बाईक्स घेताना - भाग १
बाइक्स घेताना - भाग २
बाइक्स घेताना - भाग ३
...तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू...मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत...त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत
१३५ cc
"ना घर की ना घाट की" segment
१३५ cc च्या बाईक्स का बनवतात हे अजूनही मला समजलेले नै...
बाईकची पॉवर जवळजवळ १५० cc इतकीच (किंचित कमी...कधीकधी किंचित जास्त)
मायलेज जवळजवळ १५० cc इतकेच किंवा किंचित जास्त
दिसणे १५० cc समोर काही खास नाही (याला एक अपवाद आहे)
किंमत जवळजवळ १५० cc इतकीच किंवा किंचित कमी
तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च जवळपास १५० cc इतकाच
अतिरिक्त वैशिष्ट्ये...(additional features) - कैच नैत (याला एक अपवाद आहे)
पण असे असतानाही जर बाईक बनवणार्या कंपन्या १३५ cc च्या बाईक बनवत असतील तर नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी कारण असेलच...असो
मलातरी हे सगळे मुद्दे बघता १२५ cc पेक्षा जास्त इंजिन कपॅसीटीची बाईक घेताना १५० cc ऐवजी १३५ cc ची बाईक का घ्यावी याचे उत्तर कधीच नै मिळाले...कोणी सांगेल का इथेतरी?
अगदी काही वर्षांपर्यंत या segment मध्यॆ एकापेक्षा जास्त पर्याय होते...जसे
Bajaj Pulser 135- LS
Bajaj Discover DTSi 135
Hero Honda Achiever
पण बहुतेक सगळ्या कंपन्याना कमी होणारी विक्री जाणवली असावी कारण भारतातले बाईक मार्केट आता प्रगल्भ होत आहे (फक्त चोखंदळ निवडीबाबत...सुरक्षित चालवण्या बाबत आनंदच आहे सगळीकडे) त्यामुळे आता या segment मध्ये फक्त एकाच बाईक उपलब्ध आहे
http://bikeadvice.in/125cc-motorcycle-segment-india-shrinking/ या बातमी नुसार हेच १२५ cc बद्दल सुध्धा सुरु झाले आहे
Bajaj Pulser 135- LS
बजाजने पल्सार आणल्यापासून त्यात वेळोवेळी बरेच बदल करत होती...पण टेक्नोलॉजीकल मोठ्ठा बदल याच बाईक पासून केला...
Biggest USP - world's first bike with 4 valve DTSi engine
भारतात अजूनही 4 valve इंजिन असणार्या बाईक्स फक्त बजाजच बनवते...बहुतेक फक्त बजाजकडेच पेटंट असावे (याबाबत मलातरी नक्की माहिती नाही)
4 valve इंजिनाचे फायदे
इंधन ज्वलनातून जास्तीत जास्त उर्जा मिळवता येते
इंजिनाची कार्यक्षमता वाढते आणि मायलेज सुध्धा
कमी cc च्या इंजिनामधून जास्त पॉवर मिळवता येते
(अधिक माहितीसाठी कॉलिंग चिमणराव)
टेक्नोलॉजी मधल्या बदलाबरोबरच पल्सरची नट-क्रॅकर* :D इमेज बदलणेसुध्धा याच बाईकपासून सुरु झाले
बजाजच्या ट्रिपल स्पार्क प्लगवाल्या इंजिनांचे माहित नाही पण त्या आधीच्या बजाजच्या सगळ्या इंजिनांमध्ये या बाईकचे इंजिन सगळ्यात बेस्ट आहे
१३५ cc मधून १३.५ PS पॉवार मिळते जी काही १५० cc बाईकच्या पॉवरपेक्षा जास्त आहे (होंडा युनिकॉर्न, यामाहा SZ, बजाज Discover १५० DTSi, ई.)
