देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?

ग्रेटगणेश's picture
ग्रेटगणेश in काथ्याकूट
30 Apr 2015 - 12:14 pm
गाभा: 

देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?
(सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.)

आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण ते मुलं ज्या वातावरणाचा भाग असतं, त्या वातावरणाचे प्रतिबींब त्याला मातृभाषेत, तीच्या शब्दांत दिसत असतं. ते मुल त्याचा अनुभव घेऊ शकतं, त्यातील साम्य किंवा विरोधाभास त्याला जाणवत राहातो व त्यातूनच पुढे ते मुल 'असं का?' हा विचार करायला लागतं. हे इंग्रजी भाषेतील शिक्षणात अभावानेच होताना आढळतं. ‘A’ म्हणजे Apple हे ते मुल शिकते ते घोकंपट्टीने पण ते ‘अॅपल’ त्याला आपल्या वातावरणात पुस्तक आणि ते विकणारा भय्या यांच्या व्यतिरीक्त कुठेच आढळत नाही. या उलट आंबा ते झाडावर पाहू शकतं. मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते.

या पार्श्नभूमीवर नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या मराठी चित्रपटातील एक प्रसंग विचार करण्यास लावणारा आहे. चित्रपटात डॉ. आमटेंचे सहकारी आदीवासी मुलांना शिकवायचा प्रयत्न करतात असे दृष्य आहे. मुल त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार एकमेकांत मजा करण्यात गुंतली आहेत. शिक्षक काय शिकवतायत आणि ते काय बोलतायत याकडे मुलांच अजिबात लक्ष नाहीय कारण त्यांच्या दृष्टीने काहीतरी अगम्य असे शिक्षक बोलत आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते त्यांनी कधीच पाहिलेलं वा अनुभवलेलं नाहीय. शेवटी कंटाळून ती मुल शाळेतून सुंबाल्या करण्याची सुरुवात करतात तेंव्हा डॉ. आमटे शिक्षकांना सांगतात की अरे त्या मुलांना त्यांच्या शब्दांत, त्यांना समजेल अशा भाषेत शिकव. या प्रसंगाला थिएटर मध्ये मोठा हशा (लाफ्टर) मिळतो व हा प्रसंग विनोदी प्रसंग म्हणून जमा होतो. उद्या हा प्रसंग एखाद्या पुरस्कारासाठी 'सर्वात चांगले विनोदी दृष्य' म्हणून नॉमिनेट झाले तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही कारण आपण आता या विनोदी प्रसंगाचे अविभाज्य भाग झालो आहोत.
इंग्रजी वा इतर कोणतीही भाषा व्यक्तीनत्व विकासासाठी हातभार लावते यात कोणतीही शंका नाही. पण ती श्रेष्ठ आणि आपली भाषा मागासलेली हा विचार मात्र कोतेपणाचा आहे. इंग्रजी भाषेत महान ग्रंथसंपदा निर्माण झाली, निरनिराळे शोध लागले, औद्यागीक क्रांती झाली याचं श्रेय नि:संशय त्या भाषेचंच आहे. पण हे सर्व लेखक, कवी वा शास्त्रज्ञ यांची 'मातृभाषा' इंग्रजी किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे आपण लक्षात घेत नाही. परकीय भाषेत संपूर्ण शिक्षण घेऊन एखाद्याने एखादा मोठा शोध लावला व तत्वज्ञान मांडले असे माझ्या अद्याप वाचनात व ऐकण्यात आलेले नाही. त्याच्याही अगोदर आपल्या देशात शुन्याचा क्रांतिकारी शोध लागला,
ग्रह-तारे यांच्याविषयी माहिती आपल्याला व अरबांना पाश्चात्यांच्या खूप पुर्वीपासून होती, आयुर्वेदासारखं शास्त्र आपल्या देशात फारच पुर्वी विकसीत झालेले होते. कालीदासाचे मेघदूत, रामायण, महाभारत ही महाकाव्ये ही जगभर मान्यता पावलेली होती आणि ही सर्व त्याकाळी प्रचलीत असलेल्या संस्कृत या समृद्ध 'देशी' भाषेतच आहेत. भाग्वाद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झाली व भगवद्गीता तत्वाज्ञानावरचा जगातला एक जुना व अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे तो संस्कृत भाषेतच आहे. आपले सहीत्य, कलाकृती, शास्त्र इंग्रजी भाषेतल्यापेक्षा पुर्वीचे व काकणभर सरसच आहेत. इथे भाषांची तुलना करण्याचा प्रयत्न मी करत नाही तर प्रतयेक भाषा ही परिपूर्ण असतेच तर मला एवढेच म्हणायचे आहे कि ज्ञान्साधानेसाठी मातृभाषा हि इतर कोणत्याही भाषेसाठी अधिक योग्यच नव्हे तर एकमेव असते.

आपल्या देशात प्रथम मोंगल व नंतर इंग्रजांच्या राजवटीत आपल्या देशातील भारतीय भाषांची पीछेहाट झपाट्याने होऊ लागली. इंग्रजांना तर त्यांचे साम्राज्य शाबूत ठेवण्यासाठी बंदूकीपेक्षा भाषेने आधार दिला. इंग्लीश शिक्षणतज्ञ मेकॅले याच्या सुपीक डोक्यातून जन्मलेली शिक्षण पद्धती इंग्रज सरकारने देशात लागु केली. ही शिक्षण पद्धती आपली म्हणजे स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढु नये, किंबहूना त्यांनी विचारच करू नये अशा पद्धतीने आखलेली होती. इंग्रजांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा 'रोबो' नोकरवर्ग हवा होता तो त्यांचा हेतू त्यांनी भाषेच्या माध्यमातून साध्य केला. इंग्रजी भाषेनुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणं सोप्पं झालं असं म्हणताना इंग्रजी ही ‘त्यांची’ मातृभाषा होती हे आपण लक्षातच घेत नाही. इंग्रजांनी इथ इंग्रजी शिक्षण देण्यास सुरूवात केली ती त्यांची भाषा समजणारा नोकरवर्ग त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून! कारण त्यांना त्यांच्या भाषेत कारभार करायचा होता. इंग्रज अर्ध्यापेक्षा अधिक जगावर राज्य करू शकले यात त्यांच्या
दरा-यापेक्षा त्यांच्या भाषेचा वाटा मोठा होता. त्यांनी कोणत्याही देशावर राज्य करताना ‘त्यांच्या’ मातृभाषेचाच आधार घेतला हे विसरून चालणार नाही. जेत्यांनी जीतांवर आपली भाषा व संस्कृती लादण्याचा प्रघात पहिल्यापासूनच आहे मात्र जे जे देश परकीय सत्तेपासून स्वतंत्र झाले त्यांनी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या भाषेची संस्कृतीची पुनर्स्थापना केली. सोव्हिएत रशियातील संघराज्य अनेक वर्ष एकसंघ राहून महाशक्ती बनू शकला यात दडपशाही एवढाच त्यांच्या देशभर लागु केलेल्या 'रशीयन भाषेचा' जुलमी आग्रहही कारणीभूत होता. भाषा हा समाजाला ताब्यात ठेवण्याचं वा एकसंघ ठेवण्याचं प्रभावी माध्यम आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे

स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६७ वर्ष उलटून गेलियावरही आपण मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत फार बदल केलेला नाही. आजही आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रेत्साहन देऊन 'फाड फाड इंग्लीश' बोलणारा मात्र विचारशक्ती पुरेश्या प्रमाणात विकसीत न झालेला असा उच्चशिक्षीत नोकरवर्गच तयार करीत आहोत असं म्हणण्यास जागा आहे.
इंग्रजी ही जागतीक संपर्काची भाषा आहे हे खरंच ! परंतू संपर्काची भाषा असणे व ज्ञान भाषा असणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. केवळ उत्तम(?) इंग्रजी बोलता येणे यात अभ्यासापेक्षाही सवयीचा भाग जास्त आहे. माझे एक परिचित केवळ १० वी पास. तेही गावाकडच्या शाळेत शिकलेले. परंतू इंग्रजी संभाषण चांगल्यापैकी करायचे कारण एका इंग्लीश कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात अनेक वर्ष शिपाई म्हणून काम केलेलं..! कोणतीही भाषा संपर्काचे माध्यम म्हणून वापरणे वा बोलता येणे हा शिक्षणापेक्षा त्या भाषेच्या सहवासात राहाणे याचा भाग आहे असे मला वाटते. मुंबई सारख्या शहरात अनेकजण गुजराती वा मारवाडी भाषा उत्तम रित्या बोलु शकतात वा वाचु शकतात यात विशेष असे काहीच नाही कारण ते त्या समाजाच्या सहवासात राहत असतात. परंतू अशी माणसे काही गंभीर विचार करताना वा सुख-दु:खाच्या भावना व्यक्त करताना मातृभाषेचाच विचार करतात हे खरं आहे.

जगातील मुख्य विकसित देशांचे उदाहरण घेतले तरी हेच दिसून येते कि त्यांच्या देशात त्यांच्याच भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्वाच्या देशात शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे आपण नजरेआड करून चालणार नाही. या देशांमध्ये इंग्रजी व इतर परकीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते ते केवळ संपर्काचे साधन असावे म्हणून, मात्र मुख्य शिक्षण त्या त्या देशांच्या मातृभाषेतूनच दिले जाते.

नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात या अर्थाचे विधान केले. खरतर बंदी घालून काहीही साध्य होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याउलट देशी भाषांच्या शाळांना प्रोत्साहन, देशी भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य, कलाकृती कशा निर्माण होतील याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षणाचं मुख्य मध्यम मातृभाषाच असावी. ती सोप्पी, मुलांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. मुलांना आपल्या भाषेची रुची उत्पन्न होईल अशी तिची मांडणी व्हायला हवी. ज्यावेळी व्यवहारात देशी भाषांचे महत्व वाढेल, देशी भाषांना प्राधान्य दिले जाईल तेंव्हाच इंग्रजी भाषेचं महत्व कमी होत जाईल. प्रशासनाची भाषा, न्यायदानाची भाषा देशीच असावी असा आग्रहच नव्हे तर हट्ट असावा. त्यासाठी आंदोलने देखील करण्याची तयारी ठेवावी लागेल तरच देशी भाषांचं महत्व वाढेल. मी कित्येकदा उच्च न्यायालयात कामानिमित्त जात असतो. तेथे कोर्टासमोर फर्ड्या इंग्रजीत वादविवाद चालू असतात. त्या उच्चशिक्षित वकिलांचा अशील जो माझ्यासारखा असतो किंवा ब-याचदा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतो त्याचा एखादा खटला चाललेला असते. हे सर्व पहाताना एक गमतीचा विचार मनात येतो की ज्याच्या भवितव्यासाठी वा ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे विद्वान वकील न्यायाधीशांसमोर वादविवाद करीत आहेत त्या अशिलाला त्यांचे काय चालले आहे हे काहीच कळत नसते. तो भांबावल्या सारखा एकदा या वकिलाकडे तर एकदा त्या वकिलाकडे पाहत असतो. माझीही बऱ्याचदा अशी परिस्थिती होते हा माझा अनुभव आहे.

सरकारी मराठी भाषा तर एखाद्या मराठीचा बऱ्यापैकी जाणकार माणसाला देखील कळणे अवघड जाते तर एखादा ग्रामीण भागातील मनुष्य ती काय समजणार? त्यातील मराठी(?) शब्दप्रयोग तर अनेकदा अनाकलनीय असतात. त्या शब्दांना मराठी का म्हणावे असा प्रश्न पडतो. केवळ याच कारणांमुळे शासनाच्या अनेक चांगल्या योजना सामन्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हा अनुभव आहे. सरकारी खात्यांचा पत्रानुभव तर हसावं की रडावं या प्रश्नाच्याही पलिकडचा आहे व असतो. मी बॅंकेत नोकरी करत असताना रिझर्व बॅंकेकडून आम्हाला कामकाजाच्या निमित्ताने पत्र यायची. पत्रं अगदी उच्चस्तरीय अस्खलित इंग्रजी भाषेत लिहीलेली असायची पण शेवटी मात्र जाड ठशांत छपाई केलेलं एक वाक्य असायचं ' हम हिन्दी मे पत्र व्यवहार का स्वागत करते है'. म्हणजे काय? मग तुम्ही का नाही हिन्दीत पत्र पाठवले? भाषेच्या या अशा माकडचेष्टा आपल्या देशांत सुरू आहेत आणि महाराष्ट्र त्यातही 'नं. १' वर आहे.

मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा असली तरी ती डोक्यावर राजमुकुट घालून फाटक्या कपड्यात मंत्रालायासमोरच्या फुटपाथवर उभी आहे असे काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी सांगितले होते..आता इतक्या वर्षानंतर तिची अवस्था आणखीनच दयनीय झालेली दिसत आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद व्हाव्यात या दृष्टीने सर्व बाजून पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. यातला सर्वात मोठा वाट आपल्या मराठी लोकांचाच आहे हे त्यात आणखी दुर्दैव आहे. सुशिक्षीत असोत वा अशिक्षित आई बाप मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात धन्यता मनात आहेत. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालणे म्हणजे काहीतरी मोठा अपराध आहे अशी आपली मानसिक धारणा झालेली आहे. मुलगा वा मुलगी convent मध्ये शिकतो हे सांगणे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले आहे. मराठी बोलणे आज मागासलेपणाचे लक्षण मानले जात आहे. मराठी आई-बाप आपल्या पाल्याने इंग्रजीच बोलावे असा दुराग्रह करत आहेत. यात त्या मुलाचे काय हाल होतात या कडे कोणीही लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही. समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरचे आई-बाप देखील माहागड्या फिया भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी काय वाटेल ते करत आहेत. अस का करता, हे बहुतेकांना विचारलं असता उत्तर एकच मिळतं, इंग्लीश छान बोलता येतं म्हणून. पुन्हा इंग्लीश छान बोलता येण्यानं काय होणार असं विचारता, चांगली नोकरी मिळते हे उत्तर मिळतं. म्हणजे आयुष्याचा पाया असलेली वय वर्ष पाच ते पंधरा अशी महत्वाची १० वर्ष केवळ इंग्रजी बोलता येण्यासाठी आणि तीही नोकरी मिळावी म्हणून खर्च करायची हे असं काहीतरी विचित्र चाललंय..!!मुल दिवसभर स्कूल मध्ये काढून घरी येतो तो मम्मी त्याला ‘स्नॅकस’ आणि ‘मिल्क’ देते. तीच मम्मी मिल्क ला दुध म्हणताना तो ऐकतो व दुध म्हणतो त्याला मम्मी हरकत घेते व म्हणते, ‘नो बेटा डोन्ट से दुध, से मिल्क..’. आता पोर गोंधळात, की मग ही का दुध म्हणते..मग ती सांगते कि दुधवाला अशिक्षित आहे आणि त्याला इंग्लिश कळत नाही म्हणून त्याला मराठीत सांगितले. यावर ते पोरग आपल्याशी समीकरण बांधते की मराठी ही अशिक्षित लोकांची भाषा आहे हळूहळू त्याच्या मनात आपली भाषा मागासलेली आहे असा समज पक्का व्हायला लागतो. ते पोरग ज्या समाजात वावरते तेथील शब्द संपदा व तो जे शिकतो त्या पुस्तकातील शब्दसंपदा यात त्याला काहीच साम्य दिसत नाही. वर उल्लेख केलेला ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातील प्रसंग या पार्श्वभूमीवर आठवून पहावा.

