ब्राउजर एक्स्टेंशन्स

मदनबाण's picture
मदनबाण in तंत्रजगत
11 Apr 2013 - 3:38 pm

नमस्कार मंडळी,सुझेच्या अ‍ॅन्ड्रॉइड धाग्यात अ‍ॅप्स देताना,विचार केला की इथे क्रोम आणि फायरफॉक्स वापरणारी बरीच मंडळी आहेत्.तेव्हा मला माहित असलेले आणि इथल्या अन्य टेक-सॅव्ही मंडळींना माहित असलेले ब्राउजर एक्स्टेंशन शेअर करण्यास काय हरकत आहे.

तर आता मी वापरत असलेले वरील दोन्ही ब्राउजर्सचे एक्स्टेंशन्स इथे देत आहे.

***************************************************

ब्राउजर एक्स्टेंशन हे अगदी छोटे सॉफ्टवेअर असते ज्यामुळे तुमच्या ब्राउजरची फंक्शनॅलिटी वाढवता येते.

आता सर्वात प्रथम मी जे एक्स्टेंशन्स इथे देणार आहे ते प्रायव्हसी इनहान्स करणारे आहेत.प्रायव्हसी बाबतीत बरेचसे इंटरनेट युजर्स जागरुक नसतात,पण जसे जसे नेटकरी मंडळींना ऑनलाईन प्राव्हसीचे महत्व आणि गरज समजु लागली आहे तस तसे या संदर्भातल्या अनेक एक्स्टेंशची निर्मीत होउ लागली आहे.

आत्ताचे युग जरी मोबाईल क्रांतीचे असल्या सारखे वाटत असेल तरी खरे तरी सुद्धा सध्याचे युग हे डेटा जनरेशन आणि येणारे प्रायव्हसीचे आहे. हे दोन्ही मल्टि बिल्यन डॉलर इंडस्ट्री ठरणार आहे.डेटा मधे डेटा सेंटर्स आणि ऑनलाईन स्टोरेज तसेच नविन डेटा स्टॉरेजचे आहे.तुमच्या लक्षात येईल की साध्या पेन ड्राईव्हची तसेच एक्सटर्नल युएसबीची कपॅसिटी प्रचंड वेगाने वाढली आहे.तसेच येणार्‍या काळात तुमच्या पिसी मधीली हार्डडिस्क ड्राईव्हची जागा एसएसडी {सॉलिड स्टेट ड्राइव्ह्स} घेतील.याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे,जो पिसी बुट होउन सुरु होण्यासाठी आणि वापर चालु करण्यासाठी सध्याच्या हार्डडिस्कमुळे वेळ लागतो,तेच एसएसडी ड्राईव्हमुळे फक्त जवळपास २० सेकंदात होईल. :) ३५० पेक्षा जास्त पानांचे वर्ड डॉक्युमेंट फक्त १० सेकंदात तुम्हाला तुमच्या पिसीवर ओपन करता येईल.

आता या डेटा जनरेशन आणि स्टोरेजचा एक अंदाज यावा म्हणुन उदाहरण देतो,युट्युबवर दर मिनीटाला ७२ तासांचे व्हिडीयो अपलोड केले जातात्,तर ४ बिलीयन तासांचे व्हिडीयो युट्यबर दर महिन्याला पाहिले जातात्,तसेच जगभरातुन २५% लोकांच्या मोबाईलवरुन युट्युब पाहिले जाते. यावरुन तुम्हाला डेटा जनरेशन आणि स्टॉरेज याचे महत्व कळुन येईल.

आता मूळ मुद्द्यावर येउया,तो म्हणजे प्राव्हसी... तुम्ही इंटरनेटवर सतत ट्रॅक केले जातात्,तुम्ही कुठल्या साईट वरुन कुठल्या दुसर्‍या साईटवर गेलात्,काय कंटेन्ट पाहिलेत्,किती वेळ कुठल्या साईटवर थांबलात याची पूर्ण माहिती मिळवली जाते.ट्रॅकरच्या सह्हायाने तुमचा माग काढला जातो.मग तुमची"प्रायव्हसी" राहिलीच कुठे ? मदनबाणने युट्युबर कुठली कुठली गाणी पाहिली,यावरुन याला कुठल्या प्रकारची गाणी आवडतात अशी माहिती ट्रॅकरच्या सहाय्याने काढता येऊ शकेल.या सर्व माहितीचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो,जाहिरातीसाठी हे तर मुख्य करुन वापरलेच जाते,यात गुगल,फेसबुक आणि अनेक इंटरनेट जायंट्स आहेत.

