अहिराणी बोली भाषा ( आत्ताच्या आंदोलनाचा काहिही सबंध जोडू नये) हि मराठी (च) बोली भाषा आहे.

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
18 Nov 2008 - 5:08 pm
गाभा: 

येथे अहिराणी बोली भाषा कुणाला येते आहे? ( आत्ताच्या आंदोलनाचा काहिही सबंध जोडू नये)
हि मराठी (च) बोली भाषा आहे.

आठे अहिराणी कोन्ले यस ?
अहिराणी हाई भासा खानदेस मधार बोल्त्स. (जळगाव, धुय, नंदुर्बार आन नाशिक ना काही भाग)
कवयत्री बहिणाबाई, कवी महानोर आठलाच शेतस.
मना बाप नी सटाणा (बागलाण) ले बदली व्हती तव्हळ हाई भासा जराशीक शिकनू.
हाई भासा बू (लै) भारी शे.

प्रतिक्रिया

रम्या's picture

18 Nov 2008 - 5:45 pm | रम्या

मला येत न्हाई, ;)
भाषेसंबधातली तुमची अडचण थेट विचारलीत तर बरे होईल.

आम्ही येथे पडीक असतो!

टारझन's picture

18 Nov 2008 - 6:23 pm | टारझन

येथे अहिराणी बोली भाषा कुणाला येते आहे?

सहमत ! असेच म्हणतो

( लै भारी धागा आहे राव)

बिसोबा खेचर's picture

18 Nov 2008 - 7:07 pm | बिसोबा खेचर

पुलेशु राहिले बघ.

दिनेश५७'s picture

18 Nov 2008 - 9:48 pm | दिनेश५७

कवा होशीन मानूस...
एव्हढी एक ओळ येते.

टवाळचिखलू's picture

19 Nov 2008 - 9:54 am | टवाळचिखलू

आठे मी शे आहीराणी बोलणारा ...
थेट जयगावथुन
राम राम आबा.

आउटलूकचे सेण्ड/ रीसीव बटन जर मेकनिकल असते तर आतापर्यन्त तुटले असते

गनेश३१'s picture

5 Mar 2009 - 1:52 pm | गनेश३१

राम राम,
मि अमलळनेर तालुका ना सार्बेटे गाव ना शे . बर म भेटुत आखो.

अभिरत भिरभि-या's picture

19 Nov 2008 - 11:32 am | अभिरत भिरभि-या

चांगला विषय सुरु केल्याबद्दल अभिनंदन
काही प्रश्न
अहिराणी बोली भाषा ( आत्ताच्या आंदोलनाचा काहिही सबंध जोडू नये)

अहिराणी संबंधी कोणते आंदोलन चालु आहे का ?
असल्यस कृपया महिती द्यावी.

हि मराठी (च) बोली भाषा आहे.

भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून अहिराणी वेगळी भाषा आहे हे ही सिद्ध करता येईल.
जर कोकणीला वेगळी भाषा म्हणून केंद्र मान्यता मिळाली तर ते निकष अहिराणीला ही लागू पडतात.
किंबहुना याच निकषांवर भोजपुरीलाही हिंदीपासून वेगळा दर्जा मिळू शकतो.
पण अहिराणी / भोजपुरी या बोलीभाषा व कोकणी ही स्वतंत्र भाषा असे कसे ? लोकेच्छा !!

खानदेशी लोकांची "महाराष्ट्रीय" म्हणुन ओळखले जाण्यची व त्याच वेळेस गोवेकरांची वेगळी चूल मांडायची इच्छा.

असो वेगळ्या भाषेच्या दर्जाने अहिराणी समृद्ध होईल असे नाही. किंबहुना गोव्यात कोकणीने म्हणावी तितकी प्रगती केली असे मला वाटत नाही.
त्याच वेळी तथाकथित बोलीभाषा भोजपुरी नाटक / सिनेमा / साहित्य या अंगाने बहरते आहे.
अहिराणीचा ही असाच उत्कर्ष होवो ही सदिच्छा !

(मराठीच्या सर्व रुपांचा चाहता) अभिरत

पिवळा डांबिस's picture

19 Nov 2008 - 12:28 pm | पिवळा डांबिस

चांगला विषय सुरु केल्याबद्दल अभिनंदन
आमच्या तर्फेही मूळ लेखकाचे अभिनंदन!!

पण तुम्हाला मूळ विषयाचा विसर पडलेला दिसतोय....
विषय अहिराणीबद्दल आहे....
तुम्ही उगाच कोकणीला मध्ये कशाला खेचताय?
काय लिहायचं ते अहिराणीबद्दल लिहा ना!!!!
उगाच वड्याचं तेल वांग्यावर!!!!

कोकणी वा गोवेकरांवर उगीच टीका कशाला करताय?

