बाईक्स घेताना - भाग १
बाइक्स घेताना - भाग २
बाइक्स घेताना - भाग ३
...तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू...मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत...त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत
१३५ cc
"ना घर की ना घाट की" segment
१३५ cc च्या बाईक्स का बनवतात हे अजूनही मला समजलेले नै...
बाईकची पॉवर जवळजवळ १५० cc इतकीच (किंचित कमी...कधीकधी किंचित जास्त)
मायलेज जवळजवळ १५० cc इतकेच किंवा किंचित जास्त
दिसणे १५० cc समोर काही खास नाही (याला एक अपवाद आहे)
किंमत जवळजवळ १५० cc इतकीच किंवा किंचित कमी
तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च जवळपास १५० cc इतकाच
अतिरिक्त वैशिष्ट्ये...(additional features) - कैच नैत (याला एक अपवाद आहे)
पण असे असतानाही जर बाईक बनवणार्या कंपन्या १३५ cc च्या बाईक बनवत असतील तर नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी कारण असेलच...असो
मलातरी हे सगळे मुद्दे बघता १२५ cc पेक्षा जास्त इंजिन कपॅसीटीची बाईक घेताना १५० cc ऐवजी १३५ cc ची बाईक का घ्यावी याचे उत्तर कधीच नै मिळाले...कोणी सांगेल का इथेतरी?
अगदी काही वर्षांपर्यंत या segment मध्यॆ एकापेक्षा जास्त पर्याय होते...जसे
Bajaj Pulser 135- LS
Bajaj Discover DTSi 135
Hero Honda Achiever
पण बहुतेक सगळ्या कंपन्याना कमी होणारी विक्री जाणवली असावी कारण भारतातले बाईक मार्केट आता प्रगल्भ होत आहे (फक्त चोखंदळ निवडीबाबत...सुरक्षित चालवण्या बाबत आनंदच आहे सगळीकडे) त्यामुळे आता या segment मध्ये फक्त एकाच बाईक उपलब्ध आहे
http://bikeadvice.in/125cc-motorcycle-segment-india-shrinking/ या बातमी नुसार हेच १२५ cc बद्दल सुध्धा सुरु झाले आहे
Bajaj Pulser 135- LS
बजाजने पल्सार आणल्यापासून त्यात वेळोवेळी बरेच बदल करत होती...पण टेक्नोलॉजीकल मोठ्ठा बदल याच बाईक पासून केला...
Biggest USP - world's first bike with 4 valve DTSi engine
भारतात अजूनही 4 valve इंजिन असणार्या बाईक्स फक्त बजाजच बनवते...बहुतेक फक्त बजाजकडेच पेटंट असावे (याबाबत मलातरी नक्की माहिती नाही)
4 valve इंजिनाचे फायदे
इंधन ज्वलनातून जास्तीत जास्त उर्जा मिळवता येते
इंजिनाची कार्यक्षमता वाढते आणि मायलेज सुध्धा
कमी cc च्या इंजिनामधून जास्त पॉवर मिळवता येते
(अधिक माहितीसाठी कॉलिंग चिमणराव)
टेक्नोलॉजी मधल्या बदलाबरोबरच पल्सरची नट-क्रॅकर* :D इमेज बदलणेसुध्धा याच बाईकपासून सुरु झाले
बजाजच्या ट्रिपल स्पार्क प्लगवाल्या इंजिनांचे माहित नाही पण त्या आधीच्या बजाजच्या सगळ्या इंजिनांमध्ये या बाईकचे इंजिन सगळ्यात बेस्ट आहे
१३५ cc मधून १३.५ PS पॉवार मिळते जी काही १५० cc बाईकच्या पॉवरपेक्षा जास्त आहे (होंडा युनिकॉर्न, यामाहा SZ, बजाज Discover १५० DTSi, ई.)