मग आशा परिस्थीत आपण नेटवर आपली प्रायव्हसी जपण्यासाठी काय करु शकतो ? तर आपण ब्राउजर एक्स्टेंशन्सचा आधार घेउ शकतो.क्रोम आणि फायर फॉक्स साठी अशी प्रायव्हसी आणि डु नॉट ट्रॅक एक्स्टेंशन्स उपलब्ध आहेत.तसेच दोन्ही ब्राउजर्स मधे हा पर्याय सुद्धा देण्यात आलेला आहे.
********************************************************

आता माझ्या वापरातले एक्स्टेंशन्स देत आहे.

१) Collusion :- वर जे ट्रॅकिंग प्रकरण सांगितले आहे,ते पटकन समजुन घेण्यासाठी,तुम्ही नेटवर कसे ट्रॅक केले आहे ते पाहण्यासाठी हे एक उत्तम एक्स्टेंशन फायर फॉक्ससाठी आहे.

२) DoNotTrackMe :- ऑनलाईन प्रायव्हसी जपण्याचे हे अजुन एक उपयोगी एक्स्टेंशन,याने जाहिराती सुद्धा ब्लॉक केल्या जातात.

३) BetterPrivacy :- कुकीज {खायच्या नव्हे तर्,ब्राउजरच्या} ;)मुळे तुमचा माग काढणे सहज आणि सोप्पे होते,त्यांच्यावर नियंत्रण आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी उपयोगी,प्रायव्हसी जपण्यासाठीचे हे अजुन एक उपयोगी एक्स्टेंशन.

४)Google Privacy :- जसे मी वर सांगितले आहे की गुगल प्रत्येकाला ट्रॅक करतो,आणि जरी फायरफॉक्स ब्राउजर मधे डु नॉट ट्रॅक ऑप्शन एनेबल केला असला तरी गुगल आणि इतर सर्च इंजिन्स या हेडरला इग्नोर करतात्,त्यामुळे या एक्स्टेंशनचा वापर गरजेचा झाला आहे.हे एक्स्टेंशन इन्स्टॉलकेल्यावर गुगल सर्च मारल्यास तुम्हाला फरक लगेच कळेल्,प्रत्येक लिंक जवळ प्रायव्हेट हा पर्याय दिसु लागेल्,जो आपण निवडु शकतो.

५)AVG Do Not Track :- अ‍ॅन्टीव्ह्यायरस बनवणार्‍या एव्हीजी कंपनीचे हे एक्स्टेंशन आहे. आता याच्या वापराचे उत्तम उदाहरण देतो,ते म्हणजे आपले मिपा.

मिपाच्या पानाच्या उजवीकडे फेसबुकचे एक सोशल प्लगइन (सोशल बटन) आहे,मला ते मी मिपावर असताना पहायचे नव्हते,तेव्हा हे एक्स्टेंशन कामाला आले्ए तुम्हाला ब्लॉक करायचा की नाही याचा पर्याय देते,तेव्हा जर मला परत मिपाच्या पानावर फेसबुकचे सोशल प्लगइन बघायचे असेल तेव्हा या पाना परते ते मी एनेबल करु शकतो.(लक्षात असु द्द्या की हे बटन सुद्धा तुमची वेगवेगळ्या प्रकारची माहिती काढु शकते.)

६) Ghostery :- अत्यंत उपयोगाचे प्राव्हसी एक्स्टेंशन.

