रोगप्रतिबंधात्मक उपाय १
व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन तर ती व्यक्ती स्वत:ला मोठी भाग्यवान समजत असते. पण जर तीच्या वाट्याला कधीकाळी दु:ख आले तर तीच व्यक्ती त्याचे कारण दुसऱ्याच्या कपाळावर फोडून(नावावर टाकून) मोकळी होते. पण अशाने दु:ख तर कमी होत नाहीच; उलट पक्षी जास्त त्रास व मानसिक कुचंबना होत असते.
आपल्याला जर अधिक सुखी, अधिक आनंदी व्हायचे असेल तर मात्र आपण स्वत: (वेळेआधी) ठरवून जे हवे ते (कालांतराने) मिळवू शकतो. याचाच अर्थ मनुष्यजीवनात काय हवे आहे ते आधी ठरवावे लागते व नंतर आपण ठरवलेले मिळवण्यासाठी भरपूर परिश्रम करून व पुरेसा वेळ देवून ते मिळेल याची तजवीज करावी लागते.
आपल्याला नेहमी हवे असलेले चांगले आरोग्यही असेच मिळवावे लागते. आपल्याला लागणारे चांगले आरोग्य हे काही कोणत्या दुकानात किंवा मॉल मध्ये उपलब्ध होत नसून ते मिळवण्यासाठी त्यासाठी आधी ठरवावे लागते, मग भरपूर परिश्रम करून व पुरेसा वेळ देवून ते मिळेल याची तजवीज करावी लागते. ते कोणी आपल्याला आणून देत नाही, किंवा आपल्याला मिळेल याची कोणी संपूर्ण जीवनभर(व एकदा घराबाहेर पडल्यावर) काळजी घेऊ शकत नाही.
मान्य आहे, आपल्याला कुटुंबासाठी व कंपनीत नेमून दिलेल्या कामासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. समजा आपण खूप व्यस्त आहात आणि आपल्याला स्वत:ला आरोग्य चांगले रहावे यासाठी द्यायला (जो काही अर्धा ते एक तास)वेळच भेटत नाही. अशा परिस्थितीत जर आपल्यावर संपूर्ण कुटुंब व कंपनी अवलंबून असेल अशात जर जर मी आजारी पडलो व काही दिवस/ आठवडा/ महिने/ वर्षभर माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करू शकलो नाही तर काय होईल माझ्या कुटुंबाचे व कंपनीचे/ माझ्या नोकरीचे/ माझ्या व्यवसायाचे? आणि जर मी काम करण्यास असमर्थ ठरलो तर कोण काळजी घेईन माझ्या कुटुंबाची? माझ्या नोकरीची? माझ्या कंपनीची/व्यवसायाची? यामुळे स्वत:ला निरोगी ठेवणे ही देखील सर्वात मोठी जबाबदारीच होवून बसते. आणि जर आपण स्वत: निरोगी व परिणामी अधिक आनंदी राह्यलो तर आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला व कंपनीला अधिकाधिक फायदा व तोही जास्त दिवस/वर्षे मिळत राहणार आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे इतर कोणतेही कारण न देता, स्वत:ला न फसवता, आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी "जे काही आवश्यक असे ते सर्व" आवर्जून केलेच पाहिजे व पुरेसा वेळ दिलाच पाहिजे.
जर आपण आपल्या स्वत:च्या आनंदासाठी जर वेळ देवू शकत नसलो तर मग आपण नेमके कोणासाठी जगत आहोत हा प्रश्नही आपण स्वत:ला विचारला पाहिजे! आपण न थकता, न सुट्टी घेता कुटुंबाची/कंपनी व व्यवसायाची पार पाडत असलेली जबाबदारीही आता ह्या आनंदाचा एक भाग आहे.
आता आधीच्या लेखात दिलेली आजारी पडण्याचे सर्व कारणे परत एकदा पाहू या व प्रत्येक कारणाआधी मला, माझे, मी ठरवलेले, मी मान्य केलेले असे शब्द वापरले तर काय होते/होईल ते पहा.
