आणि गोव्याची साद आली ........ पुन्हा एकदा

किणकिनाट's picture
किणकिनाट in भटकंती
13 Apr 2015 - 6:04 pm

मिपाकर मंडळी, नमस्कार.

आजच लिखाण करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आपणा सर्वांना आव डेल अशी आशा.

आणि गोव्याची साद आली ........ पुन्हा एकदा

गोव्याची साद तशी नेहमीच येत असते कानावर आणि वर्षातून कमितकमी २ वेळा तरी आम्ही गोवाभेट घेतली आहे, गेली पाच एक वर्षेतरी नक्कीच. २०१४ मधे मात्र मे १४ ते मार्च १५ एवढा काळ लोटला पण जाता आले नव्हते. आता ह्या मेमधे नक्की जायचे असे ठरवले आणि आमच्या लाडक्या जनशताब्दीची तिकिटे काढली. तीन महीने आधीपासूनच वारे वाहायला लागले. आणि अहो आश्च्रर्यम ...... सौ. आणि चिरंजीव दोघांनी डिक्लेअर केले की त्यांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुट्टी मिळू शकते. मग तर वारे अजून जोराने वाहायला लागले, जायची जनशताब्दीची तिकिटे मिळाली पण येण्याच्या ठरवलेल्या दिवशी तिकिटे प्रतिक्षायादीत. तरीही वाट पाहू लागलो.

परत एक आश्चर्याचा धक्का .... सौ. आणि चिरंजीव दोघेही म्हणाले कारने जाऊयात, खरेतर दोघेपण कारपेक्षा ट्रेन पसंत करतात पण ह्या वेळी दोघांचा वेगळा सूर होता. त्यांचा सूर बदलायच्या आत पहिल्यांदा ट्रेनची तिकिटे प्रतिक्षायादीचे स्टेटस न बघता रद्द केली आणि सज्ज झालो.

२८ मार्च, शनीवार सकाळी ६.१५ प्रयाण.

मागच्या वेळेस ह्याच वेळी निघून दुपारचे जेवण गोवा हद्द पार करून पात्रादेवी ते म्हापसा दरम्यान केले होते (३.०० वाजता). ह्या वेळीही तसेच करू असे ठरवून निघालो पण एक पंक्चर, चाक बदलणे, पंक्चर काढणे आणि पुणे परिसर,सातारा, टोलनाके आणि वाटेतला ट्राफिक यांनी साधारण १.३० तास मागच्या वेळेपेक्षा मागे पडलो.

पंक्चर काढताना सूर्यदर्शन

Suryadarshan

आम्ही ठरवले होते की सुर्यास्तापर्यंत पाळोळेला पोचायचे पण आता ती शक्यता धूसर झाली आणि उत्तर गोव्यातच आज मुक्काम करायचा असे ठरवले. वाटेतल्या खादाडीची सूरुवात अर्थातच मिसळपावनेच

भुइंजला मि. पा.

Bhuinja Mi Paa

नंतर मात्र जेवायला आजय्राला ४५ मि. थांबून थेट गोवा गाठले. घाटानंतर आणि एकूणच २-३ तासांनी गाडी व पायांना आराम द्यायला १० मिनीटे रस्त्याच्या बाजूला गाडी घेऊन बंद केली की झाला दोघांचा आराम. आजरा गावात जेवण छान चवदार मिळाले. घेतलेला मार्ग एक्सप्रेस वे - सातारा - कोल्हापूर - थावंदी फाटा - आजरा - अंबोली - विलवडे - बांदा - म्हापसा बाहेरून - अंजूना.

विलवडेमार्गे एकदम बांदा गाठता येते, सावंतवाडीला जावे लागत नाही. १० एक कि.मि. वाचतात. पण मधला रस्ता फारच खराब झाला आहे, मागच्या वेळी बरा होता.

