नाही?" मी..
"गाडी आल्याव खिडकी उघडनार म्हनं"

वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता, साडेसहाची बस सहा चाळीसला आणली. तिकीटं देणं वैगरे सोपस्कार पार पडेपर्यंत सात वाजले. ज्या वेगात ड्रायव्हर गाडी चालवर होता त्या मानाने प्रकरण एकंदर कठीण वाटत होतं. हळूहळू बसनं वेग(?) घेतला आणि डोळे मिटू लागले. डोळे उघडले तेव्हा नऊ वाजले होते आणि गाडी सातारच्या जवळपासपण नव्हती. प्रवाशांमध्ये एव्हाना चुळबुळ सुरु झाली आणि ड्रायव्हरबाबतीत दबक्या आवाजात शेरे मारले जाऊ लागले. सातारच्या अलीकडे गाडी एका धाब्यावर थांबली तेव्हा पावणेदहा झाले होते.

कोल्हापूर ३० KM अशी पाटी पाह्यल्यावर संयोजक अन्याभाऊ दातार यांना फोनवण्यात आले. उतरलास की फोन कर सांगून साहेबांनी फोन ठेवला. मध्येच एकदा यसवायजीचा कॉल येऊन गेला. कोल्हापूर मनपाची कमान ओलांडली तेव्हा अद्द्याला फोनवले आणि यष्टी ष्ट्यांडावर तो येऊन हजर होता. आधी रावसाहेब वैगरे नाव वाचल्याने, विमेकाकांच्या बाबतीत आमचा जो गैरसमज झाला तो याच्याबाबतीतही झाला होता. पल्लेदार मिश्या असलेले, थोडे केस वैगरे पांढरे झालेले कोणी गृहस्थ स्कूटीच्या हँडलला भाज्या, किराणा मालाच्या पिशव्या अडकवून वाट बघत उभे असावेत असं वाटलं होतं. पण तसलं काही घडलं नाही....

असो, तर अद्द्याच्या बाईकवरुन कट्टास्थळी पोचल्यानंतर चित्र थोडं वेगळं होतं. मुंबई-पुण्याच्या कट्ट्यात जी हास्याची कारंजी उडतात तसलं काही ऐकू आलं नाही. आत गेल्यानंतर हिंदीत कोणाची तरी मुलाखत चालली होती, हेच ते शाहकाका!! दोन मिनीटं अद्द्यानं मला मिपा कट्ट्याला आणलंय का कोल्हापूर आकाशवाणीच्या हापिसात ते कळेना. पण वल्लीनाखुयसवायजीगिर्जाकाकादि ओळखीची टाळकी दिसल्यावर आपण योग्य स्थळी पोचल्याची खात्री झाली. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे या कट्ट्याला कोणीही भिकबाळीकडे आश्चर्य, कौतुक, मत्सर, संशय, कुत्सित अशा कोणत्याही नजरेने पाहीलं नाही.

पाणी पितोय तोवर पेढ्यांचा बॉक्स पुढे करण्यात आला, एक दोन पेढे घेऊन टेचात मी पण तुमच्यासाठी काहीतरी आणलंय असं म्हणत ब्यागेतनं डबा काढला. एरवी मुंबैपर्यंत व्यवस्थित पोचणार्‍या रसगुल्ल्यांनी एव्हाना एकमेकांत विलीन व्हायला सुरुवात केली होती. त्यांची एकंदर अवस्था बघून मिपापरंपरेप्रमाणं पब्लिकनं त्याला शबरीचे रसगुल्ले, पनीर बासुंदी वैगरे नावंही दिली. अद्द्यानं जो वर फोटो मागितलाय तो त्याचाच!! पण मी काय फोटो-बिटो न टाकता पुढील सलग तीन कट्टे रसगुल्ले किंवा तत्सम पदार्थ बनवून घेऊन जायचा विचार केला आहे. ;)

त्यानंतर मिपावरच्या काही अजरामर कवितांचा विषय निघाला आणि थोर मिपाकवी चचा उर्फ लीलाधर यांची 'साय' ही कविता चर्चेत आली. वल्ली यांच्या म्हणण्याप्रमाणे ती कविता 'दादा मला एक वहिनी आण' च्या चालीवर नीट म्हणता येते. मी या मताला असहमती दर्शवल्यामुळे की काय नाखुकाकांनी त्या कवितेचं जाहीर वाचन माझ्याकरवीच घडवून आणलं. या कवितावाचनाचं प्रायश्चित म्हणून सोमवारचा दिवस मी उपास केला. नाखुकाकांना आकाशातला बाप सद्बुद्धी देवो.
पुढील कवितावाचनांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कोणीतरी आता जेवायला निघायचा प्रस्ताव ठेवला आणि सगळे निघाले.

