गाभा:
नमस्कार,
आताच बातमी ऐकली की, धुळे दंगलीतील प्रमुख आरोपीनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेत. तेही न्यायालयीन कोठडीत असताना. उमेदवारी अर्ज भरताना काही नियम असतात की नाही ? हा प्रश्न मला पडलाय कुणी उत्तर शोधण्यास मदत करेल का?
मतदान करणार्याना आता सगळ्यात जास्त गुन्हे करणार्यास निवडुन द्यावे लागेल. ( हा विनोद म्हनावा की ....?)
---- संतप्त चिखलू
प्रतिक्रिया
16 Nov 2008 - 6:43 pm | टारझन
एक मन असे म्हणते : भरु द्या की भरले तर , आपण मतदान सारासार विचारसरणीने करावे, आता त्याला निवडणूकांत करू द्या खर्च , मग त्याला दारूण मतांनी पाडून आपण विजयोत्सव साजरा करावा
दुसरे मन म्हणते : कायद्याने गुन्हेगारी पार्श्वभुमी असणार्यांना बंदीच हवी निवडणूक लढवायला.
आता आपल्याला कायदे काय ते पुर्ण ठाऊक नाही बा, पण कायदा पैशाने आणि ताकदीने जिंकता येतो असा इतिहास आहे. चालू द्ता
मा.श्री. टारझनचंद्ररावजी अफ्रिकावालेसाहेब
(वार्ड क्रमांक ४२० चे युवा,धडाडीचे,खंबीर अन कैच्याकै नेतृत्व)
17 Nov 2008 - 12:01 am | कशिद
निवदनुकित जेल मधे असलेया लोकानी निवदनुक लाधव्ल्या आहेत अणि जिंक्ल्या पण आहेत ..
त्यात आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गाँधी ,पपू कालानी अणि बरेच नेते मंडली आहेत....
बिहार उत्तर प्रेअदेश ज़रखंड मधे
निवाद्नुक बंदुकीचा नोक वर जिन्क्ल्या जातात म्हणे ..मी काही गेलू नाही पण वाचनात आला आहे भावतेक वेला...
कायदा आहे...
जो परेंट घुन्हा सिद्ध होत नाही थो परेंट आरोपी हा संशयित असस्थो त्याची मुलभोत अधिकार..(fundamental rights)
काढून घेता येत नाही..
कायदा कड़क करावा लागेल अणि त्याची आमल बज़वनी पण ठेवधीच कड़क करावी लागेल हे खरा.....
पण आपल्या कधे बरेच दा आस होता की जेल मधून जावून आल्या शिवाय माणसाचा दबदबा समजा मधे काही वाढत नही म्हणुन त्याना हे नाविलाजाने करावे लगत अस्सवे अससे वाटते...
(कायदे प्रेमी अणि कायद्याचा विद्यार्थी, भावी विद्यार्थी युवा नेता मनसे चा ) अक्षय
17 Nov 2008 - 10:30 am | वेताळ
कायद्यानुसार ज्याच्या वर गुन्हा सिध्द झाला आहे अशा व्यक्तिस निवडणुकीला उभे राहता येत नाही.ज्याचा वर आरोप आहेत वा कच्चे कैदी अटकेत आहेत अशा व्यक्तिना निवडणुकीना उभे राहता येते.आपण आपला मताधिकार वापरुन गुन्हेगार व्यक्तिस त्याची खरी जागा दाखवु शकतो.
वेताळ
17 Nov 2008 - 10:41 am | टवाळचिखलू
<<<आता आपल्याला कायदे काय ते पुर्ण ठाऊक नाही बा, पण कायदा पैशाने आणि ताकदीने जिंकता येतो असा इतिहास आहे. >>>
असे असेल तर तुम्ही म्हणता तसे (<<मग त्याला दारूण मतांनी पाडून आपण विजयोत्सव साजरा करावा>>) आपल्याला शक्य नाही. बरोबर ना ?
आणि वेताळ आप्पा ...
<<<आपण आपला मताधिकार वापरुन गुन्हेगार व्यक्तिस त्याची खरी जागा दाखवु शकतो.>>>
हे तुमचे म्हणनं जरी खरे असले तरी असे घडले / घडेल काय ? तुमच्या आमच्या सारखी मताधिकारचा योग्य वापर करणारी मंडळी कीती आहेत ?
- चिखलू
20 Nov 2008 - 9:49 pm | पाषाणभेद
धुळे दंगलीत कोण कसा आहे हे सिध्ध झाले आहे. जास्त लिहित नाही. येथेच दंगल होईल.
-( सणकी )पाषाणभेद