BSNL लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घ्यावे का?

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
30 Apr 2015 - 5:15 pm
गाभा: 

आमचे गाव कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात असून BSNL शिवाय कोणतीही इंटरनेट सर्विस उपलब्ध नाही . मोबाईलसाठी 2G वोडाफोन GPRS वरुन नेट वापरतो . परंतु तिचा स्पीड 30-50 केबीपीएस पेक्षा जास्त नसतो. BSNL चे ५०० केबीपीएस ब्रॉडब्रॅंड ५५०/- रूपयामध्ये अमर्यादित प्लान आहे. पण इथे १०० केबीपीएस तरी मिळेल अशी आशा आहे.

त्यातच आता बीएसएनएल ने रात्री ९.०० ते सकाळी ७.०० वाजे पर्यन्त माहाराष्ट्र व मुंबई साठी अमर्यादित फ्री कॉलिंग ची सुविधा दिल्याने बीएसएनएल कनेक्शन घ्यावे असे वाटत आहे .

आपला काय अनुभव आहे ? BSNL लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घ्यावे का?

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

30 Apr 2015 - 5:30 pm | मंदार कात्रे
अद्द्या's picture

30 Apr 2015 - 5:47 pm | अद्द्या

"ग्रामीण भागात असून BSNL शिवाय कोणतीही इंटरनेट सर्विस उपलब्ध नाही"

^^

पुढचे सगळे प्रश्न रद्द होतात . .

असो . . BSNL अश्याच लोकेशन ला जबरदस्त सर्विस देते . . बिनधास्त घ्या . ९०० चा एक एक प्लान आहे त्यांचा . एकदा बघून घ्या . २ एम बी आहे पहिल्या ८ जीबी पर्यंत .

ग्रामीण भागासाठी हाच प्लान किमतीत सुद्धा असेल . . रक्ताच्या नात्यात / नोकर असाल . २० % कमी होते होते किंमत

भरोसा नाही.नवीन प्लान आणतात आणि। थोड्या महिन्यांनी गुंडाळतात.अगदी कमी किंमतीचा घ्या.

पाषाणभेद's picture

1 May 2015 - 12:07 am | पाषाणभेद

काय बात आहे! बीएसेनेल आजून हाये?

धर्मराजमुटके's picture

1 May 2015 - 12:13 am | धर्मराजमुटके

आता नाविलाज को क्या विलाज ? घेऊन टाका. बेगर हॅज नो चॉईस. (असा वाक्प्रचार आहे बरकां नाहितरं उगाचं वैयक्तीक घ्यालं)

खटपट्या's picture

1 May 2015 - 3:00 am | खटपट्या

ठाण्यात सहा वर्षांपुर्वी घेतलेले यमटीयनल चे ब्रॉड्बँड अजुनही टकाटक चालू आहे. ९ च्या नंतर ओनलाईन चित्रपट पण पाहु शकतो.

सुबोध खरे's picture

1 May 2015 - 7:55 pm | सुबोध खरे

घरी गेली १० वर्षे एम टी एन एल ची ब्रॉड बँड सेवा आहे. सध्या रुपये ११११/- मध्ये ४ MBPS वेगाने ३२ GB मिळतात. पुढच्या प्रत्येक GB ला १६ रुपये हा दर आहे. केंव्हाहि व्हिडियो न अडखळता दिसतो. सेवा उत्तम आहे. लाईनमनचे मोबाईल दिलेले आहेत. अर्ध्या तासात हजर होतात.
बी एस एन एल चे माहित नाही. पण अवाजवी बिल लावले असा प्रकार एम टी एन एल मध्ये कधीही होत नाही.

टवाळ कार्टा's picture

1 May 2015 - 8:29 pm | टवाळ कार्टा

येस्स

शब्दबम्बाळ's picture

27 Aug 2015 - 9:58 pm | शब्दबम्बाळ

hathway तेवढ्याच किमतीमध्ये 50MBPS चे स्पीड देत आहे. 50GB साठी!
बराच फरक वाटतोय!