तर पुन्हा एकदा गोंय दर्शन .......... आणि हे
धारगळचा टोल नाका (गोवा एंट्री टॅक्स)

Dhargal Toll

संध्याकाळचे ५.००. मोर्चा सरळ वॅगॅतोरकडे वळवला. धारगळ ते वॅगॅतोर सुद्धा वेळ लागला. वाटेत पेट्रोल फूल केले. (आता येथील पेट्रोल फक्त ९.०० रू. स्वस्त आहे, मागच्या वेळेस हा फरक तब्बल २० रू. होता). हॉटेल शोधण्याच्या फंदात न पडता गाडी वॅगॅतोर फूट्बॉल ग्राऊंड्समोर उभी केली (थलासासमोरचा पार्किंग लॉट), पैसे,मोबाइल, कॅमेरा बरोबर घेतले, इतर सर्व सामान गाडीतच सोडून एक ५०-६० पायरी खाली उतरलो आणि उत्तर गोव्यातील आमच्या आवडत्या बीचवर पाऊल ठेवते झालो. लिटल वॅगॅतोर किंवा ओझरान बीच. मेन किंवा बिग वॅगॅतोर बीचच्या खूपसा डावीकडे असलेला हा बीच पटकन दिसत नाही. म्हणूनच अत्यंत कमी गर्दी असलेला, नावाप्रमाणेच छोटासा नितांत सुंदर बीच.

सुंदर बीच आणि तेथील सुंदर सुर्यास्ताचा देखावा

Ozraan 1

Ozraan 2

Ozraan 3

चिरंजीवाचे मनसोक्त पहिले समुद्रस्नान झाले, सुर्यास्त झाला आणि मग आम्ही अंजूनाला गेलो. स्टारको जंक्शनजवळ गाडी लाऊन हॉटेल शोधले. एका वस्तीपुरते साधेसे महाग नसलेले होटेल; ते लगेच मिळाले.

Esparanca 1

Esparanca 2

आंघोळ पांघोळी उरकून, एक फेरफटका मारून परत हॉटेलवर येऊन आराम केला आणि मग रात्री थोडे उशिराच रात्रीचे जेवण करून आजचा दिवस संपवला.
______________________________________________________________________________________

दुसरा दिवस मार्च २९ रविवार

सकाळी लवकरचा फेरफटका. --- आम्ही अंजूनात राहतो तेव्हा नियम केल्याप्रमाणे सकाळी लवकर एक मोठी चक्कर अर्थातच चालत चालत मारतो. चिरंजीव साखर झोपेत असतात, आम्ही प्रभातफेरी करतो. स्टारको जंक्शन वरून फ्लिया मार्केट किंवा कर्लीज रस्त्यावरून, अंजूना बीच. बीचवरून उजवीकडे बीच संपेपर्यंत चाल. नंतर परत बीचलगतच्या स्टॉल्स आणि शॅक्समधल्या रस्त्यावरून अंजूना बीच बस स्टॉप. बॅक टू स्टारको जंक्शन. खालच्या फोटोंमधे ही चक्कर. (साधारण ५.५० ते ६.०० कि.मि.)

Anjuna 1

Anjuna 2

Anjuna 3

Anjuna 4

गोव्यातील घरांचे रंग आकर्षक आणि वेगळे असतात. मागे या विषयावर ईथे एक धागा झाला आहे बहुतेक.

Anjuna 5

कैरी आणि फणस.

Kairi

Phaanas

हॉटेलवर येऊन चिरंजीवांची झोपमोड करून आवरले, नाश्ता केला आणि आमच्या सर्वात आवडत्या समुद्रकिनार्याकडे प्रयाण केले. (अर्थातच पाळोळे - दक्षिण गोव्याचे टोक . कर्नाटक हदद् कारवार लगत)

वाटेत पणजी - मांडोवी पुलाखालील ट्रॅफिक आयलंड

Panaji

माडगाव - नवीन जिल्हाध्यक्ष कार्यालय

Madgaon

वाटेत

Vaatet

आणि

Vaatet 1

आता पाळोळेला पोचल्यानंतर पुढे चालू

क्रमशः

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 6:16 pm | अत्रुप्त आत्मा

येउं द्या .. फुडचा बाग... वाट फातोय आत्मुवाला!

गोवा सदातरुण ठिकाण.अतिशय आवडते.पुन:प्रयाचा आनंद येतोय.पुभाप्र.

पहिलाच लेख परंतू झकास आणि ठिकाण बहाद्दर.आरशातला फोटु +++
डोंगर भटकंतिला सुट्टी जाऊ आता समुद्रकिनारी.

