गोवंशहत्या बंदी

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
3 Mar 2015 - 6:21 pm
गाभा: 

अलीकडच्या काळातील एक मैलाचा दगड ठरावा असा कायदा ...

एकीकडे गाय हि माता तिचे पावित्र्य ..आयुर्वेदिक महत्व ...

दुसरीकडे 'गाय हा पशू ..देव नव्हे' हे आमच्या आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्पष्टोक्ती ...

तिसरीकडे ते वेन्दांचे दाखले "अनुस्तरणी कर्म ...चर्मण्वती शब्दाची व्युत्पत्ती"

चौथीकडे अन्य धर्मातील त्याज्ज्य प्राणी खाण्याब्द्दल्ची कठोर आचारसंहिता ..

त्यातून शाकाहार मांसाहार वाद ... मुळासकट उपटून खाल्लेल्या भाज्या वगैरे हि सुद्धा हत्त्याच असे मानणारा एक गट ...

आणखीन कुणी म्हणतो "फलाहार हाच काय तो माणसाला शक्य असलेला नैसर्गिक आहार ..कारण फळे माणूस कसलेही कृत्रिम प्रोसेसिंग न करता करू शकतो

...विचार करकरून एक शीण येतो :D

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

3 Mar 2015 - 6:38 pm | अनुप ढेरे

अडाण*ट निर्णय...

नांदेडीअन's picture

3 Mar 2015 - 6:49 pm | नांदेडीअन

दीनदयाळ उपाध्याय आणि पत्रकारिता या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, ""हा नव्या पिढीचा जमाना आहे. चिंतन नव्या संदर्भात मांडले पाहिजे. मला कोणी सांगितले की गायीला नमस्कार करा, त्यात 33 कोटी देवता आहेत, तर मी म्हणेन दाखवा कोठे आहेत त्या देवता?''

गडकरी यांचे जुने स्टेटमेंट.

बॅटमॅन's picture

3 Mar 2015 - 6:51 pm | बॅटमॅन

विचार करकरून येणारा शीण घालवायचा असेल तर फक्कडपैकी दम बिर्यानी चापा अन निवांत झोपून टाका.

मुक्त विहारि's picture

3 Mar 2015 - 6:53 pm | मुक्त विहारि

बिर्याणी बरोबर बियर मस्त...

सुनील's picture

3 Mar 2015 - 7:09 pm | सुनील

गोमांसभक्षण केले आहे, कदाचित यापुढेही करीन. परंतु, आजतागायत भारतात केलेले नाही. तेव्हा सदर निर्णयाचा वैयक्तिकबाबतीत फार फरक पडू नये.

मात्र भाकड गाईंबाबत कायद्यात काय तरतूदी आहेत, ते पाहणे उद्बोधक ठरावे!

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 7:17 pm | आजानुकर्ण

उठताबसता सावरकरांचे नाव घेणाऱ्या आणि अंदमान-सेल्युलर जेल-मणीशंकर अय्यर वगैरे विषयांवरुन अनेक वर्षे आगपाखड करणाऱ्या पक्षांच्या सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेऊन सावरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे... या शब्दात या निर्णयाचे या ठिकाणी या माध्यमातून अभिणंदण करण्यात येताय!

मृत्युन्जय's picture

3 Mar 2015 - 10:54 pm | मृत्युन्जय

यानिमित्ताने मणिशंकर अय्यर बद्दल तुमचे काय मत आहे ते जाणुन घ्यायला आव्डेल (विशेषतः सावरकरांच्या अनुषंगाने). धाग्याचा तो विषय नाही हे जाणुन आहे पण संदर्भ तुम्हीच आणलेत.

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 10:56 pm | आजानुकर्ण

मूर्ख माणूस आहे तो. हे माझे मत.

आजानुकर्ण's picture

3 Mar 2015 - 11:01 pm | आजानुकर्ण

तो हे सर्वनाम मणीशंकरसाठी आहे सावरकरांसाठी नाही. उगीच नसत्या शंका काढण्यापूर्वी स्पष्टीकरण दिलेले बरे.

निनाद जोशी's picture

4 Mar 2015 - 12:13 pm | निनाद जोशी

मूर्खच काय देशद्रोही म्हंटल तरी चालेल..... काल ह्याच माणसाने अफझल गुरूला निरर्थक फाशी दिली गेली असे म्हंटले आहे...... ******..... आणि गोवंशहत्या बंदी बद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रात गाय हि पूजनीयच आहे. त्यामुळे महाराष्ट्रापुरती हि बंदी ठेवण्यास काहीच हरकत नाही. शिवाजी महाराजांचा दाखला आपण सर्वत्र देतो तेव्हा त्यांचा हा विचारही अंमलात आणल्यास काहीच हरकत नाही......

चुकलामाकला's picture

3 Mar 2015 - 7:25 pm | चुकलामाकला

गंगाधर मुझे यांची गोवंशाला अभय द्या ही कविता आठवली.

कपिलमुनी's picture

3 Mar 2015 - 7:31 pm | कपिलमुनी

मला स्वतःला गाय धार्मिक वगैरे काही वाटत नाही. त्या मुळे असल्या फालतू कायद्याची काहीही गरज नव्हती.
भाकड गायींना कापल्यान असा काय फरक पडतो ? बाकी भूतदया म्हणून मासे, कोंबडी , बोकड यांना पण दयेचा हक्क आहे. पण एवढ्या पशुधनाचा करायचा काय ?
अवांतर :
आता या पापामुळे मी नरकात जाणार आणि बरेचसे मिपाकर्स तिथेच भेटणार ;)

विकास's picture

3 Mar 2015 - 7:51 pm | विकास

महाराष्ट्रात गोहत्याबंदी १९७६ पासूनच आहे. त्यात आता फक्त बैल आणि वळू (गोवंश) पण आले आहेत असे दिसतयं. मला स्वतःला बिफ खावेसे कधी वाटले नाही त्यामुळे खाल्ले नाही. बाजूचा कोणी खात असेल तर मला काही फरक पडत नाही. या कायद्याचे एक संस्कृती आणि मला वाटती एकंदरीत १९४७ पासूनच घटनेनुसार गोहत्याबंदी करण्याची पावले उचलणे हा उद्देश मान्य केल्यावर एक प्रश्न पडतो... याची नक्की तातडीने गरज होती का? त्या व्यतिरीक्त राज्य सरकारने नक्की काय काय निर्णय घेतले आहेत. (मला खात्री/आशा आहे, व्यावहारीक निर्णय देखील घेतले असणार पण ते माध्यमात इतके प्रकाशात येणार नाहीत..)

अर्धवटराव's picture

3 Mar 2015 - 9:43 pm | अर्धवटराव

महाराष्ट्रात गोहत्याबंदी १९७६ पासूनच आहे

जरा कुठे होतकरु मंडळींचं थोडं पुरोगामी पुराण सुरु झालं कि हे आलेच मागचा-पुढचा विदा घेऊन :P
छान सावरकरी संदर्भ आलाय. काहि वेळात गांधीजीपण आपली सीट पकडतील. मग शिमगा करायला हिंदुत्व, मुस्लीम धर्मांधता, आयुर्वेदाचार्य-काळा पैसा भंजक श्री श्री बाबा रामदेव प्राणायामकर इ. घटक आपापल्या घटना घेऊन सरसावतील. तेव्हढीच होळी निमीत्त करमणुक झाली असती. पण कसचं काय...छे !!

सुनील's picture

4 Mar 2015 - 8:33 am | सुनील

महाराष्ट्रात गोहत्याबंदी १९७६ पासूनच आहे.

मुंबई-ठाण्यात 'बड्या'चे मटन काही भागात सर्रास मिळते. तेव्हा १९७६ पासूनच्या गोहत्याबंदीच्या अंमलबजावणीविषयी शंका येते आहे. आता त्यात वळूंची भर पडली इतकेच काय तर!

थोडक्यात, सदर कायद्यानंतरही, काहींची मने समाधानाने, काहींचे खिसे पैशाने तर काहींचे पोटे 'बड्या'ने भरणार, असेच दिसते!

विकास's picture

4 Mar 2015 - 10:11 am | विकास

कदाचीत गुजरातचे दारूबंदीचे मॉडेल वापरण्यात येईल. ;)

विकीवरील माहिती जर बरोबर असेल तर जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब देखील ऑलमोस्ट असाच कायदा आहे.. काश्मीर मधे तर १० वर्षाचा तुरूंगवास आहे.

