बालकवी

जयेश माधव's picture
जयेश माधव in काथ्याकूट
24 Nov 2008 - 2:08 pm
गाभा: 

आपल्याकडे बालकवि या॑च्यावीषयी काही माहीति आहे काय?

प्रतिक्रिया

सर्किट's picture

24 Nov 2008 - 10:43 pm | सर्किट (not verified)

त्र्यंबक बापूजी ठोमरे.
लोकमान्य टिळकांनी त्यांना बालकवी हे अभिधान दिले.
रेव्हरंड टिळकांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते.
श्रावणमासी हर्ष मानसी, आणि औदुंबर ह्या कविता त्यांनी लिहिल्या.

(का लिहिल्या, ते प्रा. बिरुटे सांगू शकतील.)

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मुक्तसुनीत's picture

25 Nov 2008 - 12:15 am | मुक्तसुनीत

लोकमान्य टिळकांनी त्यांना बालकवी हे अभिधान दिले.
कवी आणि गंधर्वात काही गल्लत तर होत नाही ना ?

सर्किट's picture

25 Nov 2008 - 12:32 am | सर्किट (not verified)

काही वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केल्याने, चुकीची माहिती अत्यंत आत्मविश्वासाने सांगण्याची आम्हाला सवय आहे.

होय, गल्लत झाली.

-- (स्वतःचेच कान धरलेला) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2008 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(का लिहिल्या, ते प्रा. बिरुटे सांगू शकतील.)

बालकवी मुळातच आपल्या समकालीन जीवनातील सामाजिक व राजकीय परिस्थीतीबद्दल अत्यंत उदासीन होते. राजकीय आंदोलने, महायुद्धे या संबधीचे संदर्भ त्यांच्या कवितेत सापडत नाही (चुभुदेघे) बालकवी केशवसुतांना माननारे होते. त्यांच्या कवितेवर केशवसुतांचा प्रभाव होता. जसे, निसर्गसानिध्य, जातिरचना, सुनीत रचना, व काव्यांतर्गत काही कल्पना यामधे सारखेपणा दिसतो असे असले तरी केशवसुत ओजस्वी तर बालकवी सुकुमार, केशवसुतांची रचना ओबड-धोबड तर बालकवींची नादमधूर, केशवसूत प्रगल्भ तर बालकवी निरागस. लक्ष्मीबाई टिळकांनी स्मृतीचित्रातून म्हटले आहे की, ठोमरें बालकवी होता पण तो कवीपेक्षा बाल अधिक होता. त्यामुळे बालकवीच्या निसर्गाला जराशा मर्यादा होत्या, निरीक्षण व रुची जराशी विकलांगच होती मानवी जीवनाबद्दलचे निरीक्षणाचा अभाव दिसतो असे असले तरी सृष्टीचे सौंदर्य उकलून दाखविण्यासाठी माझा जन्म झाला आहे, अशी बालकवींची श्रद्धा होती आणि निसर्गाकडे पाहण्याचा त्यांच्या निरागस, उत्स्फुर्त,सहज अशा दृष्टीमुळे त्यांच्या कवीतेला एक अनोखा अनुभव आलेला होता, तोच अनुभव त्यांनी कवितेत मांडला म्हणून निसर्गकवी म्हणजे बालकवी असे समीकरण रुढ झाले असावे.

बालकवींच्या कविता, आठवणी, त्यांचा अपघात, अशा आठवणींचे एक पुस्तक होते नेमके आता आठवत नाही. पण ते जर मिळाले तर त्यांच्या कविता लिहिण्याचा प्रेरणा जरुर इथे लिहिन :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

25 Nov 2008 - 9:12 am | मुक्तसुनीत

बिरुटे ,
फारच उत्तम विवेचन ! जियो !

बालकवींच्या कविता, आठवणी, त्यांचा अपघात, अशा आठवणींचे एक पुस्तक होते नेमके आता आठवत नाही. पण ते जर मिळाले तर त्यांच्या कविता लिहिण्याचा प्रेरणा जरुर इथे लिहिन

हे म्हणजे सोनाळकरांचे पुस्तक का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2008 - 9:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे म्हणजे सोनाळकरांचे पुस्तक का ?

