क्षणभर कल्पना करा आणि शक्य झाला तर त्या कल्पनेत ४-५ तास घुसून राहा ...... आणि विचार करा तुमचे जगभरात पसरलेले आपला एकेक शब्द झेलणारे लाखो चाहते ... स्वत:च्या हिमतीवर कमवलेले ४०० -५०० कोटी रुपये आणि अजून तितकेच किंबहुना त्याहून जास्त कमवायची क्षमता ... पैशाने विकत मिळणारे कोणतेही सुख उपभोगायचे शिल्लक नाही किंवा पुढच्या ७ पिढ्यांना एक रुपया कमवायची गरज नाही इतके आर्थिक स्थैर्य ...उत्तम तब्ब्येत मोट्ठे कुटुंब ..एकोप्याने राहणारे ...
अशा वेळेला तुम्ही नाही पण तुमच्या एखाद्या जिवलगाने किंवा मित्राने काही मोठा झोल केला ... तर तुम्ही पैशाच्या जोरावर हे आपण दाबून टाकू असा विचार सुद्धा तुमच्या मनात येणार नाही ???
भारतासारख्या समाजव्यवस्थेत आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे सलमान सारखे वागू शकतो ..किंबहुना माणसे मारणे वगैरे नसेल कदाचित पण लहान मोठ्या प्रमाणात ..आपण तसे वागतोही ...
आत्ताच अमेरिकेत सेट्ल झालेय एका मित्राची chat आली कि अरे अमेरिकेत सुद्धा पैशाच्या जोरावर उत्तम वकील मिळवून सुटण्याची शक्यता खूप जास्त असते ...
त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे घडतंय .. ते समाज म्हणून आपल्याला हवय आणि ते आपल्यापैकी बहुतांश लोकांना मान्यसुद्धा आहे ..हे एकदा जाणले कि ...मग आता पुढे काय ह्याचा ठोस विचार करायला हरकत नाही ...
प्रतिक्रिया
9 May 2015 - 1:52 am | रेवती
अमेरिकेत सुद्धा पैशाच्या जोरावर उत्तम वकील मिळवून सुटण्याची शक्यता खूप जास्त असते ...
हे हे हे. अगदी खरे.
9 May 2015 - 5:22 am | अत्रुप्त आत्मा
आसन क्रमांक - 2
9 May 2015 - 6:26 am | जेपी
आसन क्रमांक -3
9 May 2015 - 8:18 am | अरुण मनोहर
मान ना मान,
हम सब सलमान!
9 May 2015 - 8:47 am | अप्पा जोगळेकर
चुकीच्या गोष्टींचे निर्लज्ज समर्थन. हल्ली ही एक नविन प्रथा आहे.
गेल्या महिन्यातिल गोष्ट. देसाई गाव, डोंबिवली येथे एका मर्डर केलेल्या आणि जामिनावर बाहेर आलेल्या २२ वर्षीय तरुणाचा स्टेजवर सत्कार करण्यात आला. हळदीमध्ये त्याच्यासाठी स्पेशल गाणे वाजविण्यात आले. खांद्यावर उचलून नाचवले गेले. अर्थात हे कुठेही छापून वगैरे आलेले नाही. लिहिण्याचा उद्देश इतकाच की तुम्ही देखील याच पंथातले दिसता.
9 May 2015 - 9:43 am | तिमा
अहो अप्पा,
त्यांनी ते उपरोधिक लिहिले आहे. आणि समाजातला एक मोठा वर्ग तसे वागतही आहे, ही वस्तुस्थिती आहे.
9 May 2015 - 2:03 pm | पगला गजोधर
बरोबर आहे, अन अनादीकालापासून भारतात अश्या प्रवृत्ती आहेत, माझ्या ऐका मिपा वरील कथेत (जय मनुबाबा) मध्ये, मला तुमच्या मता सारखेच कथन करायचे होते.