केरळ, पूर्वांचल प्रदेश आणि तिथली राज्ये सोडली तर प्रत्येक राज्यात किमान "हत्या करण्यासाठी योग्य" म्हणजे "गाय हा उपयुक्त पशू" उरला नाही असे सर्टीफिकेट तरी लागते.

प्रचेतस's picture

3 Mar 2015 - 10:31 pm | प्रचेतस

स्तुत्य निर्णय.
सरकारचे मनापासून अभिनंदन.

विकास's picture

3 Mar 2015 - 11:34 pm | विकास

आता महाराष्ट्रातील तमाम बैल आणि वळूंना संरक्षण मिळालेले आहे! ;)

धडपड्या's picture

4 Mar 2015 - 7:40 pm | धडपड्या

आता माझे पिताश्री मला पाहिजे तेव्हा बडवू शकणार नाहीत का?

black pearl's picture

4 Mar 2015 - 9:14 am | black pearl

सहमत आहे .

संदीप डांगे's picture

3 Mar 2015 - 11:50 pm | संदीप डांगे

लेख वर आणन्याची गरज आहे.

विकास's picture

4 Mar 2015 - 12:13 am | विकास

हम्म्मम्म

अत्रुप्त आत्मा's picture

4 Mar 2015 - 12:13 am | अत्रुप्त आत्मा

हे सरकार आपल्याला आवळा देऊन कोहोळा काढणार..!

हो कि नै गाइज...!? ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2015 - 12:17 am | डॉ सुहास म्हात्रे

हो कि नै गाइज...!?

नो, नो, नो. लिंगभेदभाव टाळण्यासाठी ते
"हो कि नै गाइज अँड बैलाज...!?"
असं असायला हवं, नै का ?

अत्रुप्त आत्मा's picture

4 Mar 2015 - 7:51 am | अत्रुप्त आत्मा

हो हो! आणि बालक अन्याय नको,म्हणून वासराज! :-D

स्वप्नांची राणी's picture

5 Mar 2015 - 12:08 am | स्वप्नांची राणी

व्हाय शूड गाईज हॅव ऑल द फन...!!

यसवायजी's picture

5 Mar 2015 - 4:38 pm | यसवायजी

व्हाय शूड गाईज हॅव द मरण?...!!

वेल्लाभट's picture

4 Mar 2015 - 7:59 am | वेल्लाभट

स्तुत्य निर्णय !
जे बात !

नाखु's picture

4 Mar 2015 - 8:52 am | नाखु

नियमीतपणे "मिपा" वाचत आहे याचा हा ढळढळीत पुरावा ! *pardon* *dance4*
गोवंशाला अभय दिले गेले.
जय मिपा
जय मिपाकर
जयहिंद
जय महाराष्ट्र
जय ओसाडवाडी

राज्यात सध्या ६१% चारा कमतरता आहे. भाकड जनावरे पोसन्यासाठी २०००/ महिना खर्च येतो. माय बाप सरकारने कायदा केला आहे, तर ही जबाबदारी घ्यावी. नाहितर शेतकर्याचे पुन्हा मरण.

मंदार कात्रे's picture

4 Mar 2015 - 9:38 am | मंदार कात्रे

स्वातन्त्र्याच्या वेळी भारतात ९० कोटी गाई-बैल होते आणि लोकसंख्या ३३ कोटी
आज लोकसंख्या १३० कोटी असताना गाई-गुरांची संख्या २ कोटी आहे.
असे का झाले? जरूर विचार व्हावा...
एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुपालन-आधारित शेतीची आज अशी अवस्था का व्हावी?

गोमांस भक्षकांची काळजी नको, तशी काळजी घेण्यास पाकिस्तान-अरबस्थान समर्थ आहेत . ज्याना बीफशिवाय राहवत नाही त्यानी तिकडे जाउन खावे!

जय गौमाता ! जय हिन्द ! वन्दे मातरम !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 9:41 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आजही १३० कोटी वजा काही उद्योगपती आणि राजकारणी सोडुन उरलेली गुरंढोरचं आहेत.

असो. ९० कोटी नसाव्यात आणि आजही २ कोटीहुन बर्‍याचं जास्तं असाव्यात.

फक्त २ कोटी गाईगुरं धरली आणि त्यातल्या निम्म्या गाईम्हशी धरल्या तर त्यांच दुध महाराष्ट्राला तरी पुरेल का?

खंडेराव's picture

4 Mar 2015 - 10:17 am | खंडेराव

माफ करा, आकडे पुर्ण चुकिचे आहेत. आज जवळपास २० कोटी हुन जास्त फक्त गाई म्हशी आहेत. एकुन बघितले तर ५० कोटी हुन जास्त.

दुवा पहावा.

http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=109280

जय हिंद

विकास's picture

4 Mar 2015 - 10:18 am | विकास

गायींची संख्या ही २००७ च्या तुलनेत २०१२ मधे ६.५२% नी वाढलेली आहे. ती २०१२ च्या पशू गणनेनुसार १२.२९ कोटी आहे.

मंदार कात्रे's picture

4 Mar 2015 - 10:18 am | मंदार कात्रे

गाई-गुरे व रेडे-म्हशी अलग आहेत
म्हैस गोवंशामध्ये येत नाही ॓

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 10:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्म्म माहित नव्हतं हे.

अहो, तुम्ही लिहिले २ कोटी गाई गुरे.

आता, फक्त गाई सुद्धा १२ कोटी आहेत. ( २०१२)

तुम्ही त्यांच्या आकडेवारीवर संशय घेताय ??? देशद्रोही कुठले ..

त्यांनी जय गौमाता ! जय हिन्द ! वन्दे मातरम ! हे लिहिलेले वाचले नाहीत काय.? या सगळ्यांची शप्पथ घेवून ते सांगू शकतील की ते नेहमी खर्राच विदा देतात आणि त्यांनी दिलेला विदा हा खर्राच असतो.

या वेळेस माफ, पण पुढच्या वेळेस लक्षात ठेवा हो..

बादवे, कात्रेसहेब, फक्त महिष-वंशाची हत्या केली तर चालेल काय ? (कुक्कुट-वंश आणि इतर मरण्यासाठीच आहेत त्यांना तुम्ही मोजले पण नसेल तसे पण) नै म्हंजे अजून पण काय काय चालेल अन काय काय चालणार नै ते पण एकदा एका लेखात टाका राव.

कोंबडी प्रेमी's picture

4 Mar 2015 - 10:35 am | कोंबडी प्रेमी

चर्मण्वती / अनुस्तरणी ...हे कुणी नीट सांगेल का ?

धडपड्या's picture

4 Mar 2015 - 7:45 pm | धडपड्या

बहुदा, मनाला येईल तेथे चरणार्या व अनुला निस्तरायला लावणार्य वगैरे असावे.. :)

मराठे's picture

4 Mar 2015 - 8:11 pm | मराठे

शिम्पळ आहे.

चर + मण + वती = मणभर चरणारी
अनु: + तरणी = लहान तरूणी, लहान मुलगी/वासरू.

प्रसाद१९७१'s picture

4 Mar 2015 - 10:55 am | प्रसाद१९७१

म्हशीं आणि रेड्यां वरच्या अन्याया मुळे निषेध.

वेल्लाभट's picture

4 Mar 2015 - 11:07 am | वेल्लाभट

अनेक देशात त्या त्या देशाच्या प्रमुख धर्माप्रमाणे, प्रथांप्रमाणे, इतिहासाप्रमाणे कायदे आहेत. त्यानुसार अनेक देशात अनेक होष्टींप्वर बंदी आहे. हा आमचा देश आहे. आम्ही गायीचं मटण निषिद्ध मानतो. त्यामुळे आमच्या देशात गायींच्या हत्येवर बंदी आहे. जिथे नाही तिथे जाऊन खावं ज्यांना हवं त्यांनी. आम्ही जगभर तर बंदी नाही ना आणली अजून?!

प्रसाद१९७१'s picture

4 Mar 2015 - 11:29 am | प्रसाद१९७१

जिथे नाही तिथे जाऊन खावं ज्यांना हवं त्यांनी.

त्या पेक्षा ज्यांना खायचे नाही त्यांनी खाऊ नये असे वाक्य असते तर बरे झाले असते.

आणि प्राणीजगतात एकाच प्राण्याला विशेष स्थान दिलेले अजिबात पसंत नाही.

