पॅरिस आणि अ‍ॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in भटकंती
24 Apr 2015 - 5:38 pm

मित्रहो, कालच मी पॅरिसला पहुचलो आहे आणि इथे ३ जून पर्यंत मुक्काम आहे. यावेळी अ‍ॅमस्टरडॅमला पण जायचा विचार आहे.
तर मंडळी, पॅरिस आणि अ‍ॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ? पॅरिस मधे Petite Palais अथवा Musée de la Marine सारखे एखादे लहानसे म्युझियम बघता येईल, किंवा Parc de Sceaux अथवा Parc de Saint Cloud सारख्या निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करता येईल.

कोण कोण येणार, हात वर करा.

.
प्रशांत आणि मी: मिपा फोन्तेन्ब्लो कट्टा २०१२

.

.

.
वरील तीन फोटो: Parc de Saint Cloud पॅरिस

.
Petite Palais पॅरिस

.
Parc de Sceaux पॅरिस
-- सर्व चित्रे जालावरून साभार.

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

24 Apr 2015 - 5:49 pm | नावातकायआहे

वडगाव बुद्रुक वरुन कस याय्च वो? :-(

माझे तिकीट , विसा चे तेवढे बघा काका
येतोच आहे :)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Apr 2015 - 5:55 pm | अत्रुप्त आत्मा

सावधान सावधान !!!
नको नको... चित्रगुप्त काका ... इसस्वास ठिऊ णका.

सदर माणूस अशीच मस्स्स्स्स्स्स्स्स तानी आश्वासने (मिळवून)घेऊनंही इथल्याइथे पुण्याला सुद्धा कध्धिही येत नै! :-/
तो थिकडे काय येणार?
===
दू...दू...दू...! पांडू :-/

स्पा's picture

24 Apr 2015 - 5:59 pm | स्पा

पुणे आणि प्यारीस काही फरक आहे कि नाही मला सांग

मोहनराव's picture

24 Apr 2015 - 6:09 pm | मोहनराव

तु कुठं हायस नक्की!!
http://www.misalpav.com/comment/688714#comment-688714

श्रीरंग_जोशी's picture

24 Apr 2015 - 11:37 pm | श्रीरंग_जोशी

.

टिपः या चित्राचा अन वरील प्रतिसादांच संबंध असेलच असे नाही.

पॅरिस / अ‍ॅमस्टरडॅम कट्ट्याला शुभेच्छा!!

स्पा's picture

25 Apr 2015 - 7:20 am | स्पा

लोल =))

क्लिंटन's picture

25 Apr 2015 - 4:21 pm | क्लिंटन

उकाड्यामुळे मुंबई जर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये सूर्याजवळ ७५% अंतरावर असेल तर मग थंडीमुळे मिनिईपोलिस कुठे असेल रे? मला वाटते ते सूर्याच्या विरूध्द दिशेला पृथ्वीपासून बरेच दूर असेल--बहुदा गुरू आणि शनीच्या मध्ये, बरोबर ना? विशेषतः जानेवारी-फेब्रुवारीमध्ये :)

श्रीरंग_जोशी's picture

26 Apr 2015 - 8:28 am | श्रीरंग_जोशी

गेल्या हिवाळ्यातली ही बातमी आठवली...

How cold is it? Minnesota temps cooler than daily temperatures on Mars

अत्रुप्त आत्मा's picture

24 Apr 2015 - 7:11 pm | अत्रुप्त आत्मा

@फरक आहे कि नाही मला सांग >> हलकट...... पांडू! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/mocking-with-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif

>>इथल्याइथे पुण्याला सुद्धा कध्धिही येत नै!

कसा येईल? स्पावड्या आलाय म्हटल्यावर तुमच्या आनंदाला जे काही उधाण येतं त्याचा धसका घेतला असेल त्याने!!

सुबोध खरे's picture

24 Apr 2015 - 8:41 pm | सुबोध खरे

पान्डूबा
तिकडे कोल्हापुरास जातो म्हणालात
मग इकडे प्यारीसला कशे जाणार?

..रात्री जरा उशिरा चालत असेल आणि तुम्ही मस्त लोकल अन्न मिळणार्‍या ठिकाणी जेवायला नेणार असाल तर येतो.

.डिनर अन रात्री भटकणे याचे किती ड्यामेज व्हावे? ;)

चित्रगुप्त's picture

25 Apr 2015 - 1:19 am | चित्रगुप्त

रात्री जरा उशिरा चालत असेल आणि तुम्ही मस्त लोकल अन्न मिळणार्‍या ठिकाणी

चालेल चालेल, रात्री मस्त खायला 'सँ मिशेल' ला भरपूर मिळेल.

खटपट्या's picture

25 Apr 2015 - 1:40 am | खटपट्या

शुभेच्छा !! फोटू आणि व्रुत्तांत टाका...

ब़जरबट्टू's picture

25 Apr 2015 - 4:05 pm | ब़जरबट्टू

नाही.

शशिकांत ओक's picture

25 Apr 2015 - 5:17 pm | शशिकांत ओक

बरीच गर्दी झाली आहे. हे ही नसे थोडके! मजा भेटी पेक्षा भेटीसाठी जाण्यासाठीच्या धावपळीत आहे.
अहो त्या पंजाबात घडलेल्या मराठी साहित्य संमेलनातही मौजे खातर गेलेल्या शौकिनांना खरी सम्मेलनाची मज्जा रेल्वेच्या प्रदीर्घ प्रवासात आली म्हणतात...

येण्याची मनापासुन इच्छा आहे.. पण इथवर फक्त इच्छेवर पोहचताच येणार नाही ..

कधी एकदा युरोप ला फिरायलाला मिळेल काय माहीत ?

नगरीनिरंजन's picture

27 Apr 2015 - 8:15 pm | नगरीनिरंजन

जीवन में एक टैम जाना ऐमस्टरडैम। =))

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 May 2015 - 2:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

फोटो जरुर टाका बर्का!!

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 10:14 pm | चित्रगुप्त

अत्रंगी पाऊस लवकरच पॅरिसास येत आहेत, शिवाय एक वाचनमात्र असलेले मिपाकर कालच भेटले आहेत, त्यामुळे पॅरिस कट्ट्याची शक्यता वाढत आहे. आणखी आहेत का कुणी ? २ जून चे आधी ?

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 10:34 pm | टवाळ कार्टा

बॅग भरलेली आहे...तिकिट पाठवता कै? ;)

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 10:43 pm | चित्रगुप्त

तिकीट पाठवतो, तेवढा क्रेडिट कार्डाचा लंबर द्यावा.

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 10:45 pm | टवाळ कार्टा

कार्ड बिर्ड आमी नाय वाप्रत...पोतं भरून नोटा छापून आणु का ;)

अत्रन्गि पाउस's picture

24 May 2015 - 3:53 am | अत्रन्गि पाउस

उद्या सकाळी मी आणि चित्रगुप्त साहेब पॅरिस मध्ये भेटत आहोत ...आणखीन कुणी येतंय का ?? असल्यास +33 755 989 352 वर मला कॉल करा ...

श्रीरंग_जोशी's picture

24 May 2015 - 3:58 am | श्रीरंग_जोशी

पॅरिस कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!!

फोटो आणि वृत्तांत येउद्या.