नंदिहिल्स बेंगलोरपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहे. नंदिहिल्स हि बेंगलोरवासियांसाठी सुटीच्या दिवशी भेट द्यायची आवडीची जागा. सुटीच्या दिवशी जवळपास जत्रा भरेल इतकी गर्दी असते आणि टेकडीवरचे योगानंदिश्वरा मंदिर सर्वांच्या परिचयाचे आहे. पण नंदिहिल्सच्या पायथ्याशी असलेलं भोगानंदिश्वरा हे बारशे वर्श जुनं मंदिर मात्र दुर्लक्षित राहिलं आहे. हे मंदिर नंदिहिल्सपासून फक्त पाच किमी अंतरावर नंदिग्राम ह्या खेड्यात आहे.
नवव्या शतकात बाणा राज्यघराण्याची राणी रत्नावली हिने ह्या मंदिराची स्थापना केली. ह्या मंदिराचा पुढे, गंगा, चोला, होयसाळा, पल्लवा आणि विजयनगर ह्यांचा कारकिर्दित विस्तार झाला. मंदिराच्या कलाकृतींमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. मंदिराचा आवार प्रशस्त असून तिथे अरुणाचलेश्वर, उमामहेश्वर आणि भोगानंदिश्वर असे तीन मंदिरांचे संकुल आहे.
अरुणाचलेश्वर ही महादेबाची बाल अवस्था, भोगानंदिश्वरा ही तारुण्य अवस्था आणि योगानंदिश्वरा ही वैराग्यावस्था मानन्यात येते. भोगानंदिश्वरा हे शिवाच्या तारुण्य अवस्थेला समर्पित केले आहे.
मंदिराचा आवार प्रचंड मोठा आहे. त्याचे काही फोटो
प्रवेशद्वारावर कोरलेल्या काही अप्सरा.
आता मुख्य मंदिराचे काही फोटो.
आता मंदिरातील मूर्त्या आणि इतर कलाकुसर.
ह्या मंदिराच्या आवारात शृंगेरी तिर्थ नावाची एक मोठी पुष्कर्णी आहे आणि तिथे पिनाकिणी नदिचा उगम होतो असे मानन्यात येते.
पुष्कर्णीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला मंड्प.
पुष्कर्णीचे फोटो
पुष्कर्णीच्या भोवतलचा परीसर आणि तिथले मूर्तीकाम.
आता नंदिहिल्स वरून सूर्यास्ताच्या वेळी काढलेले काही फोटो.
चोला, होयसाला आणि विजयनगर ह्यांच्या कलाकृती एकाच ठिकाणी असणारे हे दुर्मिळ मंदिर आहे. प्रत्येक इतिहासप्रेमी मानसाने भेट जरूर द्यावी.
मंदिराला भेट देण्यासाठी दोन प्रकारे प्लॅन करता येत. नंदि हिल्स वर सूर्योदय पाहा. मग खाली येवून मंदिराला भेट द्या.
किंवा दुपारी दोन-तीनच्या सुमारास आधी मंदिराला भेट द्या मग नंदिहिल्सवर सुर्यास्त पाहायला जा.
मंदिराविषयी अधिक माहीत तुम्हाला इथे मिळेल.
http://www.karnataka.com/nandi-hills/nandi-village-bhoga-nandeeshwara-te...
प्रतिक्रिया
25 Apr 2015 - 12:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेख आणि फोटो ! अजूण एक प्राचीन भारतिय सौंदर्यस्थळ !! त्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !
25 Apr 2015 - 1:10 pm | कवितानागेश
छान जागा आणि फोटो.
चांगली चाललिये भटकंती.
25 Apr 2015 - 1:17 pm | सतिश गावडे
मस्त !!!
फोटो अप्रतिम आहेत. या जागेबद्दल बंगळूरूवासी मित्रांकडून खुप ऐकले होते.
25 Apr 2015 - 2:13 pm | कविता१९७८
मस्त माहीती, फोटो सुरेख.
25 Apr 2015 - 3:11 pm | बॅटमॅन
या देवळाबद्दल ऐकून होतो, मात्र बेंगरुळास असतानाही कधी जाणे झाले नाही. विस्तृत माहितीकरिता अनेक धन्यवाद! मूळ शिल्पकलेप्रमाणेच फोटोही छान आलेत. अप्सरा व पुष्करणी यांचे फटू जास्त आवडले. पुष्करणीच्या या डिझाईनबद्दल अल बेरूनीच्या पुस्तकातही प्रशंसोद्गार काढण्यात आलेत- खूप लोक असले तरी अशा डिझाईनमुळे गर्दी होत नाही वगैरे वगैरे.
27 Apr 2015 - 2:04 pm | पॉइंट ब्लँक
अल बेरूनीचे पुस्तक वाचले नाही, पण खाली चित्रगुप्त ह्यांनी सुचवल्याप्रमाणे एखादा लेख त्या संदर्भात टाकालत तर छान होईल. बाकी माहितीसाठी धन्यवाद.
25 Apr 2015 - 3:58 pm | अजया
नविन माहिती आणि छान फोटो.बंगलोरला जाऊनही न पाहिलेले स्थळ गवसले.धन्यवाद.
25 Apr 2015 - 9:49 pm | चित्रगुप्त
वा सुंदर.
अवांतरः 'भोगानंदिश्वरा' हे स्त्रीलिंगी नाव झाले. शंकराबद्दल असेल, तर 'भोगनंदीश्वर' असावे. तसेच 'चोला', 'होयसाला' वगैरे आंग्लाळलेले उच्चार जरा खटकतात.
