या पुणेकरांचे काही सांगता येत नाही. ते कशाचेही कौतुक करतील. भले ती गोष्ट ताजमहालाएवढी मोठी नसेना का. या कौतुकात शनिवारवाडा, लालमहाल असलाच पाहिजे असे नाही. किंबहुना खरा पुणेकर शनिवारवाडा आतून पाहातच नाही. शनिवारवाडा ही पुण्याबाहेरून आलेल्या पर्यटकांनी मुद्दाम भेट देवून पाहण्याची गोष्ट आहे अशी पुणेकरांची पक्की धारणा आहे.
एखादा पुणेकर तुम्हाला विचारेल ' का हो कधी टिळक स्मारकला गेलायत का' यावर समोरचा विचार करू लागतो 'हो गेलोय अमुक तमुक नाटके पाहिली आहेत'. यावर मुरलेला पुणेकर म्हणेल 'ते सोडा हो पण टिळकच्या गेटपाशी आइस्क्रीम(सॉफ्टी) मिळते ते खाल्लय का कधी' आता टिळक स्मारकला नाटक पाहायला जायचे एवढा माफक विचार करणार्याची विकेट पडलेली असते. असे कुठल्यातरी अतिसूक्ष्म गोष्टीचे आख्यान लावून इतरांना कॉम्प्लेक्स देणे हा पुणेकरांचा साइड बिझिनेस आहे.
बालगंधर्व हे नाव ऐकल्यावर आपल्याला नारायणराव राजहंस आठवतील. त्यांच्या नावाचे रंगमंदिर आठवेल. पण पुणेकर तुम्हाला विचारेल 'बालगंधर्वचा बटाटेवडा खाल्लाय कधी' यावर नवीन माणूस नाही म्हटला की पुणेकराच्या चेहेर्यावर आनंद तरळतो. मग पुणेकरांचा पुढचा प्रश्न ठरलेला ' काय सांगताय बालगंधर्वचा बटाटेवडा खाल्ला नाही ? किती वर्षे राहताय पुण्यात ? पुण्याचे नागरीकत्व मिळायला टिळकचं आइस्क्रीम, बालगंधर्वचा बटाटेवडा या गोष्टी आवश्यक असाव्यात. सिंहगड हादेखील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध नसून ते कांदाभजी खाण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे 'सिंहगडला गेलायत कधी मग झुणका भाकर खाल्ले की नाही' असाही प्रश्न कुणी पुणेकर तुमच्यावर भिरकवू शकतो.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातली एक मिसळ अशीच चर्चेत असते. आपण खानदानी पुणेकर आहोत हे दाखवण्यासाठी याचेही कौतुक करणे भाग आहे. ही मिसळ तुम्ही खाल्ली नसेल तर 'का हो मग तुम्ही पुण्यात राहून करता काय' असा प्रश्न तुम्हाला ऐकावा लागेल. असे अतिप्रचंड कौतुक ऐकून आम्हीही एकदा त्या दुकानात गेलो. रिकामा बाक पाहून बसलो. एक काका आले आणि थंडपणे म्हणाले 'सेल्फ सर्विस'. म्हणजेच बाकावर आणून कुणी देणार नाही. म्हणून पैसे भरून कुपन घेऊन ते देऊन आलो. मिसळ तयार नव्हती म्हणून पुन्हा वाट पाहत बाकावर येऊन बसलो. काही वेळाने मिसळ आली पण चमचेच नाही आणले. म्हणून विचारले 'चमचे इथेच मिळतील का त्यासाठी पुन्हा सेल्फ सर्विस ?' थंड चेहेर्याचे काका जोक समजल्यासारखे हसले.
पुढे थंड चेहेर्याची आणि दरपत्रकाची धास्ती घेऊन दुकानाची पायरी चढलो नाही. नंतर घरीच मिसळीचा बेत केला तेव्हा लक्षात आले 'आमची बायको घरी करते तीच जगातली बेष्ट मिसळ' ती खाताना थंड चेहेर्याच्या काकांची फार आठवण आली. वाटले त्यांनाही मिसळ खायला बोलवावे. त्यांना तरी अशी मिसळ कधी मिळणार ?
खाण्यापिण्याचे फक्त आपणच काय ते शौकीन अशा आविर्भावात पुणेकर बाता करतात. त्यामुळे पुण्यात राहून दुर्गाची कोल्डकॉफी न पिणे म्हणजे अपराधच. बरं त्याऐवजी चूकून दुसरी कोल्डकॉफी पिणे हा तर अधर्मच समजला जातो.
असेच कौतुक काका हलवाईंच्या बासुंदीचे आणि जोशींच्या सुरळीच्या वड्यांचेसुद्धा ऐकायला मिळेल. काकांचे कौतुक करताना आपणच काकांचे खरे पुतणे अशा थाटात पुणेकर भांडतात.
चितळ्यांच्या बाकरवडीचा मात्र यात सर्वात वरचा नंबर लागतो. बाकरवडी चितळ्यांच्या कोथरूडच्या किंवा डेक्कनच्या दुकानातून आणली असे सांगाल तर पुणेकर तुमच्याकडे 'किती रे हा अज्ञानी' अशा नजरेने पाहील आणि मग आपलं नेमकं काय चूकलं हे तुम्हाला कळणार नाही. बाकरवडी अशी दोन मिनिटात जाऊन आणण्याची गोष्टच नाही. चितळ्यांच्या बाजीराव रोडच्या दुकानात जाऊन २ तास रांगेत उभे राहून बाकरवडी आणली तर त्याचे खरे माहात्म्य. बरं तिथेही झटकन नंबर लागला तरी 'आज चितळ्यांच्या दुकानात काय गर्दी, चांगला दोन तास रांगेत उभा राहीलो आणि आणली बाकरवडी' हे ऐकवता आले पाहीजे.