भाषा म्हणजे केवळ शब्द आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी नसते तर त्या त्या भाषेतून, त्या भाषेच्या शब्द संपत्तीतून त्या त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे आपोआप पोचवला जात असतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे एखाद मुल सुसंस्कृत होण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. शिक्षणाची भाषा मातृभाषाच असावी हे जगभरातील तज्ञ ओरडून सांगत आहेत. मातृभाषेत शिक्षण व जोडीला किमान एकतरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञान कशा रुंदावतात. मनुष्य जेवढ्या भाषा शिकतो तेवढा तो जगाविषयी सजग होतो पण या सर्वांचा पाया मात्र नि: संशय मातृभाषा असावी.

थोडेसे भाषेच्या शुद्धतेविषयी..
आज जगातील कोणतीही भाषा तिच्या मूळ स्वरुपात नाही हे सत्य आहे. ज्या भाषा जिवंत आहेत त्या भाषांमध्ये शब्दांची देव-घेव सतत चालू असते किंबहुना ती तशी चालू असेल तर आणि तरच ती भासह जिवंत आहे असे समजण्यास काहीच अह्रकत नाही. आज आपण जी शुद्ध (?) मराठी बोलतो वा वापरतो ती तिच्या मूळ स्वरूपापासून खूप वेगळी आहे तरी ती आपली वाटते यात दुमत नसावे. आजच्या आपल्या प्रमाण मराठी भाषेत फारसी, अरबी वा दक्षिण भारतीय भाषांतील अनेक शब्द बेमालून मिसळून गेले आहेत. आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे ‘फडणवीस’ हे आडनाव चक्क फारसी ‘फर्द्नवीस’चा अपभ्रंश आहे हे वाचून आपल्यालाही आश्चर्य वाटेल एवढे ते आपले होऊन गेले आहे. मस्करी, मस्ती, महिरप, मातब्बर, शंकरपाळं ह्या शब्दांचं मुळ अरबी/फारसी आहे हे कोण सांगायला गेले तर आपण त्याला वेड्यात काढू पण ते खर आहे. पटाईत, निरोप, मुलगा या अस्सल मराठी वाटणाऱ्या शब्दांचं मूळ कानडी आहे. टेबल, स्टेशन, सीम-कार्ड, इंजिनीअर असे इंग्रजी शब्द आता ग्रामीण माणसालाही सहज समजतात व ते तसेच लिहिण्यास व बोलण्यास काहीच हरकत नाही. उलट त्यास मराठी/भारतीय भाषेतील मेज, स्थानक, अभियंता असे प्रतिशब्द दिल्याने त्याचा काहीच बोध होत नाही हि वस्तुस्थिती आहे. भाषा शुद्धीचा अतिरेकी आग्रह शेवटी त्या भाषेच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. इंग्रजी भाषेतील देखील काही शब्द अपभ्रंशीत होऊन समाविष्ट झाले आहेत. अवतार, जंगल, बंगला, गुरु, लुट, महाराज, मंत्र, रोटी असे कितीतरी भारतीय शब्द इंग्रजी भाषेत मोठ्या सन्मानाने विराजमान झालेले आहेत. प्रतिष्ठित इंग्लिश ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ७०० हून अधिक भारतीय शब्द स्वीकारले गेले आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल-नसेल पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या दोन किंवा अधिक भाषा कोणत्याही कारणाने एकमेकींच्या संपर्कात येतात तेंव्हा त्यात शब्दांची अदलाबदली होणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे भाषा अशुद्ध झाली किंवा बाटली म्हणण्याचे काहीच कारण नाही. उलट अशा आदान-प्रदानामुळे भाषा समृद्धच होत असतात. हे दोन नद्यांच्या संगमासारखे आहे. नद्यांच्या संगमाला तीर्थक्षेत्राचा मान देणारी आपली संस्कृती या भाषा रुपी नद्यांच्या संगमाला नक्कीच सन्मान देईल परंतु त्याची सुरुवात वा त्यतील मोठेपणा आपल्या जनतेला कोणीतरी समजावून देणे गरजेचे आहे.

- गणेश साळुंखे
९३२१८ ११०९१

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

7 May 2015 - 4:32 pm | क्लिंटन

बाय द वे इक्विटी स्वाप ला मराठीत काय म्हणतात?

गुगलचा मराठी अनुवादक इक्विटी स्वॅपला 'इक्विटी स्वॅप'च म्हणत आहे :)

सध्या इक्विटी स्वाप बद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल वाचतो आहे. कुठली भाषा मला जास्त सोप्या रितीने समजावू शकते? अर्थातच इंग्रजी कारण त्यात वेगवेगळ्या तर्‍हेचं साहित्य उपलब्ध आहे. मराठी साहित्य उपलब्ध तरी नाही कींवा जे असेल ते तितकंसं सखोल नाही.

हे इक्विटी स्वॅपच नाही तर बहुतांश गोष्टींविषयी सत्य आहे.

रच्याकाने, हावर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये इक्विटी स्वॅपविषयी नोबेल पारितोषिक विजेते रॉबर्ट मर्टन यांनी लिहिलेला लेख मी वाचला आहे. तुमचा ई-मेल पत्ता व्य.नि करून जरूर कळवा.मी त्याविषयी लिहून तुम्हाला पाठवू शकेन.आणि इक्विटी स्वॅप आणि टोटल रिटर्न स्वॅप हे मी रिस्क मॅनेजमेन्टच्या विद्यार्थ्यांना शिकविलेही आहेत. याविषयी काही माहिती मला देण्यासारखी असेल ती मी नक्कीच देऊ शकेन. पण इंग्रजीतून बरं का :)

नर्सरीत शिकवतात का हे ? का पहिलीला माफ करा फर्स्ट स्टँडर्ड ला ?

आणि आपण इंग्रजीतून माहिती कशी काय देऊ शकताल? आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काय इंग्रजी माध्यमातून झालंय का?

(आपण कधीच कुणाचीच/कशाचीच विशेष करून आपल्या स्वतःच्या मातृभाषेची कधीच हेटाळणी करत नसणार अशी खात्री आहे हं माझी...बरोबर आहे का मी? का हेटाळणी करायचा विषय आल्यावर आपण इतका संकुचित दृष्टीकोन ठेवत नाही?)

मग त्यात चुकीचे काय आहे?

यावरुन एक गोष्ट आठवली...
इंग्लंड आणि फ्रान्स ला जोडणारा बोगदा बांधण्यासाठी टेंडर काढली होती. सगळ्यात कमी कोटेशन एवढ्या कमी किमतीचं होतं की सगळ्यांनी ते कोटेशन पहिलेच बाजुला ठेवून दिलं. ते दिलं होतं संता बंता यांनी.
फक्त उत्सुकतेपोटी शेवटी एकदा संता बंता यांना मुलाखतीसाठी बोलावलं गेलं. त्यांना सांगितलं गेलं की त्यांचं कोटेशन सगळ्यात कमी आहे तर खरं पण ते हे काम कसं करणार हे त्यांनी अगोदर सांगावे...
संताबंता म्हणाले की त्यांच्यापैकी एक जण इंग्लंड मधून खोदायला सुरू करेल आणि दुसरा फ्रान्स मधून.
समिती म्हणाली की पण तुम्ही दोघं खोदत खोदत एकमेकांना बरोबर एकाच ठिकाणी मिळणार कसे? याला केवढं क्लिष्ट गणित आणि हिशेब करावे लागतील, ते तुम्ही कसे करणार?
संताबंता वदले-अहो यात इतका त्रास करून घेण्यासारखं काय आहे? समजा आम्ही नाही भेटलो एकाच ठिकाणी तर एकाच्या जागी आम्ही तुम्हाला दोन बोगदे देऊ!!

यात काही चुकीचं वाटतंय का हो दादा?

काळा पहाड's picture

7 May 2015 - 5:25 pm | काळा पहाड

अहो दादा, भारतात करियर असंच ठरत असतं. इंजिनियरींग केल्यावर जमलं तर आयटी, नाहीतर इंजिनियरींग जॉब, एमपीएस्सी आणि यूपीएस्सी साठी प्रयत्न, एखादी कला अंगात असेल तर ते जमतंय का पहाणे. नोकरी मिळाली तर ठीक नाहीतर बिझनेस करता येतोय का ते पहाणे. मी सध्याच्या नोकरीत असं काम करतोय ज्याचं शिक्षण मी कधीच घेतलं नव्हतं आणि माझ्या नोकरीतल्या निम्या वर्षांचाही त्याच्याशी काही संबंध नाही. तेव्हा झालं तर रॉकेट सायंटिस्ट नाहीतर बीपीओ यात काहीही चुकीचं नाही. मी कित्येक एमपीएससी वाले पाहिले आहेत ज्यांनी मराठीत पोस्ट ग्रॅज्युएट केलं कारण एमपीएससी वर लक्ष देता यावं. आता एमपीएससी पण नाही झाले आणि मराठी मध्ये ग्रॅज्युएशन असल्यानं तिकडेही जॉब लागत नाही.

क्लिंटन's picture

7 May 2015 - 5:29 pm | क्लिंटन

अहो दादा, भारतात करियर असंच ठरत असतं.

टंकायचे कष्ट वाचविल्याबद्दल धन्यवाद.

मी पण सुरवातीला एक उद्दिष्ट ठेवले होते पण प्रत्यक्षात भलतेच काहीतरी झाले.असे भलतेच काहीतरी झाले तर त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी हातपाय मारायलाच लागतात.अन्यथा सगळीच बोंब होते. अशावेळी फार ताठर असून उपयोग नाही.

असंका's picture

7 May 2015 - 10:56 pm | असंका

मी हेटाळणी करतोय? ती कशी? आप्ल्या पुढच्या पिढीसमोर उद्दीष्ट ठेवताना विचारपूर्वक ठेवा असा अर्थ नाही का दिसला आपल्याला माझ्या वाक्यात? फक्त हेटाळणी दिसली?

उलट आपण काय काय बोल्ताय ते बघा-
कॉल सेंटर मधील नोकरी महत्त्वाकांक्षी लोकांसाठी नाहीच
ज्यांना कशातच गती नाही ते कॉल सेंटरमध्ये नोकरी करून उदरनिर्वाह...

म्हणजे जे कॉल सेंटर मध्ये नोकरी करतायत त्यांना महत्त्वाकांक्षा नसतात, त्यांना इतर कशात गती नसते इ. तर आपण बोलताय....मग ही काय स्तुती करताय का आपण कॉल सेंटरमधे नोकरी करणार्‍यांची?

म्हणजे मी काहीही न बोलता मी म्हणे हेटाळणी केली आणि आपण सरळ सरळ त्यांना कमी लेखताय आणि ती मात्र हेटाळणी नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2015 - 10:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सध्या कॉल सेंटर्सची चलती आहे तर लुटू द्या की तिचा फायदा आपल्या मुलांना.
ही अशी महत्त्वाकांक्षा असायला हवी का, "आपल्या" माणसांची ?

जगात बहुतेक लोकांचा कल पाण्यासारखा "पाथवे ऑफ लीस्ट रेझिस्टंट" चोखाळण्याचा असतो. कॉलेजात भरती होताना कधी मेडिकल, तर कधी इंजिनियरींगची, इ, इ चलती चाललेली असते, यावरून हे स्पष्ट होत नाही काय ? त्यावेळेस बहुसंख्य पालक मुलांच्या आवडीला (किंबहुना मुलेही स्वतःच्या आवडीला) किती महत्व देतात आणि त्याकाळात असलेल्या विषयाच्या चलतीला किती महत्व देतात हे जगजाहीर आहेच !

मुख्य म्हणजे, एखाद्या विषयामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता नाही तरीसुद्धा विषयाचे परिपूर्ण आणि उच्च ज्ञान मिळते म्हणून त्या विषयाच्या कॉलेजमध्ये भरतीसाठी रांगा लागलेल्या आहेत असे एखादे उदाहरण बघायला मिळेल काय ?

ही वस्तुस्थिती जरी वरवर पाहता बरी वाटली नाही, तरी ते कालातीत सत्य आहे आणि मुख्य म्हणजे त्यात लाजिरवाणे असे काहीही नाही ! जगात सर्वच देशांतल्या बहुसंख्य लोकांच्या शिक्षणाचा रोख त्यातल्या त्यात जास्त आर्थिक सुस्थिती मिळवण्यासाठीच असतो. अत्युच्च बौद्धीक पातळी गाठणार्‍या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, विचारवंत आणि कलावंतांची संख्या नेहमीच अल्पसंख्य असते. किंबहुना, उच्च श्रेणीच्या अल्पसंख्य लोकांच्या गटातील बरेच लोक, उच्च श्रेणीमुळे मिळणारा भौतीक फायदा आणि प्रसिद्धीच्या आकर्षणानेच धडपड करून तेथे पोचलेले असतात !

पाथवे ऑफ लीस्ट रेझिस्टन्स साठीच मातृभाषेतून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घ्यावे असं मला वाटतं..

कॉल सेंटर बद्दल माझी माहिती आउटडेटेड होत चाललीये का? कॉल सेंटर मधली नोकरी असेल तर तो व्यक्ती आर्थिक दृष्ट्या आता सुस्थित समजला जाऊ लागला आहे का? वयाच्या पन्नासाव्या, साठाव्या वर्षापर्यंत ही असली नोकरी आता करता येते का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2015 - 11:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाथवे ऑफ लीस्ट रेझिस्टन्स साठीच मातृभाषेतून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घ्यावे असं मला वाटतं..

त्याकरिताही, सर्वप्रथम "मातृभाषेतून घेतलेले शिक्षण विद्यार्थ्याच्या बौद्धीक पात्रतेला शक्य असलेल्या सर्व संधी त्याला उपलब्ध करून देईल काय ?" हा प्रश्न विचारणे जरूर आहे.

सद्यातरी, मराठीच्या संबंधात या प्रश्नाचे उत्तर नाही हेच आहे.

मातृभाषेत घेतलेल्या शिक्षणानंतर विद्यार्थ्याच्या बौद्धीक पात्रतेला साजेशी नोकरी मिळण्याची खात्री असेल अशी परिस्थिती निर्माण केली तर लोकांना मातृभाषेचे वेगळे महत्व समजाऊन द्यायची खटपट करावी लागणार नाही ! मग तसे शिक्षण घ्यायला जास्त कष्ट घ्यायला लागले तरी त्यासाठी लोकांची तयारी असेल.

याबाबतीत, बर्‍याचदा सांगितली जाणारी जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, इ देशांची उदाहरणे अज्ञानावर आधारलेली आहेत असे नम्रतापूर्वक नमूद करतो आहे ! त्या लोकसंख्येने मोठ्या समजल्या जाण्यार्‍या देशांतच नाही तर कमी लोकसंख्या असलेल्या नॉर्वे (५२ लाख), स्विडन (९८ लाख), इत्यादी देशांमध्ये
(अ) केवळ शैक्षणिक पुस्तकेच नव्हे तर जगातील अत्याधुनिक शास्त्रिय व इतर ज्ञानाचे स्त्रोत (जर्नल्स, इ) त्वरीत त्यांच्या स्थानिक भाषेत भाषांतरीत करण्याची व्यवस्था आहे
(आ) स्थानिक भाषेत मिळालेले शिक्षण उत्तम स्थानिक नोकरी मिळण्यास पुरेसे असते...

