पंचांग कोनते घ्यावे?

अव्यक्त's picture
अव्यक्त in काथ्याकूट
20 Mar 2015 - 1:39 am
गाभा: 

नववर्ष सुरू होताय. या वर्षीपासून प्रत्येकाने आवर्जून पंचांग घरात ठेवा. पंचांग हा अत्यंत उपयुक्त माहितीचा खजिना आहे. तुम्ही ज्या गावात राहता, त्याच्या किंवा त्याजवळच्या गावाच्या अक्षांश रेखांशांवर आधारित पंचांग घ्या.
कुठल्या नक्षत्रांवर आपण आपली कामं करायची आणि कुठल्यावर कशापासून दूर रहायचं?
...जरा तुम्हीच सांगा ना कुठली नक्षत्रं चांगली आणि कुठली वाईट ते. हे पंचांगात कुठे सापडेल? >>>>>> कुठल्या नक्षत्रांवर आपण आपली कामं करायची आणि कुठल्यावर कशापासून दूर रहायचं, एवढं कळलं तरी जन्माचं कल्याण होईल.मी स्वतः शिवलीखित वेळेच्या कोष्टकाचा वापर करतो जेव्हा केव्हा काही महत्वपूर्ण काम असतात तेव्हा.
त्या पंचांगामध्ये प्राचीन भारतीयांना अजिबात माहीत नसलेल्या युरेनस, नेपच्यून आणि प्ल्यूटो या ग्रहांची फळेफुले मांडलेली बघून फार मौज वाटते. आणि राहूकेतूंसारख्या निव्वळ छेदनबिंदूंच्या दशादिशा पाहूनही. त्यातपुन्हा यांचा वसंतसंपातबिंदू गेली हजारो वर्षे चुकतोय म्हणे. मग पुन्हा टिळक विरूद्ध दाते. बाकी ढवळे, रूईकर, निर्णयसागर, जन्मभूमी, कालनिर्णय वगैरे इतर अनेक खेळाडू आहेतच.

प्रतिक्रिया

लेख अजून थोडा वाढवा आणि अमुक एक पंचांग तुम्ही अथवा इतर का वापरतात ते सांगाल का ?
आता पंचांगात वाद का आहेत त्याची उत्तरे पंचांगकर्त्यांना माहीत आहेत आणि आता ते वाद बाजूला ठेवून ते नवीन वर्षाचे पंचांग काढताना अगोदर पंचायत बसवून तिथीचा निर्णय घेतात त्यामुळे काही सण वेगवेगळ्या पंचांगात वेगळ्या दिवशी दिसत नाहीत.
आणखी बरेच मुद्दे आहेत परंतू सर्वांनाच त्याचा उपयोग नाही.

पृथ्वी भोवती इतर तारे आणि ग्रहमाला फिरते या चुकीच्या परंतू व्यवहार्य आणि प्रत्यक्ष दृग्गोचर स्थितीला धरून दाखवलेली गणितेच अचूक वाटतात हेच शेवटी खरे ठरते.

कपिलमुनी's picture

20 Mar 2015 - 7:29 am | कपिलमुनी

१. सर्वात स्वस्त असेल ते घ्यावे
२. पाडव्यानंतर ८ - १० दिवसांनी घ्या . ५ रू. स्वस्त मिळते

सांगलीचा भडंग's picture

21 Mar 2015 - 3:24 pm | सांगलीचा भडंग

+१.....कुठलेही घ्यावे कारण बर्याच घरात ते पाडव्याला पूजा करून कुठे तरी ठेवून दिले जाते . हल्ली कालनिर्णय सारख्या केलेंडर मध्ये सगळी लागणारी माहिती असते ( पोर्णिमा , अमावस्या , चंद्रोदय , थोडे फार मुहूर्त , शुभ दिवस अशुभ दिवस टाइप, जयंत्या , यात्रा ) . आणि या तसेही य गोष्टी वापरणारे /विश्वास असणारे लोक हल्ली कमीच होत आहेत

यसवायजी's picture

20 Mar 2015 - 8:29 am | यसवायजी

दरवर्षी नातेवाइकाना लाटकर पंचांग (कोल्हापुर) घरपोच मिळाल्याने आतापर्यंत तेच वापरलय.

