सोमनाथपुरा हे म्हैसूर जिल्हतील एक छोटेसे गाव. बेंगलोरपासून १४० किमी अंतरावर. इथे चन्ना केशवा हे होयासाला काळातील भव्य मंदीर आहे. होयसाळांचा सेनापती सोमनाथ ह्याने हे मंदिर १२६८ साली बांधले. हे मंदीर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असून इथे जनार्दन, केशव आणि वेणुगोपाल ह्या तीन मुख्य देवता आहेत. त्यातील केशावाची मूर्ती गायब आहे.
कुणी सुलतानाने ह्या मंदिरातील मूर्त्यांची नासधूस करून मंदिराचा विटाळ केला. तेंव्हापासून ह्या मंदिरात पूजा केली जात नाहि.
मुख्य द्वारातून प्रवेश करताच दिसणारे मंदिर
मंदिराच्या भिंती विविध देवतांच्या मूर्त्यांनी सजल्या आहेत.
ह्या मंदिरातील सर्वात जास्त आवडलेली मूर्ती ही महिशासुरमर्दिनिची. आक्रमकता आणि नाजुकतेचा छान संगम
ही कल्पतेचा उच्चांक गाठणारी नृसिंह लक्ष्मीची मूर्ती . लक्ष्मीने कमळावर पाय ठेवला आहे. आणि त्या दबलेल्या कमळाला हत्ती आधार देतोय.
मंदिरचा द्वारपाल
ह्या मंदिराच्या एका कोपऱ्यात काही मोडक्या मूर्ती आहेत. ह्या बहुदा इतर मोडलेल्या मंदिरातील मुख्य देवता असाव्यात
ह्यात दोन जैन मुर्त्यासुद्धा आहेत
सोमानाथापुराचे हे मंदिर कलेचा एक खजाना आहे इथे लहान मोठ्या हजारो मूर्त्या कोरल्या आहेत. सोमनाथपुरा आणि तळकडु एक दिवसात पाहता येतात. सोमनाथपुरामध्ये जेवणाची कोणतीही सोय उपलब्ध नाहि. बेंगलोर म्हैसोर हायवेवर नाष्टा करून सोमणाथपुराला भेट द्या आणि जेवण्यासाठी तळकडुला जा. तळकडुचे फोटो लवकरच टाकेन.
प्रतिक्रिया
22 Mar 2015 - 10:45 am | पॉइंट ब्लँक
जैन मूर्तींमधील पहिला फोटो चुकिचा घातला गेला आहे. दुरुस्ती केलेली प्रतिमा
22 Mar 2015 - 11:07 am | मंदार कात्रे
उत्तम फोटो आणि वर्णन. धन्यवाद
22 Mar 2015 - 8:28 pm | श्रीरंग_जोशी
अप्रतिम आहेत फोटोज. पाहतच राहावेसे वाटते.
23 Mar 2015 - 4:38 pm | पॉइंट ब्लँक
तिथे मंदिरात काही अशीच परिस्थिती होते. बाहेर पडाव अस वाटत नाही :)
22 Mar 2015 - 10:59 pm | विनोद१८
.....आजही जिवंत वाटणारी ही शिल्पे पाहुन आपल्या पुर्वजांनी ही कला विकसीत करुन तिला इतक्या उंचीवर नेउन ठेवले याचा अभिमान वाटतो पण त्यांना असे विद्रुप करुन समाधान मिळविणारी 'सुलतानी वॄत्ती' किती 'विकॄत व सुंदरतेची मारेकरी' होती व आहे याचाच पुरावा मिळतो.
छान प्रकाशचित्रे व माहीती, धन्यवाद श्री.पॉइंट ब्लँक
23 Mar 2015 - 4:39 pm | पॉइंट ब्लँक
खर आहे. नासधूस पाहून दुख्ख होते.
22 Mar 2015 - 11:02 pm | एस
वाह! वल्ली या मूर्त्यांवर अजून प्रकाश टाकतीलच अशी अपेक्षा. तोपर्यंत तुम्ही जरा विनेटिंगचा परिणाम कमी करा. :-) (फोकसिंग, कॉम्पोजिशन इत्यादी बाबी खूप छान आहेत.)
