गाभा:
पुण्यामध्ये आयुर्वेद रुग्णालय सुरु करण्याचा विचार करतो आहे,अंदाजे ३००० चौ.मी.जागा उपल्बद्ध होइल असे वाटते आहे. यात पंचकर्माचे दोन सेट अप,फिजिओथेरपी,अक्युपंकचर सेट अप,योगा हॉल्,सहा ते आठ स्पेशल रुम,असा सगळा विचार आहे.
आजपर्यंत पुण्यात खासगी असे एकच आयुर्वेद रुग्नालय आहे,बाकी जी आहेत ती वेगवेगळ्या महाविद्यालयांना सल्लग्न आहेत. ज्यांच्या पिढ्यान पिढ्या आयुर्वेदात गेल्या आहेत अश्या लोकांनीही आजपर्यंत हा विचार केला नाही पण अंगात थोडे सुलेमानी किडे असल्याने हे धाडस करतो आहे,तरी यात काय काय सुधारणा करता येतिल ? किंवा ज्यांनी देशाबाहेर अथवा आपल्या केरळात आयुर्वेद रुग्नालये पाहिली आहेत त्यांनी त्यात काय काय करता येइल हे सुचवावे ही विनंती.
कृपया धाग्याचा काश्मिर करु नये ही कळकळीची विनंती.
प्रतिक्रिया
28 Feb 2015 - 8:36 pm | अजया
कुठे पाहिलेले नाही पण वाटलं म्हणून सुचवत आहे.
-आयुर्वेदिक आहार मार्गदर्शन,तसंच निरनिराळ्या आजारांसाठी आयुर्वेदिक पथ्य पाकृंचे मार्गदर्शन.याबाबत मधेमधे व्याख्यानं देखिल ठेवता येतील.त्यासाठी सोय केल्यास उत्तम.
-आयुर्वेदिक विशेषज्ञ डाॅक्टर्स उदा. कॅन्सर तज्ञ,मधुमेह तज्ञ असे असतील आयुर्वेदात तर त्या डाॅक्टर्ससाठी वेगळी ओपिडि रुम
अजून सुचेल तसे लिहीनच.
28 Feb 2015 - 8:41 pm | बाबा पाटील
तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्याख्याने आहेतच त्याबरोबर आंतररुग्नांचा आहार देखिल देणार आहे.
साधारणता योगा मेडीटेशन,व्याख्यान असे उपक्रम नक्की असतील
2 Mar 2015 - 3:12 am | स्पंदना
आंतर रुग्णांच्या आहारा बरोबरच रोज सकाळी घ्यायचे आरोग्यदायी न्याहरीचे पदार्थ जर तुम्ही उपल्ब्ध करुन दिले तर बरेचजण घेउन जातील. जे रुग्ण स्पेशल डायट्वर आहेत त्यांना एखाद्या व्हॅन मधुन घरपोच तयार आहार (डोअर सर्विस) पोहोचवण्याची सोय करता येइल.
28 Feb 2015 - 8:37 pm | जेपी
पंतजली योगपीठ, हरिद्वार ला भेट द्यावी.
बाकी केरळ सारखी व्यवस्था ईकडे देणे शक्य नाही.
अवांतर-नळेगाव (लातुर) येथे आर्युवेदाचे वेगळे परिमाण भेटतील.
28 Feb 2015 - 8:43 pm | बाबा पाटील
या नळेगाव/लातुरची अधिक माहिती देव्य शकाल काय .
28 Feb 2015 - 8:38 pm | संदीप डांगे
सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा... :-)
रूग्णालयात काय असावे हे जरा विचार करून सांगतो. बाकी तुम्हाला गरज असेल तर मार्केटींग कम्युनिकेशन आणि कोलॅटरल्स साठी मदत करू शकतो.
28 Feb 2015 - 8:44 pm | बाबा पाटील
मार्केटींग विषयी फारखी माहिती व जाणही नाही त्यामुळे तुम्हाला संपर्क नक्की करणार
28 Feb 2015 - 8:44 pm | लॉरी टांगटूंगकर
सुलेमानी किडा अमर रहे! शुभेच्छा!
केरळात एक चक्कर टाका (बंगळूरात भेटूच, रस्त्यातच आहे :) ), प्रत्यक्ष बघितल्यावर खूप चांगलं लक्षात यावे.