समजा एखादा मिपाकर भारताबाहेर राहत असेल तर कोणतं पंचांग घ्यावं? जगातल्या प्रत्येक टाइम झोनची पंचांगं असतात का?

श्रीरंग_जोशी's picture

20 Mar 2015 - 9:01 am | श्रीरंग_जोशी

आमच्या इथले स्थानिक हिंदू मंदिर इथल्या स्थानानुसार सणांच्या तिथी ठरवते. बरेचदा गणेशोत्सवाच्या वेळी आमचे व त्यांचे मतभेद स्थापनेच्या दिवसावरून होतात. आम्ही कालनिर्णयचा मध्ये बघून जो दिवस सुचवतो त्याच्या पुढचा दिवस ते सुचवतात.

याविषयी एक दुवा: Why there is a one day difference in hindu festival dates in India and America?

कंजूस,कपिलमुनी,यसवायजी,आदूबाळ,श्रीरंग_जोशी … आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद… @कंजूस : खरे पाहता पंचांग जगातल्या प्रत्येक ज्या गावात राहतो, त्याच्या किंवा त्याजवळच्या गावाच्या अक्षांश रेखांशांवर आधारित असते. आणि मी फक्त pocket पंचांग वापरत होतो कालनिर्णयचे…. पण मला अश्याच एका मराठी group मध्ये समजले की गुढीपाडवा, हिंदू नववर्ष … ह्या शुभ समयी नवीन पंचांग घेवून त्याची पूजा करायची असते … परंतु मी राहणाऱ्या शहरासाठी (ठाणे) कोणते पंचांग तंतोतंत उपयोगी ठरू शकेल? ह्याबाबतीत मी अनभिज्ञ आहे… कोणी जाणकार खुलासा करू शकेल काय… उदा. नागपूर करता राजन्देकरांचे पंचांग, पुण्यात टिळक पंचांग … इ. तसेच पंचांग कसे पहावे हे सुद्धा मला माहित नाही… तर ह्याची माहिती करून घ्यावयाची आहे…जेणेकरुन आपल्या हिंदू परंपरेचे जतन होईल… जाणकार माझी शंका निरसन करतील काय ?

खरंच गाभिर्याने जाणून घ्यायचे असेल आणि श्रद्धापूर्वक माहिती हवी असेल तर ती आहेच परंतू फाटेच फोडायचे असतील तर या सर्वाँपेक्षा १जाने ,३१ डिसेंबर आहेच.
असो.

॥श्री॥

१)कपिलमुनिवर्य, जो भाविकपणे एखादे धार्मिक आचरण करू इच्छितो तो पाचेक रुपयांचा विचार करणार नाही आणि तो पाडव्याच्या दोन दिवस अगोदरच पंचांग खरेदी करेल.

२)ठाणे मुंबई ते नागपूरपर्यँत सर्वच गावांचे सुर्योदय {आणि सूर्यास्त} सर्वच पंचांगांत दिलेले असतात. दाते बृहत् पंचांगात स्पष्ट (अचूक अंशांत)ग्रह असतात शेवटच्या पानांवर बरीच उपयुक्त माहिती असते.

३)तिथीनिर्णय कसा करतात याचे थोडे विस्तृत उत्तर आहे ते नंतर टंकतो तोपर्यँत-
महाराष्ट्रातल्या सर्वच निरयन (लोकप्रिय)पंचांगांचा (टिळक आणि इतर "सायन पंचांग" सोडून) तिथीनिर्णय एकच असतो.
४)
-परदेशातला तिथीनिर्णय ,
-सणवारास कोणती इंग्रजी तारीख घ्यावी,
-सायन/निरयन/सायन+निरयन पंचांग याचीही मोठी उत्तरे आहेत.
"निर्णयसिंधु" नावाचा ग्रंथ आधारभूत मानतात तरीही काहींचे निर्णय तात्पुरते करावे लागतात.