निनाद जोशी's picture

4 Mar 2015 - 12:47 pm | निनाद जोशी

अहो सरकारला काही गोष्टींवर बंदी घालण्याचा पूर्ण अधिकार आहे. उद्या काही लोक असं हि म्हणतील आम्ही ड्रग्स घेतो आणि घेणार ज्यांना नाही घ्यायचे त्यांनी घेऊ नये. ह्या विधानालाही तुम्ही समर्थन द्याल का??? महाराष्ट्रात गाय हि पूजनीय होती आणि आहे हे निर्विवाद सत्य आहे . त्यासाठीच वसुबारस नावाचा एक खास दिवस मराठी दिवसांमध्ये आहे ज्यात बायका गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतात. असे असताना तिच्या हत्येवर बंदी घातली तर काय चुकीचे केले??? गुजरात गांधीजींचे मुख्य कर्मराज्य असल्यामुळे तिथेही दारू बंदी आहेच कि......

वेल्लाभट's picture

4 Mar 2015 - 1:06 pm | वेल्लाभट

+१ ! अनुमोदन.

Medicinal values of Cow urine

Uses
Urea : Product of protein metabolism. Strong antimicrobial agent.
Uric Acid : Anti microbail activity helps to control cancer.
Nitrogen : Diuretic, stimulates kidney
Sulphur : Purifies blood, increases intestinal peristalsis
Copper : Controls fat deposition
Iron : Production of RBC in blood
Sodium : Purifies blood, checks hyperacidity
Potassium : Appetizer, eliminates muscles fatigue
Other salts : Antibacterial, prevents comma and ketoacids
Carbolic Acid : Antibacterial, prevents gas gangrenes
Ammonia : Integrity of body tissue and blood
Sugar-Lactose : Heart, thirst, giddiness
Creatinine : Antibacterial
Swarna Kshar : Antibacterial, improves immunity (aurum hydroxide) acts as antidote
Enzyme-urokinase : Dissolve blood clot, improves heart disease, blood circulation
Colony stimulating factor : Effective for cell division and multiplication
Erythropoietin stimulating factor : Production of RBCs
Gonadotropin : Promotes menstrual cycle, sperm production
Kallikrein : Releases Kallidin which expands peripheral veins and reduces blood pressure.
Allantoin : Heals wounds and tumors
Anticancer substances : Prevents multiplication of carcinogenic cells
Phenols : Bactericidal, antifungal

गायीचे दूध - हे सर्वश्रेष्ठ आहार मानले गेले आहे. आईच्या दुधाला पर्याय फक्त गायीचे दूधच आहे. गायीच्या दुधामध्ये मुबलक प्रमाणात कॅरोटीन नावाचे तत्त्व असते, ज्याचे पुढे व्हिटॅमीन ‘ए’ मध्ये रूपांतरण होते. अन्य दुधामध्ये कॅरोटीन खूप कमी आढळते. गायीच्या दूधामुळे मेंदूच्या शक्तीमध्ये वाढ होण्यास मदत होते. अन्य दुधांच्या तुलनेत फॅट व कोलेस्टेरॉलचे प्रमाणसुद्धा गायीच्या दुधात खूप कमी असते.

शेण- एकाचा कचरा दुसऱ्याचे पोषक द्रव्य, या नियमाप्रमाणे खत म्हणून याचा उपयोग होतो. शेण अथवा राखेमुळे किरणोत्सर्गापासून संरक्षण होते म्हणून शेणाने घर किंवा भिंती सारवतात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार शेणाइतके चांगले जंतुनाशक असू शकत नाही. शेण जाळल्यावर होणाऱ्या धुरामुळे विषारी जंतू नष्ट होतात व वातावरणाची शुद्धी होते. शेणामध्ये नायट्रोजन, स्फुरद व पोटॅश असते. शेण व गोमूत्र यापासून निर्माण होणाऱ्या खत व औषधामुळे जमिनीचा पोत सुधारतो व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्वात मोठा फायदा शेणामुळे बायोगॅस चालतो व बायोगॅसमधून ६७ टक्के मिथेन वायू मिळतो.

वरील माहिती 'आ. जा' वरून साभार,

अंधश्रद्धा असू नये, पण श्रद्धा असायला हरकत नसावी, आणि थोडे अवांतर ज्या जीवांनी (आपले आई वडील पण आले) त्यांच्या उमेदीच्या काळात आपल्याला, आपल्या कुटुंबाला मदत केली त्यांना कमी उपयोगाचे किवा निरुपयोगी झाल्यावर बाजूला सारणे कितपत योग्य ?

शेण अथवा राखेमुळे किरणोत्सर्गापासून संरक्षण होते

वरील माहिती 'आ. जा' वरून साभार, आंजावर लिहिलेले सारेच खरे (सत्य) असते असा तुमचा समज आहे का??

साती's picture

4 Mar 2015 - 6:10 pm | साती

Uses
Urea : Product of protein metabolism. Strong antimicrobial agent.
Uric Acid : Anti microbail activity helps to control cancer.
Nitrogen : Diuretic, stimulates kidney
Sulphur : Purifies blood, increases intestinal peristalsis
Copper : Controls fat deposition
Iron : Production of RBC in blood
Sodium : Purifies blood, checks hyperacidity
Potassium : Appetizer, eliminates muscles fatigue
Other salts : Antibacterial, prevents comma and ketoacids
Carbolic Acid : Antibacterial, prevents gas gangrenes
Ammonia : Integrity of body tissue and blood
Sugar-Lactose : Heart, thirst, giddiness
Creatinine : Antibacterial
Swarna Kshar : Antibacterial, improves immunity (aurum hydroxide) acts as antidote
Enzyme-urokinase : Dissolve blood clot, improves heart disease, blood circulation
Colony stimulating factor : Effective for cell division and multiplication
Erythropoietin stimulating factor : Production of RBCs
Gonadotropin : Promotes menstrual cycle, sperm production
Kallikrein : Releases Kallidin which expands peripheral veins and reduces blood pressure.
Allantoin : Heals wounds and tumors
Anticancer substances : Prevents multiplication of carcinogenic cells
Phenols : Bactericidal, antifungal>>

हेच सगळे पदार्थं शेळ्या मेंढ्यांपासून माणसांपर्यंत प्रत्येक सस्तन प्राण्याच्या मूत्रात असतात.
गाईत काय ब्वॉ विश्शेष?

पैसा's picture

4 Mar 2015 - 7:47 pm | पैसा

मोरारजी देसाई 'शिवांबू' प्राशन करत होते बहुतेक.

(हे लिहिताना पण मला "युक" वाटतंय.)

वेल्लाभट's picture

4 Mar 2015 - 1:00 pm | वेल्लाभट

ज्यांना रहायचं नाही इथे त्यांनी राहू नये असं कदाचित योग्य ठरेल नाही का?

:-) काय सांगताय! कधी केरळात जाउन या. आणि नॉर्थ ईस्ट ला सुध्दा. खुप लोक आहेत या देशात.

तुम्हि, महाराश्ट्र देश तर म्हनत नाही आहात ना?

बाकी, रस्त्यावर फिरणार्या गाईचेही काही करा.

प्रसाद१९७१'s picture

4 Mar 2015 - 12:05 pm | प्रसाद१९७१

पूर्वी तर ह्या देशाची जनता ( ब्राह्मण धरुन ) खायचे म्हणे गोमास. ह्यात तथ्य असेल तर कुठल्या परंपरे विषयी चर्चा चालू आहे?

ज्योति अळवणी's picture

9 Mar 2015 - 9:37 am | ज्योति अळवणी

तुमच्या मताशी संपूर्ण सहमत वेल्लाभट

'पिंक' पॅंथर्न's picture

4 Mar 2015 - 12:09 pm | 'पिंक' पॅंथर्न

काल रात्री कळालेली बातमी...

गोहत्या बंदी ला 'एम आय एम' कोर्टात आव्हान देणार आहे.

निनाद जोशी's picture

4 Mar 2015 - 12:14 pm | निनाद जोशी

गोवंशहत्या बंदी बद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रात गाय हि पूजनीयच आहे. त्यामुळे महाराष्ट्रापुरती हि बंदी ठेवण्यास काहीच हरकत नाही. शिवाजी महाराजांचा दाखला आपण सर्वत्र देतो तेव्हा त्यांचा हा विचारही अंमलात आणल्यास काहीच हरकत नाही......