28 Feb 2015 - 8:46 pm | भिंगरी
भरघोस पाठींबा!!!!!
भरघोस शुभेछा!!!!!!!!!
28 Feb 2015 - 8:47 pm | प्रभाकर पेठकर
अभिनंदन आणि शुभेच्छा.
कधी आलो तर, रुग्ण म्हणून, व्यवसायाला हातभार लावेन.
28 Feb 2015 - 8:56 pm | बाबा पाटील
काका तुम्ही नक्की या पण आजारी पडुन येवु नका ही परमेश्वरचरणी प्रार्थना,देव तुम्हाला निरोगी आयुष्य देवो.
1 Mar 2015 - 1:23 am | प्रभाकर पेठकर
श्री. बाबा पाटील,
मधूमेह आणि उच्च रक्तदाब आधीच शरीर बळाकावून बसला आहे. त्यावर नियंत्रण ठेवले आहेच पण आयुर्वेदिक औषधपोचार करायची इच्छा आहे, म्हणून तसा प्रतिसाद दिला आहे.
बाकी प्रकृती ठणठणीत आहे.
28 Feb 2015 - 11:55 pm | संदीप डांगे
एक मराठी माणूस दुसर्या मराठी माणसाला त्याच्या व्यवसायास मदत व्हावी म्हणून एवढ्या टोकाला जायची तयारी दाखवतो हे कदाचित इतिहासातले एकमेव उदाहरण असेल. (स्व-अनुभवातून... कुठलीही टिप्पणी नाही.)
पेठकर काका, जिओ (अगदी ठण्ठणीत रहा..) :-)
1 Mar 2015 - 1:27 am | प्रभाकर पेठकर
संदिप डांगे,
मुद्दाम आजारी पडायची गरज नाही. मधूमेह आणि उच्च रक्तदाब माझे साथी आहेत. आहार आणि व्यायामाद्वारे अजून तरी नियंत्रण ठेवले आहे. अॅलोपॅथीच्या गोळ्या टाळता आल्या तर पाहावे हा विचार आणि आयुर्वेदावरील विश्वास ही भावना त्या प्रतिसादामागे आहे.
तरीपण धन्यवाद.
28 Feb 2015 - 10:04 pm | अत्रन्गि पाउस
विचारपूर्वक पुढचा प्रतिसाद देतो...
28 Feb 2015 - 10:18 pm | पैसा
अभिनंदन आणि शुभेच्छा! आमचे शेजारी केरळात दर वर्षी जाऊन ट्यून अप करून येतात. तिथे रुग्णासोबत रहाणार्यांनाही पथ्यकर आहार देतात असे सांगत होते. निदान रुग्णाला तरी पथ्याचे जेवणखाण देता येईल का याचा विचार जरूर करा! म्हणजे तुमच्या उपचाराला अधिक यश मिळेल.
28 Feb 2015 - 10:41 pm | टवाळ कार्टा
खूप खूप शुभेच्छा :)
जी काही औषधे सांगाल ती तिथल्या तिथे उपलब्ध करुन देता येइल का बघा... :)
28 Feb 2015 - 10:42 pm | मराठी_माणूस
खुप शुभेच्छा
28 Feb 2015 - 10:48 pm | पिंगू
खूप खूप शुभेच्छा.. मला तरी किमान पंचकर्म करुन घ्यायला तुमच्याइथे यायला नक्कीच आवडेल..
28 Feb 2015 - 10:52 pm | विंजिनेर
सर्वप्रथम किड्याबद्दल अभिनंदन आणि पुढील प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा!
गमतीचा भाग नव्हे पण रुग्णसेवेपलिकडे जाउन एक व्यवसाय म्हणुन तुम्ही विचार केला आहे काय?
तुम्ही वर सांगितलेल्या गुंतवणुकीवर परतावा कसा, किती आणि कधी मिळणार याचा अपेक्षित आराखडा आखला आहे का? इतकी(च) गुंतवणुक का करावीशी वाटते - म्हणजे, ८ खोल्या का? २ किंवा २० का नको?
पुण्यात एकच खासगी आर्युवेदिक रुग्णालय आहे असे म्हणालात पण पुण्यासारख्या इतर शहरात(म्हणजे, सामान्य राहणीमान, ढोबळ रुग्णसंख्या, आर्युवेदीक उपचारांबाबत माहिती/कुतुहल/विश्वास असलेला वर्ग) अशी रुग्णालये कशी चालतात? त्यांचे उत्पन्न किती असते?