पण तरीही त्या सर्व देशांतही...

जर महत्वाची आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या कंपनीचे पद हवे असेल अथवा आंतरराष्ट्रीय गटाबरोबर शास्त्रीय संशोधन करायचे असल्यास इंग्लिश भाषा आवश्यक समजली जाते.

आणखी काही रोचक...

चीनमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या मेडिकल कॉलेजेसमधली शिक्षणाची भाषा इंग्लिश असते !

कारण ???... परदेशी विद्यार्थांचे शिक्षण हा चीनच्या अर्थव्यवस्थेतला महत्वाचा भाग बनवण्याचा चिनी सरकारचा प्रयत्न आहे... अर्थातच, ते करताना (त्याना इतर वेळेस अत्यंत संवेदनाशील असलेला) भाषेचा प्रश्न त्यांनी दुय्यम स्थानी टाकला आहे !

संदीप डांगे's picture

8 May 2015 - 12:04 am | संदीप डांगे

मला एक प्रश्न पडलाय तुमच्या या प्रतिसादावरून.

सगळ्यांनी आपापल्या शिक्षणाबद्दल सांगितले. इंजिनीअरींगचे शिक्षण, डॉक्टरकीचे शिक्षण कसे इंग्रजीतून असेल तर पटकन समजते वैगेरे.

मी सेमी इंग्लीशमधून (८-९-१०) शिक्षण पुर्ण केले. डिस्टींक्शनमधे दहावी झालो. म्हणजेच अ‍ॅवरेज खचितच नव्हतो. माझे इंग्रजी अक्ख्या शाळेत टॉपचे होते. (यासाठी ज्यांचे इंग्रजी माझ्याइतके चांगले नव्हते त्या इंग्रजीच्या शिक्षकांचा फटकाही खाल्ला आहे जळणुकीतून.) मी अकरावीत अकोल्यातल्या सर्वात चांगल्या विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. सगळे शिक्षण इंग्रजीतूनच होते. तरी मला विज्ञान/गणित विषय झेपले नाहीत. सगळे व्यवस्थित समजत असून सुद्धा.

सॅन, कॉस, थीटा ने झीटा आणल्या. बॉटनी/झूलॉजी फक्त आकृत्या काढण्याइतके चांगले, रसायन प्रयोगशाळेत हिरव्यातला द्रव पिवळ्यात का टाकायचा हेच प्रश्न, भौतिक थोडे चांगले. पण आपला इथे निभाव लागणे अशक्य आहे हे वर्ष संपेस्तोवर लक्षात आले. तडक बारावी आर्टस ला प्रवेश घेऊन मोकळा झालो.

माझ्या या प्रकरणात नेमके काय झाले असावे बरे?

आयला माझाच प्रतिसाद वाचतोय असं वाटत होतं...फक्त मी अकरावीतच मध्यातनं सोडलं सायन्स...कॉमर्सला गेलो. आणि अकोला नाही, नगर. इंग्रजीच्या सरांचा मार मीही खाल्ला. दहावी इंग्रजीत एवढे मार्क आले की रँकर मुलांनी मला जवळ येऊन विचारलेलं की खरंच तुला एवढे मार्क आले का!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2015 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला एक प्रश्न पडलाय तुमच्या या प्रतिसादावरून....
...माझ्या या प्रकरणात नेमके काय झाले असावे बरे?

तुमच्या बाबतीत झाले त्याला मुख्यतः "मनाचा कल" (अ‍ॅप्टिट्युड) जबाबदार होता (अर्थात, इतर काही गोष्टीही होत्या, त्या पुढे येतीलच). मनाच्या कलाचा मूळ संबंध बुद्धीमत्तेशी नसून व्यक्तीगत आवडीशी असतो. उत्तम डॉक्टर, इंजिनियर अथवा शास्त्रज्ञ जेवढे बुद्धिमान असतात तेवढेच बुद्धिमान उत्तम लेखक आणि कलाकारही असतात, फक्त त्यांच्या मनाचे कल वेगवेगळ्या विषयांकडे असतात.

शास्त्रिय विषयांचे (विशेषतः व्यावसायीक) उच्च शिक्षण घेतल्याने चांगली नोकरी/व्यवसाय करून उत्तम आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता कला विषयांच्या उच्च शिक्षणापेक्षा खूप जास्त असते ही सद्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे बुद्धीमान विद्यार्थी आणि त्यांचे पालक, विद्यार्थ्यांचा कल असो वा नसो, शास्त्रिय शिक्षणाचीच निवड करतात... काही दुर्मिळ उदाहरणे सोडून सर्वत्र हेच घडते. त्यामुळे, केवळ शास्त्र विषय कॉलेजात घेऊन पुढे डॉक्टर, इंजिनियर अथवा शास्त्रज्ञ बनणारेच बुद्धिमान असतात हा गैरसमज आपल्या "उत्तम नोकरी = उत्तम आर्थिक स्थिती = सफलता = बुद्धीचे लक्षण" या व्यवहारीक समिकरणाने तयार झालेला आहे.

शास्त्रिय शिक्षण बरेच पुढे गेले असताना अथवा ते पूर्ण केल्यावर उपरती होऊन आपल्या कलाला (आवडीला) साजेश्या व्यवसायाची निवड करून यशस्वी झालेल्यांची अनेक उदाहरणे कलाक्षेत्रात (अभिनय, संगीत, इ) आढळतात... पण अश्या प्रत्येक उदाहरणामागे अनेक पटींनी जास्त लोक "आता शास्त्रिय विषय निवडला आहेच ना, आणि तो उत्तम आर्थिक स्थैर्य देतोय ना, मग कशाला आता धोका पत्करून दुसर्‍या क्षेत्रात जायचे ?" असा व्यावहारीक विचार करून पुढील सर्व जीवन जगतात, हेही तितकेच सत्य आहे.

शिक्षण आणि व्यवसाय निवडीतील वस्तूस्थिती :

व्यक्तीगत बुद्धिमत्ता, व्यक्तीगत आवड, व्यक्तीगत आवडीच्या विषयाचा पाठपुरावा करण्याने होऊ शकणारे अथवा न होऊ शकणारे भौतीक फायदे, नातेवाईक व मित्रांच्या समजूतींचा भार (पियर प्रेशर), व्यक्तिगत धाडस (जे सर्वसामान्य समजूतींच्या विरुद्ध निर्णय घेण्यास आणि तो निर्णय व्यवहारात आणण्यास भरपूर प्रमाणात असणे जरूर आहे), व्यक्तीची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, व्यक्तीगत जबाबदार्‍या, इत्यादी अनेक मुद्दे व्यक्तीच्या शिक्षण व व्यवसाय संबंधी कृतीवर प्रभाव टाकतात. त्याबाबतीत शिक्षणाचे माध्यम (भाषा) हा महत्वाचा मुद्दा आहे, पण तो केवळ एक महत्वाचा मुद्दा आहे आणि कळीचा मुद्दा नाही.

वरचा मुद्दा अधोरेखीत करणारी अजून एक गोष्ट अशी आहे : उत्तम भविष्याच्या इच्छेने इंग्लिश आणि विकसित देशांच्या आधुनिक युरोपियन भाषा (मॉडर्न युरोपियन लँग्वेजेस, उदा. जर्मन, फ्रेंच, इ) शिकण्यासाठी जगभरचे लोक जरूर ते सर्व श्रम घेण्यास तयार असतात. बदलत्या जागतीक आर्थिक समीकरणांमुळे अशा भाषांच्या यादीत चीनी भाषेची भर पडली आहे. भारतासारख्या विकसनशील देशातलेच नव्हे तर विकसित देशांतलेही (यात इंग्लिश मातृभाषा असणारे विकसित देशही येतात) अनेक महत्वाकांक्षी लोक किचकट चीनी भाषा जरूर ते कष्ट घेऊन आत्मसात करत आहेत.

राही's picture

9 May 2015 - 2:01 pm | राही

सुंदर आणि सहृदय प्रतिसाद.
अतिशय आवडला हेवेसांनल.

अवतार's picture

9 May 2015 - 3:38 pm | अवतार

सुंदर !

संदीप डांगे's picture

10 May 2015 - 2:54 pm | संदीप डांगे

खूपच सुंदर आणि योग्य विश्लेषण.

या विवेचनावरून एक बाब स्पष्ट होतेय की भाषा एक साधन (टूल) आहे. कालपरत्वे साधने बदलतात. त्याचा बुद्धीमत्तेशी आणि यशस्वीपणाशी तसा काही थेट संबंध दिसून येणार नाही. ज्या साधनांचा वापर करून कमी श्रमात जास्त संपत्ती निर्माण होऊ शकते तिकडे मानवी मनाचा कल असणारच हे मान्य. जे खरंच हुशार असतात ते कुठल्याही अडचणींवर मात करून जातात. ज्यांना शक्य होत नाही ते अडकतात.

त्याबाबतीत शिक्षणाचे माध्यम (भाषा) हा महत्वाचा मुद्दा आहे, पण तो केवळ एक महत्वाचा मुद्दा आहे आणि कळीचा मुद्दा नाही.

हे वाक्य दोन्ही बाजूंच्या वादपटूंसाठी लागू होऊन चर्चा नलिफाय होत आहे. :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2015 - 6:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझा मुद्दा समजला आणि आवडला याचा आनंद वाटला.

मानवाच्या निर्मितीपासून आजपर्यंत त्याचे बहुतेक सर्व निर्णय "त्यात माझा काय फायदा आहे ? (What is in it for me ?)" या एकमेव प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून झालेले आहेत, होत आहेत आणि होत राहतील.

खालील काही उदाहरणे आर्थिक-व्यावसायिक-राजकीय वस्तूस्थितीने भाषेचे महत्व कसे वाढते ते अधोरेखीत करतात...

१. नुकतीच झालेली ब्रिटिश निवडणूक:

भारतीय वंशांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी:
अ) मावळते पंतप्रधान कॅमरन यांनी कपालावर लाल टिळा लावून आणि सौ कॅमरन यांनी साडी नेसून प्रचार केला
आ) निवडणूकीसाठी हिंदीतली खास घोषवाक्ये आणि गाणी तयार केली गेली
इ) निवडणूकीसाठी तयार केलेल्या व्हिडीओत कॅमरून यांच्या भारतभेटीची क्षणचित्रे आवर्जून टाकली होती
ई) स्कॉटलंडमध्ये ५९ पैकी ५६ जागा जिंकणार्‍या स्कॉटिश नॅशनल पार्टीने परदेशी विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणानंतर ब्रिटनमध्ये दोन वर्षे नोकरीचा अनुभव घेता यावा यासाठी कायद्यांत जरूर ते बदल करू असे अश्वासन दिले
उ) भारतीय वंशाच्या एकूण ५० लोकांना आमदारपदाची तिकीटे दिली गेली, त्यापैकी विक्रमी संख्येने १० जण आमदार झाले

"British PM David Cameron's Party Woos Indian-Origin Voters with Hindi Song"

हे सर्व भारताच्या प्रेमापोटी नसून भारतिय मतदारांचा ब्रिटनमधिल वाढता प्रभाव डोळ्यासमोर ठेऊन केले गेले हेवेसांन.

२. आजच्या घडीला एकूण चार अमेरिकन विद्यापिठांनी हिंदीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे.

US university to offer Hindi language course

हे सर्व हिंदीच्या प्रेमापोटी नसून भारताची वाढती आर्थिक व्यवस्था डोळ्यासमोर ठेऊन आहे हेवेसांन.

३. डोळ्यासमोरचे अजून काही : मुंबईत (अजून तरी) मराठी लोक बहुसंख्य असूनही मुंबईतल्या व्यवसाय-धंदा-व्यापारात असलेली बहुसंख्य मराठी माणसे कमीत कमी गुजराती बोलणे तरी शिकतात.

यात गुजराती भाषेच्या प्रेमापेक्षा आर्थिक कारणे जास्त प्रभावी आहेत हेवेसांन.

थोडक्यात :

ज्या भाषेने उत्तम भौतीक फायदा होतो त्या भाषेच्या संवर्धनासाठी भाषिक लोकांसाठीच नव्हे तर परभाषिक लोकांसाठीही कोणती वेगळी व्यवस्था करावी लागत नाही..."त्यात माझा काय फायदा आहे ? (What is in it for me ?)" या प्रश्नाचे उत्तर त्या भाषेच्या बाजून असल्याने सर्व हुशार/कमहुशार (पैशाचे जीवनातले महत्व कळायला फार हुशारी लागत नाही) लोक पडेल ते श्रम घेऊन ती भाषा आत्मसात करू लागतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2015 - 9:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्याबाबतीत शिक्षणाचे माध्यम (भाषा) हा महत्वाचा मुद्दा आहे, पण तो केवळ एक महत्वाचा मुद्दा आहे आणि कळीचा मुद्दा नाही.
हे वाक्य दोन्ही बाजूंच्या वादपटूंसाठी लागू होऊन चर्चा नलिफाय होत आहे. :-)

नाही.

महत्वाचा मुद्दा आणि कळीचा (पिव्हॉटल) मुद्दा यांत एक अत्यंत महत्वपूर्ण फरक आहे. तो असा :

एखादा महत्वाचा मुद्दा दुर्लक्षित झाला तर कमी प्रमाणात का होईना पण यश मिळण्याची शक्यता असते...

मात्र कळीचा मुद्दा दुर्लक्षित झाला तर नक्कीच अपयश येते... किंबहुना अश्या ताकदीच्या मुद्द्यालाच कळीचा मुद्दा म्हणतात.

काळा पहाड's picture

11 May 2015 - 5:29 pm | काळा पहाड

खालील पैकी एक झालं असं असावं की
१. तुमचे शिक्षक (नवीन) तितकेसे हुशार नसावेत आणि शिकवण्याची हातोटी त्यांच्याकडे नसावी. माझ्या दुर्दैवाने माझे गणिताचे शिक्षक १० वी ला बदलून एक (कदाचित हुशार) पण न शिकवता येणारे शिक्षक आले. माझा गणित कच्चा राहिला तो पुढेही कच्चा राहिलाच.
२. किंवा तुमचा मेंदू सायन्स साठी (गणिती वाला) न बनता आर्टस साठी (कलासक्त वाला) बनला असावा. फक्त तुम्हाला ते जाणवलं उशीरा. पण त्यात भाषेचा काही संबंध नाही.

यातल्या अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणे भाग आहे कारण मी लहान तोंडी मोठा घास घेणे योग्य नव्हे...

पण एक शंका, मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे अमुक एक गोष्ट मला कधीच करता येणार नाही अशी परीस्थिती मी दहावी पास झालो तेव्हा नव्हती. मग आता असं काय बदललंय?

संदीप डांगे's picture

8 May 2015 - 12:25 am | संदीप डांगे

बदल फक्त विचारसरणीत झालाय. मातृभाषेत बोलणार्‍यांकडे, इंग्रजी न येणार्‍यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन.

क्लिंटन's picture

8 May 2015 - 1:36 pm | क्लिंटन

जर महत्वाची आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या कंपनीचे पद हवे असले अथवा आंतरराष्ट्रीय गटाबरोबर शास्त्रीय संशोधन करायचे असल्यास इंग्लिश भाषा आवश्यक समजली जाते.