जेपी's picture

13 Apr 2015 - 6:45 pm | जेपी

मस्त...
पुढचे भाग लवकर येऊ द्या..

यसवायजी's picture

13 Apr 2015 - 8:46 pm | यसवायजी

कोल्हापूर - थावंदी फाटा - आजरा - अंबोली
योग्य रस्ता निवडलात. फक्त याच रस्त्यावरुन एकदा पावसाळ्यात प्रवास करा. अप्रतिम वाटते. त्यात जर बाईकवर गेलात तर अजुन मजा.
थावंदीची दुरुस्ती-> आमच्या निपाणीच्या २ किमी. पुढे "तवंदी" (स्तवनिधीचा अपभ्रंश) घाट चढल्यावर काही हॉटेल लागतात. (हॉटेल गोवा-वेस वगैरे.) तिथून उजविकडे वळायचं.
फोटो ब्लर आलेत. बाकी छान. वाचतोय.

गवि's picture

13 Apr 2015 - 7:40 pm | गवि

..दुष्ट.वाईट.क्रूर.
.काहीच वाचले नाही अन फोटोही पाहिले नाहीत.
..करा चैन..खा खा..रोज चणक खा..फिशकरी खा.

सुबोध खरे's picture

15 Apr 2015 - 11:58 am | सुबोध खरे

गवि शेठ
ठाणे येथे ज्युपिटर रुग्णालयाच्या आवारात फोर्च्युन हॉटेल आहे तेथे गोव्याच्या सारखे फिश अण्ड चिप्स मिळतात. यात तो चोणक मासा खरपूस तळून टार्टर सॉस सहित बटाट्याच्या चिप्स बरोबर देतात. ३०० रुपयाला तीन भले मोठे तुकडे देतात. चव पण उत्तम आहे अर्थात गोव्याच्या समुद्रकिनार्याची सर नाहीच येणार परंतु दुधाची तहान ताकावर भागवता येते.
येणार काय?

अवश्य.. हे काय विचारणं झालं. पुढचा मिनीकट्टा ज्युपिटर हॉस्पिटलच्या आवारात.

कैकदा त्या हॉटेलच्या एन्ट्रन्ससमोरुन वावरलो आहे, पण सर्व वेळी कोणी ना कोणीतरी आयसीयूत असताना, किंवा तपासण्या चालू असताना.. त्यामुळे चणक खाण्याच्या मन:स्थितीत तिथे जायचे तर खास वेगळे निमित्त काढूनच जायला पाहिजे. नक्की जाऊया.

आदूबाळ's picture

13 Apr 2015 - 8:01 pm | आदूबाळ

जबरी! वाचतोय!

किणकिनाट's picture

13 Apr 2015 - 9:01 pm | किणकिनाट

आत्मुदा, श्री. कंजूस, जेपीदा, आदूबाळ - प्रतिसादांसाठी धन्यवाद

@ यसवायजी सर. अजून एका अपभ्रंशाबद्दल क्षमस्व. हा रस्ता खूपच चांगला आहे. मागच्या वेळी तवंदी-आजरा रस्ता खराब. रस्ता खराब ऐकून आम्ही पुढे जाऊन संकेश्वर-गडहिंग्लज-अंबोली रस्त्याने गेलो. ह्यावेळी मात्र तवंदीला गोवा वेस आणि कावेरी हॉटेलच्यामधून राइट्ट्ट मारला.

@गवि - चणक, कलामारी, विसण, कालवं, सुंगठं, कुर्ल्या, मोडसो, माणक्यो, तिसर्यो, किसमूर, आंबोटतिख, लेपो सर्व येणार. जे काय ब्लर-बिर फटू आहेत ते टाकायचा प्रयत्न करेन.

.चणक, कलामारी, विसण, कालवं, सुंगठं, कुर्ल्या, मोडसो, माणक्यो, तिसर्यो, किसमूर, आंबोटतिख, लेपो सर्व येणार. जे काय ब्लर-बिर फटू आहेत ते टाकायचा प्रयत्न करेन.

..अरे कोण आहे रे तिकडे..?..यांचे खाते गोठवा रे महिनाभर.