अभिरत भिरभि-या's picture

19 Nov 2008 - 4:20 pm | अभिरत भिरभि-या

तुम्हाला मूळ विषयाचा विसर पडलेला दिसतोय....

पिडा काका; लेख आपण परत वाचला तर लेखकाने अहिराणी ही मराठीची बोलीभाषा आहे असे ठाम सांगितल्याचे आपणास दिसेल.

मला इतकी खात्री नसल्याने माझी मते/कारणे सांगितली. पुष्टिकरता कोकणीचे उदाहरण घेतले.
म्हणजे माझ्या इच्छेने मी संबंध नसलेला विषय घुसवला नाही हे स्पष्ट आहे.

गोवेकरांचे वेगळे व्हायची इच्छा होती व त्यांना त्यांच्या भाषेला वेगळा दर्जा हवा यात मला काही वाईट दिसत नाही.
प्रत्येक भाषिक / उपभाषिक गटास स्वतःला पटेल अशा कोणत्याही न्याय्य मार्गाने स्वभाषेचा उत्कर्ष करण्याचा नैसर्गिक आधिकार आहे. कितीही नाकारले तरी गोवेकरांनी वेगळा मार्ग स्वीकारला ही वस्तुस्थिती आहे.
भाषांचा प्रेमी म्हणून मी या निर्णयाचा आदर करतो.

पण मी कोठेही विषय भटकवण्यासाठी वा तुमच्या भाषेत वड्याचे तेल वांग्यावर काढण्यासाठी कोणतेही उदा. घेतलेले नाही.

माझा प्रथम पासून रोख अहिराणीवरच होता. ही बोली/भाषा आणखी समृद्ध व्हावी म्हणून वेगवेगळे मार्ग चोखाळता येतील.
यात इतर भाषक पूर्वसुरींचे उदा. स्वाभाविक आहे हे कोणालाही पटेल.
कोकणी व भोजपुरी भाषक जे काही करतात ते त्यांना पटलेला मार्ग आहे.
कोकणी व भोजपुरी ही मला माहिती असलेली दोन उदा. दिली.
यात हळवे होण्यासारखे वा भावना दुखावण्यासारखे काहीही नाही.

याही उप्पर आपण असहमत असाल तर या धाग्यावर ती चर्चा/वाद येथे होऊ नये असे वाटते. आपण खव/खफ वापरु.
कारण हा धागा अहिराणी विषयावर आहे.

राकेश वेंदे's picture

19 Nov 2008 - 11:45 am | राकेश वेंदे

भो रे, माले बी आयरानी बोलता येस.

एकदम गावनी गल्लिमा गप्पा मारी राहीनू अस वाटी राहिनं .

मि बेटावद गावतुन शे, जिल्हा धूये .

राम राम, परत भेट्सुत :)

तृप्ती's picture

19 Nov 2008 - 12:17 pm | तृप्ती

मी मुळची पुणेची ...पण सासर मात्र मालेगावचे .....तिकडची भाषा अहिराणी.....पाहयला आल्यवर , अहिराणी बोलता जरी नाही आले तरी निदान समजेल ना या
प्रश्नाचे ,बिनधास्त "हो" म्हणुन उत्तर देऊन टाकले.अजुन वर असेही म्हणाले ,बहिना बाई च्या कविता वाचल्या आहेत भरपूर .....
पुढे लग्न ठरले …
.. त्या नंतरच्या च्या भेटीगाठीत , मम पतीराज फ़ोन वर घराच्याशी अहीरनी मधे बोलत असे ,तेव्हा ती भाषा त्याच्या तोंडून ऐकायला खुप गोड वाटायची ....

नंतर साखरपुडा दिनु उजाडला
मी general cha नेट वर अहीरनी वाक्य सर्च केलि ...पण आयत्या वेळ स ...१ वाक्य लक्षात राहीले , "जेवण व्हंयन का "...बस..

रिंग एक्सचेंज एंड ऍप्लिकेशन प्रोग्राम ज़ल्यावर ,मग मात्र मला जेव्हा थोड्या वरिष्ठ मंडळीशी बोलावे लागले ,तेव्हा मात्र वाट लागली..सर्व जण प्रेमाने काही तरी सांगायचा प्रयत्न करत होते पण मला एक अक्षरही कळयाला तयार नही..पण थोड्या वेळाने तरुण वर्गाचे मात्र बोलने लक्षात येऊ लागले.. तर हा अनुभव लक्षात घेवून लग्न नंतर अजुन काय होइल या कल्पनानी हसू याचे ....actual लग्न नंतर सासरी गेल्यावर , नव्या मराठी सुनेशी सगळे मराठीच बोलत होते पण , आपापसात अहीरनी ....सुरवातीला तर अशी गमत होत असे की कोणी मला काही आजी बाई नी काम सांगितले तर , न कळल्याने मी नुसती हो हो करत उभी रहायचे ....कुणी काही प्रश्न विचारला तर मी आपली "हो हो "...याची वरून कधी हशा पिकायाचा !!!!!
पण काही दिवसातच ही नवीन भाषा मला उमगू लागली .....आता fluently बोलता येत नाही मात्र बरेचा काही कलते..पण तरी एक गोष्ट मान्य करायला हवी जुन्या लोकांची भाषा अजुन सुद्धा पटकन कळत नाही. तेव्हा आधार असतो तो नेहमीच्या गाइड चा ...पतीराज ......