गवि's picture

4 Mar 2015 - 1:53 pm | गवि

..
कांदा लसूण
पोर्क
मद्य

..या गोष्टींवर ठराविक धर्माला /पंथाला निषिद्ध म्हणून सरसकट बंदी आल्यास काय मत असेल? सर्वांना आहे प्रश्न.

आणि अशी मागणी झाल्यास कोणत्या न्यायाने नाकारायची?

निनाद जोशी's picture

4 Mar 2015 - 2:16 pm | निनाद जोशी

गाय आमच्यासाठी पूज्य आहे म्हणून तिला मारणे त्याज्य करण्याला आम्ही समर्थन करतो. बाकी तुम्ही ज्या गोष्टी बोललात त्या एखाद्या धर्मात वा पंथात पूज्य नाहीत.... तुम्ही एखाद्या गोष्टीवर अथवा जीवावर प्रेम करता त्याला हानी झालेली तुम्हाला नक्कीच पटणार नाही......

कांदा लसूण
पोर्क
मद्य
या गोष्टींवर ठराविक धर्माला /पंथाला निषिद्ध म्हणून सरसकट बंदी आल्यास काय मत असेल?

सजीव आणि निर्जीव यात थोडे अंतर करावे, थोडे अवांतर ज्या जीवांनी (आपले आई वडील पण आले) त्यांच्या उमेदीच्या काळात आपल्याला, आपल्या कुटुंबाला मदत केली त्यांना कमी उपयोगाचे किवा निरुपयोगी झाल्यावर बाजूला सारणे कितपत योग्य ?

hitesh's picture

4 Mar 2015 - 1:54 pm | hitesh

मला तर बै तो पीके आठवला.

गाईवर देवाचा शिक्का म्हणुन गाय मारायची नाही.

पण गाय मारुन खाणारे आता इतर प्राणी खातील !

माणसांची गोमाता आता इतर प्राण्यांच्या मृत्युला कारणीभुत ठरेल.

धन्य तो धर्म अन धन्य ती गोमाता !

काल पाउस पडला तो पाउसच होता की सावरकरांचे अश्रू ?

निनाद जोशी's picture

4 Mar 2015 - 2:02 pm | निनाद जोशी

मला सावरकरांनी असे कुठे म्हटले आहे हे वाचायची वा ऐकायची फार इच्छा झाली आहे जरा सांगता का कुठे आहे ते ????

अत्रन्गि पाउस's picture

4 Mar 2015 - 2:18 pm | अत्रन्गि पाउस

ह्या पुस्तकात श्री पु गोखले ह्यांनी उल्लेख केला आहे असे वाटते ... भारताला अन्नधान्याची कमी असली तरी एक नैसर्गिक शेत १२ महिने उपलब्ध आहे ते म्हणजे आपला सागर किनारा ... लोकांनी भरपूर मासे खाल्ले तर आपली अन्नधान्याची चणचण कमी होईल अशा अर्थाचे संवाद आहेत ...
त्यातच पुढे गाय हा एक उपयुक्त पशू आहे असाही उल्लेख असावा असे वाटते (निश्चित करण्यासाठी पुन:परिशीलन करावे लागेल)

निनाद जोशी's picture

4 Mar 2015 - 2:32 pm | निनाद जोशी

हा उल्लेख गायीकडून मिळणारे दुध ह्या संदर्भातही असू शकतो. ते हि अन्नधान्यास पूरकच आहे. ह्याचा अर्थ थेट गोमांसाशी जोडला जाऊ शकत नाही....

अत्रन्गि पाउस's picture

4 Mar 2015 - 2:42 pm | अत्रन्गि पाउस

बघून सांगतो

इरसाल's picture

4 Mar 2015 - 2:54 pm | इरसाल

धर्मांतरचं कुठपर्यन्त आलयं ?

अत्रन्गि पाउस's picture

4 Mar 2015 - 3:10 pm | अत्रन्गि पाउस

कुठून कुठल्या धर्मांतराविषयी आहे त्यावर आहे उत्तर :)

इरसाल's picture

5 Mar 2015 - 2:29 pm | इरसाल

ते हितेसभाइ साठी होतं

अत्रन्गि पाउस's picture

5 Mar 2015 - 2:43 pm | अत्रन्गि पाउस

च्च च्च च्च

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 10:28 am | मृत्युन्जय

माणसांची गोमाता आता इतर प्राण्यांच्या मृत्युला कारणीभुत ठरेल.

धन्य तो धर्म अन धन्य ती गोमाता !

काही धर्मातले लोक डुक्कर निषिद्ध मानतात आणि त्यामुळे खात नाहित. त्यामुळे माणसे इतर प्राणी खातात. या धर्मांच्या माणसांमुळे आणि डुक्करांमुळे इतर प्राणी मारतात. धन्य ते धर्म आणि धन्य ती डुक्करे. दरवर्षी पडणारा पाऊस हा पाऊसच असतो की प्रेषिताचे अश्रु?

hitesh's picture

5 Mar 2015 - 12:01 pm | hitesh

डुक्कर निषिद्ध मानणारे इतराना तुम्हीही खाऊ नका असे सांगत नाहीत.

गाय न खाणारे स्वतः खात नाहीत... पण आम्हाला गाय पूज्य आहे म्हणुन बाकीही कुणी गाय खायचीच नाही अशी इतरांवर सक्ती करतात व याला ते देशप्रेम म्हणतात.

अत्रन्गि पाउस's picture

5 Mar 2015 - 12:20 pm | अत्रन्गि पाउस

पाकिस्तान किंवा तत्सम देशात पोर्क मिळते का हो ? आणि तिथेही ते आम्ही खात नै पण तुम्ही खा ..अगदी पोटभर खा असे सांगतात का ??

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 12:24 pm | संदीप डांगे

इथे पाकिस्तान कुठे आला?

डुक्कर निषिद्ध मानणारे इतराना तुम्हीही खाऊ नका हे इतरांना सांगणे ...हे कुठे तर जिथे हे म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही तिथे ...पण जिथे शक्य आहे उदा पाकिस्तान तिथे काय परिस्थिती आहे ?

कळाले नाही. पाकिस्तान हे फेलड स्टेट आहे. तिथे काय शक्य आहे?

वेल्लाभट's picture

5 Mar 2015 - 2:33 pm | वेल्लाभट

फेल्ड स्टेट म्हणून विषयाला बगल देऊ पहाता का?
त्यांना डुक्कर निषिद्ध आहे. मग म्हणून तिथे 'इतरांना' ते मिळतं का कापायला खायला? सांगा!

बगल नाही हो वेल्लाभट. तुमचा आदर्श पाकिस्तान आहे कि काय? जरा युरोप अमेरिका बघा की.

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 12:41 pm | मृत्युन्जय

इथे कुठेच नाही आला. तो भारताच्या शेजारी येतो. काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात वगैरे राज्यांना लागुन. थोडे गुगलुन बघितले तर नकाशा मिळेल.

बाळ सप्रे's picture

5 Mar 2015 - 12:38 pm | बाळ सप्रे

पाकीस्तान किंवा तत्सम देश तुमचा आदर्श आहे का? नसेल तर त्यांच्यासारखं कशाला वागायला हवं...

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 12:40 pm | मृत्युन्जय

काय आहे हितेशभाऊ तसेच हिंदु देखील कोणाला गाय खाऊ नका म्हणुन नाही सांगत.

पण मला हे समजुन घ्यायला नक्कीच आवडेल की पाकिस्तान आणि सौदीत डुक्करे मारुन खायला परवानगी आहे का? नाही तिथली सरकारे मुस्लिम सरकारे आहेत म्हणजे कायदे मुस्लिमच करतात म्हणुन विचारले.

हम्म असे मांडायला/विचारयला हवे होते ...

आपले सरकार हिंदु सरकार आहे का?

दुबई, जे सगळ्यात प्रगत आहे आहे सौदीत, तिथे पोर्क मिळते.
Israel मधे मिळते. ज्यु धर्मात पोर्क खाल्ले जात नाही.

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 12:58 pm | बॅटमॅन

दुबई सौदीत आहे का हो? नै म्हणजे आमचा भूगोल अंमळ कच्चाच म्हणून विचारले आपले.

मान्य :-) दुबई सौदीत नाही पण अरब जगाचा पार्ट आहे, तो रेफरन्स होता.

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 1:58 pm | बॅटमॅन

हम्म :) ते बाकी आहेच.

