कोकोनट-चॉकलेटच्या वड्या.

शितल's picture
शितल in पाककृती
17 Nov 2008 - 9:06 pm

साहित्य. -
२- छोटे मारी बिस्कीटचे पुडे
२- चमचे चॊकलेट पावडर
२- वाट्या बदाम पुड
१- वाटी काजु पुड
२- वाटी सुक्या नारळाचा चव
दीड वाटी पिठी साखर.
१- टीन कंडेन्स मिल्क
अर्था वाटी दुध.

कृती -
१. मारी बिस्कीट मिक्सरवर फाईन बारीक करून घ्यायचे, एका प्लेट मध्ये ओतुन त्यामध्ये दोन चमचे चॊकलेट पावडर, एक वाटी बदामाची पुड पाऊन टीन कंडेन्स मिल्क घालुन ते पिठ मळतात तसे मळुन घ्यायचे, मळताना थोडे- थोडे दुध ही घालायचे, ( पुरीला जेवढे घट्ट मळतो तेवढे घट्ट मळायचे ) आणि साधारण त्या पिठाचे तीन गोळे करायचे. (चॊकलेटी कलरचा गोळा तयार होतो.)

२. आता आतील सारणासाठी - दोन वाट्या नारळाचा चव , एक वाटी बदाम पुड, एक वाटी काजुची पुड (फक्त काजु किंवा फक्त बदामची पुड असेल तरी चालेल, किंवा दोन्ही पैकी एकाची पुड घेऊन, एक वाटी मिल्क पावडर घालुन ही वडी बनविता येते.) पाव टीन कंडेन्स मिल्क, दीड वाटी पिठी साखर घालुन सर्व एकत्र करून घ्यावे, एकत्र करताना थोडेसे दुध ही घालावे.

ह्या सारणाचे ही तीन गोळे करून घ्यावेत.

३. चॊकलेटी कलरच्या गोळ्याला तुप लावुन ते मध्य जाडी पर्यत लाटावा, दुस-य़ा बाजुला सारणाचा गोळा चॊकलेट्या गोळ्याच्या पोळे पेक्षा जरा कमी साईजचा लाटावा, लाट्ताना तुप लावावे, (मध्यम आकार झाल्यावर तो उचलुन चॊकलेटी पोळीच्या वर ठेवुन हाताने पसरविला तरी चालतो ) आणि त्याचे हलके दाबत रोल करावेत, रोल फ्रीज मध्ये २ तास ठेवुन द्यावेत.
आणि मग त्याच्या वड्या पाडाव्यात.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

17 Nov 2008 - 9:08 pm | यशोधरा

झटपट आणि मस्त!

रेवती's picture

17 Nov 2008 - 9:09 pm | रेवती

दिसताहेत वड्या.
फोटो छान. करून बघायला पाहिजेत.

रेवती

छोटा डॉन's picture

17 Nov 2008 - 9:17 pm | छोटा डॉन

च्यायला दिवसेंदिवस आमचे फ्रस्ट्रेशन वाढत चालले आहे ...
करता आणि खाता (घरापासुन / देशापासुन दुर असल्याने ) तर काही येत नाही, नुसते फोटो पाहुन जीव तुटतो ...
असो.

पाककृती चांगली असेलच त्यात वाद नाहीच ...
पण "फोटो" अक्षरशः जीवघेणे आहेत, जबरदस्त !!!!
आज रात्री जेवण हे फोटो पहातच करावे लागणार, ४ घास जास्त जातील ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्राजु's picture

17 Nov 2008 - 9:25 pm | प्राजु

अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे वडी ही...
जबर्दस्त फोटो.. लगे रहो शितल... शाब्बास!

(आता हीला घरी बोलवावं आणि येताना या वड्या करून आण म्हणून सांगावं. ;) )
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

17 Nov 2008 - 9:27 pm | शितल

प्राजु,
उद्या वड्या तुझ्या घरी पोहचत आहेतच :)

चतुरंग's picture

17 Nov 2008 - 10:36 pm | चतुरंग

चतुरंग

आता हीला घरी बोलवावं आणि येताना या वड्या करून आण म्हणून सांगावं.

