शेअरबाजार - ईतिहासाची पुनरावृत्ती होणार का ??

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
20 Feb 2015 - 8:33 pm
गाभा: 

साधारण २० एक वर्षापुर्वीची गोष्ट असावी, बाजारांतील एक प्रमुख कंपनी असलेल्या ITC च्या देशभरांतील विविध कार्यालयांवर परकीय चलनाची गडबड केल्याच्या आरोपाखाली कस्टम्स व प्रवर्तन निर्देशनालय(ED) यांनी धाडी घातल्या. कंपनीचे प्रमुख संचालकांबरोबरच तीचे 'आयकॉनिक' चेअरमन श्री. देवेश्वर यांना तडकाफडकी अटक केली आणि या सगळ्यांना एका पोलिस चौकीत पुर्ण रात्र डांबुन ठेवले...

अतिशय स्वच्छ व उत्तम व्यवस्थापनासाठी नावाजलेल्या कंपनीवरील या कारवाईमुळे तेंव्हा आपल्याकडील आर्थिक जगतात मोठी खळबळ उडाली. शेअरबाजारात सहाजिकच ITC च्या भावाने गटांगळ्या खाल्या.

नेमके याच वेळी मी, एका जाणत्या ब्रोकरच्या सल्ल्यामुळे माझ्या तिर्थरुपांच्या रिटायर्मेंट्च्या पैशांतील काही भाग ITC मध्ये गुंतवण्याच्या बेतांत होतो.(अस्मादिकांना नोकरीला लागुन उणेपुरे वर्षही झाले नव्हते हो... स्वतःचे पैसे कोठुन येणार??) पण झाला प्रकार पाहुन "बरे झाले, ...या भानगडींत पडलो नाही ते" असे म्हणुन मी भगवंताचे आभार(??) मानले.

पुढे काही काळाने तेंव्हा प्रसिद्ध होत असलेले एक अतिशय उपयुक्त मासिक 'Intelligent Investor' मध्ये 'Scandal Investing' विषयावर अगदी याच कंपनीचे, हेच उदाहरण घेवुन एक अतिशय उत्तम लेख प्रसिद्ध झाला,(दुर्दैवाने सकाळ पासुन शोधुनही तो सापडलेला नाही.) त्याचा मतितार्थ ब्ल्यु-चीप कंपन्यांबाबत अशा आलेल्या 'संधी' सोडु न देता बेधडक गुंतवणुक करावी असा होता, मी त्यातील युक्तीवादाने प्रभावितही झालो, पण तो पर्यंत वेळ निघुन गेली होती. पश्चातबुद्धी पश्चातबुद्धी म्हणतात ती हीच.

सांगावयास 'खेद' होतो की मधल्या काळांत ह्या कंपनीने प्रतिवर्षी 25% हुन अधिक वाढ तीही चक्रवाढीने (CAGR) दाखवली असुन माझ्याकडील आलेखांच्या(charts) आधारे बोलावयाचे झाले तर आजचा भाव तेंव्हाच्या साधारण 35 पट आहे.(शिवाय दरवर्षीचा 400/500% लाभांश वेगळाच!!!)... म्हणतात ना 'आगे बुद्धी वाणीया...पीछे बुद्धी XXणीया,.हे खरे असेल का ??

असो. हे सगळे रामायण सांगावयाचे कारण म्हणजे आता चालु पेट्रोलियम मंत्रालय गोपनीय दस्तावेज चोरी प्रकरणानंतर 'आपण रिलायन्सचे काय करावे??' ह्या प्रश्नाचे न सापडलेले उत्तर.

तुम्हाला काय वाटते??- प्रसाद भागवत

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

20 Feb 2015 - 8:41 pm | अनुप ढेरे

शेणात हात घालायची चांगली वेळ कधीच नसते असं म्हणेन...