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 4:07 pm | मृत्युन्जय

सौदी आणि दुबई एकच? मी दुबईत बायकांना सर्रास मिनिस्कर्ट घातलेले बघितले आहे. स्विमसुटही (रस्त्यावर नाही हा). सौदी मध्ये बुरखा काढला तरी फटके बसतात म्हणे. हे म्हणजे सोमालिया आणि सोमनाथ एकच म्हटल्यासारखे आहे. चालु द्यात.

हे म्हणजे सोमालिया आणि सोमनाथ एकच म्हटल्यासारखे आहे.

अगायायो =))

अत्रन्गि पाउस's picture

5 Mar 2015 - 1:22 pm | अत्रन्गि पाउस

ओक्के ... हेच विचारायचे होते ..धन्यवाद

बाकी सौदी / पाकिस्तान बाबत (कुणा कडूनही) उत्तराच्या अपेक्षेत

स्वप्नांची राणी's picture

5 Mar 2015 - 4:30 pm | स्वप्नांची राणी

कतार मधे पोर्क मिळते. २०११ च्या आधी पुर्णपणे बंदी होती. आताही कतार डीस्ट्रीब्युशन कंपनी या एकाच कंपनी मार्फत मिळते. तेच लोक फक्त घरच्या घरीच प्राशनासाठी अल्कोहोलही विकतात. एक परमिट घ्यावे लागते अल्कोहोल खरेदीसाठी. पोर्क फक्त एक्स्पॅट कम्युनिटिलाच विकत घेता येते, कतार्‍यांना नाही.

घरच्या घरीच प्राशनासाठी याचा अर्थ ईथे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशनास बंदी आहे. मद्य विकत घ्यायचे आणि डायरेक घरीच जायचे. अलोहोलबाबत शुन्य सहनशक्ती आहे.

मधेच कोणीतरी बीचवर बिकीनी काढली होती...तर हो, हो, हो...त्रिवार हो. बीचवर बिकीनी आणि मॉलमधे मिनी घातलेली चालते. बिचवर सुर्यस्नानही करतात लोक.

सौदी अरेबियात काही बदल घडण्याची शक्यता नाही. तरिही तिथे अमेरिकन बेसवर सगळी मज्जानू लाईफ आहे. पोर्क काय..दारु काय..ज्ये पायजे ते!!

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 4:01 pm | मृत्युन्जय

तेच तर म्हणतो ना. आपले सरकार हिंदु नाही. त्यामुळेच या कायद्याला धार्मिक रंग द्यायचा आणि हे सगळे हिंदुंनी केले म्हणुन उर बडवायचा यात काय हशील?

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 1:06 pm | संदीप डांगे

भारत हा धर्मनिरपक्ष देश आहे. इथे प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे खाण्यापिण्याचा हक्क ज्याला त्याला आहे.
कायदा काय म्हणतो आहे आणि तुम्ही त्याला धार्मिक रंग का देत आहात?
तुम्हाला मुस्लिम राष्ट्रांचा आदर्श ठेवायचा आहे का?

बाकी हे बरे असते हो लोकांचे, सोयिस्करपणे कधी अमेरिका, युरोपकडे बघा म्हणतात तर कधी अरब राष्ट्रांकडे बघा म्हणतात. आपला आपण स्वयंभू विचार कधी करणार आहेत देव जाणे.

अत्रन्गि पाउस's picture

5 Mar 2015 - 1:18 pm | अत्रन्गि पाउस

१ डुक्कर खाणारे इतरांना तुम्ही डुक्कर खाऊ नका असे म्हणत नाहीत
ह्या विधानावर प्रश्न आहे कि
२ सौदी / पाकिस्तान मध्ये डुक्कर मारून खाने चालते का ?

२ चे उत्तर होय असेल तर १ चे विधान खरे आहे ...
२ चे उत्तर नाही असेल तर १ विधान (अप्रत्यक्ष रित्या) खोटे ठरते
डुक्कर न खाणार्या लोकांनी इंग्लंड अमेरिका युरोपात लोकांना "तुम्ही डुक्कर खाऊ नका हे सांगणेच त्यांना शक्य नाही"

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 3:14 pm | संदीप डांगे

तुमच्या या प्रतिसादाचा एकूण गोवंशहत्याबंदी आणि भारतदेशातल्या नागरिकांच्या खाण्यापिण्याचे मूलभूत स्वातंत्र्य यांचा काय संबंध आहे जरा इस्कटून सांगता काय?

विषयाशी थेट संबंध नसलेली कोडी सोडवण्यात आमची बुद्धी काम करत नाही. क्षमस्व.

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 3:58 pm | मृत्युन्जय

धार्मिक रंग हितेश चाचांनी दिला हे दिसले नाही का तुम्हाला कॉम्रेड डांगे? ;)

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 4:29 pm | संदीप डांगे

धार्मिक रंग सिले़क्टीवली हितेशने दिला आहे का? धन्यवाद. इतर सर्वजण गायींचे निर्णयस्वातंत्र्य आणि माणुसकी यावरच चर्चा करत आहेत तर. त्यामुळेच कदाचित याच धाग्यावर मी जे दहा प्रश्न दिले आहेत त्यावर अजूनही काही उत्तर नाही आले जाणकारांकडून.

गवि, कपिलमुनि, बॅटमॅन, प्रसाद यांच्या सडेतोड प्रतिसादावर तुमच्याकडे काही उत्तर नाही. का?
सोयीस्करपणे डुक्कर हेच मांसाहाराचे प्रतिक बनवत आहेत असे का? गायींच्या कत्तलीबद्दल दांभिक पुळका येणार्‍यांना इतर प्राणी हेही गायींप्रमाणे सजिव आहेत त्यांच्या कत्तलीबाबत काही वाटत नाही, असे का?

गोवंशहत्याबंदी कायद्याने आता मुसलमानांना बिफ खायला मिळणार नाही, त्यांची कशी गोची केली असा आणि फक्त एवढाच आसुरी आनंद मिळवू पाहणार्‍यांच्या मनात खरंच गायीबद्दल प्रेम आहे?

बादवे, तसे असेल तर या सोकॉल्ड हिंदूंनी सर्वप्रथम गायीचे दूध पिणे बंद केले तर गायींवर जिवंतपणी होणारे अत्याचार ताबडतोब बंद होतील. दूधासाठी गायी कुणी पाळणारच नाही, त्यामुळे त्या भाकड होण्याचा संबंध नाही, खाटकाकडे जाण्याचाही.

गायींबाबत हिंदूंचे प्रेम तेवढेच बेगडी आणि खोटे आहे जेवढे पिंजर्‍यांमधे पक्षी पाळणार्‍या पक्षीमित्राचे, कुत्र्यांना गळ्यात पट्टा घालून फिरवणार्‍या श्वानप्रेमींचे.

तसेच, गंगाधर मुंटेंच्या कवितेलाही अजून कुणा हिंदूपरंपराभिमानीने उत्तर दिलेले नाही.

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 5:07 pm | मृत्युन्जय

धार्मिक रंग सिले़क्टीवली हितेशने दिला आहे का? धन्यवाद.

हो. धन्यवाद

इतर सर्वजण गायींचे निर्णयस्वातंत्र्य आणि माणुसकी यावरच चर्चा करत आहेत तर. त्यामुळेच कदाचित याच धाग्यावर मी जे दहा प्रश्न दिले आहेत त्यावर अजूनही काही उत्तर नाही आले जाणकारांकडून.

मी प्रत्येकाच्या प्रतिसादाला प्रतिवाद करायला बांधील नाही. दांभिक आणि ढोंगी लोकांचा बुरखा फाडायची संधी मिळाली. त्यामुळे प्रतिसाद दिला. अजुन बाकीच्या मुद्द्यांवर मी काहीच प्रतिवाद केलेला नाही. तसे असताना तुम्ही या विषयावर माझ्यावर नसते आरोप / प्रतिसाद अपेक्षा का करत आहात?

गवि, कपिलमुनि, बॅटमॅन, प्रसाद यांच्या सडेतोड प्रतिसादावर तुमच्याकडे काही उत्तर नाही. का?

त्यांच्या प्रतिसादाशी मी सहमत / असहमत आहे असे कुठलेही विधान अजुन केलेले नाही. ते आपल्या प्रतिसादांशी प्रामाणिक असतात. त्यांचे प्रतिसाद हिंदु विरुद्ध उर बडवणारे नव्हते. त्यांचे प्रतिसाद धार्मिक रंग देणारे नव्हते. मी कुठल्या प्रतिसादांना प्रतिवाद केला आहे ते तर बघा आधी. तुम्ही सिलेक्टिव्ह रित्या ऊर बडवुन घेत आहात. माझा नाईलाज आहे.