आता ही काही टिपिकल वाकये ::

खुप आहेत :: गण शे
आम्ही दाखवले ....आमने दखडले
काय बाई ताण शे ....
माले गावाले जावयाचे शे ...
नवी मुंदी घेनी, तुले दाखाडा ली शे :: नवी अंगठी घेतली ,तुला दाखवली
रावन्या केल्या :: विनवान्या केल्या ....

तर या प्रवासात मी शिकले की चांगले ते सर्व टिपून घ्यावे अणि वाईट ते सर्व कळले नाही म्हणुन सोडून द्यावे :).

टवाळचिखलू's picture

19 Nov 2008 - 6:15 pm | टवाळचिखलू

तृप्ती .. फारच छान ....

काही वाक्ये अशी

<<<माले गावाले जावयाचे शे >>>...-- माले गावले जावांनं शे
<<<नवी मुंदी घेनी, तुले दाखाडा ली शे>>> -- नवी मुंदी लिनी तुले दावाले लयनु.

चु. भु. द्या. घ्या.
- चिखलू
आउटलूकचे सेण्ड/ रीसीव बटन जर मेकनिकल असते तर आतापर्यन्त तुटले असते

तृप्ती's picture

20 Nov 2008 - 4:22 pm | तृप्ती

:) अजुन शिकतेच आहे ......

तृप्ती's picture

20 Nov 2008 - 4:22 pm | तृप्ती

:) अजुन शिकतेच आहे ......

सुनील's picture

19 Nov 2008 - 6:52 pm | सुनील

बहिणाबाईंच्या कविता ह्या अहिराणीत असल्याचे मानले जात असले तरी, त्या खानदेशीत आहेत असे नुकतेच कुठेसे वाचले.

हे खरे का? असल्यास, अहिराणी आणि खानदेशीत फरक काय?

ह्या भाषांवर गुजरातीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

टवाळचिखलू's picture

19 Nov 2008 - 7:12 pm | टवाळचिखलू

खरं म्हणजे खानदेशी आणि अहीराणी हे समानअर्थी शब्द आहेत.

<<<त्या खानदेशीत आहेत असे नुकतेच कुठेसे वाचले. >>>
खानदेशात बोलली जाणारी भाषा म्हण्जेच खानदेशी (अहीराणी ) असे लिहीनार्याला अपेक्शित असेल.

माझी अहीराणी अनुदिनी ... फ़कस्त अहिराणी.

आउटलूकचे सेण्ड/ रीसीव बटन जर मेकनिकल असते तर आतापर्यन्त तुटले असते

पांथस्थ's picture

19 Nov 2008 - 7:26 pm | पांथस्थ

आमचे अहिराणीचे शब्दज्ञान -

१) सगळे - बठ्ठे
२) म्हातारा म्हातारी - धल्ला धल्ली
३) मुरमुरे घे ग बाई - मरमरा लई लो वो मनी माय...
४) गुरांचा चारा - तोटा
५) नाहि - नई रे भो...

अहिराणी म्हटले कि खानदेश आणि पर्यायाने अंमळनेरच्या आठवणी जाग्या होतात...मस्त ताज्या पोकळ्याची भाजी...उन्हाळ्यात बहरलेली गुलमोहोराची झाडे...गावाबाहेरचे शांत राम मंदिर...तापी नदिचे पात्र...आखाजी....रथयात्रा...पारोळयाचा भुईकोट किल्ला (अवशेष)...पद्मालयाचे गणपती मंदिर...असे बरेच बरेच काहि....

खानदेशी आठवणी जाग्या करणारा धागा सुरु केल्या बद्दल धन्यवाद!!!

(खानदेशी) पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातील प्रकाश . . .

नाशिककर's picture

20 Nov 2008 - 5:22 pm | नाशिककर

तशी मनी मातृभाषा मराठी शे.. पण मना माय-बाप नी मातृभाषा अहिरनी शे... त्यामुळे हाई भाषा समजस भी आणि बोलता पण येस..
या संकेत स्थळ (स्थय... अहिरानीत सहसा "ळ" वापरला जात नाही..) वर अहिरानी वर धागा चालू शे हाई दखिसन भलता आनंद व्हयना माले...!!!