speed आणि acceleration च्या बाबतीत सुध्धा वर लिहिलेल्या बाईक्सपेक्षा उजवी आहे आणि मायलेजसुध्धा ६० kmpl च्या आसपास मिळते
इंजिन ३० kmph इतक्या कमी स्पीडलासुध्धा ५ व्या गिअरमध्ये knocking करत नाही
लुक्सच्या बाबतीत बघावे तर काही first in class features आहेत...जसे
clip-on handlebars
split seats
DC circuit
5 step adjustable rear Nitrox shock absorber
ज्यांची उंची कमी आहे अथवा ज्यांना १५० cc च्या बाईक्स वजनदार वाटतात आणि पिकपसुध्धा हवाय, थोडे बरे मायलेज पण हवे पण १२५ cc किंवा त्यापेक्षा कमी cc च्या बाईक्स वरणभात टाईप वाटतात अश्या सर्व बाईकप्रेमींसाठी ही बाईक "आखुडशींगी बहुगुणी लाथा न मारणार्या दुभत्या गायीसारखी सर्वगुणसंपन्न" आहे...हि "विद्या बालन"
*ज्यांनी पल्सरचे सगळ्यात पहिले मॉडेल चालवले आहे त्यांना व्यवस्थित कळले असेल मला काय म्हणायचे आहे ;)
Disclaimer - या लेखातली सर्व मते माझी खाजगी मते आहेत
प्रतिक्रिया
27 Apr 2015 - 1:25 pm | काळा पहाड
डिस्क्लेमर का लिहिलाय काही कल्ला नाय
27 Apr 2015 - 1:30 pm | टवाळ कार्टा
बरे असते लिहिलेले :)
27 Apr 2015 - 1:42 pm | जेपी
काय त्यो अभ्यास...
_/\_
27 Apr 2015 - 2:01 pm | पॉइंट ब्लँक
+१००
27 Apr 2015 - 2:12 pm | टवाळ कार्टा
चायला वरच्या दोन्ही प्रतिसादांत "खौचट्टपणा" आहे की नाही हे कोणी अनाहिता संगू शकतील कै?
27 Apr 2015 - 2:14 pm | पैसा
पुणेकर किंवा कोब्रा असणे पुरेसे नाही का?
27 Apr 2015 - 2:19 pm | टवाळ कार्टा
ते तुम्च्याकडे सिक्स्थसेंस का कायते अस्ते ना...आणि खौचट्टपणा ओळखता येणे हा गुण पुरुषांमध्ये जर ते "पुणेकर किंवा कोब्रा" असतील तर कदाचित असेल...पण सग्गळ्या बायकांत असतोच्च ;)
27 Apr 2015 - 2:22 pm | पैसा
किती प्रतिसाद पायजेत? कंपूला बोलावते थांब. (अनाहिताचा नव्हे, दुसरा.)
27 Apr 2015 - 2:37 pm | टवाळ कार्टा
अनाहितांचा कंपू अधिकृत आहे...त्यांनाच बोलवा ;)
27 Apr 2015 - 2:48 pm | टवाळ कार्टा
अनाहितांचा कंपू अधिकृत आहे...त्यांनाच बोलवा ;)
27 Apr 2015 - 2:25 pm | पॉइंट ब्लँक
आता तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होणार !
27 Apr 2015 - 2:35 pm | जेपी
अरारा,
कौतुक पण खवचटपणा वाटला...
लाडोबा झाल्यापासुन हा गुण चिटकला वाटत..
27 Apr 2015 - 2:38 pm | टवाळ कार्टा
आज्काल कै समजत नै :(
27 Apr 2015 - 2:41 pm | पॉइंट ब्लँक
ही ही!
27 Apr 2015 - 2:38 pm | टवाळ कार्टा
तो तर लाडोबा झाल्यापासून होतच आहे ;)
16 May 2015 - 7:23 pm | सदस्यनाम
लाडोबा,
जरा अचिव्हर पाहा बरे, ती या सेगमेंटात येत नाही. अॅम्बिशन नंतरची जुनी अचिव्हर होति १३५ वाली पण ती लगेच बंद झाली. अॅस्पायर नावाने पण उतरवली पण रिस्पॉन्स नव्हता. अॅम्बीशन अजून डिपार्टमेंटाला देतात व्हाईट कलरची. आताची अचिव्हर १५० सीसी वाली आहे. achiver
16 May 2015 - 7:44 pm | टवाळ कार्टा
तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे...१३५ वाली अचिव्हर कधीच बंद झाली...पण तिचा फोटो नै मिळाला म्हणून हा लावलेला...१५० वालीबद्दल येइलच पुढल्याच्या पुढल्या भागात...स्टे ट्युन्ड :)
27 Apr 2015 - 2:06 pm | पैसा
माझ्या नवर्याची बजाज डिस्कव्हर आहे (सुरुवातीचे मॉडेल) १२५ सीसी. आता मुलाला बजाज पल्सार हवी आहे. त्याला आताच १८ पुरी झाली. मोटारसायकल चालवायला नुकताच शिकला आहे. त्याला पल्सार द्यावी का याबद्दल साशंक आहे (कानावर आलेल्या बर्याच अपघातांच्या हकीकतींमुळे).