'चितळ्यांची बाकरवडी अशक्य असते' या शब्दात कौतुक ऐकल्यावर नवीन पुणेकर चमकतो. म्हणजे काय ती खाणे अशक्य असते काय ? पण कौतुक करताना पुणेकर कोणते शब्द वापरेल ते सांगता येत नाही. त्या शब्दाचा सामान्य मराठीतला अर्थ एक आणि पुणेरी मराठीत दुसराच असण्याची शक्यता असते.
बाकरवडी साता समुद्रापार पोचली ती तिच्या अंगभूत गुणापेक्षा लोकांनी तिच्यावर लिहिलेल्या निबंधामुळे. पुण्यातला माणूस पुण्याबाहेर मद्रास, कलकत्ता, बंगलोर, लंडन, न्यू जर्सी अशा कुठेही गेला तरी तिथल्या लोकांना 'इथे चितळ्यांची बाकरवडी कुठे मिळते' असे विचारल्याशिवाय राहात नाही. विचारण्याचा भावार्थ बाकरवडीशिवाय तुम्ही जगूच कसे काय शकता ?
एकूण काय तर पुणेकर होण्यासाठी प्रत्यक्ष खाल्ले पाहीजेच ही सक्ती नाही पण शाब्दिक कौतुकाचा मारा करता आला पाहिजे. कौतुकाच्या मेल्स खरडता आल्या पाहिजेत. एरवी दुर्वांकुरचा दर खिशाला परवडला नाही तरी फिकीर नको.
प्रतिक्रिया
24 Jun 2013 - 3:35 pm | बॅटमॅन
25 Jun 2013 - 12:41 pm | चित्रगुप्त
24 Jun 2013 - 3:46 pm | भावना कल्लोळ
इ - चिखलत वैगरे असेल तर तयार व्हा, कारण पुणेरी मिपाकर आता तुम्हाला काही सोडणार नाहीत. तेव्हा शाब्दिक हल्ल्यासाठी तयार रहा … ( ह. घ्या)
25 Apr 2014 - 7:44 pm | एकुलता एक डॉन
चिखलत
कि
चिलखत???
25 Mar 2015 - 3:33 pm | नर्मदेतला गोटा
चिलखत
24 Jun 2013 - 4:00 pm | अभ्या..
गुरुजी परवा मी पुण्यात आल्यावर तुम्ही प्रेमाने खाऊ घातलेली मिसळ ती हिच का वो? ;)
नंतरचे १२०/३०० मात्र भारी होते पण तो भय्या होता ना?
24 Jun 2013 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा
ती मिसळ हि नै रे अभ्या! आणी धागाकर्ते म्हणतात,ती पुण्याचं नाव घालवणारि बेडे(ढे)कर ;-) मिसळ. आणी पानवाला भैय्याच होता. :-)
24 Jun 2013 - 4:18 pm | तुमचा अभिषेक
लेख बराच छोटा आहे :)
25 Jun 2013 - 1:36 pm | तुषार काळभोर
कारण लेखक नर्मदेतला गोटा आहे!!!
24 Jun 2013 - 4:36 pm | पैसा
पहिलीच प्रतिक्रिया बघा पुणेरी माणसाची!
24 Jun 2013 - 5:20 pm | विक्रान्त कुलकर्णी
सर्व पुणेकर चितळेंच्या रांगेत उभे आहेत का ?? अजुन प्रतिक्रिया नाहित कोणाच्या....
24 Jun 2013 - 5:22 pm | कपिलमुनी
24 Jun 2013 - 5:37 pm | विक्रान्त कुलकर्णी
कपिलमुनी क्लिप तर काढली आहे... पण अजुन धमाका कसा होत नाही आहे ????????? वाट पहात आहे...
24 Jun 2013 - 6:12 pm | पिलीयन रायडर
पहिला प्रतिसाद पहा की..
असल्या तद्दन भिकार लेखना वर प्रतिक्रियांची वाट पहाताय म्हणजे कमाल आहे..
24 Jun 2013 - 8:56 pm | श्रीगुरुजी
आपल्या गावच्या गोष्टींचं कौतुक करण्याच्या बाबतीत कोल्हापूरकर पुणेकरांच्या कैक योजने पुढे आहेत. कोणत्याही मूळच्या कोल्हापुरी असलेल्या माणसाच्या उपस्थितीत "कोल्हा", "पूर" किंवा "कोल्हापूर" असे नुसते शब्द उच्चारले तरी काही क्षणातच कोल्हापूरकरांची रसवंती सुरू होते व पुढला तासभर कोल्हापूरचे कौतुक ऐकावे लागते.
त्या कौतुकात कोल्हापूरची उत्कृष्ट हवा (या हवामानात काय ग्रेट आहे हे आजतगायत मला समजलेले नाही), रंकाळा (प्रत्येक शहरात एखादा तलाव असतोच, रंकाळा तलावात काय ग्रेट आहे ते कोल्हापुरीच जाणे), कोल्हापूरच्या म्हशींचं तुम्हाला समोर उभं करून पाणी न घालता काढलेलं सकस दूध (अनेक शहरात व गावात तुमच्या समोर दूध काढून देतात. पण कोल्हापूरचं दूध म्हणजे जणू काही अमृतच अशी कोल्हापूरकरांची समजूत असते), कोल्हापूरचा गूळ (!), कोल्हापुरी लोकांचं तिखट खाणं (नागपरी मंडळी जास्त तिखट खातात, पण हे कोल्हापुरींना कोण समजावणार?), कोल्हापुरी चप्पल (चपलेचा सुद्धा अभिमान असतो), महालक्ष्मीचं देऊळ, पन्हाळा (सिंहगड काय पन्हाळ्यापेक्षा वाईट आहे?), 'अरे'ला 'कारे' म्हणणारे रांगडे कोल्हापुरी (हे अजून युपी/बिहारमध्ये गेलेले दिसत नाहीत), गुजरी (पुण्यातल्या दाजीकाका गाडगीळांचं दुकान काय कमी दर्जाचं आहे?), कोल्हापुरी पैलवान (पैलवानांचा सुद्धा अभिमान), कोल्हापुरातील कुस्त्या (!), तिथल्या पैलवानांचा रोजचा खुराक (आता मात्र हद्द झाली) . . . अशा अनेक कौतुकास्पद व अभिमानास्पद गोष्टींचा श्रोत्यांवर भडीमार होतो.