म्हणूनच आज अगदी युरोपातल्या विद्यापीठांमध्येही इंग्रजी भाषेतून शिक्षणाची सोय आहे. मी २००१-०२ मध्ये परदेशी विद्यापीठांमध्ये अर्ज करत होतो त्यावेळी युरोपमध्ये त्या त्या देशातील भाषेतच पदव्या मिळू शकत होत्या.पण नंतरच्या काळात परिस्थिती झपाट्याने बदलली. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर इंग्रजीला पर्याय नाही हे ओळखले. आज जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, स्पेन इत्यादी सगळ्या आघाडीच्या युरोपिअन देशांमध्ये इंग्रजीतून पदव्या मिळतात.

परदेशी विद्यार्थांचे शिक्षण हा चीनच्या अर्थव्यवस्थेतला महत्वाचा भाग बनवण्याचा चिनी सरकारचा प्रयत्न आहे... अर्थातच, ते करतान त्याना (इतर वेळेस अत्यंत संवेदनाशील असलेला) भाषेचा प्रश्न त्यांनी दुय्यम स्थानी टाकला आहे !

मला वाटते की लोकांचे जीवनमान भरभर उंचावायचे आहे अशी महत्वाकांक्षा असलेला कोणताही समाज भाषा वगैरे मुद्दे दुय्यम स्थानावरच ठेवेल.

दोनदा पाठवला गेल्याने प्रकाटाआ.

धागा आल्याआल्या ओपन करुन पाहिला.. पहिल्यांदाच ह्या चर्चेचा चोथा झालाय असा रिप्लाय आल्याने या धाग्याकडे लक्षच दिले नाही.. तसेच समजुन ..
आणि १५० + रिप्लाय ..
अरे रे पुन्हा तेच तेच ..

राजकारणाच्या धाग्यावरुन आत्ताशी मी शिकलो आहे
आपले म्हणणे मांडा आणि बाजुला व्हा ... कितीही आपलेच मत खरे आणि दूसर्याचे कसे चुकीचे ह्यात वेळ वाया घालवायचा नाही..

पटल तर घ्यायच, नाही तर सोडुन द्यायच.

वरील चर्चा वाचुन बघेन एकदा वेळ मिळाल्यास..

बाकी शिक्षणाचे म्हणाल तर .. वयक्तीक रीत्या.. माझ्या बाळाला मी चित्रकला..संगित असल्या गोष्टींचे शिक्षण देणार आणि शाळेचे म्हंटला तर जे फि साठी परवडेल आणि घराच्या जवळ असेल ते..
बाकी देशाचा शाळेतील माध्यमांची चर्चा मी करुन काहीच फायदा नाही, त्या साठी किमान त्या पदावर पोहचल्यास विचार करु ..

राही's picture

7 May 2015 - 8:16 pm | राही

माझा मुद्दा आणि धोशा एकच असतो की लोकांना त्यांच्या प्रिमिटिव पातळीतून वर नेणारी शिडी सध्या तरी इंग्लिश हीच आहे. भले ह्या लोकांना शेक्स्पीअर,कालिदास भवभूति, देशाचे पं.प्र., राष्ट्रपति माहीत नसतील. पण एका गटाराशेजारच्या दहा बाय आठ च्या झोपडीतल्या बाईच्या मुलीस २०-२५ हजाराची नोकरी मिळाल्याने किंवा एका गवंड्याच्या मुलास कम्प्यूटरवर अकाउंटिंगचे काम मिळाल्याने किती फरक पडतो आणि किती आनंद होतो हे मी पाहिले आहे.सैन्यात शिपाई म्हणून भरती झालेला सिन्नरचा एक धनगर मुलगा अधिकारी बनण्याची आकांक्षा बाळगतो,त्यासाठी त्याला एका सैन्यदलातल्या अधिकारीपदांसाठीच्या क्लासला घातल्यावर इंग्रजीमुळे त्याची किती फरपट होते आणि निराशेने त्यातून बाहेर पडावे लागते हे प्रत्यक्ष पाहिले आहे. या मुलांना प्राथमिक आणि सन्मानाची उपजीविका हवी आहे. ही मुले 'सर्वसाधारण' कॅटेगरीतली आहेत,प्रचंड हुशार, बुद्धिमान वगैरे नाहीत.कदाचित 'बिलो अ‍ॅवरेज'च असतील.त्यांच्या अ‍ॅस्पिरेशन्स, आशाआकांक्षा आपण समजून घेणार की नाही? मराठीत हे ज्ञान येईल तेव्हा येईल पण त्यासाठी आत्ताच्या या पिढीचा बळी का जावा? जेव्हा हे ज्ञान भारतीय भाषांत येईल(आणि त्यासाठी सध्याची बुद्धिमान मुले प्रयत्न करतीलच करतील,)तेव्हा पुढच्या पिढ्यांना त्याचा फायदा कदाचित होईलही.पण आत्ताचे काय?
आणि हो, इंग्रजीतून शिकल्याने मराठी नष्टबिष्ट तर अजिबातच होणार नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या पहिल्या काही सुविद्य पिढ्या इंग्लिशमध्ये शिकल्या तरी त्यांनीच मराठीतून शिक्षणाची पायाभरणी केलीं. न्या.रानडे, लो.टिळक, तेलंग, भांडारकर, डॉ. भाऊ दाजी, यांनी मराठी, आयुर्वेद, भारतीय संस्कृती यासाठी भरीव काम केले. तेव्हा भारतीय संस्कृती नष्ट होईल अशी डूम्स डेची भाषा करण्यात काहीच अर्थ नाही.

क्लिंटन's picture

7 May 2015 - 9:45 pm | क्लिंटन

प्रतिसादास प्रचंड सहमती आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2015 - 10:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

कवाधरनं मास्लोव सांगू र्‍हायलाय. पन आपन ऐकू न्हाय र्‍हायलोय !

संदीप डांगे's picture

7 May 2015 - 11:01 pm | संदीप डांगे

पण एक्कासाहेब,

युनेस्को का म्हणून मातृभाषेतून शिक्षण द्या असे म्हणून र्‍हायलंय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2015 - 12:01 am | डॉ सुहास म्हात्रे

युनेस्को काय म्हणते याचा विरोध नाही... प्रश्न आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणती पार्श्वभूमी आणि इन्फ्रास्ट्रक्चर असणे आवश्यक आहे... आणि तेथेच मराठीचे घोडे पेंड खात आहे...

ते कसे अगोदरच येथे(१) आणि येथे(२) लिहीले आहे.

ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या मुद्द्यांना संदिप डांगे यांनी अनेकदा समर्पक उत्तरे दिली आहेत. त्यांचा संदर्भ न देता परत परत तेच तेच प्रश्न विचारण्यात काय हशील आहे?

अवतार's picture

8 May 2015 - 12:36 am | अवतार

मी देखील मराठी माध्यमातील विद्यार्थी. कॉलेजमध्ये इंग्रजीतून विषय समजून घेतांना आणि फाड फाड इंग्रजी बोलणाऱ्या मुलांसमोर जे भोगावे लागले ते शब्दांत सांगू शकत नाही. नोकरी शोधायची वेळ येईपर्यंत इंग्रजीबद्दल आत्मविश्वास नव्हता. एक-दोन इंटरव्हयू दिल्यावर स्वत:चीच लाज वाटली. त्यानंतर सहा महिने इंग्रजी शिकण्यासाठी कसून प्रयत्न केले आणि पहिल्याच प्रयत्नात नोकरी मिळाली. आज माझे सिनियर्स महत्वाचे इमेल मला दाखवल्याशिवाय पुढे पाठवत नाहीत. कम्युनिकेशन स्किलच्या बाबतीत मला नेहमीच कॉमप्लिमेंटस मिळतात. हा आत्मविश्वास आणि हे स्थान मिळवण्यासाठी मला ज्या यातना भोगाव्या लागल्या आणि जे अतिरिक्त कष्ट घ्यावे लागले ते इंग्रजीतून शिक्षण घेतल्यास वाचू शकले असते.
लहान वयात इंग्रजीचे ओझे न झेपल्याने कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे अजून तरी माहित नाही. इंग्लिश स्पिकिंग क्लासेसऐवजी मराठी संभाषणाच्या वर्गांना सुगीचे दिवस येतील त्या दिवशी मातृभाषेतून शिक्षणाची आवश्यकता मांडण्याची गरजच राहणार नाही.

संदीप डांगे's picture

7 May 2015 - 11:25 pm | संदीप डांगे

जेव्हा आमच्या कडे विदा नसतो तेव्हा लोक सारखं मागे लागतात, 'पुरावा द्या, पुरावा द्या' करत. आता देतोय तर कोण ढुंकून बी बगायला तयार न्हाय.

युनेस्कोच्या सायटीवरून घेतलेल्या या पुस्तकात बरंच काही आहे. वाचून घ्या. उदाहरणादाखल हे वाचा:

Q1.What is the educational situation for members of non-dominant or minority language communities?

Many members of non-dominant or minority language communities, especially those living in remote areas, face significant challenges when they try to get a good quality basic education:

  • Some have no access to school at all; others have access to schools, but not to trained teachers – or teachers of any kind.
  • Even if schools are adequately staffed, many of the teachers use a language that the learners do not understand.
  • Textbooks and lessons focus on the language and culture of the dominant group. If the learners are unfamiliar with that culture, as many are, it is very difficult for them to understand the concepts that are being communicated.
  • Teachers who come from the dominant language society may consider the learners “slow”. They may fail to appreciate – or may even look down on – the learners’ heritage language and culture.

For these learners, school is often an unfamiliar place teaching unfamiliar concepts in an unfamiliar language. Such was the case described by an educator who visited a classroom in a minority language community in India in which Hindi was the language of instruction:

"The children seemed totally disinterested in the teacher’s monologue. They stared vacantly at the teacher and sometimes at the blackboard where some [letters] had been written. Clearly aware that the children could not understand what he was saying, the teacher proceeded to provide even more detailed explanation in a much louder voice.

Later, tired of speaking and realizing that the young children were completely lost, he asked them to start copying the [letters] from the blackboard. “My children are very good at copying from the blackboard. By the time they reach Grade 5, they can copy all the answers and memorize them. But only two of the Grade 5 students can actually speak Hindi,” said the teacher."

Forcing children, or adults, to attend schools that use a language they neither speak nor understand hinders rather than helps them to develop their potential as productive members of society. When lessons constantly focus on the world outside their community and ignore all that they know and have experienced, the not-so-hidden message is that their own language, culture and experiences have no value. This is how schooling causes children to lose respect for their community, their parents and themselves. One parent in Papua New Guinea has described such a situation in this way:

When children go to school, they go to an alien place. They leave their parents, they leave their gardens, they leave everything that is their way of life. They sit in a classroom and they learn things that have nothing to do with their own place. Later, because they have learned only other things, they reject their own.

The result, in many cases, is that learners who want to succeed in the formal education system can do so only at great cost, by sacrificing their linguistic and cultural heritage:
"They [language minority communities] are allowed into that mainstream life – if at all – only by leaving behind their ethnic and linguistic identity and taking on the language and culture of the dominant society. This is not a new process. It is the long, well-known, well-documented, and sad history of minority communities throughout the world"

संदीप डांगे's picture

8 May 2015 - 2:24 am | संदीप डांगे

मला काय म्हणायचंय त्यासाठी वेगळाच धागा काढतो...

मधुरा देशपांडे's picture

8 May 2015 - 2:53 am | मधुरा देशपांडे

बरीचशी चर्चा वाचली. क्लिंटन, एक्का काका आणि राही यांचे प्रतिसाद आवडले.
शिक्षण मातृभाषेतुन घ्यावे, म्हणजे सगळे नीट समजेल इत्यादी बाबी मला वैयक्तीक पटत नाहीत. युनेस्कोचे सर्वेक्षण, संशोधन हे मत मांडत असले, तरीही शिक्षणात भाषेशिवाय इतर अनेक बाबीही महत्वाच्या आहेत. इंग्रजीतुन शिक्षण असो अथवा मराठीतुन, शिक्षक, विद्यार्थ्याची वृत्ती, घरातले वातावरण, बुद्ध्यांक, अभ्यास करण्याची तयारी, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती हे इतर मुद्देही तेवढेच महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांना बोली भाषेतुन शिकवले तर ते विशेष लक्ष देऊन शिकतील, सगळे सोपे वाटेल असे काहीही नाही आणि एखाद्याला खरेच इंग्रजीतुन झेपत नसेल तर त्याला जबरदस्ती ते करायला लावणे हेही योग्य नाही. लहान गावांमध्ये, जिथे शाळेसाठी जागा, शिक्षक, विद्यार्थी इथपासुनच अडचणी आहेत, तिथे बोलीभाषेत का असेना, शिक्षण होणे महत्वाचे आहे.
पण सध्याच्या परिस्थितीत माझा कल देखील इंग्रजी शाळेलाच असेल हे नक्की. याची कारणे वरच्या बर्‍याच प्रतिसादात आली असल्याने परत लिहीत नाही.

वर बरेचदा जपान, जर्मनीचा उल्लेख आला. थोड्याफार अनुभवावर त्यावरच दोन सेंट्स अजुन. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जर्मन लोकांनी काय केले आहे, हे क्लिंटन यांच्या प्रतिसादात आलेच आहे. एक्का काकांनी लिहिलेल्या
या संपुर्ण परिच्छेदाशी सहमत.

याबाबतीत, बर्‍याचदा सांगितली जाणारी जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, इ देशांची उदाहरणे अज्ञानावर आधारलेली आहेत असे नम्रतापूर्वक नमूद करतो आहे ! त्या लोकसंख्येने मोठ्या समजल्या जाण्यार्‍या देशांतच नाही तर कमी लोकसंख्या असलेल्या नॉर्वे (५२ लाख), स्विडन (९८ लाख), इत्यादी देशांमध्ये
(अ) केवळ शैक्षणिक पुस्तकेच नव्हे तर जगातील अत्याधुनिक शास्त्रिय व इतर ज्ञानाचे स्त्रोत (जर्नल्स, इ) त्वरीत त्यांच्या स्थानिक भाषेत भाषांतरीत करण्याची व्यवस्था आहे
(आ) स्थानिक भाषेत मिळालेले शिक्षण उत्तम स्थानिक नोकरी मिळण्यास पुरेसे असते...

पण तरीही त्या सर्व देशांतही...
जर महत्वाची आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या कंपनीचे पद हवे असले अथवा आंतरराष्ट्रीय गटाबरोबर शास्त्रीय संशोधन करायचे असल्यास इंग्लिश भाषा आवश्यक समजली जाते.

युनेस्को काय म्हणते याचा विरोध नाही... प्रश्न आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणती पार्श्वभूमी आणि इन्फ्रास्ट्रक्चर असणे आवश्यक आहे..