जेवतानाही टेबलं आडवी लावायची का उभी इथपासून ते नॉनव्हेजवाल्यांनी व्हेजवाल्यांसोबत टेबलावर बसावं का नाही इथपर्यंत छोटेमोठे काथ्याकूट झाले. बाकी जेवणात असलेल्या भेंडी आणि मसूरच्या भाजीला नावं ठेवायला शोधूनसुद्धा जागा सापडली नाही. अद्द्याने आणलेले मांडे अप्रतिम होते. पुढे कधी अद्द्याने पुण्यात येताना मांडे आणले नाहीत तर तर त्याला लकडीपुलाहूनच परत पाठवण्याची व्यवस्था करणेत येईल. ;)

जेवताना निघालेले विषय/काथ्याकूट येणेप्रमाणे:
यमगर्निकरांच्या लिव्हईनची सुरुवात, डॉ. खरे यांचे बोटीवरील लिखाण आणि त्यातील अस्मद् सर्वनामांची संख्या, मोजींच्या खालावलेल्या लेखनशैलीला जबाबदार कोण पिडांकाका की पेठकर काका, जळगावचे मांडे आणि बेळगावचे मांडे यात उजवं काय, फणसाचे तळलेले गरे मीठात बरे लागतात की तिखटमीठात.

जेवून मंडळी बाहेर पडली तेव्हा, माझ्या आयडीला उपप्रतिसाद द्यायलाही लोक घाबरत असल्याचे कळले आणि हसावं की रडावं ते कळेना.

परतीच्या प्रवासात शाह काका सोबत होते. त्यांच्यासोबत त्याकाळची मुंबई, शिक्षणपद्धती, त्यांचे प्रवास यावर चर्चा करताना पुण्यात गाडी कधी पोचली तेही कळलं नाही. इस्पिकचा एक्का यांची प्रवासवर्णने आवडल्याचा मात्र शाहकाकांनी आवर्जून उल्लेख केला.

दगदग, मनस्ताप यांनी सुरु झालेल्या दिवसाचा शेवट मात्र छान झाला.

आदूबाळ's picture

14 May 2015 - 2:51 pm | आदूबाळ

फोटो कुठाहेत हो?

संयोजकांना विचारा, मी कट्टास्थळी मोजून दीड...डोक्यावरुन पाणी दोन तास होतो. ;)

प्रचेतस's picture

14 May 2015 - 3:00 pm | प्रचेतस

काही फोटो.
उपवृत्तांत नंतर लिहिनच.

१. रंकाळ्यावर थंडगार भर्राट वार्‍यात गुंगलेली मंडळी
डावीकडून शिवाजीमहाराज उर्फ प्रगो, काकडलेला रावसाहेब उर्फ अद्द्या, मध्ये यसवायजी, बाजूला टांगमारु दातार आणि शेवटी नाखुकाका.

a

२. कट्ट्याच्या दिवशी महाराणी लॉन्सच्या बाहेर
डावीकडून लिवैन स्पेशालिस्ट यमगर्निकर, भिंगरी, शहासाहेब, सूड, अद्द्या, यसवायजी, वेताळ, आणि उजवीकडे जिनेन्द्र
a

३. जेवणात दंग मंडळी
a

४. a

५. मांडे
a

६. जिनेन्द्र, कन्फ्युज्ड अकौटंट, यमगर्निकर, वेताळांचा मित्र, वेताळ, नाखु, मी, सूड, स्नेहांकिता आणि इतर (फोटो सौजन्य यसवायजी)
a

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2015 - 3:54 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटच्या फ़ोटुत मोरपंखि ड्रेसात आहे , (टेबलावर हात टेकुन बसलेली) ती आमची आंबूssss आंबुटलि!!! है कि नै!? सांगा हो क.अकाऊंट? बरोबर नाssss!!!