मला रोग होणे/आजारी पडणे हे प्रामुख्याने
१) माझे वय
२) माझे लिंग
३) माझ्या आहारातील घटक
४) माझी आहार घेण्याची वेळ
५) माझी आहार घेण्याची सवय
६) माझ्या घरात/मी जात असलेल्या खानावळीत आहार तयार करण्याची पद्धत
७) माझ्या आहारातून शरीरात शोषले जाणारे पौष्टिक घटक
८) माझी शैक्षणिक पार्श्वभूमी
९) माझा व्यवसाय
१०)माझ्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे आरोग्य
११)माझ्या कुटुंबातील पूर्वजांच्या आजारांचा इतिहास
१२)माझा समंजसपणा
१३)माझा मानसिक दृष्टीकोन
१४)माझ्या घरातील भावनिक वातावरण
१४)मी घेत असलेला/ली आराम व झोप
१५)मी करत असलेला शारीरिक व्यायाम
१६)मी करत असलेले योगासने व प्राणायाम
१७)माझी मानसिक व्यग्रता
१८)माझे धार्मिक संस्कार व मान्यता
१९)माझ्या कर्मावरील माझा विश्वास
२०)स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची माझी प्रवृत्ती
२१)माझी वैयक्तिक स्वच्छता
२२)माझ्या वातावरणातील रासायनिक प्रदूषण
२३)मी जातो तेथे होवू घातलेला संसर्ग
२४)मी निवडलेली संगत
२५)माझ्या स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र
२६)मी खातो त्या खाद्यान्नातील जैविक शक्ती
२७)माझ्या आजारांवर केले/घेतले जाणारे वरवरचे/चुकीचे/प्रदीर्घ/अपूर्ण उपचार
२८)माझ्यावर होवू घातलेल्या आवश्यक व अनावश्यक शस्त्रक्रिया
ह्या सर्व घटकांवर अवलंबून असते.
यावरून असे लक्षात येईल कि आज जी काही परिस्थिती उद्भवली आहे किंवा उद्या उद्भवणार आहे ती संपूर्णतः माझ्या स्वत:च्या इच्छेनुसारच होणार आहे व त्याचे परिणाम आपण स्वत:, आपले कुटुंब व आपली कंपनीच/ आपला व्यवसायच भोगणार आहात. नंतर दुसऱ्या कोणाला दोष देवून बळीचा बकरा जरी बनवायला जाल तरी त्याआधी तुमचा स्वत:चा व कुटुंबाच्या आनंदाचा, कंपनीच,/नोकरीचा वा व्यवसायाचा बळी गेलेला असेल.
जर आपले आयुष्य हे जर क्षणभंगुर आहे तर सदैव निरोगी रहाणे देखील आपलेच कर्तव्य आहे, हे आता मान्य करावेच लागेल. त्यामुळे दोस्तांनो एकच गोष्ट मनात ठासून भरवा ती म्हणजे स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
जाहीर करा कोण कोण स्वत:ला निरोगी आयुष्य देण्याचे ठरवते आहे ते.....
प्रतिक्रिया
9 Apr 2015 - 1:38 pm | पिलीयन रायडर
नमनाला घडाभर तेल झालं आता.. मुद्द्यावर या..
9 Apr 2015 - 1:48 pm | पॉइंट ब्लँक
तुम्हाला फार घाई आहे बुवा. जरा दम खावून प्रतिक्रिया द्यायची की. डाव चालू व्हायच्या आधीच बाद केलात. ;) आता कशी करमणूक होणार बरं?
9 Apr 2015 - 4:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मुद्दा हवा असेल तर व्यनि करावा ही विनंती. =))
आणि ते घडाभर तेल आयुर्वेदिक पद्धतीनी बनवलय का ते पण पहा बरं. उगीच अॅलर्जी यायची
9 Apr 2015 - 5:52 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
9 Apr 2015 - 6:16 pm | संदीप डांगे
अरारारारा...... घसरून पडेल की वो ते तुमचं आपलं... तेलावरून म्हणतो मी!
9 Apr 2015 - 1:40 pm | जेपी
जाहीर कशाला करायच ..व्यनी केला तर चालेल ना....