9 May 2015 - 1:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तिमा ताई? =))
तिमा स्टँड्स फॉर तिरशिंगराव माणुसघाणे. दादा हायती ते पग साहेब.
9 May 2015 - 2:07 pm | पगला गजोधर
आधीची प्रतिक्रिया जेन्डर न्युट्रल अशी संपादित केली आहे.
9 May 2015 - 9:49 am | चित्रगुप्त
बळी तो कान पिळी, जिसकी लाठी उसकी भैस, वगैरे म्हणीतून व्यक्त होणारी ही परिस्थिती मानवी इतिहासात वारंवार अनेक रूपात प्रकट होत आलेली आहे, तरीपण पैश्याच्या शक्तीपेक्षाही सद्विवेक बुद्धीची, न्याय-व्यवस्थेची शक्ती मोठी असते, हे या मस्तवालांना वेळोवेळी दाखवून देणे अतिशय आवश्यक असते. हे कार्य करणारे खरे समाजाचे दीपस्तंभ. काही शिकावे, प्रेरणा घ्यावी, ती अश्या कर्तव्यनिष्ठ लोकांपासून.
9 May 2015 - 1:14 pm | अत्रन्गि पाउस
आपले ...
दुर्दैवाने विकास आमटे स्टेज वर जाऊन आर्थिक मदतीची हाक देतांना दिसतात ... आणि सलमानच्या घरासमोर जल्लोष असतो हीच तर शोकांतिका आहे ...
फेसबुक वर एक पोस्त आहे कुणाचीतरी ...'समाज नासत चाललाय'..
9 May 2015 - 10:04 pm | मास्टरमाईन्ड
कारण लोकांना (काही सन्माननीय अपवाद सोडल्यास) खरंच कुणाला मदत करायची नसते. फकत समाजसेवेची ष्टाईल मारायची असते. जी BEING HUMAN (?) चा टी शर्ट घालून मारता येते
9 May 2015 - 10:53 pm | काळा पहाड
सलमानच्या घरासमोरचा जल्लोष हा एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी केलेला होता.
9 May 2015 - 11:18 pm | खंडेराव
फेसबुकावर तुम्ही म्हणतात त्या विशिष्ट समाजातले जे आहेत. त्यांच्या काही दिसल्या नाही प्रतिक्रिया, उलट ईतरांच्याच डझनभर दिसल्या, सलमान कसा देवमाणुस आहे. आणि त्याला भेटायला गेलेले काय फक्त जातवाले नव्हते त्याचे.
9 May 2015 - 11:04 am | द-बाहुबली
जे सुइ... सल्लमॉण ?
अरारा :(
9 May 2015 - 11:05 am | मृत्युन्जय
पहिली गोष्ट म्हणजे जनक्षोभ हा न्यायप्रक्रियेतील अक्षम्य विलंबाबद्दल आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे न्यायव्यवस्था सडकी आणि किडकी आहे असे लोकांचे मत झाल्यामुळे तसे आहे (मी असे म्हणतो असे मी म्हणत नाही).
तिसरी गोष्ट म्हणजे पैसा आला म्हणजे पाठोपाठ माज आणी न्यायव्यवस्थेबद्दल अनादर यायलाच हवा असे नाही. शिवाय पैसा मला कायदा तोडण्याची मुभा देतो असे काही नाही. एक सलमान खान आहे (अजुन हजारो असतील) तसाच अमाप पैसा मिळवुनही नम्र आणि सज्जन राहिलेला सचिन तेंडुलकर देखील आहे. आपण सलमानकडे बघुन "मी ही कदाचित हेच केले असते" असे म्हणायचे की सचिनकडे बघुन "मलाही असेच वागायला आवडले असते" असे म्हणायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.
