ज्येष्ठ साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी 'संवाद' पुरवणीत 'थोडासा नाराज आणि बराच शरमिंदा!' असा लेख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चालवलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने लिहिला होता. या लेखावर कवी-लेखक सलील वाघ यांची ही सविस्तर प्रतिक्रिया
....................
कोणी काहीच बोलत नव्हते. किरकोळ किरकोळ साहित्यिक लुटीपुटीची सेमी-लाडिक, तक्रारीसदृश्य विधाने करत होते पण कोणीच मोठा अणि महत्त्वाचा साहित्यिक याबद्दल बोलत नव्हता. आता चित्रे बोलले आणि त्यांनी कोंडी फोडली. कैक वर्षांपूवीर् आऊटडेटेड झालेल्या विचारसरणीच्या पिढीचे प्रतिनिधित्व या लेखात चित्र्यांनी केलेले आहे. या लोकांचा मानसिक अवकाश १९७५ च्या आधीचा आहे. हे लोकं १९७५ च्या पुढे आलेलेच नाही. १९७५ नंतर जगात काय घडतं आहे, समाजाच्या मनाची स्पंदनं कोणत्या शैलीने धडकतात याच्याबद्दल हे लोकं अनभिज्ञ असतात किंवा त्याकडे पूर्ण कानाडोळा करतात. राष्ट्रीय एकात्मता वगैरेची रोम्यँटिक व्हर्जन्स या लोकांच्या डोक्यात रेंगाळत असतात. आजच्या जागतिकीकरणोत्तर काळात शरीराने वास्तव्य करत असूनही मनानं हे लोक शीतयुद्धकालीन मानसिकतेतच वावरत असतात. ही मंडळी स्युडो-सेक्युलर असतात. दिलीप चित्र्यांनी मराठीच्या संदर्भात अनुवादाच्या माध्यमातून केलेलं अद्वितीय कार्य, 'शिबाराणीच्या शोधात' सारख्या 'कोसला'पेक्षा दजेर्दार आणि जागतिक पातळीच्या कादंबरीचं लेखन, बुद्धीला चालना देणारं समीक्षालेखन आणि त्यांनी न-कंटाळता उपसलेले कष्ट हे सगळंच त्यांना विशिष्ट उंचीवर नेतं. इतक्या महत्त्वाचे योगदान मराठीला देणाऱ्या चित्रेजींनी आपल्या लेखात इतकी विस्कळीत आणि विदूप भूमिका घ्यावी हे विसंगत वाटतं. चित्रे म्हणजे काही रंगनाथ पठारे, विलास सारंग किंवा प्रवीण दवणे नव्हेत. त्यामुळे चित्रेंच्या मताला काहीएक अर्थ आणि वजन असते आणि चित्र्यांबद्दल समाजमनात अजूनही आदर दाहे. शरमिंदा होण्यासारख्या हजार गोष्टी आजुबाजूला असताना मराठीच्या स्वाभिमानाबद्दल कोणी मराठीच्या बाजूने बोलताना जर आपल्याला शरमिंदा व्हावसं वाटत असेल तर एक लेखक म्हणून ती फारशी सन्मानाची गोष्ट नाही, जे लोकं सरळसरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे, काँग्रेसचे किंवा जनता दलाचे सच्चे कार्यकतेर् आहेत त्यांची पक्षनिष्ठा समजू शकते. पण चित्रे काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकतेर् नाहीत किंवा जदचेही प्रचारक नाहीत, ते एक लेखक आहेत त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे आश्चर्य वाटते अणि त्यांच्याशी मतभेद नोंदवणे गरजेचे वाटते.
मराठी भाषेची आणि संस्कृतिची निमिर्ती किमान दीड हजार वर्षांपूवीर् झाली. मराठीला निदान एक हजार वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. आपण गेल्या शंभरदीडशे वर्षांपासून (इंग्रजांपासून) आणि मुख्यत: नेहरूकाळपासून 'भारतीय' झालो. त्याच्या आधी आपण 'एत्तद्देशीय' होतो आणि त्याच्या आधी हजारेक वर्षांपासून आपण 'मराठी' आहोत. थोडक्यात आपण मूळ मराठी आहोत आणि नंतर भारतीय, नंतर आशियायी, मग जगाचे नागरिक, मग सूर्यमालेतले प्राणी, मग आकाशगंगेतले सजीव वगैरे आहोत. उद्या मंगळवार जीवसृष्टी सापडली आणि तिथले लोक जर पृथ्वीचा 'वसाहत' म्हणून वापर करायला लागले तर त्याला विरोध करायला शरमिंदा व्हायचं नसतं. इतकं साधं सरळ हे लॉजिक आहे.