9 Apr 2015 - 2:00 pm | कोंबडी प्रेमी
फारच गोंधळायला होतंय ...
9 Apr 2015 - 2:01 pm | कोंबडी प्रेमी
नै हे जरा अति होतंय का नै ?
१) माझे वय
२) माझे लिंग
३) माझ्या आहारातील घटक
४) माझी आहार घेण्याची वेळ
५) माझी आहार घेण्याची सवय
६) माझ्या घरात/मी जात असलेल्या खानावळीत आहार तयार करण्याची पद्धत
७) माझ्या आहारातून शरीरात शोषले जाणारे पौष्टिक घटक
८) माझी शैक्षणिक पार्श्वभूमी
९) माझा व्यवसाय
१०)माझ्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे आरोग्य
११)माझ्या कुटुंबातील पूर्वजांच्या आजारांचा इतिहास
१२)माझा समंजसपणा
१३)माझा मानसिक दृष्टीकोन
१४)माझ्या घरातील भावनिक वातावरण
१४)मी घेत असलेला/ली आराम व झोप
१५)मी करत असलेला शारीरिक व्यायाम
१६)मी करत असलेले योगासने व प्राणायाम
१७)माझी मानसिक व्यग्रता
१८)माझे धार्मिक संस्कार व मान्यता
१९)माझ्या कर्मावरील माझा विश्वास
२०)स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची माझी प्रवृत्ती
२१)माझी वैयक्तिक स्वच्छता
२२)माझ्या वातावरणातील रासायनिक प्रदूषण
२३)मी जातो तेथे होवू घातलेला संसर्ग
२४)मी निवडलेली संगत
२५)माझ्या स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र
२६)मी खातो त्या खाद्यान्नातील जैविक शक्ती
२७)माझ्या आजारांवर केले/घेतले जाणारे वरवरचे/चुकीचे/प्रदीर्घ/अपूर्ण उपचार
२८)माझ्यावर होवू घातलेल्या आवश्यक व अनावश्यक शस्त्रक्रिया
9 Apr 2015 - 2:04 pm | पिलीयन रायडर
मागच्या लेखात ही यादी जनरिक होती.. यंदा कस्ट्माइज्ड आहे!
वय च्या ऐवजी "माझे" वय!!
पण लेखाची लांबी वाढवायला बरी पडतेय..
9 Apr 2015 - 3:48 pm | अत्रन्गि पाउस
वा पिरा तै
9 Apr 2015 - 5:53 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
10 Apr 2015 - 6:13 pm | नावातकायआहे
नंतर तुझे ह्याचे त्याचे हिचे तीचे सर्वांचे.... सहा भाग तर तयार आहेत!
9 Apr 2015 - 4:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कॉलिंग प्रगो फॉर अॅणालिसिस ;)
9 Apr 2015 - 5:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
"मी माझा" मधे पण चंद्रशेखर गोखले एवढं मी, माझं, माझ्या, माझी ई.ई. मीपणा करत नैत.
9 Apr 2015 - 5:58 pm | बॅटमॅन
अहो, बोटीवरील वृत्तांतापासून प्रेरणा घेतली असेल त्यांनी.
-आपला सर्वांचा लाडका,
ढापूहित.
9 Apr 2015 - 6:10 pm | सूड
त्यावर एक नवीन लेखमाला सुरु व्हायला हरकत नाही, 'बोट बुडाली धरतीला*....आय मीन धर तिला' ;)
*श्रेयअव्हेर: निर्मिती सावंत
9 Apr 2015 - 6:14 pm | बॅटमॅन
बोट बुडाली धरतीला
लाट आली भरतीला
;)
9 Apr 2015 - 6:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सूद्द आ च र ट प णा.
9 Apr 2015 - 9:10 pm | यसवायजी
अशाच एका बोटावर बोटीवर
9 Apr 2015 - 10:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
दंबुक दाखवु का रे? =))
10 Apr 2015 - 8:46 pm | सूड
अगदीच हौस असेल तर दाखवा, आम्ही आमच्या दंबुका काढल्या मग बोलायचं नाय हा काय? ;)
10 Apr 2015 - 9:07 pm | टवाळ कार्टा
नक्की दंबूकांबद्दलच बोलत आहात ना
14 Apr 2015 - 5:54 pm | बॅटमॅन
"मी शिकारी, बंदूक मम पाहणार का?" नामक वासेपुरी समूहकथेतील गाणे आठवले.