9 May 2015 - 12:53 pm | अत्रन्गि पाउस
बाकी सगळे ठीक आहे पण फेरारी चा कर चुकवलाच कि .. आपली सामाजिक मानसिकता हीरोचे गुन्हे चुका माफ करण्याची आहे (बहुतांश)
9 May 2015 - 12:59 pm | मृत्युन्जय
फेरारीचा कर अजिबात चुकवलेला नाही. करमाफीसाठी अर्ज केला होता. करमाफी मिळाली नाही तेव्हा तो कर फेरारी कंपनीने सचिनतर्फे भरला. कायदेशीर मार्गाने योग्य त्या सवलती मिळवणे किंवा मिळवण्याचा प्रयत्न करणे यात काहिही बेकायदेशीर कृत्य केले गेलेले नाही.
9 May 2015 - 1:11 pm | अत्रन्गि पाउस
हाच तर मुद्दा आहे ...
तो हिरो आहे ...त्याला अधिकार आहे ...आणि ते सगळे मान्य आहे अशीच आपली मानसिकता आहे ...
सामान्य लोकांना भारतात साधीशी सवलत कायदेशीर मार्गाने देखील मिळण्याची शक्यता नसते ...
तो कर फेरारी कम्पनीने सचिनतर्फे भरला तर ते सचिनचे उत्पन्न होत नाही का ??
मूळ मुद्दा तो नाही ...
मुद्दा असा कि आपण ' गडगंज श्रीमंत असू तर ' काहीही करू शकू हा बहुजनमान्य विचार आहे ..हे खरे कि नाही
9 May 2015 - 3:37 pm | असंका
फेरारी त्याला बक्षिस मिळाली होती ना? की त्याने विकत घेतली होती?
10 May 2015 - 12:22 pm | फारएन्ड
मृत्युंजय यांनी लिहीलेल्या मुद्द्याचा तुम्ही नक्की काय प्रतिवाद केला आहे "हाच तर मुद्दा आहे" म्हणून, ते समजले नाही. सचिन ला जर ती सवलत दिली गेली असती तर हीरो लोकांना स्पेशल ट्रीटमेण्ट वगैरे मुद्दा लागू झाला असता. ती दिली गेली नाही हे योग्यच झाले. पण त्याने निव्वळ तशी मागणी करण्याने सचिन चा रोल मॉडेल म्हणून विषय निघाल्यावर विचारण्याएवढा तो मोठा मुद्दा होऊ नये, व सचिन ला काही स्पेशल ट्रीटमेण्ट "मिळाली" असा समज होऊ नये. ते उदाहरण येथे लागू होत नाही.
10 May 2015 - 12:44 pm | पगला गजोधर
फारएन्ड सर तुमच्या स्टैलने चित्रपटाची परीक्षणे लिवाना,अपुन फ्यान हाये तुमच्या मिपावरील परीक्षनांचा ..... क्रांती वरचे परीक्षण वाचून, आग आयाया ... हसूच आवरत नव्हते ......प्लीज येवू देणा मिपावर अजूनकाही .....
:)
9 May 2015 - 11:10 am | पिवळा डांबिस
कुठल्याही देशी विषयावर जाता जाता अमेरिकेला दोन शिव्या द्यायची मिपा संस्थळावरची भिकार*ट परंपरा सांभाळल्याबद्द्ल मंडळ तुमचे आभारी आहे! :)
बॉस्टन मॅरेथॉन बॉम्बिंग २०१३ मध्ये झालं. २०१५ च्या सुरवातीमध्ये त्याच्या खटल्याचा निकाल लागून गेला.
आता करा सलमानच्या खटल्याशी तुलना!!!!
कोण कुठला तुमचा तो फोकलीचा मित्र, आणि त्याची तुम्हाला चॅट आली म्हणुन तुम्ही सार्वजनिकरित्या अमेरिकेला प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे दोष देताय! हे करायला एक स्पेशल उद्धटपणा लागतो!!!!
(आता होऊं द्या सुरवात! तुमच्या या धाग्यावर किमान १०० प्रतिसादांची मी सोय करून दिली आहे!!!!)