कोल्हापुरी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने एखाद्या कोल्हापुरीच्या उपस्थितीत स्वतःच्या गावाबद्दल किंवा इतर कोणत्याही गावाबद्दल चार बरे शब्द काढले की कोल्हापुरी अस्वस्थ होतात आणि "हे तर काहीच नाही. आमच्या कोल्हापुरात तर . . ." असे प्रास्ताविक करून पुढील किमान अर्धा तास कोल्हापुरची अफाट स्तुती केली जाते.
24 Jun 2013 - 9:10 pm | टिवटिव
मी पुण्याचि अति स्तुती करणारे फक्त वाचले..पण कोल्हापुरचे मात्र ऐकले व सहन केले...जाम बोर करतात...
24 Jun 2013 - 9:26 pm | रमेश आठवले
व्हाय धीस कोल्हापुरी कोल्हापुरी डी ?
24 Jun 2013 - 9:33 pm | मदनबाण
च्यामारी आमच्या कोल्हापुराबाबत कायबी बोललं आमास्नी खपणार नाय ! ;)
मिसळ कंची फेमस व्हो ? कोल्हापुरीच ना ? ;) बाकी समदं पांचट पानी बघा ! ;)
रंकाळा आणि त्याच्यावर तरंगणार्या केंदाळांच बी लयं कवतिक हाय आम्हासनी ! ;)
धारोष्ण दुध हे कट्यावर पचवल्या शिवाय समजायचं न्हाय तुम्हासनी ! ;)
कोल्हापुरी चप्पल करकचं असा विशिष्ठ आवाज करणारी, इतकी नक्षिदार चप्पल अख्ख्या जगामंदी प्रसिद्ध हाय तवा कवतीक केल तर कशा पायी त्रास व्हतो ? ;)
महालक्ष्मीचं देऊळ... अवं आदिमाया हाय ती ! :)
आशा ताईंच हे गाणं जरा ऐकाचं...
कुस्ती म्हंटलं की लालमाती आणि कोल्हापुरी पैलवानचं का बरं आठवतात ? ;)
जाता जाता :---
दिक्षितांची माधुरी सुद्धा म्हणते मै कोल्हापुरसे आई हूं ;)
24 Jun 2013 - 10:31 pm | मोदक
हा प्रतिसाद फाट्यावर मारण्यात आला आहे. :D
कोल्हापूरी पुणेकर - मोदक.
25 Jun 2013 - 12:31 am | बॅटमॅन
+१११११११११११.
कोल्हापूरकर भलेही काही म्हणत असोत, जालावर फक्त आणि फक्त पुणेकरांची पिरपिर दिसते. त्यामुळे आम्हीही तो प्रतिसाद पूर्ण फाट्यावर मारलेला आहे.
(हाडाचा मिरजकर) बॅटमॅन.
25 Mar 2015 - 6:31 pm | कैलासवासी सोन्याबापु
हायला!!! तुम्ही मिरजेचे बॅटमॅन!!! मला उगा मिरजेचे गोथम सिटी झाल्यागत फीलिंग आले
26 Mar 2015 - 1:19 pm | बॅटमॅन
हम जहां रहते हैं वहीसे गॉथम सिटी शुरू होती है |
30 Mar 2015 - 7:19 pm | हाडक्या
जाइल त्या सिटीला गॉथम सिटी करुन टाकता असं म्हणायचय का हो तुम्हाला ? ;)
31 Mar 2015 - 12:36 pm | बॅटमॅन
इंडीड. यू कॅन टेक बॅटमॅन औटॉफ गॉथम (दॅट टू ऑनली फॉर अ व्हाईल) बट यू कांट टेक द गॉथम औटॉफ बॅटमॅन.
24 Jun 2013 - 11:13 pm | कवितानागेश
देजा वू!
25 Jun 2013 - 2:35 am | किसन शिंदे
+१
धागा वाचल्यासारखा वाटतोय.
25 Jun 2013 - 7:57 am | आदूबाळ
हा ना! मला वाटलं मेरीही आंखें मुझे धोका दे रही हय.
25 Jun 2013 - 11:54 am | नर्मदेतला गोटा
काय या पुणेकरांचे कौतुक ! या धाग्यावर वाचले असणार
25 Mar 2015 - 5:08 pm | कहर
पुण्यावर आणि पुणेकरांवर भरपूर लेख झाले … आतापर्यंत स्वताच्या गावात काय चांगले हे पुणेकरांनी अभिमानाने सांगितले आणि पुणेतरांनी त्याचे दोष काढले … आता जरा जागा बदलून बोल राव… तुमच्या गावात अभिमानास्पद काही असेल आणि तुम्हाला त्याचा अभिमान असेल तर जर सांगा आणि मग त्यावर पुणेकर कसे आडवे तिडवे घेतात ते पहा आणि जमल्यास अशा विषयावर पुणेकर दाखवित असलेली सहनशक्ती तुमच्याकडे आहे का हेही तपासून पहा ...