सुबोध खरे's picture

28 Aug 2015 - 11:56 am | सुबोध खरे

कुणाला प्रत्यक्ष वेग किती मिळतो याचा अनुभव आहे काय?
एम टी एन एल चा वेग मला ३. ५ एम बी पी एस प्रत्यक्षात मिळतो.त्यांच्या लाईनचा वेग १०० एम बी पी एस आहे.

मदनबाण's picture

28 Aug 2015 - 12:33 pm | मदनबाण

सध्या जवळपास १.५ महिने एमटीएनएल ब्रॉडबँडच्या त्रासाने लयं म्हणजी लयं वैतागलो आहे ! सारखे एडीएसले कनेक्शन मरत आहे ! बर्‍याच तक्रारी करुन झाल्या, एकदा लाईनमन येउन गेला. पण त्रास आहे तसाच आहे ! :( एमटीएनलच्या कॉल सेंटरचा अनुभव तर "भिकार" आहे ! आप कतार में है ची टेप ऐकुन ऐकुन झीट येउन पडायचा एखादा... मग एखादी बाई फोन उचलते, आपण बोलणार तोच... थांबा हो... असं ठणकवत बाजुच्या बाइशी तिच्या गप्पा पूर्ण करते आणि मगच अतिशय रुक्ष आवाजात हं काय प्रॉब्लेम आहे ? असा प्रश्न पलिकडुन आपल्याला अलिकडे ऐकायला येतो. डीएनएस काय आहे ? लाईट चालु आहे का ? असे २-४ ठराविक प्रश्न करुन एक तर तक्रार नोंदवली जाते,किंवा तुमच्या जवळच्या एक्सेंजचा फोन नंबर दिला जातो... जवळच्या एक्सेंज मधल्या दिलेल्या फोनवर फोन केल्यास रिंग ऐकायला येण्या पलिकडे काहीच साध्य होत नाही.
सध्या मोबाइलच्या कॉल ड्रॉपवर मोंदीनी उपाय करायला खडसवले आहे म्हणे ! आता ब्रॉडबँड क्षेत्रात क्रांती येण्यासाठी मोंदीनीच पावले उचलावीत याची वाट पहावी काय ?
एमटीएनएलवाले सर्व्हीस टॅक्स लावतात, कशाचा आणि का ? ते अजुनही मला बराच विचार करुनही उमगले नाहीये !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town

शब्दबम्बाळ's picture

28 Aug 2015 - 9:34 pm | शब्दबम्बाळ

मी स्वतः वापरतोय, भन्नाट स्पीड आहे.
दीड जीबी ची फाईल तीन मिनिटांच्या आत download झाली.
HD विडिओ बिना बफरींग मस्त चालतात!
पण मुंबईमध्ये कसे स्पीड आहे ते माहिती नाही...

abcd

२१ एमबीपीएस चा दणदणीत स्पीड दाखवतोय..

नमस्कार श्री. मंदारजी,
आपण बीएसएनएल चे लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन बिनधास्त घ्यावे. बीएसएनएल सरकारी कंपनी आहे म्हणून विश्वासू आहे. बीएसएनएल चे लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन साठी वेगवेगळे प्लॅन उपलब्ध आहेत. आपल्या गरजेनुसार प्लॅन निवडावा.
जर आपण आपल्या घरगुती वापरासाठी बीएसएनएल चे लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घेणार असाल तर मी आपणास खालील प्लॅन सुचवितो .........
१) बीएसएनएल ६७५ कॉम्बो प्लॅन .....
यामध्ये १०० कॉल बीएसएनएल नेटवर्क साठी मोफत.
अमर्यादित ब्रॉडब्रॅंड सुविधा - ५१२ केबीपीएस स्पीड सह
दूरध्वनी भाडे नाही.
२) बीएसएनएल ८४५ कॉम्बो प्लॅन .....
अमर्यादित ब्रॉडब्रॅंड सुविधा..
यामध्ये ६ जीबी पर्यंत १ एमबीपीएस स्पीड त्यानंतर स्पीड ५१२ केबीपीएस राहील.
कॉल मोफत नाही.
दूरध्वनी भाडे नाही.
दि. ०१/०५/२०१५ म्हणजे आजपासून बीएसएनएल ने रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व कॉल सर्व नेटवर्क साठी पूर्णपणे मोफत केले आहे त्याचा फायदा घ्यावा.
तसेच जर आपण घेतेलेला प्लॅन आपल्याला योग्य नाही वाटला तर आपण तो प्लॅन कधीही बदलू शकता.
ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा भाडे कमी असते.
जर आपल्या घरामध्ये कोणी राज्य शासनाचे किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी असतील आणि त्यांच्या नावाने नवीन कनेक्शन घेतल्यास दूरध्वनी मासिक भाड्यामध्ये अतिरीक्त सूट मिळू शकते.
बीएसएनएल आपले जाहीर केलेले प्लॅन सहसा रद्द करीत नाही. उदा. काही वर्षापूर्वी जाहीर केलेले "यकीन नही आता" प्लॅन, वन इंडिया प्लॅन अजून ही व्यवस्थित चालू आहेत. त्यामुळे बीएसएनएल वर विश्वास ठेवावयास हरकत नाही.
कृपया आधिक माहिती साठी आपण स्थानिक बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधावा आणि नवीन नोंदणी साठी अर्ज करावा.
काही अडचण असल्यास मला व्यनि करावा ही विनंती.