+११११

आत्ताचा जर्मनीतला माझा अनुभव सांगते. मोठ्या बॉश, सिमेन्स सारख्या कंपन्या तात्पुरत्या बाजुला ठेवु. एका आकाराने लहान, ६००-८०० लोकांच्या कंपनीत मी काम करते. कंपनीचे तंत्रज्ञान अमुक एका क्षेत्रात अत्यंत महत्वाचे मानले जाते. पण सगळा आवाका फक्त जर्मनीपुरता होता. ऑस्ट्रिया, गेला बाजार फ्रान्स, इटली हे शेजारचे देश. पण आंतरराष्ट्रीय प्रकल्पात उतरायचे म्हणजे इंग्रजी यायला हवे. आणि इथे सगळे लोक मार खातात. शिक्षण जर्मन भाषेतुन झाले आहे मान्य. पण इंग्रजीची चार वाक्यंही कुणी धड बोलु शकत नाही. (अपवाद वगळता) कंपनीचे तंत्रज्ञान उत्तम दर्जाचे आहे, योग्य तो वापर करण्यात आला तर जागतिक बाजारपेठेत आत्ताहुन कित्येक पटींनी चालेल. पण हे घडु शकत नाही, कारण इंग्रजी न येणे.

आता या लोकांनी त्यांची भाषा टिकवुन ठेवली आहे, किती उत्तम वगैरे प्रतिवाद होऊ शकतील. त्यांच्या भाषाप्रेमाचा मला आदर आहे, पण यातुन जागतिक बाजारपेठेत पुढे जाण्याचीच कुणाची तयारी नाही. कशाला जायचे बाहेर, आहे ते बरे आहे हे एखाद्या व्यक्तीने म्हणणे गोष्ट वेगळी आणि कंपनीने म्हणणे वेगळे. एका चांगल्या उत्पादनाचे, महत्वाच्या क्षेत्रातले तंत्रज्ञान केवळ भाषेअभावी जर मागे पडत राहिले, तर हे योग्य नक्कीच नाही. मग जर्मनी हा प्रगत देश आहे, त्यांच्याकडे सद्यस्थितीत पैसा आहे, नाही, लोक उत्तम शिक्षण घेताहेत वगैरे महत्वाचे ठरणार नाही. जग जवळ आले आहे, इतर हजारो लोक स्पर्धेत आहेत आणि इंग्रजीचा वापर करणार्‍या इतर कंपन्या वरचढ ठरत आहेत. हे टाळायचे असेल, तर जर्मन इतकेच इंग्रजीला महत्व द्यायला हवे हे सरळ आहे.
हे कदाचित या आकाराच्या कंपनीज चे प्रातिनिधिक चित्र असु शकते. अर्थात सगळीकडे असेच आहे असे विधान करुन सरसकटीकरण करणार नाही.

आता दुसरा मुद्दा, मोठी होण्याची, जगभर विखुरण्याची कंपनीची तयारी सुरु होते. हळुहळु हातपाय मारायला सुरुवात होते. मग गरज पडते इंग्रजी येणार्‍यांची. पण बाहेरुन आलेले लोक सोडुन इथल्या लोकांना देखील आपल्या कोषातुन बाहेर पडुन इंग्रजी शिकण्याची गरज पडते. सध्याच्या ठिकाणचे बहुतांशी सहकर्मचारी हे १०० किमीच्या परिसरात बॉर्न & ब्रॉट अप असे आहेत. जे आहे त्यात सगळे खुश आहेत. मग आता यांना जर इंग्रजी येत नाही, तर आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स हँडल करण्यासाठी क्लासेस, वेगळा वेळ दिला जातो. पण यापैकी प्रत्येक जण ते करतोच असे नाही. ज्यांना शिकायचे नाही, त्यांचे वरवर बघता खूप अडत नाही कारण, या १०० किमीच्या परिसरात मुलांसाठी चांगल्या शाळा, मोठे घर, गाडी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, अथवा कुठल्याही क्षेत्रासंबंधीच्या रोजगार संधी त्यांना उपलब्ध आहेत. देशांतर्गत प्रोजेक्स्ट जर्मन भाषेतुनच होतात म्हणजे तिथेही अडचण येत नाही. पण ही परिस्थिती भारतात नाही, नजीकच्या भविष्यात होणे नाही. शिवाय जे लोक आवडीने, करीअर म्हणुन भाषेकडे सकारात्मक बघतात, त्यांना तशा संधी उपलब्ध होताना इंग्रजी येणे हा महत्वाचा मुद्दा ठरतो. यासोबतच, उत्तम इंग्रजी येणारे, जे लोक इथे येऊन सहजपणे जर्मन शिकले, त्या लोकांना मग आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थानिक लोकांपेक्षा जास्त संधी निर्माण होतात.

जेव्हा हे लोक काही ठिकाणी भाषेबद्दल एवढे आग्रही आहेत, त्याला कारणेही तशी आहेत. आणि त्यातुन बाहेर पडण्यासाठी सध्या इथेही लोक धडपडतच आहेत. ज्यांना उच्च शिक्षणासाठी, संशोधनासाठी, अगदी भटकंतीसाठी सुद्धा बाहेर जायचे आहे, त्यांना सर्व शिक्षण जर्मन मध्ये घेऊनही इंग्रजीला पर्याय नाही.

प्रतिसाद बराचसा विस्कळीत झाला आहे. पण एक्का काकांच्या प्रतिसादाला पुरवणी म्हणुन जे रोज दिसते आहे ते लिहिले.

अजुन एक अवांतर, जर्मन शिकताना व्याकरण दृष्ट्या मराठी/संस्कृतशी बरेच साधर्म्य असले, तरीही इंग्रजी चांगले येत असल्याने मला किंवा अनेक भारतीयांना फायदा होतो. हे प्रत्येक भाषेसाठी असेलच असे नाही, परंतु जर्मन बाबतीत तरी नक्कीच म्हणता येईल.

रुपी's picture

8 May 2015 - 4:16 am | रुपी

शिक्षणात भाषेशिवाय इतर अनेक बाबीही महत्वाच्या आहेत. इंग्रजीतुन शिक्षण असो अथवा मराठीतुन, शिक्षक, विद्यार्थ्याची वृत्ती, घरातले वातावरण, बुद्ध्यांक, अभ्यास करण्याची तयारी, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती हे इतर मुद्देही तेवढेच महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांना बोली भाषेतुन शिकवले तर ते विशेष लक्ष देऊन शिकतील, सगळे सोपे वाटेल असे काहीही नाही आणि एखाद्याला खरेच इंग्रजीतुन झेपत नसेल तर त्याला जबरदस्ती ते करायला लावणे हेही योग्य नाही.

>>> याच्याशी प्रचंड सहमत.

आता खूप टाईप करायला वेळ नाही, म्हणून थोडक्यात लिहिते. सरळसोट व्याख्येने माझी मातृभाषा मराठी नाही. दहावीपर्यंतचे शिक्षण माझे मराठी तर भावाचे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झाले. आम्ही दोघेही हुषार विद्यार्थी म्हणून गणले जायचो, अभ्यासेतर गोष्टींतही आपापल्या आवडी/ कल यांनुसार बरे होतो. व्यावसायिक दृष्ट्या दोघेही आपापल्या क्षेत्रात समाधानी आहोत - दोन्हीही क्षेत्रे आणि त्यात लागणारे गुण/ कसब वेगवेगळे आहेत, पण ते माध्यमामुळे/ भाषेमुळे नाही तर व्यक्तिमत्त्वामुळे आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लिहिलंय तसं बाकी बरेच घटक महत्त्वाचे असतात.

माझ्यापुरतं सांगायचं तर मला माझ्या मुलाने लहानपणीपासूनच जास्त भाषा आत्मसात केल्या तर मला नक्कीच आवडेल.

संदीप डांगे's picture

8 May 2015 - 4:48 am | संदीप डांगे

प्रतिसाद आवडला आणि पटला.

राही's picture

8 May 2015 - 7:05 am | राही

प्रतिसाद खूप आवडला.

पिलीयन रायडर's picture

8 May 2015 - 1:09 pm | पिलीयन रायडर

अत्यंत उत्तम प्रतिसाद!! जे म्हणायचे आहे त्याला उदाहरणासकट लिहीले आहेस, त्याला अनुभवाची जोड आहे, म्हणुन प्रतिसाद जास्त भावला.

मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं तरच मराठी टिकुन राहील / तरच मुलांचा पाया पक्का होइल.. ह्या भ्रामक कल्पना आहेत. माझा मामेभाउ इंग्रजी माध्यमातुन शिकला आहे, तो संस्कृतमध्ये पत्र पाठवायचा आम्हाला. आजही श्लोक वाचला कुठे तर त्यातल्या व्याकरणाच्या चुका काढतो. त्याची होणारी बायको काश्मिरी आहे, ती ४-५ वर्ष महाराष्ट्रात आहे तर "अ स्ख लि त" मराठी बोलते. अगदी म्हणी वगैरेही कळतात आता तिला.. ह्या उलट मराठी माध्यमात शिकुन आजवर साधं पु.लंच एकही पुस्तक बसुन वाचलं नाही असेही महाभाग आहेत माझ्याच घरात. त्यामुळे माध्यमाचा आणि भाषा शिकण्याचा काही संबंध नाही..

आणि मुलांचा पाया पक्का फक्त "मातृभाषेतच" होतो हे ही चुक आहे.. अशानी जी हजारो मुलं मराठी असुन इंग्रजी माध्यमात शिकली ती मागे पडायला हवी होती आणि मराठी माध्यमातली मुलं पुढेच असायला हवी होती.
असं होत नाही कारण तू वर म्हणातेस तसं अनेक इतर घटकही कारणीभुत असतात.

भारतासारख्या देशात साधं देशातल्या देशात फिरायचं झालं तर इतक्या भाषा आहेत.. ४ वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांनी नक्की एकाच विषयावर चर्चा करायची कशी? म्हणजे तुम्हाला काय ती एकच भाषा लागणारच.. जागतिक स्तरावर ती इंग्रजीच आहे.. मग उगाच आता मातृभाषेतुन शिका.. मग पुन्हा ते इंग्रजीत शिका.. कशासाठी? आणि हे करताना जी महत्वाची २-४ वर्ष वाया जातात त्याचं काय?

संदीय डांगे काका, तुम्ही दुसरा धागा नक्की काढा. पण थोडक्यात काय म्हणणं आहे ते मांडा. मला तरी खुप मोठे वाटत आहेत तुमचे प्रतिसाद.. आणि एवढं करुन काही नीट कळत नाहीये ते वेगळच.. अर्थात तो माझ्या तोकड्या बुद्धीचा दोष आहे..

क्लिंटन's picture

8 May 2015 - 2:01 pm | क्लिंटन

आणि मुलांचा पाया पक्का फक्त "मातृभाषेतच" होतो हे ही चुक आहे.. अशानी जी हजारो मुलं मराठी असुन इंग्रजी माध्यमात शिकली ती मागे पडायला हवी होती आणि मराठी माध्यमातली मुलं पुढेच असायला हवी होती.

याउलट मी म्हणेन की उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये मध्ये बहुसंख्य विद्यार्थी हे इंग्रजी शाळेत शिकलेलेच असतात. जर मातृभाषेत शिकूनच पाया पक्का होत असता तर आय.आय.टी आणि आय.आय.एम मध्ये सगळे विद्यार्थी मराठी/तामिळ/तेलुगू/बंगाली इत्यादी शाळांमधले असायला हवे होते.पण प्रत्यक्षात उलटेच चित्र दिसते.

भारतासारख्या देशात साधं देशातल्या देशात फिरायचं झालं तर इतक्या भाषा आहेत.. ४ वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांनी नक्की एकाच विषयावर चर्चा करायची कशी?

पण हे बाणेवाल्यांना कोण समजावणार?

म्हणजे तुम्हाला काय ती एकच भाषा लागणारच.. जागतिक स्तरावर ती इंग्रजीच आहे.. मग उगाच आता मातृभाषेतुन शिका.. मग पुन्हा ते इंग्रजीत शिका.. कशासाठी? आणि हे करताना जी महत्वाची २-४ वर्ष वाया जातात त्याचं काय?

हो ना. मी पण या प्रकारात चांगली चार वर्षे वाया घालवली आहेत. तो सगळा काळ आणि कष्ट मला इतर काहीतरी उपयुक्त शिकायला सत्कारणी नक्कीच लावता आले असते.

राही's picture

8 May 2015 - 3:51 pm | राही

क्लिंटन साहेब, आपले या धाग्यावरचे सगळे प्रतिसाद आवडलेले आहेत. फक्त प्रत्येक प्रतिसादाखाली तसे लिहिले नाही इतकेच.
प्रश्न वर्तमान काळाचा आहे, वर्तमानात बहुतेक सगळे ज्ञान आणि माहिती इंग्लिशमध्ये आहे हे 'न'वेळा सांगितले तरी खर्‍या समस्येचा वेध घेण्याऐवजी 'साप साप'म्हणून भुई धोपटणे थांबणार नाही. आपण उल्लेखलेली आय आय टी, आय आय एम या संस्थांतील इंग्लिश माध्यमाच्या मुलांची परिस्थिती खरे तर डोळे उघडवणारी आहे.पण लक्षात कोण घेतो? या बाबतीत एक जुना किस्सा आठवतो.चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी तथाकथित राष्ट्रप्रेमाचे भरते आलेल्या लोकांनी इंग्लिश विरुद्ध अशीच भुई बडवून मराठी शाळांमध्ये एकदम आठवीपासून इंग्लिश विषय, तोही प्राथमिक दर्जाचा सुरू केला.त्यामुळे मराठी मुले इंग्लिशचा आधार लागणार्‍या नोकर्‍यांमध्ये इतकी मागे पडली की मुंबईत दक्षिणेकडच्या इंग्लिशप्रवीण लोकांसमोर अक्षरशः त्यांची धूळदाण उडाली.(दक्षिणेत त्या वेळेस शाळांमधून इंग्लिश विषय बराच आधीपासून शिकवला जाई)या संतापातून आणि तथाकथित अपमानातून मार्मिक साप्ताहिक आणि शिवसेनेला बळ मिळाले. लुंगी हटाव आंदोलन सुरू झाले.पुढचा सर्व इतिहास आहे.मराठी तरुणांच्या दोन पिढ्या या त्राग्याच्या आणि हिंसक खळ्ळ्-खट्याकमध्ये बरबाद झाल्या.जेव्हा शिवसेनेच्या प्रभावकाळाच्या पन्नास वर्षांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या गोष्टीचे मूल्यमापन नक्की होईल.
मराठी मुले इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमुळे मागे पडत असल्याची ओरड इतकी वाढली की सरकारला पुन्हा पाचवीपासून आणि नंतर तर पहिलीपासून इंग्लिश सुरू करावे लागले.आता इंग्लिश माध्यमाकडेच सर्वांचा ओघ आहे. इतिहासाचे ट्रिगर हे कुठल्यातरी वेगळ्याच गोष्टींमध्ये दडलेले असतात आणि वरवर क्षुल्लक भासणार्‍या गोष्टी इतिहासाला कलाटणी देणार्‍या ठरू शकतात. आता तरी ही झापडे उघडावी एव्हढीच आशा.

टवाळ कार्टा's picture

8 May 2015 - 1:48 pm | टवाळ कार्टा

मधुरा देशपांडे तै...मी तिकडे जॉब शोधतो आहे...रिकामी जागा असेल तर चिकटवाल का मला?

मधुरा देशपांडे's picture

8 May 2015 - 7:52 pm | मधुरा देशपांडे

अवश्य. इकडची काहीही मदत हवी असेल तर कळवणे. :)

टवाळ कार्टा's picture

8 May 2015 - 8:32 pm | टवाळ कार्टा

रेझ्युमे पाठवू का?