speed आणि acceleration च्या बाबतीत सुध्धा वर लिहिलेल्या बाईक्सपेक्षा उजवी आहे आणि मायलेजसुध्धा ६० kmpl च्या आसपास मिळते
इंजिन ३० kmph इतक्या कमी स्पीडलासुध्धा ५ व्या गिअरमध्ये knocking करत नाही
लुक्सच्या बाबतीत बघावे तर काही first in class features आहेत...जसे
clip-on handlebars
split seats
DC circuit
5 step adjustable rear Nitrox shock absorber
ज्यांची उंची कमी आहे अथवा ज्यांना १५० cc च्या बाईक्स वजनदार वाटतात आणि पिकपसुध्धा हवाय, थोडे बरे मायलेज पण हवे पण १२५ cc किंवा त्यापेक्षा कमी cc च्या बाईक्स वरणभात टाईप वाटतात अश्या सर्व बाईकप्रेमींसाठी ही बाईक "आखुडशींगी बहुगुणी लाथा न मारणार्या दुभत्या गायीसारखी सर्वगुणसंपन्न" आहे...हि "विद्या बालन"
*ज्यांनी पल्सरचे सगळ्यात पहिले मॉडेल चालवले आहे त्यांना व्यवस्थित कळले असेल मला काय म्हणायचे आहे ;)
Disclaimer - या लेखातली सर्व मते माझी खाजगी मते आहेत
प्रतिक्रिया
6 May 2015 - 5:42 pm | टवाळ कार्टा
अगदी ब्रोब्र पण golden quadrilateral वर भन्नाट आहे...फक्त तिथेच चालवायची...घ्यायला फक्त परवडली पाहिजे :(
6 May 2015 - 5:41 pm | अनिरुद्ध.वैद्य
:D :D :D
27 Apr 2015 - 2:57 pm | झकासराव
पल्सर १५० सीसी वाली ७५ हजारच्या आसपास असेल (पुण्यात) पण त्या तुलनेत सीबीआर पाहुन अवाक झालोय.
सव्वा लाखाच्या पुढेच असेल ती.
27 Apr 2015 - 3:05 pm | टवाळ कार्टा
कोणत्या जमान्यातल्या किंमती सांगताय :)
पुण्यात माहित नै पण मुंबईमध्ये Pulser 150cc आरामात ८० हजाराच्या वर असेल...शीबीआर १५० ची घेताय का २५० ची घेताय त्यानुसार सव्वा लाख (चायला पुजेच्या दक्षिणेचा आकडा वाटतोय) ते एक लाख नव्वद हजाराच्या आसपास आहे
27 Apr 2015 - 3:11 pm | झकासराव
पुण्यात ७८ हजार आहे लेटेस्ट किमत. मी घेतली तेव्हा ७५ होती.
सीबीआर एक शोरुम गुगलुन पाहिली. म्हणुन मोघम सव्वा लाखाच्या पुढे लिहिल. :)
27 Apr 2015 - 3:13 pm | टवाळ कार्टा
ह्म्म...पुण्यात ट्याक्सेस कमी आहेत बहुतेक
6 May 2015 - 5:19 pm | अनिरुद्ध.वैद्य
एक सदतिस आणि एक एन्शि. एबीएश वाल घेतल तर दोन दहा!
6 May 2015 - 5:31 pm | टवाळ कार्टा
अग्गदी ब्रोब्र...बाकी तुम्ही सुध्धा "अनिरुद्ध"...बाकी २ अन्यांना ओळखता कै?
6 May 2015 - 5:46 pm | अनिरुद्ध.वैद्य
मध्यंतरी कैप्टन साहेब बोलले होते मी ४ था म्हणून :D … पण अजून ओळख नाही.
27 Apr 2015 - 3:39 pm | प्रचेतस
पोराला मोटारसायकल पालकांनी घेऊन देऊ नये असे माझे व्यक्तीगत मत. त्याची त्याने स्वकमाईवर घ्यावी. अशाने बाईकची काळजी असल्याने ती काळजीपूर्वक चालवली जाते व देखभालसुद्धा व्यवस्थित घेतली जाते असा माझा स्वानुभव.
27 Apr 2015 - 3:48 pm | पैसा
मी स्वतःची सायकल सुद्धा स्कॉलरशिपचे पैसे जमवून घेतली होती. पण मुलाचं कॉलेज ४ किमि लांब आहे. त्यांच्या खास बसमधे गर्दी खूप असतेच पण ती बस जर एका मिनिटासाठी चुकली तर पुढची बस अर्ध्या तासाने असते, मग लेक्चर चुकतं. घरी येताना तोच प्रॉब्लेम. त्यामुळे हातात वाहन असलेले बरे. इथे गोव्यात चढ उतार खूप असल्यामुळे सायकली कोणी वापरत नाहीत.