9 May 2015 - 1:03 pm | अत्रन्गि पाउस
माझ्या लिखाणात भिकार*ट परंपरा / फोकलीचा मित्र वगैरे शिव्या वगैरे अजिबात नाहीत ... त्या तुम्ही देताय ...आणि अमेरिकेत सेट्ल झालेल्या मित्राची चॅट उधृत करणे ह्यात 'उद्धट पण' कसा काय ?? तो तिथला नागरिक आहे आणि ते त्याचे मत आहे ...
न्याय प्रक्रियेतील विलंब हा भाग वेगळा पण .. मजबूत पैसे मोजून शक्य तेवढे गुन्हे न्यायालयात माफ करून घेणे हे अमेरिकेत होते कि होत नाही ? ( मला स्वानुभव नाही ..म्हणून हा प्रश्न ...तिरकस टोमणा वगैरे नाहि ...)
बाकी 'देशी विषय' वगैरे उल्लेख आणि त्या मागील भावना पोहोचली ..
असो ...
9 May 2015 - 1:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मुक्तपीठ वाचत चला. परदेशवारीचे लेख आले की कसं धुतलं जातं लेखकाला ते कळेल.
9 May 2015 - 2:19 pm | अत्रन्गि पाउस
इथे उलटी गंगा आहे
9 May 2015 - 1:05 pm | सतिश गावडे
खाल्ल्या मिठाला कसं जागावं हे आमच्या उत्तर भारतीय देशबांधवांनी तुमच्याकडून शिकायला हवं.
9 May 2015 - 1:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आमच्या न्यु जर्सीच्या शिरिषने त्या रजत गुप्ताचे उदाहरण दिले.त्या मॅकिन्सीच्या रजतकडे पैसा,अडका प्रचंड.दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे पण शेवटी जेलमध्ये पाठवलाच दोन वर्षांसाठी.
9 May 2015 - 2:24 pm | अत्रन्गि पाउस
निकाल एक गोष्ट आहे पण तो सुटावा हि अनेकांची इच्छा होतीच ... त्याच्यासाठी जगातील 'कोणाचे कोण' (whos who) लोकांनी पराकाष्ठेची रदबदली केली होतीच ...
मुद्दा मानसिकतेचा आहे ...
9 May 2015 - 3:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
जगातल्या सर्वच देशांना,तेथील व्यवस्थांना तू एकाच पंक्तीत बसवतो आहेस तर.बसव हो.
अफगाणिस्तान्,पाकिस्तान.. येथील मानसिकता देखील आपल्यासारखीच आहे..ह्याचीही उदाहरणे घ्यावीत असा ह्यांचा आग्रह.
9 May 2015 - 3:45 pm | अत्रन्गि पाउस
चर्चा भरकटते आहे ...
मूळ मुद्दा भारतीय मानसिकतेचा आहे ... अमेरिकेतील फक्त एक उल्लेख आहे ..
आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ..पुढे सुदान येमेन वगैरे आणायचे आहे का ???
9 May 2015 - 4:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
स्वतःची,आपल्या नातलगांची कातडी वाचावी ही नैसर्गिक इच्छा जगभर आहे.असते.त्यात विशेष ते काय?
कशावरून ? गेल्या ५० वर्षांच्या तुलनेत समाज अधिक बथ्थड झाला आहे हे मान्य पण संवेदनशीलता अगदीच संपली आहे अशातला भाग नाही.
9 May 2015 - 6:21 pm | अत्रन्गि पाउस
हे मान्य पण संवेदनशीलता अगदीच संपली आहे अशातला भाग नाही.
पण किती झपाट्याने घसरतो आहोत ...अशाने पुढच्या १० वर्षात काय होईल ??
9 May 2015 - 10:46 pm | सतिश गावडे
याला आमचा रिचर्ड डॉकिन्स स्वार्थी जनुक म्हणतो.