७) Webutation - Reputation & Security :- जेव्हा तुम्ही गुगलवर एखादी गोष्ट शोधता तेव्हा अनेक पर्याय मिळतात्,यातली सुरक्षित साईट कोणती आणि किती प्रमाणात असुरक्षित कोणती याची माहिती या एक्स्टेंशनमुळे मिळते.हे WOT - Safe Surfing या एक्स्टेंशन प्रमाणेच चालते.
८)HTTPS Everywhere :- एचटीटीपीएस पेजेएर अ‍ॅटोमॅटिक रिडायरेक्ट केले जाते.तुम्ही तुमच्या जी मेल मधे लॉगइन करताना किंवा इतर सिक्युर साईटवर(बँकिंग /ट्रेडिंग इ.) ट्रॅन्झॅक्शन करताना अ‍ॅड्रेसबारवर पाहिलेत तर तुम्हाला डावीकडे कुलपाचे चित्र दिसुन येईल.{माझा आणि cipher strength चा अनेक वर्ष आधी संबंध आला होता जेव्हा माझ्या पिसीवर मी विंडोज २००० चालवत होतो,तेव्हा SSL साठी कमीत कमी cipher strength १२८बिट असावी लागते हे मला कळाले होते.} हे एक्स्टेंशन खुप उपयोगी आणि महत्वाचे आहे. माझ्या सहीतले युट्युबचे दुवे हे HTTPS चे असतात त्याचे कारण हे एक्स्टेंशनच होय.
९)Greasemonkey :- या एक्स्टेंशन शिवाय कुठल्याही टॉप एक्स्टेंशन्सची यादी पूर्ण होउ शकत नाही. स्क्रीप्टस वापरुन तुमचे ब्राउजर हवेतसे तुम्ही कस्टमाईज करु शकता. जसे मी माझ्या फायरफॉक्सवर केले आहे.
यासाठी https://userscripts.org/ या साईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो,मी आत्ता पर्यंतच फक्त २दा इथल्या स्क्रिप्ट्स वापरल्या आहेत.

ज्यांना या विषयी अधिक माहिती हवी त्यांनी खालील दुवे जरुर पहावेत / वाचावेत.
दुवे :-
DO NOT TRACK FAQ
How do I turn on the Do-not-track feature?
How to enable Chrome's Do Not Track option
Why Giving Us Control Of Our Online Data Is The Next Multi-Billion Dollar Opportunity
Do Not Track': The Next Billion-Dollar Industry?
What is tracking and AVG Do Not Track?

हे किडुकमिडुक लिखाण करण्यास उद्युक्त केल्या बद्धल पै तै आणि गणापासेठ चे आभार.
तुम्हीही जर कुठल्याही प्रकारचे एक्स्टेंशन्स वापरात असाल तर ते या धाग्यावर द्या.
हॅव सेफ सर्फिग... ;)

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

8 Mar 2014 - 8:53 am | मदनबाण

आजचे क्रोम एक्स्टेंशन :-

zenmate :- कुठलीही वेब साईट पहा,म्हणजे ती तुमच्या देशात ब्लॉक असेल तरीही तुम्ही ती उघडु शकाल. :) तुमचा सगळा ब्राउजर वेब ट्रॅफिक एनक्रिप्ट केला जातो.तुम्हाला तुमचा देश सोडुन इतर देश निवडता येतो...त्यामुळे तुमच्या आयएसीपी प्रोव्हाडरचा आयपी पटकन समोरच्याला मिळणार नाही.हाँगकाँग्,जर्मनी,युके,स्विर्त्झलँड आणि युएसए असे देश निवडता येतात. सध्या हे वापरतोय आणि याची कार्यक्षमता उत्तम वाटली.

Hola :- जे झेनमेट करते तेच काम हे एक्स्टेंशन करते,पण यात निवडायला अनेक देश आहेत.
या दोन्ही एक्स्टेंशन पैकी एकच एका वेळी वापरता येइल कारण :- प्रॉक्सी सेटींग्स

आजचे फायरफॉक्स एक्स्टेंशन :-
तुम्हाला Adblock Plus माहित होते, आता Adblock Edge आले आहे.
दुवा :- http://goo.gl/0TCUKG

आजचे फायरफॉक्स एक्स्टेंशन :-
गुगल तुमचा सर्च मॅन्युपुलेट करते हे आता तुम्हाला ठावुक असेलच... आणि बरेचसे इतर सर्च इंजिन सुद्धा करतात... मग हे कसं बदलता येइल ?
तर यासाठी एक Add-on आहे ज्याचे नाव आहे Google/Yandex search link fix
दुवा :-
Google/Yandex search link fix

पैसा's picture

5 May 2014 - 11:38 am | पैसा

बाणा, सगळे वाचते आहे. बरेचसे अ‍ॅड ऑन निदान माहिती होत आहेत. धन्यवाद!