सोयीस्करपणे डुक्कर हेच मांसाहाराचे प्रतिक बनवत आहेत असे का? गायींच्या कत्तलीबद्दल दांभिक पुळका येणार्‍यांना इतर प्राणी हेही गायींप्रमाणे सजिव आहेत त्यांच्या कत्तलीबाबत काही वाटत नाही, असे का?

मी शुद्ध शाकाहारी आहे. माझ्याच्याने कुठल्याही प्राण्याला मारवणार नाही (त्याच्यामुळे मला अपाय होणार नसेल तर)

गोवंशहत्याबंदी कायद्याने आता मुसलमानांना बिफ खायला मिळणार नाही, त्यांची कशी गोची केली असा आणि फक्त एवढाच आसुरी आनंद मिळवू पाहणार्‍यांच्या मनात खरंच गायीबद्दल प्रेम आहे?

असा आनंद ज्यांना झालेला आहे त्यांना हा प्रश्न विचारा. माझ्या मुद्द्यांवर तुमच्याकडे आणी हितेश चिच्चांकडे प्रतिवास नसल्याने तुम्ही भलतेच मुद्दे घुसडता आहात. माझ्या प्रतिसादावार तेवढ्याच मुद्द्यांवर प्रतिवाद करावा. बाकी मुद्यांसाठी वेगळी गल्ली शोधावी ही नम्र विनंती.

बादवे, तसे असेल तर या सोकॉल्ड हिंदूंनी सर्वप्रथम गायीचे दूध पिणे बंद केले तर गायींवर जिवंतपणी होणारे अत्याचार ताबडतोब बंद होतील. दूधासाठी गायी कुणी पाळणारच नाही, त्यामुळे त्या भाकड होण्याचा संबंध नाही, खाटकाकडे जाण्याचाही.

वरीलप्रमाणे

गायींबाबत हिंदूंचे प्रेम तेवढेच बेगडी आणि खोटे आहे जेवढे पिंजर्‍यांमधे पक्षी पाळणार्‍या पक्षीमित्राचे, कुत्र्यांना गळ्यात पट्टा घालून फिरवणार्‍या श्वानप्रेमींचे.

वरीलप्रमाणे

तसेच, गंगाधर मुंटेंच्या कवितेलाही अजून कुणा हिंदूपरंपराभिमानीने उत्तर दिलेले नाही.

वरीलप्रमाणे

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 5:33 pm | संदीप डांगे

मृत्युंजयजी,
वेगवेगळ्या प्रतिसादांच्या गोंधळात काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय.

माझ्या प्रतिसादावर अत्रंगी यांनी प्रतिसाद दिला त्यावर त्यांना मी उपप्रतिसाद दिला, त्या उपप्रतिसादावर वर तुमचा हितेशचाचा वाला प्रतिसाद आला, त्यावर मी प्रतिसाद दिला तर तुमचे हे उत्तर. लोच्या है भै...

जरा नीट वाचले पाहिजे नेमका गोंधळ कुठे झाला ते...

मी माझे म्हणणे वरती मांडले आहे .....

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 6:12 pm | मृत्युन्जय

च्यामारी. मिपा गोंधळ घालते कधीकधी. जौद्यात सोडुन द्या.

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 6:15 pm | बॅटमॅन

.

द्विशतक निमीत्त धागाकरते आणी समस्त मिपाकरांचा सत्कार एक -एक प्लेट करंभ,परिवाप आणी पुरोडाश देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम वैदिक कार्यकर्ते

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 6:30 pm | मृत्युन्जय

त्यापेक्षा एक किलो बीफ द्या प्रत्येकाला. कसे?

स्वप्नांची राणी's picture

5 Mar 2015 - 6:34 pm | स्वप्नांची राणी

एक प्लेट परिवाप चालेल मला पण..वडापावसारखं वाटतय...

अत्रन्गि पाउस's picture

5 Mar 2015 - 9:24 pm | अत्रन्गि पाउस

कृपा करा आणि पामरांना प्राकृत मध्ये समजवा ...

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 4:45 pm | मृत्युन्जय

तेच तर म्हणतो ना. आपले सरकार हिंदु नाही. त्यामुळेच या कायद्याला धार्मिक रंग द्यायचा आणि हे सगळे हिंदुंनी केले म्हणुन उर बडवायचा यात काय हशील?

मी फक्त इतकाच मुद्दा मांडला आहे. तुमचा हा प्रतिसाद कोणाच्या प्रतिसादाला होता हे न कळाल्यामुळे परत तोच प्रतिसाद दिला आहे.

तिता's picture

6 Mar 2015 - 2:28 pm | तिता

मी दुबईमध्ये राहतो. इथे पोर्क मिळते. पोर्क मिळणारा भाग सुपर मार्केटमध्ये वेगळा असतो आणि तिथे 'For Non-Muslims only' अशी पाटी असते.

hitesh's picture

8 Mar 2015 - 7:52 pm | hitesh

गाय व डुक्कर यात फरक आहे.

डुक्कर खाऊ नका असा सरसकट आदेश काढला तरी कुणाला फरक पडत नाही. लोक डुक्कर पाळणारही नाहीत व कुणी खाणारही नाहीत.

पण हिंदु धार्मिक लोक गाय खात नाहीत. पण त्याना दूध मात्र हवे असते. कुणीतरी गाय पाळायची , याना दूधही द्यायचे व ती भाकड झाली तरी त्या बिचार्‍याने स्वखर्चाने पाळही बसायची . शिवाय नवी दुभती गाय आणुन यांची पुन्हा सोयही करायची.

धर्मांधता कुणाची व भुर्दंड कुणाला ! हा मुख्य मुद्दा आहे.

गाय पवित्र मानणार्‍यानी भाकड गायी पाळायला सुरु कराव्यात

हाडक्या's picture

8 Mar 2015 - 8:26 pm | हाडक्या

कुणी खाणारही नाहीत.

हे कसे काय हो ? कळाले ही नाही. म्हणजे पोर्क खातातच की लोकं. सॉसेज खातात. झालंच तर बर्‍याच भटक्या जमाती अजून ही डुक्कर पकडून मारून खातात की.

बाकी शक्य असेल तर थोडे तटस्थ होऊन लिहा की राव. नाय तर तुमचे ते परखड मत आणि इतरांची ती अस्मिता हे काय पटत नाय.

असो.

hitesh's picture

8 Mar 2015 - 11:53 pm | hitesh

अहो ते पाकिस्तानातील डुक्करबंदी व इथली गोबंदी यासंदर्भात आहे.. वर कुणीतरी विचारले होते की की पाकिस्तानात सरसकट डुक्करबंदी आहे का ?

त्याबाबत मी लिहिले आहे... तिथे सरसकट डुक्करबंदी केली तर फरक पडत नाही.

पण गाय ही दुधाच्या हेतूने शेतकरी पाळतो.. ती गाय भाकड झाल्यावर त्यालाच पाळावी लागेल. गोप्रेमी लोक त्याला मदत करतील का ? या संदर्भात ते लिहिले आहे.

आपल्याकडे बरेच लोक डुक्कर खातात . मला कल्पना आहे.

तिथे सरसकट डुक्करबंदी केली तर फरक पडत नाही.

फरक पडतो. मी दारु पिणार नसेन तरीही सरसकट दारुबंदीच्या विरोधातच असेन. तशीच ही पण गोष्ट आहे.
कोणाला खायचा असेल डुक्कर, तर बंदी करणारे कोण ? आणि तुम्ही त्याने फरक पडत नाही म्हणण्याचा काय संबंध ? अशी सरसकट बंदी चूकच (आणि चूक ला चूक म्हणा की स्पष्ट).

तुमचा दांभिकपणा उघड पडतोय इथे.

hitesh's picture

9 Mar 2015 - 6:53 am | hitesh

बंदी असणे हे चूकच आहे , हे मान्य आहे.

कोंबडी प्रेमी's picture

5 Mar 2015 - 5:28 pm | कोंबडी प्रेमी

संकलित करण्याची जरुरी आहे ...