मला तुमच्या सारख्या जाणकार सद्गृह्स्थाने (पेशाने ज्योतिषी ) मुंबईसाठी कालनिर्णय आणि ढवळे पंचांग सुचवले होते … चालतील का…पण माझ्या सौ. नी निर्णयसागर आणले आहे… काय करता येईल?…आणि हो आणल्या नंतर ते कसे पाह्यचे कसा अभ्यास करायचा चांगली वेळ कोणती अशुभ वेळ कोणती ते कसे पाहावे जर सविस्तर माहिती वानगीदाखल दयावी हि नम्र विनंती… माफ करा पण मी असे वाचले होते पेशवे आपली सगळी कामे पंचांगानुसार करत होते… शुभा-शुभ बघणारी पेशवाई बुडली, लयास गेली पण कोणताही विधिनिषेध न बाळगणारे साहेबाचे (इंग्रज ) राज्य उदयास आले ह्या वर कोणी प्रकाश टाकेल काय … माफी असावी विषयांतर झाले… पण ह्या निमिताने ज्ञान वाढेल हिच अपेक्षा… मूळ मुद्दा महत्वाचा आहेच पंचांगाचा…. माहिती मिळावी ही माफक अपेक्षा… लोभ असावा…

कपिलमुनी's picture

20 Mar 2015 - 2:03 pm | कपिलमुनी

भाविकपणे एखादे धार्मिक आचरण करू इच्छितो

आताच तुम्हला भाविक म्हणले होते की हो !

लगेच तुम्ही गुगली टाकलीत

पेशवे आपली सगळी कामे पंचांगानुसार करत होते… शुभा-शुभ बघणारी पेशवाई बुडली, लयास गेली पण कोणताही विधिनिषेध न बाळगणारे साहेबाचे (इंग्रज ) राज्य उदयास आले

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Mar 2015 - 1:20 pm | अनिरुद्ध.वैद्य

शुभाशुभ पाहून चांगल्या मुहूर्तावर चुकीचे निर्णय घेतले तर दोष यजमानाचा कि मुहूर्ताचा?

आदूबाळ's picture

23 Mar 2015 - 3:40 pm | आदूबाळ

असं कसं असं कसं? चांगल्या मुहूर्तावर चुकीचे निर्णय घ्यायची बुद्धीच झाली नाही पाहिजे. नाहीतर उपयोग काय चांगल्या मुहूर्ताचा?

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Mar 2015 - 6:37 pm | अनिरुद्ध.वैद्य

मुहूर्त चांगलाच अस्तु … पण लोकास कसा वापरून घ्यावा त्ये नाई कळल त बिचार्या मुहुर्तास का जबाबदार धरता :D
बाकी मुहूर्त विचारणार्याच्या बुद्धीस त्यांनीच सांभाळावे! मुहूर्त सांगणार्यांनी नाई ;)

शुभा-शुभ बघणारी पेशवाई बुडली, लयास गेली पण कोणताही विधिनिषेध न बाळगणारे साहेबाचे (इंग्रज ) राज्य उदयास आले

हेच म्हणतो!

पंचांग सोडा आणि मस्तपैकी (किंगफिशरचे) क्यालेंडर घ्या!

एकात नक्षत्रे मिळतील तर दुसर्‍यात 'नक्षत्रासारख्या' मिळतील!

चॉईस इज युअर्स! ;)

आदूबाळ's picture

20 Mar 2015 - 6:19 pm | आदूबाळ

पण कोणताही विधिनिषेध न बाळगणारे साहेबाचे (इंग्रज ) राज्य उदयास आले

सर्वपित्री अमावस्येला विलायतेच्या बोटीवर पाय ठेवणारा बेनसन जॉनसन कंपनीचा फादरवेट साहेब आठवला!

बॅटमॅन's picture

20 Mar 2015 - 6:25 pm | बॅटमॅन

हाहा, अगदी अगदी!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2015 - 7:40 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११. :D

वाजवलीत ना तिसरी घंटा आता कोण आवरणार वारू अन मल्ल्याची वारुणी ?

आमच्याकडे वर्षानुवर्षे दाते पंचांग वापरत आलेत म्हणून आम्हीही आणतो असे म्हणणे चुकीचे ठरेल. आमचे आईवडील दाते पंचांग येनकेनप्रकारेण आमच्यापर्यंत पोहोचेल हे कटाक्षाने बघतात. ;)

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2015 - 10:17 am | प्रकाश घाटपांडे

पंचांग एक अवलोकन
मधे काही माहिती मिळेल. कोणते घ्यावे हे घरातील चालीरितीनुसार ठरवतात.