महाराष्ट्राचा एकही मंत्री आज केंद सरकारात नाही. महाराष्ट्राचे कागदोपत्री निवासी असलेले जे मंत्री दिल्लीत आहेत त्यांची भूमिका, वागणूक आणि कर्तब पाहता त्यांचा मराठीपणा संशयास्पद आहे. बोटचेपी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना मराठी म्हणणे हे आपल्याला कमीपणा आणणारे आहे. गावात इकडे आपल्यासमोर म्हणजे आपापल्या मतदारसंघात वगैरे स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे हे शूरवीर नेते आज सोनियाजींच्या दारात उठाबशा काढताना दिसतात त्याची आपल्याला शरम वाटत नाही. पंतप्रधान वायचं, मुख्यमंत्री वायचं, महापौर वायचं, सरपंच वायचं असं काही ना काही 'वायचं'च्या आपल्या खासगी लालसेपोटी शेतकऱ्यांचा बळी देणारे व्याजमाफिये, करोडो रूपयांची संपत्ती ओरबाडणारे लँडमाफिये, सरकारी कॉन्ट्रॅक्टांमधून मलिदा खाणारे ठेकेमाफिये, साखरकारखानेवाले सहकारमाफिये, शिक्षणकुंटणकारखाने चालवणारे शिक्षणमाफिये, बायांच्या नादावर दौलतजादा उधळणारे सेक्समाफिये, बेकायदा उद्योगांना पाठीशी घालणारे उद्योगमाफिये अशा अनेक प्रकारच्या माफियांनी देशात आणि महाराष्ट्रातही अक्षरश: नंगानाच चालवलेला असताना त्याची आपल्याला शरम वाटत नाही आणि मराठीप्रेमाची मात्र शरम वाटते? लालू यादवसारखा चाराघोटाळ्यात आकंठ बुडालेला गणंग राबडीदेवीला राज्यघटनेतल्या तरतुदींच्या आधारे भारतीय संघराज्यातल्या एका राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर 'घरकी खेती' असल्यासारखा बसवतो, आपल्या अनेक विदूषकी चाळ्यांना आयआयएमसारख्या प्रसिद्ध संस्थेची स्टंटबाजीयुक्त मान्यता मिळवतो, मुंबईत येऊन मराठी माणसाचा अपमान करतो, मुलायमसिंगसारखा असभ्य, असंस्कृत राजकारणी अमरसिंग आणि त्यांच्यासारख्या चार उनाड साथीदारांची टोळी घेऊन येतो आणि इथं प्रक्षोभक डिवचणारी भाषा वापरतो, लोकांच्या पैशातून मिळणाऱ्या पगारावर आणि वदीर्च्या जोरावर जगणारा एखादा पगारी पोलिस 'मुंबई कुणाच्या बापाची' असा मग्रूर आणि उर्मट प्रश्ान् विचारून पूर्ण महाराष्ट्राचा अपमान करतो, जया बच्चनसारखी अत्यंत बोअर, कंटाळवाण्या भूमिका करून लाखो वर्षांपूवीर् कालबाह्य झालेली किरकोळ नटी कुत्सितपणे मराठीचा पाणउतारा करते, कुणीतरी एक मूर्ख भय्या मुंबईत येऊन हातात पिस्तुल घेऊन बसमध्ये लोकांच्या जिवाशी खेळतो. हे सगळं घडतं तेव्हा या सगळ्याची शरम नाही वाटत आणि मराठीप्रेमाची मात्र शरम वाटते?