@पाषाणभेद - बीएसएनएल अजूनही आहे आणि राहील.
@खटपट्या - आपला अनुभव वाचून छान वाटले.
@धर्मराजमुटके - नाविलाज को क्या विलाज ? तसे नाही. खाजगी कंपन्या ग्रामीण भागात आपली सेवा सुरूच करीत नाही कारण त्यांना ते बंधनकारक नसते. तेवढी गुंतवणुक खाजगी कंपन्या करीत नाही. जसे लक्झरी बस सर्व्हिस ग्रामीण भागात नसते कारण त्यांना ते बंधनकारक नसते परंतु आपली एसटी बस मात्र ग्रामीण भागात पोहोचलेली आहे. बीएसएनएल ला ग्रामीण भागात सेवा पुरविणे बंधनकारक आहे.

बरोबर आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 May 2015 - 5:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बीसएनएल लँडलाईन क्षेत्रात चांगली कंपनी आहे. ब्रॉडबँडसाठी घेउन टाका.

मात्र सेल्युलर नेटवर्क मधे शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर बी.एस.एन.एल. महाभिकार** कंपनी आहे. अजिबात सपोर्ट नाही चांगला. ६-६ महिने तक्रारी पेंडींग ठेवतात. कॉल सेंटरवरुन फोनवर एखादी सेवा चालु अथवा बंद करता येत नाही. कायम एक्स्चेंजच्या फेर्‍या माराव्या लागतात.

धर्मराजमुटके's picture

1 May 2015 - 9:20 pm | धर्मराजमुटके

मी हे बीएसएएल ची सेवा चांगली नाही या अर्थाने बोलत नाहिये. जेव्हा दुसरा ऑप्शन नसेल तेव्हा आहे ते स्वीकारा हेच सुचवायचे होते.

नाखु's picture

2 May 2015 - 12:43 pm | नाखु

म्हणजे
बाजू से ही गता (अगदी भिकारी रेंज)
आद्द्याक्षरे जुळवा इंग्रजीत
मला स्वतःला हद्दीचे कारणावरून निष्कारण तरंग ही वायरलेस सुविधा दिली गेली.घरापासून जेमेतेम ४ विजेचे खांब अंतरावर शहर हद्द आहे असे सांगण्यात आले. घर तिथे घेऊन जाणाचा पर्याय अंमलात आणणे शक्य नसल्याने मासीक २८५ रू भाढे असलेली तरंग सुविधा माथी मारली.
पुढे त्यावरून मोबाईल त्यांचाच असेल तर फ्री म्हणून मोबाईल्या सेवा त्यांचीच घेतली तर नवीन खुस्पट काढून तरंग सुवीधा असल्याने मलाच लटकवत ठेवले.
बीएसएनल्कडून अगदी अनामत रक्क्मेतही गंडवला गेलेला
अनुभवी नाखु

माझ्याकडे bsnl सेवा पिंची मध्ये होती. जेव्हा चालू असायची तेव्हा मस्त. पण मध्येच २/३ दिवस बंद असायची. कितीही फोन करून फायदा नाही. इंटरनेट वर नोकरी अवलंबून असल्याने तास भर बंद पडली तरी त्रास व्हायचा. तुम्हाला तेवढी गरज नसली तर उत्तमच सेवा.