27 Apr 2015 - 3:50 pm | प्रचेतस
ओह्ह ओके.
बाकी तुमच्या गोव्यात बायकिंगला जाम मजा येते.
27 Apr 2015 - 4:05 pm | टवाळ कार्टा
सहमत :)
27 Apr 2015 - 4:05 pm | टवाळ कार्टा
ओ...४ किमी"च" आहे ना...सायकल घेउन द्या भारीतली (१७-२५ हजारात येते)...तेव्हडाच यायाम पण होउन जाईल
27 Apr 2015 - 4:24 pm | पैसा
घरापासून कॉलेजपर्यंत संपूर्ण चढ आहे. फार्मागुडी हिलस्टेशनला कॉलेज, आणि आणि आम्ही राहतो फोंड्यात. कोंकणीत फोंड म्हणजे खड्डा! एवढा चढ काढून गेल्यावर लेक्चर कुठलं! शिवाय रस्त्यात एवढ्या गाड्या असतात की कुठेही चालत लवकर पोचायला होईल. म्हणजे त्या ४ किमि चढ चढेपर्यंत १०० वेळा थांबावं लागेल.
27 Apr 2015 - 4:40 pm | टवाळ कार्टा
१७+ हजाराची सायकल असेल तर चढाचे काय वाटत नै...
असे असेल तर पोरगं बाईक घेउनसुध्धा १०० वेळा थांबणारच की...वर पेट्रोल जळणार ते वेगळेच...असो जर पटत असेल तर सेकंडहँड बाईक द्या घेउन...फक्त बाईक घाटावरून घ्या...गोव्यात खार्या वार्यामुळे बाईकची वाट लागते
28 Apr 2015 - 11:46 am | टवाळ कार्टा
एक फटू द्या पाठवून...त्यावेळी फ्लेक्ष ची फ्याशन नसेल...पण आता आहे...
खालच्या सारखा एखादा बनवैचा का? ;)
28 Apr 2015 - 12:21 pm | पैसा
ती सायकल गेली ना पण आता फ्लेक्श कुठे लावणार?
28 Apr 2015 - 12:24 pm | टवाळ कार्टा
इतका विचार करायला लागलात तर कश्या तुम्ही फेमश होणार...फ्लेक्ष लाग्ला तर गेलाबाजार ग्राम्पंच्यायतीत तिकिट तरी मिळेल ;)
28 Apr 2015 - 12:30 pm | पैसा
ग्रामपंचायत अग्दीच डौनमार्केट! गेलाबाजार विधानसभेत तरी जावे आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी! ;)
28 Apr 2015 - 12:54 pm | टवाळ कार्टा
तिथे जायला गेंड्याची कातडी लागते असे ऐकून आहे (जी तुम्च्याकडे नै असे कानावर आलेले आहे)...मी तुम्हाला भेटलेलो नाहीये पण तिथपर्यंत पोचलात तर वळख ठिवा :)
28 Apr 2015 - 5:08 pm | पैसा
देऊ तुम्हाला पण एखाद्या समितीचं सदश्यत्व!
28 Apr 2015 - 5:21 pm | टवाळ कार्टा
पोटभर खायला मिळेल असे बघा ;)
28 Apr 2015 - 5:23 pm | पैसा
आधी गेंड्याची कातडी कमावली पाहिजे मात्र!