अव्यक्त's picture

21 Mar 2015 - 12:31 pm | अव्यक्त

अहो, आपला पंचांगाचा मूळ मुद्दा बाजूला राहिला… मी प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे… थोड्या वेळाने… कोणते पंचांग घ्यावे हा प्रश्न उनुत्तरीतच राहिला…उत्तर अपेक्षित…

मध्येच तुम्ही स्वत:च "कधीही पंचांग न पाहणारे इंग्रज पुढे कसे गेले आणि पंचांग पाहणारे कसे अयशस्वी झाले" हा मुद्दा आणून धाग्याचा गुंता केलात आणि अश्रद्धपणा दाखवलात. -काथ्याकूट.

विवेकपटाईत's picture

22 Mar 2015 - 1:34 pm | विवेकपटाईत

आम्ही तर कालनिर्णय घेतो. दिल्लीत ही मराठीतला कालनिर्णय स्थानिक दुकानात ही मिळतो. सूर्योदय सूर्यास्त, चतुर्थी, सण-वार सर्व कालनिर्णयात सापडते. जोतिषीला सोडून कुणाला ही पंचांगाची गरज नाही. मी तर उभ्या आयुष्यात जोतिष माणसाला हात दाखविला नाही आहे. अर्थातच या वर कधीच विश्वास न्हवता. कारण भविष्य कुणीच सांगू शकत नाही.

>>ज्योतिषीला सोडून कोणालाही पंचांगाची गरज नाही<<=+१०
मिथुन रास अथवा कन्या लग्न कुंडलीवाल्यांना उगाचच हेच्यात काय अन तेच्यात काय करायची सवय असते श्रद्धा कशावरच नसते.

अव्यक्त's picture

23 Mar 2015 - 12:29 pm | अव्यक्त

आताच तुम्हला भाविक म्हणले होते की हो !

लगेच तुम्ही गुगली टाकलीत..

@ कपिलमुनी : ...साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय… सश्रद्ध की भाविक हा मुद्दा इथे गौण ठरतो… मी फक्त आपली ह्या धाग्याच्या अनुषंगाने माझी बऱ्याच दिवसांची शंका विचारली… मि. पा. हे एक मुक्त व्यासपीठ आहे शंका विचारायचे आणि त्या शंकेचे निरसन करून घ्यायची … इथे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे… … माफ करा पण मी असे वाचले होते पेशवे आपली सगळी कामे पंचांगानुसार करत होते… शुभा-शुभ बघणारी पेशवाई बुडली, लयास गेली पण कोणताही विधिनिषेध न बाळगणारे साहेबाचे (इंग्रज ) राज्य उदयास आले ह्या वर कोणी प्रकाश टाकेल काय … माफी असावी विषयांतर झाले… पण ह्या निमिताने ज्ञान वाढेल हिच अपेक्षा… हे वरील विधान मी माझ्या पोस्ट मध्ये नमुद केले होते…हे आपण विसरता आहात महोदय ! दिलगीर आहे.

अव्यक्त's picture

23 Mar 2015 - 12:40 pm | अव्यक्त

हेच म्हणतो!

पंचांग सोडा आणि मस्तपैकी (किंगफिशरचे) क्यालेंडर घ्या!

एकात नक्षत्रे मिळतील तर दुसर्‍यात 'नक्षत्रासारख्या' मिळतील!

चॉईस इज युअर्स!

… तुमच्यासारख्यामुळे ते मल्या गर्भश्रीमंत झालेत. आणि नंतर आपली संस्कृती नष्ट होत चालली आहे म्हणून गळे काढायचे … तूर्तास आपण ग्रह नक्षत्राविषयी बोलत आहोत… आणि दुसऱ्या नक्षत्राविषयी विचार करण्या इतपत बुद्धी भ्रष्ट झाली नाही अद्याप … आपण घरी कालनिर्णयऎवजी तसली कॅलेडर वापरता वाटते … आपल्या अमुल्य सल्ल्याबद्दल धन्यवाद… हलकेच घ्या.

अव्यक्त's picture

23 Mar 2015 - 12:53 pm | अव्यक्त

वाजवलीत ना तिसरी घंटा आता कोण आवरणार वारू अन मल्ल्याची वारुणी ?
मध्येच तुम्ही स्वत:च "कधीही पंचांग न पाहणारे इंग्रज पुढे कसे गेले आणि पंचांग पाहणारे कसे अयशस्वी झाले" हा मुद्दा आणून धाग्याचा गुंता केलात आणि अश्रद्धपणा दाखवलात. -काथ्याकूट.

