कॅनन 50mm/f1.8 लेन्स

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in काथ्याकूट
15 Apr 2015 - 12:12 am
गाभा: 

मी बर्‍याच ठिकाणी ह्या लेन्स बद्दल ऐकले व वाचले आहे. ही लेन्स आपल्या किट मधे असावीच असेच सर्व ऑनलाइन रिव्यू सांगत आहेत. तुमच्यापैकी कुणी ही लेन्स कधी वापरली आहे का? असल्यास कृपया मला फीडबॅक द्यावा. सध्या माझ्याजवळ 18-135 mm लेन्स आहे. पण ती कमी प्रकाशात तितकीशी उपयोगी नाही. 50mm घेऊन माझा नक्की फायदा होईल का ते कृपया सांगावे.

प्रतिक्रिया

फोटोग्राफर243's picture

15 Apr 2015 - 8:06 am | फोटोग्राफर243

50mm also called as nifty fifty, कमी प्रकाशात पण ही लेन्स खूप छान रिज़ल्ट्स देते, portrait साठी ही लेन्स चांगली आहे, वजनाने हलकी वापरायला पण सोपी अशी ही लेन्स

अजिंक्य विश्वास's picture

15 Apr 2015 - 8:17 am | अजिंक्य विश्वास

५० m.m. १/८ ही लेन्स माझ्याकडे आहे. पोर्ट्रेट छायाचित्रण करायला ही खूप उपयोगी लेन्स आहे. हिचे अपार्चर १/८ असल्यामुळे हिची खासियत म्हणजे ती संधीप्रकाशात अथवा रात्रीच्या वेळेस कमी isoवर वापरता येते. आणि ब्लर इफेक्टसुद्धा छान देते. ही प्राईम लेन्स असूनदेखील खूप कमी किंमतीमध्ये ऑनलाईन उपलब्ध आहे. रू.५७००/-. ह्या मध्ये एकच कमी आहे. त्याला इमेज स्टॅबिलायजर नाहिये. पण त्याची गरज देखील भासत नाही.

अभिजीत अवलिया's picture

15 Apr 2015 - 2:00 pm | अभिजीत अवलिया

रू.५७०० मधे कोणत्या साइट वर उपलब्ध आहे ते सांगा ना. मला 7354 ही किंमत दिसतेय flipkart
वर. पोर्ट्रेट छायाचित्रण सोडून लॅंडस्केप छायाचित्रण करण्यासाठी पण ही उपयोगी पडेल का?

नांदेडीअन's picture

15 Apr 2015 - 2:44 pm | नांदेडीअन

पोर्ट्रेट छायाचित्रण सोडून लॅंडस्केप छायाचित्रण करण्यासाठी पण ही उपयोगी पडेल का?

नाही.
मी निकॉनची 35mm 1.8g लेन्स वापरतो.
लॅन्डस्केपसाठी तुम्हाला 35mm च्याही खालची लेन्स घ्यावी लागेल.

तुमच्याकडे 18-135mm लेन्स आहे ना.
ती 35mm वर सेट करून लॅन्डस्केप फोटो काढून बघा.

पॉइंट ब्लँक's picture

15 Apr 2015 - 3:10 pm | पॉइंट ब्लँक

पोर्ट्रेट छायाचित्रण सोडून लॅंडस्केप छायाचित्रण करण्यासाठी पण ही उपयोगी पडेल का?

हा मजेशीर प्रश्न आहे. आणि मी स्वतः बर्याच वेळा ६०mm किंवा त्याहून अधिक फोकल लेंथच्या लेन्सेसला लँडस्केपसाठी ११-१६ पेक्षा जास्ती प्राधन्य दिले आहे. तुम्हाला फोटोत काय दाखवायहे आहे त्यावर बरच अवलंबून आहे.
उदा. तुम्ही समुद्राकाठी सुर्यास्ताचा फोटो काढायला गेलाय. खालील तीन प्रकारे फोटो काढतो येतो. आणि मी अशा परीस्थितीत वापरलेली फोकल लेंथ देत आहे.
१. तुम्हाला पाणि, आकाश आणि जमीन ह्यावर रंगाच्या बदलणार्या छ्टा पूर्ण क्षितिजावर दाखवायचे आहे - ११mm
2. तुम्हाला सूर्य आणि त्याचे पाण्यावरचे प्रतिबिंब ह्याला प्राधन्य द्यायचा आहे किंवा उंच उसळणार्या लाटा दाखवायच्या आहेत - ६०mm
3. तुम्हाला भला मोठा सूर्य दाखवायचा आहे - ३०० mm
हाच योग्य वापर आहे अस मला म्ह्णायच नाही आहे. पण फोटोग्राफी साठी नियम फारसे महत्वाचे नसतात हे स्पष्ट करायचे होते. :)