असंका's picture

14 May 2015 - 5:10 pm | असंका

:-)

यस्सर...
रच्याकने, आपण यावेत अशी फार इच्छा होती...!!

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2015 - 10:51 pm | अत्रुप्त आत्मा

@ आपण यावेत अशी फार इच्छा होती...!!>> माझिहि खूप इच्छा होती. आंबुटल्याला भेटायच होतं. पण कामाचा सीझन ,आणि मंगल कार्यालयांना दिलेल्या तारखा! या मुळे सारे काही अशक्यात राहिले. :-(

तरीही 12 जून नंतर कोल्हापूर ,रत्नाग्री ,चिपळुण ,हरेश्वर,असा दौरा आहे माझा. तेंव्हा नक्की येणार आहे.

एस's picture

14 May 2015 - 3:00 pm | एस

सगळ्यात भारी कट्टे पुण्यात होतात. त्यांचे वृत्तांतपण भारी असतात. ;-)

(वृत्तांतात भरगच्च भर घाला आणि फोटूंचा पसारा मांडा. त्याशिवाय असला काही कट्टा झाला नाही असेच मानण्यात येईल.) :-)

तलवारी अणि कोथळे काढायच्या घोषणांचा परिणाम असणार! :D

मस्त वृ, फोटो :)

टवाळ कार्टा's picture

14 May 2015 - 4:28 pm | टवाळ कार्टा

खिक्क

भिंगरी's picture

14 May 2015 - 3:00 pm | भिंगरी

ज्याच्या नावात सूड आहे त्याच्या भिकबाळीवर 'आसूड'ओढण्याचे धैर्य कोण दाखवेल?

त्रिवेणी's picture

14 May 2015 - 3:13 pm | त्रिवेणी

कट्टा मस्त झालेला दिसतोय.
पण फोटों टाका कुणीतरी.

यसवायजी's picture

14 May 2015 - 3:30 pm | यसवायजी

विस्तार करा-
१. ब्याटया आणि नानासाहेब नेफळे हे एकच आहेत अशी खात्रीशिर माहिती या कटयादरम्यान समोर आली. त्याला मी आणि वल्लीने जोरदार पाठींबा दर्शवला.
.
२.अनाहिताँविरुद्ध उगाच सगळे पेटतात ऐसा आरोप करनेत आला. गैरसमज दूर करण्यात यावेत अशी विच्छा कुणीतरी सांगितली.
.
३.साय वाचून झाली. दही लावण्यात आलेलं नाही. त्याचे वाचन पुणे कट्याला अलका चौकात करण्यात यावे.
.
४.लफडी मार्गदर्शन-
*लग्नाआधीची (यमगरणीकर)
*लग्नानंतराची आणि कधीचीही (परगो उर्फ़ गिरजा उर्फ़ पोप उर्फ़ शिवाजी)
.
५.(जागा राखीव)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 May 2015 - 10:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

१. ब्याटया आणि नानासाहेब नेफळे हे एकच आहेत अशी खात्रीशिर माहिती या कटयादरम्यान समोर आली. त्याला मी आणि वल्लीने जोरदार पाठींबा दर्शवला.

बॅटुक मोड ऑन

इंडिड रोचक माहिती आहे. एक अंमळ शंका होती. नेफळे रात्रीचे बॅटमॅन बनुन फिरतात का बॅटुक रात्री नाना बनुन फिरतो.

बॅटुक मोड ऑफ

बॅटमॅन's picture

14 May 2015 - 10:51 pm | बॅटमॅन

एक अंमळ शंका होती. नेफळे रात्रीचे बॅटमॅन बनुन फिरतात का बॅटुक रात्री नाना बनुन फिरतो.