@कंजुस महाराज, आपला काहीतरी गैरसमज होतो आहे… ह्या धाग्याच्या अनुषंगाने माझा ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न होता… इथे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे…… माफी असावी विषयांतर झाले… पण ह्या निमिताने ज्ञान वाढेल हिच अपेक्षा… हे वरील विधान मी माझ्या पोस्ट मध्ये नमुद केले होते…हे आपण विसरता आहात महोदय ! दिलगीर आहे. अजूनही मी पंचांग व ते कसे अभ्यासावे ह्याविषयी पूर्वी इतकाच उत्सुक आहे… मि. पा. हे एक मुक्त व्यासपीठ आहे शंका विचारायचे आणि त्या शंकेचे निरसन करून घ्यायची …ह्या व्यासपीठावर आपल्या सारखे बरेच विद्वान आहेत ज्यांच्याकडून माझ्या सारख्या अज्ञाला बरेच ज्ञान ग्रहण करता येवू शकेल… आपल्या मार्गदर्शनाची अपेक्षा… अजूनही पूर्वी इतकाच डोळस भाविक आणि सश्रद्ध…धन्यवाद.

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2015 - 12:56 pm | टवाळ कार्टा

१०० करून हवेत का बोला ;)

असंका's picture

23 Mar 2015 - 2:35 pm | असंका

अवांतरः अरे वा!! पाच दिवस झाले?

(अवांतराबद्दल क्षमस्व...)

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2015 - 2:55 pm | टवाळ कार्टा

५ दिवस???

अहो मौनात होतात ना गेले काही दिवस? ते म्हणालो... (उगाच का?)

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2015 - 3:30 pm | टवाळ कार्टा

तुमी खफ नै वाचत कै?

सूड's picture

23 Mar 2015 - 8:12 pm | सूड

__/\__

टवाळ कार्टा's picture

24 Mar 2015 - 11:34 am | टवाळ कार्टा

हायला सूडचा प्रतिसाद बघितल्यावर त्या ५ दिवसांचे लॉजिक समजले

अव्यक्त's picture

23 Mar 2015 - 1:27 pm | अव्यक्त

@ टवाळ कार्टा : महोदय, आपणास काय म्हणायचे आहे समजलो नाही…खुलासा अपेक्षित…

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2015 - 1:28 pm | टवाळ कार्टा

खिक्क =))

कपिलमुनी's picture

23 Mar 2015 - 2:25 pm | कपिलमुनी

त्यास्नी उघडून दाखव रे

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2015 - 2:34 pm | टवाळ कार्टा

अश्लिल अश्लिल

ज्ञान मिळवण्याच्या (=पंचांग कोणते घ्यावे) तुमच्या गाडीला तुम्ही "पेशवाई अथवा इतर मुहूर्त पाहणारे अयशस्वी विरुद्ध न पाहणारे यशस्वी "असे डायवर्शन करून एक्सप्रेस वे सोडून सर्विस रोडच्या फुटपाथवर चढवलेत.कशाला एवढी घाई टोल चुकवायची?

दुसरीकडे एक प्रामाणिक मिपाकर सिंदबाद बनून "नाडीग्रंथाच्या शोधात"नेपाळ ते अयोध्या प्रवासास निघाला आहे.++

धमाल मुलगा's picture

23 Mar 2015 - 6:58 pm | धमाल मुलगा

एखाद्यानं टिळकांच्या गणितज्ज्ञ असण्यावर आणि त्यांच्या अभ्यासावर विश्वास ठेऊन टि़ळक पंचांग वापरायला सुरु केलं (हल्ली मिळत नाही, ठाऊक आहे.), तर घोळच व्हायचे. लोकांच्या पितृपक्षात टिळकपंचांगवाले फटाके उडवून दिवाळी साजरी करणार!

तस्मात, कोणतं पंचांग हा प्रश्न पडण्यापुर्वी निदान मलातरी कोणत्या पध्दतीनं मांडलेलं पंचांग वापरावं हा प्रश्न आधी पडतो, ब्र्यांड वगैरे नंतर पाहूच.

टिळक पंचांगवाले वेगळे पडतात हे बघितले आहे. नवर्‍याच्या मामेबहिणीला दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात तर यांची दिवाळी, दसरा कधीच होऊन गेलेला असतात. शिवाय त्यांना सुट्ट्या मिळतातच असे नाही. मग नेहमीच्या दिवाळीत ते हमखास कुठेतरी फिरायला जातात.