27 Apr 2015 - 2:11 pm | टवाळ कार्टा
माझ्याकडे अजूनसुध्धा माझी पहिली बाईक आहे...तीच बजाज डिस्कव्हर आहे (सुरुवातीचे मॉडेल) १२५ सीसी :)
काही शंका असतील तर मुविंना दिलेली प्रश्नपत्रिका पाठवू का :)
27 Apr 2015 - 2:13 pm | पैसा
पाठव! कोल्हापूरला घेऊनच ये ना!
27 Apr 2015 - 2:26 pm | कपिलमुनी
मलासुद्धा पल्सर जास्त अपघातप्रवण वाटते .
युनिकॉर्न , हीरो सीबीझी ,यामाहा एफ झी , सुझिकी जिक्सर या गाड्या जास्त चांगल्या आहे.
27 Apr 2015 - 2:42 pm | टवाळ कार्टा
मुनिवर...गाड्या चांगल्या लाख असतील हो...चालवणार्याला जोपर्यंत फिल गुड वाटत नै तर कैच उपयोगाच्या नैत :)
27 Apr 2015 - 2:35 pm | टवाळ कार्टा
इथेच लिहितो...आणखी कोणाला हवी असेल तर "व्यनी करा" असे लिहायला नक्को ;)
तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या बाईकसाठीच्या सगळ्या expectations लिहून काढा...चालवणार तो असला तरी पैसे तुमचे आहेत...बाईकसाठी आणि पेट्रोलसाठीसुध्धा
बजेट जास्तीत जास्त किती ताणायची तयारी आहे
बाईक जास्तीत जास्त किती वर्षे वापरणार
तुमच्या मुलाने आधी कधी, कोणती बाईक चालवली आहे? असेल तर किती वेळ? आधी कधी पडला आहे बाईकवरुन?
बाईक घेण्यासाठी थोडे थांबण्याची तयारी आहे का? होय तर किती वेळ? कारण २०१५ मध्ये बरीच नवीन मॉडेल्स येणार आहेत
मुलाच्या रायडिंगबद्दल काही काळजी करण्यालायक गोष्टी आहेत का? जसे कट मारणे...विना हेल्मेट चालवणे...स्पीडमधे चालवणे...ड्रिंक्स घेउन चालवणे?
आठवड्याला किती वापर होईल
किंवा
मुलगा बाईकवेडा आहे कै? :)
27 Apr 2015 - 2:40 pm | टवाळ कार्टा
कल्लापूरला जमेलसे वाटत नै...तुम्ही पुण्यात येणार कै? तिकिट पाठवतो आणि पुण्यात जेवण आणि मस्तानी सुध्धा...आईस्क्रिम वेगळे :)
27 Apr 2015 - 3:03 pm | पैसा
ऑफर लय टेम्प्टिंग आहे पण तरी १० मे ला कब्बी नै!
27 Apr 2015 - 3:07 pm | टवाळ कार्टा
१० ला नै ओ...१ ला येताय का पुण्यात...९ ला कल्लापूरला पुण्यवान ग्यांग ब्रोब्र टरकातूनच जा ;)
27 Apr 2015 - 3:50 pm | पैसा
धा तारखेला अन्याभौ दातार काढण्या, टरक वैग्रे घेऊन तयार असतीलच, पण महत्त्वाचा प्रश्णः एक तारखेला पुण्यात काय आहे? कट्टा असल्याचं कै कुट्ठे ऐकलं नै ब्वा!
27 Apr 2015 - 3:58 pm | टवाळ कार्टा
तुम्ही या तर ;)
27 Apr 2015 - 2:30 pm | पॉइंट ब्लँक
पल्सार शक्यतो नको. ओळखीच्या लोकांमध्ये जास्त अपघात पल्सारचे झालेले पाहण्यात आहेत. टिव्हियस आपाचे, होंडा सीबीआर, किंवा यामा फेजरचा विचार करा. सर्विसिंगच्या दृष्टीने होंडा उत्तम.