10 May 2015 - 5:52 am | नगरीनिरंजन
तुमचा? कधीपासून तुमचा झाला म्हणे रिचर्ड डॉकिन्स? :-)
10 May 2015 - 12:02 pm | सतिश गावडे
तो विनोद निर्मितीचा क्षीण प्रयत्न होता. फसला. :(
10 May 2015 - 12:17 pm | नगरीनिरंजन
चालायचंच. तुम्हाला "आमचा लाडका" असं म्हणायचं होतं बहुतेक.
10 May 2015 - 12:32 pm | सतिश गावडे
ते माईंच्या "आमचे हे" च्या चालीवर "आमचा रिचर्ड डॉकिन्स" असे म्हणायचे होते. मात्र त्यातून वेगळाच अर्थ ध्वनित होतो हे प्रतिसाद टाकून झाल्यावर लक्षात आले =))
10 May 2015 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
माईंचे "आमचे हे..." टाईपचे प्रतिसाद वारंवार वाचल्याने असे होते असे माईच्या ह्यांचे मत आहे, असे समजते ;)
10 May 2015 - 12:30 pm | सतिश गावडे
खरं पाहता. (अॅक्च्युअली)
10 May 2015 - 12:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
स्वार्थी जनुकामुळे त्यांनी आमचा म्हणलं आहे. मुद्दा प्रुव्ह्ड.
11 May 2015 - 11:17 am | गॅरी ट्रुमन
अमेरिकेत पापभीरू आणि कायदेभीरू सामान्य माणसाला अजिबात घाबरायची गरज नाही पण भारतात मात्र कायदे पाळणार्या सामान्य माणसापुढे अडचणीच असतात.या कारणासाठी (आणि इतरही अनेक कारणांसाठी) मला अमेरिका प्रचंड आवडते आणि संधी मिळाल्यास आजही मला अमेरिकेत अगदी आनंदाने जायला आवडेल.
तरीही अमेरिकेतही पैसा/पद याच्या जोरावर निर्णय अजिबात बदलता येत नाहीत असेही नाही. सप्टेंबर २००८ मध्ये लेहमन ब्रदर्स कोसळली तेव्हा हेन्री पॉल्सन ट्रेजरी सेक्रेटरी (अर्थमंत्री) होते. ते अर्थमंत्री होण्यापूर्वी गोल्डमन सॅक्सचे सी.ई.ओ होते. आणि लेहमन ब्रदर्स कोसळू दिली यात गोल्डमन-लेहमन यातील कॉर्पोरेट चढाओढीचा काहीच भाग नव्हता का? हे न्यायव्यवस्थेशी संबंधित नसले तरी पैसा आणि पद यांच्या जोरावरचा माज आणि निर्णयावर त्याचा पडलेला प्रभाव याचे द्योतक नाही का?
(पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन
11 May 2015 - 2:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अगदी योग्य बोललास रे ट्रुमना. समजा हॉलिवूडच्या नटाने एकाला पदपथावरून चालणार्या माणसाला चिरडले तर नटाला शि़क्षा होउ नये म्हणून त्याच्या घराभोवती लोक जमतील प्रार्थना करायला ?राजकीय नेते पैसे मागायला जातील?
("आम्ही सारे जॉर्ज क्लूनी" असा धागा निघेल का ? असा ह्यांचा सवाल!).
9 May 2015 - 1:08 pm | नीलमोहर
नावाची एक गोष्ट आहे, जी खुप कमी लोकांकडे असते,
पण ज्यांच्याकडे असते ते असले विचार कधीच करत नाहीत..
9 May 2015 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
अमेरिकेत सुद्धा पैशाच्या जोरावर उत्तम वकील मिळवून सुटण्याची शक्यता खूप जास्त असते ...
नक्कीच ! कारण पृथ्वीवरच्या सर्व देशांत (-क्रसी कोणती का असेना, पण) माणूस नावाच्या प्राण्याचेच राज्य असते, नाही का ?!