असो माझे २ पैसे!!
28 Feb 2015 - 11:14 pm | श्रीरंग_जोशी
नव्या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन व अनेक शुभेच्छा.
रुग्णालयाबरोबरच निरोगी माणसांना अधिक सुदॄढ बनण्यासाठी लागणार्या सुविधा तुम्ही देत आहात असे वर्णनावरून जाणवत आहे.
त्यामुळे नावात रुग्णालय ऐवजी सुदॄढ आरोग्य केंद्र किंवा त्या अर्थाचे काहीतरी वापरा अशी सूचना करतो.
बाकी या उपक्रमातून सेवा घेणार्यांसाठी ऑनलाइन अकाउंट वेब व चतुरभ्रमणध्वनीच्या अॅपद्वारे स्वतःच्या तब्बेतीची व उपचारांची नोंद ठेवण्याची सुविधा असावी. उदा. ठराविक वेळी औषध घेण्याची आठवण देणारे संदेश इत्यादी.
याखेरीज जसे सुचेल तसे लिहितो.
28 Feb 2015 - 11:32 pm | जयंत कुलकर्णी
आपल्याला नवीन बिझनेस साठी शुभेच्छा ! एक लक्षात ठेवा, रुग्णांना याचा फायदा व्हावा असे आपल्याला वाटत असावे हे गृहित धरले आहे. पण हे चालू राहिले तरच रुग्णांना व आपल्याला फायदा होईल हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याचा व्यापारी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात अजिबात अपराधीपणाची भावना नको. हे एकदा मान्य केले की जे काही गृहित धरले आहे ते तपासून घेतले पाहिजे. त्यासाठी मी आपणास मदत करु शकतो. आपल्याला जर ही मदत पाहिजे असल्यास आपण मला व्यनि करु शकता. अर्थात हा सल्ला फुकट असेल. मी हा देऊ शकतो कारण माझ्या इतके अपयश कोणी पाहिले नसेल.... :-)
28 Feb 2015 - 11:53 pm | टिवटिव
अत्यंत चांगली कल्पना.
1 Mar 2015 - 12:07 am | अर्धवटराव
तुम्ही काहि विशिष्ट रोगोपचाराला प्राधान्य देणार आहात काय? असल्यास त्या प्रोसेसमधे सप्लाय चेन सुदृढ ठेवणे सर्वात महत्वाचे. औषधं, उपकरणं, त्यांची देखभाल, साठवण, क्वालीटी मेण्टेनन्स, रुग्णांचि आणि त्यांच्या सोबत येणार्या मदतनिसांची सर्व प्रकारची सुविधा, इन केस ऑफ इमर्जन्सी जर काहि बाह्य मदत लागली तर त्याची उपलब्धता वगैरे बाबी तुम्ही ध्यानात घ्यालच. आता सरकारी पातळीवर आयुर्वेद, युनानी थेरपी वगैरेसाठी काहि अच्छे दिन येणार म्हणतात. त्यातल्या सुविधा पदरी पाडुन घ्याच.
आणि हितशत्रुंपासुन सावध रहा. आयुर्वेदीक इस्पीतळांच्या कायदेविषयक/न्यायवैद्यकीय काटेकोरपणा चॅलेंज करणं किती सोपं/कठीण आहे माहित नाहि, पण या क्षेत्रातला एखादा अगदी भरोशाचा वकील सुरुवातीपासुनच संपर्कात राहु देत...
हार्दीक अभिनंदन आणि शुभेच्छा डॉक्टर साहेब. मिपावर धागा टाका आपल्या अनुभवांचा.
1 Mar 2015 - 12:11 am | रेवती
६ ते ८ स्पे. रुम्स जरा जास्त वाटत नाहीत का? म्हणजे आधीच इतका खर्च यायला नको म्हणून म्हणतिये.
आमच्या आयु. डॉ. चा पुण्यात आल्याआल्या जो उपयोग होतो तो सांगू शकते. रात्री अपरात्री कधीही फोन केल्यास चालतो.