27 Apr 2015 - 2:43 pm | टवाळ कार्टा
अपघात हे बाईकमुळे नाही तर चालवणार्यांच्या चुकीने होतात :)
या बाईक्सबाबत पुढिल लेखात येईलच...stay tunned :)
27 Apr 2015 - 2:51 pm | पॉइंट ब्लँक
हे काही अंशी सत्य आहे. पण बाईकचे चांगले डिझाईन बर्याच ठिकाणी अपघातातून शेवटच्या क्षणी वाचू शकते. समजा वेग जास्त असताना कुणी आडवा आला आणि डिस्कब्रेक करकचुन दाबायची वेळ आली तर पल्सार स्किड होण्याची शक्यता जास्त आहे. आपाचे आणि फेझर ह्या बाबतीत जास्त स्टेबल आहेत.
नक्कीच :)
27 Apr 2015 - 3:01 pm | टवाळ कार्टा
बाईकच्या डिझाईनचा आणि अपघातातून वाचण्याचा फार कमी संबंध आहे असे माझे मत आहे....कारण बाईकला फक्त २ चाके असतात त्यामुळे अपघात झाला तर बाईक पडणार आणि चालवणारासुध्धा घसरत जाणार हे ठरलेले असते...बाईकच्या अपघातातून स्वतःला दुखापत करून न घेण्याचा फक्त एकच उपाय आहे आणि तो म्हणजे बाईक शिस्तीत सुरक्षितरीत्या चालवणे
याबाबत सुध्धा असहमत...डिस्क्ब्रेक करकचून दाबल्यावरसुध्धा बाईक स्किड न होणे हे फक्त बाईकला ABS असेल तरच शक्य आहे (TVS Apache 180cc मध्ये आहे)...बाकी सगळ्या बाईक्स याबाबत सारख्याच धोकादायक आहेत
27 Apr 2015 - 3:09 pm | पॉइंट ब्लँक
असो. तुमची गर्लफ्रेंड( बायको नव्हे, तिच्या बाबतीत उलटं असल्याचं अनुभवी लोकांच मत आहे) भारी की माझी भारी ह्या वादाचा शेवट जसा होऊ शकात नाही तसा ह्याचाही होऊ शकत नाही ;) ह्या वादला अंत नाही.
हे १५० किंवा अधिक cc वाल्या बाइक बसल्यावर कधी सुचल्याचे आठवत नाही ;) काटा किर्र करण्यात एवढं कुठलं सुचतय राव.
27 Apr 2015 - 3:12 pm | टवाळ कार्टा
असा वाद करणेच चुकीचे आहे कारण कोणालाही दुसर्या बाजूचा अनुभव घेणे शक्य नसते ;)
27 Apr 2015 - 3:17 pm | पॉइंट ब्लँक
ही ही. सहमत ( "खौचट्टपणा" शिवाय ).
27 Apr 2015 - 4:46 pm | टवाळ कार्टा
खौचट्टपणा सग्ग्ळ्यात पहिला समजेल ;)
रच्याकने ते
याबाबत अधीक माहीती लिहिता का...माझेपण ज्ञान वाढेल (हा खौचट्टपणा नै...खरोखर विचारतो आहे) :)
27 Apr 2015 - 6:21 pm | पॉइंट ब्लँक
हे काही ऐकण्यात आलेले मुद्दे आहेत. चुकिचे असतील तर दुरुस्ती सुचवने.
पल्सार १५० चे दोन्ही टायर १७ इंचाचे आहेत. तर आपाचेची पुढचे टायर १७ इंचाचे आणि मागचे टायर १८ इंचाचे आहे. त्त्यामुळे बाईकचा जास्ती वजन पुढच्या भागावर शिफ्ट होते. हे स्टॅबिलिटीसाठी चांगले असते ( काही तरी सेंट्रिफ्युगल फोर्से कमी होतो असं कुठं तरी वाचल्याचे आठवते.)