खंडेराव's picture

15 Apr 2015 - 11:05 am | खंडेराव

मस्त लिहिताय, पुढे चालुद्या..
हन्जुन्याला ( वगातोर रस्त्यावर ) मँगो ट्री ला गेले कि नाही, नसाल गेले तर पुढ्च्या वेळेस नक्की जा!

तिथे त्याच मँगो ट्रीमधे आंबटतिखट ऊर्फ आमोटतीक रेड वाईनसोबत ओरपले होते. आंबट होते.. अर्थात नावानुसार. आंबट न आवडणे हा खाणार्‍याचा प्रॉब्लेम, पदार्थाचा नव्हे.

खंडेराव's picture

15 Apr 2015 - 2:49 pm | खंडेराव

आम्ही पोहोचलो गोव्यात की चक्कर असतेच..जेवन मस्त, संध्याकाळी बॉब मार्लेची गाणी, आणि जिवाभावाचे चार लोक, सोबतीला बियर..आहा..डोळे पाणावले :-)

तिथले वेटरही आणि नेहमीचे गोरे गिर्हाइकलोक ओळखीचे झालेत. लग्नानंतर गेलो, तेव्हा एक ७०-७५ चे आजोबा येउन अभिनंदन करुन गेले, बायको चकित!

किणकिनाट's picture

15 Apr 2015 - 6:22 pm | किणकिनाट

हो गेलोय ना मॅ॑गो ट्री मधे सुद्धा. एका सकाळी सेट ब्रेकफास्ट आणि बहुतेक फ्रुट पॅनकेक घेतले होते इथे. पण काही वर्षांपुर्वी. चांगली जागा आहे सुशेगात बसायला. पण नंतर एक दोघांकडून ऐकले की विदेशी चलनाला येथे जास्त मान मिळतो. हा प्रकार खुद्द कर्लीज आणि कळंगुट्ला रेडोंडाबद्दल खूपच ऐकला आहे. अनुभवला मात्र नहिये. पण असं ऐकले की जात नाही अशा ठिकाणी. घरच्या मंडळींबरोबर तर नाहिच.

खंडेराव's picture

16 Apr 2015 - 5:54 pm | खंडेराव

माझा अनुभव गेल्या ४ वर्षातला, नेहमीच चांगला राहिलाय. बाकी कर्लीज फालतु आहे असच मत झालय. विदेशी चलनाचा मुद्दा ही खरा आहे.

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2015 - 6:43 pm | दिपक.कुवेत

ईथे भर उन्हाळ्यात बीयर आणि फिश च्या गोष्टि नका करु!! फोटो जरा मोठे टाकाल का पुढिल भागात?

मनिमौ's picture

16 Apr 2015 - 1:35 pm | मनिमौ

या नोव्हेंबर महिन्यात एकटीने गाडी घेऊन गोवा भटकायला जाणार आहे.

किणकिनाट's picture

16 Apr 2015 - 7:47 pm | किणकिनाट

भटकंतीला शुभेच्छा मनिमौ. पुढच्या भागांमधे काही ठिकाणांची वर्णने द्यायचा प्रयत्न करतो. काही उपयोग झाला तर आनंद आहे.

जुइ's picture

16 Apr 2015 - 9:13 pm | जुइ

फोटो देखिल आवडले.

पैसा's picture

25 Apr 2015 - 10:27 pm | पैसा

आम्हाला माहीत असलेला गोवा आणि टुरिस्टांचा गोवा या दोन खम्प्लीट वेगळ्या गोष्टी आहेत असं मला बरेचदा वाटतं!

किणकिनाट's picture

27 Apr 2015 - 9:44 pm | किणकिनाट

पैसाताई, तुमची गोवा इतिहासमालमा चांगलीच लक्षात आहे. तुमचा फोंडा ते पणजी लोकल बस प्रवासही वाचला आहे. स्थानिक गोवेकरांच्या नजरेतून आणि मनातून तुमचा गोवा पण लिहा ना. फार आवडेल.

पॉइंट ब्लँक's picture

25 Apr 2015 - 10:29 pm | पॉइंट ब्लँक

प्रवास वर्णन छान लिहिलं आहे. :)

प्रवास वर्णन आवडले .. फोटो नाही आवडले.