25 Mar 2015 - 8:34 pm | श्रीगुरुजी
>>> तुमच्या गावात अभिमानास्पद काही असेल आणि तुम्हाला त्याचा अभिमान असेल तर जर सांगा
या आव्हानातून कोल्हापूरकरांना वगळा. नाहीतर ते एकदा सुटले की आवरायचे नाहीत. कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी गूळ, रंकाळा, कोल्हापुरी तालमी, कोल्हापुरी मल्ल, कोल्हापुरी मटण, कोल्हापुरी दूध, कोल्हापुरची हवा ... अशी कोल्हापूरची अफाट स्तुती सुरू होईल आणि मग त्यांना आवरणं अशक्य होईल.
25 Mar 2015 - 9:05 pm | सूड
हो राव!! कोल्हापूरकर एकदा सुटले की लै म्हणजे लै मंडई करतात डोक्याची.
26 Mar 2015 - 1:48 pm | कपिलमुनी
ताजमहाल कोल्हापूरलाच बांधायचा होता .. पण जागा दिली नाय ओ !
26 Mar 2015 - 2:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
रंकाळ्यात ताजमहालाचं प्रतिबिंब काय खुललं असतं म्हणुन सांगु पोर्णिमेच्या रात्री. =))
26 Mar 2015 - 2:51 pm | बॅटमॅन
जलपर्णीच्या पानांवर प्रतिबिंब अगदी खुलून दिसलं असतं बघा. =))
26 Mar 2015 - 3:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
ते सुवर्णमंदिरासारखं रंकाळ्याच्या मध्यभागी बांधलं असतं तर चारी बाजुची को.पु. जन्ता आनंदी झाली असती नै? ह्या राव, को.पु.करांनी जागाच नै दिली पण.
26 Mar 2015 - 4:04 pm | यशोधरा
दिलदारी नाय त्यांच्यात जागा द्यायची! ;) पुणेकर बघा, समस्त अपुणेकरी मंडळीना जागा पुरवतात आणि वरुन त्यांची पुण्याबद्दल पिरपिरही ऐकतात.
26 Mar 2015 - 4:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पिरपिर काय फुकट नै ऐकत. बाहेरच्याला ४ शाब्दिक टोले मारायची संधी मिळावी म्हणुन लावलेलं आमिष असतं ते =))
26 Mar 2015 - 6:09 pm | यशोधरा
आमिषाला का भुलतात तर अपुणेकर? =))
26 Mar 2015 - 8:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
काय माहित. ह्या वर्षी किमान १० लोकं पुणे युनिव्हर्सिटीमधुन पी.एच.डी. करत आहेत म्हणे ह्या विषयावर =))
27 Mar 2015 - 5:25 am | यशोधरा
तुम्ही काय गाइड म्हणून काम करताय का त्यांचे? =))
27 Mar 2015 - 7:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
देव करो आणि त्यांच्यावर आणि युनिव्हर्सिटीवर एवढी वैट्ट वेळ न येवो. एम-३ चा सगळा वचपा घाउक काढण्यात येईल. =))
27 Mar 2015 - 6:56 pm | यशोधरा
=))
30 Mar 2015 - 7:13 pm | अत्रुप्त आत्मा
@ आमिषाला का भुलतात तर अपुणेकर? =)) >> अमीषा ला ना? ती पटेल , असं भय वाटत असेल... :-D म्हणुन! :-D (असेल! ;-) )
30 Mar 2015 - 8:16 pm | सूड
ऑ अच्च जालं तल?
30 Mar 2015 - 9:27 pm | अत्रुप्त आत्मा
बॉSSSSS ... मग कच वायला हवं होतं तल.. :P
30 Mar 2015 - 10:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ए अच्चॉ नै कॉलायचॉ...आपन शिल्यश विषयावर चल्चा करल हाओत हे विसरु नये....!!!
26 Mar 2015 - 6:38 pm | सूड
माताय!! हा दोन्ही बाजूंनी बोलतोय राव.
26 Mar 2015 - 8:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कारण मी पुणेकर नाही =))
मी शेजारी :P असल्यानी शेजारचं कार्टं कित्तीही नमुनाछाप असलं तरी कौतुक करावं लागतं. =))
26 Mar 2015 - 8:47 pm | सूड
हे वाक्य लक्षात ठेव मेल्या, नंतर जर माझे आणि पुण्याचे जवळचे संबंध आहेत वैगरे लिहीलंस तर जीमोंच्या कथा आणि अनाहितांच्या लाडोबाची विडंबनं वाचायला लावेन तुला!!
26 Mar 2015 - 8:56 pm | बॅटमॅन
हे काय आहे हो नक्की?
27 Mar 2015 - 7:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आधुनिक मराठी काव्यप्रकारात एक टकाटकटंकनकाव्य नावाचा प्रकार आलाय. तांब्या संप्रदायाचे संस्थापक आणि कवी, लेखक रा.रा.दु.दु.त्मु.त्मु.गुरुजी ह्यांच्या काव्यावर (आणि नंतर संप्रदायाच्या जीवावर) बेतलेलं विडंबनकाव्य ह्या लेखन प्रकारात मोडतं. बाकी एकमेव टकाटकटंकनकवी रा.रा.श्री.श्री.ट.वा.ळ.का.र्टे. हे मार्गदर्शन देतीलचं.
27 Mar 2015 - 2:45 pm | सूड
या शब्दासाठी लकडी पुलावर पुस्प्गुच् देऊन आपला सत्कार करणेत येईल.