या विषयावर जास्त विचार केलात तर डोक्याचा भुगा होईल.
तात्विक दृष्टीकोनातून विचार करा - गाय बैल आपल्याकडे शेतीच्या कामासाठी वापरले जातात. आता आयुष्यभर त्यांच्याकडून काम करून घेणे आणि नंतर खाटकाला नेउन विकणे चूक. पण कर्जात बुडालेला शेतकरी करणार काय?
मुंबईत कबुतरे वाढली तर रोगराई वाढली, उद्या गायी वाढल्या आणि रस्त्यात बसून त्यांनी वाहतुकीची कोंडी केली, एखादी रुग्णवाहिका वेळेवर इस्पितळात नाही पोहोचली तर जीव जाइल ना कोणाचा तरी. आणि डोईजड झालेल्या गायी रोज मरत असतात. प्लास्टिक च्या पिशव्या खाउन! ३०-३५ किलो प्लास्टिक निघते पोटातून. नाहीतर भुकेने व्याकुळ होऊन मरतात. शेवटी दुर्दैवी मरण त्यांच्यासाठी ठरलेले आहे. या नाहीतर त्या बाजूने. पशुप्रेमी म्हणून एखादी व्यक्ती ३-४ भाकड गायी सांभाळू शकतो पण इथे हजारो गायींचा प्रश्न आहे! सरकारने कायदा करून चालणार नाही, त्या हजारो गायींचे काय करायचे, हे सुद्धा सांगावे.

अत्रन्गि पाउस's picture

4 Mar 2015 - 2:41 pm | अत्रन्गि पाउस

उद्या गायी वाढल्या आणि रस्त्यात बसून त्यांनी वाहतुकीची कोंडी केली, एखादी रुग्णवाहिका वेळेवर इस्पितळात नाही पोहोचली तर जीव जाइल ना कोणाचा तरी.
हे जरा अति खेचलेले वाटत नाही का ? रुग्णवाहिकेला अडवायला आपले रिक्षावाले, बाईक वाले , कारवाले सगळेच किती तत्पर असतात ... एखाद्या गाईने रुग्णवाहिकेला अद्व्ल्याचे ऐकिवात /पाहण्यात नाही ...किंबहुना हॉर्न वाजवल्यावर गाय चट्कन बाजूला होते ...

अगदी अगदी....मेरे मन को भाया, मैं गाय काटके खाया छाप प्रकार वाट्टो आहे.

सुचिकांत's picture

4 Mar 2015 - 2:47 pm | सुचिकांत

यावर एकच उपाय आहे. देशातल्या मंदिरांनी गोशाळा उभ्या कराव्यात आणि सर्व भाकड गायींना सांभाळावे, नाहीतर प्रत्येकाने आपल्या पगारातून गो संवर्धनासाठी ठराविक रक्कम बाजूला काढून द्यावी

गोभक्तांची मुक्ताफळे ऐकून बाकी मजा वाटली.

निनाद जोशी's picture

4 Mar 2015 - 2:30 pm | निनाद जोशी

ह्यात मुक्ताफळे कोणती होती हे जरा सांगू शकता का ज्यात अजिबात तथ्य नाही ......

सरसकट म्हशीचे दूध पीत असूनही म्हशीला प्रोटेक्शन न देणे, गायींना मारू नये म्हणून ज्या गौ सेवा संस्था काढल्या आहेत तिथे गायींची कंडिशन इतकी वाईट असते की मरण हाच त्यांच्या सुटकेचा एकमेव मार्ग असतो कैक वेळेस-तरी तिकडे दुर्लक्ष करणे, सावरकरांच्या विचारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे, वैदिक धर्मातील आहाराकडे दुर्लक्ष करणे, आणि एकूणच बिनडोकपणे बोंबा मारणे, इ.इ.

सध्याच्या जगात नॉनव्हेजचे प्रमाण अ‍ॅज़ अ होल कमी झाले तर ते पर्यावरणाच्या फायद्याचे आहे. चिकनमटन सगळेच कमी खाऊ लागले तर ठीक, पण तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून जे मांस बहुसंख्य हिंदू लोक सध्या खातच नाहीत त्याच्याच नावाने बोंबा मारणे हे खास बिनडोक गोभक्तांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

अशी नानाविध बाष्कळ मुक्ताफळे "हा आमचा देश आहे" वगैरे (१६ मे नंतर या प्रवृत्ती जास्त माजल्यात) छापाची उधळणे हे यांचे पेटंट कसब आहे. लय मज्जा येते निरर्थक बिनबुडाच्या गैरसमजुती ऐकायला, अजून चालूद्यात.

निनाद जोशी's picture

4 Mar 2015 - 2:44 pm | निनाद जोशी

मगाशी हि मला उत्तर मिळाले नाही.... सावरकरांनी असे कुठे म्हंटले आहे ते मला जरा कृपया सांगाल का.....

बॅटमॅन's picture

4 Mar 2015 - 2:47 pm | बॅटमॅन

अगदी नक्की सांगतो. जरा कळ काढा. आज रात्री वा उद्या रात्रीपर्यंत नक्की शोधतो.

खंडेराव's picture

4 Mar 2015 - 2:55 pm | खंडेराव

विन्ग्रजीत आहे, अनुवादित माहिती.

Cow is worthy of protection so long as this serves humanitarian and national interests

Animals such as the cow and buffalo and trees such as banyan and peepal are useful to man, hence we are fond of them; to that extent we might even consider them worthy of worship; their protection, sustenance and well-being is our duty, in that sense alone it is also our dharma! Does it not follow then that when under certain circumstances, that animal or tree becomes a source of trouble to mankind, it ceases to be worthy of sustenance or protection and as such its destruction is in humanitarian or national interests and becomes a human or national dharma? (Samaj Chitre or portraits of society, Samagra Savarkar vangmaya, Vol. 2, p.678)

…When humanitarian interests are not served and in fact harmed by the cow and when humanism is shamed, self-defeating extreme cow protection should be rejected…(Samagra Savarkar vangmaya, Vol. 3, p.341)

…A substance is edible to the extent that it is beneficial to man. Attributing religious qualities to it gives it a godly status. Such a superstitious mindset destroys the nation’s intellect.

The cow is but a milch symbol of the Hindu nation. By no means should it be considered its emblem

बॅटमॅन's picture

4 Mar 2015 - 3:02 pm | बॅटमॅन

धन्यवाद!!!!

बॅटमॅन's picture

4 Mar 2015 - 2:51 pm | बॅटमॅन

http://mayurkhape.blogspot.in/2010/06/blog-post_9744.html

समग्र सावरकर, खंड ८. सरसकट गोमांसभक्षणाचा पुरस्कार नसला तरी आंधळ्या गोभक्तीला विरोध केलेला आहे. गोभक्तांना ते समजेल अशी आशा करणे व्यर्थ आहे.

निनाद जोशी's picture

4 Mar 2015 - 3:21 pm | निनाद जोशी

ह्यात त्यांनी स्वसंरक्षण वा राष्ट्र संरक्षण ह्यासाठी गोहत्या मान्य केली आहे आणि ती मान्य करण्यासारखीच आहे परंतु त्यांनी भक्षणासाठी गोहत्या सांगितली नाही आहे. गाय हि हिंदू धर्माचं प्रतिक नसली तरी पूज्य आहे हे त्यांनी हि मान्य केले आहे. त्यामुळे सांभाळणे जड झाले म्हणून तिला विकणे ह्याचे त्यांनी कोठेही समर्थन केलेले नाही अथवा आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तिला मारावे ह्याचेही समर्थन केलेले नाही. त्यामुळे ह्या मुद्यावर सावरकरांचे मत हे व्यर्थ गोहत्येच्या बाजूने आहे असे मानता येउच शकत नाही.....

वरील भाषांतरित मजकुराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेत याची नोंद घेण्यात आलेली आहे.