मनीशा's picture

21 Feb 2015 - 10:07 pm | मनीशा

Satym pun blue-chip company hoti you can not predict

रिलायन्सचे आणि एकंदर पेट्रोलियम रिफायनरीजचे मार्जिन मला फार कमी वाटते. ७५% ऑफ टोटल रेव्हिन्यू रिफायनरी मधून येतो. रिलायन्सला चांगले मार्जिन फक्त गॅस मध्ये आणि त्या खालोखाल पेट्रोकेमिकल्समध्ये मिळते आहे. पण त्या बिझनेसचा रेव्हीन्यू संपूर्ण रेव्हीन्यूच्या मानाने फारच तोकडा आहे. (गॅस १% ऑफ टोटल रेव्हिन्यू आणि पेट्रोकेमिकल्स २२% ऑफ टोटल रेव्हिन्यू). अलिकडेच कंपनीला दंड भरण्याची शिक्षा झाली होती. गेले कित्येक क्वार्टर्स रिलायन्सचा स्टॉक अंडरपर्फॉर्मर आहे.

असे असूनही बरेचसे इक्विटी रिसर्चर्स होपफूल आहेत कारण मिन हिस्टॉरिक पिई रेशोच्या खाली सध्या रिलायन्सचा स्टॉक आहे. गेली कित्येक वर्ष कंपनी व्हर्टीकल इंटिग्रेशन मध्ये इन्व्हेस्ट करत आहे. सर्वात महत्वाचे म्हण्जे KG D6 आणि MJ1 मधून नक्की किती फायदा होणार आहे यावर रिलायन्सच भविष्य अवलंबून आहे.

(माझी रिलायन्स मध्ये गुंतवणूक नाही)

लॉरी टांगटूंगकर's picture

23 Feb 2015 - 9:47 pm | लॉरी टांगटूंगकर

धाग्यानंतर रिलायन्सकडे नजर टाकलेली, प्रॉफिट मार्जीन्स चार वर्षात पंधरा टक्क्यावरून साडेसात टक्क्यापर्यंत कमी झालेत.
काही स्पेसीफिक कारण???

सुधीर's picture

24 Feb 2015 - 11:16 am | सुधीर

तुम्ही म्हणताय ती स्टँडअलोन इबिटा मार्जिन असावी. पॅट मार्जिन याहूनही कमी आहे. नुसत्या आकड्यांवरून बोलायचे झाले तर रॉमटेरीअल कॉस्ट वाढल्याने कन्सॉलिडेटेड ग्रॉस मार्जिन २५% वरून १८-२०% आली आहे. (रॉ मटेरीअल कॉस्ट सेल्सच्या ७५% ते ८०%-८२% गेली आहे) गेल्या चार वर्षात रिलायन्सचा सेल (स्टँडअलोन आणि कन्सॉलिडेटेड) जवळ-जवळ २०% आणि पॅट जवळ-जवळ ८-९% नीच वाढला आहे.
पण नुसत्या आकड्यांवरून आपण फक्त तर्क करू शकतो. त्या सेक्टरची इत्यंभूत माहिती असलेले तज्ञ अधिक विश्लेषण देऊ शकतील.

प्रसाद भागवत's picture

27 Feb 2015 - 8:34 am | प्रसाद भागवत

श्री. सुधीरजी,खुप अभ्यासपुर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद

सुधीर's picture

27 Feb 2015 - 6:32 pm | सुधीर

जी नको हो... हिंदी वाटतं :) तुम्ही अनुभवाने आणि वयाने थोर आहात... फक्त सुधीर चालेले.

सुधीर जी's picture

4 Mar 2015 - 4:32 pm | सुधीर जी

सुधीरजी मि आहे, मला सुधीरजी बोललेले चालेल

काळा पहाड's picture

13 Mar 2015 - 11:41 am | काळा पहाड

तुम्हाला सुधीरजीजी म्हटलं जाईल.

सुधीर's picture

13 Mar 2015 - 9:41 am | सुधीर

ग्रॉस रिफायनरी मार्जिन वाढण्याची चिन्ह आहेत..

http://www.business-standard.com/article/opinion/ril-higher-grms-to-boos...