28 Apr 2015 - 5:26 pm | टवाळ कार्टा
गेंड्याच्या कातडीचे ज्याक्येट बनवून घेऊ की...हा.का.ना.का. ;)
http://www.rhinoleather.com.au/mens-leather-jackets/
ह्ये बगा शांपल :)
27 Apr 2015 - 4:04 pm | टवाळ कार्टा
अग्दी अग्दी...कॉलेजला जायला म्हणून बाईक दिलीत तर ती जास्त इथे तिथे फिरण्यातच जाते...द्यायचीच असेल तर अगदी साधी आणि सेकंडहँड घेउन द्यावी...पोरगं जर सुट्टीत स्वकमाई करत असेल तर मात्र पोराने कमावलेल्या किमतीच्या २०-३० पट किंमत असलेली बाईक घेउन द्यायला हर्कत नै कारण पैसे कमवायला घरचे कसे कष्ट करतात हे समजलेले असते ...परंतू घरात १ बाईक असावीच असे माझे मत आहे...अडीअडचणीला बाईकसारखे दुसरे साधन नाही धावाधाव करायला
29 Apr 2015 - 12:06 pm | सुबोध खरे
पोराने स्वकमाईने बाईक घ्यावी हे ठीक आहे परंतु तो कमवायला लागेपर्यंत आयुष्यातील काही( चार ते पाच) सोनेरी वर्षे गेलेली असतात ती मात्र कधीच परत येत नाहीत. त्या काळात जर तुमच्या मुलाला पैश्याची किंमत समजावून देऊन बाईक दिलीत तर पुढे आयुष्यात काही राहून गेले असे वाटणार नाही.मुलाला जबाबदारीची जाणीव द्या. म्हणजे बापाची वस्तू स्वतःची म्हणून वापरायला शिकतील.
मला वयाच्या १९ व्या वर्षी लहान का होईना बाईक मिळाली होती.७५,००० किमी व्यवस्थित चालवून शेवटी विकली. त्याचे अनुभव आजही अंगावर रोमांच आणतात. उदा पर्वती टेकडीवर मागच्या बाजूने बाईक चढविली होती. किंवा मुंबई ते मुरुड आणि परत एका दिवसात. प्रत्येक सुटीत मी बाईक पुण्याहून मुंबईला घेऊन जात असे.
माझे एक म्हणणे आहे पैसा आयुष्यात केंव्हाना केंव्हा तरी प्रत्येकाला मिळतोच. गेलेला वेळ मात्र कधीच परत येत नाही. आयुष्य हे आनंद लुटण्यासाठी आहे. नाहीतर पैसा मिळवून कुणाच्या मढ्यावर घालायचा आहे? आजही मुलाला मी माझी होंडा युनिकोर्न देऊ केलेली आहे अट इतकीच-- परवाना( लायसन्स) मिळव आणि बाईक घेऊन जा आणि हेल्मेट शिवाय बाईक वर दिसलास तर बाईक परत घेतली जाईल. मुलगा सिव्हिल इंजिनियरिंग ला आहे (२ सेमिस्टर) केंव्हा तरी इंजिनियर होईलच आणि कमवायला लागेलच. फारतर एखादे वर्ष उशिरा.
29 Apr 2015 - 12:31 pm | टवाळ कार्टा
हे पटले...त्या सोनेरी वर्षांत बाईक नसेल तर बर्याच आनंदाना मुकतो :(
27 Apr 2015 - 4:41 pm | काळा पहाड
सुझूकी १५० आर किंवा होंडा युनिकॉर्नच बरी.
28 Apr 2015 - 11:35 am | टवाळ कार्टा
अजून पण बरेच पर्याय आहेत....येइलच पुढच्याच्या पुढच्या भागात :)
28 Apr 2015 - 11:40 am | काळा पहाड
याडव्हर्टाईज कर्तूस वाट्टं पुढच्या भागांची?
27 Apr 2015 - 4:23 pm | गणेशा
चांगली माहिती ...
पुढील भागात अपाची असेलच . वाचायला आवडेल,
मागील भाग बहुतेक बघितलेनाहित वाचतो लवकरच...
27 Apr 2015 - 4:36 pm | टवाळ कार्टा
नै...ती पुढच्याच्या पुढच्या भागात आहे...पुढचा भाग अनाहिता स्पेश्शल अस्णारै :)
यावरून एका मिपाआयडीची आठवण झाली ;)
एक खौचट्ट शंका - तुम्ही लेख सुध्धा कोणी लिहिला आहे ते बघून मगच वाच्ता कै? :)
27 Apr 2015 - 4:46 pm | काळा पहाड
म्हंजे कंच्या बाय्की? अनाहिता बाय्की वापरत नै कै.