नक्की सांगता येणार नाही. पण बालकवींच्या आयुष्याचे अनेक पैलू त्या पुस्तकात उलगडतात. सापडले, आठवले तर याच दुव्यात लिहीन.

-दिलीप बिरुटे

नंदन's picture

25 Nov 2008 - 11:17 am | नंदन

विवेचन, सर. नक्की लिहा, वाचायला आवडेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सर्किट's picture

25 Nov 2008 - 9:16 am | सर्किट (not verified)

पण तो कवीपेक्षा बाल अधिक होता.

लक्ष्मीबाईंसारखे आम्हीही हल्ली, काही लोकांना, "तो डॉ पेक्षा प्रा अधिक" असे म्हणतो, त्याच्या विरुद्धच आज हा प्रतिसाद वाचून वाटले. प्रा असले तरी डॉही आहेतच, ही खात्री पटवून देणारा प्रतिसाद.

छानच लिहिले आहेत हो !

आणखी लिहा..

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

जयेश माधव's picture

25 Nov 2008 - 11:06 am | जयेश माधव

जयेश माधव
सर एक नाव सुचवीतो.''बालविहग''अनुराधा सरपोतदार या॑चे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2008 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समग्र बालकवी : संपादिका श्रीमती पार्वतीबाई ठोंमरे,( बालकवींची पत्नी) व्हीनस प्रकाशन ' तपश्चर्या'३८१ क, शनिवार पेठः पुणे २
पहिली आवृत्ती सप्टेंबर १९६६.

त्यानंतर या पुस्तकाची आवृत्ती निघाली की नाही मला माहित नाही. पण या पुस्तकात बालकवींच्या समग्र प्रकाशित अप्रकाशित अशा कविता आहेत. बालकवींचे गद्य लेखन, त्यांची पत्रे, त्यांच्याविषयी निकटवर्तीयांनी लिहिलेल्या आठवणी या पुस्तकात आहेत. सारांश बालकवींवर अधिकारवाणीने बोलता येईल इतकी माहिती या पुस्तकात नक्की आहे. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ's picture

26 Nov 2008 - 4:14 pm | लिखाळ

बिरुटेसर,
विवेचन छान. आणि पुस्तकाच्या संदर्भासाठी आभार.
-- लिखाळ.

चतुरंग's picture

25 Nov 2008 - 12:31 am | चतुरंग

बालकवींचा जन्म (१८९०) गुजरातेतल्या नवसारी इथे झाला आणि वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी (१९१८) हा प्रतिभावान निसर्गकवी रेल्वे अपघातात सावनेर ह्या विदर्भातल्या गावी मृत्यूमुखी पडला.

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

25 Nov 2008 - 12:39 am | मुक्तसुनीत

पुन्हा एकदा , तुमची गडकरी आणि बालकवी यात गल्लत नाही ना होत आहे ??

कवी आणि "राम" (बाळकराम) यातील गल्लत ! =))

इजा बिजा तिजा : त्यांचा जन्म १८५६ साली रत्नांग्रीजवळ झाला आणि मृत्यू १९२० ला मुंबईमधे झाला.
(बालकवी आणि बाल-गंगाधर यातील गल्लत !)

चतुरंग's picture

25 Nov 2008 - 12:46 am | चतुरंग

पलटी बसली खरी!
जन्ममृत्यूची सनावली बरोबर आहे पण गावांचे संदर्भ हुकले ते गडकरींचे आहेत. चूक निदर्शनाला आणून दिल्याबद्दल मुक्तराव धन्यवाद!
(खुद के साथ बातां : रंगा, तूही एक वर्ष अभियांत्रिकीला शिकवलेस ना? आता कळले इतकी पोरे नापास का झाली!! ;)

चतुरंग

छोटा डॉन's picture

25 Nov 2008 - 1:03 am | छोटा डॉन

>> पुन्हा एकदा , तुमची गडकरी आणि बालकवी यात गल्लत नाही ना होत आहे ??

बेक्कार, एकाच लेखात "डबल सिक्सर" !!!
जहबहर्‍या हो मुसुशेठ, काय बरोबर पकडताय एकेकाला ...
तरीच म्हटलं एवढे प्रतिसाद कसे आले लगेच ...
असो.