14 Apr 2015 - 6:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
त्याचं दंबुकीमधुन ठ्ठॉ!!!!
9 Apr 2015 - 2:05 pm | पॉइंट ब्लँक
हे जरी बटबटीत अक्षरात लिहले असले तरी स्पष्ट नाहिए. उगा अर्थाचा अनर्थ होउ शकतो.
9 Apr 2015 - 2:47 pm | तुषार काळभोर
9 Apr 2015 - 4:00 pm | रुस्तम
9 Apr 2015 - 4:31 pm | सूड
=))))
9 Apr 2015 - 5:45 pm | अत्रुप्त आत्मा
हे जरी बटबटीत अक्षरात लिहले असले तरी स्पष्ट नाहिए.उगा अर्थाचा अनर्थ होउ शकतो. >> पॉइंट'च ब्लँक केलात हो तुम्मी! टांगा पल्टी घोडे फरार..
9 Apr 2015 - 10:25 pm | पॉइंट ब्लँक
*lolz * :-)
9 Apr 2015 - 5:52 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
त्यात बाकी
स्वतः केले तरी स्वर्ग दिसेलच असे नाही
हेही अॅडवायला हवे. ;)
9 Apr 2015 - 6:22 pm | अत्रुप्त आत्मा
@दिसेलच असे नाही>> य्या य्या य्या .. ह्या खाटुकाला हराम्याला नरकपण दिसला!
आयुर्हित.. आ..आ..आ.. असा ओ रडणार आता!
10 Apr 2015 - 8:47 pm | सूड
तुम्हाला बरं म्हाइत? =))))
9 Apr 2015 - 10:18 pm | पॉइंट ब्लँक
भारी पॉईंट, सुचलाच नाय तिच्या आयला!
9 Apr 2015 - 8:58 pm | प्रसाद गोडबोले
=))
9 Apr 2015 - 2:18 pm | अजया
=))
9 Apr 2015 - 6:42 pm | चुकलामाकला
त्या लिश्टीतलं दुसरं पोइंट वाचून भारीच हसल्या गेलो आहे.:):):):):)
9 Apr 2015 - 6:29 pm | सूड
मी पण ! ;)
9 Apr 2015 - 8:26 pm | अत्रन्गि पाउस
*lol*
9 Apr 2015 - 6:45 pm | अजया
टवाळ दंगेखोर कुठचे
9 Apr 2015 - 8:38 pm | संदीप डांगे
विसाव्या पॉईंटात मी, माझे, माझ्या, माझी यापैकी काहीही न वापरून सुरूवात केल्याने बायडीफॉल्ट पॉईंट सिद्ध झाला आहे.
9 Apr 2015 - 8:48 pm | आदूबाळ
हे एक मात्र पटलं...
9 Apr 2015 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
इतिहासात एकदा 'ध' चा 'मा' केला गेला आणि रक्त सांडले... आता इथे 'म' चा 'क' केला गेला आणि बदाबदा प्रतिक्रिया सांडत आहेत ! ;)
9 Apr 2015 - 9:13 pm | टवाळ कार्टा
आज पासून तुम्हीपण माझे गुरु :)
9 Apr 2015 - 9:20 pm | प्रसाद गोडबोले
आता तुमच्यावर "गुरुदेव , मला वाचवा" म्हणायची वेळ आणतील ते =))
- गारदी प्रगो
9 Apr 2015 - 9:22 pm | टवाळ कार्टा
=))
9 Apr 2015 - 10:16 pm | पॉइंट ब्लँक
कुणाच्या मरण्यामध्ये गुरुजी वाचवू शकतील, पण त्याच्या करण्यामध्ये त्यांची भुमिका योग्य वाटत नाही. :P
9 Apr 2015 - 10:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्हीपण ???
अशी सेकंडरी गुरुशिप स्विकारत नाही आम्ही ! :) येव्हढे डेश्परेट नाय आमी ;)
9 Apr 2015 - 10:23 pm | टवाळ कार्टा
आम्चे आद्य गुर्ध्येव हैत की इथेच
10 Apr 2015 - 10:44 am | नाखु
जावूद्या कुणीतरी २४ गुरु केल्याचा पुराणात आहे ट्क्या २५ करून तो विक्रम मोडीत काढणार आहे जरा तुम्ही हातभार लावावी हि विनंती.