एलटीटीईच्या आणि तमिळ अस्मितेच्या मुद्द्यावर तमीळ खासदार राजीनाम्याचे हत्यार वापतात, सौरभ गांगुलीसारख्या अत्यंत सरासरी दर्जाच्या उर्मट क्रिकेटरसाठी सगळे बंगाली एका सुरात गळा काढतात, डेरा सच्चाच्या प्रकरणात कथित अपमानाची प्रतिक्रिया म्हणून सरदार लोकं नंग्या तलवारी घेऊन भांडुपपासून परळपर्यंत दहशत माजवतात. तेव्हा या गोष्टींची नाही शरम वाटत आणि मराठीप्रेमाची मात्र शरम वाटते? थोडीशी तोडफोड महाराष्ट्रात झाली ती अगदीच किरकोळ आणि प्रतीकात्मक होती. मात्र, त्याच्या बदल्यात भय्यांच्या देशात असंस्कृतपणाची आणि जगबुडी आल्यासारखी प्रतिक्रिया उमटते, आचरट मिडियावाले मराठी संस्कृतीला व्हिलन ठवरतात, युरोप-रशियात आणि जगातल्या उर्वरित भागात झालेली वांशिक यादवी आणि संहार आपले लुब्रे आणि फुकटे समीक्षक लोचट कौतुकानी अभ्यासतात आणि देशोदेशीच्या वाह्यात चित्रपट दिग्दर्शकांनी बनवलेले असल्या विषयांवरचे फालतू भुक्कड सिनेमे चवीने चघळतात तेव्हा त्याची नाही शरम वाटत आणि मराठीप्रेमाची शरम वाटते? तेंव्हा राधासुता गेला होता कोठे तुझा धर्म?
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जबाबदार मराठी भाषिक नेतृत्वानी मराठी अस्मितेकडे उपहासाने आणि मराठी भाषेकडे उपेक्षेने पाहिले असल्यानेच आज राजकारण्यांकडून मराठीप्रेम शिकण्याची वेळ तरुण पिढीवर आली आहे. एका ज्येष्ठ पत्रकाराने म्हणल्याप्रमाणे मराठी समाजाला खूप दिवसात हीरो नव्हता तो मिळाला. तरुण पिढी राजला हिरो ना मानते त्याची कारणे अजूनही रिटायर व्हायची इच्छा नसलेल्या पिढीने आत्मपरीक्षणातून शोधायची आहेत. राजकारण्यांना कधीच लोकांच्या प्रश्ानंशी देणंघेणं नसतं. पण एखाद्या राजकारण्याला जर चांगली बुद्धी होत असेल आणि मराठी भाषेच्या आणि अस्मितेच्या मुद्द्याला जर समर्थन मिळत असेल तर अशांचा पाठिंबा घेण्यात गैर काय?
राज ठाकरेंचं नाव किणी प्रकरणात होतं, ते स्वत: इंग्लिश मिडियममधून शिकले, ते ब्रँडेड टी शर्ट घालतात, त्यांची मुलं इंग्लिश मिडियममधून शिकतात वगैरे आक्षेप क्षणभर मान्य जरी केले तरी जर आज राज ठाकरेंच्या निमित्तानी जर मराठी लोकांवरच्या अन्यायाला वाचा फुटत असेल तर त्यात शरम वाटण्यासारखं काय आहे? वास्तविक हा मुद्दा उपस्थित होताक्षणी एकुणएक मराठीप्रेमींनी, साहित्यिक-विचारवंतांनी टोळीभेद विसरून राजचं समर्थन करायला हवं होतं. त्याच्यानी उद्वेग नियंत्रणात राहिला असता. तसं झालं नाही. आता या असल्या ओढाताणीच्या राजकारणातून राज ठाकरेंचा गट उद्या प्रस्थापित होईल. त्यातून उद्याचे खंडणीकार जन्माला येतील. ते मराठीच माणसाला उद्या वेठीला धरतील. मतांची छटपूजा, सत्तेची नौटंकी आणि पैशाची रामलीला सुरू होईल. हे सगळे धोके सांगायला ज्योतिषी नकोत. थोडक्यात, आज राजना पाठिंबा दिल्याने उद्या कदाचित आपल्यावर पश्चातापाची वेळ येईल पण आज जर राजच्या पाठीशी आपण आपल्या शतीर्वर ठाम उभे राहिलो नाही तर उद्या पश्चातापाचीही संधी मिळणार नाही. उद्या करावा लागणारा पश्चाताप आजच करायची वेळ हे भय्येच नव्हे तर इतरही लोकं आपल्यावर आणतील.