आहिरनी मा तशी बहु/भलती वराइटी शे... ति जिल्हा नुसार बदलस... जसे कि नाशिक जिल्हा मझार जी अहिरअनी बोलतस ( म्हन्जे कसमा पट्ट हो आपला.... कळवण, सटाणा, मालेगाव) त्यावर मराठि ना बहु प्रभाव शे.... तेच तुम्हि जळगाव कडे गयात ... तर भाषा बहु बदलसं... आनि धुये (धुळे) आनि नंदुरबार मा ति आखो अलग शे...!!

धुळे/ नंदुरबार मझार जी अहिरनी बोलतस त्याना वर गुजराथी न थोडा प्रभाव शे ... अस म्हन्ता येई आपुनले.....!!!

अशि हई अहिरनी( जी मराठीनिच पोटभाषा शे...) भलती गोड भाषा शे!!!!!!!!

सगळास्ले मना रामराम.
आपला मान्स मिळनात हाई बघीसन लई आनंद वाटी राहिना.
सगळास्ले हाऊ "धागादोरा" आवडी राहीना हाई वाचीसन मी तर यडाच व्हयनु.

आन पवनपाटीलभाऊ, पांथस्थभाऊ, टवाळचिखलूभाऊ आन सुक्याभाऊ , बाकी सगळा गाववालास्ले सांगी द्या की मन बर चालु शे.
ऊसस्ले बारे दी सन कंबर लई जाम व्हयनी वो भाऊ.
आन हाई रान्ही लाईट बी जास. तव्हळ "रातले" लै पंचाईत व्हस.

जास्त काइ लिव्ह्त नाही.

उलट टपाली कळवा काय शे ते.

तुम्हना,
-( सणकी )पाषाणभेद
ता.क. कांदा / बोरं स्ना वानोळा लई जा. (पिसोडी आनेल शे ना ?)

टवाळचिखलू's picture

21 Nov 2008 - 10:25 am | टवाळचिखलू

बयजु मी पिसोडी ते बजार कराले आणेल व्हती .....

आते वानोया दीज र्हायनात ते दी द्या ... पन वानोया शेमड्या बोरंस्ना नयी शे ना दादा. मग त्या सुकाडना पडतीन.

-(बोरं चोर) चिखलू

नाशिककर's picture

21 Nov 2008 - 1:38 pm | नाशिककर

नमस्कार लोकेसोनि....
हाउ अहिरानी ना धागा दोरा जितला भि लोकेसनि पकडेल शे... त्यासले इनंती करस कि आपलई वळख देवा.... म्हंजे तुम्ही कोठ्ली अहिरनी भाषा बोलतस....

मी सुरुवात करस... मी नाशिक-धुळे ना हद्द वर पिंपळ्नेर शे ......मी तठला शे...!!!

टवाळचिखलू's picture

21 Nov 2008 - 1:45 pm | टवाळचिखलू

भाउस्वोनी ...
मी भडगाव ना शे जिल्हा - जयगाव (जळ्गाव )

- खानदेशी चिखलू
(http://khandeshi.blogspot.com/)

राकेश वेंदे's picture

21 Nov 2008 - 2:20 pm | राकेश वेंदे

मी बेटावद गावतून शे. जिल्हा धुये. आमयनेर ना बिलकुल जोडे रास.

बय तुमले भेटीसनी जिव कसा कसा गार-गार व्हयी गया...!

(अहिराणी) पुणेकर

सुक्या's picture

21 Nov 2008 - 2:12 pm | सुक्या

मी संगमनेर ना. हाई गाव नगर जिलामा शे. पन मी तया शिरपुर - वघाडी ना.

धागा दोरा ठीक शे पन माले वाटस मिपा "मराठी" नं संकेतस्थळ शे. माले वाटस सर्वास्नी आठे मराठी मा बात कराले जोइजे. थोडंफार अहीराणी ठिक शे पन सर्वास्ले समजन असा जोइजे. बाकि अहीराणी मा खरडवही / व्य नि करणं माले ठिक लगी र्‍हायनं. बाकि दखा तुमले काय वाटस ते.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

अभिरत भिरभि-या's picture

21 Nov 2008 - 3:14 pm | अभिरत भिरभि-या

मना सगळे कळेशे :)
समजतेय आम्हाला सगळे . चालू द्या तुमचे.
हा धागा आणखी सुरु राहू दे |

टवाळचिखलू's picture

21 Nov 2008 - 2:21 pm | टवाळचिखलू

माले वाटस सर्वास्नी आठे मराठी मा बात कराले जोइजे.

सहमत .

आउटलूकचे सेण्ड/ रीसीव बटन जर मेकनिकल असते तर आतापर्यन्त तुटले असते

राकेश वेंदे's picture

21 Nov 2008 - 2:45 pm | राकेश वेंदे

तसा मि मिपावर खुप दिवासापासुन फिरत होतो, ह्या वेळेस प्रथमच मिपाचा स्वाद घेतला.

