सृजन = नवे सुचणे/घडणे
सर्जन = -तेच-
सर्जक = घडवणारा
सर्जनशिलता = नवे घडवण्याची क्षमता
अभिजात = अगोदर जन्मलेला / मुळ /आद्य /उच्चकुलीन/श्रेष्ठ
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
पहिला शब्द :
येथे मूळ धातू सृज् ६ गण परस्मैपद आणि ४ गण आत्मनेपद असा आहे
त्याचा अर्थ निर्माण करणे असा आहे. त्यापासून तयार झालेले नाम म्हणजे सर्जन.
त्यापासून तयार केलेला सामासिक शब्द सर्जनशील म्हणजे निर्माणकार्यांत भाग घेणारा
त्याचे गुणवाचक नाम म्हणजे सर्जनशीलता = निर्माणकार्यांत भाग घेणे
त्यामुळे सर्जनशील हा शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे.
दुसरा शब्द :
येथे मूळ धातू जन् ४ गण आत्मनेपद असा आहे.
त्याला अभि हा उपसर्ग लावल्यावर त्याचा अर्थ जन्माला येणे, पासून जन्माला येणे, उच्च कुळात जन्माला येणे असा आहे.
त्याचे क. भू. धा. वि. (कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण ) होते अभिजात.
म्हणून त्याचा अर्थ होतो उच्च दर्जाचा किंवा उच्च कुळात जन्माला आलेला.
प्रतिक्रिया
16 Nov 2008 - 2:10 pm | कुंदन
सर्जनशीलता म्हणजे Creativity ( मराठी मध्ये ) :-)
16 Nov 2008 - 2:18 pm | अनामिका
अभिजात या शब्दाचा इंग्रजी अर्थ classical
यावरुन मराठी अर्थ नक्कीच कळला असेल? ;;)
"अनामिका"
16 Nov 2008 - 3:04 pm | प्रमोद देव
अभिजात=१)उच्चकुलीन , श्रेष्ठ, २)निपुण, निष्णात, ३) शास्त्रोक्त
सर्जनशीलता आणि सृजनशीलता = नवनिर्माण करण्याची क्षमता
16 Nov 2008 - 3:11 pm | वेताळ
सर्जनशीलता म्हणजे कलात्मकता,आणि सृजनशीलता म्हणजे नवनिर्माण क्षमता. दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत ना?
वेताळ
16 Nov 2008 - 3:23 pm | विजुभाऊ
सृजन = नवे सुचणे/घडणे
सर्जन = -तेच-
सर्जक = घडवणारा
सर्जनशिलता = नवे घडवण्याची क्षमता
अभिजात = अगोदर जन्मलेला / मुळ /आद्य /उच्चकुलीन/श्रेष्ठ
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
17 Nov 2008 - 4:00 pm | नील_गंधार
सर्वांचे धन्यवाद.
गंधार.
17 Nov 2008 - 4:19 pm | सुनील
सर्जन शब्दाचा इंग्लीश सर्जन (शस्त्रक्रीया विशारद) ह्या शब्दाशी काही संबंध आहे काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Nov 2008 - 11:04 pm | चतुरंग
'सर्जन' हा मराठी 'सर्जन' असतोच पण मराठी 'सर्जन' हा इंग्लिश 'सर्जन' असेलच असे नाही! ;)
चतुरंग
17 Nov 2008 - 7:47 pm | स्वानन्द
मला नाही वाटत.
18 Nov 2008 - 12:28 am | भाषांतरकार
पहिला शब्द :
येथे मूळ धातू सृज् ६ गण परस्मैपद आणि ४ गण आत्मनेपद असा आहे
त्याचा अर्थ निर्माण करणे असा आहे. त्यापासून तयार झालेले नाम म्हणजे सर्जन.
त्यापासून तयार केलेला सामासिक शब्द सर्जनशील म्हणजे निर्माणकार्यांत भाग घेणारा
त्याचे गुणवाचक नाम म्हणजे सर्जनशीलता = निर्माणकार्यांत भाग घेणे
त्यामुळे सर्जनशील हा शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे.
दुसरा शब्द :
येथे मूळ धातू जन् ४ गण आत्मनेपद असा आहे.
त्याला अभि हा उपसर्ग लावल्यावर त्याचा अर्थ जन्माला येणे, पासून जन्माला येणे, उच्च कुळात जन्माला येणे असा आहे.
त्याचे क. भू. धा. वि. (कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण ) होते अभिजात.
म्हणून त्याचा अर्थ होतो उच्च दर्जाचा किंवा उच्च कुळात जन्माला आलेला.
कळावे,
आपला ("अभिजात" आणि "सर्जनशील")
भाषांतर अनुदिनी - संचालक