27 Apr 2015 - 4:48 pm | टवाळ कार्टा
म्हणजे बाय्की बाय्का :)
27 Apr 2015 - 6:44 pm | काळा पहाड
बाय्का बाय्की नस्तात. इस्कूटर बाय्की अस्तात. बाय्की बाय्का कुठ्ल्या ब्रं?
27 Apr 2015 - 5:00 pm | अजया
येता जाता अनाहिता काढल्याशिवाय काहीही लिहिता येऊ नये इतका अनाहितामय झाला आहेस वाटतं टकाबाळा!
लेखमालिका छान आहे ही तुझी.माझा मुलगा अगदी विंट्रॆस्ट घेऊन वाचतोय आणि मला रस्त्यात या बायका दिसल्या की ज्ञानात प्रॅक्टिकल भर घालतो!
रच्याकने-रविवारी पहाटे आमच्या रस्त्यावरुन (जुना हायवे) भारी भारी बाईक्स आणि बायकर्स जातात!!माझ्या लेकाला त्या डुकाटी वगैरे बायकांची स्वप्नं पडतात बहुतेक!!
27 Apr 2015 - 5:15 pm | टवाळ कार्टा
अनाहिता के बगैर मिपा पे लिख्खा नही जाता*
अर्रे व्वा...संपादक + अनाहितेकडून कौतिक...ठ्यांकू :)
बायका नक्का हो म्हणू...पहिल्याच भागात कोणीतरी बायका असे लिहिल्याबद्दल टोचलेले
बाकी ज्ञान वाढले असेल तर पुढचा अनाहिता स्पेश्शल भाग नक्की वाचा :)
पुण्यात की ठाण्यात की मुंबईत?
या बायकांची स्वप्ने पडत असतील तर ठिकै...या बैका तुम्च्या डोक्यावर नै बस्णार ;)
*सुझानचा माजी नव्रा टू ऐश्वर्याचा आजी नव्रा व्हाईल कॉईन देतानाचा सीन ईन धूम-२
28 Apr 2015 - 7:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
त्यांना मुलाला ड्युकाटी घेउन द्यायला लागली तर त्या तुला त्याचं ड्युकाटी खाली घालणार एवढं खर्ं ;)
29 Apr 2015 - 11:43 am | टवाळ कार्टा
कै सांग्ता येत नै...आज्काल धमक्यांच्या खरडी / व्यनी यायला लाग्लेत
झेड का काय्ते अस्ते तस्ली शिकूरीटी मिपावर मिळ्ते कै?
27 Apr 2015 - 6:27 pm | जेपी
bajaj avenger बद्दल काय मत आहे???
27 Apr 2015 - 6:45 pm | कपिलमुनी
त्याची पीएचडी आहे bajaj avenger मधे !
27 Apr 2015 - 7:19 pm | टवाळ कार्टा
सध्ध्या वापरतो आहे Avenger 220 DTSi
विकायची आहे...घेणार का...बाकी Avenger बद्दल लिहिनच...तितका धीर धरवत नसेल तर इथेच विचार काय ते...वरची प्रश्नपत्रिका बघ पैसा तैंना दिलेली :)
27 Apr 2015 - 7:26 pm | जेपी
सध्या टैम आहे.वेळ आली की सांगेन.
27 Apr 2015 - 7:32 pm | टवाळ कार्टा
मागणार आहेस कै ;)
27 Apr 2015 - 7:34 pm | जेपी
तसल्या अपेक्षा नैत
27 Apr 2015 - 7:37 pm | टवाळ कार्टा
खिक्क
30 Apr 2015 - 12:34 pm | जेपी
लै खिक्क..खिक्क ..करायला आजकाल..सांगिन नाव दंतोप्टक अनाहिताला..मग बसशील बोबंलत...
ऑं...खिक्क
27 Apr 2015 - 7:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सांगतो रे रात्री. जर्रा कामात आहे. काम करता करता इथे टवाळक्या चाल्ल्यात. ते झालं की हे संपादित करतो.
28 Apr 2015 - 11:35 am | टवाळ कार्टा
कै सांग्तो?