@बॅटमन : पतंजली योगसूत्रांचे प्रथम अन्य भाषेत भाषांतर म्हणजे अल बेरूणीने केलेले अरबी भाषांतर होय, असे अलिकडेच वाचनात आले. हे वाचून अल बेरूणीबद्दल अतीव आदर मनात दाटून आला. अल बेरूणी बद्दल एखादा लेख टाकता आला तर बघा.
27 Apr 2015 - 2:06 pm | पॉइंट ब्लँक
इथे बेंगलोरमध्ये त्याला भोगानंदिश्वरा असंच म्हणातात. बर्याच नावांच्या शेवटी "आ" जोडायची पद्धत आहे इथ. :)
26 Apr 2015 - 9:12 am | पैसा
अप्रतिम फोटो. हे देऊळ बहुतेक पाहिले होते असं वाटतंय.
26 Apr 2015 - 11:33 am | स्पा
वा वा, सगळे अँगल्स सुपर आवडलेत, मस्त,
पोस्ट प्रोसेसिंग पण बरच कंट्रोल मध्ये आहे आधिपेक्षा, खरतर इतक्या सुंदर फोटोंना प्रोसेसिंगची गरज नाही, उदा. तो झाडाचा फटु,इतका भडक करण्याची गरजच नव्ती :)
27 Apr 2015 - 2:08 pm | पॉइंट ब्लँक
वेळोवेळी प्रामाणिक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद :)
26 Apr 2015 - 11:46 am | सुहास झेले
मस्तच.... स्पा शी सहमत :)
26 Apr 2015 - 12:15 pm | प्रचेतस
फोटो आवडले.
साला दक्षिण भारताची सहल कधी होणार आहे कुणास ठाउक.
27 Apr 2015 - 2:09 pm | पॉइंट ब्लँक
हे असच माझं उत्तर भारतच्या बाबतीत झालं आहे. :( बघु जमेल कधी तरी !
26 Apr 2015 - 2:41 pm | एस
अगदी सुंदर धागा व छायाचित्रे. नंदीहिल्स पाहिले, पण तिथल्या गर्दीमुळे अजिबात आवडले नव्हते. तेव्हा या जागेची माहिती असती तर नक्कीच गेलो असतो.
27 Apr 2015 - 2:11 pm | पॉइंट ब्लँक
हा त्रास बेंगलोरमधल्या जवळपास सर्व ठिकानी चालू झाला आहे. पूर्वी ज्या ज्या जागा शांत म्हणून प्रिय होत्या ता सर्व ठिकाणी आजकाल भरमसाठ गर्दी असते :(
26 Apr 2015 - 10:12 pm | किसन शिंदे
मस्त आहेत सगळे फोटो.
26 Apr 2015 - 10:22 pm | स्रुजा
सुंदर जागा. छान परिचय करून दिलात. प्रतिसादांमधुन पण छान माहिती कळते आहे. तुमची भटकंती मस्त चालू आहे.
27 Apr 2015 - 7:44 am | Vimodak
खुप सुंदर फोटो आणि माहिती..आभार.
27 Apr 2015 - 4:32 pm | गणेशा
अप्रतिम लेख पुन्हा एकदा ... एकदम आवडली माहीती आणि फोटो.
अवांतर : आजच epic चॅनल वर कित्तुर ची माहीती सांगत होते तेंव्हा तुमच्या एल्खांची आठवण झाली होती
28 Apr 2015 - 5:41 am | रुपी
फोटो तर फारच छान!
28 Apr 2015 - 6:03 am | स्पंदना
अच्छा? तो सुर्यास्ताचा फोटो प्रोसेस्ड आहे म्हणुन असा दिसतोय तर! मी विचारात पडले! असो.
किती सुरेख मुर्ती आहेत. अन पुष्करणी सुद्धा मस्तच!! अतिशय आवडल हे ठिकाण.
28 Apr 2015 - 12:29 pm | सानिकास्वप्निल
छान माहितीपूर्ण लेख.
फोटो ही खूप सुंदर आहेत.
28 Apr 2015 - 3:41 pm | सतीश कुडतरकर
तसा देवाचा आणि आमचा संबंध कमीच. पण शिवा विषयी काही पाहिले कि कुतूहल आपसूकच जागे होते.
डोळ्यांची पारणे फेडल्याबद्दल, धन्यवाद!
28 Apr 2015 - 4:13 pm | मदनबाण
सर्वच फोटू सुंदर हायेत... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt
2 May 2015 - 11:41 pm | शब्दबम्बाळ
कालच जाउन आलो, पण तिथे एक लग्नाचा कार्यक्रम सुरु असल्यामुळे बर्यापैकी गर्दी होती…
तरीही सनईचे सूर कानावर पडत असल्यामुळे अजूनच छान वाटलं! :)
5 May 2015 - 5:01 pm | पॉइंट ब्लँक
लई भारी. तुम्ही जावून आलात हे वाचून फार आनंद झाला.
3 May 2015 - 6:25 pm | तिमा
सुंदर आणि वेधक फोटो. मंदिराचा परिचयही आवडला.
3 May 2015 - 9:24 pm | स्वाती दिनेश
फार सुरेख फोटो व माहिती.. भटकंती मस्त!
स्वाती
9 May 2015 - 6:15 pm | उमा @ मिपा
मंगळवारी जाऊन आले या देवळात. खूप सुंदर!
तुमच्या या धाग्यामुळे माहितीपण मिळाली. फोटो छान आलेत.