दुसर, बाईक कंट्रोल करण्यासाठी किती स्नायुंची ताकत वापरात येते हे सुद्धा महत्वाच. उदा आरामदायक क्रुजिंग बाईक्स उदा थंडर बर्ड, अव्हेंजर ईत्याती नियंत्रित करण्यासाठी फक्त मनगट आणि फार फार तर पुढील हात (forearm) ह्यांचीच ताकत वापरता येते. ह्या विरुद्ध हंडल कमी उंच असलेल्या बाईक्स ( पुढे वाकून चालवाव्या लागनारया बाईक) चालवताना पुर्न हात आणि खांदे ह्यांची ताकद सुद्धा वापरता येते. (लांब पल्ल्याच्या प्रवासात हे चांगले नसते हा वेगळा भाग).
पल्सारचे हंडल थोडं उंच आहे ( थंडरबर्ड इतक नसलं तरी आपाचे, र१५ ह्या तुलनेत थोडं जास्ती उंच आहे). पल्सारची भली मोठी टाकीसुद्धा त्रासदायक आहे, गुडघे फार बाहेर येतात.
28 Apr 2015 - 12:16 pm | टवाळ कार्टा
मला तरी चूक वाटले पण www.xbhp.com किंवा www.team-bhp.com यावर चेक करा एकदा
तुम्ही सांगितलेली TVS च्या टायरची मापे चुकीची आहेत...TVS ला दोन्ही टायर १७" चेच आहेत
कुठल्याच बाईकला पुढचा टायर मागच्या टायरपेक्षा छोटा नसावा...फार चुकीचे डिझाईन आहे ते...अपघात झाला तर जास्त मार लागणार रायडरला
बाईकचे वजन कसे असावे हे बहुतेकदा बाईकच्या ईंजिनाची कपॅसिटी (cc) व बाईकचा प्रकार (कम्युटर, क्रूझर, रेसिंग, नेकेड स्ट्रीट, मोटोक्रॉस, ई.) यावर अवलंबून असते...
साध्या कमी कपॅसिटीच्या कम्युटर बाईक्ससाठी (१५० cc किंवा त्यापेक्षा कमी) बहुतेकदा वजन हे सारखे पसरवलेले असते (uniformly distributed)
रेसिंग बाईकसाठी वजन मुख्यत्वे पुढचे चाक व रायडर यांच्या मधोमध असते व मागचा भाग कमीत कमी वजनाचा असतो
क्रूझर बाईकसाठी वजनदार भाग जसे इंजिन आणी गीअरबॉक्स हे जमिनीला जवळ असतात...वजनसुध्धा बर्याचदा सारखे पसरवलेले (uniformly distributed) असते
बाईक कंट्रोल करणे म्हणजे काय? चालती बाईक वळवणे (रिकाम्या रस्त्यावर, ट्राफिकमध्ये, इ.)???
कोणतीही बाईक वळवण्यासाठी मनगट, हात, खांदे यांचा एकत्रित उपयोग होतो...Avenger आणि Thunderbird हे हत्ती आहेत कारण त्यांचा turning radius खूप जास्त आहे :)
28 Apr 2015 - 2:38 pm | पॉइंट ब्लँक
मी सांगितली मापे बरोबर आहेत. TVS ची वेबसाईट पहा.
http://www.tvsmotor.com/apache-160.asp
हेच करण्यासाठी बहुदा पुढच्या चाक छोटं ठेवलं आहे. जेणे करून CG पुढे शिफ्ट होईल.