खुप छान वाट्ले तुम्हा सर्वाना भेटुन.

बाकिनी चावय खरडवही वर

(अहिराणी) पुणेकर

अभिरत भिरभि-या's picture

21 Nov 2008 - 3:16 pm | अभिरत भिरभि-या

मने सारा समझा आउ छे | घनो चोक्कस छे एटला धागा :)

टवाळचिखलू's picture

21 Nov 2008 - 3:26 pm | टवाळचिखलू

तारो ठिक छे .. पण बिजा ना सु ?

(गुज्जु ) - चिखलू
---लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी! ---

अभिरत भिरभि-या's picture

21 Nov 2008 - 3:44 pm | अभिरत भिरभि-या

अरे तुमना जेटला मन शे तित्की कठीन नथी तारो भाषा |
मने तो घणॉ मजा आउ शे|

पण बिजा ना सु ?

ना समझे वो "सु सु" करे | हु केअर्स |
(मराठी वाले नाही गुजराती वाले सु सु म्हणतोय )

अभिज्ञ's picture

21 Nov 2008 - 3:50 pm | अभिज्ञ

मला वाटते कि हा धागा अहिरणी बोलीभाषा जाणणा-यांनी खरडफळा वा खरडवहितून चालू ठेवावा.
"मला अहिरणी बोली भाषा समजते" एवढेच उत्तर जर द्यायचे असेल व इतर गप्पा मारावयाच्या असतील
तर वरिल पर्यायांचा जरुर विचार व्हावा.
तेच कोकणी बोली भाषेबाबतहि सांगता येईल.
महाराष्ट्रातल्या इतर भागातून असलेल्या जनतेला त्या समजून घ्यायला थोडेसे अवघड पडते.

अभिज्ञ.

अभिरत भिरभि-या's picture

21 Nov 2008 - 4:09 pm | अभिरत भिरभि-या

>> "मला अहिरणी बोली भाषा समजते" एवढेच उत्तर जर द्यायचे असेल व इतर गप्पा मारावयाच्या असतील
तर वरिल पर्यायांचा जरुर विचार व्हावा.

अभिज्ञचे हे म्हणणे खरे आहे.
मंडळी, हवापाणी / नावागावाच्या गप्पांसोबत एखादी चांगली कथा / कविता / लेख अहिराणीत ( वा प्राधान्याने मराठी-मिश्रित अहिराणीत) येऊ द्या.
तुमच्या गोड बोलीत काही वाचायला मजा येईल. :)

लिवा मग बिगि बिगि पावन |

मी वाट बघु शे :)
(किंचित अहिराणी ) अभिरत

पाषाणभेद's picture

21 Nov 2008 - 4:22 pm | पाषाणभेद

मी तसा नाशिकचा, पण सटाण्याला खुप दिवस राहीलोय.
नोकरी आणि छोकरी निमित्ताने सर्व नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्हे बघीतले.

क्रुपया हा धागादोरा चालू राहू द्या. वाट्ल्यास दोन्ही भाषांमध्ये बोला.

आपल्या आठवणी जपु या. नाहितर कोण कुणाला विचारतो / बोलतो. दुधाची तहान ताकावर.

(भयान सेन्टी व्हयनु ना मी.)
(भयान = खूपच)
-( सणकी )पाषाणभेद

विजुभाऊ's picture

21 Nov 2008 - 4:55 pm | विजुभाऊ

अरे आ भाषा एकदम गुजराथी जेवी स. अहीं बेसीने तो एवुज लागस

मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

आर्या१२३'s picture

6 Oct 2014 - 2:16 pm | आर्या१२३

माले येस अहिराणी... पन अगदी पिव्वर नई! आठे रोज उनु त शिकी जासु. :)

आयुर्हित's picture

7 Oct 2014 - 2:28 am | आयुर्हित

साधं नको समजू माले. अहिराणी माले बी समजस बरं.
देव तुले आनंदमां ठी राखी रे मना भावड्या तू!
इतला दिन द्खालेच मिळणा नही हौ धागा.
कथा लपाड दिनथा?

हात्त मरो आयुर्हितभौ! माले बी काल सापडना...! दखा ना वर! २००८ सालना शे!
तुम्ही ई उनात, आते येथीन बाकी ना लोके बी बागेबागे! :)

बॅटमॅन's picture

7 Oct 2014 - 2:05 pm | बॅटमॅन

यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याच्या (?) शेपले मुडना काटा. नाइभाउ, नाइभाउ, काड तं खरी काटा म्हने. नाइ म्हने, याना काटा काढू दे.