पण अशी उदाहरणे किती संख्येनी आणि किती बेदरकारपणे मिळू शकतील यावर "कायद्याचे राज्य आहे की नाही ?" या वर्णपटात त्या देशाचे स्थान ठरते !
9 May 2015 - 3:36 pm | अवतार
सहमत
9 May 2015 - 3:47 pm | अत्रन्गि पाउस
वर माईन्ना म्हटले तसे अमेरिकेचा फक्त उल्लेख आहे तो मूळ मुद्दा नाहीये ..
मूळ मुद्दा भारतीय मानसिकतेचा आहे ...
9 May 2015 - 7:39 pm | प्रथम म्हात्रे
पैसा बोलता है।
9 May 2015 - 8:30 pm | सुबोध खरे
The law is a system that protects everybody who can afford to hire a good lawyer. – Mark Twain.
सलमानचा जमीन या धाग्यावर श्री विकास यांनी टाकलेला प्रतिसाद
9 May 2015 - 11:25 pm | खंडेराव
मध्यंतरी झालेला एक कार अपघात आठवतोय? मुकेश अंबानींची २-४ कोटींची महागडी गाडी..दोन गाड्या उडवल्या.
http://www.forbes.com/sites/naazneenkarmali/2014/01/02/the-curious-incid...
सलमानच्या केस मधे २-३ वगळता बाकी साक्षिदार नीट होते म्हणुन तो किमान गुन्हेगार सिद्ध झाला, वरची तर बातमीही नव्हती मुख्य मिडियामध्ये..
10 May 2015 - 1:45 am | अत्रन्गि पाउस
इतकेच म्हणूयात
11 May 2015 - 3:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
खंडेराव, सगळ्या बातम्या छापल्या जात नाहीत.७०च्या दशकात राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्याने हाजी मस्तान की करीम लाला ह्याच्या एका ईमारतीचे भूमीपूजन केले होते.कुठे आली बातमी तेव्हा?१९९२च्या दंगलीआधी राजकीय पक्षाच्या अनेक सुभेदारांची दाउद्,वरदराजनबरोबर ईमारत्,दारूच्या धंद्यात भागीदारी असायची.
11 May 2015 - 10:43 am | प्रशु
सहमत
आपण सगळे उक्तित "सलिम खान" असतो आणि कृतित "सलमान खान"
14 May 2015 - 3:54 pm | निनाद मुक्काम प...
अमेरिकेत सुद्धा पैशाच्या जोरावर उत्तम वकील मिळवून सुटण्याची शक्यता खूप जास्त असते ...
अगदी अगदी
वकील असावा तर असा
15 May 2015 - 12:59 pm | शि बि आय
जिथे पैसा आणि भौतिक सुखाला जास्त महत्त्व असते तिथे पैसे दिले कि काम होतेच.. आणि दुर्दैवाने आपल्या न्याय व्यवस्थेने ते सिद्ध आहे.
आता सलमान ह्या परिस्थिथितही सुटतो तर आपण का नाही ?? आणि त्यामुळेच सहारा परिवारचे सुब्रोतो रोय आणि आसाराम बापूचे पोट दुखू लगाले आहे. आता प्रत्येक आजाराची गोळी वेगळी असते, सलमानच्या सुदैवाने त्याला ती गोळी मिळाली. बापू आणि सुब्रोतो ती शोधत आहेत. सामान्य मनुष्य अशी गोळी पुरेसे पैसे,वेळ आणि सत्ता नसल्यामुळे घेउ शकत नाही आणि शिक्षा भोगत राह्तो.
15 May 2015 - 3:55 pm | निनाद मुक्काम प...
भारतात पूर्वी देशासाठी तुरुंगवास भोगून बाहेर येणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना जनता हार तुरे घालून स्वागत करायची.