मधुरा देशपांडे's picture

9 May 2015 - 3:22 am | मधुरा देशपांडे

तुमचे कार्यक्षेत्र, अनुभव, जॉब एक्स्पेक्टेशन्स इत्यादी बद्दल व्यनि करा. म्हणजे अधिक माहिती देऊ शकेन.

पण अजुन काही माहितीसाठी - मी आयटी क्षेत्रात नाही. माझा नवरा आधी शिक्षणासाठी आला आणि मग नोकरी मिळाली. मी देखील जर्मनचे कोर्सेस करुन मग नोकरी शोधली. जर्मन शिकणे लोकल कंपनीत अत्यावश्यक आहे. यासाठी कधीकधी कंपनीज मदत देखील करतात. इंग्रजी येणे हा युएसपी असला, तरीही जर्मन शिवाय चालत नाही. मोठ्या कंपनीज मध्ये अर्थात चालते, पण यात भारतातुन, इतर देशांमधुन ऑनसाईट येणारे अधिक आहेत. असे ओळखीचे लोक आहेतच जे फक्त इंग्लिश येत असुनही उत्तम नोकरीत आहेत, पण शिक्षण, कामाचा अनुभव, नोकरीचे स्वरुप, कंपनी, शहर यावर देखील हे अवलंबुन आहे.

भारतातुन इकडे जॉब्स शोधायचे असतील तर नेमकी प्रोसीजर मलाही माहिती नाही. चौकशी करु शकते. याशिवाय एकुणच रोजच्या व्यवहारात जर्मन लागते त्यामुळे तेवढे शिकणे आवश्यक वाटु लागते.

क्लिंटन's picture

8 May 2015 - 1:52 pm | क्लिंटन

प्रतिसाद प्रचंड आवडला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2015 - 1:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

वस्तुस्थितीवर आणि स्वानुभवावर आधारलेला हा सुंदर प्रतिसाद बर्‍याच गोष्टी सुगम करण्यास उपयोगी व्हावा !

राही's picture

8 May 2015 - 9:08 am | राही

श्री. डांगे यांची बहुतेक मांडणी ही तत्त्वात्मक किंवा मूल्यात्मक वाटली. ग्राउन्ड रिआलिटीचा फारसा विचार त्यात आढळला नाही. इ. एक्का यांनी 'प्रेज़ेन्ट इन्फ्रास्ट्रक्चर्'चा जो मुद्दा काढलाय तो महत्त्वाचा आहे.
भारताच्या बाबतीत बोलायचे तर अतिदूरदुर्गम भागातल्या भाषिक अत्यल्पसंख्यांकांना कोणतीच प्रमाण भाषा सुलभ, सुकर आणि आपलीशी वाटणारी नाही. यांना मुख्य प्रवाहात यायचे तर कोणत्या ना कोणत्या प्रमाणित अशा नव्या भाषेशी झटापट करून जुळवून घ्यावेच लागते.इतके कष्ट करून पुन्हा जीवनलढाईला(सन्मानाने जगण्यासाठी)लागणारे कमीतकमी गुणसंच ती भाषा मिळवून देत नाही ती नाहीच.(ही सद्यस्थिती आहे, भविष्याचा विचार येथे केलेला नाही.)
बरे त्यांना आपल्या पाळांमुळांबाबत हीनगंड वाटू लागतो,हे तर वास्तव आहे.मोठ्या तलावात आल्यावर छोट्या डबक्याविषयी अप्रीती वाटणे हे नैसर्गिक आहे. यालाच तर आपण मुख्य प्रवाहात येणे म्हणतो.तेव्हा हे भाषिक वैविध्य काही प्रमाणात(किंवा मोठ्या प्रमाणा)नष्ट होणार हे या अत्यल्पसंख्यभाषक भाषांविषयीचे वास्तव आहे. यूनेस्कोसारख्या संस्था अशा मरणोन्मुख बोलींचे दस्तऐवजीकरण करून त्यांची ओळख जपून ठेवू शकतील पण त्यांचे उपयोगित्व वाढवू शकतील काय? बरे या बोली आजच नष्ट होत आहेत असे नाही, ती शतकानुशतके चाललेली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.तसेही जीवनाचे संदर्भ बदलले की भाषा बदलते.भटक्या अवस्थेतून शेतीप्रधान अवस्थेत आल्यावर नवी औजारे, नव्या प्रक्रिया यासाठी नवी भाषा वापरली गेली असेल.मूळ भाषा पार बदलून गेली असेल, भले तिचे नाव तेच म्हणजे कायम (उदा. मराठी, हिंदी, तमीळ इ.)राहिले असेल. तर जेव्हा जीवनसंघर्ष नव्या कौशल्यांनिशी लढायची वेळ येते,तेव्हा भाषेचा ढांचा बदलतो. मुघल साम्राज्याच्या काळात मराठ्यांचा दिल्लीसाठीचा पत्रव्यवहार फारसीतून होत असे आणि त्यासाठी मुद्दाम फारसी जाणणारे लोक निर्माण केले गेले.
आजच्या युगातल्या बहुतेक सर्व नव्या संकल्पना सध्याच्या भारताबाहेर निर्माण होत आहेत.त्यामुळे त्यासाठीची सगळी शब्दप्रणाली परकीय आहे.मुळात या संकल्पनाच आपल्याला परक्या, नवख्या आहेत तर आपल्या (या बदलासाठी वेळेवर तयार होऊ न शकलेल्या) भाषेतून त्या आपण कश्या व्यक्त करू शकू? त्या संकल्पना आपल्या भाषेत, आपल्या भूमीत, आपल्या मेंदूत जन्मायला हव्यात.पुढेमागे त्या तशा निपजतीलही, किंवा निपजतीलच. पण सध्या, तोपर्यंतच्या ट्रान्ज़िटपीरियड्-संक्रमणकाळात, तात्पुरत्या म्हणून इंग्लिशच्या कुबड्या घेतल्या तर बिघडले कुठे?या कुबड्या तात्पुरत्या राहाणार नाहीत, कायम बनून जातील अशी भीती काही जणांना वाटते पण जर आपले पाय सशक्त झाले तर या कुबड्यांची गरजच उरणार नाही. पण पायही लटपटताहेत आणि हाती कुबड्याही नाहीत अशी अवस्था तर होऊ नये!

संदीप डांगे's picture

8 May 2015 - 6:22 pm | संदीप डांगे

माफ करा पण तुम्ही युनेस्को चा अहवाल आणि अ‍ॅक्टीविटी किट पूर्ण वाचले का? की फक्त मी इथे म्हणतोय 'युनेस्को अमूक म्हणतंय तमुक म्हणतंय' त्यावर फक्त हेटाळणीयुक्त टोमणे मारत आहात?

मातॄभाषेतून शालेय शिक्षणाचा आग्रह धरणार्‍या माझ्यासारख्या माणसाला तुम्ही थेट शिवसेनेच्या निव्वळ राजकारणी, गुंडगीरी करणार्‍या स्वार्थी लोकांच्या पंक्तीत बसवताय या बद्दल खरंच खेद वाटला. वारंवार लावला जाणारा मराठी बाणाचा आरोप तर जस्ट हैट्ट आहे. इतका अंदाधुंद गोळीबार मी तरी मिपावर पाहिला नाही अजून.

साप समजून भुई धोपटण्याचा कार्यक्रम तुम्ही आणि क्लिंटन दोघेही या धाग्यावर करताय असं मला वाटतंय. तुमच्या दोघांपैकी एकानेही तो अहवाल व किट मुळातून वाचलेच नाही असं तुमच्या प्रतिसादांवरून दिसतंय. तुमच्या मनात एक घट्ट बसलेली कसली तरी अढी आहे या विषयाबद्दल जी खरंच तुम्हाला अन-बायस्ड विचार करायला रोखत आहे.

मला तुमच्या शैक्षणिक, सामाजिक अथवा व्यवसायिक पार्श्वभूमीबद्दल माहिती नाही पण असा अंदाज आहे की तुम्ही खरे ग्राऊंड अजून बघितले नसावे.

अतिदुर्गम भागातल्या किती विद्यार्थ्यांमधे तुम्ही स्वत: राहिला आहात? किती शाळांमधे स्वतः जाऊन छाननी केली आहे? भारतात अस्तित्वात असलेल्या सगळ्या जाती-वर्गांच्या मुलामुलींमधे तुम्ही प्रत्यक्ष राहिलात? त्यांच्या समस्यांना जाणून घेतले? लाखो मुलांना त्यांच्या भविष्याच्या दॄष्टीने खरंच कशाची गरज प्राधान्याने आहे याचा तुम्ही विचार केलात? त्यांच्यासाठीचा मुख्य प्रवाह म्हणजे काय याची तुम्हाला जाण आहे? भारताचं सोडा, निदान महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात काय चाललंय मुलांच्या शिक्षणाबद्दल त्याबद्दल काही अभ्यास?

हे मी सर्व केलंय आणि पाहिलंय. म्हणून मला युनेस्कोचा रिपोर्ट कळला आणि पटला सुद्धा. आता अजून टोमणे आणि हेटाळणीयुक्त प्रतिसाद लिहिण्याआधी कृपया तो अहवाल आणि किट वाचून घ्या.

राही's picture

9 May 2015 - 11:31 am | राही

आता ही चर्चा व्यक्तिगत पात़ळीवर आणि आव्हानांवर उतरू लागली आहे तेव्हा माझ्याकडून इथेच पूर्णविराम.
जेव्हा एखाद्याची मते काही गृहीतकांवरून, काही निरीक्षणांवरून, काही अनुभवांवरून बनलेली असतात तेव्हा तिथे 'तुम्ही हे वाचून घ्या, ते वाचा, तुम्ही काहीच वाचलेले, अनुभवलेले दिसत नाही'अश्या व्यक्तिगत शेर्‍यांनी त्या मतांमध्ये फरक तर पडत नाहीच, उलट (प्रतिवादातला कमकुवतपणा दिसून येऊन)ती मते अधिकच ठाम बनतात.तेव्हा मी माझ्या मतांनुसार माझ्या वाटेने आणि आपण आपल्या मतांनुसार आपल्या वाटेने जावे हे श्रेयस्कर. आपल्याला शुभेच्छा. आपले कल्याण असो.

इंग्रजी माध्यमात शिक्षण सर्वांनी सदासर्वदा घ्यावं हे सांगण्यासाठी वाट्टेल त्या थराला का जावं लागतंय?

क्लिंटन एकदा म्हणत होते की उच्चशिक्षा देणार्‍या बहुतेक संस्थांमध्ये इंग्रजी माध्यमातलीच मुले दिसतात. मग म्हणतात की नारायणमुर्ती म्हणतात की आय आय टी मधल्या मुलांना इंग्रजी नीट येत नाही.

ह्यात काही विरोधाभास दिसतो का हो? जर सगळी इंग्रजी माध्यमातलीच मुले तिथे आहेत तर त्यांना इंग्रजी नीट यायला हवे ना? मुद्दा बदलून इंग्रजी माध्यमातल्या शाळेत इंग्रजी नीट शिकवत नाहीत असा मुद्दा मांडायचा होता का आपल्याला?

एकतर आय आय टी सारख्या ठिकाणी बहुसंख्येने इंग्रजी माध्यमातलीच मुले दिसतात ही एक लोणकढी थाप असली पाहिजे. किंवा मग इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी नीट शिकवत नसले पाहिजेत. मग कसं पाठवायचं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना? जिथे इंग्रजी पण नीट शिकवत नाहीत?

एक तर इंग्लिश माध्यमातूनच शिक्षण घ्या, अशी सक्ती नाहीच. फक्त लोकांचा ओढा एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर (मोठ्या प्रमाणावर नसता तर ही चर्चा कदाचित घडलीच नसती.)इंग्लिश माध्यमांकडेच का आहे, ते लक्ष्यात घ्यावे असे म्हणणे होते.
दुसरे म्हणजे इंग्लिश माध्यमांतील मुलांचे इंग्लिशही जिथे अपेक्षित पातळीइतके उच्च(होय, काही ठिकाणी उच्च पातळीच्या इंग्लिशची अपेक्षा ठेवली जाते)वाटत नाही, तिथे मराठी माध्यमातील मुलांचे काय होत असेल?
तिसरे म्हणजे माध्यमांचा हा वाद काही आजकालचा नाही.चाळीसपन्नास वर्षांपूर्वी 'साम्राज्यशाहीचे प्रतीक असलेले अंग्रेजी हटाओ'असा एल्गार इंग्लिशविरुद्ध छेडला गेला होता. त्यात प्रामुख्याने राम मनोहर लोहिया आदि समाजवादी होते.त्यावर खूप ऊहापोह झाला. अनेकांनी- यात शिक्षणतज्ञ,राजकारणी, वृत्तपत्रकार्,उद्योजक सामान्य नागरिक असे सर्व प्रकारचे लोक होते- मते मांडली. विद्वान आणि साहित्यिक हे मराठीच्या बाजूचे होते.मातृभाषेतील शिक्षण हेच उत्तम शिक्षण हा मुद्दा तत्कालीन वर्तमानपत्रांतून लिहित्या वर्गाकडून जोरदारपणे मांडण्यात आला. यासाठी बालमानसशास्त्र,मेंदूची रचना-वाढ इत्यादींची साक्ष काढण्यात आली.इंग्लिशवाल्यांनीही इंग्लिशचे व्यावहारिक उपयोग हिरिरीने मांडले. मग बरीच भवति न भवति होऊन त्रिभाषा सूत्र उदयाला आले. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची, मराठी मातृभाषा आणि इंग्लिश असा तीन भाषांचा बोजा पडला. उत्तरेत दोनच भाषा शिकाव्या लागणार होत्या. उत्तरेस मिळणार्‍या ह्या परिस्थितीजन्य फायद्यामुळे व इतरही काही कारणांमुळे दक्षिणेत हिंदीविरुद्ध जोरदार आंदोलन पेटले.त्यांनी त्यांची प्रादेशिक भाषा(मातृभाषा) आणि इंग्लिश या सूत्राचाच आग्रह धरला. (तेव्हाचा लॅन्ग्वेज फॉर्म्युला हा थोडा गुंतागुंतीचा होता, पण तो मुख्य मुद्दा नाही.)ह्या सर्वांत राजकारणी आणि साहित्यिकांनी वेगवेगळ्या हेतूंनी मराठीची बाजू घेतली.फारच थोड्यांची भूमिका 'बोले तैसा चाले' अशी होती. पण सर्वसामान्य लोकांनी मात्र आपला मार्ग स्वतःच निवडायला सुरुवात केली.क्रिस्टियन मिशनर्‍यांनी चालवलेल्या तेव्हाच्या काही थोड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर प्रवेशासाठी खूप दबाव येऊ लागला. जे राजकारणी वरवर मराठीला प्राधान्य देत होते, त्यांच्या चिट्ठ्या प्रवेशाच्या वशिल्यासाठी या शाळांच्या फादर किंवा मुख्याधिकार्‍यांकडे पोचू लागल्या. ज्या अधिकार्‍यांनी त्या मानल्या नाहीत, त्यांच्या शाळांसमोर उग्र निदर्शने, घेराव, तोंडाला काळे वगैरे प्रकार झाले. मागणी खूप आहे हे बघून मग या राजकारण्यांनीच (आणि काही उद्योगपतींनीही)इंग्रजी शाळा काढल्या. आता हा वाद खूप जुना झाला आहे आणि लोकांनीच व्यवहारवादाची बाजू घेऊन त्याचा निकालही आपल्या परीने लावून टाकला आहे. मागणी होती म्हणून इंग्लिश माध्यमाच्या शाळा फोफावल्या. मागणी नसेल तर त्या आपोआप बंद पडतील. गेल्या चाळीस वर्षांत हळू हळू इंग्लिश माध्यमाच्या शाळा वाढल्याचे फारसे वाईट परिणाम मराठीवर झालेले दिसले नाहीत.उलट अलीकडे इंग्रजीत आणि मराठीत समर्थपणे लिहू-बोलू शकणार्‍या तरुणांची संख्या वाढते आहे. देशी भावविश्वाचे इंग्लिशमध्ये प्रकटीकरण होऊ लागल्यामुळे ते इतरांपर्यंतही पोचू लागले आहे. ग्लॅमर आणि पैसा ह्या (आनुषंगिक)बाबी तर आहेतच.
अशा तर्‍हेने या वादाला बालमानसशास्त्र किंवा एखाद्या(प्रभावशाली) संस्थेचा अहवाल हा एकच संदर्भबिंदू नसून अनेक व्यवहारी अंगे,दडपलेल्यांच्या आशाआकांक्षा,नेत्यांचे अनुकरण,अभिजनांमध्ये गणले जाण्याची सुप्त इच्छा, उपयुक्ततावाद असे अनेक पैलू आहेत. भारतीय चौकटीत पाहिल्यास सध्या प्रबोधनाची जी घुसळण समाजात चालू आहे, त्याही अंगाने या वादाकडे पाहिले पाहिजे.मानवजात, किंबहुना सर्व प्राणिजात अतिशय चिवट आहे.जीवनसंघर्षात टिकण्याचा मार्ग खडतर असला तरी ती तो (टिकून राहाण्याच्या)उपजत प्रेरणेनुसार यथाशक्ति अनुसरते.
असो. आता याउप्पर खरोखरच काही मुद्दे (दोन्ही बाजूंनी)राहिलेले नाहीत.