आयुर्हित's picture

8 Oct 2014 - 12:20 am | आयुर्हित

त्याच्या (?) : त्याना

इरसाल's picture

7 Oct 2014 - 5:33 pm | इरसाल

किधरसे पकड्के लाए.

मर्‍हाटी विश्वकोश, खंड क्र. १. अहिराणी शँपळ टेक्ष्ट.

इरसाल's picture

7 Oct 2014 - 5:36 pm | इरसाल

आथानी काडी तथानी काडी, काड्या कोन करे वं माय
आथानी फुटकी तथानी फुटकी.....फुटकी गोंडा घोये वं माय !!!!!!

इरसाल's picture

7 Oct 2014 - 5:43 pm | इरसाल

मी ते दोडांइच्यान बजारमां जासु माय जासु,
मी ते पावशेर पेडा लयसु माय लयसु,
मी ते एखलीच बशीन खासु वं
शेजारीन सखु बाइ !

आथानी काडी तथानी काडी, काड्या कोन करे वं माय
आथानी फुटकी तथानी फुटकी.....फुटकी गोंडा घोये वं माय !!!!!! >>

=)) =)) =))

आर्या१२३'s picture

8 Oct 2014 - 1:16 pm | आर्या१२३

फक्त गानाच इ राह्यनात का? कोनी बोली नै राह्यन!

इरसाल's picture

8 Oct 2014 - 1:35 pm | इरसाल

मी बोलसु तं तुमी म्हन्श्यात बोली र्‍हायना ं ..... हांय !

इरसाल's picture

8 Oct 2014 - 1:39 pm | इरसाल

एखादं वाह्यात कार्ट सापडत नसेल आणी अचानक दिसले तर त्याच्यावर खालील फुले उधळली जातात.

"कथा कलथना हाउ रे ? इतलामा तं आठेच खी र्‍हायंता. मरीमाय खाइले येले, कारे भडवा आथा चेटस का काढु शिंगाडे ?

सुहास पाटील's picture

8 Oct 2014 - 1:45 pm | सुहास पाटील

माले भी एस रे भो मी मुयना तारखेडा पाचोराना

आर्या१२३'s picture

9 Oct 2014 - 10:39 am | आर्या१२३

शिन्गाडे :))

इरसाल's picture

10 Oct 2014 - 1:01 pm | इरसाल

चालना ग्यात बठ्ठा लोके. दिवाईनं साफ्सुफ कराले लागी ग्यात का येनार लोकेस्नी तयारी मा लागेल शेतस ?

शे का कोनी आठे,

आर्या१२३'s picture

10 Oct 2014 - 3:19 pm | आर्या१२३

मी उनु!! दिनमा मी एखाद दुसरी चक्कर टाकी जास! :)

म्या एक आहिराणी भासामधार गानं लिखेल शे. त्यानामधारल्या काही शब्दनी माले आडचण शे.

ते बराबर हाय का नही कोन सांगी? कोनले ते गानं पाठवू म्हंजे माले कळी बराबर शे का चुकेल शे.

इरसाल's picture

11 Oct 2014 - 11:36 am | इरसाल

द्या माले.

आर्या१२३'s picture

11 Oct 2014 - 1:31 pm | आर्या१२३

आरे हाउ पाभे कव्हयना कोकली राह्यना व्हता! इरसालभौ, त्याले नेमबन्द मदत करजो! :)

आर्या१२३'s picture

11 Oct 2014 - 1:38 pm | आर्या१२३

हाई ल्या काही अहिराणी शब्देसना अर्थ...तठे मायबोलीवर टाकेल व्हत मीच!
आन हाउ मन्हा खान्देशी ब्लॉगः www.khandeshkanya.blogspot.in