चित्रगुप्त's picture

21 Jul 2014 - 5:16 am | चित्रगुप्त

ऑनलाईन खरेदी करताना वापराव्या लागणार्‍या क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग वगैरेची माहिती वगैरे कुणाच्या हाती लागू नये म्हणून काय करावे?

ऑनलाईन खरेदी करताना वापराव्या लागणार्‍या क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग वगैरेची माहिती वगैरे कुणाच्या हाती लागू नये म्हणून काय करावे?
सर्वात प्रथम पब्लिक कॉप्युटरचा वापर शक्यतो करु नये,उदा. सायबर कॅफे. घरातील पीसी वरुन जर हा व्यवहार करत असाल तर पीसी मधे अ‍ॅन्टीव्हारस,अ‍ॅन्टी स्पायवेअर्/मॅलवेअर सॉफ्टवेअर असलेच पाहिजे आणि जेव्हा केव्हा नेटला कनेक्ट कराल तेव्हा आधी ही सॉफ्टवेअर्स अपडेट करावी,निदान आठवड्यातुन एकदा तरी या सॉफ्टवेअर्सचा वापर करुन पीसी स्कॅन करावा.
आता मी वापरत असलेली सॉफ्टवेअर्स परत इथे देतो :-
अ‍ॅन्टीव्हारस :- Avira
Malwarebytes
SUPERAntiSpyware
Spybot – Search & Destroy
अजुन एक काळजी घेता येउ शकते,ती म्हणजे की-लॉगर्स ना अटकाव करणे... तुम्ही की बोर्डवरुन जे काहीपण टाईप कराल ते नेटवर जाताना एनक्रीप्ट करुन जाइल. काही काळ हे मी वापरले होते,पण सध्या हे मी वापरत नाही.
KeyScrambler
या बद्धल अधिक इकडे :- http://www.qfxsoftware.com/ks-windows/how-it-works.htm

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

मदनबाण's picture

21 Jul 2014 - 7:19 pm | मदनबाण

आत्ताच Avira चे Browser Safety अ‍ॅडऑन इनस्टॉल केले आहे.
Avira Browser Safety 1.2.2 :- हे फाफॉसाठी
Avira Browser Safety :- हे क्रोमसाठी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

इंटरनेट आणि प्रायव्हसी या बाबतीत आपण नेहमीच जागरुक रहावयास हवे.
आता COWL: { A Confinement System for the Web } उपलबध होणार आहे जे फायरफॉक्स आणि क्रोमवर इनस्टॉल करता येणार आहे, अजुन मुख्य संकेतस्थळावर हे उपलब्ध झाले नाही, ५ दिवसांनी म्हणजे १५ तारखे पासुन हे फ्री डाउनलोडला उपलब्ध होइल.
अधिक इकडे :- New web privacy system could revolutionise the safety of surfing
http://cowl.ws/
Mandatory access control

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, Japan to sign advance-pricing agreement to untie tax hassles

मदनबाण's picture

8 Apr 2015 - 11:41 am | मदनबाण

आजचे एक्स्टेंशन :-
ZenMate Security & Privacy VPN 4.1.7
हे एक्स्टेंशन मी अधुन-मधुन सिक्युअर सर्फिंगसाठी वापरतो... रिस्टीक्टेड वेब साईट्स, आणि स्वतःचा आयपी बदलण्यासाठी मला याचा उपयोग होतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 12:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्यकडे नकळत स्टार्ट माय सर्चचं होमपेज अ‍ॅडॉन इन्स्टॉल झालयं. आणि ते फायरफॉक्स च्या अ‍ॅडॉन लिस्ट मधे किंवा प्रोग्राम अनिन्स्टॉल मधे दिसत नाहिये. काय करता येईल?