अमेरिकेत सेलेब्रेटी बेकायदेशीर कृत्ये करून तुरुंगवास भोगून बाहेर आल्यावर त्याचे विजयी वीरांच्या सारखे स्वागत केले जाते.
हेच लोण भारतात पसरले आहे.
2 Jan 2016 - 4:51 pm | अक्षय१
सहमत .पण रवि पाटीलचे काय चुकले ?त्याला एवढी मोठी किंमत का चुकवावी लागली ?म्हणजे देशात पोलिसपण सुरक्षित नहि. सलमानने देशासाठी काय भरीव केल आहे ? रवि पाटील सिस्टिम मधलाच माणूस होता ना . त्याच्याच खात्यातील लोकांनी त्याची मदत का केली नाहि?
5 Jan 2016 - 12:15 am | गामा पैलवान
अक्षय१,
मुंबई पोलीस व्यवस्थितपणे माफियांना विकले गेलेले आहेत. संजय दत्त, सलमान खान वगैरे नटांवर माफियांचे कोट्यावधी रुपये गुंतलेले असतात. यांना तुरुंगात ठेवणं माफियांना परवडत नाही. य:कश्चित रवींद्र पाटील त्यांच्या दृष्टीने कीस झाडकी पत्ती आहे. भले तो पोलीस असेना.
आ.न.,
-गा.पै.
4 Jan 2016 - 12:09 am | बोका-ए-आझम
There is a little bit of wh$%& in all of us. Gentlemen, what's your price?
4 Jan 2016 - 6:46 pm | हेमंत लाटकर
आपल्या देशात राजकारणी, हिरो, क्रिकेटर यांना सर्व सवलती, सेवा सुविधा व गुन्हे केले तरी पैशाच्या जोरावर सहज सुटका होते.
पण प्रकाश आमटेना मदतीसाठी आवाहन करावे लागते. महाराष्ट्राची एवरेस्ट कन्या कृष्णा पाटीलला आर्थिक मदत एकाही राजकारण्यांनी, उद्योगपतींनी मदत केली नाही. शेवटी तिने सारस्वत बॅंकेतून 30 लाखाचे कर्ज काढून एवरेस्टवर विजयी चढाई केली. सारस्वत बॅंकेने 30 लाखाचे कर्ज व्याजासहित माफ करून कृष्णा पाटीलचा गौरव केला. नंतर मात्र महाराष्ट्रातील राजकारणी तिचा सत्कार करण्यासाठी पुढे आले.
5 Jan 2016 - 7:06 am | सौन्दर्य
"अशा वेळेला तुम्ही नाही पण तुमच्या एखाद्या जिवलगाने किंवा मित्राने काही मोठा झोल केला ... तर तुम्ही पैशाच्या जोरावर हे आपण दाबून टाकू असा विचार सुद्धा तुमच्या मनात येणार नाही ???"
१) असा विचार नक्की येणार. पण त्यानुसार कृती करेनच असे नाही. पुन्हा हा 'मोठा झोल' किती मोठा आहे ह्यावर पुढची कृती अवलंबून असेल. मित्र जिवलग आहे त्यामुळे (मित्राच्या जागी 'जवळचा नातेवाईक' असे वाचले तरी चालेल) हा विचार आणखीनच प्रबळ होईल.
२) समजा ह्या जिवलग मित्राने कुणाचा खूनच केलाय, तरी देखील जवळ पैसे असल्यामुळे त्याला जामीनीवर सोडविण्याची, त्याला चांगला वकील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीनच. माझ्या मते गुन्हेगाराने स्वता वरच्या गुन्ह्याची अगदी कबुली दिली तरी देखील खटला उभा केल्याशिवाय त्याला शिक्षा होत नाहीच. मग अश्यावेळी त्याला जामीनीवर सोडविण्यासाठी स्वता जवळचे पैसे खर्च केले तर त्यात वाईट काय ?