30 Mar 2015 - 6:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पुस्प्गुच् चं बजेट कोंबडीकडे वळवता येणार नै काय?
30 Mar 2015 - 6:56 pm | सूड
ये कुछ ज्यादा ही नही हुवा?? ;)
31 Mar 2015 - 11:45 pm | टवाळ कार्टा
त्या कोंबडीत वाटा मिळेल कै ;)
31 Mar 2015 - 11:50 pm | टवाळ कार्टा
आधुनिक मराठी काव्यप्रकारात एक टकाटकटंकनकाव्य नावाचा प्रकार आलाय. तांब्या संप्रदायाचे संस्थापक आणि कवी, लेखक रा.रा.दु.दु.त्मु.त्मु.गुरुजी ह्यांच्या काव्यावर (आणि नंतर संप्रदायाच्या जीवावर) बेतलेलं विडंबनकाव्य ह्या लेखन प्रकारात मोडतं. बाकी एकमेव टकाटकटंकनकवी
ए हल्कट =))
1 Apr 2015 - 6:00 am | खटपट्या
दीक्षा पूर्ण झाली.
26 Mar 2015 - 8:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ए बाबा मला दोन्ही शहरांच्या बाजुनी बोलायला लागतं. =))
अनाहितांच्या लाडोबाची विडंबन बंद झाली गुर्जींनी तांब्या जप्त केल्यापासुन.
31 Mar 2015 - 11:46 pm | टवाळ कार्टा
आम्च्या गुर्जींनी व्हिआरेस घेतली म्हणुन आम्हीपन बुच लावले तांब्याला
26 Mar 2015 - 4:35 pm | कपिलमुनी
पण एकडाव रस्सा प्याला बादशा आणि पळालं !
26 Mar 2015 - 4:08 pm | बॅटमॅन
आणि मध्ये ग्रंथ घेऊन कोल्लापुरी लोक्स बसले असते सरदारांसारखे, अस्सल कोल्लापुरी भाषेतील भजने म्हणत...
"आयच्यान् सांगतो लडतर हूंदे नैतर काही हूंदे
पायजे तितके करशिला पालथे गावभरचे हो धंदे
टायमाला पायजे घरात यायला, बोलायचं अन काम न्हाई
नायतर पिट्टा पाडतिल पुरता, बाबा अन सोबत आई"
(ढगाला लागली कळ च्या चालीवर वाचावे.)
26 Mar 2015 - 4:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
_/\_ _/\_ ढिंच्याक राडा...
आयच्यानं सांगतो कोल्हापुरवाले पुणे मिरज रोडला रास्ता रोको करणार पुढच्या वेळी =))
30 Mar 2015 - 5:45 pm | नाखु
लंगरला मिसळ देणार असाल तर मी येत जाईन आप्ल्या "धर्म स्थळा" मध्ये हा का ना का !
बावडा मिसळ खाऊन एक तप लोटलेला.
एम एच १४ नाखु
30 Mar 2015 - 6:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
चला करायचा का कोल्हापुर मिसळ/ तांबडा-पांढरा कट्टा? =))
24 Jun 2013 - 11:44 pm | श्रीरंग_जोशी
प्रत्येक गाव / परिसराच्या रहिवाश्याने आपापल्या गोष्टींचे कौतुक केले तर इतर कुणाला त्यावर आक्षेप घेण्यासारखे काय त्यात? प्रत्येकाला स्वतःच्या गावातल्या / परिसरातल्या गोष्टींचे कौतुक करण्याचे स्वातंत्र्य आहेच अन तसे ते करत असतातही.
जरा अवांतर -
या निमित्ताने माझे गेल्या काही वर्षांतले मराठी माणसांच्या आंतरजालावरील प्रतिनिधित्वाचे निरिक्षण नोंदवतो. समजा मराठी भाषा शिकलेला एखादा परदेशी माणूस मराठी आंतरजालावर वाचन करू लागल्यास त्यास असे नक्कीच वाटेल की महाराष्ट्र राज्यात पश्चिमेकडील भूभाग सोडल्यास अत्यंत तुरळक लोकवस्ती असावी. उर्वरीत महाराष्ट्रात आंतरजालावर मोठ्या प्रमाणात दखल घेण्याजोगते फारसे काही घडतच नाही (किरकोळ अपवाद वगळता).
याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता असे जाणवते की, गेल्या दशकभरात आंतरजालाची सुविधा सगळीकडे पोचली व विस्तारली गेली असली तरी महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग वगळता लोडशेडींगचा फटका उर्वरित महाराष्ट्राला फारच बसला. निवांतपणे जालावर बसून लेखन / वाचन करण्याची संधी तेवढ्या प्रमाणात मिळाली नाही.
अन एकदा एक प्रवाह जोमाने सुरू झाला की इतर प्रवाह त्यापुढे जोम धरू शकत नाही.
पण कारणे काहीही असोत, आंतरजालावर कुठल्याही परिसराचे प्रतिनिधित्व कमी पडत असेल तर त्याचा दोष त्या परिसरातील जालावर वावरणार्यांनाच जातो. ज्यांचे प्रतिनिधित्व भरपूर आहे त्यांना याबाबत दोष दिला जात असेल तर ते चूक आहे.