जातवेद's picture

18 Apr 2015 - 11:37 pm | जातवेद

अगदी बरोबर

सह्यमित्र's picture

15 Apr 2015 - 11:02 am | सह्यमित्र

अतिशय उत्तम लेन्स आहे. f/1.8 इतके मोठे aperture असल्याने कमी प्रकाशात देखील जास्त shutter speed मिळतो. त्यामुळे ISO value कमी ठेवून चांगले छायाचित्र घेता येते. crop sensor वाला कॅमेरा असेल (५५०D, ६००D etc ) तर effective focal length ७५ mm मिळते जी portraits साठी योग्य आहे.

संदीप डांगे's picture

15 Apr 2015 - 11:38 am | संदीप डांगे

उत्तम लेन्स. माझ्याकडे आहे. वापरलेली चालणार असल्यास सांगा.

अभिजीत अवलिया's picture

15 Apr 2015 - 2:01 pm | अभिजीत अवलिया

संदीप साहेब,
मे सध्या U.K. मधे असल्याने तुमच्याकडून घेऊ शकणार नाही.

निशिकान्त's picture

16 Apr 2015 - 3:35 pm | निशिकान्त

मला हवी आहे. सद्ध्या आपण वापरता का? किंमत किती?

नांदेडीअन's picture

15 Apr 2015 - 2:42 pm | नांदेडीअन

1.8g घ्या.
1.8g आणि 1.8d मधला फरक.
https://www.youtube.com/watch?v=6my3DO00X2

Reason for editing :
माफ करा, मी निकॉनबद्दल बोलत होतो.
नंतर चूक लक्षात आली.

हो चांगली आहे.परंतू माझे फिल्म कॅम्र्याचे किट आहे आता डिजिटल साठी कामाचे नाही.२८mm f/2ची फार महाग होती (८५ साली वीस हजार )म्हणून टोकिनाची घेतली होती (३ हजार)एका लेन्सच्या किंमतीत आख्खे किट येते पण फिर छान फोटो येतात.
माझे मत-१)२८mm नेचर आणि स्ट्रीट फोटो
। २)१३०mm/110mm f/2 portrait फार महाग असतात.

एकेका लेन्सचा विचार न करता वाइड ते टेली इशा तीन प्राइम फोकल लेंग्थचा विचार पक्का करणे बरे.मला कॅम्ररावर ३५/५०mmचा पर्याय होता।.५०ची घेतली,२८mmf2 टोकिना+,70-200zoom canon इसे किट बनवले.

स्वधर्म's picture

16 Apr 2015 - 1:42 pm | स्वधर्म

वरील फिल्म कॅमेरा अाणि निकाॅरच्या दोन लेन्सेस माझ्याकडे पडून अाहेत. त्या अाॅटोफोकस अाहेत. मला फोटोग्राफीचा फार षौक नाही. या धाग्याच्या निमित्ताने त्यांचा काही उपयोग अाहे किंवा अाता त्या गोष्टी निव्वऴ भंगार झाल्यात, याबद्दल कोणी काही सुचवेल काय?

कंजूस's picture

19 Apr 2015 - 7:06 am | कंजूस

कॅननवाल्यांनी EOSकॅम्रा बनवतांना संपूर्ण नवीन जोड (mount)टाकला त्यामुळे ही आतातरी भंगार आहेत.माझ्याकडे मुलीचे याच लेनसचे फोटो आहेत फ्लॅश न वापरता काढलेले.मला कोणी मुलांचे फोटो तीनचार फुटांवरून फ्लॅश टाकून काढताना पाहिले की राग येतो.या लेन्सला ओटोफोकस मोबाइल कॅम्रा लावता आला तर माझी तीनही लेन्सिज वापरता येतील.यांचा माउंट नवीन डिजिटल कॅम्रा बॅाडीला बसत नाही.

आजची टाइम्समधली जाहिरात(page 7) -
कॅनन EOS 1200D +18-55 LENS+50MM 1.8LENS
रुपये ३३०००

कपिलमुनी's picture

23 May 2015 - 3:37 pm | कपिलमुनी

EOS 1200D is not good camera.