सदरचा लेख मटा मधे छापुन आला होता तो जसाच्या तसा इथे देत आहे.
मिपाच्या धोरणात बसत नसेल तर सरळ उडवावा.
सदरहू लेखाची लिंक इथे देत आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3745689.cms
सदरहू लेखातील मला न पटलेले विधान "सौरभ गांगुलीसारख्या अत्यंत सरासरी दर्जाच्या उर्मट क्रिकेटरसाठी सगळे बंगाली एका सुरात गळा काढतात"
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
प्रतिक्रिया
23 Nov 2008 - 2:01 pm | वेताळ
बाळासाहेबाच्या आमंत्रणावरुन राज ठाकरे ३ वर्षानंतर प्रथमच मातोश्रीवर गेले आहेत. अजुन भेट चालु आहे.
उध्दव हजर नाही आहे तिथे. :?
23 Nov 2008 - 7:15 pm | विकास
उध्दव हजर नाही आहे तिथे.
म.टा. तील बातमी प्रमाणे:
राज ठाकरे आज दुपारी एकच्या सुमारास मातोश्री येथे दाखल झाले. त्यांनी सुरुवातील उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीच्या दुस-या मजल्यावर असलेल्या बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन राज ठाकरे बाळासाहेबांना भेटले. त्यावेळी खाली हॉलमध्ये असलेल्या उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांनी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी काही वडिलकीचा सल्ला दोघांना दिला.
23 Nov 2008 - 2:28 pm | सुक्या
बुद्धीजिवी लोकांमधे ही मराठी अस्मीतेसाठी होत असलेल्या ह्या आंदोलनाला मान्यता मिळते आहे हे वाचुन आनंद झाला. आताच्या राज्यकर्त्यांनी थोडा बोध घ्यावा हीच आशा ..
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
23 Nov 2008 - 2:38 pm | इनोबा म्हणे
अत्यंत रोखठोक, प्रतिक्रीयात्मक लेख. मनापासून आवडला.
विचारवंत/लेखक मंडळी आता या मुद्द्यावर एकत्र येतील तर बरे!
विलासरावांचे अजूनही दिल्लीच्या तख्तापुढे मुजरा घालणं चालूच आहे. परमेश्वर त्यांना सुबुद्धी देवो!!
लेख/लेखाचा दूवा दिल्याबद्दल अनामिकालाही धन्यवाद!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
23 Nov 2008 - 6:07 pm | अनामिका
"मार्ग वेगळे झालेच आहेत पण द्वेष नको.तसेच दोन्ही पक्षांमधे निकोप स्पर्धा असावी" असा सल्ला वडिलकीच्या नात्याने माननिय बाळासाहेबांनी दिल्याचे समजते... या भेटिने महाराष्ट्राच्या राजकारणातील समिकरणे बदलोत अथवा न बदलोत पण उद्धव व राज यांच्या मनातील किल्मीष व एकमेकांबद्दल आलेल मत्सर व द्वेषाच मळभ या निमित्ताने दुर झाल असाव अशी आशा करायला हरकत नाहि.या भेटिमुळे बहुतांश मराठी माणुस आनंदि असेलच पण आजची रात्र पवार,देशमुख,निरुपम व त्यांच्यासारख्या इतर विघ्नसंतोषी राजकारण्यांची झोप उडवणारी असेल हे मात्र नक्की..............
उद्धव राजने बाळासाहेबांच्या या सल्ल्याचा मान राखावा.व या पुढिल राजकारण अगदी गळ्यात गळे घालुन नाही केल तरी हातात हात घालुन कराव अशी आपली आमची माफक अपेक्षा..............
ही भेट घडवुन आणणार्या व्यक्तीचे आम्ही समस्त मराठी जन ऋणी आहोत्.कोण असेल बर तो पडद्यामागचा सुत्रधार. :?
"बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता असणारी"
"अनामिका"
23 Nov 2008 - 7:19 pm | विकास
राज यांच्या म्हणण्याप्रमाणे:
बाळासाहेबांचा आवडता व्यंगचित्रकार आहे डेविड लो. त्याची काही पुस्तकं माझ्याकडे होती. काही दिवसांपूर्वी साहेबांचा फोन आला होता. डेविड लोचं पुस्तक आहे का, अशी विचारणा करणारा. मी माझा लॉट तपासला. त्यात ते पुस्तक होतं. मी सांगितलं त्यांना की, पुस्तक आहे माझ्याकडे. ते म्हणाले, पाठवून दे. मग मी विचार केला. म्हटलं, मीच घेऊन येतो. तर ते म्हणाले... ये !
=))
आशा करतो, यातून काही चांगले निष्पन्न होईल! पडद्यामागचा सुत्रधार हा "जेष्ठ पत्रकार" आहे. असेल कदाचीत एखादा संसदपटू ;)
बाकी मला त्यांच्यातील राजकीय आणि व्यक्तिगत नाते मोडकळीस आले आहे असे वाटत नाही. (कदाचीत चांगल्या अर्थी पण...) टर्मिनेटरचे हे दोन तुकडे परत एकत्र येतील असे वाटते. कुठल्या रुपात ते काळ सांगेल..
23 Nov 2008 - 6:09 pm | पांथस्थ
दिल खुष झाला!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
24 Nov 2008 - 12:09 pm | अनामिका
पांथस्थ कुणी कुणाला ठोकल?
काही कळेल का? :P
"अनामिका"
24 Nov 2008 - 8:32 am | मराठी_माणूस
अत्यंत सडेतोड आणि योग्य लेख
24 Nov 2008 - 12:38 pm | अनिल हटेला
अत्यंत सडेतोड आणि योग्य लेख
असेच म्हणतो.......
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
24 Nov 2008 - 12:58 pm | अविनाशकुलकर्णी
वा छान व सडेतॊड लेख लिहिला आहे...दिलिप मराठी माणसानी "कुत्र्याचे काळे पिल्लु" सारखी कविता सहन केली ना? का त्या वेळी शरम वाटते म्हणुन मान खाली केली??
24 Nov 2008 - 2:01 pm | अभिरत भिरभि-या
राजचे मार्ग आक्षेपार्ह वाटले तरी बरेचसे मुद्दे सडेतोड आहेत. महाराष्ट्रातल्या (उरल्यासुरल्या) विचारवंतांकडून या भरधाव सुटलेल्या बांधाला योग्य पाट घालून देण्याची अपेक्षा होती.
एलटीटीईच्या आणि तमिळ अस्मितेच्या मुद्द्यावर तमीळ खासदार राजीनाम्याचे हत्यार वापतात, सौरभ गांगुलीसारख्या अत्यंत सरासरी दर्जाच्या उर्मट क्रिकेटरसाठी सगळे बंगाली एका सुरात गळा काढतात, डेरा सच्चाच्या प्रकरणात कथित अपमानाची प्रतिक्रिया म्हणून सरदार लोकं नंग्या तलवारी घेऊन भांडुपपासून परळपर्यंत दहशत माजवतात. तेव्हा या गोष्टींची नाही शरम वाटत आणि मराठीप्रेमाची मात्र शरम वाटते?
वरिल सर्व उदाहरणात तत्प्रांतिय वैचारिक नेतृत्व इतकी आत्मघातकी भूमिका घेताना पाहिले नाही.
खुळ्या राष्ट्रिय एकतेसाठी आत्मघात करणारे चित्रे पाहिले आणि महाराष्ट्रात या भूमीची काळजी करणारे अत्र्यांसारखे वैचारिक नेतृत्व संपल्याची खात्री पटली.
सौरभ गांगुलीसारख्या अत्यंत सरासरी दर्जाच्या उर्मट क्रिकेटरसाठी सगळे बंगाली
सौरभ गांगुली अगदीच सामान्य नाही पण त्याला कलकत्यात असलेला परमेश्वरासमान दर्जा मला व्यक्तीशः लायकीपेक्षा जास्त वाटतो.
icon-पूजक बंगालमधे बरीच वर्षे असलेला आयकॉन चा अभाव बंगाली सौरभच्या रुपात पूर्ण करत आहेत.