मी पण आसंच म्हणतो ... माझ्यापण घरी वड्या पोचव गं ...

- (हावरट)
टारूबाळ

स्वाती दिनेश's picture

17 Nov 2008 - 9:30 pm | स्वाती दिनेश

शीतल, वड्या मस्तच दिसताहेत. फोटो तर लय भारी..
नक्की करुन पाहिन.
स्वाती

टारझन's picture

17 Nov 2008 - 10:51 pm | टारझन

नक्की करुन पाहिन.

तुम्ही पहा ... आणि पाहून झालं की प्रामाणिकपणे अफ्रिकेत कुरियर करा स्वाती तै ... प्लिज :)

--(डबल हावरट)
टारूबाळ

शाल्मली's picture

17 Nov 2008 - 9:36 pm | शाल्मली

शीतल,
वड्यांची पाकृ एकदम मस्त दिसते आहे.
आणि फोटोही छान दिसतो आहे.

--शाल्मली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Nov 2008 - 10:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाव .... तोंडाला (भरपेट जेवल्यावर) पाणी सुटत आहे.

भाग्यश्री's picture

17 Nov 2008 - 11:10 pm | भाग्यश्री

वॉव.. काय सुरेख आहेत या वड्या!
नक्कीच करणार ! भार्री पाककृती शितल!

http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 11:39 pm | विसोबा खेचर

हम्म.. वड्या छान वाटताहेत..

आंबा घातलेल्या नारळाच्या वड्या आणि बेसनाच्या वड्या आम्हाला फार प्रिय आहेत..

तात्या.

शिप्रा's picture

18 Nov 2008 - 9:41 am | शिप्रा

खुपच छान आहेत वड्या..दोन कलर मध्ये तर एकदम मस्त दिसत आहेत.
नक्कि करुन बघणार..:)

सर्किट's picture

18 Nov 2008 - 9:47 am | सर्किट (not verified)

कोकोनटला बहुतेक खोबरे (वाळल्यास) अथवा नारळ (ओला असल्यास) म्हणतात ना ?

खुलासा व्हावा.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

शिप्रा's picture

18 Nov 2008 - 9:55 am | शिप्रा

मराठित कोकोला कोकोच म्हणत असावेत आणि नट म्हणजे इथे तुम्हि काहिहि घेऊ शकता ..बदाम किंवा काजु
थोड्क्यात ह्या कोको काजु वड्या आहेत..

राजा ची रानी's picture

18 Nov 2008 - 10:22 am | राजा ची रानी

छान आहे .........
आनि पध्त पन बरोबर आहे. पन्.....ह्याला ना "चोकलेट्-रोल " असे म्हनतो.आनि हा रोल तयार झल्यावर फ्रिज पेकशा फ्रिजर मधे ठेवला तर आनखी छान पने पिस करता येतिल.
अनि पुरन हातने लावावे म्हन्जे हवे तसे जम्ते आनि सगलिकडे एक सारखे लागते.
तशि नविन आहे मि.... मि पा वर म्हनुन स्माएल फेस कुथे आहे ते माहित नाहि. पन छान आहे हि रेसिपि.

जयवी's picture

24 Nov 2008 - 1:40 pm | जयवी

ए मस्त आहे गं......!! झटपट आणि सोप्पी पद्धत :) आणि दिसताहेत किती छान !!

मनस्वी's picture

24 Nov 2008 - 2:06 pm | मनस्वी

मस्तच शितल. वड्या एकदम भारी दिसताएत आणि सोप्याही आहेत.
करून बघीन आता.

शितल's picture

24 Nov 2008 - 6:24 pm | शितल

वड्या आवडल्यचे कळविल्या बद्दल सर्वाचे मनःपुर्वक आभार. :)