प्यारे१'s picture

10 May 2015 - 9:14 am | प्यारे१

काय ठरलं शेवटी?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2015 - 10:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पोरन्ना शिकवायचं नाही...गुरं हाकायला पाठवायचं ;)

जेपी's picture

10 May 2015 - 12:01 pm | जेपी

mi tar kadhi paasun boltoya..

(guraakhi) jepi

प्यारे१'s picture

10 May 2015 - 3:37 pm | प्यारे१

हे कुठलं 'माध्यम' जेपी?

संदीप डांगे's picture

10 May 2015 - 4:35 pm | संदीप डांगे

हेच ते माध्यम ज्यात अतिदुर्गम भागातली मम्मी आपल्या सन ला इंस्ट्रक्श्न देते, 'काउंना ग्रास ईट करायला सेंड करायचं.'

द्विशतका निमीत्त तमाम लोकांचा सत्कार एक एक मराठी आणी इंग्रजी टाइप करणारा किबोर्ड देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम अडाणी कार्यकर्ते.

नमकिन's picture

18 May 2015 - 2:25 pm | नमकिन

Mumbai parisarat marathi shala sankhya ghatat challi aahe, Kaalch (17-May)zalelya "Marathi Shala Tikwalya pahijet" sammelanat www.marathishalatikwa.in' ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. तिची घोषणा या बैठकीत करण्यात आली.
Bharat deshat matrubhashetun shikshan he shirshak asale tari sadhya maharashtra purte paahile tar- Bhashwaar prantrachana zalyaapasun aajtovar maharashtraat 18% tar Kerala t 50% tar Tamilnadu 36% mule English medium madhun shikat aahet, parantu jar ka Mumbai aani itar sharant aajchya ghadila Marathi shalanchi sankhya chintajanak ritya ghatat aahe aani Shikshan mandalalt Waykar x Tawade chitra disatey.
Maadhyam partawani (ghar wapasi) dekhil nakkich shakya aahe mulanchi 3-4std paryant, D. S. Highschool, Sion yethe ase pravesh 4th std la dilet 12-15 mulanche palak gheun aale hote ya varshi.
Aarthik bajune vichar kela tar ase disun yete ki bahutansh marathi shalanche maidaan + imaarat ashi vistirna jaga mokyachi thikane asalyane nemake dhokyache thikaan tharat aahe.
Aajahi jar ka Matrubhasha hich parisar bhasha asel tar nakkich parbhashik dekhil aapalya mulana parisar bhaashet shikshan detil, aata parisar bhashecha astivta japnyacha aani sanwardhan karnyachi jababdari aaplich!

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Jun 2015 - 10:52 am | पुण्याचे वटवाघूळ

दोन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल लागला. त्यात इंग्लिश मिडियममधले ९६.५९% तर मराठी माध्यमातले ९३.८६% विद्यार्थी पास झाले. म्हणजे इंग्लिश शाळेमधले विद्यार्थी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त प्रमाणावर पास झाले असे म्हणायला नको का? मटामधली ही बातमी वाचा.

पण या चर्चेत तर सूर दिसत आहे की इंग्लिश शाळेत शिकले तर संकल्पना कळत नाहीत आणि मराठी शाळेत शिकले तर त्याच संकल्पना कळायला सोपे जाते. भिंगाचा वापर करून पेपर जाळता येतो हे शिकायला कोणत्याही भाषेची गरज नाही वगरे वगरे. तसे असेल तर इंग्लिश शाळांचा निकाल मराठी शाळांपेक्षा जास्त कसा लागला हे मराठी शाळांचे समर्थक सांगू शकतील का? काय म्हणता संदीप डांगे, क्न्फ्युज्ड अकौंटंट?

संदीप डांगे's picture

11 Jun 2015 - 11:08 am | संदीप डांगे

आधी एक माहिती काढा बघू. इंग्रजी शाळा किती आणि मराठी शाळा किती ते? मग हे टक्केवारीची गणितं खेळूया. काय म्हंता?

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Jun 2015 - 11:50 am | पुण्याचे वटवाघूळ

तुम्ही हा प्रश्न विचारणार हे माहितच होते. शाळांच्या नावावरून ती शाळा मराठी आहे की इंग्लिश हे कळत नाही. उदाहरणार्थ सरस्वती विद्यामंदिर ही मराठी शाळा असू शकते किंवा इंग्लिश शाळाही असू शकते. तेव्हा शाळांचे निकाल बघून काहीच अनुमान बांधता येणार नाही. बोर्डाच्या साईटीवर ते पण निकाल आहेतच. तेव्हा याच माहितीसाठी मी अजून एक प्रॉक्सी वापरले. बोर्डाच्या वेबसाईटवर प्रत्येक विषयातील पासिंग टक्केवारी दिलेली असते. त्यातील मराठी (प्रथम भाषा) म्हणजे मराठी शाळेतील विद्यार्थी आणि इंग्रजी (प्रथम भाषा) म्हणजे इंग्रजी शाळेतील विद्यार्थी असतात. सगळ्या बोर्डांमध्ये इंग्रजी (प्रथम भाषा) विषयाचा निकाल मराठी (प्रथम भाषा) यापेक्षा जास्त लागला आहे. पण मुंबई वगळता इतर सगळ्या बोर्डांमध्ये मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा बर्‍याच पटींनी जास्त आहे.त्यामुळे इतर बोर्डांमध्ये तो 'लो बेस' इफेक्ट म्हणून त्याचे समर्थन कोणी करू शकेल. सगळा विदा मिळाल्याशिवाय अनोव्हा टेस्ट करता येणार नाही.

पण मुंबई बोर्डात मात्र मराठी आणि इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास सारखीच आहे. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या थोडी जास्त आहे. तरीही मुंबईतही पुढील निकाल लागले आहेत--

APPEARED PASSED PASS PERCENTAGE
MARATHI (1ST LANG) 152579 143122 93.80
ENGLISH (1ST LANG) 139641 133454 95.56

हे निकाल http://mahresult.nic.in/ssc2015/divi4/S4-SUBJ.htm वर बघता येतील.

इतर बोर्डांमध्ये हा फरक अजून जास्तही आहे.पण तो लो बेस इफेक्ट म्हणून ध्यानात घेत नाही.

बाकी गणित, सायन्स वगैरे भाषा स्पेसिफिक नसलेल्या विषयांचे माहित नाही पण दस्तुरखुद्द भाषेमध्ये मात्र इंग्रजी शाळेतील विद्यार्थीच अधिक प्रमाणात पास झाले आहेत हा गुंता कसा सोडविणार? जर का इंग्रजी शाळेत शिकणे हा आकलनासाठीचा अडसर असेल तर तसे व्हायला नको बरोबर की नाही?

(एम.एस.सी स्टॅटिस्टिक्स) पुण्याचे वटवाघूळ

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Jun 2015 - 11:52 am | पुण्याचे वटवाघूळ

पण मुंबई बोर्डात मात्र मराठी आणि इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास सारखीच आहे. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या थोडी जास्त आहे.

यातील दुसरे वाक्य ---मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या थोडीच (सुमारे १०% ने) जास्त आहे--- असे हवे.

सोडा हो सगळं... गुजराती घ्या. ९५.६६%!! इंग्रजीपेक्षाही जास्त!

दोन तीन टक्क्यांच्या पास पर्सेंटेज मधल्या फरकावरून मराठी भाषेतील शिक्षणावर टीप्पणी करण्याचा प्रयत्न अफाट धाडशी आहे! आपल्या धाडसाला सलाम!!

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Jun 2015 - 12:16 pm | पुण्याचे वटवाघूळ

दोन तीन टक्क्यांच्या पास पर्सेंटेज मधल्या फरकावरून मराठी भाषेतील शिक्षणावर टीप्पणी करण्याचा प्रयत्न अफाट धाडशी आहे! आपल्या धाडसाला सलाम!!

हा हा हा.मुद्दा हा की इथली काही मंडळी म्हणत आहेत की इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे आकलनावर परिणाम होतो. तसे असेल तर इंग्रजी शाळांचा निकाल बराच कमी लागायला हवा. इथे तसे होताना दिसत नाही तर इंग्रजी शाळांचा निकाल जास्तच आहे (इंग्रजी या पहिल्या भाषेत). हा गुंता कसा सोडविणार ते सांगा.

आणि हो माझ्या दृष्टीने मुलांचे शिक्षण हा फारसा गांभीर्याने घ्यायचा विषय नाही असे काहीसे खाली बरळला आहात ते कशावरून या प्रश्नाचे पण उत्तर द्या की. बाकीचे नंतर बघू.

इंग्रजी भाषेत शिकल्यामुळे आकलनावर परीणाम होतो, असे मी कुठे म्हणालो आहे ते दाखवताल का? मी शोधले पण मला सापडले नाही. मुळात तसे माझे मत नाहीच. पण कधी कधी शब्द इकडचा तिकडे झाल्यामुळे तसा अर्थ निघणारे एखादे वाक्य मी लिहिले असू शकते. आपण माझे नाव घेऊन मला विचारता आहात, याचा अर्थ आपण तर माझे तसे वाक्य वाचलेले आहेच. कृपया दाखवता का?

शालांत परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे असलेले मार्क मिळवणारे मुल, कुठला भाषा विषय प्रथम म्हणून निवडते, यावर आधारीत आकडेवारीवरून जर आपण शिक्षणासाठी कुठले माध्यम योग्य ह्याविषयी निष्कर्श काढू इच्छिता तर आपण या विषयावर गंभीर नाही असेच म्हणावे लागेल.

संदीप डांगे's picture

11 Jun 2015 - 12:20 pm | संदीप डांगे

मि. एम.एस.सी स्टॅटिस्टिक्स,

स्वत:च्या मताच्या सोयीने आकडेवारीची एकतर्फी मांडणी करून एकूण मुलांपैकी फक्त १ टक्का मुलांच्या निकालावरून तुम्ही 'शिक्षणाचे भाषा माध्यम' हा विषयच बाद करत आहात. तेव्हा तुमच्या सांख्यिकीच्या अभ्यासाबद्दल मनापासून दाद द्याविशी वाटत आहे. तुमच्या ह्या लॉजिकने तर पहिलेछूट पूर्ण शिक्षणव्यवस्थाच नापास होत आहे. कारण जर ७-६ टक्के मुलं नापास होतात तर ती शिक्षणव्यवस्थाच कुचकामी आहे. नाही? भाषा माध्यम ते तर फार लांब राहिलं.

भले शाब्बास! तुम्ही जिंकले, आम्ही हरलो!

धन्यवाद!

(दहावी गणितः ५४/१५०) संदीप डांगे

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Jun 2015 - 12:28 pm | पुण्याचे वटवाघूळ

इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे आकलनावर परिणाम होतो आणि मराठी शाळेत शिकल्यामुळे आकलन चांगले होते हा इथल्या काहींचा मुद्दा आणि प्रत्यक्षातली आकडेवारी सुसंगत नाही एवढेच दाखवून द्यायचे आहे. जर इंग्रजी शाळेत शिकून आकलन चांगले होत नसेल तर निकाल बराच कमी लागायला हवा.पण तसे होताना दिसत नाही.त्याविषयी काय?

तुमच्या ह्या लॉजिकने तर पहिलेछूट पूर्ण शिक्षणव्यवस्थाच नापास होत आहे. कारण जर ७-६ टक्के मुलं नापास होतात तर ती शिक्षणव्यवस्थाच कुचकामी आहे.

मी जे काही लिहिले आहे त्याविषयीच उत्तरे देण्यास बांधिल आहे. इतर तर्क तुम्ही लढवत असाल तर त्याविषयी उत्तरे देण्यास मी बांधील नाही.

संदीप डांगे's picture

11 Jun 2015 - 12:46 pm | संदीप डांगे

तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी तुम्ही दिलेली सांख्यिकीची मांडणी एकतर्फी आणि बालिश आहे हेच जर तुम्हाला कळत नसेल तर चर्चा करून उपयोग नाही. दोन्ही भाषेतील नापासांमधला एक-दोन टक्का फरक हा तुमच्या सांख्यिकी दृष्टीने आकलनाच्या मोजमापासाठी कसा महत्त्वाचा आहे हे मला तरी कळले नाही. त्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही.

तुमचे तर्क ज्या आधारावर मांडले आहेत ते असे असावे बहुधा:
१. आकलनक्षमतेचे मोजमाप मार्क्सवरून सिद्ध होते.
२. रट्टा मारून मिळवलेले मार्क्स म्हणजे गुणवत्ता असते.
३. इंग्रजी व मराठी शाळेत शिक्षण घेणार्‍या यच्चयावत मुलांची आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, कौटुंबिक पातळी समान असते.

म्हणूनच म्हटले, जिवंत माणसांना स्टॅटीस्टीक्सचे आकडे करून तुम्ही जिंकलात. काँग्रॅचुलेशन्स!!!

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Jun 2015 - 12:59 pm | पुण्याचे वटवाघूळ

दोन्ही भाषेतील नापासांमधला एक-दोन टक्का फरक हा तुमच्या सांख्यिकी दृष्टीने आकलनाच्या मोजमापासाठी कसा महत्त्वाचा आहे हे मला तरी कळले नाही.