मदनबाण's picture

8 Apr 2015 - 12:33 pm | मदनबाण

Spybot रन कर...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }

टवाळ कार्टा's picture

8 Apr 2015 - 12:49 pm | टवाळ कार्टा

भेंडी....जाम त्रास देते ते

ह्म्म... फायरफॉक्स रिसेट करुन पहा... काही फरक पडतो का ते ?
जमल्यास About:config चा वापर करुन सर्च स्ट्रिंग शोध { होम पेज हायजॅक झाले आहे,असे इथे गॄहीत धरले आहे. } त्यामधली सर्च वेबसाईट युआरएल एडिट करा.... मी बर्‍याच वेळा किडाकांडी करण्यासाठी About:config चा आधार घेतला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }

मदनबाण's picture

5 Jun 2015 - 7:30 am | मदनबाण

आजचे एक्स्टेंशन :-
uBlock Origin:- अ‍ॅडब्लॉक पेक्षा हे एक्स्टेंशन सिस्टीमवर लाईट आहे... याची लिस्ट अपडेट करण्यासाठी स्टेप खालील प्रमाणे आहे :-
Tools=> Add-Ons=>uBlock Origin=> Options=> Show Dashboard=>3rd-party filters=> Update Now

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक

आजचे फायरफॉक्स एक्स्टेंशन्स :-
१ ] AdBlocker Ultimate
अ‍ॅड ब्लॉक करण्यासाठीचे अजुन एक एक्स्टेंशन.
२] Decentraleyes
ऑनलाईन ट्रॅकिंग रोखण्यासाठीचे उपयोगी एक्स्टेंशन.
३] Bitdefender TrafficLight
उपयोगी सिक्युरिटी एक्स्टेंशन...
४] OmniSidebar
तुमचे बुकमार्क पटकन पाहण्यासाठी आणि मॅनेज करण्यासाठीचे सुंदर एक्स्टेंशन.
५] Download Status Bar
तुमच्या सगळ्या डाउनलोड्स चे स्टेटस दाखवणारा उपयोगी स्टेटस बार.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasa

आजचे फायरफॉक्स एक्स्टेंशन्स :-

१] Cookie AutoDelete
कुकीज Self Destruct करण्यासाठी.
२] Dark Reader :-
डोळ्यावरचा ताण कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी, सर्व वेब ब्राउजिंग डार्कमोड मध्ये करण्यासाठी. असेच तूनळीसाठी ग्रिसमंकी वापरुन Lights Out स्क्रिप्टचा उपयोग करुन तूनळीवरचे व्हिडियो डार्क मोड मध्ये पाहण्यासाठी इथे प्रतिसाद दिला होता, तूनळी ने माझ्या सारख्या असंख्य लोकांची गरज ओळखुन आता डार्क मोडचा पर्याय त्यांनी त्यांच्या पेजवरच दिला आहे.
३] Privacy Possum :-
ऑनलाइन ट्रॅकिंग कमी करण्यास मदतगार
४]Online Security Pro :-
फिशिंग, मॅलवेअर चा अटकाव करण्यासाठी उपयुक्त

============================================================================================
तुम्ही जर फायरफॉक्स प्रेमी असाल आणि ते वापरत असाल तर हे ब्राउजर अधिक सिक्युअर आणि पर्यायाने तुमचे नेट ब्राउजिंग अधिक सिक्युअर करण्यासाठी खाली ब्राउजर मॉडिफिकेशन स्टेप्स देत आहे.

काय आणि कसे करायचे :-
प्रथम https://www.cloudflare.com/ssl/encrypted-sni/ या लिंकवर जाउन चेक माय ब्राउजर क्लिक करा, क्लिक केल्यावर ब्राउजर सिक्युरिटी चेक होउन त्याचा रिझल्ट खालील प्रमाणे दिसेल
P1