अवांतर : आता येवढी माहिती दिल्यावर मुसुशेठ तुम्ही स्वतःच का लिहीत नाही बालकवींवर ????
( मजेने म्हणतो आहे हां, टोमणा नाहीच, पण लिहल्यास बरेच वाटेल.)

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग's picture

25 Nov 2008 - 1:12 am | चतुरंग

मुक्तरावांकडे कोणतीही चुकीची माहिती नाहीये त्यामुळे ते लिहू शकणार नाहीत!! (ह्.घ्या) ;)

चतुरंग

छोटा डॉन's picture

25 Nov 2008 - 1:13 am | छोटा डॉन

=)) =))
शह आणि मात ....
मस्तच ...

स्वगत : लैच अवांतर झालं, बास आता भौ.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Nov 2008 - 2:43 am | llपुण्याचे पेशवेll

ही बालकविंचीच कविता ना!
पुण्याचे पेशवे

टवाळचिखलू's picture

25 Nov 2008 - 7:43 am | टवाळचिखलू

सौजन्य : लोकसत्ता .

http://www.loksatta.com/daily/20060611/lr12.htm

कलंत्री's picture

25 Nov 2008 - 8:02 am | कलंत्री

रविवार ११ जुन २००६ च्या लेखाचा योग्य वेळी संदर्भ पुरवल्याबद्दल कौतुक करावे तितके कमीच आहे.

लिखाळ's picture

26 Nov 2008 - 4:16 pm | लिखाळ

सहमत !
टवाळचिखलू यांनी दुवा दिला याबद्दल आभार.
त्या लेखातील जीएंचे मत पटले. द ग गोडश्यांनी औंदुबराची जी समिक्षा केली आहे ती वाचून जी ए जे म्हणतात तेच मला औंदुंबराच्या कवितेत जाणवले.
-- लिखाळ.

टवाळचिखलू's picture

25 Nov 2008 - 8:05 am | टवाळचिखलू

http://www.marathipustake.org/Kavita.asp

येथुन बालकवींच्या काही कवीता आपल्या संगणकावर उरवता येतील.
- चिखलू

बलाकमालां उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुन येती अवनीवरती ग्रहगोलचि कीं एकमतें

जयेश माधव's picture

26 Nov 2008 - 1:39 pm | जयेश माधव

जयेश माधव
हिरवे हिरवेगार गालिचे -- हरित त्रुणा॑च्या माखमालीचे
त्या सु॑दर मखमालीवरती -- फुलराणी ही खेळत होती
गोड निळ्या वातावरणात -- अव्याज मने होती डोलत
प्रणयच॑चला त्या भूलीला -- अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मा॑डीवर बासुनी -- झोके घ्यावे,गावी गाणी;
याहुनी ठावे काय तियेला -- साध्या भोळ्या फुलराणीला?

अमोल नागपूरकर's picture

23 Dec 2008 - 4:56 pm | अमोल नागपूरकर

बालकवी हे मूळचे जळ्गावजवळच्या भादली गावचे. तरुण वयातच गावाजवळ एका रेल्वे अप्घातात त्यान्चा म्रुत्यू झाला.

विनायक पाचलग's picture

23 Dec 2008 - 6:39 pm | विनायक पाचलग

आम्हाला धडा होता त्यांचा
आणि हो गेल्याच वर्षी आम्ही त्यांच्यावर एक कर्यक्रम सादर केला होता.
त्यात मी वाचन केलेल्या ४ कवितांपैकी एका कवीतेचे हे एक कडवे सहज देतोय
पाखरा गाइले तुला कधीही ऩ कोणी
नच अश्रु धावले कोणी वनी येवोनी
निश्वास धावती सोउख्यामागे सारे
दुखाचा वाली कुणा कुणीही न बारे
-बालकवी(कवीता -पाखरास)
शब्द चुकले असण्याची शक्यता आहे.
आठवली तशी लीहीली .
फक्त माझी एक आठवण

मन्जिरि's picture

23 Dec 2008 - 9:28 pm | मन्जिरि

"समग्र बालकवि" मला बि ए ला होत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Dec 2008 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"समग्र बालकवि" मला बि ए ला होत
काय म्हणता ? लिहा आपणास वेळ मिळाल्यावर !
बालकवींबद्दल वाचायला आवडेल !

-दिलीप बिरुटे