याचे कारण मुळातल्या चर्चेत आणि प्रतिसादांमध्येही म्हटले आहे की इंग्रजी शाळेत शिकले की आकलन चांगले होत नाही आणि मराठी शाळेत शिकले की आकलन चांगले होते. तसे असेल तर इंग्रजी शाळांचा निकाल मराठी शाळांपेक्षा बराच कमी लागायला हवा होता.पण तसे न होता तो उलट मराठी शाळांपेक्षाही जास्त लागत आहे.तसे असेल तर मुळातले गृहितक--- इंग्रजी शाळांमध्ये आकलन चांगले होत नाही हे चुकीचे आहे असे का म्हणू नये?

१. आकलनक्षमतेचे मोजमाप मार्क्सवरून सिद्ध होते.

२. रट्टा मारून मिळवलेले मार्क्स म्हणजे गुणवत्ता असते.

ठिक आहे. म्हणजे मराठी शाळांमधले विद्यार्थी रट्टा मारत नाहीत आणि केवळ इंग्लिश शाळांमधलेच विद्यार्थी रट्टा मारतात असे थोडीच आहे?

३. इंग्रजी व मराठी शाळेत शिक्षण घेणार्‍या यच्चयावत मुलांची आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, कौटुंबिक पातळी समान असते.

म्हणजे मराठी शाळेत शिकल्यावर आकलन चांगले होते आणि इंग्रजी शाळेत होत नाही हा दावा करताना हा प्रश्न पडत नाही. पण हे मुळातले गृहितक चुकीचे आहे हे दाखवणारी आकडेवारी दिल्यावर मात्र असे प्रश्न पडतात. मजाच म्हणायची.

संदीप डांगे's picture

11 Jun 2015 - 1:26 pm | संदीप डांगे

मुळात ही मार्कांची, पास-नापासांची आकडेवारी 'आकलन' सिद्ध करते असं तुम्हाला कसं काय वाटतं बुवा? माझ्या या प्रश्नाला तुम्ही अजूनही उत्तर दिले नाही.

मी तरी माझे मुद्दे मांडतांना मार्क्स हा आधारभूत मुद्दा मांडलेला नाही. चर्चेत जो मुद्दाच नाही त्याच्या अनुषंगाने तिरपागडं गणित मांडून काहीही निष्कर्ष काढायची तुम्हाला मुभा आहे पण त्याने काही सिद्ध होते असे नाही.

तुम्हालाच मूळ धागा आणि चर्चेचा मुद्दा कळलेला नाही असे दिसत आहे. संपूर्ण चर्चेत दोन्ही बाजूपैकी कुणीही मार्क्स हा मुद्दा ग्राह्य धरलेला दिसत नाही. माझी विनंती आहे की पुढे काही लिहण्याआधी लेख आणि चर्चा एकदा नीट वाचून घ्या.

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Jun 2015 - 1:33 pm | पुण्याचे वटवाघूळ

बरं मग आकलन नक्की कुठल्या आधारावर सिध्द करता येते? कारण मराठी शाळेचा इतका हिरीरीने पुरस्कार तुम्ही करत आहात त्याला नक्की आधार काय? माझी दोनही मुले इंग्रजी शाळेत आहेत. ते नक्की काय मिस करत आहेत असे तुम्हाला वाटते?

वेल्लाभट's picture

11 Jun 2015 - 1:48 pm | वेल्लाभट

बाकी कुणाला 'वाटण्या'पेक्षा ते तुम्हाला 'कळलं' तर उत्तम.

वेल्लाभट's picture

11 Jun 2015 - 12:10 pm | वेल्लाभट

ते टक्केवारी वगैरे ठीक आहे.
त्या आधी होतंय ते महत्वाचं आहे. असंख्य हुशार मुलं आपल्या अतिहुशार पालकांच्या इंग्रजीबद्दलच्या पोकळ कल्पनांमुळे इंग्रजी शाळांमधे ढकलली जातात. या हुशार मुलांमुळे इंग्रजी शाळातला निकालाचा टक्का वाढतो. त्यांना मराठी शाळात घातलं तर ते ९३ चे ९९ पण होतील.

मुद्दा काय आहे? माध्यम कुठलं हवं की माध्यमातला निकालाचा टक्का?

सांगू तर शक्तो, पण जो खोडसाळ सूर लावला आहे प्रश्न विचारताना, त्यामुळे उत्तर देण्याची इच्छा नाहिशी झाली आहे.

धन्यवाद.

(पुन्हा कधी इच्छा झाली, तर परत येऊन नक्कीच सांगेन.)

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Jun 2015 - 11:24 am | पुण्याचे वटवाघूळ

सांगू तर शक्तो, पण जो खोडसाळ सूर लावला आहे प्रश्न विचारताना, त्यामुळे उत्तर देण्याची इच्छा नाहिशी झाली आहे.

हा हा हा. अहो उत्तर द्यायचे नसेल तर देऊ नका.पण असले काहीतरी पुचाट कारण देऊ नका हो.

धन्यवाद

मुलांचे शिक्षण हा आपल्या दृष्टीने वेळ घालवायचा विषय आणि प्रश्न असला तरी मला तो एवढ्या हलकेपणे घेता येणार नाही. आत्ता तरी नाही.
वेळ मिळाल्यावर आपल्या खोडसाळपणाला उत्तर द्यायचा प्रयत्न करणारच आहे.

सध्या वर संदीप डांगे जे विचारत आहेत, त्याचेही उत्तर द्यायचा विचार करा, जमल्यास.

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Jun 2015 - 12:03 pm | पुण्याचे वटवाघूळ

मुलांचे शिक्षण हा आपल्या दृष्टीने वेळ घालवायचा विषय आणि प्रश्न असला तरी....

हे अनुमान नक्की कशावरून बांधलेत? कळफलक हातात आहे म्हणून उगीच काहीच्या काही कळा बडवू नका.

मला तो एवढ्या हलकेपणे घेता येणार नाही. आत्ता तरी नाही....

तो तुमचा प्रश्न झाला. तुम्ही कुठलीही गोष्ट हलकेपणे घ्या किंवा जडपणे घ्या त्यामुळे इतरांना काहीच फरक पडणार नाही.

वेळ मिळाल्यावर आपल्या खोडसाळपणाला उत्तर द्यायचा प्रयत्न करणारच आहे.

म्हणजे तुम्ही इतरांवर "मुलांचे शिक्षण हा वेळ घालवायचा विषय असल्याचा" बिनबुडाचा आरोप करणार आणि वर इतरांनी काही प्रश्न विचारला तर तो खोडसाळपणा म्हणणार? बहोत अच्छे.

सध्या वर संदीप डांगे जे विचारत आहेत, त्याचेही उत्तर द्यायचा विचार करा, जमल्यास.

तुम्ही हे बडवायच्या दोन मिनिटे आधीच ते उत्तर दिले आहे. तेही वाचायचा विचार करा, जमल्यास.

वेल्लाभट's picture

11 Jun 2015 - 12:14 pm | वेल्लाभट

वैयक्तिक चर्चेपेक्षा संयुक्तिक चर्चा झाल्या तर बरं.

बाकी सगळ्या माध्यमांपेक्षा हे माध्यम महत्वाचं असतं नेहमी.

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Jun 2015 - 12:18 pm | पुण्याचे वटवाघूळ

वैयक्तिक चर्चेपेक्षा संयुक्तिक चर्चा झाल्या तर बरं.

मान्य. पण वैयक्तिक चर्चेवर सुरवातीला कोण गेले? मी नाही तर अकाऊंटंट गेले. तेव्हा जे काही सांगायचे असेल ते त्यांना सांगितलेले बरे.

वेल्लाभट's picture

11 Jun 2015 - 12:33 pm | वेल्लाभट

बरं. :)
व्यापक सल्ला होता तो. कुणा एकाला उद्देशून नव्हे.

वेल्लाभट's picture

11 Jun 2015 - 12:37 pm | वेल्लाभट

समजांपेक्षा गैरसमज अधिक पटकन पसरतात आणि पक्के होतात.
इंग्रजीचा वृथा हव्यास हा तसाच एक.

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Jun 2015 - 12:39 pm | पुण्याचे वटवाघूळ

समजांपेक्षा गैरसमज अधिक पटकन पसरतात आणि पक्के होतात.

हो ना. इंग्रजी शाळेत शिकले की आकलन होत नाही आणि मराठी शाळेत शिकले की आकलन चांगले होते हा पण असाच एक गैरसमज.

वेल्लाभट's picture

11 Jun 2015 - 1:46 pm | वेल्लाभट

बर.

हा 'गैर' आता वाटतोय काही लोकांना. मुळात हा समज नाही. हे वास्तव आहे. आणि दोन पिढ्यांपूर्वी हे सर्वमान्य होतं. मग इंग्रजी चा अतिरिक्त उदो उदो पद्धतशीरपणे केला गेला. मग लोकं भुलली. पण असो.

लॉजिकली बघू.
युनेस्को ने पब्लिश केलेल्या रिसर्च नुसार मातृभाषेतील शिक्षण हे आकलनशक्तीच्या सशक्ततेसाठी पूरक असतं.
जिओग्राफिकली, जपान, जर्मनी, फ्रान्स अशा इंग्रज्येतर भाषिक देशांमधेही मातृभाषेतूनच शिक्षण दिलं जातं. आग्रहाने. तिथे हा गैरसमज नाही हं वाटत कुणाला.
हिस्टॉरिकली आपण मातृभाषेतूनच शिकत आलोत. आणि तसं शिकलेल्या पिढ्यांनीच आज इंग्रजी श्रेष्ठ आणि मराठी कनिष्ठ वाटणारी ही पिढी जन्माला घातली आहे. त्यामुळे,

गैरसमज काय आणि कुणाचा हे उघड आहे.

असंका's picture

11 Jun 2015 - 1:30 pm | असंका

वरचा प्रतिसाद पुण्याचे वटवाघूळ यांच्या सोयीसाठी पुन्हा इथे देत आहे.

इथली काही मंडळी म्हणत आहेत की इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे आकलनावर परिणाम होतो.

इंग्रजी भाषेत शिकल्यामुळे आकलनावर परीणाम होतो, असे मी कुठे म्हणालो आहे ते दाखवताल का? मी शोधले पण मला सापडले नाही. मुळात तसे माझे मत नाहीच. पण कधी कधी शब्द इकडचा तिकडे झाल्यामुळे तसा अर्थ निघणारे एखादे वाक्य मी लिहिले असू शकते. आपण माझे नाव घेऊन मला विचारता आहात, याचा अर्थ आपण तर माझे तसे वाक्य वाचलेले आहेच. कृपया दाखवता का?

आणि हो माझ्या दृष्टीने मुलांचे शिक्षण हा फारसा गांभीर्याने घ्यायचा विषय नाही असे काहीसे खाली बरळला आहात ते कशावरून या प्रश्नाचे पण उत्तर द्या की. बाकीचे नंतर बघू.

शालांत परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे असलेले मार्क मिळवणारे मुल, कुठला भाषा विषय प्रथम म्हणून निवडते, यावर आधारीत आकडेवारीवरून जर आपण शिक्षणासाठी कुठले माध्यम योग्य ह्याविषयी निष्कर्श काढू इच्छिता तर आपण या विषयावर गंभीर नाही असेच म्हणावे लागेल.

नमकिन's picture

22 Jun 2015 - 4:56 pm | नमकिन

प्रत्यक्षात इथे जो वाद व दावा चाललाय तो आग सोमेश्‍वरी.............वाटला.
मुळात जे पास ज़अलेत त्यांचा आकळनाचा पडताला का? बरे जो पास आहे तो नक्की किती गुणधरक आहे की 35 च्या वरचा. जो विध्यर्थी नापास आहे त्याचे आकलन पडताळण्याची गरज आहे म्हणजे तो नेमका त्या गुन्स्पर्धक मुलाच्या (मराठी ) तुलनेत कुठे आकलनात कमी पडला आणि पुढे जर का त्या संदर्भात कुणाला आपल्या सांखिकी कौशल्याचा काही जरूर लाभ होईल.
जर का युनेसको ला प्रतिवाद करयकचा असेल तर आपला आभ्यास तगडा हवा , पथदर्शक
प्रयत्नाचे स्वागत.

"व्यथा खेड्यातिल मुलांचि"
खेड्या पाड्याच्या शाळेत दिसे,
विद्यार्थ्याचा रुसवा
अ आ इ ई नको मास्तर,
ABCD शिकवा !
मराठी आमची मातृभाषा,
त्याचा आम्हालाही अभिमान
पण द्या हो मास्तर थोडं
इंग्लिश स्पीकिंगचे ही ज्ञान !
बापुला आम्ही भेटलो,
आता अब्राहम लिंकनला भेटवा
अ आ इ ई नको मास्तर
ABCD शिकवा !
रामायण महाभारत आम्ही,
आजीकडेच शिकलो
रावण कुंभकर्णचा विचार करीत,
रोजच आम्ही पकलो
राम कृष्ण बघितले आता,
थॉमस एडिसन ही दाखवा
अ आ इ ई नको मास्तर
ABCD शिकवा !
बाप आमचा शेतकरी,
पिकवतो जमीन काळी
इंग्रजीच्या अभावामुळे,
जातो रोजच त्याचा बळी
काळ्या आईच्या पोटी मास्तर,
बिल गेट्सची टेक्नॉलॉजी शिकवा
अ आ इ ई नको मास्तर,
ABCD शिकवा !
चुलता माझा आर्ट बी. कॉम,
त्याच्या काहीच नाही म्होरं
करतो शेती, काढतो शेण,
रोजच वळतो ढोरं !
गावाबाहेर पडण्या मास्तर,
आम्हांला तरी इंग्लिश शिकवा
अ आ इ ई नको मास्तर,
ABCD शिकवा !
इंग्लिश मीडियम आमच्या खेड्यात,
करा कुणीतरी खुलं
शिकून सवरून मोठं होईल,
शेतकऱ्यांचही मुलं
कळकळ आमच्या जीवाची मास्तर,
तुम्ही सरकारला दाखवा
अ आ इ ई नको मास्तर,
ABCD शिकवा !
झाले क्रांतिकारक अनेक
झाले नेते हो अनेक
जो वर्गा बाहेर राहुन
झाला भारत देशाचा घटणाकारं
त्या डॉ.भिमराव आंबेडकरांचा
खरा इतिहास आम्हा दाखवा
अ आ इ ई नको मास्तर,
ABCD शिकवा !

संदीप डांगे's picture

6 Jul 2015 - 7:44 pm | संदीप डांगे

कवीला थॉमस एडीसन शाळेत गेला नव्हता हे माहित नै बहुतेक ;-)

आणि बर्‍याच चुका आहेत. पण जौ दे, काय ते नेमी नेमी शक्ती अन् वेळ वाया घालवायचा.

dadadarekar's picture

7 Jul 2015 - 8:01 am | dadadarekar

एडिसनबद्दल शिकवा असे ते म्हणत आहेत.

एडिसन शाळेत गेला होता का ? याच्याशी त्याचा संबंध नाही.

"ते" कोण? शाळकरी मुले? की कवी?

भाषेचं माध्यम कुठलं का असेना, शिक्षणाचं माध्यम ज्ञानेश्वर विद्यापीठ असावं ब्वॉ

संदीप डांगे's picture

11 Jul 2015 - 11:23 pm | संदीप डांगे

;-) :-D