आमच्या वेळा विचित्र, कमी असल्याने ते सकाळी लवकर पंचकर्मासाठी उपलब्ध होऊ शकतात. हामेरिकेतून कधीही फोन केल्यास ते औषधे कमी जास्त करणे. वेगळी देणे, पार्सलने पाठवणे (त्यांचे सर्टिफिकेट वगैरे) करतात. आता आमच्या घरी आमच्या तब्येतींनुसार औषधे आहेत. त्याची लिस्ट एक्सेल शीटमध्ये करून, किती गोळ्या, पुड्या, पावडरी शिल्लक आहेत ते त्यांना माहित असते. आम्ही आमच्या मनाने औषधे घेत, बदलत नाही व भारतात गेल्यावर त्यांचे पैसे देणे, ट्रान्सफर करणे, आमच्या तेथील नातेवाईकांकडून देववणे हे प्रमाणिकपणे चालू असते. तुम्हाला यातून काही आयडिया मिळावी म्हणून कळवले. एका दोन वेळा मुलाला आयुर्वेदिक औषधाने गुण उशिरा येणार होता व हे डॉ. शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टीस करत असल्याने त्यांच्या ओळखीच्या रुग्णालयात एलोपॅथी ट्रीटमेंतसाठी पाठवले. आम्ही भारतवारीच्या आधीच दोन महिने त्यांना फोन करून ट्रीटमेंट, पंचकर्म प्लॅन करतो. त्यात फार कमीवेळा बदल होतात. एकदा प्रवासात मुलगा आजारी पडला तर डॉ. दर दोन, तीन तासांनी फोन करून तब्येतीचा आढावा घेत होते. आमच्यासाठी असे डॉ. देवच आहेत.
1 Mar 2015 - 6:07 am | अमित खोजे
रेवती ताई,
तुमचा प्रतिसाद वाचून तुमच्या वैद्यांची माहिती घेण्याची तीव्र इच्छा झाली आहे. पुढच्या पुणेवारीमध्ये त्यांना भेटून येण्याचा उद्देश आहे. कृपया माहिती सांगता का? इथे लिहिणे शक्य नसल्यास व्यक्तिगत निरोप पाठवला तरीही चालेल.
1 Mar 2015 - 7:26 am | रेवती
हो. सांगते की!
1 Mar 2015 - 12:11 am | रेवती
तुमचे रुग्णालय सुरु होणे व रुग्णांच्या सेवेसाठी शुभेच्छा!
1 Mar 2015 - 2:11 am | खटपट्या
+१
1 Mar 2015 - 5:09 am | कंजूस
सर्वाँसारखा मीपण हितेच्छूक आहे आणि जो अर्धी वाट चालून गेलाय तो ते ध्येय गाठतोच. कार्य सिद्धी =श्री +निष्ठा.
तुमच्या क्षेत्राबद्दल केरळपेक्षाही शीव रेल्वे स्टेशनजवळच्या आयुर्वेद महाविद्यालयातून चांगला सल्ला मिळेल याची खात्री आहे.
1 Mar 2015 - 7:11 am | आनन्दिता
सर्वात आधी या चांगल्या कल्पनेबद्दल तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
आमच्या सातार्याजवळ कास ला प्रकृती हेल्थ रिसॉर्ट नावाचं अशाच धर्तीचं आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे. तिथल्या उपचार पद्धती बद्दल खुप खोल ज्ञान नाही पण दोन तीनदा फिरायला आणि एकदा औषध उपचारा करता गेले होते.
http://www.prakrutiayur.com/english/index.php
ही त्यांची वेबसाईट. तिथे गेलात तर तुम्हाला बरीच माहीती मिळु शकेल. तिथे पंचकर्मा बरोबरच इतर अनेक प्रॅक्टीस केल्या जातात. आता बराच जम बसवलाय त्यांनी. खुप लांबुन लांबुन लोकं उपचाराला येत असतात.
त्यांची ओपीडी सातारा शहरात आहे, आणि इनडोअर पेशंट्स ना या कास च्या प्रॉपर्टी मध्ये ठेवलं जातं. त्याची कपॅसिटी सुद्धा भरपुर असावी, त्यात स्पेशल रुम वगैरे सारखे प्रकार ही आहेत. मागे तिथे पर्णकुट्या वगैरे पण होत्या. उपचाराची पद्धत म्हणुन त्या पर्णकुट्यांमध्ये लोकांना ठेवलं जाई. आता आहेत की नाही याची मला कल्पना नाही. मी तिथे जाउन ६-७ वर्षे होऊन गेलीत.