पाषाणभेद's picture

2 May 2015 - 1:35 am | पाषाणभेद

>>>> दि. ०१/०५/२०१५ म्हणजे आजपासून बीएसएनएल ने रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व कॉल सर्व नेटवर्क साठी पूर्णपणे मोफत केले आहे त्याचा फायदा घ्यावा.

माझ्या माहीतीप्रमाणे ही सेवा पहिल्या सहा महिन्यांसाठी प्रायोगीक तत्वावर राबवणार आहेत. नंतरचे माहीत नाही. (त्यांनाही अन आपल्यालाही)

gogglya's picture

2 May 2015 - 9:51 am | gogglya

पर्याय असेल तर तोच निवडावा लागेल! त्यांची सेवा जरी समाधानकारक नसली [शेवटी सरकारी काम] आणी संपत यांनी म्हणल्याप्रमाणे जर तुम्हाला अखंडीत सेवेची तीव्र गरज नसेल तर मात्र BSNL ला पर्याय नहिये. TRAI च्या ज्या काही अटी आहेत [मुख्यत्वे करून bandwidth], त्या पूर्ण करताना खासगी कंपन्या किमान अटी पूर्ण होतील अशीच यंत्रणा निवडतात आणी मग bandwidth निर्धारित क्षमतेपेक्षा नेहेमीच कमी मिळने. किंवा फक्त रात्रीच जास्त वेग असणे [कारण व्यावसायिक वापर दिवसा जास्त असतो] असे प्रकार अनुभवास येतत. उलट BSNL सरकारी कंपनी असल्यामुळे तेथील यंत्रणा [hardware] उच्च दर्ज्याची असते आणी bandwidth च्या अडचणी कधीच अनुभवाव्या लागत नाहीत. ही माहिती मला BSNL केंद्राच्या तांत्रिक प्रमुखाने स्वतः दिली आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 May 2015 - 1:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे.

अवश्य घ्या. मोबाइल साठी दोन अँटेनावाला वाय फाय राउटर घ्या. मी सहा महिन्यापूर्वी बसवलेलाय. माझा डेटा वापर दसपट वाढून बिल मात्र निम्म्यावर आलंय.

डिटेल्स देता का त्याची.

असंका's picture

4 May 2015 - 10:12 am | असंका

D Link DSL 2750U

नितीन पाठक's picture

2 May 2015 - 1:27 pm | नितीन पाठक

नमस्कार,
वर्ष २००५ पर्यंत मोबाईल सेवा महाग पडत होती. सर्व ठिकाणी भूमिगत केबल वर चालणारे बीसएनएल लँडलाईन होते. कालांतराने हळू हळू मोबाईल सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येउ लागली. लोकांचे बीसएनएल लँडलाईन कडे हळूहळू दुर्लक्ष होउ लागले. २००५ पर्यंत बीएसएनएल कडे भूमिगत केबल चा भरपूर साठा होता. त्यानंतर मात्र केंद्रसरकार ने बीएसएनएल कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. नवीन साधनसामग्रीचा पुरवठा न करणे, (जसे केबल, ओएफसी केबल, मोबाईल उपकरणे, नवीन दूरध्वनी संच) नवीन टेंडरला मंजुरी न देणे, विस्तार योजनेला परवानगी न देणे, इ.इ. गोष्टींमुळे बीएसएनएलचा आपल्या ग्राहकांना दिल्या जाणा-या सर्व्हिस वर परिणाम होउ लागला.
@ नाद खुळा ...
कदाचित आपले घर बीएसएनएल च्या डीपी पासून लांब असेल. आपल्या घरापर्यंत बीएसएनएल ची केबल आली नसेल. त्यामुळे स्थानिक अधिका-यांनी आपल्याला तरंग फोन दिला असेल. आपली काही शंका / तकार असेल तर आपण स्थानिक कार्यालयात जाउन उपमहाप्रबंधक किंवा महाप्रबंधक यांच्याकडे जाउन तक्रार देउ शकता. आपली तक्रार निश्चितच सोडवली जाईल.
आजच्या घडीला नवीन कनेक्शन देण्यासाठी बीएसएनएल कडे केबलच नाही. पूर्ण भारता मध्ये ही परिस्थिती आहे. केंद्रसरकार बीएसएनएल कडे लक्ष देत नाही म्हणून बीएसएनएल च्या सर्व संघटना मिळून नुकताच दि. २१ व २२ एप्रिल ला संप केला आहे. तरी अजून ही प्रतिसाद मिळालेला नाही. नवीन साधनसामग्री च्या अभावी बीएसएनएलची सर्व्हिसचा दर्जा खालावला आहे.