24 Jun 2013 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा
@असे कुठल्यातरी अतिसूक्ष्म गोष्टीचे आख्यान लावून इतरांना कॉम्प्लेक्स देणे हा पुणेकरांचा साइडबिझिनेस आहे. >>> :-)) :-)) :-))
25 Jun 2013 - 2:18 am | मोदक
सोडा हो बुवा... अतिसुक्ष्म गोष्टीच्या आख्यानातूनही यांना कॉम्प्लेक्स येतो. :D
25 Jun 2013 - 8:17 am | अत्रुप्त आत्मा
चालायचच...शेवटि ते नर्मदेतले गोटे'च ना!? ;-) असो. न.गो.- त्या 15 वर्षांपूर्वीच "खतम" झालेल्या एका मिसळवरुन "अख्या" पुण्याचा अंदाज काय काढताय?तुमची इच्छा असेल तर आमच्या संग या,हव्या त्या जातिची ;-) मिसळ आणी सरमिसळं(ही) खायला घालतो! :p
25 Jun 2013 - 12:02 am | lakhu risbud
ह आयडी सार्थ करणारा लेख लिहिल्याबद्दल धागाकर्त्याचे अभिनंदन !
25 Jun 2013 - 8:54 am | पिंपातला उंदीर
@धागा
शिळ्या कढी ला उत
25 Jun 2013 - 3:49 pm | कपिलमुनी
असाच पांचटपणा
एकदा एक कोल्हापूरकरांचा राँग नंबरचा फोन भर दुपारी पुणेकराला लागतो ..
कोल्हापूरकर : अहो देशपांडे आहेत का ?
पुणेकर ( चिडून) :देशपांडे गेले आहेत पावन खिंडीत..
कोल्हापूरकर : त्यांना सांगा , राजे गडावर पोचलेत ..आता घरी जावा !!
26 Jun 2013 - 10:49 am | llपुण्याचे पेशवेll
हाच पांचटपणा फकत शेवटच्या ओळीत "आता मरायला हरकत नाही " असा ऐकला होता.
25 Jun 2013 - 7:58 pm | इष्टुर फाकडा
कालच याच छापाच्या 'प्रेमळ' वादात ऐकलेली वाक्ये,
माणसाने पुणेरी असावे,
कोल्हापुरी तर चप्पल पण असते ;)
किंवा,
माणसाने पुणेरी असावे,
सोलापुरी तर चादर पण असते
वगैरे वगैरे....
26 Jun 2013 - 2:52 am | कंजूस
नर्मदेतल्या गोट्यालाही काही सूक्ष्म गोष्टी जाणवून गडगडत गेले आहेत .पण ते मुळा मुठातल्यांना अजिबात आवडलेले दिसत नाही .कुल्हापुरच्या पंचगंगेतूनही आबूराव -बाबूरावछाप गडगडाट झाला .अवधुत आणि सुरेशजींना तर कुल्हापुरच्या आठवणींनी सारख्या उचक्या लागत असतात .परवा मुलाखतकार सुधीर गाडगीळांचा सत्कार झाला त्यावेळी त्यानींही सांगितले 'पुणेकर सर्व गोष्टींचे कौतुक करतात म्हणून सर्वाँनाच आवडतात' ( प्रचंड टाळ्या ) .पुणेकरांनी अमृततुल्य ,मस्तानी ,मिसळ ,बाकरवडी याची परंपरा कायम ठेवावी त्याची कैलाश लस्सी,चौपाटी भेळ ,अथवा चाट करू नये .पर्वती ,शनिवारवाडा ,तुळशीबाग आणि लक्ष्मीरोड(दादर आणि मालाड मार्केटपेक्षा भाऽरी आहेत ) ,डेक्कन बद्दल त्यांना रास्त आदर आहे .१९७० नंतर स्थानिक वैविध्य कमी होत चालले आणि एकसारखे मॉल्स ,पंजाबी डिशेस येऊन भारतातल्या शहरांचा चेहरा हरवला आहे .
25 Apr 2014 - 1:19 pm | नर्मदेतला गोटा
गाडगीळछाप पुणेरी अभिमानाबद्दल न बोललेलंच बरं
त्यांना पुण्याचा अभिमान नसून इतर जगाबद्दल अज्ञान आहे
25 Mar 2015 - 5:25 pm | सूड
तुम्हाला कोल्लापूर म्हणायचं असावं.
30 Jun 2013 - 3:35 pm | विजुभाऊ
पुण्याचे पुनेपण हाळुहळू लोपत चालले आहे. हिंजवडी ला हिंजेवाडी आणि पुण्याला पूना म्हणणार्या उत्तरभारतीयांचे प्रस्थ इथे वाढत आहे. पुण्यात काही वर्षानी कानपूर लखनौ प्रमाणे भिंतीभिंतींवर " पेट गैस और सैक्स की दवाईया उपलब्द " अशा झैराती दिसायला लागतील आणि सदाशिव पेठ रविवार पेठ या ऐवजी सदाशिव पुरा रविवार गंज असे ऐकायला मिळेल.
असे वातावर्ण आहे
2 Jul 2013 - 11:56 pm | नर्मदेतला गोटा
कुणी वंदा कुणी निंदा
चर्चेत राहण्याचा आमचा धंदा
इतकाच हेतू आहे
30 Jun 2013 - 9:05 pm | शिशिर
30 Jun 2013 - 9:06 pm | शिशिर
असे कुठल्यातरी अतिसूक्ष्म गोष्टीचे आख्यान लावून इतरांना कॉम्प्लेक्स देणे हा पुणेकरांचा साइड बिझिनेस आहे.
ह्या वाक्याशी एकदम सहमत.... १९८८ साली पुण्यात आल्यावर हा प्रकार प्रकर्षाने जाणवला.
11 Jul 2013 - 9:19 pm | lakhu risbud
श्री गोटा रावांना बौद्धीकदृष्ट्या आव्हान देणारी अजून एक बातमी दिसली. शोधून शोधून हा धागा वरती आणतोय ……………………एक दोन साडे माडे तीन ……………
14 Jul 2013 - 10:08 pm | नर्मदेतला गोटा
आज कळले काही हॉटेलांना मॅकडी का म्हणतात ते.