1 Mar 2015 - 7:28 am | रेवती
हे वाचून लोणावळ्याच्या माधवबाग नावाच्या संस्थेची आठवण झाली. ते आयुर्वेदिक उपचारच करतात वाटतं!
1 Mar 2015 - 8:35 am | अजया
लोणावळा नाही रेवाक्का,आमच्या भागात आहे ते माधवबाग.फार बोलत नाही पण त्याचा आदर्श न ठेवल्यास बरे असे आहे.मार्केटिंगचे उत्तम उदाहरण म्हणता येईल!
1 Mar 2015 - 5:42 pm | रेवती
असे आहे तर!
1 Mar 2015 - 9:18 am | तुषार काळभोर
पुण्याच्या पुर्वेला उरुळीकांचन येथील "निसर्गोपचार केंद्र" येथे भेट दिल्यास तेही उपयोगी ठरेल. आयपीडी/ओपीडी/रुग्णांचा विशेष आहार, जीवनपद्धती, हे सगळे पाहता येईल. शिवाय रोजचं 'व्यावहारिक'/प्रॅक्टिकल रुटीनही पाहता येईल.
(अवांतरः नवी सांगवीमध्ये एक तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे एक रुग्णालय आहे. नाव आठवत नाही, पण ते औषधे तयार करणॅ, रुग्णचिकित्सा, आयुर्वेदातील विविध उपचारांसाठी वेगळ्या रुम्स, असा साधारण सेटअप आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या तेथे यायच्या/येतात असे ऐकले आहे.)
1 Mar 2015 - 12:10 pm | बाबा पाटील
सर्व मिपाकरांनी सुचवलेल्या माहितीचा / सुचनांचा सदुपयोग करणाच्या नक्की प्रयत्न करेल.
1 Mar 2015 - 12:29 pm | पिवळा डांबिस
अॅलोपथीमध्ये अवघे आयुष्य गेल्यामुळे आयुर्वेदिक हॉस्पिटलबद्द्ल काही सूचना करण्याची पात्रता अंगी नाही याविषयी दिलगीर आहे.
पण आयुर्वेद ही एक अतिशय परिणामकारक औषधप्रणाली आहे याची निश्चित जाणीव आहे.
म्हणून, डॉ. बाबा पाटील तुम्हाला तुमच्या या उपक्रमात हार्दिक शुभेच्छा!
न जानो, कधी वर पेठकरकाकांनी म्हंटल्याप्रमाणे तुमच्या दवाखान्यात हाजीर होऊ!
:( :)
1 Mar 2015 - 5:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
रुग्णालय किंवा दवाखान्याच्या बिझनेस मॉडेलची कल्पना नाही. पण तुम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी अतिशय शुभेच्छा. :)
1 Mar 2015 - 10:00 pm | सविता००१
आणि खूप खूप शुभेच्छा!!
1 Mar 2015 - 11:05 pm | काळा पहाड
सगळ्यात पहिल्यांदा वेबसाईट काढा. तज्ञ मिपावर उपलब्ध होतीलच.
2 Mar 2015 - 10:46 am | टवाळ कार्टा
+११११
2 Mar 2015 - 1:51 am | बन्याबापू
प्रथम आपल्या कार्यासार्ठी खूप शुभेच्छा ! माझे वय २५ आहे..घरचे नोकरीच्या मागे लाग अस सांगत आहेत..पण तुमच्या सारखाच किडा आमच्यापण अंगात असल्याने स्वत:ची डिझाईन कंपनी सुरु करत आहे.सर ! कंपनी सुरुवात करतोय तर सुरुवातीला क्लायंट ला आपले वर्क कसे सगळ्यांहून हटके आहे आणि सर्विस कशी चांगली आहे हे महत्वाचे आहे.आपल्याला जर वेबसाईट बनवून पाहिजे असेल तर मला मेसेज करा.वेब होस्टिंग+डोमेन नेम चा खर्च सोडून आपल्याला मनापासून किती द्यायचे ते देवू शकता.मला फक्त चांगल काम करून दाखवायचं आहे.
2 Mar 2015 - 7:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्हालाही शुभेच्छा!१
2 Mar 2015 - 2:40 pm | काळा पहाड
अहो तुम्ही आर्मी मध्ये होता ना?