पैसा's picture

4 May 2015 - 11:22 am | पैसा

आमचा फोन मधे ट्रान्सफर केला तेव्हा वायर बदलायला हवी आहे ती स्टॉकमधे नाही म्हणून ३ आठवडे काढले होते. इतर खाजगी कंपन्यांच्या दबावामुळे बी एस एन एल चांगले चाललेले असताना सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत आहे असे वाटते.

सुनिल पाटकर's picture

4 May 2015 - 3:44 pm | सुनिल पाटकर

मी कोकणात अनेक वर्षे BSNL ब्रॉडब्रॅंड वापरतो ते उत्तम आहे .चांगले चालते.फसवेगीरी नाही. ५५०/- रूपयामध्ये अमर्यादित प्लान आहे.त्यात भरपूर डाउनलोड करता येते.छुपे कर नाहीत.बिलधास्त घ्या,प्लान बदलण्याची सुविधा आहे.

मंदार कात्रे's picture

27 Aug 2015 - 9:16 am | मंदार कात्रे

कालच ब्रॉडब्रॅंड चालू झाले . वायफाय राऊटर लावून बर्‍यापैकी स्पीड आहे . अनलिमिटेड 545 प्लान मध्ये 64 kBps म्हणजे 512 kbps स्पीड आहे . अर्ज केल्यापासून नेट सुरू व्हायला दोन महीने लागले. मोडेम आता बीएसएनएल देत नाही ,स्वत:च घ्यावा लागतो

चौकटराजा's picture

27 Aug 2015 - 10:25 am | चौकटराजा

ब्येशेनेल चा हा प्रयोग आपण केल्याबाद्द्ल आभार. आपण शुकरवारी नव्या पिक्चरचे तिकीट काढा शेणिमा पहा. भिक्कार निघाला पस्तावा तुम्हाला ! चांगला निघाला तर सोमवारी तिकिट बारीत उभा रहातो.अशी आपली पॉळीशी आहे. अनेकानी या कंपनीचे कनेक्शन स्ट्रीमिंग व डाउनलोड साठी योग्य आहे असे सांगितले आहे आपल्या रिपोर्टसाठी आतुरतेने वाट पहात आहे.
चांगला अनुभव असल्यास पुढच्या महिन्यात लॅन्डलाईन च्या लायनीत उभा राहीन म्हणतो.

मंदार कात्रे's picture

27 Aug 2015 - 8:45 pm | मंदार कात्रे

महिन्याभरात रिपोर्ट देतो साहेब

सत्याचे प्रयोग's picture

27 Aug 2015 - 10:15 pm | सत्याचे प्रयोग

B= BAD
S=SERVICE
N=NO
L=LIMIT

असंका's picture

27 Aug 2015 - 10:17 pm | असंका

कुठे? आमच्या इथे तर केवळ अप्रतिम सर्विस आहे...

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2015 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा

ऐसाइच है... अस्सल भारतीय सांस् कृतीक ;) सर्वीस आहे.. कुणाला पावते,कुणाला चावते! ;)

राघवेंद्र's picture

28 Aug 2015 - 12:18 am | राघवेंद्र

हे खरे नाव आहे.

अशोक पतिल's picture

27 Aug 2015 - 11:44 pm | अशोक पतिल

माझ्या कडे गेली अनेक वर्षे बीएसएनल फोन वापरात आहे. सध्या BSNL ब्रॉडब्रॅंड काम्बो ६७५ अनलिमीटेड सुरु आहे. स्पिड जबरदस्त आहे. विडिओ न अडकता पाहु शकतो . BSNL हि एक विश्वसनीय सेवा आहे हे नक्की . 2G व 3G चे रेट हे सर्वात कमी आहेत.