======
टक्याचे आगामी पुस्तक बाजारात येत आहे नावनोंदणी चालू आहे (फक्त पुस्तकासाठी बाकी नावनोंदणीची चव्कशी करू नै )
पुस्तकाचे नाव "गुरुशीच गुरगुर"
10 Apr 2015 - 10:50 am | टवाळ कार्टा
माझे ब्रँडनेम वापरून बर्याच नकली गोष्टी मार्केटमध्ये/मिपावर येत आहेत...नक्कल करणार्यांपासून सावधान...फक्त आणि फक्त माझेच प्रतिसाद असली आहेत :P
10 Apr 2015 - 11:21 am | नाखु
मान+धन यासाठी बोलणी चालू आहेत तोपर्यंत नावनोंदणी तरी करू दे रे !!!
9 Apr 2015 - 10:38 pm | अत्रन्गि पाउस
+१
9 Apr 2015 - 9:19 pm | तुषार काळभोर
बर्रर्रर्र!!!
मग 'म' चा 'क' केल्यावर काय सांडले?? (नुसत्या प्रतिक्रिया?)
9 Apr 2015 - 9:22 pm | टवाळ कार्टा
ठ्ठो
9 Apr 2015 - 10:21 pm | भीडस्त
' 'म' चा 'क' ' केल्यावर काय सांडणार पैलवानभौ ;-) ;-)
9 Apr 2015 - 11:02 pm | सूड
माताय!! कायतरी शब्दरचना जुळून आलीय!! =))))
9 Apr 2015 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा
@'म' चा 'क' केल्यावर काय सांडले?? (नुसत्या प्रतिक्रिया?) >>
10 Apr 2015 - 12:28 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
नेमके हेच्च्च मनात आले होते =))
काय जुळून आलीये शब्दरचना =)) इंटेंडेड तर नव्हती ना हो एक्काकाका =))
9 Apr 2015 - 11:46 pm | नंदन
उगीचच फ्रेंचमध्ये ज्याला 'किंचित मृत्यू' म्हणतात, ते आठवले. (विकीचा दुवा)
10 Apr 2015 - 10:51 am | टवाळ कार्टा
=))
9 Apr 2015 - 9:34 pm | यसवायजी
त्यानिमित्ताने अता "मी माझा तर माझा कुणाचा" या अतिसुप्रसिद्ध कवितासंग्रहाची आठवण झाली.
9 Apr 2015 - 10:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अता हा सु-प्रसिद्ध का-व्यसंग्रह कोणा-चा आहे? दु-वा दे की.
9 Apr 2015 - 10:16 pm | प्रसाद गोडबोले
सुर्यकान्ट खोकले नावाचे सुप्रसिध्द कवी आहेत त्यांचाच आहे तो कविता संग्रह !
10 Apr 2015 - 2:57 pm | काळा पहाड
पूर्वी कवींची नावं काय सुंदर असायची: कुसुमाग्रज, ग्रेस, गुलजार.
आता 'खोकले'? :)
10 Apr 2015 - 3:00 pm | बॅटमॅन
त्यात गोखले आणि खोकले या दोन्ही नावांचे स्पेलिंग येकच येक आहे. =))
'पोएटिक' जस्टिस यालाच म्हणावे की काय ;)
10 Apr 2015 - 3:15 pm | हाडक्या
"माझा" आता "कोकाकोला"ने घेतलाय म्हणे.. ;)
(घेण्याचा योग्यच अर्थ घ्यावा..)
10 Apr 2015 - 3:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खिक्कं!!!!
10 Apr 2015 - 3:18 pm | खंडेराव
विषयाला वाचा फोडल्याबद्दल लेखकरावांचे आणि धागा ६१ पर्यंत पोहोचवल्याबद्दल इतरांचे अभिणंदण.