14 Jul 2013 - 10:09 pm | नर्मदेतला गोटा
मॅकडी
15 Jul 2013 - 4:31 am | रेवती
या धाग्याकडे जरा दुर्लक्ष झाले होते........................जे होते ते भल्यासाठीच!
15 Jul 2013 - 10:24 am | मोदक
तुम्ही पुणेकर आहात का..? ;-)
15 Jul 2013 - 7:04 pm | रेवती
हॅ हॅ हॅ. भेटा एकदा.......पुण्यात.
29 Oct 2014 - 11:33 am | नर्मदेतला गोटा
भावना दुखावल्या का
15 Jul 2013 - 7:50 pm | अशोक पतिल
एक प्रवासी ट्रेन मधून प्रवास करत असतांना, रात्री एका स्टेशनवर जाग आल्यावर बाहेरील एकास विचारतो की कोणते स्टेशन आले ?
" शिंच्या डोळे फुट्लेत का ? वाचता येत नाहि का? " उत्तर आले.
प्रवासी उद्दगारतो " हं! पुणे आले वाटतं "
16 Jul 2013 - 1:59 am | बॅटमॅन
कोण पुणेकर?
धन्यवाद.
25 Apr 2014 - 1:37 pm | आयुर्हित
नकारात्मक भाषेत असला म्हणून काय झाले? पुण्याची व पुणेकरांची महती आणि माहिती देणारा लेख खासच आहे. बाहेरून पुण्यात येणाऱ्या माणसाने पुण्यात पाय टाकता टाकता नक्कीच वाचावा या साठी स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन वर मोठ्या फ्लेक्सवर लिहून लटकावला पाहिजे!
कळत नकळत ब्रांड वेल्यू वाढविण्यासाठी उपयुक्त असा हा लेख लिहून आपण आपले मार्केटिंग चे कसब समोर आणल्याबद्दल धन्यवाद.
ता.क. भारताच्या branding साठी मोदींना आपल्यासारख्या तज्ञाची/विचारवंताची गरज आहे.हे गुणविशेष कसे वाढविता येतील याबाबत अधिक मेहनत घेतली तर नक्कीच फायदा होईल.
25 Apr 2014 - 1:47 pm | नर्मदेतला गोटा
>> ता.क. भारताच्या branding साठी मोदींना आपल्यासारख्या तज्ञाची/विचारवंताची गरज आहे.हे गुणविशेष कसे वाढविता येतील याबाबत अधिक मेहनत घेतली तर नक्कीच फायदा होईल.
ही गोष्ट तुम्ही चेष्टेनी लिहीली असली तरी खरी आहे... ही विचारणा झाली होती पण...
25 Apr 2014 - 2:05 pm | आयुर्हित
अहो मी काहीच चेष्टेने लिहीत नाही.(नाहीतर स्म्यायल्या टाकल्या असते की!)
हे गुणविशेष कसे वाढविता येतील याबाबत अधिक मेहनत घेतली तर नक्कीच फायदा होईल.
कल्याण होईल हो तुमचे!
25 Apr 2014 - 8:55 pm | मृगनयनी
नर्मदेचा गोटा..... सुन्दर चित्रण केलेत.. पुण्याचे!!!.. चितळेंच्या बाकरवडीचे आणि ती घेतानाचे अगदी हुबेहूब वर्णन!!!!! :)
खरा पुणेकर शनवारवाडा पाहतच नाही... हे पटले नाही. शनवारवाडा ही पर्यटकांना दाखवायची "वास्तु" असली, तरी साधारण १९९५ च्या अलीकडेपर्यन्त शनवारवाडा आतून बघणे.. हे सर्वांसाठी फुकट होते. आतमधल्या गवताची / हिरवळीची दर १५ दिवसांनी कापणी व्हायची...आम्ही बर्याचदा शनवारवाड्यावर खेळावयास जात असू... अर्थात तेव्हा "आताइतकी" गर्दी नक्कीच नसायची. आणि शनवारवाड्याचा वॉचमन-अन्कलही बर्यापैकी ओळखीचा असायचा... आतमधल्या सुन्दर बागेमध्ये काहीजण अभ्यासाला यायचे. कपल्स आत जास्त येत नसत.. किम्बहुना वॉचमन त्यांना जास्त एन्टर्टेन करीत नसे.
त्यामुळे बर्यापैकी कपल्स हे संध्याकाळपासून सारसबागेच्या कोपर्याशी किंवा मग गंधर्व पूल- दोन्ही साईडचे फुटपाथ आणि मधला डिव्हायडर- निम्मा अडवून त्यांची हौस पुरी करत असत. (अजूनही करतात...) (नर्मदेचा गोटा- आपण सारसबागेचा आणि आमच्या तळ्यातल्या गणपतीचा साधा उल्लेखही केला नाहीत की!!!! :) खास पेशव्यांचा आवडता गणपती आहे तो!!! )
त्याचबरोबर आमच्या पुण्याची "मस्तानी" ज्याने खाल्ली नाही.... त्याने पुणे काय पाहिले!?!