वरील प्रमाणे जर Secure DNS , DNSSEC , TLS 1.3 , Encrypted SNI जर ग्रीन दिसले तर तुमचे ब्राउजिंग आणि ब्राउजर दोन्ही पूर्णपणे सिक्युअर असल्यासे समजावे ! जर यातील एकही रेड आले तर काय करावे याच्या स्टेप्स खाली देत आहे :-
प्रथम तुम्हाला तुमच्या पीसीत आणि राउटर मध्ये आयपी ४ आणि आयपी ६ मध्ये असलेले तुमच्या आयएसपी प्रोव्हाडर ने दिलेले प्रायमरी आणि सेंकडरी डीएनएस आयपी बदलावे लागतील. [ बदलण्याची आधी त्या आयपीची नोंद करुन नीट ठेवुन ठेवा. ]
प्रथम तुमच्या नेटवर्क कनेक्शन आयकॉनवर क्लिक करा, मग त्यातील प्रॉपर्टीज टॅबवर क्लिक करा, तुम्हाला खालील प्रमाणे उघडलेला बॉक्स दिसेल :-
P3
यातील इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन ४ वर क्लिक करा म्हणजे खालील प्रमाणे बॉक्स दिसेल :-
P2
वरती इमेज दिली आहे त्यातील पहिला पर्याय तसाच राहुध्या, पण खालील युज द फॉलोइंग डीएनएस सर्व्हर अ‍ॅड्रेसेस हा पर्याय निवडुन तुम्हाला खालील डीएनएस आयपी ध्यायचे आहेत :-
[ आयपी ४ डीएनएस ]
प्रायमरी डीएनएस [ प्रिफर्ड डीएनएस सर्व्हर अ‍ॅड्रेस ] :- 1.1.1.1
सेकंडरी डीएनस [ अलटरनेट डीएनएस सर्व्हर अ‍ॅड्रेस ] :- 1.0.0.1
हे डीएएनएस दिल्यावर वरती बॉक्स मध्ये दिसत आहेत त्या प्रमाणे ओके बटनावर क्लिक करा,असेच तुम्हाला आयपी ६ डीएनएस बदलायचे आहेत, त्यासाठी इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन ६ वर क्लिक करुन खालील डीएनएस ध्यायचे आहेत :-
प्रायमरी डीएनएस [ प्रिफर्ड डीएनएस सर्व्हर अ‍ॅड्रेस ] :- 2606:4700:4700::1111
सेकंडरी डीएनस [ अलटरनेट डीएनएस सर्व्हर अ‍ॅड्रेस ] :- 2606:4700:4700::1001
हेच आयपी ४ आणि आयपी ६ तुम्हाला तुमच्या राउटर मध्ये डिफॉल्ट डीएनएसच्या जागी रिप्लेस करावे लागतील. [ बदलण्याची आधी तिथे आहेत त्या आयपीची नोंद करुन नीट ठेवुन ठेवा. ]

आता हे करुन झाल्यावर तुम्हाला तुमचा लेटेस्ट व्हर्जनचा फायरफॉक्स ब्राउजर मॉडिफाय करावा लागेल, त्याच्या स्टेप्स खालील प्रमाणे आहेत :-
ब्राउजर मध्ये नविन टॅब उघडुन सर्च बार मध्ये about:config असे टाइप करुन एंटर हिट करा, आता पेजवर अ‍ॅक्सेप्ट रिस्क अ‍ॅंड कंटिन्यू असा बॉक्स दिसेल त्यावर क्लिक करा.
P5
आता खाली ज्या व्हॅल्यू देतोय त्या एक एक करुन सर्च बार मध्ये टाका आणि त्याच्या व्हॅल्यू बदला.

network.trr.uri

Default :- https://mozilla.cloudflare-dns.com/dns-query

Changed :- https://cloudflare-dns.com/dns-query

network.trr.mode
Default :- 2
Change :- 3

network.trr.wait-for-portal

Default :- False
Change :- True

network.trr.allow-rfc1918

Default :- False
Change :- True

network.trr.useGET

Default :- False
Change :- True

network.security.esni.enabled

Default :- False
Change :- True

network.trr.confirmationNS

Default :- example.com
Change :- skip

वरती बोल्ड मध्ये जे नाव दिले आहे ते तुम्हाला सर्च बार मध्ये टाकायचे आहे आणि जी Change व्हॅल्यू दिली आहे तीच रिप्ल्सेस करायची आहे. मी रेफरन्ससाठी Default आणि Change दोन्ही देउन ठेवल्या आहेत.
या व्हॅल्यू बदलल्यावर ब्राउजर रिस्टार्ट करा आणि वरती चेक माय ब्राउजर लिंक वर जाउन परत तुमचे ब्राउजर चेक करा, आता ते पूर्णपणे सिक्युअर झालेले असेल.