जेपिसाहेब, कुठे आहात, सत्कार वगैरे हाय काय नाय काय?
10 Apr 2015 - 3:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
१०० होउंद्या की. ;)
10 Apr 2015 - 3:27 pm | पॉइंट ब्लँक
व्हय १०० व्हायाच पाइजे! नशीबाची साथ किती जरूरू असते आणि धाग्याचा यशामध्ये वाचकांचा किती मोठा हातभार ( हिते मनावर ब्रेक लावणे ) असतो ह्याचे हे सर्वोत्तम उदाहरण !
10 Apr 2015 - 3:55 pm | हाडक्या
ह्यावरुन आठवलं. ते मनोबा दिसत नैत इकडे हल्ली ?
10 Apr 2015 - 3:58 pm | सूड
मनावर ब्रेक वरुन तुम्हाला मनोबा आठवले? =))))
10 Apr 2015 - 9:13 pm | जेपी
ओ ...ते जेपि नाय जेपी हाय गल्लत करु नये
14 Apr 2015 - 5:46 pm | खंडेराव
मग होऊन जाउद्या की
10 Apr 2015 - 8:25 pm | लॉर्ड फॉकलन्ड
एकदम कॉमेडी लिहिलय.खुप जास्त गोष्टी लिहिल्यात.फक्त खालील पॉइन्ट्स हवे होते.
10 Apr 2015 - 9:55 pm | पॉइंट ब्लँक
10 Apr 2015 - 8:33 pm | जेपी
प्रतिक्रीया वाचुन निर्वाण पावलो...=))
अवांतर -स्वर्ग दिसला का असे विचारु न ये.
10 Apr 2015 - 9:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
निर्वाण पावण्यावर एक लेख येउद्या १०० करायची लेखी हमी.
11 Apr 2015 - 1:09 pm | तुषार काळभोर
नाही विचारणार.
कारण त्यासाठी "स्वतः करावे लागते!"
11 Apr 2015 - 3:28 pm | पॉइंट ब्लँक
पैलवान भाउ आपण जिकलेले आहात !
10 Apr 2015 - 8:47 pm | आदूबाळ
ये कंपनी कंपनी क्या है, ये कंपनी कंपनी?
11 Apr 2015 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा
@व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन तर ती व्यक्ती स्वत:ला मोठी भाग्यवान समजत असते. पण जर तीच्या वाट्याला कधीकाळी दु:ख आले तर तीच व्यक्ती त्याचे कारण दुसऱ्याच्या कपाळावर फोडून(नावावर टाकून) मोकळी होते. पण अशाने दु:ख तर कमी होत नाहीच; उलट पक्षी जास्त त्रास व मानसिक कुचंबना होत असते...............................................................................................................................................................................................जर आपले आयुष्य हे जर क्षणभंगुर आहे तर सदैव निरोगी रहाणे देखील आपलेच कर्तव्य आहे, हे आता मान्य करावेच लागेल. त्यामुळे दोस्तांनो एकच गोष्ट मनात ठासून भरवा ती म्हणजे स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
जाहीर करा कोण कोण स्वत:ला निरोगी आयुष्य देण्याचे ठरवते आहे ते.....>>> ब्वॉर! तुमचं प्रॉडक्ट काय? ते बोला की मग आता! ;)
11 Apr 2015 - 4:01 pm | कोंबडी प्रेमी
एक व्य नी करण्याचा
झैर चर्चेचा काम संपलाय
11 Apr 2015 - 5:03 pm | पॉइंट ब्लँक
सरळ मुद्द्यालाच हात घातला की राव! :)
13 Apr 2015 - 10:07 am | तुषार काळभोर
नाय ओ!!
धिस इज कॉल्ड "धोतराला / कासोट्याला हात घालणं!"
13 Apr 2015 - 10:13 am | पॉइंट ब्लँक
13 Apr 2015 - 11:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या लेखाचा पुढचा भाग आलेला आहे. टंकनकंडुग्रस्तांनी लाभ घ्यावा.