नाही ह्या विषयी बोलत नाही. हार्ड ब्रेकिंग करायचा प्रयत्न करा. आपाचे, पल्सार आणि अव्हेंजर ह्या तीनहीवर हा प्रयोग करून बघा. आपाचेवर तुम्ही हा प्रयोग ८०-१०० च्या स्पीडवर करू शकता. पल्सारवर अजून कमी वेग ठेवावा लागेल आणि अव्हेंजर ५० ठिक आहे. बघा कुठल्या स्नायंवर तान येतोय आणी कुठ्ले उपयोगात येतात ते. आपचेवर एक पुशअप मारल्यासारखं वाटेल तुम्हाला ;)
28 Apr 2015 - 2:57 pm | टवाळ कार्टा
बहुतेक जुन्या अपाचेची स्पेक्स आहेत ती...नवीन बघा इथे (http://www.tvsapache.com/index-160.html#%2Ftechspec)...TVS वाल्यांचा घोळ आहे तो :)
CG हाच मुख्य फॅक्टर असतो बाईकची stability ठरवण्यात
हा हा हा...डिस्क-ब्रेकवाल्या बाईक चालवताना हार्ड ब्रेकींग करायची गरजच पडू नये असे चालवण्याकडे माझा कल असतो...आणि टचवूड जितक्या वेळा हार्ड ब्रेकींग करावे लागले आहे त्या प्रत्येक वेळी मी स्वतःच्या दोन्ही पायांवर तोल सावरू शकलो अश्याच स्पीडला होतो...पण तुम्ही जे म्हणत आहात ते समजले मला :)
अपाचेवर पुशप होणारच कारण forward leaned sitting position a.k.a. sporty sitting position
पल्सरवर हातावर नाही पण दुसरीकडे प्रेशर येते (जुनी पल्सर असेल तर ;) )
Avenger हार्ड ब्रेकींगच्या वेळेस बाकी कोणत्याही बाईकपेक्षा सगळ्यात आधी घसरेल कारण ती लांब आणि कमी उंचीची आहे...परंतू बहुतांशवेळा स्कीड झाल्यावर बाईक दोन्ही पायांच्या मधून घसरत जाईल आणि तुम्ही स्वतःच्या पायांवर उभे असाल :) (असे प्रत्येक वेळेस होईलच असे नाही पण दुसर्या कोणत्याही बाईकपेक्षा जास्त वेळा नक्कीच होणार)
बाकी जर ४५ kmph पेक्षा जास्तीच्या वेगाला हार्ड ब्रेकींग करावे लागत असेल तर बाईक चालवण्याची पध्धत फार चुकीची आहे असे माझे मत आहे
28 Apr 2015 - 3:13 pm | पॉइंट ब्लँक
ही ही. हे ऐकून आहे ;)
ह्म्म. (खौचट्ट्पणे) :D
28 Apr 2015 - 3:26 pm | टवाळ कार्टा
थोड्या चुक्याच मेरा...
बाकी जर ४५ kmph पेक्षा जास्तीच्या वेगाला हार्ड ब्रेकींग करावे लागत असेल तर बाईक चालवण्याची पध्धत अथवा निवडलेला रस्ता फार चुकीची/चुकीचा आहे असे माझे मत आहे
ते असे हवे होते :)
28 Apr 2015 - 6:51 pm | पॉइंट ब्लँक
तुमच्या नावाचा एक धागा निघालाय. काय चुक काय बरोबर ह्याचा हिशोब तिथं लावाला जाईल आता. तोवर इथं चर्चा थांबवू ;)
29 Apr 2015 - 11:43 am | टवाळ कार्टा
तो धागा वगळ्या विषयासाठी आहे...त्यामुळे कै आहे ते इथेच बोलू की
स्वगत - चायला ट्यार्पी खेचायला मिपावर माझा आयडी वापरला जैल असे कध्धीच वाटले नव्ह्ते ;)
29 Apr 2015 - 11:52 am | पॉइंट ब्लँक
मालक टेंशन घेवू नका. मजेत लिहिलं आहे ते :)
29 Apr 2015 - 11:56 am | टवाळ कार्टा
:)
मग चालूदे
6 May 2015 - 5:12 pm | अनिरुद्ध.वैद्य
आमितर काढ बाइक, हान किक अन सुरु .... बाकी हेल्मेट, ग्लोज, रायडींग जाकेट आणि मजबूत बूट घालूनच!
८० - १०० च्या स्पीडकडे जाण्याची हिम्मत येवढ घातल्याशिवाय होताच नाही.
6 May 2015 - 5:31 pm | टवाळ कार्टा
करू सुध्धा नये
27 Apr 2015 - 3:17 pm | टवाळ कार्टा
म्हणूनच खालील बातमी दुर्दैवाने अजूनही सत्य आहे
http://articles.economictimes.indiatimes.com/2008-01-16/news/27719982_1_...
6 May 2015 - 5:17 pm | अनिरुद्ध.वैद्य
गाड्या नकोतच यायला इतक्यात. पब्लिक रेडी नाहीये. जबरदस्त पॉवर आणि अफाट स्पीड असतो. भारतीय रस्त्यांवर क्षमतेपेक्षा २०-२५% टक्यावर चालवाव्या लागतील.