कपिलमुनी's picture

23 Mar 2015 - 7:07 pm | कपिलमुनी

आयडीया आवडली आहे .
आता टिळक पंचागच विकत घेतो

हो हो. घ्या. तुम्हाला सगळ्या सणांच्या (पुढील वर्षीच्या) आत्ताच शुभेच्छा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Mar 2015 - 11:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

गेल्या वर्षीचं इकायचं हाय...घेताय काय निम्म्या किंमतीत. एकदाबी वापरलेलं न्हाई...!!

टवाळ कार्टा's picture

24 Mar 2015 - 11:48 am | टवाळ कार्टा

=))
मल्ल्याचे हाय काय? ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Mar 2015 - 11:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मल्ल्याचं विकीन का मी? आणि ते पण निम्म्या किंमतीमधे.. =))

अव्यक्त's picture

24 Mar 2015 - 3:12 pm | अव्यक्त

कंजूस महोदय, प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करून देखील आपले समाधान होत नाही का ? आता तरी मूळ मुद्द्याला हात घालाल का ? कारण ह्या धाग्याचा मूळ हेतू बाजूला ठेवण्याचे काही टवाळ खोर जाणीवपूर्वक प्रयज्ञ करत आहे… तरी आपण मूळ मुद्दा (पंचांग ) गांभीर्याने लावून धरावा ही हात जोडून नम्र विनंती…

कपिलमुनी's picture

24 Mar 2015 - 3:51 pm | कपिलमुनी

तुम्हीच उलटे सुलटे प्रतिसाद देत मूळ मुद्दा बाजूला टाकलात

टवाळ कार्टा's picture

24 Mar 2015 - 4:04 pm | टवाळ कार्टा

तर कै...आणि नाव मात्र :(

जेपी's picture

24 Mar 2015 - 4:11 pm | जेपी

हाफशेंच्युरी निमीत्त श्री .अव्यक्त आणी श्री. टका यांचा सत्कार एक एक दाते* पंचाग देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते

*अटी लागु

टवाळ कार्टा's picture

24 Mar 2015 - 4:17 pm | टवाळ कार्टा

माझा का?

जेपी's picture

24 Mar 2015 - 4:25 pm | जेपी

दुसर कोण सापडल नाय .. *wink*

कपिलमुनी's picture

24 Mar 2015 - 6:38 pm | कपिलमुनी

satkar

कंजूस's picture

27 Mar 2015 - 5:44 am | कंजूस

होय, पण फेटा बांधणार कोण?

तसं नाही हो अगदी माहितीचा रतिब बदाबदा ओतायचा नाही हे मी इथेच शिकलो. वर्गात शिक्षक जीव तोडून मोरोपंतांची(/वामन पंडीत?) केकावली शिकवत असले तरी खिडकीतून बाहेर काही गम्मत दिसली की (उदाहरणर्थ धूराची रेषा काढत जाणारे जेट विमान हो )थोडं थांबावं लागतं.

बरोबरे. केकावली मोरोपंतांचीच. वामनपंडितांची नव्हे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2015 - 10:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोराच्या ओरडण्याला केका म्हणतात. त्यावरून केकावली (केकाची रांग = बराच वेळ ऐकू येणारे मोराचे ओरडणे) हा शब्द बनला आहे. हा मोरोपंत (खरे नाव : मोरेश्वर रामचंद्र पराडकर) यांचे नाव आणि केकावलीचा (त्यांच्या काव्याच्या नावाचा) संबध आहे.

वर्गात लक्ष नसलं की असं होतं.

मनीषा's picture

25 Mar 2015 - 7:51 am | मनीषा

न कर्त्याचा वार शनिवार

ही म्हण आठवली .

आणि

शुभस्यं शिघ्रम्...

हे सुद्धा आठवले.

कंजूस's picture

25 Mar 2015 - 10:05 am | कंजूस

शनिवारची वाट पाहू नको?

पंचांग माहितीचा आवाका फारच व्यापक आहे. थोडेफार संक्षिप्त क्रमवार टिपण करण्याचा प्रयत्न करत आहे. वाचकांनी भर घालावी.
"टिळकांचे ओरायन संशोधन, सायन आणि निरयन पंचांग. पोर्णिमान्त आणि अमान्त चांद्रमास गणना, सणवार तिथी निर्णय, मुहूर्त आणि योग विचार हे मुद्दे बाकी आहेत.

