गाभा:
कवी अनिलांच्या "आजुनी रुसूनी आहे " या अत्यंत भावस्पर्शी गीताबद्दल सर्वांनाच माहिती आहे. कुमारांनी हे अजरामर गीत आपल्या सर्वांपर्यंत पोचविले .
असे म्हणतात की ही कविता अनिलांनी त्यांच्या पत्नी कुसुमावती यांचे दु:खद झाले त्यावेळी लिहिली . हे मी देखील कित्येक वर्षांपासून ऐकून आहे आणि मानत आलो आहे. मध्यंतरी काही ठिकाणी असे वाचनात आले, की वस्तुस्थिती तशी नसून हे गीत त्यापूर्वीच केव्हातरी लिहिले होते. इतक्या वर्षांची माझी समजूत चुकीची होती कि काय ? जाणकार प्रकाश टाकतील काय ?
प्रतिक्रिया
12 Apr 2015 - 8:28 pm | अत्रन्गि पाउस
ह्यावर लिहिलेले आहे अनिलांनी गजेंद्रगडकर ह्यांना सांगितले कि हि कविता त्यांनी स्वत:च्या प्रतिभेला उद्देशून लिहिली आहे ..
कुसुमावती बाई त्यावेळी हयात होत्या ...
12 Apr 2015 - 11:03 pm | सचिन
धन्यवाद !! अजूनही कोणास काही माहिती असल्यास कळवावी.
13 Apr 2015 - 8:10 am | एस
मला कुठेतरी वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे अनिलांनी ही कविता त्यांच्या मित्राच्या मुलासाठी लिहिली होती. तपशील आत्ता नाहीत, पण मिळवून सांगतो.