2 Mar 2015 - 3:18 pm | थॉर माणूस
त्ये बापू वायलं ह्ये वायलं. :)
2 Mar 2015 - 7:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
परदेशामधले नागरिक "मेडिकल टुरिझम" साठी येतात त्यांच्याकडेही लक्ष द्या. आंतरराष्ट्रीय फोरम्स वर जाहिरात करु शकता. ह्या लोकांना आयुर्वेदीक उपचारांविषयी उत्सुकता असल्याने त्यांना आकर्षित करु शकता.
2 Mar 2015 - 7:16 am | योगी९००
डॉ. बाबा पाटील यांना नव्या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन व अनेक शुभेच्छा...!! माझ्या भावाचे आरोंन्दा येथे असाच सेट्-अप आहे. त्याला विचारून त्याचा नंबर तुम्हाला व्यनि करतो.
2 Mar 2015 - 9:02 am | ब़जरबट्टू
लायकी नाही तरी सांगतो, तरीही "गर्भसंस्कार"या विषयावर जे देऊ शकता ते बघा.. बाळ हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा खर्च... व या नऊ महिन्यात चांगले चांगले टोणगे आयुर्वेदाकडे धावतात.. :)
2 Mar 2015 - 10:50 am | टवाळ कार्टा
अग्दी अग्दी :)
2 Mar 2015 - 2:47 pm | काळा पहाड
अगदी अगदी हा वाघुळमानवाचा पेटंटेड वाक्प्रचार आहे याची नोंद घ्यावी.
2 Mar 2015 - 3:13 pm | टवाळ कार्टा
"दंबूक" इतके लिहून मी हा प्रतिसाद संपव्तो :(
2 Mar 2015 - 3:35 pm | काळा पहाड
डॉ. नी धाग्याचं काश्मीर करू नका असं सांगितलं होतं. तुम्ही धाग्याचा पार 'अजय माकन' करताहात. दंबून नाही काढणार ते तर काय मग?
2 Mar 2015 - 7:54 pm | बाबा पाटील
दंबुकवर कधीतरी निवांत धागा काढतो.
2 Mar 2015 - 10:36 pm | टवाळ कार्टा
:)
मला शेटवगैरे नका हो करु...तुम्च्यासमोर मी पर्वतासमोर मुंगी असावी तितका छोटा आहे
पण तुम्हाला भेटायला आवडेल...तुमच्या अंगातले किडे माझ्या फक्त स्वप्नात येतात...त्यांना बाहेर काढायला मदतच होईल
2 Mar 2015 - 3:35 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!
तदुपरि डागदरसाह्यबांना दवाखाण्याच्या शुभेच्चा! शुभं भवतु.
2 Mar 2015 - 2:44 pm | काळा पहाड
अहो काय गर्भसंस्कार? कीती ती संस्कार करायची घाई? त्या मुलाला आधी जन्म तर घेवू द्या. बाकी संस्कार म्हणजे काय हो? तुमच्या अवताली भवताली असणार्या जीवनव्यवस्थेतल्या चांगल्या अंशाबद्दल शिकवणे व घडवणे म्हणजे संस्कार. त्या बाळाला ना दिसतं ना कळतं. कसले संस्कार करणार? घाबरून जाईल ते. काय तर उगाच!
2 Mar 2015 - 3:01 pm | ब़जरबट्टू
आपले काम आहे बाबासाहेबांना मदत करायचे, म्हणून गर्भसंस्कार.. लोक्स देतात हो पैसे.. कमवू द्या की त्यांना.. झाले संस्कार तर बरेच की.. :)
2 Mar 2015 - 3:26 pm | काळा पहाड
अस्संय होय? मग बिझनेसच कराचा तर आमच्याकडे खूप क्लृप्त्या आहेत. पहिल्यांदा म्हणजे दहापैकी दोनच रूम ऑर्डीनरी ठेवायच्या आणि त्या कायम बुक ठेवायच्या. ४ डिलक्स आणि ४ सुपर डिलक्स. पैशातला फरक 'लय' पाहिजे. लोकांना आज काल ऑर्डीनरी काहीही आवडेनासं झालंय.
2 Mar 2015 - 9:33 am | नाखु
काहीच अनुभव घेतला नाही आणि माहीतीही नाही *sorry2*
उद्घाटन कधी आहे ते मिपावर यथावकाश जाहीर करा !!
2 Mar 2015 - 10:37 am | अनुप ढेरे
रुग्णालयाला शुभेच्छा.
फक्त रुग्ण्यालय उघडल्यावर बाबाजी तांबे म्हणून टीव्हीवर झळकू नका.