वडगण- जेवताना ताटातली आमटी/ वरण एकीकडे वाहु नये म्हणुन पुर्वी ताटाखाली लाकडी चौकोनी वडगण लावत असत.
बोघन- पातेल
झब- नरसाळ
गोण्ट- गोणपाट
अस्तुरी- बायको
आन्डेर- मुलगी
आन्डोर- मुलगा
धडला/ धल्ला- म्हातारा
धडली/ धल्ली- म्हातारी
व्हउ- सून
फुई- आत्या
देवपळ्हः देवकपाशी
उखल्ला- उकीरडा
कान्जील- विहीर
कबाडी- भन्गारवाला
याही/ याहीण- व्याही/ विहीण
जवाई- जावई
आठे- इथे
इबाक- इकडे
तिबाक- तिकडे
तठे- तिथे
बठ्ठाजण- सगळेजण
उना- आला
जोयजे- पाहिजे
जुवान- तरणाताठा
परनाले- लग्नाला जाणे
कव्हळमव्हळ- कधी मधी
माती ग्या का?- मातला का?
हाड्या- कावळा. पितृपक्षाला 'हाडपक्ष' म्हणुनच म्हणत असावेत.
वडान्ग- कुम्पण
दान्गडो- दन्गा
घरोटा/ घट्या- जाते
चावळने- उगीच काहीतरी बोलणे. उदा. "काय चावळी राह्यनात रामभाऊ! आम्ही दखेल शे ना ते खेत! "
येरोनेरले- एकमेकान्ना
बाट्टोड- वात्रट
उप्पाद- कटकट
कुटाणा- त्रास/ कटकट
बोखल- कोनाडा
वाळन्यानी पन्गत- नवरदेवकडच्या लोकान्नी लग्नानन्तर आपल्या गावाला देण्याच जेवण
महावस्त्र- नवरीचा शालु
तेलनचिड्ली- नवरीच्या बस्त्यातली एक प्र्कारची साडी.
पोटझाकण- नवरदेव/ नवरीचा बस्ता होतो तेव्हाच नवरदेव, नवरीच्या आईला, फुईला लग्नासाठी साड्या घेण्यात येतात. त्याचा खर्च हुन्ड्याच्या पैशातुनच होतो.
मान्डवाची साडी- ही पण नवरीची साडीच.
एकन्दरीत नवरीच्या बस्त्यात, हळदीची साडी, महावस्त्र, तेलन चिडली, मान्डवाची साडी या ४ साड्या येतातच.
बेळमाथनी- लग्न जवळ आल्यावर नवरदेवच्या/ नवरीच्या घरी 'कळस भरल्यासारख, एका कोपर्‍यात मातीचा माठ आणि त्यावर मातीचच छोट भान्ड अस पाण्याने भरुन त्याला हळद माखलेला दोरा बान्धतात. त्याची आधी पुजा करुन मगच हळद फोडणे वै. कार्यक्र्म होतात.
भानशी- चुलीच्या बाजुलाच त्याच आकाराची आतुन कनेक्टेड असते ती. चुलीतले एक लाकुड तिरपे करुन ठेवले की जाळ तिकडे पोचतो. फक्त शिजायला/ भाजी उकळायला ठेवायची असेल तर भानशीवर ठेवतात. (इकडे तिला 'चुल-उल'. 'वैल' म्हणतात)
सतेल- गोल बुडाचे पातेले
सान्डशी- स्वयम्पाकघरात वापरायची पकड
गडन्गनेर- केळवण

पैसा's picture

12 Oct 2014 - 10:42 pm | पैसा

छान वाटलं. काही शब्द हिंदी/गुजरातीला जवळचे. काही गावातल्या जुन्या मराठीचे. असे वाटले. भानशी वरून भानशेरू आठवलं. अगदी घाणेरड्या कपड्याला भानशेरू म्हटलेलं ऐकलं आहे.

इरसाल's picture

11 Oct 2014 - 2:12 pm | इरसाल

नम्बर शे वं आर्यातै !

माहितगार's picture

11 Oct 2014 - 5:19 pm | माहितगार

विकिची वकिली:

* सूची:अहिराणी बोलीभाषेतील शब्दार्थ (सध्या रिकामी आहे, अहिराणी भाषकांची वाट पहात आहे !)

* अहिराणी विकिपीडिया (सध्या जवळपास रिकामे आहे, अहिराणी भाषकांची वाट पहात आहे !)

माझ्या बायकोला थोडीफार येते, तिचा मामा कळवणचा आहे.
या भाषेत म्हणी खूप दमदार आहेत, लग्न झाल्यावर बर्‍याच ऐकल्या आहेत. माझ्या सासू़कडे अश्या म्हणींचा बराच साठा आहे.
उ. दा. जने तिले कळे, फुकटी गोंडा घोळे.
मना मामा गावले गया, घरमां कुळीद पेरी गया. (कुळीद ढेकुण, बहुतेक कुळीद हा शब्द असावा, बायकोला नक्की आठवत नाही.)

"मना मामा गावले गया, घरमां कुळीद पेरी गया"

हा एक कूट प्रश्न आहे, ज्याचे उत्तर ढेकुण आहे.
पण कुळीद म्हणजे ढेकुण नव्हे तर कुळीद (horse gram) हे एक दिवद्ल कडधान्य आहे.