खंडेराव's picture

4 Mar 2015 - 3:34 pm | खंडेराव

savarkar.org

काही मराठीत
हे पशु पहा ! मनुष्यांच्या सेवेला आणि सुखाला हवे तसेच विविध, हवे तितकेच बुद्धिमान, वाळवंटातील ते मनुष्याचे तारू - म्हणून काटे खाऊन पाण्यावाचून महिनोगणती चालण्याची युक्ति त्या उंटाला शिकविली. तो घोडा किती चपल ! त्याच्यावर स्वारी भरणार्‍या मनुष्यास भर रणांगणाताही सांभाळून वहाण्याइतकी नि मनुष्याशी अत्यंत प्रामाणिकपणे वागण्याइतकी बुद्धि त्याला देवाने दिली. पण मनुष्यावरच स्वारी भरण्याइतकी बुद्धिमात्र दिली नाही! ही गाय पहा. एका बाजूला सुके गवत ढकलावे नि दुसर्‍या बाजूला त्याचे बनलेले त्याचे ताजे जीवनप्रद दूध चरव्या भरभरून काढीत बसावे ! असे ते आश्चर्यकारक रासायनिक यंत्र ज्या देवाने घडविले तो खरोखरच किती दयाळू असला पाहिजे! आणि पुन्हा प्रत्येक वेळी जुने यंत्र मोडताच नवे घडण्याचे श्रमसुद्धा मनुष्याला पडू नयेत अशी सोय त्यातच केलेली; पाहिल्या यंत्रातच गवताचे दूध करून देता देताच तसलीच नवीन अजब यंत्रे बनविण्याचीही व्यवस्था केलेली !

hitesh's picture

4 Mar 2015 - 5:52 pm | hitesh

ह्यात त्यांनी स्वसंरक्षण वा राष्ट्र संरक्षण ह्यासाठी गोहत्या मान्य केली आहे आणि ती मान्य करण्यासारखीच आहे परंतु त्यांनी भक्षणासाठी गोहत्या.........

.....

स्वसंरक्षणासाठी गोहत्या ! म्हणजे गाय अंगावर आली तर मारुन टाकावी की काय ?

A1 versus A2 Milk
Posts from Keith Woodford

The Desi Cow – Almost Extinct

Indian Cow Milk Benefits

Indian Cow and it`s benefits ( Scientific Facts )

आणि ज्याला कोणाला भाकड गाय पोसता येत नाही त्याने ती समाजसेवी संस्थांच्या हवाली करावी. यात जैन व मारवाडी लोकांच्या संस्था अग्रणी आहेत. ही लोक आपल्या उत्पन्नाचा एक भाग वेगळा काढून ह्या गायी पोसण्यासाठी वापरतात.

खंडेराव's picture

4 Mar 2015 - 3:07 pm | खंडेराव

धन्यवाद. हा कायदा देशी गायीपुरता मर्यादीत नाही. ४०% ह्य जर्सी आणि इत्सम आहेत. त्यान्चे बैल हि शेतीकामाचे नसतात. ते काय करायचे? कोणी संभाळायचे? वरच्या संस्था १० कोट जनावरे संभाळतील?

१९६० मधे या कायद्याला विरोध झाला तो अर्थिक कारनामुळे. डेरी धंदा पुढे न्यायचा असेल तर निरुपयोगी जनावरे काढलीच पाहिजेत.

अत्रन्गि पाउस's picture

4 Mar 2015 - 3:13 pm | अत्रन्गि पाउस

तो एक गायीसारखा प्राणी आहे असे कुणीतरी अलीकडेच सांगत होता ....
देशी गाय हा वेगळा प्राणी आहे आणि ब्राझील का आणखीन कुठल्या तरी देशात त्याचे शुध्द वाण मोठ्या प्रमाणात जोपासले जात आहे अशीही माहिती होती....

अ‍ॅक्चुअली महाराष्ट्र बीफ हब झाला पाहिजे.

कपिलमुनी's picture

4 Mar 2015 - 2:48 pm | कपिलमुनी

गायींना पोसण्यापेक्षा अनाथांना , माणसांना पोसण्यात हे पैसे सत्कारणी लागतील.
बाकी हिंदू धर्मात गायीला पवित्र मानायचा खूळ केव्हापासून घुसले हे कळाले तर जास्त आवडेल.

बाळ सप्रे's picture

4 Mar 2015 - 3:03 pm | बाळ सप्रे

आता मत्स्य, कूर्म, वराह वगैरेंची हत्याबंदी व्हावी असं वाटतं !!! कुत्रा दत्ताच्या आजूबाजूला असतो (आणि वाघ्यापण बरं का) .. त्यालाही मारण्यावर बंदी यावी .. अगदी पिसाळलेले असेल तरी.. त्यांची नसबंदी वगैरे अन्यायही दूर व्हावेत..
सर्व महापालिकेतील उंदीर मारण्याचे विभाग बंद करावेत.. आमच्या बाप्पाचे वाहन आहे ते...
आणखी पुराणकथा वगैरे वाचून संरक्षणासाठी प्राणी सुचवावेत.. आमचा पाठींबा आहे..

यासाठी सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून हे कायदे ताबडतोब मंजूर करून घ्यावेत

अगदी अगदी. झालंच तर कुठल्याही प्रकारची जीवहत्या बॅन करून टाकावी. जुलमी परकीय म्लेंच्छ लोकांमुळे शिरलेला हा अनाचार लौकरच धर्मरक्षकांनी समूळ नष्ट करून टाकावा आणि इतःपर झाडांप्रमाणे फक्त प्रकाशसंश्लेषणाद्वारेच अन्नग्रहणाला परवानगी असावी. एक बॅक्टेरिया मारल्यास एक वर्षे तुरुंगवास असा शिक्षेचा रेट असावा.

पिंपातला उंदीर's picture

4 Mar 2015 - 3:19 pm | पिंपातला उंदीर

*lol* *LOL* :-)) :))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 6:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रतिक्रियेच्या बटणावर क्लिक करताना आणि ही प्रतिक्रिया लिहिताना मी किमान ८८,५७० बॅक्टेरिया मारल्याचं सबळ पुराव्याने सिद्ध झालेलं आहे. कारावासाची शिक्षा झाल्याने आपल्या प्रतिसादांवर उपप्रतिसाद देणे ह्या जन्मात शक्य होणार नाही. पुढचा जन्म बॅक्टेरियाचा मि़ळाला तर बॅटमोबाईलच्या किमान आरश्यावर बसायला जागा मिळावी ही विनंती. धन्यवाद.

बॅटमॅन's picture

4 Mar 2015 - 6:48 pm | बॅटमॅन

पुढचा जन्म बॅक्टेरियाचा मि़ळाला तर बॅटमोबाईलच्या किमान आरश्यावर बसायला जागा मिळावी ही विनंती. धन्यवाद.

तुमच्यासाटी कायपन! ब्याक्ट्रिया मार्ले तरीपन!

पैसा's picture

4 Mar 2015 - 8:27 pm | पैसा

क्लोरोफिल कुठून येणार? आणि आलंच तर सगळ्यांचा रंग हिरवा होईल ना भो!

बाकी रंग हिरवा झाला तर काळागोरा हा भेद उरणार नाही अन रेसिझम निकालात निघेल.

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 4:38 pm | संदीप डांगे

gg

हे महाराज गेले ७० वर्षे फक्त प्रकाशावर जगत आहेत म्हंतात. 'आपलेच' आहेत. यांच्याकडून दिक्षा घ्यायला पाहिजे लौकरात लौकर.

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 5:06 pm | बॅटमॅन

वा क्या बात है! दीक्षा तर घेतलीच पायजे यांच्याकडून.

अत्रन्गि पाउस's picture

5 Mar 2015 - 5:32 pm | अत्रन्गि पाउस

डोके गरगरले आहे :D

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 5:36 pm | संदीप डांगे
खंडेराव's picture

4 Mar 2015 - 3:09 pm | खंडेराव

अनुमोदन. +१

महिषासुरामुळे म्हशी बद्नाम. त्या चालतील.

मत्स्यावर बंदी नको हां! आमका मत्स्य व्हयोच ताटात. बाकी चलांदेत!

बाळ सप्रे's picture

4 Mar 2015 - 3:21 pm | बाळ सप्रे

मत्स्य स्वतः विष्णूचा अवतार त्यामुळे शिक्षा जास्त होण्याची तरतूद हवी .. १० वर्ष करावी की १५ ??

ओ दादानू, असा ओ काय? द्येवाचो अवतार म्हणान तर तेका आदर दाखवतव मां? =))

बॅटमॅन's picture

4 Mar 2015 - 3:24 pm | बॅटमॅन

१० १५ काय घेऊन बसलात सप्रेकाका? ब्रह्मदेवाच्या एका दिवसाएवढी शिक्षा द्या, बास झालं. किती वेळ डांबून ठेवायचं त्यांना, नै का?

यशोधरा's picture

4 Mar 2015 - 3:27 pm | यशोधरा

ज. मे. ल. ते तुझं! तुझ्यावर विष्णुवताराची कृपा न व्हावी हीच तुला शिक्षा!