23 Mar 2015 - 4:34 pm | पॉइंट ब्लँक
ह्म्म. प्रयत्न करतो. मूर्तीच्या आजू बाजूला असणारे डिस्ट्रॅक्शन झाकायला म्हणून विनेटिंगचा उपयोग सुरु केला होता. पण जरा दुरूपयोग होतोय असं दिसतय. प्रामाणिक मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. :)
23 Mar 2015 - 5:02 pm | कहर
विनेटींग कसे करतात . कॅमेरा मध्ये ऑप्शन आहे कि पोस्ट एडिटिंग
23 Mar 2015 - 5:06 pm | पॉइंट ब्लँक
पोस्ट प्रोसेसिंग मध्ये. पिकासामध्ये स्पेशल सोय आहे.
23 Mar 2015 - 5:27 am | स्पंदना
किती रेखिव आहेत मुर्त्या! अतिशय आवडल्या.
23 Mar 2015 - 5:30 am | मधुरा देशपांडे
सुंदर फोटो.
23 Mar 2015 - 8:24 am | मितान
सुंदर फोटो !
बेलुर-हळेबिडु च्या मंदिरांची आठवण झाली !
23 Mar 2015 - 11:36 am | सर्जेराव संपतरा...
सुंदर छायाचित्रे आणि उपयुक्त माहिती. तळकडुच्या प्रतीक्षेत!
तुमच्या कुरुडुमळे आणि नुग्गेहळ्ळी वरच्या लेखांचे दुवे देऊन मालिका बनवा एक यावर.
23 Mar 2015 - 4:39 pm | पॉइंट ब्लँक
चांगला सल्ला दिलात.
23 Mar 2015 - 12:49 pm | प्रचेतस
माझा गणेशा झालाय.
23 Mar 2015 - 4:51 pm | पॉइंट ब्लँक
समजलं नाही :(
23 Mar 2015 - 4:55 pm | कपिलमुनी
फोटू दिसत नाहीत
23 Mar 2015 - 1:03 pm | अत्रुप्त आत्मा
फोटो छान आलेत. पहिले मंदिराचे फोटो बघताना...पौराणिक चित्रपटाच्या फ्रेममधे-गेल्याचा भास झाला.
23 Mar 2015 - 4:50 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद.
23 Mar 2015 - 2:33 pm | कपिलमुनी
ठिकाणाची अजून माहिती हवी होती.
बाकी पोस्ट प्रोसेसिंग्मधे रामू एफेक्ट जाणवतो आहे
23 Mar 2015 - 4:49 pm | पॉइंट ब्लँक
अधिक माहिती इथे मिळेल.
http://www.karnataka.com/somnathpur/keshava-temple/
http://en.wikipedia.org/wiki/Chennakesava_Temple,_Somanathapura
"रामू एफेक्ट" म्हणजे काय?
23 Mar 2015 - 4:57 pm | कपिलमुनी
दुव्याबद्दल धन्यवाद !
रामू म्हणजे रामगोपाल वर्मा !
त्याच्या चित्रपटामध्ये गडद शेड्स वापरल्या जातात म्हणून रामू इफेक्ट
23 Mar 2015 - 4:58 pm | पॉइंट ब्लँक
हम्म. आता समजलं :)
23 Mar 2015 - 3:07 pm | गिरकी
ही जागा प्रत्यक्ष पाहिली आहे. सुंदरच आहे. पण तुम्ही काढलेल्या फोटोंना 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' असंच म्हणावं वाटतं. :)
23 Mar 2015 - 4:40 pm | पॉइंट ब्लँक
हा हा. वाचून मज्जा आली,
23 Mar 2015 - 3:24 pm | स्पा
फोटो सुंदर
फ्रेम्स, कंपोझिंग सुंदर
पोस्ट प्रोसेसिंग मुळे मजा जातेय पण , एकदम शार्प का केलेत फोटो , ते विनेतींग टाळता आले तर बघा
23 Mar 2015 - 4:36 pm | पॉइंट ब्लँक
पोस्टप्रोसेसिंग एकदा चालू केले की कुठे थांबायचे हे ठरवणे अवघड आहे. :-) अतिरेक होउ नये ह्याची काळजी घेईन ह्यापुढे. धन्यवाद.