आर्या१२३'s picture

13 Oct 2014 - 10:10 am | आर्या१२३

अहिराणी म्हणी जोयजे का तुम्हले?
मग हाई ल्या...
१)घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा
२)चार आनानी कोंबडी, नी बारा आनाना मसाला
३)दळे तिले कळे, नी फुकटी गोंडा घोळे
४)खिंसात नही आणा, नी माले बाजीराव म्हणा
५)नवल्यानी घीदी गाय, नी धाई धाई दुध काढले जाय
६)खिशात नही कवडी, नी वणी बाजार भवडी.
७)जीव म्हणे आखो आखो, नी पोट म्हणे नको नको
८)चार आनानी पेवाणी, नी बारा आनानी दखाडानि
९)येडी न मत, नी घुबड न चाळा.
१०)आई बाई नि दिधी भर,नी उठ व शीजी नवरा कर
११)निधी न भंडारा, नी गावभर डोम्बारा
१२)तुले माले सांगाले भगतीन आनी घुमाले
१३)काम् नही काय करु, लुगड फ़ाडी दान्डे करु
१४)सोनारणी पीटी पीटी, नी लोहार नि एकच बठी
१५)खान तशी खापरी,नी माय तशी छोकरी
१६)माले ना तुले, घाल कुत्राले
१७)उच्चा झाडवर बुच्चा बसणा, असा राज कधी ना उन
१८)तोच गुल, नी तीच काडी
१९)चिडी खोपामा, नी जीव धोकामा
२०)कागद न भाऊ, नी बाहेर नको जाऊ
२१)रीस नी माय, भिक मांगी खाय
२२)धल्ला (म्हातारा) नवरा कया, कुळले आसरा झाया
२३)घरन थोड, नी याहीन घोड
२४)जवाईन पोर, हरामखोर
२५)साक्खा भाऊ, पक्का वैरी
२६)सासू तशी सून, नी उम्बारना गुण
२७) गाव नी खावा लाथ, पण परगाव ना खाऊ नाही भात
२८)आसू न पासु, मारी गायी सासू
२९)ज्यांना घर पत्थर नि मावठी, त्यांनीच पेओ गावठी
३०)दिनभर आथ तथ, दिन मावळणा जाऊ कथं
३१)आग मारे ते खोबारण तेल, नी फसफस करे ते गोड तेल
३२)खावाले काळ, नी भूईले भार
३३)घरमा फुटेल बोयका, नि मांगस दोन-दोन बायका
३४)नाईकभाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये
३५)महारनं आख्खं गाव, नि त्याने नही कोठे ठाव
३६)उठरे तीन डाव, तोच धंदा
३७)गावमा ऊना पोया (पोळा) ,नि महारले आनन झया
३८) बाईना फुले बाईले, नि शाबासी मन्हा याहीले
३९)रायरंग रातभर राजा, नि सकायमा ऊठी पानी कोनी पाजा
४०)दुसरी वणी घरमा, पयली गयी घोरम
४१)दिल्येल शिदोरी, आणि सांगेल आक्कल पुरत नही
४२)उन उरी, ते चुल्हाप मुतारी
४३)धल्ला (म्हातारा) नवरा सदीमे निजे, जुवान बायको रातभर खिजे
४४)आग लाऊ, तमासा पाहू
४५)आसू ना पासु, मारी गई सासू
४६)कवळ मवळ, आडई तव्हळ
४७)उक्खळ म्हान डोक घाल, आते फुटो का रहावो
४८)हाड्याले (कावळा) झाये उडाले, नी फाटीले (झाडाची फांदी) झाये मुडाले
४९)उस गोड झाया, ते ते मुईसंमत खाऊ नही
५०)आईबाई नडणी, कानबाई घडणी
५१)आचर पाचार, धल्लानी पाचर
५२)घोडा इकी डांगर खाऊ नही
५३)करमम्हान पड कोड, हसिबोली गोड करी ल्हेओ
५४)आड टीड कारे नि कंबर मुडे, खापरे बसे तिने नाव कागद चढे
५५)अन्नाडूना बारवर घडी घडी जान पडस
५६)आगमाहीन निघीसन, फुफाटामा पडण
५७)देव त्याले खेव
५८)ऐकणारणी एक बात, नही ऐकणारण सुपड साफ
५८)आमुनी कमाई, जामूम्हान गमाई
५९)अधोडी खाये, त्याले मधुरा व्हये
६०)कधी ना मधी, गई हुबी नदी
६१)हाथ मूडी त्यान्हा गळात पडी
६२)काये ना बये, चालनी धुये
६३)वाटे ते बोट चाटे
६४)पेरई तसे उगई
६५)मना माल आणि मन्हाच हाल
६६)कोपरा देखी थुको, नि जागा देखी मुतो
६७)आपलाच दात नि आपलाच व्हट (ओठ)
६८)निमण कीड, निमलेच गोड लागस
६९)अम्हनाच दांड, नि अम्हनीच कुर्हाड
७०)कीतलभी कय तरी, कोयडांच हाथ निघस
७१)कोन्ही सोनानी सरी बांधी ते आपून दोरी घाली मरू नई
७२)खावाले काळ, नि भूईले भार
७३)कुडी देखी, पुडी वाढो
७४)करकडे ते सरकडे
७५)करा का वरा, फुटकी गोंडा धरा

सौ: आन्तरजाल