१)पंचांगे कालगणनेसाठी आहेत. आकाशातील दोन महत्त्वाचे प्रकाशमान गोलक सूर्य आणि चंद्र आपल्या पृथ्वीवरती काही लक्षात येणारे बदल घडवून आणतात त्यांचा उपयोग करून घेतला आहे. त्यातही काही आवर्तने दिसतात उदाहरणार्थ सूर्याचे उगवणे मावळणे, चंद्राचे लहान मोठे होत जाणे.ही आवर्तने मोजून लिहून ठेवता आली आणि त्यांची गती समजून घेऊन पुढील घटना मांडता आल्या तर चांगली कालगणना निर्माण होते. कोणतेही मोजमाप करायचे तर तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे सुरुवात आणि दुसरे संदर्भ. रात्री आकाशात असंख्य छोटे प्रकाशित गोलक अथवा तारे दिसतात ते एकमेकांपासून स्थिर अंतरावर असल्याप्रमाणे एका पडद्याप्रमाणे वाटतात या संदर्भाचा उपयोग करण्यात आला. सूर्य -पृथ्वी यांच्या निरनिराळ्या गतींमुळे आणखी दृष्यमान बदल म्हणजे ठराविक कालानंतर ऋतू होतात. चंद्रामुळे समुद्राची भरती ओहोटी होते.सूर्याच्या गतीला महत्त्व देऊन केलीली कालगणना सौर पंचांग(कलिंडर) आणि चंद्राची आपली चांद्रमास पंचांग होय.

२)कालगणना सुरुवात आणि संदर्भ-
जगात दोन्ही पदध्तीच्या कालगणना विकसित झाल्या आणि ठराविक भौगोलिक भागातील समुदाय त्यांचा उपयोग करू लागले. मोठे राजे आपल्या शासनकालात एखादी कालगणना सुरू करू लागले आणि त्याकाळापासून आतापर्यँत किती आवर्तने वगैरे झाली याची नोंद त्या राजाच्या नावाने ओळखली जाऊ लागली -ज्युलिअन, विक्रम, शके वगैरे. कोणता संदर्भ आधारभूत धरला यावरही निरनिराळी पंचांगे निर्माण झाली. काही काळानंतर निव्वळ एका गोलकाधारित गणना काही घटना वर्तवण्यात अपुऱ्या पडतात असे लक्षात आले. उदाहरणार्थ चाद्रपंचांग ऋतुचक्राचे निर्णय अचूक देऊ शकत नाही. सौरपंचांग चंद्राची कला आणि भरती ओहोटी वर्तवण्यास अपुरे ठरते.सौर गतीची नोंद चांद्रमास पंचांगात आणण्याचे प्रयत्न झाले. ऋतुचक्र हळूहळू लवकर होत आहे याचाही अंतर्भाव करण्यात आला.संदर्भ आणि सुरुवात यांच्या वैविध्यतेमुळे बरीच पंचांगे अस्तित्वात आहेत.भारतीय सौर पंचांगात सौर कालगणनेतून चांद्रमासांचे मापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

अव्यक्त's picture

26 Mar 2015 - 2:42 pm | अव्यक्त

.अतिशय अभ्यासपूर्वक लेख आपण आपल्या ओघवत्या शैलीत प्रसूत करत आहात… एखाद्या काळ्या - कभिन्न कातळातून एक अतिशय नयनरम्य,मुग्ध करणार शिल्प उभं रहावं तद्वत अनुभूती कंजूस महाराज आपण आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवलात… आणि हा धागा पंचांग आणि त्यासंदर्भातील शंकाविषयी एक उत्तम अभायासाण्याजोगा व्हावा तद्वत आपल्या हिंदू संस्कृतीच्या परंपरा जपण्यास आणि जतन करण्यास उपकारक ठरोत… ह्यासाठी अभूतपुर्वक शुभेच्छा…. आता हा धागा सुफळ आणि समृद्ध करण्याची जबाबदारी तुमच्या शिरावर महोदय … आजपासून आपले शिष्यत्व पत्करत आहे… आजपासून फक्त आणि फक्त श्रवणभक्ती… अभिष्टचिंतन !