पृथ्वीवर टाईमझोन नामक प्रकार आहे असे कळते, त्यानुसार एका ठिकाणची रात्र म्हणजेच दुसर्‍या ठिकाणचा दिवस असतो. ;)

तदुपरि याचे खरे उत्तर माईंचे हेच देऊ शकतील असे हितेशभाईंनी सांगितल्याचे ग्रेटथिंकरभाऊ म्हणत होते बॉ.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 May 2015 - 6:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यासाठी त्यांचं विल वाचायला लागेल नाही का. आयडी स्वर्गवासी झाला तो ;)

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2015 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा

@ (परगो उर्फ़ गिरजा उर्फ़ पोप उर्फ़ शिवाजी)>> अप माण! :-\ शिवाजी न्हाय,टनाटनि हिंदु औ रंग जेब! :P म्हणा! :-D
हिंदु औरंगजेब!-गिर्जा काsssकाsssssss! ;-)

पियुशा's picture

14 May 2015 - 4:25 pm | पियुशा

फोटु अजुन हवे होते ...व्रुतान्त भारी :)

माझा हा पहिलाच कट्टा होता. पण कोल्हापूरकरांच्या आमंत्रणाला मान देऊन पार मुंबई, पुणे/पिंचिं, रत्नागिरी अशा लांब लांबून आलेल्या मिपाकरांमुळे कुठेही आपण इथे अजून नवीन आहोत, असं जाणवलं नाही. एवढा आपलेपणा दाखवणार्‍या मिपा परीवाराला माझा सादर प्रणाम. त्याशिवाय, श्री नाद खुळा यांच्या प्रेमाने अगदी भारावल्यासारखे झाले. त्यांचे विशेष आभार.

गप्पा इतक्या रंगल्या की फोटो काढण्याकडे अंमळ दुर्लक्षच करणे भाग होते.

त्यातूनही टिपलेले काही क्षण-

.

डावीकडून.. सर्वश्री भिंगरी, अनन्या, स्नेहांकिता तै, नाद खुळा , आणि प्रगो.

.

डावीकडून.. सर्वश्री प्रगो, यसवायजी, वल्ली, यमगर्नीकर, वेताळ, आणि शहासाहेब.

.

सूड, अद्द्या (रावसाहेब) आणि भिंगरी तै.

.

व्हेज वाल्यांची शेप्रेट पंगत.... मध्ये अनन्या यांनी पिशवीभरून आणलेले गरे...

.

नॉन्वेज वाल्यांची पंगत.. (मागचे नाही हो, पुढचे तिघं फक्त.. शहा साहेब, अद्द्या, आणि दिसत नसलेले प्रगो )

.

श्री नादखुळा यांच्या आशेनुसारचे भावी मिपाकर...
कट्ट्याला जाताना मनात तशी धाकधूकच होती, कारण हे एवढे सगळे दिग्गज साहित्यिक येणार आणि त्यांच्या आपापसात गप्पा होणार, त्यात आपण काय बोलणार!! अगदीच काही नाही, तर बोलायला कुणी तरी बरोबर असावे म्हणून मी चक्क माझ्या लेकीला बरोबर नेले होते. पोरगीचे आभार की चार तास आईशिवाय विनातक्रार राहिली, एवढेच नाही तर अगदी खुषीत राहिली. शिवाय तिथे अजून एक भावी मिपाकर मैत्रिणही भेटली... श्री जिनेंद्र हेही बहुधा माझ्यासारखाच विचार करून आपल्या लेकीसहवर्तमान दाखल झाले होते. दोघी दोन एक तास तरी हातात आपापल्या वडलांचे मोबाइल धरून एकमेकींशी खेळत होत्या....

आदूबाळ's picture

14 May 2015 - 10:38 pm | आदूबाळ

एक फालतू शंका - पहिल्या तीन फोटोंमध्ये सगळे मिपाकर घरातसुद्धा चपला घालून का बसलेत?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 May 2015 - 10:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हॉल घेतलेला म्हणे भाड्यानी. (शुद्ध अर्थानी घेणे धन्यवाद)

यसवायजी's picture

15 May 2015 - 2:34 pm | यसवायजी

भाड्यानी? भाषा कशी सोफेस्टिकटेड पाहिजे.
अरे ने ने.'भाड्याने'.

यसवायजीने पिंचितल्या माणसाला व्याकरण शिकवावं? अरेरे, काय हे दुर्दैव!! ;)

बॅटमॅन's picture

15 May 2015 - 3:00 pm | बॅटमॅन

मराठी भाषेचे पहिले व्याकरण दक्षणेस तंजावरास लिहिले गेले अन तेही संस्कृतात.

सूड's picture

15 May 2015 - 3:14 pm | सूड

लैच!!