क्लाउड फ्लेअर जालावर असलेला सिक्युअर आणि फास्टेस् डीएनएस आहे म्हणुन मी तो वापरला आहे.
या बद्धल अधिक खाली :-
What is 1.1.1.1?
What is DNS?
What Is DNSSEC?
Encrypt it or lose it: how encrypted SNI works
TLS 1.3 - Enhanced Performance, Hardened Security

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nee Sirichalum... :- Action

यात एक व्हॅल्यू ध्यायची राहुन गेली आहे, ती खालील प्रमाणे आहे :-

network.trr.bootstrapAddress
Default :- none
Change :- 1.1.1.1

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Duaa | Jo Bheji Thi Duaa | Full Song Cover by OLI | Shanghai

कंजूस's picture

16 Dec 2019 - 6:04 am | कंजूस

मदनबाण!!

मदनबाण's picture

20 May 2020 - 8:14 pm | मदनबाण

आजचे एक्स्टेंशन :-
Dark Reader
लॉक डाउनमुळे लोकांचे जालावर भ्रमण करण्याचा कालावधी अधिक झाला आहे, याचा वाईट परिणाम डोळ्यावर होउ शकतो. डार्क रिडर तुम्हाला या त्रासातुन वाचवु शकते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Jo Teri Payalon Ki Chan Chan Hai... :- Masoom

मदनबाण's picture

14 May 2021 - 6:48 pm | मदनबाण

वरती क्लाउड फ्लेअर आणि ब्राउजर सिक्युरिटी विषयी सांगितले आहे, या सध्याच्या कालावधीत मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा विविध पब्लिक डीएनएस टेस्ट करण्याचे उध्योग मी केला. मी आधी आयएसपीचा डीएनएस वापरायचो, मग गुगल डीएनएस वर स्वीच झालो काही काळ वापरुन मग क्लाउड फ्लेअरवर स्वीच झालो आणि त्यानंतर वरती प्रतिसाद दिला होता. अनेक डीएनएस हे अमेरिकेतच आहेत आणि अमेरिकेच्या बाहेर असणार्‍या डीएनएसची संख्या कमी आहे. [ज्यांना अमेरिकन कायदे लागु होत नाही असे.] सिक्युरिटी,प्रायव्हसी आणि वेग हे मुख्य ३ गुण आणि रिलायबिलीटी हे निकष मी माझ्या चाचणी घेण्या मागे निश्चित केलेले होते. मी अमेरिकेतले आणि अमेरिकेच्या बाहेरील [ उदा. जर्मनी आणि तैवान ] डीएनएस चाचणीत वापरुन पाहिले. अगदी OpenNIC Public Servers मधले डीएनएस आणि त्यांचे तुमच्या लोकेशनच्या [ तुमच्या देशातील ] जवळचे डीएनएस सुद्धा यात घेतले होते. थोडक्यात मी अनेक ओपन / पब्लिक डीएनएस वापरुन पाहिले. [ पीसी आणि राउटर या दोन्ही मध्ये एकच ठेवुन. ]

आजचे एक्स्टेंशन :-

AdGuard AdBlocker
:- याच्या नावारुनच याचे काम स्पष्ट होते.याच बरोबर ट्रॅकिंग,स्पायवेअस,अ‍ॅडवेअर आणि डायलर्स ला देखील अटकाव करते. हे फायफॉक्स आणि क्रोमसाठी देखील उपलब्ध आहे. याच बरोबर यांचे अ‍ॅप देखील उपलब्ध आहे पण ते गुगल प्ले स्टोअरवर नाही. [ हे अ‍ॅप त्यांच्या स्वतःच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
याच बरोबर यांचे डीएनएस देखील उपलब्ध असुन अजुन तरी ते वापरण्यास चकटफु आहे.
मी डीएनएस, एक्स्टेंशन आणि मोबाइल अ‍ॅप हे ३ही वापरुन पाहिले. डीएनएस त्याचे काम करतो परंतु मला अपेक्षित वेग नसल्याने [ पिंग कमांड मध्ये मिलीसेकंद जास्ती म्हणजे त्या डीएनएसचा वेग कमी, हे माझ्या पुरते सोपे मोजमाप निवडले.] मी सध्या वेगळा डीएनएस वापरतोय. ब्राउजर आणि मोबाइल मध्ये मात्र अजुन वापर सुरु आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Soppanasundari... :- Veera Sivaji