23 Mar 2015 - 4:01 pm | पिलीयन रायडर
आत्ताच म्हैसुर ट्रिप केली तेव्हा ही जागा पहायचं फार मनात होतं पण शक्य झालं नाही. तुमच्यामुळे आज किमान इतके सुंदर फोटो तरी पहाता आले.
धन्यवाद!!
23 Mar 2015 - 4:42 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद. पण जर संधी मिळाली तर सोमनाथपुरा आणि तळकडुला अवश्य भेट द्या. फोटोमध्ये एक टक्काही टिपता आले नाही. प्रत्यक्ष पहाण्यात मिळणारा आनंद काही वेगळाच असतो.
24 Mar 2015 - 3:46 am | रुपी
मूर्ती आणि मंदिर दोन्हीही सुंदर आहेत!
24 Mar 2015 - 4:25 am | मुक्त विहारि
और आने दो...
24 Mar 2015 - 7:58 am | अर्धवटराव
जबरदस्त.
मुर्त्यांच्या आभूषणांचे डिटेल्स कसले आलेत.
कमाल शिल्पकला. सुंदर फोटो.
24 Mar 2015 - 7:03 pm | बॅटमॅन
खूप उच्च फोटो. यानिमित्ताने एक माहिती सांगायला हरकत नाही.
साधारणपणे असे मानले जाते की भारतीय परंपरेत शिल्पी इ. लोकांची नावे कोरून ठेवायची पद्धत नव्हती. पण चालुक्य आणि होयसळ राजवटींच्या काळात अनेक शिल्पींची कोरलेली नावे शिलालेखांतून मिळालेली आहेत. होयसळांपैकी बोलायचे तर मल्लितम्मा नामक त्यांचा शिल्पकार लै फेमस होता. चाळीसेक मूर्त्यांजवळ तरी त्याचे नाव कोरलेले सापडले आहे. काही दगडांच्या खाणींजवळही कामगारांची नावे कोरलेली सापडली आहेत.
आर्किटेक्टचे नाव कोरल्याचे महाराष्ट्रात किमान एक उदाहरण आहे- रायगडावर एका पायरीवर हिरोजी इंदुलकर यांचे नाव कोरलेले सापडते- "सेवेचे ठायी तत्पर, हिरोजी इंदुलकर".
24 Mar 2015 - 8:35 pm | पॉइंट ब्लँक
ही एकदम उपयुक्त माहीती दिलीत. होयसाळा मंदिरांसंदर्भात जकनाचारी हे नावसुद्धा बर्याचवेळा ऐ़कण्यात येते. त्यांच्या नावाने कर्नाटकात एक पुरस्कारही आहे.
त्यांचा जन्मगाव कैदाला आहे. तिथे एक केशवाचे मंदिर आहे. इतकी सुंदर केशवाची मूर्ती आजवर पहाण्यात आली नाही. लिहिनच त्या विषयी लवकरच.
24 Mar 2015 - 8:41 pm | बॅटमॅन
कैदाला गावच्या माहितीबद्दल धन्यवाद! बाकी जकणाचार्य यांचे नाव खिद्रापूरसंदर्भातही ऐकलेले आहे. पाहिले पाहिजे.
27 Mar 2015 - 10:54 am | झकासराव
सुरेख फोटो :)
20 Apr 2015 - 1:34 pm | सस्नेह
अतिशय रेखीव आणि नजाकतदार शिल्पे. डोळ्यांना मेजवानी.
20 Apr 2015 - 2:23 pm | गणेशा
अप्रतिम .. निशब्द
20 Apr 2015 - 2:38 pm | यशोधरा
देखणी शिल्पकला!
20 Apr 2015 - 4:39 pm | कविता१९७८
खुपच सुरेख शिल्पकला आणि छान माहीती