बघा बघा. निपाणीचा असलो म्हणून काय जाहले? आम्ही चूक काढूच नये की काय? :p

सूड's picture

15 May 2015 - 3:37 pm | सूड

होय तर काढा की!!

महाराष्ट्राचे मिष्टेका काढणे, जगी जालिया शहाणे
मग का निपाणीकराने, चुका* काढोचि नये!! ;)

*मिष्टेक या अर्थी वाचावे. खिळे का? आंबट चुका का? असले आचरट प्रश्न विचारु नये.

बॅटमॅन's picture

15 May 2015 - 12:49 pm | बॅटमॅन

हीच शंका मलासुद्धा आलेली.

अनन्न्या's picture

14 May 2015 - 5:32 pm | अनन्न्या

थोडक्यात पण मस्त लिहिलय. मलाही पोहोचायला थोडा उशिर झाला, आधीच्या गप्पात फार सामिल होता आले नाही.

बॅटमॅन's picture

14 May 2015 - 6:05 pm | बॅटमॅन

जबराट कट्टा!!!!! एकच नंबर!!!!

बाकी आमचा डुआयडी आम्हांलाच नव्याने दाखवून देणार्‍या जालराजवाड्यांना एक कडक सलाम. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 May 2015 - 10:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जालराजवाडे शब्द प्रचंड आवडला गेलेला आहे.

एकंदरीत पहिलटकरणीचा(पहिल्या कट्ट्याचा)अनुभव माझा एकटीचा नव्हता तर्.त्यामुळेच बरेच जण साळसुदासारखे बोलत होते.

यशोधरा's picture

14 May 2015 - 7:05 pm | यशोधरा

साळसूदासारखे? आँ?

भिंगरी's picture

14 May 2015 - 7:10 pm | भिंगरी

नाहीतर काय.इथे मिपावर तर खेचाखेची कापाकापी चालू असते.

यशोधरा's picture

14 May 2015 - 7:14 pm | यशोधरा

कॉलिंग स्नेहातै!

आता फोटू पाहिल्यावर कट्टा झाला यावर विश्वास ठेवत आहे.
यशो, स्णेहातै भारत भ्रमन करायल्यात म्हने!

यशोधरा's picture

14 May 2015 - 7:48 pm | यशोधरा

असाय काय! त्या तलवार घेऊन सज्ज व्हत्या ना, तवा म्हनलं कापाकापीबद्दल सांगत्याल!

यसवायजी's picture

14 May 2015 - 7:45 pm | यसवायजी

अरे तो सुरुवातीला गृप फोटो काढला होता तो कुणाच्या मोबल्यात आहे?

नूतन सावंत's picture

14 May 2015 - 8:28 pm | नूतन सावंत

कट्ट्याचे वेगवेगळे वृतांत वाचून कट्टयाला हजार असल्याचा अनुभव आला.(खाद्यंती सोडून.)त्यासाठी कोल्हापूरला सदेहच जायला हवे.

श्रीरंग_जोशी's picture

14 May 2015 - 11:44 pm | श्रीरंग_जोशी

तरुण व अविवाहित कट्टेकर्‍यांचे फोटो पाहून अन अनुभव वाचून ईर्ष्या वाटत आहे.
असे वाटते कालचक्र मागे फिरवावे अन विकांतांना कट्टे ट्रेक्स मध्ये सामिल व्हावे. वाटलं तेव्हा दुचाकी नाही तर एसटी किंवा ट्रेनने परगावचे कट्टे अनुभवावे...

गेले ते दिवस... :-(.

किसन शिंदे's picture

15 May 2015 - 9:53 am | किसन शिंदे

जबराट कट्टा वृत्तांत. काही खाजगी कारणास्तव येणं रद्द करावं लागलं. :(

सनईचौघडा's picture

15 May 2015 - 10:12 am | सनईचौघडा

जबरी कट्टा. फणसाचे तळलेले गरे पाहुन तोंपासु.

कविता१९७८'s picture

15 May 2015 - 2:41 pm | कविता१९७८

मस्त वृत्तांत आणि फोटो

मोहनराव's picture

15 May 2015 - 4:29 pm | मोहनराव

चांगला झालाय कट्टा (मळमळ, कळ्क्ळ,.. )

सविता००१'s picture

17 May 2015 - 3:28 pm | सविता००१

आणि सुंदर फोटो