पुण्याच्या दगडूशेठ'ला लांबलांबचे लोक्स नवस बोलतात... आणि दर्शनासाठी येत राहतात.... आणि सगळ्यांत महत्वाची म्हणजे आमच्या पुण्यातली युनिक- "तुळशीबाग".... सुन्दर रामाचे मन्दीर.. आणि जगात कुठेही होणार नाही.. असं बार्गेनिग!!! आणि बायकांना, मुलींना लागणार्या सगळ्या वस्तू!!... :)
पूर्वी म्हणजे आमच्या वडिलांच्या लहानपणी पुण्याला तित्कासा "सेलेब्रिटी फीवर" नव्हता... तेव्हा आचार्य अत्रे यांना लोक मुद्दाम आपल्या घरच्या फंक्शनला बोलवायचे.. लग्न-मुंज इ. कार्यक्रमांना आचार्य अत्रेंना खास निमन्त्रण असायचे. सुप्रसिद्ध गायिका- हिराबाई बडोदेकरांचे गाण्याचे कार्यक्रम गणपतीच्या दिवसांमध्ये- रात्री (प्लीज डोन्ट फील अॅज रा.गा. ;) ) भर रस्त्यात व्हायचे..... आणि लोक देखील त्यांना पाहायला आणि ऐकायला भरगच्च जमायचे... पुण्याच्या गणपती उत्सवाबद्दल तर नव्याने कुणाला सांगायलाच नको!!...
नाटकप्रेमींसाठी टिळक'बरोबरच "भरत"ही तितकंच प्रिय!!.. किम्बहुना.. पुरुषोत्तम'साठी तर-- केवळ भरत आणि भरतच!!!.
आणि अतिउच्च अभिरुची असणार्यांसाठी शनवारातलं- सुदर्शन कला मंच!!!! :) प्रथम येणार्यास प्रथम प्रवेश!!!! :)
सुबोध भावे पुण्याचा.. प्रसाद ओक पुण्याचा...सिद्धार्थ चांदेकर पुण्याचा.. सोनाली कुलकर्णी'ज पुण्याच्या, पु.ल. "शेवटी" पुण्याचेच!...
खूप गोष्टी आहेत.. पुण्यामध्ये.. जितक्या बोलाव्यात.. तितक्या कमीच्च!!! ...
25 Mar 2015 - 3:47 pm | सूड
पुण्याबद्दल किती लिहू नि किती नको असं झालंय लोकांना.
25 Mar 2015 - 4:16 pm | सतीश कुडतरकर
हि घ्या माझीपण दोन अक्षर 'पुने'
25 Mar 2015 - 4:22 pm | सतीश कुडतरकर
आमच्याकडे डोंबिवलीमध्ये पण 'मुनमुन' ची मिसळ फ़ेमस आहे……………। अस काही लोक म्हणतात.
९९% डोम्बिवालीकरांना मुनमुन सेन आंघोळ कुठे करते ते माहित असेल पण या मिसळच्या दुकानाचा पत्ता सांगता येणार नाही.
25 Mar 2015 - 5:40 pm | जयन्त बा शिम्पि
ह्याच पुण्याबद्दल पुलं नी दोन ओळी लिहून ठेवल्या आहेत " मी रहातो पुण्यात , म्हणजे विद्वत्तेच्या ' ठाण्यात ' ! "
आता ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे , हे मला वाटतं , पुणेकर सोडून सर्वांना माहित असेल ! !
25 Mar 2015 - 6:22 pm | कपिलमुनी
कृपामाईला जाउन आलात काय ?
प्रत्येक भागात वेगळे असते . असो मुंबैकरांना डबक्याबाहेरचा काहीही माहित नसता
25 Mar 2015 - 7:01 pm | खटपट्या
नायतर काय. जवा तवा आमच्या ठान्यावर येतत.
25 Mar 2015 - 6:48 pm | तिमा
तो मनोजकुमार जर पुण्याचा असता तर! पुणं बॉलिवुड मधे पण फेमस झालं असतं.
'मेरे पुणेकी मिसळ, उगले उसळ' असली गाणी घरोघरी पोचली असती.
26 Mar 2015 - 1:18 pm | बॅटमॅन
अरारारा =)) =)) =))
26 Mar 2015 - 4:08 pm | यशोधरा
तिमा =))
26 Mar 2015 - 4:01 pm | नर्मदेतला गोटा
आमचं कोल्लापूर आमचं कोल्लापूर तर मग लेका पुण्यात नोकरीला का येतोस
31 Mar 2015 - 3:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
१०० वा प्रतिसाद. ही संधी मज पामरास दिल्याबद्दल लेखकाचे कोरांटकीच्या फुलांचा पुस्प्गुच्, एक सदाशिवपेठी दुकानाची शॉपिंग कुपन्स तसचं शालजोडी देउन सत्कार करण्यात येत आहे. लेखकाचा पुण्यास असलेला विरोध लक्षात घेता पिंपरी चिंचवड व पुण्याच्या मध्यावर असणार्या सुप्रसिद्ध हॅरिस ब्रिजवर सत्कार समारंभ आयोजित करणेत येईल. फोटु चे ५० रुपये वेगळे पडतील तसचं दुपारी एक ते चार मधल्या फोटो काढायला २०० रुपये जास्तं पडतील. धन्यवाद.
31 Mar 2015 - 3:43 pm | सूड
लेखकाऐवजी लेखिका असेल तर?
31 Mar 2015 - 3:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मुका नै घेणार रे....शुद्ध मनानी सत्कार करणार ना =))
31 Mar 2015 - 3:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
नर्मदेची गोटी असं नावं नसल्याने लेखक असावा असं गृहित धरतो.
31 Mar 2015 - 10:45 pm | सूड
अर्थाचा अनर्थ बघता असा आयडी कोणी घेईलसं दिसत नाही. ;)
1 Apr 2015 - 7:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
कै सांगता येत नाही बाबा काय काय नावं घेतील लोकं ते. =))
1 Apr 2015 - 7:05 pm | तिमा
उद्या 'वाटीत चमचा' असेही नांव घेतील.
1 Apr 2015 - 7:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
1 Apr 2015 - 8:23 pm | टवाळ कार्टा
अग्गाग्गा