भिंगरी's picture

28 Aug 2015 - 12:51 am | भिंगरी

कंटाळून परवाच बीएसएनल ब्रॉडब्रॅंड बंद केले.

मंदार कात्रे's picture

7 Sep 2015 - 9:16 pm | मंदार कात्रे

मन्डळी ...आणखी एक गुड न्यूज ...

आता सर्व ग्राहकाना बी एस एन एल देणार २ एमबीपीएस च्या स्पीड ने इन्टरनेट सेवा ....

http://economictimes.indiatimes.com/tech/internet/bsnl-to-offer-minimum-...

स्वप्क००७'s picture

9 Sep 2015 - 6:34 pm | स्वप्क००७

हो पन हे सगल केव्हा होनार कोनास थाउक.

मंदार कात्रे's picture

9 Nov 2015 - 7:13 am | मंदार कात्रे

g

मंडळी नमस्कार
बी एस एन एल ब्रॉडब्रॅंड घेवून 3 महीने झाले. या कालावधीत 90 जीबी डाटा वापरला ,
एकदा वीज पडून exchange मधील साधन-सामुग्री जळाली ,तेव्हा 20 दिवस बंद होते नेट व फोन
त्यानंतर मधून मधून सर्व्हर बिघडणे व अन्य बारीक सारीक अडचणी चालूच असतात.
सरासरी आठवड्यातून १ ते २ दिवस ४ ते ६ तास नेट बंद असते .
नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी २ एमबीपीएस पर्यन्त वेग असतो, नंतर ५१२ केबीपीएस .
बीएसएनएल ने मोबाइल इंटरनेट च्या दरात सुमारे २० ते ३० % वाढ केली आहे .

एकूण अनुभव पाहता , ना नफा ना तोटा ... ५४५ /- रुपयात अमर्यादित इंटरनेट ... ठीक आहे

मंदार कात्रे's picture

9 Nov 2015 - 7:15 am | मंदार कात्रे

yu

माझ्या घरी मी राऊटर लाऊन बी एस एन एल बरेच वर्ष वापरले. ( पिंपरी चिंचवड ) मग सेवा इतकी खराब झाली की दोन - दोन दिवस नेट बंद. शनिवारी - रविवारी दुरुस्ती नाही. शेवटी काढुन टाकले. एक वर्षभर त्रास झाला. आता दोन पर्याय आहेत. जर खुप काही वेगाने सर्च करायच असेल तर एअरटेल फोर्जी जे फोरजी डाँगल वापरुन घेतो. मिसळ पाव तर आयडीयाच्या ३जीवर पण चालते. बी एस एन एल काढुन पैसे वाचले आणि कटकट गेली.

मंदार कात्रे's picture

18 Aug 2017 - 6:36 pm | मंदार कात्रे

साधारण महिन्यातून २० दिवस नेट व्यवस्थित चालायचे . सारखा बी एस एन एल ला फोन करून त्याना आणि मला ही वैताग आला . १२ जून ला वीज पडल्याने एक्स्चेन्ज जळाले . १५ दिवसानी फोन चालू झाला पण नेट नाही . शेवटी २ वर्षे वापरून २६ जुलै ला ब्रॉडबॅन्ड बन्द केले . बन्द करायला पण एक महिना घेतला , आणि दोन महिन्याचे बिल भरायला लावले. आता रिफन्ड कधी मिळेल ते बघूया ... लॅन्डलाइन सुरु आहे .

डिटिएच डिश- सॅटेलाइटमधून जेव्हा डेटा येईल तेव्हा हे तारेचे जाळे,डोंगल,टाउअरस वगैरे सर्व जाईल आणि कुठेही फिरता येईल.

मंदार कात्रे's picture

19 Aug 2017 - 10:39 pm | मंदार कात्रे

कधी येणार नक्की डिटिएच डिश- सॅटेलाइटमधून इन्टरनेट ? आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत ....

मंदार कात्रे's picture

19 Aug 2017 - 10:41 pm | मंदार कात्रे

तसंही जियो ने बर्‍याच गोष्टी सोप्या करून ठेवल्यात ...

ठॅन्कु मुकेसभाय