अत्रंगी साहेब, मी तुमच्या मताशी सहमत आहे. आपल्या पैकी बहुतेक जण अगदी पैशाच्याच जोरावर असे नाही म्हणत मी, पण अधिकाराच्या जोरावर, वडीलकीच्या जोरावर, किंवा भावनिकदृष्ट्या आपले वजन वापरून अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला वाचवायची खटपट करतोच.
11 Jan 2016 - 6:25 pm | होबासराव
भेंडी* हा बाबा चांगल्या वर्तणुकिच्या कारणास्तव लवकर सुटतोय.
बापाच्या पुण्याईमुळे आणि बापाने त्यावेळेस च्या सरकार पक्षातल्या लोकांचे उंबरठे झिजवल्याने ह्याच्यावर फक्त prohibited aamunition acts अंतर्गत गुन्हा दाखल झाला, फक्त एव्ह्ढ्याच करता म्हणालो कि संजुबाबा पेक्षा ह्या कटाचि कमि माहिति असणारे अजुनहि आर्थर रोड आणि नागपुर जेल मध्ये सडताहेत १९९४ पासुन. त्यानंतर हि हा सुधरला नाहिच ...श्रियुत महेश मांजरेकर, संजय गुप्ता आणि संजुबाबा चा फोन intercept करण्याता आला होता छोटा शकिल ला केलेला.
ID Dicsovery वर काहि खरच छान प्रोग्राम असतात सत्यकथे वर आधारित ते पाहिल्या वर कळत साला अमेरिका अमेरिका का आहे म्हणुन्..न्याय justice कशाला म्हणतात. काल Gerald Parker ची केस बघत होतो एका निर्दोष माणसाला circumstantial evidence च्या आधारे आपल्याच पत्नि ला जिवे मारण्याच्या आणि तिच्या पोटातल्या अर्भकाच्या हत्येच्या आरोपाखालि जन्मठेपेची शिक्षा होते. ज्यावेळेस त्याला शिक्षा होते त्यावेळेस DNA तंत्रज्ञान तेव्हढे विकसित नव्हते पण १६ वर्षाचि शिक्षा भोगल्यानंतर अतिशय नाट्यमयरित्या DNA तंत्रज्ञानामुळेच खरा गुन्हेगार पकडला जातो आणि जो निर्दोष होता त्याचि सुटका होते सरकार त्याला साडे सहा लाख डॉलर compensation म्ह्णुन देते त्याच्या १६ वर्षाच्या कैदेच्या बदल्यात.
11 Jan 2016 - 6:50 pm | होबासराव
In January 1999, Parker was sentenced to death by lethal injection, plus life without possibility of parole, plus 64 years in prison.
ह्याला म्हणतात शिक्षा.
11 Jan 2016 - 10:12 pm | नगरीनिरंजन
हे सार्वत्रिक आणि सर्वकालिक आहे.
अमेरिका असो की भारत. न्याय-अन्याय या कल्पना अतिशय लवचिक असतात. २००८ मध्ये अमेरिकेत बर्नि मॅडॉफला शिक्षा झाली कारण त्याने श्रीमंतांचे पैसे बुडवले. बाकी बेजबाबदारपणे मध्यमवर्गीय लोकांचे पैसे बुडवणारे सुटले आणि वर त्यांनाच खिरापत वाटली. अर्थात मध्यमवर्गीयही लुच्चेच. मिळतेय घरावर लोन तर घ्या म्हणून घेतले.
भारतात हे आणखी अगदीच रानटी लेव्हलवर आहे आणि लोकांचा मात्र सारे जहाँ से अच्छाचा गजर वगैरे. हास्यास्पद आणि खतरनाक.
12 Jan 2016 - 2:23 am | बहुगुणी
सलमानचं प्रकरण आणि इतर अशीच उदाहरणं पाहून सांपत्तिक भोगवादातून जन्माला आलेल्या affluenza ची आठवण होते. The term "affluenza" has ....been used to refer to an inability to understand the consequences of one's actions because of financial privilege.