2 Mar 2015 - 3:59 pm | सुनील
शुभेच्छा!
2 Mar 2015 - 5:39 pm | सन्जय गन्धे
वैद्यराज, खूप खूप शुभेच्छा!
2 Mar 2015 - 5:52 pm | सुबोध खरे
बाबासाहेब
काही अनुभवाचे बोल -- स्वस्तात सेवा मिळेल असे चुकुनही म्हणू नका किंवा लिहू नका. वाजवी दरात उत्तम सेवा मिळेल हेच ब्रीद वाक्य असावे लागते.
धर्मार्थ रुग्णालय असेल तरी त्याच्या सेवक वर्गाला बाजारभावाप्रमाणेच पगार द्यावा लागतो. उत्तम दर्जाच्या औषधांसाठी पैसा मोजावाच लागतो. सरकार दरबारी पैसा हा मोजावाच लागतो. रुग्णालय चालवण्यासाठी लागणारा पैसा हा निरंतर स्वरूपाचा निधी असावा लागतो. एकदा देणग्या देऊन मोकळे होणारे बरेच भेटतात. समाजसेवी रुग्णालयाला सुद्धा एक व्यावसायिक तर्हेनेच चालवावे लागते अन्यथा डबघाईला येण्यास वेळ लागत नाही.
वैद्यकीय सेवेसाठी दिलेला पैसा हा फुकट जातो हि आपल्या समाजाची मनोवृत्ती आहे आणी ती बदलणे टाटा किंवा बिर्लाना सुद्धा शक्य नाही. पहिल्या दिवसापासून चौरस फुटाला बाजार भावाप्रमाणे परतावा मिळेल या तर्हेने जे व्यवसाय चालवितात तेच येथे टिकतात. वैद्यकीय महाविद्यालयात शिकवलेले उदात्त विचार व्यवहारात कामास येत नाहीत हा स्वानुभव लष्करात, कोर्पोरेट धर्मादाय रुग्णालयात आणी स्वतःच्या दवाखान्यात घेतलेला आहे. आज रोख आणी उद्या उधार हेच ब्रीद वाक्य.
असो. सध्या इतकेच पुरे
2 Mar 2015 - 8:08 pm | आजानुकर्ण
ही मनोवृत्ती नसून डॉक्टरांच्या भेटीनंतरच्या अनुभवानंतर आलेले शहाणपण असावे असे वाटते. मिपावरील रुग्णांचे अनुभव वाचावेत. हे बदलणे टाटा-बिर्लाँऐवजी पैसा घेऊन योग्य उपचार केला तरच वैद्यकउद्योगाला शक्य आहे.
2 Mar 2015 - 7:53 pm | बाबा पाटील
सुबोधसर तुम्ही सांगताय तो अनुभव चांगलाच आहे.आणी तोही उच्चशिक्षितांकडुन जास्तच प्रमाणात.
2 Mar 2015 - 8:22 pm | विवेकपटाईत
मेरठ जवळ पांचाली खुर्द गावात जगदीश्वरानंद आरोग्याश्रम आहे, तिथे आयुर्वेदिक आणि प्राकृतिक चिकित्सेची व्यवस्था आहे. मी स्वत: एक आठवड्या करता तिथे जाऊन आलो होतो. या चिकित्सालयाचे संचालक डॉक्टर काशिनाथ किरणापुरे हे मराठी भाषिक आहे शिवाय अधिकांश कर्मचारी ही मराठी भाषिक आहेत (गेल्या ३० वर्षांपासून डॉक्टर किरणापुरे हे कार्य पाहतात). आश्रमात कमीत कमी १५ दिवस राहावे लागते. खर्च अगदी वाजवी ३०० हाल मध्ये आणि ५०० रुपये (एका खोलीत २ लोक) शिवाय aC रूम ही आहेत. यात उपचार (औषधी वगळता), जेवण सर्व काही (उपचारात- सकाळी एक तास व्यायाम, मग नेती-धौती कर्म, माती पासून उपचार, अनिमा, वाष्प स्नान, धूप स्नान, मालिश, इत्यादी गरजेनुसार उपचार. सकाळी १२ वाजता जेवण, संध्याकाळी ६ वाजता. (रोगानुसार). त्यांचा फोन न. ०९८९७१४६४३५ , ०१२१-३२५६९५५. निश्चित चांगले मार्ग दर्शन मिळेल.
2 Mar 2015 - 8:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्वप्रथम तुमच्या या प्रकल्पासाठी अनेकानेक हार्दीक शुभेच्छा !
तुमच्या विषयाची तुम्हाला पूर्ण माहिती आहेच त्यामुळे ते तुम्ही उत्तमप्रकारे कराय याची खात्री आहेच. पण काही गोष्टींकडे भारतात नेहमीच दुर्लक्ष होते (तुम्ही करत असाल असे म्हणणे नाही) तिकडे तुमचे लक्ष वेधतो.
१. सर्व कार्याची शास्त्रिय पद्धतीने बनवलेल्या फॉर्मॅट्मध्ये नोंद ठेवा (डोक्युमेंटेशन).
२. योग्य असणार्या कालखंडान त्या सर्व डेटाचे विष्लेषण करा... हे दोन प्रकारे उपयोगी पडेल
२.अ. भविष्यात (शास्त्रीय आणि कार्यपद्धतीत) सुधारणा करण्यासाठी दिशादर्शन
२.आ. आधुनिक पद्धतीने शास्त्रीय संशोधन होऊ शकेल इतका डेटा सहजपणे गोळा होईल... ही सद्याच्या काळातील सर्वात शास्त्रीय आणि व्यावसायीक यशाकरिता मोठी गरज आहे.
यामुळे आयुर्वेदीय उपचार अधिक विश्वासार्ह होऊन त्यावरील होणारी टीका कमी होईल. शिवाय तिचा "मेडिकल टूरिझम" सारख्या व्यावसायीकदृष्ट्या फायदेशीर गोष्टींकरताही वैध वापर करता येईल.
2 Mar 2015 - 9:27 pm | रामदास
जागा फारच मोठी आहे. सुरुवातीला इतकी मोठी जागा लागेल का ?
2 Mar 2015 - 9:29 pm | बाबा पाटील
खर तर हीपण जागा कमीच पडेल. पण पुण्यात सध्यातरी त्यावर पर्याय नाही.
2 Mar 2015 - 9:28 pm | बाबा पाटील
डॉक्युमेंटेशन सुरुवातीपासुनच आहे म्हणजे अगदी ११ वर्षा पासुनचे बर्यापैकी रेकॉर्ड ठेवलेले आहे. त्यावरच पुण्यातल्या एका आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या रुग्नालयातील कार्डियो ने संयुक्तरित्या लिपिड क्लिनिक सुरु करु म्हणुन सुचवले आहे पण येथे ही कन्सेप्ट किती लोकांच्या पचनी पडेल हे कळत नाही,बघुयात पुढे कधीतरी तोही प्रयोग करण्याचा विचार आहे.
2 Mar 2015 - 9:41 pm | डँबिस००७
बाबा पाटील,
प्रकल्पासाठी अनेकानेक हार्दीक शुभेच्छा,!!
आयुर्वेदीक ईस्पितळात जाउन उपचार होऊ शकतात हे आपल्या मराठी लोकांच्या मनावर बिंबवण्यापासुन सुरुवात
करावी लागेल.
केरळप्रमाणे ,
१. गरम तेलाचे औषधी पोटली वापरुन मालिशचे प्रकार !! ( मलयाळममध्ये "कीळ्ळी")
२. धान्य पोटली वापरुन मालिश (मलयाळममध्ये "न्यावरा कीळ्ळी")
३. शिरोधारा
याचा अवश्य विचार करावा !!
तयार आयुर्वेदीक औषधे केरळच्या सुप्रसिद्ध "वासुदेव विलासम" ह्या ब्रांडची औषधे रेकमेंड करता येईल व
उपचारात वापरता येतील,
पुण्यात बरेच परदेशी रहायला असतात त्यांना योग शिकव ण्यासाठी छोटे कोर्स तुम्ही आयोजीत करु शकाल.
त्यासाठी योग हॉलचा वापर करता येईल.
मी स्वता: केरळ मध्ये जाउन बरेच वेळा उपचार घेतला आहे, त्या अनुभवातुन वरच सांगत आहे.
2 Mar 2015 - 10:12 pm | यसवायजी
अनेक शुभेच्छा.
3 Mar 2015 - 3:22 pm | कपिलमुनी
तुमच्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा !
पुण्यातच असल्याने नक्की भेट देणार !